Friday, May 25, 2018

तुम्ही केलेत ते चमत्कार. आम्ही केले ते.....

तुम्ही केलेत ते चमत्कार. आम्ही केले ते.....

येशू ख्रिस्ताने जितके तथाकथित चमत्कार केल्याचं सांगितलं जातं त्याच्या कित्येक पटींनी चमत्कार आपल्या संतांनी ढिगावारी केलेले आहेत. तरीही "आपण सारी त्याची लेकरे" या सर्वसमावेशक सामायिक भावनेव्यतिरिक्त त्यांच्यापैकी कुणी थेट परमेश्वराचे पुत्र वगैरे असल्याचा दावा केलेला नाही.

उदाहरणार्थः मृत व्यक्तीला जिवंत करणे, पाण्यावर चालणे, फक्त टोपलीभर अन्नावर अख्ख्या गावाची भूक भागवणे इत्यादी. हं, आता ख्रिस्तासारखं कुणी पाण्यातून वाईन बनवलेली नाही कारण किमान संतांच्या लेखी आपल्याकडे दारूकडे सुदैवाने तितक्याशा आदराने पाहिलं गेलेलं नाही. निसर्ग, हवामानावर वगैरे असलेल्या नियंत्रणाचेही वेगवेगळे किस्से आहेत. नवनाथांच्या विषयी बोलायचं तर पोस्टची कादंबरी होईल. नाथपंथी संतांचे चमत्कारही कमी नाहीत.

ज्ञानेश्वरांचा विषय घेतला, तर त्यांच्या नावावर भिंत चालवण्याचा....नव्हे उडवण्याचा....चमत्कार नोंदवला गेलेला आहे, पण आज आपण एका वेगळ्या चमत्काराबाबत बोलणार आहोत. सगळ्या जिवंत प्राण्यांत परमेश्वरी तत्त्व आहे असं त्यांनी जेव्हा प्रतिपादन केलं तेव्हा त्यांची चेष्टा झाली. त्यांना आव्हान देण्यात आलं की बाबा रे हे खरं असेल तर  ‘तो जो पलीकडे पखाल वाहत आहे, त्या रेड्यासही ज्ञाना म्हणतात. तर त्याच्या पाठीवर चाबकाचे फटके मारले तर तुझ्या पाठीवर वळ उठतील काय?’ ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, ‘तोही माझा आत्माच आहे. उठतील  पाठीवर वळ.’ त्या रेड्यावर आसूड मारले गेले. त्यांचे वळ खरोखरच ज्ञानदेवांच्या पाठीवर उठले.

येशू ख्रिस्ताने पण असं काही केलं असतं तर मजा होती. म्हणजे त्याला मारलेल्या फटक्यांच्या वेदना ती सुनावणार्‍या गवर्नर पिलातला होणे, डोक्यावर ठेवलेल्या काटेरी मुकुटामुळे त्याच्यावर आरोप करणार्‍या ज्यू धर्मशिक्षकाच्या डोक्यावर जखम होऊन त्यातून रक्त वाहणे, किंवा उचललेल्या क्रूसाच्या वजनाने कुणीतरी भलतंच वाकणे. असं झालं असतं तर येशू ख्रिस्ताने समजा तिथेच स्वतःला काहीही घोषित केलं असतं तरी झाडून सगळे त्याच्या पायाशी लोळण घेऊन ख्रिस्ती झाले असते.  नंतरच्या काळात ख्रिस्तपूजा केल्यामुळे ज्या अगणित ख्रिश्चन लोकांना तत्कालीन राज्यकर्त्यांच्या हस्ते भयानक पद्धतिने मरण पत्करावं लागलं ते सगळे ख्रिस्ती बनल्यावर शांततेत दीर्घायुषी होऊन जगले असते.

ज्या येशूमुळे इतके लोक मेले त्यांची जबाबदारी येशूच्या माथी येत नाही का?

जो स्वतःला वाचवू शकला नाही तो इतरांना काय वाचवणार? घंटा?

=============================
मराठी स्वैर भाषांतरः मंदार दिलीप जोशी

अधिक ज्येष्ठ शु. ११, शके १९४०

मूळ हिंदी पोस्टः Anand Rajadhyaksha
=============================