Wednesday, October 7, 2015

एका सूनबाईंच्या ओव्या

बाप तो फॅसिस्ट, मुसोलीनी मित्र
डोक्यात विखार, भरलासे

सापडे सावज,  खानदानी खास
लग्न ती सत्वर, करतसे

आल्या आल्या तिनेदीराला गिळले
सासू  नवरासावकाश

देश खाऊनियापोट  भरे
ढेकरही तिजलायेत नसे

मूल मतिमंदकन्या गतिमंद
जावई मवालीनिपजले

चिरंजीव झेपगुरूग्रहापुढे
तर्क त्याचा भारीएस्केपतो

गरीबी ती एकअसे मनोवस्था
भर सभेत तोबरळला

कन्या रोज घालीजीन्स ती टाईट
निवडणूक येतासाडी नेसे

बंगला ती बांधीबंगला ती पाडी
देश तिच्या 'बा'चीमालमत्ता

जावई छपरीकेला तो केला
वर डोक्यावरीबसविला

मग जाई सत्तासाफ होई पत्ता
चोर चव्वेचाळउरलेले

पंतप्रधान तेएक ब्रह्मचारी
देशसेवा व्यसनजडलेले

लागले धडककामाला जोरात
जोर त्यांचा हिलाभिववतो

काळा पैसा आताकैसा कमवावा
मानवावे कैसेऐदीपण

सुचे एक युक्तीमिळे पक्षा मुक्ती
बंद पाडूनियासंसदेला

होऊच  द्यावेकाम काही तिथे
लोकां भडकावीबाहेर ती

फेसबुक देखेदेखे ती ट्विटर
तरी जनता अडाणीभासे हिला

जन झाले सूज्ञनसती ते अज्ञ
देशसेवा यज्ञमांडियेला

व्हॅटिकन पुसेकाय तू केलेस
हताश होऊनउत्तरली बया......

आता उरे फक्तनशीबी माझिया
आकाशीच्या बापाविचारणे

पाच वर्ष पूर्णकधी रे होतील
ओह माय गॉडसांगी आता

ऐसे म्हणोनियाकपाळ बडवी
वाट पाहण्याचीझाली शिक्षा

पापांचा तो घडाभरलासे आता
जनता ती मजाबघतसे

-----------------------------------------------------------------
या ओव्यांचा कुठल्याही शहाण्या, अर्धवट, किंवा ठार वेड्या अशा मानसिक स्थिती असलेल्या व्यक्तींशी; जिवंत, अर्धमेल्या, किंवा मृत व्यक्तींशी; आणि त्यांच्या स्थान, भाषा आणि व्यवसाय वगैरेंशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
-----------------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

भाद्रपद कृ. १०, शालीवाहन शके १९३७