अथश्री प्रतिष्ठानतर्फे चालविल्या जाणार्या अथश्री त्रैमासिकाचे संपादक श्री आनंद
आगाशे यांच्या परवानगीने एप्रिल-जून २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेला हा लेख इथे
प्रकाशित करत आहे.
-----------------------------------------------------------------------------------
जुन्या हिंदी चित्रपटाच्या चाहत्यांसाठी २०११ हे साल दु:खद आठवणी ठेऊन गेलं. आधी
शम्मी कपूर आणि मग देव आनंद यांना आपल्यातून हिरावून नेत त्यांच्या चाहत्यांना
चांगलाच धक्का दिला. २०१२ तरी चांगलं जाईल असं वाटत असतानाच ९ मार्चला जॉय
मुखर्जीवर काळाची झडप पडली आणि एका वेगळ्याच युगाचा अस्त जवळ येत चालल्याची
जाणीव तीव्रतेनं झाली.
नाही, ते युग म्हणजे अभिनयाचं युग नव्हे. कारण जॉय त्याच्या अभिनयासाठी कधीच नावाजला गेला नव्हता. किंबहुना आपली अभिनयाची मर्यादित कुवत त्याने सुरवातीलाच जोखली असावी. कारण गोरागोमटा पण भावशून्य चेहरा घेऊन अभिनय करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्याच्या फंदात पडताना तो कधीही दिसला नाही. इंग्रजीत एक म्हण आहे If I cannot overwhelm with my quality, I will overwhelm with my quantity. मुद्राभिनय हा आपला प्रांत नव्हे, ही खूणगाठ मनाशी बांधलेल्या जॉयने मग त्याला जे जमत असे त्यावरच जास्तीत जास्त भर दिला. चित्रपटातल्या नायिकेच्या मागे गाणी गात फिरत असतानाच चेहर्यावर कमालीचा भोळेपणा व गोडवा लेऊन वावरणं हे जॉय मुखर्जी नामक उत्साहाच्या मूर्तीला जसं आणि जितकं जमलं तसं क्वचितच कुणाला जमलं असेल (प्रगतीपुस्तकात फारशी उठावदार कामगिरी कधीच करता न आल्याने त्यावर सही घेण्यासाठी तीर्थरूपांसमोर चेहर्यावर जबरदस्त भोळेपणा आणि बिच्चारा असण्याचे भाव घेऊन जायचो ते आठवलं. याला अभिनय म्हणतात महाराजा! पण जॉय मुखर्जी आणि माझ्या प्रगतीपुस्तकाचा काय संबंध? हो की नाही?).
त्याच्या वडीलांनी घरातच त्याला आखाडा तयार करुन एक मल्ल त्याच्या प्रशिक्षणासाठी नेमलेला आणि त्याला व्यायामाचा एक ठराविक आराखडा आखून त्यावर अंमल करायची जबाबदारी सोपवलेली. मग काय! मुळातच देखण्या असलेल्या जॉयचा बांधा नियमित व्यायामामुळे अतिशय रेखीव आणि सुद्धृढ व्हावा यात काही आश्चर्य नव्हतं. रोशोगुल्ला छाप अती गोड दिसणं हे व्यक्तिमत्वाचं एक व्यवच्छेदक लक्षण असलेल्या समस्त बंगाली नटांत धिप्पाड आणि पिळदार शरीरयष्टीच्या जॉयचं वेगळेपण साहजिकच उठून दिसायचं. मात्र इतकं कमावलेलं शरीर असूनही शर्ट काढून भिरकावण्याची गरज त्याला कधीही भासली नाही. त्याच दणकट शरिरयष्टीनिशी टी-शर्ट, शैलीदार टोप्या आणि तत्सम रंगेबिरंगी कपड्यात तो अतिशय देखणा दिसे.
विश्वजीत हा त्याच्याच पठडीतला, पण त्याच्या मागे कुणी गॉडफादर नव्हता. मात्र जॉयच्या मस्तकावर अनेकांचा वरदहस्त होता. आपले सख्खे कुटुंबीयच चित्रपटसृष्टीत आपले गॉडफादर असण्याचा फायदा जॉय इतका क्वचितच कुणाला मिळाला असेल. त्याचे वडील शशिधर मुखर्जी, काका सुबोध मुखर्जी, अशोक कुमार आणि किशोर कुमार हे सख्खे मामा असा जवळजवळ सगळाच कुटुंबकबिला चित्रपटसृष्टीत अगोदरच पाय रोवून उभा होता. जॉयचे वडील आणि निर्माते शशिधर मुखर्जी यांनी १९६० साली त्याच्यासाठी काढलेला 'लव्ह इन सिमला' हा तूफान यशस्वी ठरल्याने जॉय पदार्पणातच तरुण सिनेरसिकांच्या मनात आपले छोटेसे स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. या चित्रपटातून त्याच्या बरोबरीने अझरा आणि साधना या नट्यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. त्यात अझरा ही पुढे फारशी चमक दाखवू शकली नाही तर साधनाने तिच्या वैशिष्ठ्यपूर्ण 'साधना कट' म्हणून ओळखल्या गेलेल्या केशरचनेसकट तूफान लोकप्रियता मिळवली.
सिमला सारख्या नयनरम्य ठिकाणी
चित्रिकरण झालेल्या या चित्रपटाच्या घवघवीत यशामुळे अशा प्रकारच्या संगीतप्रधान
हलक्याफुलक्या प्रेमकथा घेऊन काढलेल्या चित्रपटांना नाव काय ठेवायचं असा अनेकांना
पडलेला प्रश्न सुटला. देशातच नव्हे तर परदेशातही एखाद्या विशिष्ठ शहरात चित्रिकरण
झाल्यास आणि काही समर्पक नाव न सुचल्यास चक्क 'लव्ह इन...' किंवा तत्सम शब्द जोडून
त्या शहरांचंच नाव चित्रपटाला दिलं जाण्याचा गंमतीदार पायंडा पडला. खुद्द जॉयने
१९६६ साली "जापाssssssन, लव्ह इन टोकियोsssss" असा आरोळीवजा
चित्कार ठोकत बरंचसं चित्रिकरण टोकयोमधे झालेल्या अशाच एका चित्रपटात नायकाची
भूमिका केली. त्या चित्रपटाचं नाव वाचक सूज्ञ असल्याने सांगण्याची गरज नाही! कथानक
घडत असलेल्या आणि चित्रिकरण झालेल्या शहराचं आणि देशाचं नाव एका गाण्यात गुंफण्याचा
हा बहुधा पहिलाच प्रसंग असावा.
एकोणीसशे पन्नासचं दशक देव आनंद, राज कपूर, दिलीप कुमार या त्रयीने प्रेक्षकांना झुलवण्यात - आणि अर्थातच बलराज सहानी आणि अशोक कुमार यांच्यासारख्यांनी त्यांना जमिनीवर ठेवण्यात यश मिळवलेलं असताना पडद्यावर धम्माल करणार्या जॉय मुखर्जीच्या नर्मविनोदी सादरीकरण असलेल्या रहस्यप्रधान प्रेमकथा यांनी सिनेरसिकांच्या मनाचा एका वेगळ्या प्रकारे ठाव घेतला. मेंदू घरी ठेऊन चित्रपटगृहात मजा करायला जाणे ही प्रेक्षकांची मागणी त्यांनी नक्कीच पूर्ण केली. मग अशा प्रकारचे हलकेफुलके चित्रपट जॉयचा बालेकिल्लाच बनला.
स्वातंत्र्य मिळून एका तपाहून अधिक काळ लोटून गेला होता. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी किशोरावस्थेत असलेल्या अनेकांना आता चित्रपट बघताना तरी ते कष्टप्रद दिवस विसरून स्वप्नमय आणि आशावादी दुनियेत शिरण्याची गरज भासू लागली होती. अशा वेळी त्यांच्या समोर सादर झाला तो १९६० सालचाच 'हम हिंदूस्तान'. या चित्रपटात सुनील दत्त, आशा पारेख, हेलन, लीला चिटणीस, प्रेम चोपडा, गजानन जहागिरदार आणि संजीव कुमार अशी भरभक्कम मंडळी असून सुद्धा सुनिल दत्तच्या धाकट्या भावाच्या भूमिकेत असलेला जॉय मुखर्जी निश्चितच लक्षात राहतो तो त्याच्या हेलनबरोबरच्या प्रणयदृश्यांमुळे. हा चित्रपटही प्रचंड यशस्वी झाल्याने जॉयलाही त्याचा फायदा झालाच.
त्याकाळी जॉय मुखर्जींचे अनेक चाहते असले तरी कालांतराने ते टिकले नसावेत हा माझा गैरसमज माझ्या एका आजीनेच दूर केला. एकदा आजी आणि आजोबा दूरदर्शनवर एक मुसाफिर एक हसीना बघत होते. आजोबांना चक्क घोरताना बघून "तेव्हा थियेटरात झोपले होते, आता काय घरातल्या घरात बघतोय....दिली ताणून! किती गोड दिसतो ना रे जॉय?" अर्थातच साधना असलेली दृश्य आली की आजोबांची झोप तात्पुरती उडत असे आणि "गाणं लागलंय ना, म्हणून जाग आली" अशी लंगडी सबब ते पुढे करत. आजोबा-आजींचा हा प्रेमळ संवाद ऐकल्यावर आजोबा साधनाचे उघड तर आजी जॉय मुखर्जीची छुपी फॅन असल्याचा शोध मला लागला. छुपी अशासाठी की जॉयबद्दल बोलताना बिचकत बिचकत ती "शम्मीएवढा नाही, पण तरी छान नाचतो....नाही?" असं शेपूट हळुच जोडत असे.
हिंदी चित्रपटांचा सुवर्णकाळ मानलेल्या गेलेल्या १९५० आणि १९६०च्या दशकात केवळ सुश्राव्य संगीतामुळे अनेक चित्रपटांनी सुमार कथा आणि त्याहून सुमार अभिनय असूनदेखील तिकीटबारीवर घवघवीत यश मिळवलं. सुदैवाने तेव्हा पायरसी इतकी फोफावलेली नसल्याने आणि घरोघरी रेडिओ आणि दूरदर्शन संच नसल्याने फक्त गाण्यांचा आस्वाद घ्यायचा असेल तरी सिनेरसिकांना चित्रपटगृहांचाच आश्रय घ्यावा लागे. अनावश्यकरित्या अचाट लांबी ठेवलेल्या या अत्यंत रटाळ चित्रपटाला यश मिळालं ते कर्णमधूर संगीतामुळेच. रफी आणि आशाच्या जादूई आवाजातल्या 'आप यूंही अगर हमसे मिलते रहे', 'बहोत शुकरिया, बडी मेहेरबानी', 'मुझे देखकर, आपका मुस्कुराना' अशा गाण्यांनी आणि साधना व जॉयच्या तितक्याच गोड चेहर्याने या चित्रपटाला लोकप्रिय केलं.
स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेल्या रफीला एका वेगळ्या अर्थाने परकायाप्रवेशाची कला अवगत होती. कसलेल्या नटांच्या बाबतीत तर तो स्वतःचा आवाज हा त्यांचाच आवाज असल्याचा भास तर सहज निर्माण करीच, पण बंगाली चित्रपटसृष्टीचा देव आनंद म्हणून ओळखला गेलेला विश्वजीत, फारसा देखणा नसला तरी चेहर्यावर एक प्रकारचा सोज्ज्वळपणा असलेला भारत भूषण, तलवारकट मिशा शोभून दिसणारा गोरागोमटा प्रदीप कुमार आणि अर्थातच रोशोगुल्ला जॉय मुखर्जी नामक ठोकळे पडद्यावर निदान गाण्यांपुरते तरी जिवंत वाटण्याचं श्रेय त्यालाच जातं. या निर्विकार चेहर्याच्या नटांनी कॅमेर्यासमोर न केलेला अभिनय रफी आपल्या आवाजातून करुन गाणी अजरामर करुन सोडायचा आणि पर्यायाने चित्रपट अक्षरशः चालवायचा असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जॉयच्या 'फिर वोही दिल लाया हूं' या चित्रपटातील गाणी. त्यातली इतर गाणी श्रवणीय आहेतच; पण या सगळ्यावर कळस चढवला तो 'आंचल में सजा लेना कलियाँ, जुल्फों मे सितारे भर लेना' या गाण्याने. चेहर्याच्या मूळच्या गोडव्याला प्रेमळ आर्जवाची जोड देऊन जॉयने हे गाणं थोडं तरी प्रेक्षणीय केलं. सोबत आशा पारेख असल्यावर प्रेक्षकांना आणखी काय हवं? गिटार गदेसारखी खांद्यावर घेऊन 'लाखों है निगाह में, जिंदगी की राह में' गात फिरणारा जॉय ती गिटार वाजवू शकेल इतपत भास नक्की निर्माण करु शकायचा.
आपले वडील फिल्मिस्तान स्टुडीओचे संस्थापक जरी असले तरी सेटवर मात्र जॉय
'अमक्याचा मुलगा' किंवा 'मी म्हणजे कोण आहे माहीत आहे का' अशा
आढ्यतेने कधीही वावरला नाही. उलट निर्माता आणि दिग्दर्शकाला जास्तीत जास्त सहकार्य
करण्याचीच त्याची वृत्ती राहिली. या चित्रपटात त्याच्या बरोबर प्रथमच नायिकेची
भूमिका करणारी आशा पारेख त्याची आठवण सांगताना म्हणते "जॉय बरोबर काम करणं म्हणजे
काम वाटत नसे. शाळेची सहल निघाल्यासारखं खेळीमेळीचं वातावरण सेटवर असायचं. शिवाय
जॉय खूप मनमेळावू आणि सगळ्यांना मदत करणारा होता. 'आँखों से जो उतरी है दिल में' हे
गाणं माझ्यावर चित्रित होणार होतं. नेमकी फिल्म कमी पडणार अशी शक्यता निर्माण झाली,
आणि गाण्याचं चित्रिकरण त्या दिवशी पूर्ण होणार नाही अशी आम्हा सगळ्यांनाच भीती
वाटू लागली. पण जॉयने प्रचंड मदत केली आणि चित्रिकरण त्याच दिवशी पूर्ण झालं.
आशाने त्यानंतर जॉय बरोबर 'जिद्दी' आणि 'लव्ह इन टोकियो' हे तूफान लोकप्रिय चित्रपट केले; पण जॉयचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट म्हणता येईल तो 'शागीर्द' हा मात्र सायरा बानोच्या वाट्याला आला. यात आय. एस. जोहरने साकारलेला वृद्धत्वाकडे झुकत चाललेला, जगावर कावलेला, आणि 'कधीही प्रेमात पडू नकोस, कधीही लग्न करु नकोस' अशी शिकवण देणारा प्रोफेसर आणि मग तोच मदनबाणाचा शिकार झाल्यावर त्यालाच प्रेमाचे धडे देणारा जॉय मुखर्जीने साकारलेला शागीर्द या दोन व्यक्तीरेखांनी मिळून धम्माल उडवून दिली. यातलं "दुनियाsss पागल है, या फिर मैं दीवाना; मुझको चाहती है झुल्फों मे उलझाना..." या गाण्यात जॉय जे काही नाचलाय त्याला तोड नाही. आजही जी गाणी टि.व्ही.वर लागताच उठून नाचत सुटावसं वाटतं त्यात ह्या गाण्याचा नक्कीच समावेश आहे. हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्तम विनोदपटांमधे गणला जातो.
तरुणांनी त्याच्या फॅशनचं अनुकरण करणं आणि तरुणींनी त्याच्यावर जीव ओवाळून टाकणं हे त्याचं नशीब मात्र फार काळ टिकलं नाही. १९६८ सालच्या हमसाया पासून त्याच्या कारकिर्दीला झपाट्याने उतरती कळा लागली. मुळातच नगण्य अभिनयक्षमता असणार्या जॉय मुखर्जीकडे दोन गोष्टी होत्या. त्यापैकी एक नैसर्गिक तर दुसरी मिळवलेली. ती नैसर्गिक गोष्ट म्हणजे अर्थातच त्याचा गोड चेहरा आणि ती मिळवलेली गोष्ट म्हणजे नियमित व्यायामानं कमावलेलं पिळदार शरीर. हळूहळू त्याने व्यायामाकडे दुर्लक्ष करायला सुरवात केली. पत्नीची- नीलमची नजर चुकवून तो हळूच सटके आणि बाहेर जाऊन अरबटचरबट खाऊन येई. त्याचं यश आणि त्याचं व्यायामाकडे होत चालेलेलं दुर्लक्ष आणि चुकीचा आहार यांचा काही जवळचा संबंध होता असं ठामपणे म्हणता येणार नाही, पण या वाईट सवयींनी आपला प्रताप दाखवायला सुरवात नक्कीच केली. हळूहळू 'वेळ घालवायला उत्तम' या हेतूने जॉयचे चित्रपट बघायला जाणार्या प्रेक्षकांना आणि अर्थातच निर्माता-दिग्दर्शकांना राजेश खन्ना, जीतेंद्र आणि मग अमिताभ बच्चन अशा नटांच्या रूपाने समर्थ आणि उत्तम पर्याय मिळाल्याने जॉयची गरज भासेनाशी झाली.
कारकिर्दीला उतरती कळा हे फारच सौम्य शब्द म्हणावे लागतील, कारण हमसाया आणि त्या नंतरचा जॉय मुखर्जीचा जवळजवळ प्रत्येक चित्रपट आपटला. ही अपयशाची माळ त्याच्या हैवान (१९७७) या शेवटच्या चित्रपटापर्यंत कायम राहिली. सूज्ञपणा म्हणा किंवा हतबलता, जॉयने काळाची पावले ओळखून अभिनयातून आपलं अंग काढून घेतलं. त्याचं शेवटचं यश हे मात्र त्याने छलिया बाबू (पुन्हा १९७७) ह्या राजेश खन्ना आणि झीनत अमान अभिनित चित्रपटाचं दिग्दर्शन करुन मिळवलं. या चित्रपटाने बर्यापैकी यश मिळवलं असलं तरी त्याचा कोणताही फायदा जॉयला वैयत्तिक स्वरूपात झाला नाही. जॉय मुखर्जीने मग एकोणिसशे पंचाईंशी साली आलेल्या 'ब' दर्जाच्या फूलन देवी (१९८५) या चित्रपटात खलनायकाची भूमिकाही करुन पाहिली, मात्र त्याचाही त्याच्या चित्रपटसृष्टीतल्या गमावलेल्या स्टारपदाला परत आणण्याच्या दृष्टीने काहीही फायदा झाला नाही. इतरांसारख्या त्यानं चरित्र भूमिकाही न केल्यानं जॉय जो संन्यस्त झाला तो कायमचाच. शेवटी शेवटी त्याची ओळख काजोल आणि राणी मुखर्जीचा काका अशी करुन द्यावी लागत असे.
शम्मी कपूर आणि देव आनंदच्या मृत्यूने बसलेले धक्के पचायच्या आधीच ९ मार्चला वयाच्या अवघ्या त्र्याहत्तराव्या वर्षी जॉय मुखर्जीनेही इहलोकाला राम राम ठोकल्याची बातमी आली आणि त्याच्या जाण्याने जे जे चांगलं, जुनं आणि कदाचित म्हणूनच असलेलं सोनं यांचं युग संपत चालल्याची जाणीव अधिकच ठळक झाली. त्या काळच्या किंचित नटांची जितकी टिंगल-टवाळी प्रेक्षक करीत त्याच्या एक सहस्त्रांश टीका आजच्या सुनील शेट्टी, अक्षय कुमार, जॉन अब्राहम वगैरे प्रभूतींना सहन करावी लागली असेल असं वाटत नाही. अनेकांची तर "मला विश्वजीत, जॉय मुखर्जी आणि बबिता हे वेगवेगळे ओळखू यायचेच नाहीत" असं म्हणण्यापर्यंत मजल गेली होती. त्यावेळच्या अनेक उत्कृष्ठ नटांना प्रचंड प्रमाणावर असलेली मागणी पूर्ण करणं शक्य नव्हतं म्हणा किंवा प्रथितयश अभिनेत्यांना प्रत्येक चित्रपटात घेणं अनेक निर्मात्यांना परवडण्यासारखं नव्हतं म्हणा, ती पोकळी भरून काढली ती मात्र विश्वजीत, भारत भूषण, प्रदीपकुमार, जॉय मुखर्जी यांच्यासारख्या त्यावेळच्या माठ, ठोकळा आणि पुतळा अशा विशेषणांनी हिणवल्या गेलेल्या नटांनीच. या सगळ्यात जॉय मुखर्जी इतकी छाप कुणीच पाडली नसेल. जॉय इतका उत्साह, प्रचंड प्रमाणात असलेली आणि ओसंडून वाहणारी ऊर्जा त्याने अनेक गाण्यांत घातलेल्या धागडधिंग्याच्या रूपात अजरामर राहील. नायिकेसमोर आर्जवं करताना चेहर्यावर आणलेला भोळेपणाचा आव हा आव न वाटता खराच वाटावा इतपत अभिनय त्याला नक्की जमला. शम्मी कपूर खालोखाल जॉय मुखर्जीच्या कपड्यांचं, नाचण्याचं अनुकरण त्याकाळी केलं जाई एवढं सांगणं जे जॉयच्या त्याकाळी तरुणांच्या मनातलं स्थान काय होतं हे सांगण्यासाठी पुरेसं आहे.
आजोबा त्यांच्या पांढर्या विजारीवर पांढरे बूट आजीला आवडतं म्हणून घालायचे म्हणे. आणखी काय सांगू?
जॉय मुखर्जीचे चित्रपटः
-----------------------------------------------------------------------------------नाही, ते युग म्हणजे अभिनयाचं युग नव्हे. कारण जॉय त्याच्या अभिनयासाठी कधीच नावाजला गेला नव्हता. किंबहुना आपली अभिनयाची मर्यादित कुवत त्याने सुरवातीलाच जोखली असावी. कारण गोरागोमटा पण भावशून्य चेहरा घेऊन अभिनय करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्याच्या फंदात पडताना तो कधीही दिसला नाही. इंग्रजीत एक म्हण आहे If I cannot overwhelm with my quality, I will overwhelm with my quantity. मुद्राभिनय हा आपला प्रांत नव्हे, ही खूणगाठ मनाशी बांधलेल्या जॉयने मग त्याला जे जमत असे त्यावरच जास्तीत जास्त भर दिला. चित्रपटातल्या नायिकेच्या मागे गाणी गात फिरत असतानाच चेहर्यावर कमालीचा भोळेपणा व गोडवा लेऊन वावरणं हे जॉय मुखर्जी नामक उत्साहाच्या मूर्तीला जसं आणि जितकं जमलं तसं क्वचितच कुणाला जमलं असेल (प्रगतीपुस्तकात फारशी उठावदार कामगिरी कधीच करता न आल्याने त्यावर सही घेण्यासाठी तीर्थरूपांसमोर चेहर्यावर जबरदस्त भोळेपणा आणि बिच्चारा असण्याचे भाव घेऊन जायचो ते आठवलं. याला अभिनय म्हणतात महाराजा! पण जॉय मुखर्जी आणि माझ्या प्रगतीपुस्तकाचा काय संबंध? हो की नाही?).
त्याच्या वडीलांनी घरातच त्याला आखाडा तयार करुन एक मल्ल त्याच्या प्रशिक्षणासाठी नेमलेला आणि त्याला व्यायामाचा एक ठराविक आराखडा आखून त्यावर अंमल करायची जबाबदारी सोपवलेली. मग काय! मुळातच देखण्या असलेल्या जॉयचा बांधा नियमित व्यायामामुळे अतिशय रेखीव आणि सुद्धृढ व्हावा यात काही आश्चर्य नव्हतं. रोशोगुल्ला छाप अती गोड दिसणं हे व्यक्तिमत्वाचं एक व्यवच्छेदक लक्षण असलेल्या समस्त बंगाली नटांत धिप्पाड आणि पिळदार शरीरयष्टीच्या जॉयचं वेगळेपण साहजिकच उठून दिसायचं. मात्र इतकं कमावलेलं शरीर असूनही शर्ट काढून भिरकावण्याची गरज त्याला कधीही भासली नाही. त्याच दणकट शरिरयष्टीनिशी टी-शर्ट, शैलीदार टोप्या आणि तत्सम रंगेबिरंगी कपड्यात तो अतिशय देखणा दिसे.
विश्वजीत हा त्याच्याच पठडीतला, पण त्याच्या मागे कुणी गॉडफादर नव्हता. मात्र जॉयच्या मस्तकावर अनेकांचा वरदहस्त होता. आपले सख्खे कुटुंबीयच चित्रपटसृष्टीत आपले गॉडफादर असण्याचा फायदा जॉय इतका क्वचितच कुणाला मिळाला असेल. त्याचे वडील शशिधर मुखर्जी, काका सुबोध मुखर्जी, अशोक कुमार आणि किशोर कुमार हे सख्खे मामा असा जवळजवळ सगळाच कुटुंबकबिला चित्रपटसृष्टीत अगोदरच पाय रोवून उभा होता. जॉयचे वडील आणि निर्माते शशिधर मुखर्जी यांनी १९६० साली त्याच्यासाठी काढलेला 'लव्ह इन सिमला' हा तूफान यशस्वी ठरल्याने जॉय पदार्पणातच तरुण सिनेरसिकांच्या मनात आपले छोटेसे स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. या चित्रपटातून त्याच्या बरोबरीने अझरा आणि साधना या नट्यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. त्यात अझरा ही पुढे फारशी चमक दाखवू शकली नाही तर साधनाने तिच्या वैशिष्ठ्यपूर्ण 'साधना कट' म्हणून ओळखल्या गेलेल्या केशरचनेसकट तूफान लोकप्रियता मिळवली.
एकोणीसशे पन्नासचं दशक देव आनंद, राज कपूर, दिलीप कुमार या त्रयीने प्रेक्षकांना झुलवण्यात - आणि अर्थातच बलराज सहानी आणि अशोक कुमार यांच्यासारख्यांनी त्यांना जमिनीवर ठेवण्यात यश मिळवलेलं असताना पडद्यावर धम्माल करणार्या जॉय मुखर्जीच्या नर्मविनोदी सादरीकरण असलेल्या रहस्यप्रधान प्रेमकथा यांनी सिनेरसिकांच्या मनाचा एका वेगळ्या प्रकारे ठाव घेतला. मेंदू घरी ठेऊन चित्रपटगृहात मजा करायला जाणे ही प्रेक्षकांची मागणी त्यांनी नक्कीच पूर्ण केली. मग अशा प्रकारचे हलकेफुलके चित्रपट जॉयचा बालेकिल्लाच बनला.
स्वातंत्र्य मिळून एका तपाहून अधिक काळ लोटून गेला होता. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी किशोरावस्थेत असलेल्या अनेकांना आता चित्रपट बघताना तरी ते कष्टप्रद दिवस विसरून स्वप्नमय आणि आशावादी दुनियेत शिरण्याची गरज भासू लागली होती. अशा वेळी त्यांच्या समोर सादर झाला तो १९६० सालचाच 'हम हिंदूस्तान'. या चित्रपटात सुनील दत्त, आशा पारेख, हेलन, लीला चिटणीस, प्रेम चोपडा, गजानन जहागिरदार आणि संजीव कुमार अशी भरभक्कम मंडळी असून सुद्धा सुनिल दत्तच्या धाकट्या भावाच्या भूमिकेत असलेला जॉय मुखर्जी निश्चितच लक्षात राहतो तो त्याच्या हेलनबरोबरच्या प्रणयदृश्यांमुळे. हा चित्रपटही प्रचंड यशस्वी झाल्याने जॉयलाही त्याचा फायदा झालाच.
त्याकाळी जॉय मुखर्जींचे अनेक चाहते असले तरी कालांतराने ते टिकले नसावेत हा माझा गैरसमज माझ्या एका आजीनेच दूर केला. एकदा आजी आणि आजोबा दूरदर्शनवर एक मुसाफिर एक हसीना बघत होते. आजोबांना चक्क घोरताना बघून "तेव्हा थियेटरात झोपले होते, आता काय घरातल्या घरात बघतोय....दिली ताणून! किती गोड दिसतो ना रे जॉय?" अर्थातच साधना असलेली दृश्य आली की आजोबांची झोप तात्पुरती उडत असे आणि "गाणं लागलंय ना, म्हणून जाग आली" अशी लंगडी सबब ते पुढे करत. आजोबा-आजींचा हा प्रेमळ संवाद ऐकल्यावर आजोबा साधनाचे उघड तर आजी जॉय मुखर्जीची छुपी फॅन असल्याचा शोध मला लागला. छुपी अशासाठी की जॉयबद्दल बोलताना बिचकत बिचकत ती "शम्मीएवढा नाही, पण तरी छान नाचतो....नाही?" असं शेपूट हळुच जोडत असे.
हिंदी चित्रपटांचा सुवर्णकाळ मानलेल्या गेलेल्या १९५० आणि १९६०च्या दशकात केवळ सुश्राव्य संगीतामुळे अनेक चित्रपटांनी सुमार कथा आणि त्याहून सुमार अभिनय असूनदेखील तिकीटबारीवर घवघवीत यश मिळवलं. सुदैवाने तेव्हा पायरसी इतकी फोफावलेली नसल्याने आणि घरोघरी रेडिओ आणि दूरदर्शन संच नसल्याने फक्त गाण्यांचा आस्वाद घ्यायचा असेल तरी सिनेरसिकांना चित्रपटगृहांचाच आश्रय घ्यावा लागे. अनावश्यकरित्या अचाट लांबी ठेवलेल्या या अत्यंत रटाळ चित्रपटाला यश मिळालं ते कर्णमधूर संगीतामुळेच. रफी आणि आशाच्या जादूई आवाजातल्या 'आप यूंही अगर हमसे मिलते रहे', 'बहोत शुकरिया, बडी मेहेरबानी', 'मुझे देखकर, आपका मुस्कुराना' अशा गाण्यांनी आणि साधना व जॉयच्या तितक्याच गोड चेहर्याने या चित्रपटाला लोकप्रिय केलं.
स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेल्या रफीला एका वेगळ्या अर्थाने परकायाप्रवेशाची कला अवगत होती. कसलेल्या नटांच्या बाबतीत तर तो स्वतःचा आवाज हा त्यांचाच आवाज असल्याचा भास तर सहज निर्माण करीच, पण बंगाली चित्रपटसृष्टीचा देव आनंद म्हणून ओळखला गेलेला विश्वजीत, फारसा देखणा नसला तरी चेहर्यावर एक प्रकारचा सोज्ज्वळपणा असलेला भारत भूषण, तलवारकट मिशा शोभून दिसणारा गोरागोमटा प्रदीप कुमार आणि अर्थातच रोशोगुल्ला जॉय मुखर्जी नामक ठोकळे पडद्यावर निदान गाण्यांपुरते तरी जिवंत वाटण्याचं श्रेय त्यालाच जातं. या निर्विकार चेहर्याच्या नटांनी कॅमेर्यासमोर न केलेला अभिनय रफी आपल्या आवाजातून करुन गाणी अजरामर करुन सोडायचा आणि पर्यायाने चित्रपट अक्षरशः चालवायचा असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जॉयच्या 'फिर वोही दिल लाया हूं' या चित्रपटातील गाणी. त्यातली इतर गाणी श्रवणीय आहेतच; पण या सगळ्यावर कळस चढवला तो 'आंचल में सजा लेना कलियाँ, जुल्फों मे सितारे भर लेना' या गाण्याने. चेहर्याच्या मूळच्या गोडव्याला प्रेमळ आर्जवाची जोड देऊन जॉयने हे गाणं थोडं तरी प्रेक्षणीय केलं. सोबत आशा पारेख असल्यावर प्रेक्षकांना आणखी काय हवं? गिटार गदेसारखी खांद्यावर घेऊन 'लाखों है निगाह में, जिंदगी की राह में' गात फिरणारा जॉय ती गिटार वाजवू शकेल इतपत भास नक्की निर्माण करु शकायचा.
आशाने त्यानंतर जॉय बरोबर 'जिद्दी' आणि 'लव्ह इन टोकियो' हे तूफान लोकप्रिय चित्रपट केले; पण जॉयचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट म्हणता येईल तो 'शागीर्द' हा मात्र सायरा बानोच्या वाट्याला आला. यात आय. एस. जोहरने साकारलेला वृद्धत्वाकडे झुकत चाललेला, जगावर कावलेला, आणि 'कधीही प्रेमात पडू नकोस, कधीही लग्न करु नकोस' अशी शिकवण देणारा प्रोफेसर आणि मग तोच मदनबाणाचा शिकार झाल्यावर त्यालाच प्रेमाचे धडे देणारा जॉय मुखर्जीने साकारलेला शागीर्द या दोन व्यक्तीरेखांनी मिळून धम्माल उडवून दिली. यातलं "दुनियाsss पागल है, या फिर मैं दीवाना; मुझको चाहती है झुल्फों मे उलझाना..." या गाण्यात जॉय जे काही नाचलाय त्याला तोड नाही. आजही जी गाणी टि.व्ही.वर लागताच उठून नाचत सुटावसं वाटतं त्यात ह्या गाण्याचा नक्कीच समावेश आहे. हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्तम विनोदपटांमधे गणला जातो.
तरुणांनी त्याच्या फॅशनचं अनुकरण करणं आणि तरुणींनी त्याच्यावर जीव ओवाळून टाकणं हे त्याचं नशीब मात्र फार काळ टिकलं नाही. १९६८ सालच्या हमसाया पासून त्याच्या कारकिर्दीला झपाट्याने उतरती कळा लागली. मुळातच नगण्य अभिनयक्षमता असणार्या जॉय मुखर्जीकडे दोन गोष्टी होत्या. त्यापैकी एक नैसर्गिक तर दुसरी मिळवलेली. ती नैसर्गिक गोष्ट म्हणजे अर्थातच त्याचा गोड चेहरा आणि ती मिळवलेली गोष्ट म्हणजे नियमित व्यायामानं कमावलेलं पिळदार शरीर. हळूहळू त्याने व्यायामाकडे दुर्लक्ष करायला सुरवात केली. पत्नीची- नीलमची नजर चुकवून तो हळूच सटके आणि बाहेर जाऊन अरबटचरबट खाऊन येई. त्याचं यश आणि त्याचं व्यायामाकडे होत चालेलेलं दुर्लक्ष आणि चुकीचा आहार यांचा काही जवळचा संबंध होता असं ठामपणे म्हणता येणार नाही, पण या वाईट सवयींनी आपला प्रताप दाखवायला सुरवात नक्कीच केली. हळूहळू 'वेळ घालवायला उत्तम' या हेतूने जॉयचे चित्रपट बघायला जाणार्या प्रेक्षकांना आणि अर्थातच निर्माता-दिग्दर्शकांना राजेश खन्ना, जीतेंद्र आणि मग अमिताभ बच्चन अशा नटांच्या रूपाने समर्थ आणि उत्तम पर्याय मिळाल्याने जॉयची गरज भासेनाशी झाली.
कारकिर्दीला उतरती कळा हे फारच सौम्य शब्द म्हणावे लागतील, कारण हमसाया आणि त्या नंतरचा जॉय मुखर्जीचा जवळजवळ प्रत्येक चित्रपट आपटला. ही अपयशाची माळ त्याच्या हैवान (१९७७) या शेवटच्या चित्रपटापर्यंत कायम राहिली. सूज्ञपणा म्हणा किंवा हतबलता, जॉयने काळाची पावले ओळखून अभिनयातून आपलं अंग काढून घेतलं. त्याचं शेवटचं यश हे मात्र त्याने छलिया बाबू (पुन्हा १९७७) ह्या राजेश खन्ना आणि झीनत अमान अभिनित चित्रपटाचं दिग्दर्शन करुन मिळवलं. या चित्रपटाने बर्यापैकी यश मिळवलं असलं तरी त्याचा कोणताही फायदा जॉयला वैयत्तिक स्वरूपात झाला नाही. जॉय मुखर्जीने मग एकोणिसशे पंचाईंशी साली आलेल्या 'ब' दर्जाच्या फूलन देवी (१९८५) या चित्रपटात खलनायकाची भूमिकाही करुन पाहिली, मात्र त्याचाही त्याच्या चित्रपटसृष्टीतल्या गमावलेल्या स्टारपदाला परत आणण्याच्या दृष्टीने काहीही फायदा झाला नाही. इतरांसारख्या त्यानं चरित्र भूमिकाही न केल्यानं जॉय जो संन्यस्त झाला तो कायमचाच. शेवटी शेवटी त्याची ओळख काजोल आणि राणी मुखर्जीचा काका अशी करुन द्यावी लागत असे.
शम्मी कपूर आणि देव आनंदच्या मृत्यूने बसलेले धक्के पचायच्या आधीच ९ मार्चला वयाच्या अवघ्या त्र्याहत्तराव्या वर्षी जॉय मुखर्जीनेही इहलोकाला राम राम ठोकल्याची बातमी आली आणि त्याच्या जाण्याने जे जे चांगलं, जुनं आणि कदाचित म्हणूनच असलेलं सोनं यांचं युग संपत चालल्याची जाणीव अधिकच ठळक झाली. त्या काळच्या किंचित नटांची जितकी टिंगल-टवाळी प्रेक्षक करीत त्याच्या एक सहस्त्रांश टीका आजच्या सुनील शेट्टी, अक्षय कुमार, जॉन अब्राहम वगैरे प्रभूतींना सहन करावी लागली असेल असं वाटत नाही. अनेकांची तर "मला विश्वजीत, जॉय मुखर्जी आणि बबिता हे वेगवेगळे ओळखू यायचेच नाहीत" असं म्हणण्यापर्यंत मजल गेली होती. त्यावेळच्या अनेक उत्कृष्ठ नटांना प्रचंड प्रमाणावर असलेली मागणी पूर्ण करणं शक्य नव्हतं म्हणा किंवा प्रथितयश अभिनेत्यांना प्रत्येक चित्रपटात घेणं अनेक निर्मात्यांना परवडण्यासारखं नव्हतं म्हणा, ती पोकळी भरून काढली ती मात्र विश्वजीत, भारत भूषण, प्रदीपकुमार, जॉय मुखर्जी यांच्यासारख्या त्यावेळच्या माठ, ठोकळा आणि पुतळा अशा विशेषणांनी हिणवल्या गेलेल्या नटांनीच. या सगळ्यात जॉय मुखर्जी इतकी छाप कुणीच पाडली नसेल. जॉय इतका उत्साह, प्रचंड प्रमाणात असलेली आणि ओसंडून वाहणारी ऊर्जा त्याने अनेक गाण्यांत घातलेल्या धागडधिंग्याच्या रूपात अजरामर राहील. नायिकेसमोर आर्जवं करताना चेहर्यावर आणलेला भोळेपणाचा आव हा आव न वाटता खराच वाटावा इतपत अभिनय त्याला नक्की जमला. शम्मी कपूर खालोखाल जॉय मुखर्जीच्या कपड्यांचं, नाचण्याचं अनुकरण त्याकाळी केलं जाई एवढं सांगणं जे जॉयच्या त्याकाळी तरुणांच्या मनातलं स्थान काय होतं हे सांगण्यासाठी पुरेसं आहे.
आजोबा त्यांच्या पांढर्या विजारीवर पांढरे बूट आजीला आवडतं म्हणून घालायचे म्हणे. आणखी काय सांगू?
-----------------------------------------------------------------------------------
जॉय मुखर्जीचे चित्रपटः
- लव्ह इन सिमला, हम हिंदूस्तानी - १९६०
- ऊम्मीद, एक मुसाफिर एक हसीना - १९६२
- फिर वोही दिल लाया हूं - १९६३
- जिद्दी, जी चाहता है, इशारा, दूर की आवाज, आओ प्यार करें - १९६४
- बहू बेटी - १९६५
- साज़ और आवाज, ये जिंदगी कितनी हसीन है, लव्ह इन टोकियो - १९६६
- शागीर्द - १९६७
- हमसाया, एक कली मुस्कायी, दिल और मुहब्बत - १९६८
- दुपट्टा - १९६९
- पुरस्कार, मुजरिम, इन्स्पेक्टर, एहसान, आग और दाग - १९७०
- कहीं आर कहीं पार - १९७१
- एक बार मुस्कुरा दो - १९७२
- हैवान - १९७७