Wednesday, March 16, 2011

आयचाघोरसचा सिद्धांत

तुला ल सा वि चा अर्थ समजत नसताना
तू माझा म सा वि(कायला) काढलास
लाज वाटत नाही? त्रिज्या मेली तुझी
कोन वाकला आणि वर्गमुळ खपलं

चौकोनात फिरणार्‍या तुला
वर्तुळात त्रिकोण काढून
नव्वद अंशातून बगितलं हळूच
टँजंट का मारलास मला?
मी भेदतच होतो परिघ

शेवटी षटकोनातून बाहेर पडलास तू
पोटरूपी वर्तुळावर "पाय" (२२/७) देऊन काय साधलंस?
शेवटी कितीही वेगात फिरली
तरी अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो
अक्ष तोच राहतो (हे एको होतंय असं समजावं)

4 comments:

  1. आयचाघोरसचा सिद्धांत
    नाव पण भारी

    ReplyDelete
  2. प्रचंड भारी! :D

    ReplyDelete
  3. श्री. मंदार आपण माझ्या सुपिक मेंदूतून निघालेलं शिर्षक वापरून कॉपीराईट कायदा भंग केलेला आहे. तस्मात आपण मला 'रॉयल टी' द्यावी. अन्यथा घरी नेवून पाजावी.

    त्रिज्या मेली तुझी
    कोन वाकला आणि वर्गमुळ खपलं

    >> या गणिती शिव्या प्रचंड आवडल्या. तशीच वेळ आल्यास मी यांचा वापर करेन.

    ReplyDelete