Friday, January 21, 2022

संयुक्त राष्ट्रसंघात भारत पहिल्यांदाच मांडतोय हिंदू धर्माची बाजू

"इतर धर्मांबद्दल असहिष्णुता हा अब्राहमिक धर्मांचा एक सिद्धांत आहे तर हिंदू धर्म सैद्धांतिकदृष्ट्या सहिष्णू आहे."

— अस्तित्वात असलेल्या दहशतवादाकडे दुर्लक्ष करुन emerging म्हणजे येऊ घातलेल्या तथाकथित काल्पनिक हिंसेला झोडपू पाहणार्‍या काही घटकांचा डाव उघड करताना आज संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे प्रतिनिधी श्री टी एस तिरुमूर्ती यांनी या प्रयत्नांच्या चिंधड्या उडवल्या. 


हा राहुल शिवशंकर यांनी टाईम्स नाऊ वाहिनीवरील तुघलकचे संपादक श्री गुरुमूर्ती यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा जो भाग आपल्याला या व्हिडिओत दिसतो त्याचा मराठी भावानुवाद आहे. श्री गुरुमूर्ती यांची इंग्रजी बोलण्याची विशिष्ट म्हणजे दाक्षिणात्य शैली लक्षात घेता पुनरुक्ती टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे हे लक्षात घ्यावं. तसेच, आजवर पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे हिंदूंच्या बाजूने का बोलत नाहीत असा घोष करणार्‍या लोकांना कदाचित यामुळे उत्तर मिळेल की प्रत्येक बाब ही इंस्टंट पदार्थांसारखी लगेच, आपल्याला हवी तेव्हा होत नसून योग्य वेळी अत्यंत प्रभावी तरीही संवैधानिक पद्धतीने, ज्याआंतरराष्ट्रीय मंचावर मांडली जात आहे त्याचा आदर राखून कशी मांडणे आवश्यक आहे ते कळेल अशी आशा. 

राहुल शिवशंकर: भारताने संयुक्त राष्ट्रसंघात हिंदू धर्माची जी बाजू मांडली त्याचे महत्त्व किती यावर आपण आज आपल्या स्टुडियोत उपस्थित असलेले पत्रकारितेतील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व, तुघलकचे संपादक श्री गुरुमूर्ती यांच्याकडून जाणून घेणार आहोत. श्री गुरुमूर्ती, टाईम्स नाऊ आणि विशेषतः माझ्याशी संवाद साधल्याबद्दल आपले अनेक आभार.

श्री गुरुमूर्ती: आभार.

राहुल शिवशंकर: जगात प्रचलित असलेल्या काही विशिष्ट प्रकारच्या धार्मिक भेदभावांच्या प्रकारांकडे विशेष लक्ष देऊन हिंदू धर्माबद्दल पसरवला जात असलेला भयगंड (Hinduphobia) या सारख्या इतर प्रकारांकडे संयुक्त राष्ट्रसंघ जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे या गोष्टीकडे भारताने लक्ष वेधलं. ही घटना तुम्हाला किती महत्त्वपूर्ण वाटते?

श्री गुरुमूर्ती: आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी परिषदेत टी एस तिरुमूर्ती यांनी जे केलं ते खूपच थोर कार्य म्हणावे लागेल. एक म्हणजे दहशतवाद या शब्दाची व्याख्या सतत बदलून दहशतवादविरोधी लढा सौम्य करण्याचा जो प्रयत्न चालवला जात होता तोच त्यांनी उध्वस्त केलेला आहे. गेली काही वर्षे दहशतवाद या शब्दाचीच व्याख्या सौम्य करुन खर्‍या दशतवादाला एक प्रकारची क्लीनचिट देण्याचा प्रयत्न सुरु होता. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात दहशतवादविरोधी चर्चा घडत असताना अब्राहमिकेतर धर्मांच्या विरोधात असलेल्या पूर्वग्रहाला उघडे पाडले, जे याआधी कधीही, कधीही झाले नव्हते. गेल्या सत्तर वर्षात भारतीय प्रतिनिधीने भारतीय संस्कृतीची बाजू घेतल्याचं बघायला मिळालं नव्हतं. हे असं पहिल्यांदाच घडतं आहे की भारताने भारतीय संस्कृतीची बाजू मांडायला तोंड उघडलेलं आहे आणि ते ही अशा आंतरराष्ट्रीय मंचावर जिथे अशा कुठल्याही प्रकारची चर्चा ही अब्राहमिक धर्ममतांना प्रमाण मानत, तेच मानक ठेऊन होत असे अशा मंचावर. दहशतवाद या संज्ञेला सौम्य करण्याच्या प्रयत्नांच्या श्री तिरुमूर्ती यांनी कशा चिंध्या केल्या ते आपण समजून घेऊ. सद्ध्या अस्तित्वात असलेला दहशतवाद व त्या अनुषंगाने घडत असलेल्या घटनांकडे संपूर्ण दुर्लक्ष करत, राजकीय, धार्मिक, आणि इतर हितसंबंध गुंतलेल्या काही देशांनी "उदय होत असलेले धोके" (emerging threats) नामक नवीन संज्ञा जन्माला घातली. अर्थातच कुठल्याही तात्त्विक किंवा तटस्थ भूमिकेतून या देशांनी ही संज्ञा जन्माला घातलेली नव्हती. आणखी एक गोष्ट म्हणजे दहशतवाद या शब्दाची दाहकता सौम्य करण्याकरता त्यांनी दहशतवादाचे उपप्रकार पाडायला सुरवात केली: 
(१) कट्टरतावाद आणि वांशिक आधार असलेला हिंसक दहशतवाद (Radically and ethnically motivated violent extremism)
(२) अतिरेकी राष्ट्रवाद (Violent nationalism)
(३) उजवा कट्टरतावाद (Right-wing extremism)

बाँब आणि गोळ्यांद्वारे मनुष्यहत्यांसारख्या वास्तवात घडवून आणल्या जाणार्‍या घटनांपासून लक्ष दुसरीकडे वळवत लोकाशाहीचा एक अपरिहार्य भाग असलेल्या राजकीय संघर्षाच्या घटनांना दहशतवादाचा एक प्रकार असल्याचे उपरोल्लेखित देशांकडून भासवले जात होते. श्री तिरुमूर्ती यांनी हा भंपकपणा कसा हे सिद्ध करणारी काही कारणे सांगितली ती अशी: 

श्री तिरुमूर्ती यांच्या म्हणण्यानुसार, 
  • असे वर्गीकरण जागतिक दशतवादविरोधी परिषदेच्या स्थापनेमागील तत्त्वांच्या विरोधात जाते. बाँबस्फोट आणि बंदुकांद्वारे मनुष्यहत्यांसारख्या वास्तवात घडवून आणल्या जाणार्‍या घटनांच्या मागे असलेल्या कारणांचा शोध घेणे हे या परिषदेच्या स्थापनेमागील कारण होय. 
  • दुसरं म्हणजे असे वर्गीकरण काही प्रगत राष्ट्रांनी ९-११च्या दहशतवादी हल्ल्याच्या आधी जन्माला घातलेल्या "चांगला अतिरेकी आणि वाईट अतिरेकी" या फसव्या कल्पनेकडे नेणारे आहे. 
  • तिसरं म्हणजे हे समजून घेणं गरजेचं आहे की लोकशाहीत उजवी विचारसरणी आणि डावी विचारसरणी यांच्यापैकी काय निवडायचे ही जनतेच्या निवडणुकीतील निर्णयावर अवलंबून असते. जनता उजव्या किंवा डाव्या दोन्ही विचारसरणीमागील अतिरेकी विचारांना नाकारतही असते. तेव्हा, अशा प्रकारे वैचारिक संघर्षाला  दहशतवादावरील चर्चेत सामील करुन त्याला थेट हिंसक अतिरेकी कारवायांच्या पंगतीला बसवण्याचा अव्यापारेषू व्यापार हा निव्वळ दहशतवादाच्या मुळाच्या अर्थात त्यामागील सत्याच्या शोधाकडे जाण्यापासून लोकांना रोखणे याच उद्देशाने केलेला वाटतो. 
  • चौथा मुद्दा असा की दहशतवाद्यांचे वर्गीकरण करताना तयार केलेली छद्म-लेबले राष्ट्रीय किंवा स्थानिक पातळीवरील मुद्द्यांना लावून संघर्षाच्या स्थानिक मुद्द्यांना दहशतवादाच्या पातळीपर्यंत उंचावणे आणि मग आपोआप प्रत्यक्ष घडत असलेल्या दहशतवादाला सौम्य करणे असा दुहेरी डाव साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परराष्ट्रमंत्री श्री जयशंकर यांचे विधान उद्धृत करताना श्री तिरुमूर्ती  म्हणाले की "दहशतवाद हा दहशतवाद असतो, दहशतवादी हा दहशतवादी असतो, आणि चांगला दहशतवाद आणि वाईट दहशतवाद वगैरे असं काही नसतं." अशा प्रकारे ठामपणे घेतलेली ही भूमिका ही खोडसाळपणे व मुद्दाम दहशतवादाची सौम्य स्वरूपात खोटारडी मांडणी करण्याच्या विरोधात भारताने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
अब्राहमिकेतर धर्ममतांच्या विरुद्ध असलेल्या पूर्वग्रहदूषित मतांना श्री तिरुमूर्ती यांनी अशा प्रकारे प्रभावी पद्धतीने सुरुंग लावला. या आधी आंतरराष्ट्रीय मंचांवरुन होणार्‍या विचारमंथनात अब्राहमिक धर्ममते आणि अब्राहमिकेतर धर्म यांच्यात फरक करुन कधीही चर्चा झालेली नव्हती. [अपवाद फक्त मूलतत्वावाद अभ्यास प्रकल्प (fundamentalism project study) याचा. यात मात्र अब्राहमिक धर्ममते आणि अब्राहमिकेतर धर्म असे वर्गीकरण करुन त्यावर विवेचन केलेले दिसते.] श्री तिरुमूर्ती म्हणाले की सद्ध्या प्रचलित असलेल्या फोबियांमधे इस्लामोफोबिया, ख्रिती रिलिजन बद्दल द्वेष, व अ‍ॅन्टीसेमिटिझम अर्थात ज्युविरोधवाद हे प्रकार प्रामुख्याने आढळतात. पण या सगळ्याच्या सगळ्या वर्चा या अब्राहमिक धर्ममतांच्या बाबतीतल्या आहेत. पण अब्राहमिकेतर धर्मांबद्दल मोठ्या प्रमाणात असलेला आकस आणि द्वेष हा संयुक्त राष्ट्रसंघाने आजवर विचारातही घेतलेला नाही, त्यावर कधी चर्चाही केलेली नाही. हिंदूद्वेष, शीख समुदायाबद्दलचा द्वेष, बौद्धद्धमताबद्दल असलेला द्वेष हे देखील अस्तित्वात असताना या व अशा अब्राहमिकेतर धर्मांबद्दल असलेल्या द्वेषाकडे आजवर तुम्ही आजवर दुर्लक्ष का केलंत असा सडेतोड प्रश्न श्री तिरुमूर्ती यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला विचारला. यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंतरराष्ट्रीय पटलावर आपली बाजू लढवली जात आहे अशी भावना एक हिंदू म्हणून आमची प्रथमच झाली. कारण साधारण तीनेक शतकांपासून आजपर्यंत दहशतवाद, धर्ममते, व तत्सम विषयांवर होणार्‍या चर्चांचा सूर हा आम्ही हिंदू म्हणजे कुणीतरी मागासलेले आणि म्हणून टाकून देण्याच्या लायकीचे असाच असायचा, त्याला  भारताचे प्रतिनिधी श्री तिरुमूर्ती यांनी चांगलाच सुरुंग लावला. 

आता श्री तिरुमूर्ती यांच्या युक्तीवादातला सर्वात महत्त्वाचा भाग सांगतो. एक म्हणजे अब्राहमिक धर्ममतांमध्ये सैद्धांतिक आणि उपदेशात्मक पातळीवर असहिष्णुता आहे आणि हा मुद्दा जगभरात झालेल्या व सुरू असलेल्या विचारमंथनांत मान्य करण्यात आलेला आहे. दुसरीकडे अब्राहमिकेतर धर्मांत सैद्धांतिक आणि उपदेशात्मक पातळीवर असहिष्णुता अस्तित्वात नाही, आणि हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. व्यक्तीगत पातळीवर आपण सहिष्णू किंवा असहिष्णू असू शकतो. किंबहुना, मनुष्यमात्रांतील असहिष्णुता नियंत्रित करण्याचे काम हे (म्हणजे अब्राहमिकेतर) धर्म करतात. पण जर का धर्मच सैद्धांतिक आणि उपदेशात्मक पातळीवर असहिष्णू असतील तर ते मनुष्यांतील असहिष्णुता अनेक पटींनी वाढवण्याचे काम करतात हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. ही बाब Encyclopedia Britannica या शब्दकोषासकट जागतिक साहित्यात मान्य झालेली आहे. अगदी अयोध्या खटल्यात सर्वोच्च न्यायालायाचे न्यायाधीश श्री भरुचा आणि श्री अहमदी यांनीही हेच प्रतिपादन केले की हिंदू धर्म हा सैद्धांतिक पातळीवर सहिष्णूच आहे. हिंदू धर्मीय हे माणूस म्हणून असहिष्णू असू शकतात, पण त्यांचा धर्मसिद्धांत त्यांना सहिष्णू बनवतो व बनवत राहील. हा अब्राहमिकेतर धर्मांचा सर्वात मोठा गुण आहे जो या आधी भारतीय किंवा आंतरराष्ट्रीय बुद्धीजीवी(!) वर्तुळात चर्चिला गेलाच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अब्राहमिकेतर धर्मांत मूलतत्ववाद नामक गोष्टच अस्तित्वात नाही (कारण या धर्मांची मूल तत्त्वेच सहिष्णू आहेत). वस्तुतः मूलतत्ववाद प्रकल्पाचा अब्राहमिक धर्ममतांबाबतचा निष्कर्ष हा लक्षात घेण्यासारखा आहे: "मूलतत्वावाद हा लिखित स्वरूपात उपदेश अस्तित्वात असलेल्या अब्राहमिक धर्मांची वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. या धर्मांत लिखित वचनांचे प्रामाण्य अध्याहृत असून, लिखित वचनांपासून ढळणे किंवा च्युत होणे हे मान्य नाही, ते सहनही केले जात नाही. तसेच, हिंदू, शीख, बौद्ध, ताओइझम (चीनी) आदि पौर्वात्य धर्म हे मूलतत्ववादाने पीडीत नाहीत." 

भारतीय बुद्धीवादी (!) वर्तुळात अशी चर्चा कधी ऐकली आहे काय? मूलतत्वावाद प्रकल्प हा एक आंतरराष्ट्रीय प्रकल्प असून त्या अंतर्गत १९८० साली सुरू झालेला आंतरराष्ट्रीय प्रकल्प असून या अंतर्गत १९९४ सालापर्यंत ५ अहवालवाजा खंड प्रकाशित झालेले आहेत. असा हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प जर त्याच्या प्रकाशनांत म्हणत असेल की अब्राहमिकेतर धर्मांत सैद्धांतिक आणि उपदेशात्मक पातळीवर असहिष्णुता नाही आणि मूलतत्ववाद नाही तर त्याला निश्चितपणे वजन प्राप्त होते. या गोष्टी ज्या आजवर आपण जागतिक पातळीवर सत्य म्हणून स्थापित करु शकत नव्हतो, ज्यांमुळे आपल्याला चर्चेत आणि इतर बाबतीत अब्राहमिक धर्ममतांच्या बरोबरीने स्थान नव्हतं, त्याच गोष्टी श्री तिरुमूर्ती यांनी ठामपणे मांडून निश्चितपणे काही देश व घटकांच्या कारस्थानांना खोटं पाडलं. 



Transcript

Anchor:
We have a very influential voice tonight in the shape of Mr. S. Gurumurthy, the editor of Tughlaq to get a perspective on what monumental step this has actually been. Mr Gurumurthy, thank you for once again speaking with Times Now and me in particular. Thank you very much.

Mr Gurumurthy:
Thank you. Welcome please.

Anchor:
How significant is it that India has called out the United Nations for its selectivism over its emphasis on certain kinds of religious discrimination, but not others like Hinduphobia.

Mr Gurumurthy:
See the International Counterterrorism Conference, what T S Tirumurthi did is something outstanding. He made two great points. One, he demolished the effort to dilute the battle against terror by changing the narrative of what is terror. Over a period the very definition of terror was being diluted to include everything into terror so that the real terror escapes. This is point one he made. The second point was he exposed the bias against non-Abrahamic religions in the UN discourse, which has never, never happened. In 70 years, I have never seen an Indian representative attempting to defend the Indian civilization. This is the first time it has happened that India has opened its mouth to defend the Indian civilization in a world which has been running on the Abrahamic civilisational narratives and discourse. I will just take a minute to explain how he demolished the dilution of the concept of terror. They introduced the concept of “emerging threats”. Instead of dealing with the actual threats, they introduced the concept of emerging threats and began categorizing terror. Who are the people who were doing it? “Some interested Member States”, he says, “driven by political, religious, and other motivations.” It is not that they were driven by any intellectual or motivations of an unbiased nature, so they said they've been trying to label terrorism into categories. You see the categories they were making:
1. Radically and ethnically motivated violent extremism.
2. Violent nationalism
3. Right wing extremism

From the battle against terror, which means throwing bombs and killing people by AK47, the whole concept was diluted into almost what would be a political battle in a democracy. So he cited 4 reasons why this dilution is fraudulent. I mean I am using the word fraudulent, he didn't, but he meant it.

He said it goes against the accepted principle of Global Counter Terrorism Council’s very formulation. It was intended to find the actual terror of someone throwing bombs. Second, it goes back to the pre-911 label of your terror versus my terror. My terror is softer terror, your terror is a harder terror. So this is the second thing. Third thing, he said it is necessary to understand that in a democracy, right wing and left wing ideological battle is a matter of electoral choice of the people. So when people are choosing, there is nothing called right or left wing extreme thought, people will reject the extreme thought. So this whole idea of reducing spectrum of ideological battle into the idea of terror is only to dilute the actual terror.

The 4th point he made was that even such labels were given to so-called threats, which are limited to national or regional context. So they were trying to raise even the local disputes into something like global terror. He quoted the foreign minister Jaishankar’s statement to say “Terrorism is terrorism, terrorists are terrorists, and there is nothing like good terror and a bad terror.” I think this is a very, very major step. India has taken to stop the dilution of terror by intended and deliberate narratives, false narratives. Second thing is he exposed the bias against non-Abrahamic religions. Never in the international discourse the idea of Abrahamic religions and non-Abrahamic religions were ever debated or discourse, though in the intellectual discourse whether it is in the fundamentalism project study or in the intellectual discourse elsewhere, religions were categorized in the world as Abrahamic and non-Abrahamic. And I will tell you what is the impact of this. He said that while the phobia against Abrahamic religions that there is Islamophobia, there is Christian or phobia there is anti-Semitism —all these are Abrahamic religious pools are hurt. But he said there is also bias against non-Abrahamic religions. You have never discussed about it. There is anti-Hindu bias, there is anti-Sikh bias, there is anti-Buddhist bias. Why have you neglected the bias and the phobia against non-Abrahamic religions? This is the question he raised. The most important point is that we feel for the first time that we are defended. We were always, I mean Hinduism itself was taken as something which is backward and all that, it is something which has to go. This is the kind of discourse which has been going on in the world for the last three centuries.

Now I want to mention three facts, three facts Mr Rahul. One is that in Abrahamic religions there is doctrinal intolerance. This is accepted by all intellectual discourses in the world. In non-Abrahamic religions there is no doctrinal intolerance. This is important. Individuals can be tolerant or intolerant. In fact, only to moderate individual intolerance, you have religions, so that religions moderate the individual intolerance. But if the religions themselves are doctrinally intolerant, you can understand how individual intolerance will be multiplied by doctrinal intolerance of religions. It is accepted by all global literature, including the Encyclopedia Britannica and other literature that including the Supreme Court in the Ayodhya case, Justice Bharucha and Ahmedi said, “Hinduism is doctrinally tolerant.” The Hindus may be intolerant, but their doctrine will make them tolerant. That is the virtue of non-Abrahamic religions, which is never debated or discussed in the Indian intellectual scene or in the world. The second thing is there is nothing called fundamentalism in non-Abrahamic religions. In fact I would like to quote what the fundamentalism project said about Abrahamic religions. The fundamentalism project said “The idea of fundamentalism is unique to the Abrahamic religions which are text based. Textual inherency is presumed, and textual deviation is not allowed. And Fundamentalism Project goes on to say that Hinduism, Sikhism, Buddhism, Taoism and the eastern religions do not suffer from the vice of fundamentalism. Have you ever heard it in Indian discourse? This Fundamentalism Project started in 1980 and delivered 5 volumes by 1994, and this is an international research. So first there is no doctrinal intolerance in non-Abrahamic religions and there is no fundamentalism. To these two things taken together, we are not in a position to establish it in the world, we are not even treated on par with the Abrahamic religions — this Tirumurti has demolished.

© मंदार दिलीप जोशी
पौष कृ. ३, शके १९४३, संकष्ट चतुर्थी