Showing posts with label चित्रपट हिंदी. Show all posts
Showing posts with label चित्रपट हिंदी. Show all posts

Tuesday, June 20, 2023

पिढीनिरपेक्ष अभिरुची

माझ्या तीर्थरुपांनी मला लावलेली इंग्रजी सिनेमाची सवय मी चिरंजीवांना लावली. त्यातूनच अधुनमधून कंटाळा आला की जेम्स बाँडचा एखादा सिनेमा लावा असा मस्का लावला जातो. अशीच एकदा अशीच शिफारस झाल्यावर मी Moonraker हा Roger Moore चा सिनेमा लावला. 

ताबडतोब चिरंजीवांच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि म्हणाला बाबा हा नाही हो, तो आधीचा जेम्स बाँड लावा. त्याला Sean Conneryचे नाव पटकन आठवेना म्हणून 'आधीचा जेम्स बाँड'. मला अगदी रिमोटने बदलायचाही आळस म्हणून म्हणालो आधीचा कोण? तर म्हणजे सगळ्यात पहिला जेम्स बॉन्ड होता ना तो. तो जास्त डॅशिंग आणि जबरा बॉन्ड आहे ना बाबा, म्हणून.


हिंदू घरात वाढलेल्या मराठी माध्यमातल्या ज्या मुलाला सिनेमातलं इंग्रजी फारसं कळत नाही त्याला जेम्स बॉन्डची भूमिका उत्तम करणारा नट कोणता आणि चालसे  नट कोणता याची जाण असेल, तर छोट्या आणि मोठ्या पडद्यावरचं रामायण कसं असावं, चांगलं/वाईट काय याबद्दल त्याला किंवा त्याच्या 'जनरेशनच्या' वयाच्या मुलांना किती जाण असेल याचा निर्णय परस्पर कुणीही घेऊ नये. 

माझं भाग्य थोर की मी मुलांना तो आदिघाणेरडा आणि आदिबुद्धीमंद प्रकार दाखवला नाही, नाहीतर मला मुलांच्यासमोरच मान खाली घालायची वेळ आली असती. तसंही सगळ्यांच्या तोंडी असलेले काही संवाद ऐकवून झाल्यावर "शीssss ब्यॉकsss बाबा काहीही काय हो दाखवता!" असा उद्धार झालाच आहे.

टीपः मुलं रामानंद सागर कृत रामायण जनरेशनची नक्कीच नाहीत. मुलांनी सिया के राम मालिका थोडीशी आधी बघितली होती, आणि मग रामानंद सागर यांची रामायण पुनर्प्रसारित झाल्यावर. त्याच सुमारास कधीतरी लेजेन्ड ऑफ राम हा सिनेमा सुद्धा. त्यामुळे जनरेशनच्या गप्पा नकोत. आक्रमक भाषा, साधी भाषा, आणि टपोरी भाषा यातला फरक त्यांना नक्कीच कळतो.

#आदिपुरुष #AdipurushReview #adipurushmovie #Adipurush #JamesBond #SeanConnery #RogerMoore

© मंदार दिलीप जोशी

Tuesday, June 21, 2022

मिथुनदांची हास्यजत्रा - जीने की आरझू

एक सपेरा असतो तो राकेश रोशनच्या एरियात ट्रेसपासिंग करत असतो. त्याला राकेश रोशन 'वा' करतो म्हणून तो बीन बजाके त्याच्या पाळीव नागाला राकेश रोशनवर सोडतो. 

मग राकेश रोशन ओरडून त्याच्या ओळखीच्या...दिल करकचून थाम के बैठीये...हत्तीला बोलावतो. इतके इच्छाधारी नाग आहेत म्हणून प्रेक्षकांना बोअर होऊ नये म्हणून एक इच्छाधारी हत्ती आणलाय.

तर तो इच्छाधारी हत्ती नागाला सोंडेने लांsssब फेकून देतो आणि सपेऱ्याला ढिशुम करतो. 

इतकंच नव्हे, मेहेरबान कदरदान, दिल करकचून थाम के बैठीये, तो हत्ती त्या सपेऱ्याच्यात हातातली 'बीन' घेऊन स्वतः वाजवतो आणि आपल्या दोस्तीतल्या नागाला सपेऱ्यावर सोडतो आणि तो नाग त्या सपेऱ्याला चावून खतम करतो. 

मात्र तो सपेरा मरण्याच्या आधी आपल्या मुलाला म्हणजे मिथुन चक्रवर्तीला लांबलचक भाषण देतो. त्यावेळी तिथे त्यांची फॅमिली फ्रेंड रती अग्निहोत्री असते. मिथुन पण नाग असतो म्हणे आणि त्याने कुणा बाईला "प्यार केला" तर त्याच्या विषाने ती मरेल त्यामुळे किसीसे प्यार मत करना असं सांगून तो सपेरा (एकदाचा) मरतो. 

मिथुनला अचानक आठवतं की आपण मघाशी रानात शेण खायला गेलो होतो तेव्हा बिंदीया गोस्वामीला 'प्यार करून' आलोय. तो धावत जातो तेव्हा बिंदीया गोस्वामी काळीनिळी होऊन मरून पडलेली असते.

पुढे ऐका. दिल करकचून थाम के बैठीये. बिंदीया गोस्वामी राकेश रोशनची बहीण असते. आणि रती अग्निहोत्री आणि राकेश रोशनचं लफडं असतं.

आहेकिनै मज्जा.

मग मिथुनने आणखी एकीला प्यार करून निळी केल्यावर राकेश रोशनला संशय येतो आणि दोघांची हाणामारी होते. मिथुन मनुष्यरूपातच राकेश रोशनला चावायला जातो (शी घाणेरडा) तर राकेश रोशन बाजूला झाल्यामुळे चुकून एका केळीच्या झाडाला चावतो आणि ते झाड निळं पडतं. हे पाहून मी उगाचच हातातलं केळं खाली ठेवलं.

नंतर हृतिकचे पप्पा आणि रती अग्निहोत्री यांचं एक द्वंद्वगीत असतं. त्यात हत्तीला कंपनी म्हणून एक साक्षर माकड पण असतं. राकेश रोशनच्या वतीने परस्पर, त्याने काहीही न सांगता ते माकड हत्तीच्या अंगावर "मुझे माफ करो" असं लिहून रतीला दाखवून येतं. मग रती पाघळते. नंतर मिथुनला रती अग्निहोत्रीवर प्यार आता हय तेव्हा रतीचे साक्षर माकड मिथुनवर मुंगूस सोडतं आणि रतीला वाचवतं. 

 इंग्रजीत Arjoo ऐवजी ArZOO का लिहिलंय ते तेव्हा मला कळलं. या स्टेजला मला वाटून गेलं की सिनेमा संपता संपता पेंग्विन पण येऊन जाईल. पण तसा काही चिमित्कार बघायला नाही मिळाला.

शेवटी एकदा शंकराच्या देवळातला नाग मिथुन चक्रवर्तीला चावतो आणि त्याला पूर्णपणे माणसात आणतो आणि सिनेमा संपतो. 

🖋️ मंदार दिलीप जोशी

Sunday, March 20, 2022

काश्मीर फाईल्स ― एक अचर्चित मुद्दा














काश्मीर फाईल्स में सबसे महत्वपूर्ण संवाद क्या है? थोडा स्पेसिफिक पूछता हूं, काश्मीर फाईल्स में प्रोफेसर राधिका मेनन के हिस्से का सबसे महत्वपूर्ण संवाद क्या है?

यदि आप कहेंगे की "सरकार उनकी है पर सिस्टम तो हमारा है!" यह डायलॉग सबसे महत्वपूर्ण है तो आप सत्य से पृथक बात नहीं कर रहे. किंतु मुझे कुछ दूसरी बात इंगित करनी है.

चलीये आप उत्तर दें इससे पहले मैं कुछ कहता हूं. 

हम पाठशाला में हो, महाविद्यालय में हो अथवा किसीं बिझनेस स्कूल में हो, शिक्षकों का स्थान हमारे मातापिता के समकक्ष होता है. हम उन्हे सदैव सर, मॅडम, टीचर, प्रोफेसर कहके पुकारते हैं. 

JNU या कहीं भी, गांव से युवक आते हैं जिन्होने अपने आसपास कभी लडकियो से खुलकर बात नहीं की, कभी मिश्र ग्रूप में सोशलाईझ नहीं किया, उसे एक ४० के आसपास की 'ओल्ड वाईन' कॅटेगरी में आनेवाली, खुले बालवाली, husky आवाजवाली महिला, जो एक कॉलेज में प्रोफेसर है जब उसका स्टुडेंट उसे "प्रोफेसर" कहके संबोधित करता है, तो वो एक विशिष्ट seducing आवाज में कहती है कि, 

"Please, call me Radhika".

अब बताईए, काश्मीर फाईल्स में प्रोफेसर राधिका मेनन के हिस्से का सबसे महत्वपूर्ण संवाद क्या है? जी, "Please, call me Radhika".

लिबरंडू तथा बडी बिंदी गँग का युवकों को अपने चंगुल में फ़ंसाये रखने का एक प्रयोगसिद्ध आयडिया. नजदिकी बढाने का पैतरा.

© मंदार दिलीप जोशी
फाल्गुन पौर्णिमा, होळी

Monday, December 27, 2021

मदर इंडिया - सिनेमा की प्रचारतंत्र?

अजूनही, अजूनही नवा सिनेमा लागला की लॉकडाऊनने कावलेले लोक कधी एकदा जाऊन थेटरात सिनेमा बघतोय असं करतात. मग दीड वर्षापूर्वीच बॉलीवूडला धडा शिकवायची शपथ घेतलेली सोयीस्कर विसरली जाते.

आज थोडं मदर इंडिया सिनेमाकडे नॅरेटिव्हच्या दृष्टीकोनातून बघूया.

Mother India Radha Meets Lala

मेहबूब प्रोडक्शन्सचं बोधचिन्ह डावीकडे बघा, अधिक काही सांगायची गरज नाही. प्रतीके वापरून लोकांच्या मनात द्वेष पेरणी कशी करावी, फॉल्टलाईन्सचा फायदा कसा घ्यावा याचं हे उत्कृष्ठ उदाहरण आहे. यासाठी एकच दृश्य उदाहरणार्थ घेऊया. या दृश्यात गावातला व्यापारी, सावकार "लाला", मदत मागायला आलेल्या गरीब "राधा"कडे वासनांध नजरेने बघतोय. राधा ओलेती, चिखलाने माखलेली दाखवली आहे, थोडक्यात कपडे पूर्ण घातलेले असले, तरी स्त्रीदेहाचा उभार व्यवस्थित दिसेल असं दाखवलं आहे. 

  • या दृश्यातला लाला हा 'लाला' आहे, शेटजी आहे तर त्याने एखाद्या ब्राह्मणासारखी शेंडी का ठेवलेली दाखवली आहे?
  • खांद्यांवर भगवी शाल कशासाठी?
  • दोघांच्या मधे बघा. फोकसमधे नसल्याने नीट दिसत नाही, पण राधाकृष्णाची तसबीर व्यवस्थित दिसते आहे. 

सिनेमाबद्दल जागृती आत्ता आत्ता निर्माण झाली आहे, पण तेव्हा भोळ्या मनांत (gullible minds) काय चित्र निर्माण झालं असेल या गोष्टी पाहून? 

"सावकारी पाश" हे ग्रामीण भागातील सत्य आहेच, पण त्याही पेक्षा शहरी भागातील कारखान्यात काम करणारे कामगारांत जबरदस्त दहशत असलेली "पठाण" नामक एक खाजगी सावकारी करणारी जमात मात्र हिंदी सिनेमावाल्यांना कधी दिसली नसावी. दिसली असणारच, मात्र या जमातीला व्यवस्थित दडवलं गेलं. आता हे पठाण कोण होते हे वेगळं सांगायला नको. त्यांना  कर्जवसूली करायला माणसं ठेवायची आणि कायदेशीरपणे वकील आणि पोलीस घेऊन गरजच पडायची नाही. कर्जाळू कामगारांच्या येण्याजाण्याचा रस्ताही त्यांना ठावूक असायचा आणि तारखेची आठवण करायला किंवा वेळेत न फेडल्यास  कर्ज घेणार्‍यांची गचांडी धरायला तो रस्त्यातच उभा असायचा (काही मराठी चित्रपटांत बघितल्याचं आठवतं, पण तिथेही तो कनवाळू दाखवायचे. आठवा: भावे साहेबांचा बालगंधर्व). 

असं असताना कम्युनिस्टांची लाल चादर पांघरलेल्या या सिनेमातल्या लांडग्यांना पठाण दिसलेच नाहीत, यात काही नवल नाही. किंबहुना, कुणाला ते दिसू नयेत, म्हणूनच लाल चादर पांघरली जायची. 

असेच जुने सिनेमे कधी बघाल, तेव्हा अशा विसंगती दिसतील त्याची नोंद ठेवा. आणि जमल्यास लिहा सुद्धा. 

© मंदार दिलीप जोशी
मार्गशीर्ष कृ अष्टमी, शके १९४३



Monday, August 17, 2020

बॉलिवुडचे तरुण(!) 'तुर्क', काँग्रेस, आणि आंतरराष्ट्रीय लागेबांधे

आज आमिर खान सबंधातली एक बातमी वाचली आणि गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर मधली एक बातमी आठवली.

काँग्रेस पक्ष अर्थात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने तुर्कस्थानात इस्तंबुल इथं आपलं एक कार्यालय उघडल्याची ती बातमी होती. ही माहिती 'इंडियन ओव्हरसीज काँग्रेस' नावाच्या गटातर्फे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे तुर्कीश माध्यमांना देण्यात आली. 'इंडियन ओव्हरसीज काँग्रेस' हा भारताबाहेर राहणाऱ्या काँग्रेस समर्थकांचा एक गट आहे आणि पूर्वी स्व. राजीव गांधींचे खास असलेले आणि आताच राहुल गांधींचे अत्यंत विश्वासू निकटवर्तीय 'हुआ तो हुआ' फेम सॅम पित्रोदा ह्या गटाचे अध्यक्ष आहेत. या कार्यालयाची धुरा मोहोम्मद युसूफ खान नामक एक इसम सांभाळेल. काँग्रेस पक्षाचे सदस्य असलेल्या या मोहोम्मद युसूफ खान या व्यक्तीबद्दल मात्र आंतरजालावर फारशी माहिती मिळत नाही.


हे कार्यालय उघडण्यामागे काँग्रेस पक्षाचा हेतू सांगताना प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं की भारत व तुर्कस्थान यांच्यातले द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत व्हावेत या करता काँग्रेस पक्षाने हा पुढाकार घेतला आहे. यातली गोम अशी की असं करण्याचा राजमार्ग अर्थात भारतीय सरकारची अधिकृत वकीलात तिथे असताना काँग्रेस पक्षाचे आंतरराष्ट्रीय पिल्लू असलेल्या इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या या कार्यालयाचं औचित्य काय?

काही तथ्ये लक्षात घेतली तर काँग्रेस पक्षाची ही कृती किती धोकादायक आहे हे लक्षात येईल. तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांना इस्लामी जगताचा खलिफा बनण्याची सुरवातीपासूनक्सह स्वप्न पडत आली आहेत आणि त्यांनी तुर्कस्थानला मजहबी कट्टरतेच्या दिशेने नेण्यात एकही कसर बाकी ठेवलेली नाही. तुर्कस्थानचे पहिले राष्ट्राध्यक्ष केमाल पाशा अतातुर्क यांनी केलेल्या सुधारणांच्या बरोबर उलट दिशेला तुर्कस्थानला नेण्याचा त्यांनी चंगच बांधलेला आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये काश्मीरातून कलम ३७० निष्प्रभ केल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने बहुसंख्येने हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे सांगत योग्य विधाने केली. मात्र राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांच्या नेतृत्वाखालील तुर्कस्थानने मात्र भारताला या मुद्द्यावर विरोध केला.

राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांची ही पहिलीच खोडी नव्हती. या आधी २०१७ साली एप्रिल ३० ते १ मे या कालावधीत भारत दौऱ्यावर असताना काश्मीर प्रश्नावर बहुपक्षीय चर्चा व्हावी असे विधान करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. यात लक्षणीय बाब अशी की २००२ साली राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळताना मात्र त्यांनी काश्मीर प्रश्न शिमला कराराअनुसार द्विपक्षीय चर्चेनेच सोडवला जावा अशी भूमिका घेतली होती. अर्थात पाकिस्तान ज्याप्रमाणे काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पटलावर मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो त्याच प्रमाणे तुर्कस्थानच्या ग्रीसशी असलेल्या वादात ग्रीस सायप्रस बाबत तेच करत असतो ही पार्श्वभूमी त्या भूमिकेमागे होती. पण हा यु टर्न भारतासाठी आश्चर्यकारक असल्याने त्यावेळी भारताकडून या विधानाचा स्पष्ट शब्दात निषेध नोंदवण्यात आला होता व काश्मीर प्रश्न हा द्विपक्षीय मामला असल्याचे भारताने ठामपणे पुन्हा सांगितले होते.

अवांतर: याच दौऱ्यात एर्डोगन महाशयांना जामिया मिलिया इस्लामीया विद्यापीठातर्फे मानद पदवी प्रदान करण्यात आली, आणि तेव्हा त्यांनी तुर्कीश भाषेत भाषण केले होते.

इतर इस्लामिक देश - जरा सुधारणा करतो - अनेक अरब देश राष्ट्रहिताकडे डोळा ठेऊन भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यास प्राधान्य देत असताना इस्लामी जगताचे नेतृव करण्याची स्वप्ने बघणारा तुर्कस्थान आणि पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खानने शब्द टाकला म्हणून इस्लामी जिहादी विचार पसरवणाऱ्या झाकीर नाईकला आश्रय देणारा मलेशिया हे मजहबी कट्टरतेकडे झुकलेले देश मात्र काश्मीर प्रश्नावर सातत्याने इस्लामी दहशतवादाचा कारखाना असलेल्या पाकिस्तानला पाठिंबा देताना दिसतात.  हाच झाकीर नाईक राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांची उघडपणे इस्लामची तळी उचलल्या बद्दल तोंड फाटेस्तोवर स्तुती करतो.आता तुर्कस्थान, मलेशिया आणि पाकिस्तानच्या महाआघाडीत आता ओमानही आपली सुन्नी कट्टरता पोसायला सामील झाला आहे. राजकीय पाठिंबा इथवर ही गोष्ट थांबत नाही. भारताने एर्डोगन पाठिंबा सेट असलेल्या टर्किश संघटनांकडून काश्मीर व केरळमधल्या कट्टरतावादी इस्लामी संघटनांना पुरवला जाणारा पैसा या बाबतीत अनेकदा निषेध नोंदवलेला आहे.

अवांतर: हे लिहीत असतानाच अरब देश भारताशी मित्रत्वाचे संबंध ठेवण्यास उत्सुक आहेत हे दर्शवणारी एक आश्वासक बातमी आली. बहारीनमध्ये गणपतीच्या मूर्तीची नासधूस केल्याच्या आरोपावरुन एका बुरखाधारी महिलेवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. एर्डोगन मजहबी कट्टरतेची खुर्ची आपल्याकडे खेचून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न का करत आहे हे देखील अशा घटनांतून मिळणार्‍या संकेतांमधून  कळते. 

या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसने तुर्कस्थानात आपलं कार्यालय उघडणं हे निव्वळ संशयास्पदच ठरत नाही तर सरळ सरळ देशविरोधी भूमिका ठरते. पण मनमोहन सिंग पंतप्रधान आणि प्रत्यक्षात घटनाबाह्य सत्ताकेंद्र सोनिया गांधी अशी व्यवस्था राबवणाऱ्या काँग्रेसने अधिकृत भारतीय वकीलात असताना त्याला वळसा घालून वेगळं कार्यालय उघडण्यात खरं तर काहीच आश्चर्य नव्हे. कायम भारताच्या हिताला बाधा पोहोचेल अशी विधाने व कृती करणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून ऑटोमन साम्राज्याच्या दिशेने जायची इच्छा बाळगणाऱ्या मजहबी कट्टर एर्डोगन यांच्या देशात वेगळे कार्यालय उघडणे हे काँग्रेसच्या बाबतीत नैसर्गिकच म्हणायला हवे.

अवांतर: २०१९ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७४व्या सर्वसाधारण सभेच्या वेळी न्यू यॉर्क पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान, मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद आणि आपले उत्सवमूर्ती एर्डोगन हे भेटले आणि या भेटीत त्यांच्यात 'इस्लामोफोबिया' शी लढायला एक टीव्ही चॅनल सुरू करण्यावर एकमत झालं.

आता आमिर खानच्या बातमीकडे वळूया.

बॉलिवूड आणि त्याला पोसणाऱ्या पाकिस्तानी अंडरवर्ल्डचे संबंध आता काही गुपित राहिलेले नाहीत. तथापि इतर कट्टर मजहबी देश आणि बॉलिवूड यांच्यातल्या संबंधांबाबत फारशी माहिती उजेडात येत नाही. गेलाबाजार पीके सिनेमात भगवान शंकरांच्या बाबतीत खोडसाळपणा करणाऱ्या, हिंदू देवळांच्या बाबतीत डोस पाजणारा, आणि एकंदर हिंदू धर्माबद्दल यथेच्छ गरळ ओकणारा आमिर खान हज यात्रेला जाऊन तिथे विविध देशातील मौलवींची गळाभेट घेताना फोटो चमकवतो त्याला प्रसिद्धी मिळते, पण ते तेवढंच. न्यू इअर पार्टी करून साजरे करण्याचे खूळ भारतात पुरेपुर असताना एकेकाळी उदारमतवादी व प्रगत होऊ बघणारा तुर्कस्थान हा बॉलिवुडमधल्या मंडळींच्या आवडत्या देशांपैकी एक देश आहे. आजही तिथे अनेक नाईटक्लब आहेत. अशाच एका नाईटक्लबात ख्रिस्ती नवीन वर्षाच्या स्वागत पार्टीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात झालेल्या गोळीबारात बॉलिवूडचे चित्रपट निर्माते अबिस रिझवी आणि त्यांची मैत्रीण खुशी शहा हे मृत्युमुखी पडल्याचे वृत्त वाचलं आणि पहिल्यांदा बॉलिवूडच्या टर्किश कनेक्शनकडे लक्ष गेलं.

तर आमिर खान सबंधातली ती बातमी कोणती? तर फॉरेस्ट गम्प या टॉम हँक्स अभिनित हॉलिवूडच्या प्रसिद्ध चित्रपटाची नक्कल असलेल्या लालसिंग चढ्ढा या आपल्या सिनेमाचे शेवटचे काही चित्रीकरण आटपण्यासाठी आमिर खान तुर्कस्थानात होता. ही संधी साधत आमिरने १५ ऑगस्ट रोजी आपली द्वितीय हिंदू पत्नी किरण राव हिच्यासह राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांची पत्नी इमिन एर्डोगन यांची हुबेर मॅन्शन या त्यांच्या अध्यक्षीय प्रासादात भेट घेतली. आपल्या पानी फाउंडेशन या आपल्या एनजीओच्या दुष्काळ निवारण व पाणी संवर्धनाच्या क्षेत्रातल्या कामाची माहिती देण्यासाठी ही भेट होती असे समजते. श्रीमती एर्डोगन यांनी आमिर खानची तो आपल्या चित्रपटांमधून 'सामाजिक प्रश्नांची' धाडसी मांडणी [courageous handling of social problems] (!) केल्याबद्दल स्तुती केली.

ही भेट इथली साधी सरळ असणार असे समजण्याचे काहीच कारण नाही. कारण आपल्या नव-ऑटोमन धोरणानुसार चालणाऱ्या तुर्कस्थानने दक्षिण आशियातल्या मुसलमानांत आपला प्रभाव वाढवायला सुरवात केली आहे. आधी उल्लेख केल्याप्रमाणे राष्ट्राध्यक्ष एर्डोगन हे स्वतःला गैर-अरब इस्लामी जगताचा खलिफा किंवा सम्राट म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. याच धोरणाचा भाग म्हणून मलेशिया आणि पाकिस्तानशी संधान बांधलं असून या देशांच्या मदतीने दक्षिण आशिया व प्रामुख्याने भारतीय मुसलमानांना लक्ष्य करून तिथं आपलं कट्टर इस्लामी प्रभावक्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. आमिर खान व एर्डोगन पत्नीची भेट ही या परिप्रेक्ष्यात बघितली पाहिजे.

एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा अशीच परिस्थिती या खानावळीची असली तरी पाकिस्तानला गुड नेबर अर्थात चांगला शेजारी म्हणणारा शाहरुख खान आणि उघड गुंडासारखी वागणूक ठेऊन ती झाकायला बिइंग ह्युमन काढणारा हरणमाऱ्या सलमान खान यांच्यापेक्षा भारतीयांच्याच जीवावर कोट्यवधी कमावून मग २०१५ साली बायकोला भारतात असुरक्षित वाटतं असं साळसूद विधान करणारा आणि दक्षिण आशियाई देशांत इस्लामी कट्टरतेचा प्रभाव वाढवू बघणाऱ्या एर्डोगन यांच्या पत्नीची भेट घेणारा आमिर खान हा जास्त धोकादायक वाटतो.

ही सगळी माहिती आणि बातम्या अर्थातच उघड आहेत, म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये आहेत, तरी राष्ट्रीय महत्वाच्या प्रश्नांपेक्षा बॉलिवूडच्या चाळ्यांना अधिक प्राधान्य देणाऱ्या जनतेला त्याचं महत्व आणि धोक्याची जाणीव झालेली दिसत नाही. आज एका नटाच्या संशयास्पद मृत्यूने पेटून उठणाऱ्या त्याच्या चाहत्यांनी आणि तो कोण होता याची अचानक जाणीव झालेल्या इतरांनी बॉलिवूडमधली घराणेशाही, नेपोटीझम, वगैरेंत यथेच्छ डुंबून झाल्यावर त्याच्याकडे कसलेसे स्वामित्व हक्क म्हणजेच पेटंट होते आणि ते चोरले गेले वगैरे जागृती आली. हे प्रकरण आणि जे या मृत्यूस कारणीभूत ठरले आहेत किंवा यात गुंतले आहेत असे जे आरोप होत आहेत ते बघता एक-दोन संशयास्पद मृत्यू आणि बॉलिवूडच्या ताऱ्यांचा पाकिस्तानी अंडरवर्ल्डशी संबंध इतका आपल्या माहितीचा परीघ मर्यादित न ठेवता देशविरोधी शक्तींशी बॉलिवूडचे आंतरराष्ट्रीय संबंध या विरोधात व्यापक जनजागृती होण्याची आवश्यकता आहे.

या परिप्रेक्ष्यात बघितल्यास काँग्रेस पक्षाचे तुर्कस्थानात वेगळे कार्यालय उघडणे आणि तुर्कस्थानच्या मजहबी कट्टर राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीशी आमिर खानच्या अहो रुपम अहो ध्वनी थाटाच्या गप्पा या एकटीदुकटी घटना उरत नाही, तर एका मोठ्या सुनियोजित आणि दीर्घकाळ चालणाऱ्या भारत आणि हिंदूद्वेषी राजकारणाचा एक भाग असल्याचं स्पष्ट होतं.

मात्र काँग्रेसच्या वळचणीला जाणाऱ्या नवनिधर्मांध पक्षांच्या लक्षात हे दुवे आलेले तरी दिसत नाहीत किंवा लक्षात येऊनही दुर्लक्ष केलं जातं आहे. ही बाब अशा पक्षांच्या अस्तित्वासाठी ही धोक्याची घंटा आहे हे नक्की. पण तो विषय वेगळा. 

चीनी व्हायरसमुळे उद्भवलेल्या नव्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज अनेक लोक अनावश्यक गोष्टींचा त्याग करत असताना आपणही अशी यादी तयार करून अशा अनावश्यकच नव्हे तर राष्ट्रविघातक गोष्टींना अंगावर बसलेल्या माशीप्रमाणे झटकून टाकणे आणि शक्य झाल्यास ठेचणे आवश्यक आहे.

© मंदार दिलीप जोशी
श्रावण कृ १३, शके १९४२


Monday, June 29, 2020

मराठी चुड़ैलों की फिल्मोंं में कमी

आप को कदाचित पता होगा कि अनुष्का शर्मा की संस्कारी चुड़ैलों की ट्रायलॉजी में तीसरी फिल्म है, बुलबुल. फिल्लौरी, परी और अब बुलबुल. एक पंजाबी, एक बांग्लादेशी और एक बंगाली चुड़ैल.

मुझे एक बात की शिकायत है अनुष्का शर्मा से. वैसे उनके पती विराट से भी है की वो मराठीयों को टीम में ज्यादा लेते नहीं हैं। यही शिकायत अनुष्का से भी है।

ब्रूस विलीस की डाय हार्ड अर्थात कडक मृत्यू फिल्मो के तीन भाग होते होते लगा था चरम पर सिरीज खतम हो गयी है। परंतु नहीं। गन्ने के भूत से भी रस निकालने की कला तो हमें अवगत है परंतु उस कला का फिल्मो में यशस्वी प्रयोग हॉलिवूड ने ही किया है। ऊन्होने ऑफिसर मक्लेन के किरदार को रबरबँड से अधिक खिंचते हुए चौथे भाग में बेटी एवं पांचवे भाग में बेटे का किरदार को लेकर दो और फिल्में बना डालीं। 

उसी प्रकार संस्कारी चुड़ैलों के सिरीज में चौथी फिल्म में चुड़ैल को मराठी दिखा सकते हैं।  वैसे मेरे मस्तिष्क में इस रोल के लिये तीन महिलाओं का नाम है परंतु वो अपने समाजसेवा एवं राजनीती के अच्छी खासी आमदनी के क्षेत्रों को छोडकर फ़िल्मों में आने के लिये तैय्यार होंगी भी या नहीं पता नहीं। खैर कुछ ना कुछ जुगाड़ हो जायेगा।

वैसे अजिंक्य रहाणे से पता चला है की विराट को मराठीयों से विराट को वैसे तो कोई समस्या नहीं हैं परंतु उनका कहना है की मराठीयों की गालियाँ उतनी पॉवरफुल नहीं लगतीं जितना पंजाबीयों की जाकर दुष्मन को चुभती हैं। मैं फेसबुक के माध्यम से उनको बताना चाहता हूं कि ऐसा कतई नहीं है। 

मुझे लगता है कि ऐसी ही कोई शिकायत अनुष्का शर्मा को होगी। उन्हें लगता होगा कितना भी मेकअप कर लो मराठी अभिनेत्रीयां उतनी डरावनी नहीं लगेंगी। तो मैं उन्हें आश्वस्त कर देना चाहता हूं कि मैने उपर जिन तीन महिलाओं की बात की है उन्हे देखकर स्वर्गीय रफी साहब के 'उन्हे देखकर रो रहे हैं सभी' गाने की याद आ जायेगी। और तो और मेकप की भी आवश्यकता नहीं पडेगी। 

परंतु उनका नाम अभी नहीं बता सकता। कमिशन का प्रश्न है। और सायनिंग अमाउंट पसंद नहीं आया तो मुझे बंगले पर ले जाकर....खैर....आप पहले अनुष्का से चौथे सिक्वेल के एमओयु अर्थात मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग पर साइन तो करवाईए।

🖋️ मंदार दिलीप जोशी
आषाढ शु. ९, शके १९४२

बहिष्कारापेक्षा जालीम उपाय

बहिष्कारापेक्षा जालीम उपाय सांगतो. यापुढे सिनेमावर पोस्ट लिहिताना काही जेष्ठ हिंदी चित्रपट अभिनेत्यांच्या नावाआधी त्यांच्या वयाचा उल्लेख करावा.

उदाहरणत:
५४ वर्षीय शाहरुख खान व ३४ वर्षीय दीपिका पदुकोण एका नव्या सिनेमात झळकणार आहेत. यापूर्वी हे दोघे अनुक्रमे ४७ वर्ष व २७ वर्षे वयाचे असताना चेन्नई एक्स्प्रेस या सिनेमात आपल्याला दिसले होते. दीपिकाच्या धाकट्या भावाची भूमिका ४९ वर्षांचे सैफ अली खान करणार आहेत.

या सिनेमात ५४ वर्षीय सलमान खान आपल्याला तरुण कॉलेज प्राध्यापकाच्या पाहुण्या भूमिकेत दिसणार आहेत. यात ते दीपिकाच्या जराच मोठ्या असलेल्या भावाच्या भूमिकेत दिसणार असून त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत चाळीशी गाठलेल्या करीना सैफ अली खान दिसतील.

चित्रपटाची कथा गुप्त ठेवण्याचा प्रयत्न झाला असला तरी आमच्या वार्ताहराने काढलेल्या बातमीनुसार कथावस्तू एका तरुण शास्त्रज्ञाच्या संघर्षाभोवती गुंफलेली असून ती त्यातून नायक व त्याचे समवयस्क सहकारी कसे मार्ग काढतात या भोवती फिरते.

🖋️ मंदार दिलीप जोशी
आषाढ शु. ९, शके १९४२

Wednesday, February 12, 2020

बडे अच्छे लगते हैं

काही गाणी अचानक उमगतात, समजतात, आणि खरी वाटू लागतात त्यातलं हे एक.

बड़े अच्छे लगते है...
क्या?
ये धरती, ये नदिया, ये रैना...
...और?
और तुम!


आपल्याला फक्त माणसांबद्दल जिव्हाळा नसतो, तर वस्तू, वास्तू, आणि जागांबद्दलही आत्मीयता असते.

तुम इन सबको छोड़के कैसे कल सुबह जाओगी
मेरे साथ इन्हें भी तो तुम याद बहुत आओगी


काही जुने इंग्रजी आणि त्यावरून ढापलेले हिंदी सिनेमे बघितले असतील, तर त्यात चारचाकी गाडीला जीव किंवा स्वतःचं मन आहे या मध्यवर्ती कल्पनेभोवती चित्रपटाची कथा फिरत असे हे नक्की आठवेल. अनेक कठीण प्रसंगांतून ती गाडी आपल्या मालकाला किंवा त्याच्या मुलाला बाहेर काढत असे. जगात सुष्ट शक्ती आहेत तशाच दुष्ट शक्ती सुद्धा म्हणून एका चित्रपटात एक दुष्ट खुनशी काळी गाडी  'मुख्य भूमिकेत' दाखवण्यात आली होती.

मगर सच्चे लगते हैं,
ये धरती, ये नदिया, ये रैना,
और?
और तुम!


आपली गाडी, शाईचे निबाचे पेन, म्युझिक सिस्टिम, अगदी वॉशिंग मशीन सारख्या घरगुती वस्तू या आपण एकहाती रहाव्या असं म्हणतो त्यामागे व्यक्तीपरत्वे वापरण्याची पद्धत बदलत असल्याने वस्तूंची झीज लवकर होऊ शकते, वस्तू लवकर बिघडू शकते हा साधा तर्कशुद्ध विचार आहे, पण त्यापलीकडे जाऊन माणसांना जशी माणसांबरोबरच निर्जीव वस्तूंबद्दलही जिव्हाळा असतो तसाच जिव्हाळा झाडं, नदी, आपल्या गावची माती अशा वस्तूंनाही माणसांबद्दल वाटू शकतो असं मला तरी वाटतं.

एखादी स्कुटर फक्त आपल्याच लाथेने सुरू होते, तर एखाद्या जुन्या टीव्हीला त्याच्याच मालकाने टपलीत मारल्यावर सुरू व्हायची खोड असते. एखाद्या सवयीच्या किंवा आवडीच्या झाडाखाली आपण बसलो तर एरवी माणसं पाहताच तिथे न फिरकणारे पक्षी आपल्या डोक्यावर घोंघावू लागतात आणि आपण त्या झाडाच्या आणि ते झाड आपल्या सानिध्यात शांतावल्यासारखं वाटतं, तर कधी नदीच्या किंवा स्वच्छ पाण्याच्या ओढ्याच्या संथ वाहणाऱ्या पाण्यात पाय सोडून बसल्यावर लहानगे मासे पायांभोवती निर्धास्त घोटाळू लागतात. कधी वाहतं पाणी पायाशी घुटमळून तळपायाला गुदगुल्या करुन पुढे गेल्याचा भास होतो. वर्षभर बंद असणारं आपलं गावाकडचं घर कुटुंबासहित कुलूप उघडून आत शिरल्यावर एकदम जिवंत होऊन उठतं तर कधी तेच घर आपण एकटे गेल्यावर 'बाकीचे कुठे आहेत, मुलं दिसत नाहीत ती..मग बरोबर मंडळी पण नाही आली ते', असं अपूर्णतेने व्याकूळ होऊन विचारतंय असा भास होतो.

ओ माझी रे, जइयो पिया के देस
ढोबळ विचार केला तर इथे पिया का देस म्हणून फक्त प्रिय व्यक्तीचा देस नव्हे तर आपलं शहरातलं किंवा गावाकडचं घर, अगदी बरीच वर्षे काम करत असलेलं ऑफिस, मित्रांबरोबर चकाट्या पिटायची जागा, देऊळ आणि त्यापुढंचं पटांगण, असं काहीही असू शकतं. जी जागा आपला भावनिक कम्फर्ट झोन असते, तोच पियाका देस.

फक्त ते आपलं असायला, वाटायला हवं. ते नातं सहजीवनाला पूरक अर्थात symbiotic असलं तरच हे शक्य होतं, परजीवी म्हणजे parasitic असलं तर नाही. आपण बहुतांशी symbiotic आहोत म्हणूनच आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलं:
अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् |
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ||
 
(महोपनिषद्, अध्याय ४, श्‍लोक ७१)
अर्थात: हा आपला बंधू, तर तो आपला बंधू नव्हे तर परका आहे, असा विचार कोत्या मनाची माणसे करतात. उदार अंत:करणाच्या लोकांकरता हे संपूर्ण जगच कुटुंबासमान आहे.

एका कुटुंबातली लोकं ज्याप्रमाणे वागतात तसं symbiotic वागलं तर माणसं, वस्तू, आणि वास्तूच काय पण संपूर्ण देश तुम्हाला सामावून घ्यायला सरसावतील. Parasitic माणसं मात्र स्वतःच्याही देशात तिरस्करणीय ठरतात. सुज्ञांंस अधिक सांगणे न लगे.

खरंच आहे, काही गाणी अचानक उमगतात, समजतात, आणि नुसतीच वाटू लागत नाहीत तर त्यांचे वेगळे अर्थही लागू लागतात.

🖋️ मंदार दिलीप जोशी
माघ शु, चतुर्थी, शके १९४१

Thursday, January 9, 2020

छपाकच्या निमित्ताने


तुमच्यापैकी अनेक जण जिहादींशी मैत्री ठेऊन आहेत. धक्का बसला? राग आला? पुन्हा सगळे तसे नसतात अशी टेप वाजवायची इच्छा होते आहे? आधी पुढचं वाचा.

लक्ष्मी अग्रवालवर ऍसिड फेकणारा नईम खान लक्ष्मीच्या भावाचा मित्र होता, लक्ष्मी नईमच्या बहिणीची मैत्रीण होती...आणि लक्ष्मीवर ऍसिड फेकण्यात मदत करणारी नईमच्या भावाची प्रेयसी होती.

लक्ष्मी १४ वर्षांची असल्यापासून ३१ वर्षांचा नईम तिने आपल्याशी शय्यासोबत करावी म्हणून तिच्या मागे लागला होता. एक वर्ष प्रयत्न करून थकल्यावर शेवटी नईम खानने त्याच्या मजहबी मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या मदतीने लक्ष्मीवर ऍसिड हल्ला केला. नईमच्या भावाच्या प्रेयसीने लक्ष्मीला बाजारात धरून खाली पाडलं आणि सोबतच्या तीन जिहादींनी मिळून तिच्यावर ऍसिड फेकलं.

आता दुसरा परिच्छेद पुन्हा वाचा.

काही शिकलात का यातून?

🖋️ मंदार दिलीप जोशी

Monday, September 16, 2019

दिग्दर्शन म्हणजे काय

शिरीष कणेकर आपल्या फिल्लमबाजी या एकपात्री कार्यक्रमात म्हणतात, की कुठल्यातरी चित्रपटात माला सिन्हा पहिल्याच सीनमध्ये घागरच्या घागर भरून पाणी नेते, तर पुढे तिची आंघोळ का नाही दाखवली?" यातला विनोदाचा भाग सोडला तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. प्रसिद्ध रशियन लेखक अँटॉन चेकोव्ह याने आपल्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या अनेक पत्रात एक उल्लेख आढळतो. तो म्हणतो की "नाटकाचा एक नियम असावा. पहिल्या अंकात जर तुम्ही भिंतीवर बंदूक दाखवलीत, तर तिसऱ्या अंकात तिचा बार उडालाच पाहिजे. नाहीतर बंदूक दाखवण्याचं प्रयोजन काय?"

लायसन्स टू किल या चित्रपटात जेम्स बॉण्डचा अमेरिकन सीआयएमधला मित्र फिलिक्स लाईटर आणि त्याची पत्नी डेला त्यांच्या लग्नात त्याला त्यांचं आणि त्याचं नाव कोरलेला एक सिगारेट लायटर भेट देतात. जेम्स बॉण्ड लगेच तो पेटवून बघतो तेव्हा त्यातून नेहमीच्या लायटरपेक्षा खूप मोठी आणि लांब ज्योत बाहेर फेकली जाते.

कुणाला अपाय होत नाही पण याचा संदर्भ पुढे सिनेमात कुठेही न आल्यामुळे आपण हे दृश्य जवळजवळ विसरलेलो असतो.

पुढे फिलिक्सने पकडलेला अंमली पदार्थांचा तस्कर अर्थात ड्रग स्मगलर सांचेझ हा डेलावर आपल्या माणसांकरवी बलात्कार करवतो आणि फिलिक्सला गंभीर जखमी करवतो.

याचा बदला म्हणून जेम्स बॉण्ड अर्थातच गुप्तरीतीने सांचेझच्या मागे लागून त्याचं साम्राज्य नष्ट करतो. शेवटच्या मारामारीत ड्रग्स मिसळलेल्या गॅसोलीनने म्हणजे रॉकेलने माखलेला सांचेझ जेम्सला मारायला कोयता सदृश्य शस्त्र उगारतो तेव्हा जेम्स त्याला विचारतो की मी हे सगळं का केलं हे तुला जाणून घ्यायची उत्सुकता नाही का? "Don't you want to know why?" हे ऐकून सांचेझ क्षणभर थांबतो. जेम्स खिशातून तोच सिगारेट लायटर काढून त्याला दाखवतो आणि त्यावरची नावं वाचून डोळे विस्फारलेल्या सांचेझला लायटर पेटवून त्यातून निघालेल्या मोठ्या ज्योतीचा वापर करून पेटवून देतो आणि तिथून निसटतो.

तर, लायटरमधली सर्वसाधारण लायटरपेक्षा कैक पटींनी मोठी असलेली ज्योत का दाखवली हे आपण केव्हाच विसरलेलो असतो, किंबहुना मठ्ठ सिनेमांवर पोसलेल्या आपल्या सिने-मनाला हा प्रश्नही पडत नाही. पण शेवटी याचं उत्तर मिळतं, नव्हे दिग्दर्शक आपल्याला देतो.

याला दिग्दर्शन म्हणतात.

©️ मंदार दिलीप जोशी

Tuesday, May 2, 2017

बाहुबली द कन्क्लुजन - एकदा तरी नक्की पहावी अशी भव्यकलाकृती

मी दक्षिणेतले डब केलेले चित्रपट फारसे बघायला जात नाही. फारसे कशाला, बघतच नाही. चित्रपटगृहातच नव्हे तर घरी सुद्धा नाही. रोजा हा शेवटचा डब केलेला सिनेमा चित्रपटगॄहात जाऊन बघितलेला आठवतो. याला मुरड घालून बघितलेले दोन चित्रपट म्हणजे अर्थातच बाहुबली द बिगिनिंग आणि गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला बाहुबली द कन्क्लुजन.

पहिला भाग बाहुबली द बिगिनिंग काही कारणांमुळे चित्रपटगृहात बघता आला नाही, पण मुलांच्या कृपेने अगणित वेळा टीव्हीवर पारायणे झालेली आहेत. पण टीव्हीवर पाहण्यात मजा नाही हे लक्षात आलेच होते.
चित्रपट निर्मात्यांनी रामायण, महाभारत आणि इतर इतिहासातल्या अनेक घटना आणि घटनाक्रम कथानकात वापरल्या आहेत. निवर्तलेल्या राजाच्या सद्वर्तनी आणि महपराक्रमी मुलाला सत्ता न मिळता अनीती आणि कुमार्गावर चालणार्‍या त्याच्या भावाला मिळणे, त्या सन्मार्गी मुलाने सत्तात्यागच नव्हे तर राजप्रासादाचा सुद्धा त्याग केल्यावरही त्याच्या जीवावर उठलेला अन्यायी भाऊ आणि त्याचे सल्लागार मंडळ, राजघराण्यातली कटकारस्थाने, ऐन वेळी चुकीच्या व्यक्तीचा आदेश ऐकून न्याय्य पक्षावर अन्याय करावा लागणं यात झालेला कटप्पाचा भीष्माचार्य, आणि बैलांच्या शिंगांना लावलेले पेटते पलीते अशा अनेक ऐतिहासिक संदर्भ असलेल्या गोष्टी या चित्रपटात आहेत.

पहिल्या भागात जाणवलेली आणि दुसर्‍या भागात विशेषकरुन ठसठशीतपणे समोर आलेली उल्लेखनीय बाब म्हणजे चित्रपट हे संपुर्णपणे एका हिंदू साम्राज्यावर बेतलेला असून त्यात ठायी ठायी असलेल्या हिंदू देवतांच्या मूर्ती किंवा त्यांची आणि सणांची ठसठशीत प्रतीके व गाणी. या गोष्टी निश्चितपणे डोळे आणि जीवाला सुखावून जातात. याचं विशेष कारण म्हणजे आजवर हिंदीत बनलेले चित्रपट हे प्रामुख्याने धर्मांध आणि कत्तलखोर मुघल राज्यकर्त्यांची प्रतिमा व्हाईटवॉश करण्यासाठीच बनवले गेलेले होते. इतकंच नव्हे, तर नायक, नायिका आणि त्यांचं आख्खं खानदान हिंदू असले तरी चित्रपटात किमान एक कौवाली असणे किंवा प्रेमगीत असल्यास मौला, बुल्ला, खुदा किंवा तत्सम शब्दांची रेलचेल असणे, सिनेमात किमान एक सहृदय शांतीदूत वगैरे अशा गोष्टी पाहून वीट आलेला होता. त्या पार्श्वभूमीवर वर उल्लेख केल्याप्रमाणे हिंदू दैवते व प्रतीके यांची ठसठशीत उपस्थिती दाखवल्याबद्दल संबंधितांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. नाही म्हणायला पहिल्या भागात असलम खान नामक शस्त्रविक्रेत्याची एक व्यक्तिरेखा होती पण त्यातही कटप्पा त्याच्या शस्त्रांचा पाणउतारा करताना दाखवला आहे.

आणखी एक सुखावणारी गोष्ट म्हणजे माहिष्मती साम्राज्याच्या 'राष्ट्रगीता' पासून ते सैन्याला दिल्या जाणार्‍या आदेशांपर्यंत अनेक ठिकाणी संस्कृत शब्दांचा केलेला वापर होय. सातत्याने उर्दू शब्द ऐकून किटलेल्या कानांनी आणि विटलेल्या मनांनी या बदलाचं निश्चितच जोरदार स्वागत केलं यात काही आश्चर्य नाही.
किती जणांच्या लक्षात आलं माहित नाही, पण बैलांच्या शिंगांना पेटते पलीते लावण्याची ही शिवाजी महाराजांची ही एकच कल्पना दिग्दर्शक राजामौलीने वापरलेली नाही. कुंतल देशाच्या राणीचा भाऊ कुमारवर्मामधे शौर्याची भावना उत्पन्न करुन त्याला पराक्रम गाजवायला भाग पाडणारा बाहुबली आणि मदत मागायला आलेल्या बुंदेल नरेश छत्रसालाला स्वतःचं स्थान निर्माण करायला प्रोत्साहन देणारे आपले महाराज यात मला विलक्षण साम्य आढळलं.

चित्रपटातील स्त्रियांचे केलेले चित्रण ही विशेष आवडलेली बाब. सम्राज्याचा गाडा यशस्वीपणे हाकणारी शिवगामिनी तर आहेच, पण कधी संकटसमयी तलवार तर कधी प्रियकरासाठी मोकळा सोडलेला केशसंभार अशी चतुरस्र देवसेनाही आहे. देवसेना स्त्रियांशी वावगं वागणाऱ्या सेनापतीची स्वतः बोटं छाटते, त्यासाठी नवऱ्याची वाट बघत बसत नाही. पहिल्या भागातल्या हिरविणीला अवंतिकाला मात्र या भागात फारसं काम नाही.

दोषच सांगायचे तर दक्षिणेतल्या चित्रपटातील साहसदृश्यात अतिशयोक्ती या शब्दालाही लाजवेल अशी दृश्ये असतात तशी या चित्रपटातही आहेत. बैलांची काही दृश्ये ही VFXच्या दृष्टीने जरा गडबड वाटतात, पण तरीही अंगावर रोमांच यावेत अशी आहेत. बोट हवेतून जाते हे स्वप्नदृष्य (dream sequence) आहे हे नंतर जाणवतं, तिथे संपादन (एडीटींग) दोष असावा असं वाटतं. अगदी रजनीकांतला सात जन्मात जमणार नाहीत अशी अतिशयोक्तीपूर्ण साहसदृश्ये शेवटाकडे आहेत. पण याबाबत माझं जरा वेगळं मत आहे. एक तर हे कथानक काल्पनिक आहे, त्याला कुठल्याही ऐतिहासिक सत्य परिस्थितीचा काडीचाही आधार नाही. शिवाय इतक्या मोठ्या पटलावर या गोष्टी आरामात खपून जातात. आपल्याला चमत्कृतीपूर्ण हॅरी पॉटर चालतो, तर अतिशयोक्तीपूर्ण बाहुबली का चालू नये?

या चित्रपटाच्या निमित्ताने एतद्देशीय राजे व संस्कृती निर्भीडपणे दाखवणारे चित्रपट बनायला सुरवात झाली तर सोन्याहून पिवळं असं म्हणता येईल. खानावळ आणि हीन दर्जाच्या घराणेशाहीने ग्रासलेल्या हिंदीत बनतील अशी अजिबात आशा नाही. पण जे कुणी ते निर्माण करेल, ते करताना या चित्रपटातले दोष हेरून ते दूर करण्याची प्रक्रियाही सातत्याने झाली पाहीजे.

- (भयानक कम्युनल चित्रपट चाहता) © मंदार दिलीप जोशी

तळटीपः चित्रपटाशी करण जोहरचं असलेलं नातं, VFX स्टुडीओ आणि पैसे कुणाकुणाचे लागले आहेत या संबंधातले टोमणे आधीच गृहित धरुन सांगतो, की त्यांचे पैसे वापरुन हिंदू संस्कृती चित्रपटातून दिसत असेल तर मी म्हणतो वापरा बिंधास. काय?

Sunday, February 5, 2017

भन्साळी पॅटर्न


हे नक्की कुठून सुरू झालंय माहित आहे? भन्साळीचा पॅटर्न लक्षात घ्या.

गोलीयों की रासलीला रामलीला
आधी त्याने सिनेमाचं नाव ठेवलं राम लीला. मग बोंबाबोंब झाल्यावर नाव बदललं गोलीयों की रासलीला रामलीला. आता बघा, सिनेमाचं नाव आणि बदललेलं नाव या दोन्हीत त्याने प्रचंड लबाडी केली आहे. सिनेमाचं नाव इतर काहीही ठेवता आलं असतं. चित्रपटातला मसाला (किंवा शेण) लक्षात घेतलं तर ऐंशी किंवा नव्वदच्या दशकातल्या कुठल्याही मसाला मारधाड चित्रपटाचं नाव उचललं असतं तरी चाललं असतं. उदाहरणत: आज का गुंडाराज, खून भरी मांग, खून और प्यार म्हणजे अक्षरशः काहीही. पण नाव काय ठेवलं? राम लीला. भारताचं सामूहिक आराध्य दैवत कोणतं? राजाधिराज रामचंद्र महाराज. मग त्यावरच हल्ला करा. तुम्ही अभिमान बाळगावा, भक्ती करावी, पूजा करावी, आदर्श जीवानाचा वस्तुपाठ घालून ध्यावा असं जे कुणी असेल त्यावरच घाला घातला जातो. रामाची भक्ती करता काय? तुम्हाला राम मंदिर बांधायचंय काय? थांबा एका थिल्लर नट, त्याहून थिल्लर नटी आणि अतिशय बकवास सिनेमाचं नावच रामलीला ठेवतो. का काय विचारता. अपमान? तो कसा काय? सिनेमातल्या हिरोंच नाव आहे ते. लीला नावाच्या हिरोईन बरोबरच्या त्याच्या लीला दाखवायच्या आहेत. मग नाव रामलीला ठेवलं तर बिघडलं कुठे?

बरं नाव बदलतानाही त्याने काय लबाडी केली आहे लक्षात आलंय का? गोलीयों की रासलीला रामलीला हे बदललेलं नाव. रासलीला हा शब्द कुणाशी संबंधित आहे? भगवान श्रीकृष्णांशी. बघा. रामलीला नाव ठेऊन एका गालावर थोबाडीत मारली. आणि मिळमिळीत विरोध बघून भन्साळीने तुमचं पाणी जोखलं आणि बदललेल्या नावाने दुसर्‍या गालावर पाच बोटं उमटवली. तुम्ही किती भेकड आहात हे त्याने एका उथळ सिनेमाच्या फक्त नावाशी खेळून तुम्हाला दाखवून दिलं. तुमचा विरोध लक्षात घेऊन नाव बदलतानाही तो तुमचा अपमान करायला विसरला नाही. आणि तुम्हीच त्याचा सिनेमा हिट केलात. वेडे रे वेडे.

बाजीराव-मस्तानी
हिंदूंवर हल्ला करुन झाला एका सिनेमात. आता पुढची पायरी म्हणजे मराठी माणूस. मराठी माणसाला तोडायचे प्रयत्न खूप पूर्वी सुरू झालेत. अगदी ऐंशीच्या दशकापासून. आणि ज्या क्लुप्त्या हिंदूंचा अपमान करण्यात वापरल्या जातात त्याच एक महत्त्वाचा फरक करुन मराठी माणसात भेदभावाची भावना रुजवण्यासाठी केले जातात. मराठा, दलित आणि ब्राह्मण यांना आपापसात झुंजवत ठेवायचं. काय बिशाद मराठी माणूस डोकं वर काढेल. आता या तीन वर्गातला फरक लक्षात घ्या. दलितांचा किंवा त्यांच्या प्रतीकांचा किंवा त्यांच्या नेत्यांचा अपमान झाल्याचा नुसता संशय जरी आला तरी अ‍ॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत तक्रार केली जाऊ शकते. या कायद्या अंतर्गत जामीन मिळू शकत नाही. शिवाय निदर्शनं आणि हिंसेची भीती आहेच. मराठा समाजाच्या प्रतीकांवर सिनेमा बनवायची कल्पनाही कुणी करु शकत नाही कारण ब्रिगेडसारख्या संघटनांची दहशत. मग ज्यांच्या प्रतीकांवर आणि आदरणीय पुरुषांवर हिणकस सिनेमा काढला तर कुणी ब्र सुद्धा काढणार नाही असं कोण? सगळ्यात उत्तम सॉफ्ट टार्गेट कोण? ब्राह्मण.

तुमच्यातला सगळ्यात पराक्रमी पुरुष कोण? आता यावर वाद होऊ शकेल पण त्यातही तुम्हाला ज्याची कमी माहिती आहे पण ज्याचा पराक्रम अतुलनीय आहे असा माणूस मी निवडणार. श्रीमंत बाजीराव पेशवे. आणि त्याचा पराक्रम अत्यंत हास्यास्पद पद्धतीने रजनीकांत काय मारामारी करेल असा दाखवणार. तो कसा, तर एकदम एक माणूस आणि शेकडो सैनिक आणि बाणाचा वर्षाव कापत पुढे जाणारा सुपरमॅन. ते पण मस्तानीच्या प्रेमात वेडा झालेला बाजीराव एकटा सैन्यात घुसतो असं दाखवणार. म्हणजे बाजीराव हा इष्कात वेडा होऊन राज्यकारभाराला गुंडाळून ठेवणारा आणि सणक आल्यावर लढाई करणारा होता असं मी दाखवणार. मग पालखेडच्या संघर्षात अजिबात लढाई न करताही निजामाला शरण यायला लावलं ते नेमकं कसं हे दाखवून डोकं वापरावंच लागू नये. चाळीस लढाया कशा केल्या, काय डोकं वापरलं, मस्तानी किती वर्ष त्याच्या आयुष्यात होती वगैरे तपशील दाखवणारच नाही. निजाम वाघाला कुरवाळत बसलेला आणि बाजीराव तिरसटासारखा पाण्यात पाय मारत मारत चालत त्याला भेटायला गेलेला दाखवणार. तुमच्या विधवा लाल आलवणात असल्या तरी बाजीरावाची आई मात्र पांढर्‍या साडीत वेडाच्या भरात बडबडत आपलं बोडकं डोकं मिरवताना दाखवणार. त्याच्या बायकोला पायाचं दुखणं असतानाही नाचताना दाखवणार. बाजीराव वेडसर, त्यांचे चिरंजीव नानासाहेब तिरसट आणि खुनशी, नाचकाम करणारी बायको, डोक्यावर परिणाम झालाय असं वाटावं अशी आई... हे अस्संच सगळं मी दाखवणार. काय कराल तुम्ही? मी घरी बसून मस्त निदर्शनं बघतोय. एका चित्रपटगृहात सिनेमा बंद पाडल्याने मला काहीही फरक पडत नाही हो, तुमच्या दोन्ही गालांवर थोबाडीत आणि पार्श्वभागावर लाथ मारण्याचे पैसे मला केव्हाच मिळालेत. ते बघा सोशल मिडियावर जातीजातीत भांडणं कशी मस्त चाललीयेत. तुमच्या घरंदाज स्त्रीयांना पडद्यावर आंघोळ घातली, त्यांना नाचवलं. वरणभातवाले पुळचट कुठले. ब्राह्मणवाद ब्राह्मणवाद म्हणून मला हिंदूंनाच अपमानित करायचं होतं ते मी केलं. बाकीचे करतात तस्संच. हा हा हा.

पद्मिनी
आता पुढचं लक्ष्य दुसरी पराक्रमी जमात, राजपूत. तुमचं आराध्य दैवत झालं. जातीजातीत भांडणं लावून झाली. आता पुढची पायरी. तुमच्या आदरणीय स्त्रीयांवर हल्ला. कुठलंही युद्ध झालं की त्यातला एक अविभाज्य भाग म्हणज शत्रूच्या स्त्रीयांचा शीलभंग करणं, त्यांची इज्जत लुटून त्यांना नासवणं. मग हा प्रकार सिनेमाच्या माध्यमातून मानसशास्त्रीय युद्ध खेळताना कसा वर्ज्य?

असंख्य स्त्रीयांची अब्रू लुटणार्‍या अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडवर हल्ला केल्यावर आपल्या सैन्याचा पराभव दिसू लागताच त्याने आपल्याला स्पर्शच काय आपलं नखही त्याला दिसायला नको म्हणून हजारो....हो हजारो राजपूत स्त्रीयांबरोबर आगीत उडी घेऊन जोहार करणारी महाराणी पद्मिनी - तुमचा अपमान करायला याहून योग्य कोणती उमेदवार असणार?

अरे तुम्ही दोन थपडा मारल्यात, कॅमेरा फोडलात, चित्रपट निर्माण संचाला मारहाण केलीत, बस्सं! याहून जास्त काय करणार तुम्ही? मला या सगळ्याचे पैसे मिळालेत, मिळतील. माझ्या खिशाला अजिबात भोक पडलेलं नाही. लोकेशनवर नाही करु दिलंत तर जसं बाजीराव मस्तानी मधे केलं तसं कॉम्प्युटर जनरेटेड इमेजरी वापरून राजस्थानी महाल उभे करीन. पण मी हा सिनेमा काढणार. तुमच्या छातीवर नाचणार. आणि हा सिनेमा तुम्हीच येऊन हिट कराल.

कारण माहित्ये? तुम्ही भेकड आहात. स्वार्थी आहात. प्रत्यक्ष भगवान रामाच्या वेळी कुणी आलं नाही. बाजीरावाच्या वेळी इतर लोक ब्राह्मण आणि मराठी समाजाच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. आता राजपूत लोकांच्या पाठीशी कसे उभे राहतात तेच मी बघतो. काय करणार तुम्ही?

घंटा?

#पद्मिनी

© मंदार दिलीप जोशी

हिंदी रूपांतर इथे आहे

Tuesday, December 3, 2013

देव आनंद मरते नहीं.....

अथश्री प्रतिष्ठानतर्फे चालविल्या जाणार्‍या अथश्री त्रैमासिकाचे संपादक श्री आनंद आगाशे यांच्या परवानगीने २०१२ च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला हा लेख इथे प्रकाशित करत आहे.
---------------------------------------------------------------------------


 २०११ च्या डिसेंबरातली एक रविवार सकाळ.

टी.व्ही.वर "रिमझिम के तराने लेके आयी बरसात" अशी मूक साद घालत नायक देव आनंदने नायिका वहिदाला छत्रीत घेतलं आहे. ती त्याला 'याद आये किसीसे वो पहली मुलाका़त' म्हणत तसाच प्रतिसाद देते आहे. माझ्या हातात मस्त वाफाळत्या चहाचा कप आहे...आणि अशातच माझं खिडकीकडे लक्ष जातं. या पार्श्वभूमीवर बाहेर योगायोगाने इकडे पुण्यात पावसाचे अगदी हलके शिंतोडे सुरू झाल्याचं दिसतं आणि त्या गाण्याची लज्जत शतपटीने वाढते. कुठल्याही संवेदनशील निसर्गप्रेमी माणसाला धुंद करेल असा पुण्याचा रोमँटिक पाऊस. मग देव तर मुळातच रसिक माणूस. ह्या शहरातल्या पावसाने त्याला भुरळ घातली नसती तरच नवल होतं. देव आनंदने रेल्वेतून उतरून पुण्यात पहिलं पाऊल टाकलं आणि प्रभात स्टुडिओपर्यंत पावसाचा आनंद लुटत गेला तेव्हाच त्याचे आणि पुण्यातल्या रिमझिम पावसाचे ॠणानुबंध जुळले आणि पुढे आयुष्यभर टिकले, हे कुठेतरी वाचल्याचं आठवतं. अशा स्मरणरंजनात मन गुंतत असतानाच अचानक मोबाईल वाजतो आणि मित्राचा परिचित आवाज कानी पडतो. रविवारी सकाळी आठ वाजता याने का फोन केला असावा असा विचार करत असतानाच "देव आनंद वारला...काल रात्री....लंडनमधे.....बातम्या लाव" हे एका दमात सांगून तो फोन ठेवतो.

कानांनी जे ऐकलं ते मेंदूच्या समजूतीच्या कप्प्यात शिरायला जरा वेळ लागला. काही क्षणांनी मात्र जेव्हा शिरलं तेव्हा या माणसावर आपण किती प्रेम करत होतो या जाणीवेने डोळ्यांत टचकन पाणी आलं. 'I thought she was immortal' (मला वाटायचं ती अमर आहे) — प्रसिद्ध लेखक पी. जी. वूडहाऊसची चौदा वर्षांची मुलगी लियोनारा गेली तेव्हा त्याने हताश होऊन काढलेले हे उद्गार मनुष्यस्वभावाविषयी खूप काही सांगून जातात. आपल्या आसपासच्या अनेकांचं अस्तित्व आपण गृहित धरतो. आपल्या आधी ते जाणारच नाहीत असं आपल्याला वाटतं. किती स्वार्थी असतो ना आपण? देव आनंदला आपण सगळ्यांनी असंच गृहित धरलं होतं. म्हणूनच देव गेल्याची बातमी जेव्हा ऐकली तेव्हा माझ्याही मनात नेमकी अशीच प्रतिक्रिया उमटली. आपल्याला वाटायचं तो अमरपट्टा घेऊन आला आहे. निदान याची तरी पूर्ण खात्री होती की तो शंभरी आरामात पार करेल....आणि स्वतःच्या शंभराव्या वाढदिवसाप्रित्यर्थ आणखी एका चित्रपटाची घोषणा करेल. पण म्हातारपण या शब्दाचा आणि स्थितीचा आपल्या उत्साहाने आणि उमेदीने सतत पराभव करणारा ८८ वर्षांचं समृद्ध धडधाकट आयुष्य जगून देव गेला तो शेवटी हृदयविकाराचा तीव्र झटका हे सर्वसामान्यांचंच दुखणं होऊन. पण तो जसा आयुष्यभर जगला तसाच आपल्यातून गेला - ताठ मानेने, मनाने तरूण असतानाच. लंडनच्या हीथ्रो विमानतळावर दिलेली व्हीलचेअर फणकार्‍याने नाकारून तरातरा चालत टॅक्सीत जाऊन बसला. आणि मग बातमी आली ती थेट तो गेल्याचीच.

"देव साहेबांचं पार्थिव भारतात आणलं जाणार नाही..." वृत्तनिवेदक सांगत होता. बरं झालं. देवला तसं बघताच आलं नसतं. या सदगृहस्थावर आपला इतका जीव का होता, तो गेल्यावर आपण इतके का हळहळलो, ते आज अनेकांना सांगून समजणार नाही. त्यासाठी फक्त देवचा चाहता असून चालत नाही. त्या सोनेरी काळावर माया असावी लागते. त्या माणसांबद्दल जिव्हाळा असावा लागतो. प्रत्यक्षाहून उत्कट असलेल्या प्रतिमेवर प्रेम करावं लागतं. त्यांनी विकलेली स्वप्नं ही आपलीही असावी लागतात, तरच त्यांच्या सादरीकरणाशी आपण तादात्म्य पावू शकतो. एखाद्याची ओळख होण्यापासून ते त्याचा चाहता होण्यापर्यंतच्या प्रवासाशी तद्रूप व्हावं लागतं. राज, दिलीप, देव, शम्मी, रफी, किशोर, मुकेश, ओ.पी. नय्यर, गुरुदत्त, सचिनदा, ललिता पवार, नुतन, ऋषिकेश मुखर्जी, विजय आनंद, राजेश खन्ना हे आणि असे असंख्य हिरे दिलेल्या त्या काळाचं अप्रूप वाटत मी मोठा झालो. त्यामुळे या खजिन्याची मोजदाद करण्याच्या खुळ्या खटाटोपात देवची आणि माझी ओळख नेमकी कधी झाली ते सांगणं अवघड आहे. पण मनावर त्याची सगळ्यात पहिली आठवण कोरली गेली ती गाईड मधल्या बंडखोर राजूच्या रूपाने. गाईड सर्वप्रथम बघितला तेव्हा चित्रपट म्हणून नक्की काय वाटलं ते नीटसं नाही सांगता येणार. पण राजूने मला माझ्या मनातली अनेक वादळं शांत करायला मदत केली. समोर आ वासून उभ्या असणार्‍या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत केली. "तुम कोई वादा नहीं कर रही हो, तुम्हारा हात अपने दिल पे रख कर मै एक वादा करना चाह्ता हूं" असं म्हणत प्रेमातलं समर्पण कसं असावं ते दाखवलं. एक चांगला माणूस म्हणून शांत मनानं जगायचं असेल तर आपल्यातल्या करड्या छटाही निर्भयपणे स्वीकारायला शिकलं पाहिजे. नैतिकतेच्या पोकळ चौकटींपेक्षा न्याय्य गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जायला हवं. देव आनंदच्या राजू गाईडने मला हे शिकवलं  आणि मनात उगीचच साचलेला अपराध भाव कमी केला.
देव गेला त्याच दिवशी माझ्या संग्रहातला हम दोनो एकटाच बघत बसलो होतो. एक गाणं आलं आणि काही वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग जशाच्या तसा डोळ्यांसमोर उभा राहिला. ध्यानीमनी नसताना अचानक मला माझी नोकरी गमवावी लागली. कंपनीला काहीही करून माणसं कमी करायची होती. "तुम्ही आत्ताच्या आत्ता राजीनामा द्या, आणि उद्यापासून येऊ नका. महिन्याचा पगार तुमच्या खात्यावर जमा होईल", असं सांगून सरळ हातात नारळ ठेवण्यात आला. आपलं काम सांभाळून व्हॅल्यु अ‍ॅड करत जीव ओतून प्रचंड मेहनत करत असताना हे माझ्या बाबतीत का व्हावं? असा विचार करत अत्यंत संतापलेल्या पण तेवढ्याच विमनस्क अवस्थेत बसची वाट बघत बाहेरच्या टपरीवजा हॉटेलात डोळ्यांतले अश्रू लपवत बसलो होतो. माझा कंपनीतलाच एक मित्र तिथे आला आणि काहीही न बोलता त्याचा मोबाईल माझ्यासमोर टेबलावर ठेऊन हेडफोन कानात कोंबले आणि स्वतः सिगारेट शिलगावत समोर बसला. याच गाण्याच्या ओळी कानावर पडल्या.


बरबादीयों का सोग मनाना फिजूल था
बरबादीयों का जश्न मनाता चला गया

हर फिक्र को धुएं मे उडाता चला गया

असंख्य वेळा ऐकलं असेल या आधी हे गाणं. पण आज त्या शब्दांचा नव्याने अर्थ लागला. मनाने नवी उभारी धरली. विचार योग्य दिशेला काम करु लागले. आणि गेलेल्या नोकरीचं दु:ख बाजूला सारून मोजून तेवीस दिवसात नवी नोकरी मिळवली. आवडत्या गाण्यांच्या यादीत हे गाणं सामील होतंच. पण या प्रसंगापासून ते आयुष्याचा मंत्र बनलं. अनेक कठीण प्रसंगात जिवलग मित्रासारखी त्याने साथ केली. आयुष्यात हातातून गेलेल्या गोष्टी ह्या सिगारेटच्या धुरासारख्या. काळाच्या ओघात हवेत विरून जाणार्‍या. मग त्यांच्यासाठी रडत कुढत बसण्यात काय हंशील? उलट त्यांचं साचून न राहता विरणंच महत्वाचं. आणि मग हसत हसत 'जो खो गया मैं उसको भुलाता चला गया, हर फिक्र को धुएं मे उडाता चला गया' म्हणत लागलेली ठेच विसरणारा देव आणखी जवळचा वाटू लागला.
तू अमुक गोष्ट करुच शकणार नाहीस असं कुणी म्हटलं की चवताळून ते करुन दाखवायची खुमखुमी मला स्वस्थ बसू देत नाही. अशा प्रकारची नकारात्मक प्रेरणा काही जणांवर किती सकारात्मक परिणाम करते त्याचं देव हे चपखल उदाहरण आहे. एकदा नाटकात काम करताना देव चुकला तेव्हा बलराज सहानीने संतापून भविष्य वर्तवलं, "तू कधीच नट बनू शकणार नाहीस!" हे ऐकल्यावर एखादा खालमानेने दुसरं क्षेत्र धुंडाळू लागला असता. पण देव सहजी हार मानणार्‍यातला नव्हताच. त्याने त्याच क्षणी बलराजला ठणकावून सांगितलं की मी यशस्वी होऊन दाखवीन ते नट म्हणूनच. दातातली फट कृत्रिमरित्या भरायची तयारी असेल तर काम मिळेल या डी.डी.कश्यप यांच्या अटीला धुडकावून दातांना हात देखील न लावता यश मिळवून दाखवण्याची प्रतिज्ञा करुन ते खरं करुन दाखवलं. इतकं की कालांतराने ती फट दाखवत त्याचं देवतुल्य हसणं दिसलं की तरुणींच्या हृदयाचे ठोके चुकायचे. पुरुषालाही सुंदर हे विशेषण लावता येणं शक्य आहे हे देवकडे बघितल्यावर समजायचं.


आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात आपापल्या सुरैय्या येतात. त्यातल्या काहींच्या बाबतीत कुणाच्या तरी दुराग्रहापायी, हट्टापायी, किंवा दुष्टाव्यापायी दूर निघून जातात. काही जणांच्या मनात आपलं आयुष्य संपवायचाही विचार येतो. तर काही जण रडतात, कुढतात, आणि काळ नामक औषध लागू पडलं की ती जखम विसरूनही जातात. मात्र बहुतेकांच्या मनात आपल्या दुरावलेल्या सुरैय्याविषयी कायमची उरते ती कटुता आणि द्वेष. देव पहिल्यांदा त्याच्या सुरैय्याच्या प्रेमात पडला आणि त्यात अयशस्वी कसा ठरला, या गोष्टींची रसभरित खरी-खोटी वर्णनं जिकडेतिकडे सापडतील. पण त्याने या अपयशाला कसं हाताळलं हे आज फारसं कुणाला ठाऊक नसेल. नकार कसा पचवावा याची गाईडबुकं अशी सहजासहजी सापडत नाहीत. देव आनंदला त्याच्या सुरैय्याची आठवण यायची का? आलीच तर त्याच्या लाडक्या नोझीच्या आठवणीने तो हळवा व्हायचा की त्याच्या नेहमीच्या सवयीने कोरडा रहायला शिकला होता? देवच्या मनात तिच्या विषयी ओलावा होता की कडवटपणा? खाजगीपणा अतोनात जपणार्‍या देवच्या गूढ मनाचा थांग देवच्या अगदी त्याच्या जवळच्या मित्रांनाही लागत नसे, तर या प्रश्नांची उत्तरं मिळणं अंमळ कठीणच. एका प्रसंगात मात्र देवने आपले अंतरंग अप्रत्यक्षपणे उघड केले. आकाशवाणीवर जयमाला कार्यक्रमात देव त्याच्या वेगवेगळ्या नायिकांबरोबरची गाणी सादर करत होता. मधेच तो थबकला आणि म्हणाला "....आणखी एका नायिकेचं नाव घ्यायचं राहूनच गेलं. ती म्हणजे सुरैय्या." मग त्याने सुरैय्याबरोबर चित्रित झालेलं जे गाणं ऐकवलं त्यातून कदाचित या प्रश्नांचं एकच पण संदिग्ध उत्तर सिनेरसिकांना मिळू शकलं. या गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान सचिनदांनी सुरैय्याला पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र आजीच्या दहशतीपोटी सुरैय्याची हिंमत झाली नाही. गाण्याचं चित्रिकरण संपलं आणि दोघांच्या प्रेमकहाणीचा अंत झाला. तेच गाणं देवने निवडलं होतं....'नैन दिवाने, एक नहीं माने'.

अरे देखी जमाने की यारी
बिछडे सभी बारी बारी

गुरुदत्तच्या प्यासा चित्रपटातल्या एका गाण्यातल्या ह्या ओळी वास्तविक आयुष्यातही किती खर्‍या आहेत ना! नवकेतनचा 'फंटुश' साफ झोपला. यात भर म्हणून की काय फंटूशच्या सेटवर एका गाण्याच्या चित्रिकरणावरुन झालेल्या वादामुळे भाऊ चेतन फंटुश प्रदर्शित झाल्यावर नवकेतन सोडून बाहेर पडला आणि त्याने 'हिमालया' ही चित्रसंस्था काढून वेगळी चूल मांडली. सुरैय्याच्या विरहाने बसलेल्या धक्क्यानंतर देवला बसलेला हा दुसरा मोठा धक्का होता. पण त्याने तो ही पचवला. देव आनंद मला खूप गूढ वगैरे वाटतो कधी कधी. खिशातलं पाच रुपयाचं पेन हरवलं, बॉसने एखाद्या चांगल्या कामाकडे दुर्लक्ष केलं, ऑफिसमधे शेजारी बसणारी चवळीची शेंग जाऊन त्याजागी कलिंगड आलं, बायकोने डब्यात नावडती भाजी दिली, नव्या कोर्‍या गाडीला लहानसा चरा गेला, कुठल्यातरी नवख्या क्रिकेट संघाने भारतीय संघाच्या नाकी नऊ आणले...आपल्याला निराश आणि घाबरं गुबरं व्हायला काहीही कारण पुरतं. साध्या सर्दी-खोकला-ताप आले की शरीरबरोबरच आपण मानसिकदृष्ट्याही कमकुवत होतो. आपल्यावर लहानसा जरी अन्याय झाला तरी मीच काय घोडं मारलंय अशी चडफड होते. आपलं सोडा. प्रेयसी हवा तसा प्रतिसाद देत नाही म्हणून तिच्या घरावर दगडफेक करणारे हीरो आपण नुकतेच बघितले आहेत. माझ्यासाठी देव आनंद म्हणूनच प्रचंड कोडं आहे. हा इतका शांत कसा राहू शकला? स्वतःच्या प्रत्येक चित्रपटाला स्वतःचं बाळ समजणारा देव, ते बाळ अपयशी होत असताना, आपला भाऊ दूर होत असताना इतका स्थितःप्रज्ञ कसा? पुढे त्याच्या मुलीचं लग्न मोडल्यावरही तिला त्याने नव्याने आयुष्य सुरू करायला प्रोत्साहन दिलं. कोलमडणं तर दूरच, उलट झालेल्या गोष्टीचा फारसा विचारही देवने कधी केला नाही. कदाचित अस्थानी वाटेल, पण एक गंमत सांगतो. मी नियमितपणे हिशेब लिहीतो. लिहीताना आणि लिहून झाल्यावर अमुक एक खर्च का केला, जास्त केला का, टाळता आला असता का, तोच पैसा इतर ठिकाणी खर्च करता आला असता का, कशावर कमी खर्च झाला असा विचार खूप वेळ करत बसतो. मला असं करताना बघितलं की माझा भाऊ गालातल्या गालात हसतो. जो खर्च झाला, आता ते पैसे आपल्याकडे नाहीत, जे संपलं निघून गेलं त्यावर इतका विचार का? हा त्याचा प्रश्न नेहमीचाच. मला पटतोच असं नाही. मला पटावा असा त्याचा आग्रहही नाही. पण मी तरीही तितक्याच नियमितपणे हिशेब लिहीत जातो. आणि असं करताना त्यावर नेहमी इतकाच विचारही करत जातो. बरोबर की चूक नाही ठाऊक. मात्र माझ्या भावाला असं हसताना पाहीलं की त्याच्यामधे आणि "जो खो गया मैं उसको भुलाता चला गया" म्हणत झालेल्या गोष्टींना बाजूला सारणार्‍या देव मधे मला अचानक साम्य दिसू लागतं. या माणसाने आडनावाप्रमाणेच आयुष्यभर आनंद साजरा केला आणि वाटला. दु:ख मात्र मनाच्या कुठल्यातरी अज्ञात अडगळीच्या कोपर्‍यात कायमचं ढकलून दिलं. फंटुश मागोमाग आलेला मधुबाला बरोबरचा काला पानी आणि वहिदा बरोबरचा काला बाझार सुपरहिट झाले. पण अपयश सहजी मागे सारून पुढे जाणारा देव या यशालाही कुरवाळत बसला नाही. लगेच काहीतरी वेगळं करुन दाखवण्याच्या उर्मीपायी 'हम दोनो'च्या मागे लागला. सुखदु:खे समे कृत्वा हे इतकं जगलेला दुसरा माणूस माझ्या माहितीत तरी नाही.

भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमाभागातील एक लष्करी रुग्णालय. रोजचा राउंड घ्यायला डॉक्टर व त्यांच्याबरोबर नियमित सर्वेक्षणासाठी येणारे ठराविक लष्करी अधिकारी आलेले. मात्र आज त्यांच्या बरोबर एक खास पाहुणा आहे. तो ही त्यांच्याबरोबर जखमींची जिव्हाळ्याने विचारपूस करतोय. हळुहळु एकेकाशी बोलत युद्धात एक पाय गमावलेल्या एका सैनिकाच्या खाटेपाशी ती लोकं येतात. त्या पाहुण्याला पाहून तो सैनिक अचानक उत्साहात ओरडतो "अभी एक टांग तो है! एक...टांग तो है!!". त्या भेटीनंतर त्या सैनिकाची तब्येत झपाट्याने सुधारून त्याला अपेक्षेपेक्षा लवकर डिस्चार्ज देण्यात आल्याचं त्या पाहुण्याला डॉक्टरांकडून काही दिवसांनी समजतं. तो पाहुणा म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून तो होता आपला देव. हम दोनो मधला मेजर वर्मा त्या सैनिकाला इतका आपला आणि खरा वाटला होता की युद्धभूमीवरचं  मृत्यूचं तांडव, घरच्यांचा विरह, इतर मानसिक आघात, आणि त्यावर कहर म्हणजे स्वतःचा पाय कापायला लागल्याचं दु:ख हा हा म्हणता मागे टाकून त्याचं कोमेजलेलं मन पुन्हा एकदा ताजंतवानं झालं. ही घटना म्हणजे देवच्या हम दोनो मधल्या अभिनयाची जिवंत पावतीच म्हणायला हवी. चित्रपटातला एखाद्याचा अभिनय किंवा एखादी व्यक्तिरेखा कुणावर असा परिणाम करुन जाईल याची कल्पना खुद्द देवलाही करता आली नसती.

काहींनी कॅप्टन आनंद बनून दुरावलेल्या नवरा-बायकोला एकत्र आणायचे प्रयत्नही केले असतील. सैन्यातले अविवाहित जवान "रुमासारखी बायको हवी" अशी पत्र नंदाला पाठवत, तेव्हा रुमाची भूमिका तिला देण्याच्या निर्णयाचा देवला सार्थ अभिमान वाटत असणार. जर्मनीत एका चित्रपटगृहात खेळ संपल्यावर प्रेक्षकांनी देव आणि नंदा यांचा हारतुर्‍यांनी सत्कार केला. दोन महायुद्धात पोळून निघालेल्या या देशाच्या सामान्य नागरिकांनी कॅप्टन आणि मेजरच्या भूमिकांसाठी देवच्या अभिनयाला दिलेली ही मानवंदना यापेक्षा मोठं उत्तर तथाकथित समीक्षकांसाठी काय असावं?

देव नुसताच सुपरस्टार आहे, अभिनेता नाही अशी टीका देववर सुरवातीपासूनच होत असे. देव हा सर्वोत्कृष्ठ नट आहे असा अवाजवी गैरसमज त्याचाच काय पण त्याच्या कट्टर चाहत्यांचाही नसेल. प्रत्येक नटाला आपल्या अभिनयाची ताकद आणि मर्यादा यांची जाणीव असते. तशी जाणीव देवलाही होती. ह्या बाबी लक्षात घेऊनच तो कॅमेर्‍यासमोर वावरला. अर्थात, चांगले दिग्दर्शक मिळाले (विशेषतः गोल्डीच्या दिग्दर्शनाखाली) तेव्हा त्याचा अभिनय अधिक खुलला हे खरं. आणि त्याने स्वतःमधल्या अभिनेत्याला पूर्ण न्याय दिला नाही हे सुद्धा खरं. पण म्हणून त्याला अजिबातच अभिनय येत नाही असं म्हणणंही तितकंच हास्यास्पद नव्हे का? सी.आय.डी. मधे वहिदा रहमानच्या हातात पिस्तुल पाहून "तुम गोली चला सकती हो, लेकिन चलाओगी नहीं" असं फणकारणारा आणि आपण इन्स्पेक्टर आहोत, सामान्य माणूस नव्हे अशा तोर्‍यात वावरणारा इन्स्पेक्टर शेखर आठवा. नेहमी देव नायिकेच्या भोवती रुंजी घालणार, मग मधे काहीतरी गडबड होणार आणि शेवटी नायिका त्याची होणार अशा ठराविक पठडीबाहेरचा 'बंबई का बाबू' आठवा. त्यात नायिकेच्या भाऊ असल्याची बतावणी केल्यानंतर तो दैवयोगाने तिच्या प्रेमात पडतो. ही भावना तिच्यापर्यंत पोहोचवताना झालेली तगमग देव आनंदने ज्या पद्धतीने व्यक्त केली आहे तिला तोड नाही. विशेषतः चित्रपटाच्या शेवटी नायिका पालखीत बसून वरातीबरोबर सासरी जायला निघते तेव्हा त्याच्या चेहर्‍यावरची जीवघेणी भावनिक ओढाताण बघवत नाही आणि आपल्याला ओरडून सांगावसं वाटतं......अरे हा देव आहे देव आनंद. सिनेमाच्या शेवटी हिरोईन यालाच मिळायला हवी!!! 'तेरे मेरे सपने' मधला डॉक्टर आनंदच्या भूमिकेतला देव डॉक्टर जगन्नाथ कोठारीला त्याच्या दारूबाजपणाबद्दल जाब विचारताना तिरकसपणे म्हणतो "मेरे लिये अभी ये जान लेना बहुत जरूरी है...ठर्रे की ये बदबूदार बोतल देखता हूं तो एम.आर.सी.ओ.जी. लंडन, समझमें नहीं आता". डॉक्टर होताना जे आदर्श समोर ठेऊन वैद्यकी स्वीकारली आणि ते आदर्श पुढे वास्तविक जीवनात पाळणे कठीण होऊन बसल्यावर होणारी मनस्थिती देवने अत्यंत परिणामकारकरित्या दाखवली आहे (एम.आर.सी.ओ.जी. मधलं प्रत्येक अक्षर एकदा देवच्या शैलीत म्हणून बघा). 'दिन ढल जाए' या गाण्यातील 'दिल के मेरे पास हो इतनी, फिर भी हो कितनी दूर' या ओळी पडद्यावर म्हणणार्‍या देवच्या विदीर्ण चेहर्‍याकडे बघवत नाही. आणि 'पल भर ले लिये कोई हमें प्यार कर ले' मधे 'माना तू सारे हसीनों मे हसीं है, अपनी भी सूरत बुरी तो नहीं हैं' असं नखरा करणार्‍या ड्रीमगर्ल हेमा मालिनीला ठणकवून सांगण्याचा अधिकार फक्त देवलाच आहे हे पटूनच जातं.

 
  

देव चॉकलेट हीरो, रोमँटिक नायक म्हणून लोकप्रिय झाला. पण देवचा प्रणय हा मुळातच हळूवार, खट्याळपणा करत नायिकेला हलकेच छेडत तिच्या अवतीभवती पिंगा घालत तिची आर्जवं करणारा होता. तो कधीच धुसमुसळा झाला नाही. अगदी जोरदार पावसातही. पाऊस आठवला की पहिलेछूट जी चार-पाच गाणी आठवतात त्यांपैकी दोन देव आनंदवर चित्रित झालेली आहेत यातच सारं आलं. प्रेयसीला मिठ्या मारत अंगाशी झोंबाझोंबी नाही, की पावसात उगाच रस्त्यावर लोळणं नाही. नायिकेचा पदर खेचणं नाही की उगाच तिला चापट्या मारणं नाही. हातात छडी किंवा काठी असली तरी तिचा उपयोग प्रेयसीला 'घे हवी ती शिक्षा मला दे, पण माझी हो' हे सांगण्यापुरता. हळुवारपणा हा देव आनंदच्या प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीचा पाया होता. "रिमझिम के तराने लेके आयी बरसात" या गाण्यात दोघं एकमेकांसोबत घालवलेले सुंदर क्षण आठवत एकच छत्रीत जात असले तरी एकमेकांमधे योग्य अंतर राखून आहेत. या गाण्यात वहिदा आणि देवचे डोळे बोलतात. आठवलेल्या प्रत्येक क्षणाबरोबर दोघांच्या डोळ्यांत एक निराळीच चमक दिसते. अशा प्रणयाराधनात देवचा अभिनय फुलायचा. पावसातलं आणखी एक गाणं आठवतं ते म्हणजे 'एक बुत बनाउंगा तेरा और पूजा करुंगा'. या गाण्यात पावसाचा प्रभाव ठायी ठायी जाणवत राहतो. पण अजिबात न भिजलेल्या नायकाचा खट्याळपणा आणि नायिकेचं मधाळ लाजणं या दोन गोष्टी मिळून आपल्याला जो आनंद देतात त्याला उपमा नाही. फळ्याच्या मागे उभी असलेली बासुंदीसारखी गोड साधना, आणि पुढून हळूच डोकावत 'कसं ओळखलं' हे भाव चेहर्‍यावर आणत तिला चिडवणार्‍या देवचा या गाण्यातला अभिनय म्हणजे  संयत रोमँटिक अदाकारीचं झकास उदाहरण आहे. याच गाण्यात आता रोज भेटणं होईल या आनंदात "शाम सवेरे हर मौसम मे होंगी मुलाकातें" म्हणताना देवच्या चेहर्‍यावरचे भाव इतके गोड आहेत की क्षणभर गाण्यातल्या साधनाचा विसर पडतो. अभी ना जाओ छोडकर, दिल का भंवर करे पुकार, खोया खोया चांद, अच्छा जी मैं हारी, आजा पंच्छी अकेला है, दिल पुकारे आ रे - अशी अगणित गाणी देवच्या नितांतसुंदर रोमँटिक अभिनयाची साक्षीदार आहेत. 



देवच्या यशात उत्तमोत्तम गाण्यांचा सर्वाधिक वाटा आहे हे मान्य करावंच लागेल. पण याच सुरेल मैफिलीला पडद्यावर झळाळी आणि दृष्टीला प्रसन्नता प्राप्त करुन देण्याचं श्रेय मात्र देवलाच आहे. तो अभिनयाचं विद्यापीठ वगैरे म्हणून ओळखला जात नसेल, पण खास 'लिप सिन्क' कसं असावं हे शिकायचं असेल तर देव आनंदची गाण्यांची पारायणं करावी. त्याला गाण्याची नुसतीच आवड नव्हे तर उत्तम जाणही होती, शब्दांचं महत्त्वही ठाऊक होतं. इतकंच नव्हे तर तो स्वतः छान गायचा असं त्याचे अनेक सहकलाकार आणि परिचित सांगतात. गाणं शिकल्याने अभिनय नैसर्गिक होतो, ते पडद्यावर सादर करताना शारीरिक हालचाली जशा एका विशिष्ठ लयीत व्हायला हव्यात तशा व्यवस्थित होतात हे त्याला माहित होतं. गायकाच्या स्वरांनुसार ओठांची आणि मानेच्या स्नायुंची हालचाल व्हायला हवी आणि गाण्यांतल्या शब्दांनुसार खांदे, हात, पाय यांच्या हालचाली व्हायला हव्यात हे ठावूक असल्याने ते  कसब त्याने उत्तमरित्या आत्मसात केलं होतं. देवला प्रामुख्याने आवाज दिला तो रफी आणि किशोरने. देवची बहुसंख्य गाणी याच दोघांच्या आवाजात आहेत. दोघांकडे आपापली जादू होती. रफी आवाजातून जो नट असेल त्या अनुसार अभिनय करायचा तर किशोर गाण्याच्या मूडमधे शिरून कमाल करायचा. वास्तविक देवच्या आवाजाला आणि संवाद म्हणण्याच्या शैलीकडे बघता त्याला पार्श्वगायक म्हणून किशोर अधिक शोभत असे. तरीही गाण्याची उत्तम जाण आणि कॅमेर्‍यासमोर सादरीकरणाचं अप्रतीम कौशल्य असल्याने गायक कुठलाही असला तरी देवला फरक पडत नसे. 'जायें तो जायें कहाँ' मधे तलत मेहमूद, 'साँझ ढली दिल की लगी थक चली पुकार के' मधे मन्नाडे इथपासून 'है अपना दिल तो आवारा' मधे हेमंत कुमार अशा विविध गायकांनी देवला आवाज दिला. गायक  गाताना कुठे श्वास सोडतो आणि कुठला शब्द कसा उच्चारतो त्याकडे  लक्ष ठेऊन बरोबर तिथेच आणि तसाच श्वास सोडल्याचा कायिक आणि मुद्राअभिनय देव करायचा आणि गायकाच्याऐवजी देवच गातोय असा भास निर्माण करायचा. याचं चपखल उदाहरण म्हणजे जॉनी मेरा नाम मधलं 'पल भर के लिये कोई हमें प्यार कर ले' हे गाणं. यातली एक जागा पहा: 'सुन सुन कर तेरी नहीं नहींssssss, जाँsss अपनी निकल जाएssssss ना कहीं' यातल्या 'नहीं नहींssssss' म्हणताना उचललेलं शरीर 'जाँsss' म्हणताना देव एकदम खाली आणतो आणि 'जाएssssss'  च्यावेळी आपल्या दातातली ती सुप्रसिद्ध कातील फट दाखवत मान हलवत हसतो. मग हेमा मालिनी सकट आपणही देवच्या त्या मोहक अदांनी केव्हा घायाळ होऊन जातो कळतच नाही.

 

राज कपूर, दिलीप कुमार, आणि देव आनंद या त्रयींपैकी पहिले दोघे शहरी आणि ग्रामीण भूमिकांमधे सहज वावरू शकायचे. देव आनंद मात्र बहुतेक काळ तेरे घर के सामने मधला आर्किटेक्ट, सी.आय.डी. मधला इन्स्पेक्टर, ज्वेल थीफ मधला रत्नपारखी अशा चकाचक शहरी भूमिकांमधेच दिसला. अगदी बंबई का बाबू मधली त्याची भूमिकादेखील एका शहरी मवाल्याचीच होती. देवच्या अशा शहरी प्रतीमेमुळेच कदाचित त्याला समीक्षकांनी फार गांभीर्याने घेतलं नसावं. मात्र देव अभिनयाच्या क्षेत्रात जनरल प्रॅक्टिशनर नव्हता, तर स्पेशालिस्ट होता. पण देव हा निव्वळ सुपरस्टार नव्हता, तर ट्रेंड सेटर होता. याची दोन प्रमुख कारणं आहेत. अशोक कुमारच्या १९४३ साली आलेल्या 'किस्मत' पर्यंत अगदी सरळमार्गी, बिचारा, निर्व्यसनी, आणि सभ्य नायक बघायची सवय असलेल्या तत्कालीन समाजाला चक्क ओठांत सिगारेट घेऊन वावरणारा पाकीटमार हीरो बघून एक प्रकारचा मोठा संस्कृतिक धक्काच बसला होता. पण हा फक्त धक्का होता. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी खलनायकाच्याही वरताण दुष्कृत्ये आणि क्रूरकर्मे करणारे नायक आपण खूप नंतर स्वीकारले. साधनशुचितेला फारसे महत्व न देता इप्सित 'साध्य' करण्याकडे अधिक कल असलेले अ‍ॅन्टी हीरों आपल्या अंगवळणी पडण्याच्या आधी आपली खरी 'मानसिक तयारी' करुन घेतली ती असे कमालीच्या गुंतागुंतीच्या व्यक्तिमत्वाचे, प्रवाहपतीत, नैतिक अध:पतन झालेले किंवा होणे शक्य असणारे नायक रंगवणार्‍या देव आनंदने. क्षयरोगग्रस्त बहिणीच्या उपचारांसाठी नाईलाजाने जुगारी बनलेला आणि हा प्रेमात पडल्यावर पुन्हा त्यातून बाहेर पडण्याचा निश्चय केलेला 'बाजी' मधला मदन ही देवच्या अशा प्रकारच्या भूमिकांची सुरवात होती. 'काला बाजार' मधला बस कंडक्टरच्या नोकरीवरुन काढलेला रघुवीर हा आजारी आई आणि दोन भावंडांचं पालनपोषणाच्या जबाबदारीमुळे सिनेमा तिकीटांच्या काळा बाजार करण्याकडे वळतो आणि प्रेमात पडल्यावर बदलतो. हाऊस नंबर ४४ मधला गुंड अशोक हा देखील प्रेयसीमुळे गुन्हेगारीचा मार्ग सोडतो. टेक्सी ड्रायव्हर मधला बाई (सिल्व्ही - शीला रामाणी) आणि बाटलीच्या नादाला लागलेला मंगल दरोड्यासाठी त्याची टॅक्सी वापरणार्‍या गुन्हेगारांना सामील होतो. मात्र प्रेमात पडल्यावर अर्थातच तो ही बदलतो आणि सन्मार्गाला लागण्याचा प्रयत्न करतो. जाल मधल्या टोनीच्या संपूर्ण व्यक्तिरेखेला तर चक्क संपूर्णपणे खलप्रवृत्तीच्या छटा आहेत. अगदी गाईडमधल्या राजूचा वाल्मिकी होण्यापर्यंतचा प्रवास हा सुद्धा वाल्या असण्यापासूनच सुरू होतो. हे झालं एक कारण.

दुसरं म्हणजे नवकेतनच्या स्थापनेपासून देव आनंदने पगारदार नटांची परंपरा मोडीत काढून प्रत्येक चित्रपटाचा स्वतंत्रपणे मोबदला आकारायला सुरवात केली. स्वतःच्या नवकेतनचे चित्रपट करत असतानाच बाहेरच्या चित्रपटात भूमिका करुन त्यासाठी ठराविक पैसे घ्यायला सुरवात केली. मी अमुक इतके पैसे घेईन. मान्य असेल तरच चित्रपट साईन करेन अशी स्पष्ट भूमिका देव घेत असे. मात्र एकदा करार केला की क्षुल्लक गोष्टींसाठी निर्माता-दिग्दर्शकाला वेठीला धरण्याचा अव्यावसायिकपणा तो कधीही करत नसे. चित्रिकरणाबाबत स्वतःची मतं असली तरी सूचना करण्यापलीकडे दिग्दर्शकाच्या कामात हस्तक्षेप तो करत नसे. त्याच्या काम करण्याच्या शिस्तीमुळे चित्रपटही लवकर किंवा वेळेवर पूर्ण होई आणि सगळेच खूष असत. गाईडच्या नेत्रदीपक यशाचं श्रेय दिग्दर्शक विजय आनंदला दिलं जातं. मात्र तितकंच श्रेय देवच्या नियोजन आणि व्यवस्थापनकौशल्याला आहे. देवने गाईड काढताना रंगभूषाकार वसंत देसाईंना दोन लाख रुपयांचं साहित्य निव्वळ रंगीत चित्रिकरणासाठी रंगभूषा करायचा सराव म्हणून आणून दिलं होतं. गाईडच्या चित्रिकरणाच्या वेळी उदयपुरच्या महाराज भगवतसिंहांनी संपूर्ण युनिटला राजवाडा रहायला देण्यापासून हरे रामा हरे कृष्णाच्या चित्रिकरणासाठी नेपाळचे राजे महेन्द्र यांनी दिलेलं सहकार्य या सर्व प्रसंगांतून देवच्या लोकप्रियतेची प्रचिती येत राहिली.



नवकेतनच्या चित्रपटासाठी जुळवाजुळव सुरु करण्याआधीच प्रत्येक कलाकाराला दिली जाणारी पटकथेची छापील प्रत, चित्रिकरण सुरु असताना कलाकार, तंत्रज्ञ, आणि इतर कामगार यांच्या जेवणाखाणाची आणि औषधपाण्याची घेतली जाणारी काळजी, देवसोबत काम करताना असणारी एक सुरक्षिततेची भावना, फक्त चित्रिकरणाच्याच वेळी नव्हे तर इतरही वेळी असणारा देवचा वेळेच्या बाबतीतला काटेकोरपणा या सगळ्या गोष्टींमुळे देवच्या सिनेमात काम करायला कुठलाही कलाकार तयार होत असे, अगदी त्याचे नंतरचे सातत्याने चित्रपट आपटत असतानाही. ह्या गोष्टी नवकेतनच्या स्थायी भाव बनल्या होत्या. देवची प्रतिमा ही रोमँटिक हीरोची असून देखील त्याच्या झाडून सगळ्या नायिका त्याचं 'अत्यंत सभ्य माणूस' असं वर्णन करतात. इतकंच नव्हे तर त्याच्याबद्दल जिव्ह्याळ्याने आणि मनमोकळेपणाने बोलतात हे विशेष. व्यावसायिकता ठासून भरलेल्या आणि पैशासाठी रोकठोक असणार्‍या देवने गरजेच्या वेळी सढळ हस्ताने गरजूंना मदतही केली. आपल्या चित्रपटांचे खेळ चॅरिटी शो म्हणून दाखवले - अगदी हम दोनोच्या प्रिमिअरचं उत्पन्नही त्याने अशाच एका विधायक कामासाठी दिलं. काहींनी त्याने केलेल्या मदतीची जाण ठवली, तर काहींनी कृतघ्नपणा दाखवला. पण कुणाचा राग धरणं हे त्याच्या स्वभावातच नव्हतं. देवने अनेक नवोदित नायिकांना जसं त्याने नाव मिळवून दिलं तसंच विस्मरणात गेलेल्या नटांना पुन्हा पडद्यावर आणून नवसंजीवनी प्राप्त करुन दिली. अनेक वर्ष अडगळीत पडलेल्या प्रेमनाथकडे 'जॉनी मेरा नाम' नंतर पुन्हा खलनायकी भूमिकांची रीघ लागली. मधुबाला चित्रपटात काम करु लागली तेव्हा तिला इंग्रजीचा गंध नव्हता. देवने तिला मार्गदर्शन केलं. तो उत्कृष्ठ मास्तर आहे असं ती नेहमी म्हणायची. त्याचं इंग्लिश, हिंदी, आणि उर्दू लाजवाब होतं. देवच्या या भाषाप्रभुत्वामुळे त्याची मुलाखत घेणं हे पत्रकारांसाठी समृद्ध अनुभव असायचा.

देव नक्की कुठे चुकत गेला, याचा विचार करताना बोट ठेवण्यासारख्या अनेक जागा आहेत. देवच्या डोक्यात दिग्दर्शनाचा किडा फार पूर्वी शिरला होता. प्रेम पुजारी आपटल्यावर त्याला आणखी एक प्रयत्न करावासा वाटला असेल हे मान्य. पण हरे रामा हरे कृष्णाच्या जमलेल्या तूफान यशस्वी भट्टीचं यश हे देव निव्वळ त्याच्या दिग्दर्शनाचं समजला आणि मग हा किडा जाईचना. 'गोल्डी डायरेक्ट करेगा तो फिर मैं क्या करुंगा' हे त्यानं एका प्रश्नाला दिलेलं उत्तर त्याच्या मनातल्या या गोड गैरसमजाची साक्ष आहे. हरे रामा हरे कृष्णा नंतर देस परदेसचा छोटासा अपवाद वगळता त्याचे इतर चित्रपट आपटतच गेले. मनोरंजनाच्या दृष्टीने चित्रपटात अनेक गोष्टी मिसळा, पण कथेचं मूळ हे आपलं वाटायला हवं. देवच्या कारकीर्दीतल्या शेवटच्या टप्प्यातले सिनेमे हे वास्तवापासून, या मातीपासून खूपच दूर जाणारे होते. देव चित्रपटासाठी अगदी ताजे विषय निवडत असे. भान हरपावं असं निसर्गसौंदर्य, आजूबाजूला घडणार्‍या घटना, सामाजिक संदर्भ असलेले महागाई, भ्रष्टाचार, दहशतवाद, गुन्हेगारी, बेकारी असे असंख्य वैविध्यपूर्ण विषय देवकडे असत. मात्र अशाच अतीआधुनिक, अतीताज्या विषयांमुळे देवचे चित्रपट मागे पडत गेले. कारण एखादी घटना बारा वाजता घडली तर तीच घटना साडेबारा व्हायच्या आत झाडून सगळीकडे झळकते. मग अशा काळात ताज्या विषयांवर कुणी प्रचारकी डॉक्युमेंटरी वाटावा अशा दर्जाचा चित्रपट काढला, तर तो कोण बघेल? एखाद दुसरा चित्रपट सोडला, तर देव हाच प्रमुख भूमिकेत असायचा. तोच चित्रपटाचा नायक असायचा. मग आधी फक्त बहीण आणि बायको असलेला नायक, मग बायको-मुलं असलेला नायक, मग आणखी वय झाल्यावर सिनेमात एक तरुण नट आणि त्याच्या जोडीला एक हिरवीण असली तरी नायक मात्र देवच!! भारतीय प्रेक्षक आजही वयस्कर नायक पडद्यावर बघू शकत नाहीत. यालाही अपवाद आहेत, पण तशी परिस्थिती आजही सर्वसामान्य झालेली नाही. मग सबकुछ देव आनंद असलेले सिनेमे प्रेक्षक स्वीकारतील ही शक्यता नव्हतीच.

अफलातून कल्पनांचा त्याच्याकडे तुटवडा नव्हता. पण या सगळ्या गोष्टींचं चित्रपटात रूपांतर करताना त्यांची अवस्था धरण फुटून इतस्ततः वाहणार्‍या पाण्यासारखी व्हायची. सिनेमात चांगल्या बाजू असल्याच तर त्या ह्या महापूरात सहजी वाहून जायच्या. विषय काहीही असो, चित्रपटातल्या व्यक्तिरेखा सशक्त असाव्या लागतात. त्यांना स्वतःचे स्वभाव असावे लागतात. त्या स्वभावाचे विविध कंगोरे दृश्यांतून, संवादांतून दिसावे लागतात. इथेच कुठेतरी देवचा जबरदस्त घोळ व्हायचा. देवच्या चित्रपटातल्या सगळ्याच व्यक्तिरेखा या दिलेल्या संवादांची पोपटपंची करण्यार्‍या असायच्या. त्यांचे संवाद हे संवाद न वाटता शाळेतल्या सांस्कृतिक कार्यकमात म्हणायला घोटून घेतलेलं भाषण वाटावं अशा प्रकारचे असायचे. त्यात भरीस भर म्हणून देवच्या चित्रपटात पात्रांनी संवाद एकसुरीपणे आणि कानात पुटपुटल्यागत म्हणायच्या 'हरे रामा हरे कृष्णा' पासून सुरू झालेल्या प्रकाराने नंतर नंतर कळस गाठला.

देव आनंदवर पाश्चात्य विचारांचा खूप प्रभाव होता. त्याच्या कारकीर्दीतल्या शेवटच्या टप्प्यांत काढलेल्या चित्रपटात त्याचा अतिरेक झाला. भारतीय प्रेक्षकांना अभिप्रेत असलेलं नाट्य, कौटुंबिक वातावरण, भावनिक कल्लोळ, थोडीशी रडारड ह्या गोष्टी देवच्या चित्रपटातून अदृश्य झाल्या. पाश्चात्य वातावरणातलं चित्रिकरण, त्याच वळणाची कोरडी कथानके, पाश्चात्य उच्चारांनी हिंदी बोलणारे मठ्ठ नट्-नट्या, नको तिथे बलात्कार आणि अतीप्रसंगांची दृश्ये हे प्रकार सिनेरसिकांना आपले वाटलेच नाहीत. प्रेक्षक चित्रपटाचा, त्यातल्या एखाद्या दृश्यांचा आस्वाद घेण्याऐवजी कथानकाचा प्रचंड वेगामुळे सुरवातीला वाहून गेले आणि नंतर त्याचे सिनेमे बघत नाहीसे झाले. प्रेक्षक हा घटक बाजूला झाला आणि उरले फक्त चाहते. नवकेतनच्या चित्रपटांतली गाणी म्हणजे अर्थपूर्ण शब्दांना अवीट गोडीच्या सुरांनी कसलेल्या गायकांच्या माध्यमातून चढवलेला कळस होता. त्या संगीतात असणारा गोडवा कुठेतरी हरवला, गाण्यांतल्या शब्दसामर्थ्याचा र्‍हास झाला, त्यांचा साहित्यिक दर्जा हरवला, आणि उरला तो फक्त धागडधिंगा आणि वाद्यांचा गदारोळ. अजूनही बहुतेकांना त्याचे सत्तर सालानंतरचे बहुतेक सिनेमे आठवतच नाहीत, मग त्यातली निरस गाणी तरी कशी आठवतील? देव गेल्यावर मित्रमंडळीत सहज झालेल्या गप्पांमधे कुणीतरी 'सच्चे का बोलबाला' चित्रपटाचं नाव घेतलं. देव ऐन भरात असताना निघालेले अनेक सिनेमे एकेकदाच बघितलेले असले तरी त्यातल्या अनेक गोष्टी आजही स्पष्टपणे आठवतात. पण इथे स्मरणशक्तीला कितीही ताण दिला तरी आवर्जून व्हिडिओ कॅसेट आणून बघितलेल्या त्या सिनेमात देव आनंद संपादक(!) असतो, त्यात हेमा मालिनी असते आणि तिचा खून होतो, आणि तिच्या आणि तिच्या धाकट्या बहिणीच्या अंगावर कुठेतरी गुलाब गोंदलेला असतो यापलीकडे तपशील आठवेना. अशा चित्रपटांतलं अतर्क्य दॄश्याचं आणि सुमार गाण्याचं एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं तरी मुळात ते आठवायला तरी हवं ना? नवकेतनच्या शेवटच्या अनेक चित्रपटांची ही अवस्था होती. पण दुर्दैवाने आपले देव साहेब वास्तवापासून फार दूर पोहोचले होते. मुंगेरीलाल के हसींन सपने बघत कधीतरी आपला एखादा चित्रपट हिट होईल असं स्वप्नं बघत ते नेमाने चित्रपट काढत होते. आणि असाच एखादा सिनेमा निघाला आणि सालाबादप्रमाणे आपटला की काही दिवस 'मी देव आनंदचा फॅन आहे' असं चारचौघात सांगण्याची सोय ठेवत नव्हते. लाखो चाहत्यांनी त्याची मूर्ती ठेवण्यासाठी बांधलेली मनमंदिरं तो एकापाठोपाठ स्वतःच्या हाताने उध्वस्त करत सुटला होता.

देव आनंद म्हणायचा, 'मी चित्रपट काढणं थांबवेन ते माझ्या मृत्यू झाल्यावरच, त्या आधी नाही'. कारण चित्रपट काढणं हा त्याचा फक्त आवड किंवा व्यवसाय नव्हता. तो त्याचा प्राणवायु होता. देवने चित्रपटात काम करायला सुरवात केल्यापासून जपलेली आर्थिक शिस्त त्याच्याकडे पैशाचा तुटवडा भासू देत नसे. शिवाय त्याच्यावर प्रेम करणार्‍या लाखो चाहत्यांपैकी कुणीतरी त्याला पैसा पुरवायचंच. सिनेमे काढायला त्याने कधीही संशयास्पद स्त्रोतांकडुन पैसा घेतला नाही. पैसा कमावण्याची जी साधनं, मालमत्ता देवकडे होती ती सगळीच्या सगळी चित्रपटांशीच संबंधीत होती. बांद्र्याला असलेलं एक रेकॉर्डिंग रूम  आणि एक फिल्म प्रिव्ह्यु थियेटर आणि त्याचा स्वत:चा बंगला वगळता चित्रपटांतून त्याने काहीही इस्टेट उभी केली नाही. आज अनेक कलाकार चित्रपटसृष्टीत आल्यावर उणीपुरी पाच वर्ष होत नाहीत तोच एकूण किंमत कोट्यावधीच्या घरात जाणार्‍या चार पाच सदनिका घेताना आपल्याला दिसतात. पण देवने चित्रपटांतून जे कमावलं ते चित्रपट काढण्यातच गुंतवलं. त्याच्या श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात एका तरुण अभिनेत्रीने व्यक्त केलेले विचार अगदी योग्य होते. ती म्हणाली "चित्रपटसृष्टीने आम्हाला काय दिलं ह्याचा आम्ही नेहमी विचार करतो. पैसा-अडका, बंगला-गाडी, मानमरातब वगैरे. पण देव साहेबांनी चित्रपटसृष्टीकडून नुसतं घेतलंच नाही तर त्याच्या कित्येक पटीने सिनेमाला दिलं आहे." त्यामुळे देवने वेळीच थांबायला हवं होतं, हे बोलण्याचा आपल्याला कितपत अधिकार आहे, ते तो वरचा देवच जाणे.

पन्नासच्या दशकात जेव्हा देव चित्रपटसृष्टीत स्थिरावत होता, तेव्हा एका पत्रकाराने एका इंग्रजी नियतकालिकात त्याच्याविषयी बरंच काही(बाही) लिहीलं होतं. त्यात एक वाक्य होतं "आजपासून पंचवीस वर्षांनंतर देव आनंदचं नावसुद्धा कोणालाही आठवणार नाही." आज ते लिहीणारा कुठे आहे त्या परमेश्वरालाच ठावूक. देव मात्र सढळ हस्ताने आनंद वाटून त्याचं नाव हिंदी चित्रपटरसिकांच्या हृदयावर कायमचं कोरून गेला आहे. देवने आपल्याला काय नाही दिलं? 'फूलों का तारों का, सबका कहना है, एक हजारों मे मेरी बहना है' म्हणत भाऊ आपल्या बहिणीचं कौतुक करू लागले, तर प्रेयसीबरोबर अधिक वेळ मिळावा असं वाटणारे प्रियकर 'अभी ना जाओ छोडकर' अशी आर्त साद घालू लागले. रुसलेल्या प्रेयसीचा राग 'देखो रुठा ना करो' म्हणत दूर करू लागले तर प्रेम यशस्वी झालेले प्रेमिक 'हे मैनें कसम ली' असं म्हणत एकमेकांना जन्मोजन्मी साथ देण्याची वचनं देऊ लागले. अनेकांच्या मोबाईलच्या रिंगटोन आणि हेलोटोन मधे हम दोनो मधल्या सिगारेट लायटरच्या संगीताने स्थान मिळवलं. अंताक्षरी खेळताना 'श' अक्षर आलं की हमखास "शोखियों मे घोला जाये" हे गाणं आठवतं.

वयाची ऐंशी वर्ष उलटली तरी शरीरावर थकल्याचं कुठलंही लक्षण नव्हतं. मन ताजंतवानं असल्यावर शरीर थकेल तरी कसं? उतारवय, म्हातारपण, वयोवृद्ध, वगैरे विशेषणं ही देवसाठी नव्हतीच. त्याचा उत्साह हा प्रत्येकवेळी त्याच आवेगाने किनार्‍यावरच्या खडकांवर आपटणार्‍या समुद्राच्या लाटांसारखा होता.  भावलेला एखादा विषय घेऊन मनातल्या खळबळीचं रूपांतर चित्रपटात करुन टाकायचं, आणि तो सिनेमा कितीही जोरात आपटला—नाही, आपटला हा फार सौम्य शब्द आहे. त्याच्या शेवटच्या चित्रपटाच्या खेळाला एका चित्रपटगृहात एकही तिकीट विकलं गेलं नाही म्हणून खेळच रद्ध केला म्हणे—तरी ही त्या आणि त्याआधी साफ झोपलेल्या असंख्य चित्रपटांचं अपयश विस्मरणात ढकलून नव्या उमेदीने पुढच्या चित्रपटाच्या तयारीला लागत असे. या वयातही ज्या उत्साहात रणरणत्या ऊन्हात उभं राहून काम करायचा त्याच उत्साहात बर्फात पाय रोवून युनिटला सूचना देताना दिसायचा. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना चित्रपट हिट झाल्यावर तो ना कधी उतला-मातला, ना पडल्यावर कधी दु:ख करत घेतला वसा टाकून दिला. देवनं अगदी राजकारणातही हात पोळून घेतलेले आहेत. पण त्यात अयशस्वी झाल्यावर अधिक धडपड न करता पुन्हा चित्रपटनिर्मितीकडे वळला. 'जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया, जो खो गया मैं उसको भुलाता चला गया' हे तत्त्व आयुष्यभर जगला.  देव प्लॅस्टिक सर्जरी करुन घेतो, टक्कल लपवायला टोपी घालतो अशी टीका झाली. पण तो वागण्यात शिस्त ठेवतो, नियमित व्यायाम करतो, आहारावर नियंत्रण ठेवतो, त्याला अनेक वर्ष सुपारीच्या खांडाचंदेखील व्यसन नाही याकडे सोयिस्करपणे दुर्लक्षही झालं. नामांकित आहारतज्ञांनी "चेहर्‍यावर असा तजेलदारपणा कृत्रिमरित्या आणणं शक्य नाही" असं सांगताच अशी टीका तात्पुरती बंदही झाली. देवची जन्मतारीख सगळ्यांना माहित असताना तो वय लपवायचा ही हास्यास्पद टीका सुद्धा झाली. आपलं कौटुंबिक जीवन खाजगी राखण्याच्या त्याच्या वृत्तीवर टीका झाली. पण या जगाची जाण येईपर्यंत त्याने मुलांना नीट शिक्षण दिलं, चित्रपटसृष्टीत यायचं ते समजून उमजून याचं भान दिलं, ते मात्र विसरलं गेलं. देवची कारकीर्द भरात असतानाही त्याला उत्कृष्ठ अभिनयाबाबत एखादा पुरस्कार मिळाला तरी त्याच्या अभिनयाचं कौतुक करण्यात हात आखडता घेतला गेला. उलट कॅमेरा स्वतःवर रहावा म्हणून त्याने इतर कलाकारांच्या भूमिकेवर कात्री फिरवली अशी टीका झाली. पण त्याचवेळी चित्रपटातल्या नायक-नायिकेची भूमिका महत्त्वाची असते, इतरांची नाही हे साधं व्यावसायिक गणित लक्षात घ्यायची गरजही लेखणी परजणार्‍यांपैकी कुणाला भासली नाही. देव मात्र या सगळ्या आरोपांना उत्तर देण्याच्या भानगडीत पडला नाही. त्याची उत्तरं इतरांनीच दिली.

गेल्या वर्षा-दीड वर्षात सिनेरसिकांच्या मनावर बरेच आघात झाले. शम्मी कपूर गेला तेव्हा आपलं दंगा करणारं खोडकर बालपण गेलं. देव आनंद गेला म्हणजे आपल्या स्वप्नील विश्वातलं तारुण्य हिरावलं गेलं. आत्तापर्यंत लांब भासणारा मृत्यू जवळ आल्याचा भास झाला. तुमच्या लक्षात आलं ना आता, मी सुरवातीला आपण किती स्वार्थी असतो असं का म्हणालो ते? शेवटी आपल्याला भीती वाटते ती आपल्या मृत्यूची!! देव हे जग सोडून गेला असेल. पण वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात आपल्या चिंता धुम्रवलयासम मानून उडवून लावणारा देव आनंद त्याची ही वृत्ती, ही मानसिकता एखाद्या शिकवणीसारखी आपल्यासाठी सोडून गेला आहे. जुन्या गोष्टींना फार चिकटून न राहण्याच्या सवयीमुळे म्हणा किंवा आर्थिक कारणांमुळे म्हणा, देवच्या आयुष्याची पस्तीस वर्ष ज्या जुहूच्या आयरीश पार्क बंगल्याने बघितली त्याची डागडुजी करण्याऐवजी तो विकून त्याजागी टॉवर बांधायचं त्याने ठरवलं होतं. त्याच्यावर आता कदाचित 'इथे देव आनंद यांचे निवासस्थान होतं' अशी मुंबई महानगरपालिका पुरस्कृत पाटी लागेल. २००९ सालच्या डिसेंबरात त्याने बंगला सोडला होता. गेल्या डिसेंबरातल्या चार तारखेला देवने शरीररूपी देव्हार्‍याचाही निरोप घेतला. आता त्या देव्हार्‍यात देव नाही. पण लाखो सिनेरसिक आणि त्याच्या चाहत्यांच्या मनात मात्र तो अमर असेल.

आनंद मधल्या अमिताभचं शेवटचं वाक्य थोडं बदलून असं करता येईल "देव आनंद मरा नहीं, देव आनंद मरते नहीं!!"



 

Friday, May 10, 2013

हिंदी चित्रपटांचा 'जॉय'



अथश्री प्रतिष्ठानतर्फे चालविल्या जाणार्‍या अथश्री त्रैमासिकाचे संपादक श्री आनंद आगाशे यांच्या परवानगीने एप्रिल-जून २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेला हा लेख इथे प्रकाशित करत आहे.
-----------------------------------------------------------------------------------

जुन्या हिंदी चित्रपटाच्या चाहत्यांसाठी २०११ हे साल दु:खद आठवणी ठेऊन गेलं. आधी शम्मी कपूर आणि मग देव आनंद यांना आपल्यातून हिरावून नेत त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का दिला. २०१२ तरी चांगलं जाईल असं वाटत असतानाच ९ मार्चला जॉय मुखर्जीवर काळाची झडप पडली आणि एका वेगळ्याच युगाचा अस्त जवळ येत चालल्याची जाणीव तीव्रतेनं झाली.

नाही, ते युग म्हणजे अभिनयाचं युग नव्हे. कारण जॉय त्याच्या अभिनयासाठी  कधीच नावाजला गेला नव्हता. किंबहुना आपली अभिनयाची मर्यादित कुवत त्याने सुरवातीलाच जोखली असावी. कारण गोरागोमटा पण भावशून्य चेहरा घेऊन अभिनय करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्याच्या फंदात पडताना तो कधीही दिसला नाही. इंग्रजीत एक म्हण आहे If I cannot overwhelm with my quality, I will overwhelm with my quantity. मुद्राभिनय हा आपला प्रांत नव्हे, ही खूणगाठ मनाशी बांधलेल्या जॉयने मग त्याला जे जमत असे त्यावरच जास्तीत जास्त भर दिला. चित्रपटातल्या नायिकेच्या मागे गाणी गात फिरत असतानाच चेहर्‍यावर कमालीचा भोळेपणा व गोडवा लेऊन वावरणं हे जॉय मुखर्जी नामक उत्साहाच्या मूर्तीला जसं आणि जितकं जमलं तसं क्वचितच कुणाला जमलं असेल (प्रगतीपुस्तकात फारशी उठावदार कामगिरी कधीच करता न आल्याने त्यावर सही घेण्यासाठी तीर्थरूपांसमोर चेहर्‍यावर जबरदस्त भोळेपणा आणि बिच्चारा असण्याचे भाव घेऊन जायचो ते आठवलं. याला अभिनय म्हणतात महाराजा! पण जॉय मुखर्जी आणि माझ्या प्रगतीपुस्तकाचा काय संबंध? हो की नाही?).

त्याच्या वडीलांनी घरातच त्याला आखाडा तयार करुन एक मल्ल त्याच्या प्रशिक्षणासाठी नेमलेला आणि त्याला व्यायामाचा एक ठराविक आराखडा आखून त्यावर अंमल करायची जबाबदारी सोपवलेली. मग काय! मुळातच देखण्या असलेल्या जॉयचा बांधा नियमित व्यायामामुळे अतिशय रेखीव आणि सुद्धृढ व्हावा यात काही आश्चर्य नव्हतं. रोशोगुल्ला छाप अती गोड दिसणं हे व्यक्तिमत्वाचं एक व्यवच्छेदक लक्षण असलेल्या समस्त बंगाली नटांत धिप्पाड आणि पिळदार शरीरयष्टीच्या जॉयचं वेगळेपण साहजिकच उठून दिसायचं. मात्र इतकं कमावलेलं शरीर असूनही शर्ट काढून भिरकावण्याची गरज त्याला कधीही भासली नाही. त्याच दणकट शरिरयष्टीनिशी टी-शर्ट, शैलीदार टोप्या आणि तत्सम रंगेबिरंगी कपड्यात तो अतिशय देखणा दिसे.


विश्वजीत हा त्याच्याच पठडीतला, पण त्याच्या मागे कुणी गॉडफादर नव्हता. मात्र जॉयच्या मस्तकावर अनेकांचा वरदहस्त होता. आपले सख्खे कुटुंबीयच चित्रपटसृष्टीत आपले गॉडफादर असण्याचा फायदा जॉय इतका क्वचितच कुणाला मिळाला असेल. त्याचे वडील शशिधर मुखर्जी, काका सुबोध मुखर्जी, अशोक कुमार आणि किशोर कुमार हे सख्खे मामा असा जवळजवळ सगळाच कुटुंबकबिला चित्रपटसृष्टीत अगोदरच पाय रोवून उभा होता. जॉयचे वडील आणि निर्माते शशिधर मुखर्जी यांनी १९६० साली त्याच्यासाठी काढलेला 'लव्ह इन सिमला' हा तूफान यशस्वी ठरल्याने जॉय पदार्पणातच तरुण सिनेरसिकांच्या मनात आपले छोटेसे स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. या चित्रपटातून त्याच्या बरोबरीने अझरा आणि साधना या नट्यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. त्यात अझरा ही पुढे फारशी चमक दाखवू शकली नाही तर साधनाने तिच्या वैशिष्ठ्यपूर्ण 'साधना कट' म्हणून ओळखल्या गेलेल्या केशरचनेसकट तूफान लोकप्रियता मिळवली.


सिमला सारख्या नयनरम्य ठिकाणी चित्रिकरण झालेल्या या चित्रपटाच्या घवघवीत यशामुळे अशा प्रकारच्या संगीतप्रधान हलक्याफुलक्या प्रेमकथा घेऊन काढलेल्या चित्रपटांना नाव काय ठेवायचं असा अनेकांना पडलेला प्रश्न सुटला. देशातच नव्हे तर परदेशातही एखाद्या विशिष्ठ शहरात चित्रिकरण झाल्यास आणि काही समर्पक नाव न सुचल्यास चक्क 'लव्ह इन...' किंवा तत्सम शब्द जोडून त्या शहरांचंच नाव चित्रपटाला दिलं जाण्याचा गंमतीदार पायंडा पडला. खुद्द जॉयने १९६६ साली "जापाssssssन, लव्ह इन टोकियोsssss" असा आरोळीवजा चित्कार ठोकत बरंचसं चित्रिकरण टोकयोमधे झालेल्या अशाच एका चित्रपटात नायकाची भूमिका केली. त्या चित्रपटाचं नाव वाचक सूज्ञ असल्याने सांगण्याची गरज नाही! कथानक घडत असलेल्या आणि चित्रिकरण झालेल्या शहराचं आणि देशाचं नाव एका गाण्यात गुंफण्याचा हा बहुधा पहिलाच प्रसंग असावा.

                    

एकोणीसशे पन्नासचं दशक देव आनंद, राज कपूर, दिलीप कुमार या त्रयीने प्रेक्षकांना झुलवण्यात - आणि अर्थातच बलराज सहानी आणि अशोक कुमार यांच्यासारख्यांनी त्यांना जमिनीवर ठेवण्यात यश मिळवलेलं असताना पडद्यावर धम्माल करणार्‍या जॉय मुखर्जीच्या नर्मविनोदी सादरीकरण असलेल्या रहस्यप्रधान प्रेमकथा यांनी सिनेरसिकांच्या मनाचा एका वेगळ्या प्रकारे ठाव घेतला. मेंदू घरी ठेऊन चित्रपटगृहात मजा करायला जाणे ही प्रेक्षकांची मागणी त्यांनी नक्कीच पूर्ण केली. मग अशा प्रकारचे हलकेफुलके चित्रपट जॉयचा बालेकिल्लाच बनला.

स्वातंत्र्य मिळून एका तपाहून अधिक काळ लोटून गेला होता. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी किशोरावस्थेत असलेल्या अनेकांना आता चित्रपट बघताना तरी ते कष्टप्रद दिवस विसरून स्वप्नमय आणि आशावादी दुनियेत शिरण्याची गरज भासू लागली होती. अशा वेळी त्यांच्या समोर सादर झाला तो १९६० सालचाच 'हम हिंदूस्तान'. या चित्रपटात सुनील दत्त, आशा पारेख, हेलन, लीला चिटणीस, प्रेम चोपडा, गजानन जहागिरदार आणि संजीव कुमार अशी भरभक्कम मंडळी असून सुद्धा सुनिल दत्तच्या धाकट्या भावाच्या भूमिकेत असलेला जॉय मुखर्जी निश्चितच लक्षात राहतो तो त्याच्या हेलनबरोबरच्या प्रणयदृश्यांमुळे. हा चित्रपटही प्रचंड यशस्वी झाल्याने जॉयलाही त्याचा फायदा झालाच.

 


त्याकाळी जॉय मुखर्जींचे अनेक चाहते असले तरी कालांतराने ते टिकले नसावेत हा माझा गैरसमज माझ्या एका आजीनेच दूर केला. एकदा आजी आणि आजोबा दूरदर्शनवर एक मुसाफिर एक हसीना बघत होते. आजोबांना चक्क घोरताना बघून "तेव्हा थियेटरात झोपले होते, आता काय घरातल्या घरात बघतोय....दिली ताणून! किती गोड दिसतो ना रे जॉय?" अर्थातच साधना असलेली दृश्य आली की आजोबांची झोप तात्पुरती उडत असे आणि "गाणं लागलंय ना, म्हणून जाग आली" अशी लंगडी सबब ते पुढे करत. आजोबा-आजींचा हा प्रेमळ संवाद ऐकल्यावर आजोबा साधनाचे उघड तर आजी जॉय मुखर्जीची छुपी फॅन असल्याचा शोध मला लागला. छुपी अशासाठी की जॉयबद्दल बोलताना बिचकत बिचकत ती "शम्मीएवढा नाही, पण तरी छान नाचतो....नाही?" असं शेपूट हळुच जोडत असे.


हिंदी चित्रपटांचा सुवर्णकाळ मानलेल्या गेलेल्या १९५० आणि १९६०च्या दशकात केवळ सुश्राव्य संगीतामुळे अनेक चित्रपटांनी सुमार कथा आणि त्याहून सुमार अभिनय असूनदेखील तिकीटबारीवर घवघवीत यश मिळवलं. सुदैवाने तेव्हा पायरसी इतकी फोफावलेली नसल्याने आणि घरोघरी रेडिओ आणि दूरदर्शन संच नसल्याने फक्त गाण्यांचा आस्वाद घ्यायचा असेल तरी सिनेरसिकांना चित्रपटगृहांचाच आश्रय घ्यावा लागे. अनावश्यकरित्या अचाट लांबी ठेवलेल्या या अत्यंत रटाळ चित्रपटाला यश मिळालं ते कर्णमधूर संगीतामुळेच. रफी आणि आशाच्या जादूई आवाजातल्या 'आप यूंही अगर हमसे मिलते रहे', 'बहोत शुकरिया, बडी मेहेरबानी', 'मुझे देखकर, आपका मुस्कुराना' अशा गाण्यांनी आणि साधना व जॉयच्या तितक्याच गोड चेहर्‍याने या चित्रपटाला लोकप्रिय केलं.

स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेल्या रफीला एका वेगळ्या अर्थाने परकायाप्रवेशाची कला अवगत होती. कसलेल्या नटांच्या बाबतीत तर तो स्वतःचा आवाज हा त्यांचाच आवाज असल्याचा भास तर सहज निर्माण करीच, पण बंगाली चित्रपटसृष्टीचा देव आनंद म्हणून ओळखला गेलेला विश्वजीत, फारसा देखणा नसला तरी चेहर्‍यावर एक प्रकारचा सोज्ज्वळपणा असलेला भारत भूषण, तलवारकट मिशा शोभून दिसणारा गोरागोमटा प्रदीप कुमार आणि अर्थातच रोशोगुल्ला जॉय मुखर्जी नामक ठोकळे पडद्यावर निदान गाण्यांपुरते तरी जिवंत वाटण्याचं श्रेय त्यालाच जातं. या निर्विकार चेहर्‍याच्या नटांनी कॅमेर्‍यासमोर न केलेला अभिनय रफी आपल्या आवाजातून करुन गाणी अजरामर करुन सोडायचा आणि पर्यायाने चित्रपट अक्षरशः चालवायचा असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जॉयच्या 'फिर वोही दिल लाया हूं' या चित्रपटातील गाणी. त्यातली इतर गाणी श्रवणीय आहेतच; पण या सगळ्यावर कळस चढवला तो 'आंचल में सजा लेना कलियाँ, जुल्फों मे सितारे भर लेना' या गाण्याने. चेहर्‍याच्या मूळच्या गोडव्याला प्रेमळ आर्जवाची जोड देऊन जॉयने हे गाणं थोडं तरी प्रेक्षणीय केलं. सोबत आशा पारेख असल्यावर प्रेक्षकांना आणखी काय हवं?  गिटार गदेसारखी खांद्यावर घेऊन 'लाखों है निगाह में, जिंदगी की राह में' गात फिरणारा जॉय ती गिटार वाजवू शकेल इतपत भास नक्की निर्माण करु शकायचा.


आपले वडील फिल्मिस्तान स्टुडीओचे संस्थापक जरी असले तरी सेटवर मात्र जॉय 'अमक्याचा मुलगा' किंवा 'मी म्हणजे कोण आहे माहीत आहे का' अशा आढ्यतेने कधीही वावरला नाही. उलट निर्माता आणि दिग्दर्शकाला जास्तीत जास्त सहकार्य करण्याचीच त्याची वृत्ती राहिली. या चित्रपटात त्याच्या बरोबर प्रथमच नायिकेची भूमिका करणारी आशा पारेख त्याची आठवण सांगताना म्हणते "जॉय बरोबर काम करणं म्हणजे काम वाटत नसे. शाळेची सहल निघाल्यासारखं खेळीमेळीचं वातावरण सेटवर असायचं. शिवाय जॉय खूप मनमेळावू आणि सगळ्यांना मदत करणारा होता. 'आँखों से जो उतरी है दिल में' हे गाणं माझ्यावर चित्रित होणार होतं. नेमकी फिल्म कमी पडणार अशी शक्यता निर्माण झाली, आणि गाण्याचं चित्रिकरण त्या दिवशी पूर्ण होणार नाही अशी आम्हा सगळ्यांनाच भीती वाटू लागली. पण जॉयने प्रचंड मदत केली आणि चित्रिकरण त्याच दिवशी पूर्ण झालं.

आशाने त्यानंतर जॉय बरोबर 'जिद्दी' आणि 'लव्ह इन टोकियो' हे तूफान लोकप्रिय चित्रपट केले; पण जॉयचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट म्हणता येईल तो 'शागीर्द' हा मात्र सायरा बानोच्या वाट्याला आला. यात आय. एस. जोहरने साकारलेला वृद्धत्वाकडे झुकत चाललेला, जगावर कावलेला, आणि 'कधीही प्रेमात पडू नकोस, कधीही लग्न करु नकोस' अशी शिकवण देणारा प्रोफेसर आणि मग तोच मदनबाणाचा शिकार झाल्यावर त्यालाच प्रेमाचे धडे देणारा जॉय मुखर्जीने साकारलेला शागीर्द या दोन व्यक्तीरेखांनी मिळून धम्माल उडवून दिली. यातलं "दुनियाsss पागल है, या फिर मैं दीवाना; मुझको चाहती है झुल्फों मे उलझाना..." या गाण्यात जॉय जे काही नाचलाय त्याला तोड नाही. आजही जी गाणी टि.व्ही.वर लागताच उठून नाचत सुटावसं वाटतं त्यात ह्या गाण्याचा नक्कीच समावेश आहे. हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्तम विनोदपटांमधे गणला जातो.



तरुणांनी त्याच्या फॅशनचं अनुकरण करणं आणि तरुणींनी त्याच्यावर जीव ओवाळून टाकणं हे त्याचं नशीब मात्र फार काळ टिकलं नाही. १९६८ सालच्या हमसाया पासून त्याच्या कारकिर्दीला झपाट्याने उतरती कळा लागली. मुळातच नगण्य अभिनयक्षमता असणार्‍या जॉय मुखर्जीकडे दोन गोष्टी होत्या. त्यापैकी एक नैसर्गिक तर दुसरी मिळवलेली. ती नैसर्गिक गोष्ट म्हणजे अर्थातच त्याचा गोड चेहरा आणि ती मिळवलेली गोष्ट म्हणजे नियमित व्यायामानं कमावलेलं पिळदार शरीर. हळूहळू त्याने व्यायामाकडे दुर्लक्ष करायला सुरवात केली. पत्नीची- नीलमची नजर चुकवून तो हळूच सटके आणि बाहेर जाऊन अरबटचरबट खाऊन येई. त्याचं यश आणि त्याचं व्यायामाकडे होत चालेलेलं दुर्लक्ष आणि चुकीचा आहार यांचा काही जवळचा संबंध होता असं ठामपणे म्हणता येणार नाही, पण या वाईट सवयींनी आपला प्रताप दाखवायला सुरवात नक्कीच केली. हळूहळू 'वेळ घालवायला उत्तम' या हेतूने जॉयचे चित्रपट बघायला जाणार्‍या प्रेक्षकांना आणि अर्थातच निर्माता-दिग्दर्शकांना राजेश खन्ना, जीतेंद्र आणि मग अमिताभ बच्चन अशा नटांच्या रूपाने समर्थ आणि उत्तम पर्याय मिळाल्याने जॉयची गरज भासेनाशी झाली.

कारकिर्दीला उतरती कळा हे फारच सौम्य शब्द म्हणावे लागतील, कारण हमसाया आणि त्या नंतरचा जॉय मुखर्जीचा जवळजवळ प्रत्येक चित्रपट आपटला. ही अपयशाची माळ त्याच्या हैवान (१९७७) या शेवटच्या चित्रपटापर्यंत कायम राहिली. सूज्ञपणा म्हणा किंवा हतबलता, जॉयने काळाची पावले ओळखून अभिनयातून आपलं अंग काढून घेतलं. त्याचं शेवटचं यश हे मात्र त्याने छलिया बाबू (पुन्हा १९७७) ह्या राजेश खन्ना आणि झीनत अमान अभिनित चित्रपटाचं दिग्दर्शन करुन मिळवलं. या चित्रपटाने बर्‍यापैकी यश मिळवलं असलं तरी त्याचा कोणताही फायदा जॉयला वैयत्तिक स्वरूपात झाला नाही. जॉय मुखर्जीने मग एकोणिसशे पंचाईंशी साली आलेल्या 'ब' दर्जाच्या फूलन देवी (१९८५) या चित्रपटात खलनायकाची भूमिकाही करुन पाहिली, मात्र त्याचाही त्याच्या चित्रपटसृष्टीतल्या गमावलेल्या स्टारपदाला परत आणण्याच्या दृष्टीने काहीही फायदा झाला नाही. इतरांसारख्या त्यानं चरित्र भूमिकाही न केल्यानं जॉय जो संन्यस्त झाला तो कायमचाच. शेवटी शेवटी त्याची ओळख काजोल आणि राणी मुखर्जीचा काका अशी करुन द्यावी लागत असे.


शम्मी कपूर आणि देव आनंदच्या मृत्यूने बसलेले धक्के पचायच्या आधीच ९ मार्चला वयाच्या अवघ्या त्र्याहत्तराव्या वर्षी जॉय मुखर्जीनेही इहलोकाला राम राम ठोकल्याची बातमी आली आणि त्याच्या जाण्याने जे जे चांगलं, जुनं आणि कदाचित म्हणूनच असलेलं सोनं यांचं युग संपत चालल्याची जाणीव अधिकच ठळक झाली. त्या काळच्या किंचित नटांची जितकी टिंगल-टवाळी प्रेक्षक करीत त्याच्या एक सहस्त्रांश टीका आजच्या सुनील शेट्टी, अक्षय कुमार, जॉन अब्राहम वगैरे प्रभूतींना सहन करावी लागली असेल असं वाटत नाही. अनेकांची तर "मला विश्वजीत, जॉय मुखर्जी आणि बबिता हे वेगवेगळे ओळखू यायचेच नाहीत" असं म्हणण्यापर्यंत मजल गेली होती. त्यावेळच्या अनेक उत्कृष्ठ नटांना प्रचंड प्रमाणावर असलेली मागणी पूर्ण करणं शक्य नव्हतं म्हणा किंवा प्रथितयश अभिनेत्यांना प्रत्येक चित्रपटात घेणं अनेक निर्मात्यांना परवडण्यासारखं नव्हतं म्हणा, ती पोकळी भरून काढली ती मात्र विश्वजीत, भारत भूषण, प्रदीपकुमार, जॉय मुखर्जी यांच्यासारख्या त्यावेळच्या माठ, ठोकळा आणि पुतळा अशा विशेषणांनी हिणवल्या गेलेल्या नटांनीच. या सगळ्यात जॉय मुखर्जी इतकी छाप कुणीच पाडली नसेल. जॉय इतका उत्साह, प्रचंड प्रमाणात असलेली आणि ओसंडून वाहणारी ऊर्जा त्याने अनेक गाण्यांत घातलेल्या धागडधिंग्याच्या रूपात अजरामर राहील. नायिकेसमोर आर्जवं करताना चेहर्‍यावर आणलेला भोळेपणाचा आव हा आव न वाटता खराच वाटावा इतपत अभिनय त्याला नक्की जमला. शम्मी कपूर खालोखाल जॉय मुखर्जीच्या कपड्यांचं, नाचण्याचं अनुकरण त्याकाळी केलं जाई एवढं सांगणं जे जॉयच्या त्याकाळी तरुणांच्या मनातलं स्थान काय होतं हे सांगण्यासाठी पुरेसं आहे.

आजोबा त्यांच्या पांढर्‍या विजारीवर पांढरे बूट आजीला आवडतं म्हणून घालायचे म्हणे. आणखी काय सांगू?


-----------------------------------------------------------------------------------

जॉय मुखर्जीचे चित्रपटः
  • लव्ह इन सिमला, हम हिंदूस्तानी  - १९६०
  • ऊम्मीद, एक मुसाफिर एक हसीना - १९६२
  • फिर वोही दिल लाया हूं  - १९६३
  • जिद्दी, जी चाहता है, इशारा, दूर की आवाज, आओ प्यार करें  - १९६४
  • बहू बेटी - १९६५
  • साज़ और आवाज, ये जिंदगी कितनी हसीन है, लव्ह इन टोकियो - १९६६
  • शागीर्द - १९६७
  • हमसाया, एक कली मुस्कायी, दिल और मुहब्बत - १९६८
  • दुपट्टा - १९६९
  • पुरस्कार, मुजरिम, इन्स्पेक्टर, एहसान, आग और दाग  - १९७०
  • कहीं आर कहीं पार - १९७१
  • एक बार मुस्कुरा दो - १९७२
  • हैवान - १९७७
-----------------------------------------------------------------------------------