Saturday, April 21, 2018

कठुआच्या निमित्ताने मतदानावर बहिष्कार घातक

सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी काही केलं नाही तर आम्ही मतदान करणार नाही - अशा अर्थाची पोस्ट ज्याने पहिल्यांदा लिहीली तो इसम चपलेने बडवून काढण्याच्या लायकीचा आहे.

ही पोस्ट ज्या भोळसटपणे** काही महिलावर्गाने पोस्ट केली त्यांना माझा कोपरापासून नमस्कार.

NOTA चा प्रचार कमी पडतो आहे असं वाटलं म्हणून आता कठूआ आणि उन्नाओ प्रकरणाचा फायदा घेऊन टाळूवरचं लोणी खाणारेच हा धंदा करत आहेत.

मतदान न केल्याने काय होणार आहे ते आपण आता पाहू.

आपण लोकशाहीत राहत असल्याने तुम्ही मतदान केलं नाहीत तरी निवडणुका व्हायच्या थांबणार नाहीत.

मतदान करणार नाही असं "माझी झांशी मी देणार नाही" या आवेशात ज्या म्हणत आहेत त्यातल्या बहुतेकांनी मोदी सरकारला मत दिलेलं आहे. मी हे ठामपणे म्हणू शकतो की हे सरकार त्याच्या सर्व गुणदोषांसकट काँग्रेस व त्याच्या भेळपुरी सरकारांच्या हजारो पटींनी चांगले आहे. असं असताना मतदान न केल्याने फक्त मोदी सरकारची अर्थात भाजपची मते कमी होतील आणि पुन्हा इटालियन मम्मी प्रणित काँग्रेस पुरस्कृत सरकार सत्तेवर येईल. मग कर्नल पुरोहित वगैरेंवर जे झालं ते सामान्य नागरिकांवर सुरु होईल. हिंदूंचं जगणं सद्ध्या मुश्कील असेल तर तेव्हा ते अशक्य होऊन बसेल. विचार करा, मतदान करु नका असं आवाहन करणार्‍या लोकांना कुणाच्याही अब्रूची पडलेली नाही. त्यांना फक्त या घटनांचा फायदा घेऊन मोदी सरकार खाली खेचायचे आहे आणि परत जनतेला आणि हिंदूंना छळायला सत्तेत यायचे आहे. आणि ते सत्तेत आल्यावर नक्की असं म्हणणार आहेत की "तुम्ही तर मतदान केलंच नाहीत, आम्ही कशाला तुमचे प्रश्न सोडवू".

खात असलेल्या अन्नाला चव नाही म्हणून ते टाकून तुम्ही शेण खाणार का? तसं असेल तर खरंच मतदान करु नका.

पण भावनेच्या भरात एका देशविघातक लांडग्याने केलेले घातक आव्हान भोळसटपणाने** आपल्या टाईमलाईनवर शेअर करु नका. हलकट लोकांनी टाकलेल्या वैचारिक शेणाचे पो आपल्या भिंतींवर थापू नका - दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ. परमेश्वराने डोक्यावर जो अवयव बसवला आहे त्याचा उपयोग करा आणि काहीही पोस्ट करण्याआधी सांगोपांग विचार करा.

माझं म्हणाल तर मी २०१९ मधे कमळावरच बटन दाबणार आहे. फिर एक बार, मोदी सरकार.

© मंदार दिलीप जोशी

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10155670347982326&id=652482325

**बावळटपणा म्हणणार होतो, पण जाऊदे म्हटलं आणि भोळसटपणे हा शब्द वापरला.

कठुआ, सिरीया, आणि आपण

कठुआ येथे झालेल्या तथाकथित बलात्कार आणि खून प्रकरणानंतर तसेच अमेरिका, फ्रान्स, आणि ब्रिटन यांनी सिरीयावर पुन्हा सुरु केलेल्या बॉम्बवषावाच्या निमिताने माध्यमांनी आणि इतर घटकांनी जी राळ उधळली आहे त्यातून तरुन जायचं असेल तर काही तथ्यांचा आणि तर्कांचा खोलवर जाऊन विचार करणे भाग आहे.

मनुष्याला मन आहे आणि मन म्हटलं की भावना आल्याच. वरवर उदात्त हेतू असल्याचं दाखवत मनुष्यस्वभावातील कमकुवत बाजूंचा व्यवस्थित अभ्यास करुन त्यांचा उपयोग छुपे घाणेरडे हेतू साध्य करायला वापर केला जातो, जात आहे याची नोंद आपण घेणं आवश्यक आहे. लहान मुलांना होणारे त्रास हा विषय निघाला की साहजिकच आपण भावुक होतो. त्यातही मातृसुलभ भावनेमुळे सगळ्याच स्त्रीया लहान मुलांच्या बाबतीत खूप हळव्या असतात, मग अशा घटना घडल्यावर या हळव्या बाजूचा गैरफायदा घ्यायला काही भामटे सरसावले नाहीत तरच नवल आहे.  ही गोष्ट अधिक स्पष्ट करायला एक उदाहरण पाहूया. समजा तुम्हाला बातमी सांगितली गेली की 'सिरीयात एक ३० वर्षीय तरुण बॉम्बवर्षावात मेला" तर त्यावर तुमची प्रतिक्रिया ही फार फार तर "अरेरे वाईट झालं" या उद्गारांपलिकडे नसेल. पण वयाच्या याच आकड्यातून शून्य काढून तुम्हाला सांगितलं की 'सिरीयात बॉम्बवर्षावात ३ वर्षांचा मुलगा दगावला' तर त्यावर त्वेषाने व्यक्त होणं आणि ज्यानी कुणी हे घडवून आणलं त्याचा निषेध करणं हे तुम्हाला तुमचं नैतिक कर्तव्य वाटेल.

आपल्याला जेव्हा हे सांगितलं जातं की एका ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला, तेव्हा आपल्या मेंदूतला मातृपितृसुलभ सहानुभूतीचा कोपरा जागृत होतो, पण त्यानंतर जो भावनांचा महापूर येतो त्याच्यात मात्र दुष्प्रचार करणार्‍यांनी पेरलेल्या खोट्या बातम्यांखेरीज काहीही नसतं. कठुआत घडलेल्या घटनेनंतर आपल्या मनाच्या याच कमकुवत बाजूचा फायदा घेत सहानुभूती आणि रोषाचा ओघ हा आपल्याच धर्माची आणि संस्कृतीची बदनामी करण्याकडे वळवायचा. आणि दुसरीकडे मेलेल्या लहान मुलांचे खरेखोटे फोटो पसरवून युरोपात बहुसंस्कृतिवादाचा प्रसार करायचा आणि सिरीयातील असाद सरकारला अस्थिर करायची मोहीम चालवायची.

लहान मुलांबद्दल आपल्याला असलेल्या नैसर्गिक सहानुभूतीचा फायदा घेऊन त्याचा उपयोग भलत्याच गोष्टीसाठी करुन घेणे ही नवीन गोष्ट राहिलेली नाही. जरा मागे गेलं तर युगोस्लाव्हिया आणि सर्बियाचे नेते स्लोबोदान मिलोसोविच यांना असाद यांच्या प्रमाणेच बदनाम करुन अमेरिका आणि नेटोच्या हवाईदलांनी कोसोवो आणि सर्बियावर इतका बॉम्बवर्षाव केला की मिलोसोविच यांच्यावर जितकी मुलंमाणसं मारण्याचा आरोप होता त्याच्या कित्येक पटींनी माणसं या बॉम्बवर्षावात मारण्यात आली. वर दिलेल्या उदाहरणाचा प्रयोग अमेरिकेत करुन बघितला तरी परिणाम तोच होईल. अमेरिकेत कुणालाही विचारा की सिरीयात अमेरिकेने हस्तक्षेप करावा का? तर उत्तर नाही असंच येईल. पण हा प्रश्न विचारताना "असाद सरकारमुळे आज २० मुलं मेली" हे शेपूट जोडून दिलंत, की तीच व्यक्ती फेफरे आल्यागत उच्चरवाने मुलांचा खुनी असादला खाली खेचायचा सल्ला देईल. मग त्याचे परिणाम अधिक मुलांच्या मृत्यूमध्ये होणार असल्याचं त्याच्या गावीही नसेल.

लहान मुलांबद्दल आपल्याला असलेल्या सहानुभूतीची कारणं जैविक तर आहेतच पण इतिहासाला योग्य परिप्येक्षातून बघायला आपण अजूनही न शिकणं हे कारणही तितकंच महत्त्वाचे आहे. माध्यमं आणि इतर घटकांनी चालवलेल्या मोहिमांत लहान मुलांच्या डोक्यावर निरपराध असल्याचा शिका उमटतो आणि तशी ती खरोखरच निरपराध असतातही, पण हे जग इतकं साधं सोपं नाही. लहान मूल हे आकाशातून पडलेलं रत्न नसतं, तर ते फक्त भूतकाळ आणि भविष्यकाळ यातील एक दुवा म्हणून काम करत असतं. ते कितीही निरपराध असलं तरी ते स्वतःला भूतकाळातून आलेल्या नाचणार्‍या भुतांपासून आणि क्रूर भविष्यकाळापासून वाचवू शकत नाही. आयुष्य जगताना, जगण्यासाठी त्याच्या पूर्वजांनी ज्या पर्यायांची निवड केली त्यांची, किंमत त्याला चुकवावीच लागते भले ते पर्याय निवडण्यात त्याचा काहीही हात नसला तरीही. उदाहरणतः आपल्या पूर्वजांनी ज्या पर्यायांची निवड केली त्याचे परिणाम आपण भोगतोच आहोत; यात सद्गुण विकृतीने पछाडलेल्या हिंदू राजांचा आणि देश चालवायला काँग्रेसला उत्तम पर्याय समजणार्‍या आपल्या वाडवडिलांचाही समावेश करावा लागेल. माझ्या मुलांनाही मी निवडलेल्या पर्यायांच्या परिणामांना सामोरे जावे लागेल, त्यात त्यांचा काहीही निर्णयाधिकार नसला तरी. इतिहास हा एक कालखंड नसून सतत घडणार्‍या घटनांची एक साखळी आहे, त्यामुळे कुठल्याही घटनेला भावनावेगात वेगळं कढून पुढचे, मागचे, आणि आजूबाजूचे संदर्भ वगळून तपासल्याने त्यातले प्रयोगसिद्ध वास्तविकता बदलत नाही.

याचा विचार केला तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला "पुढे काय?" याचा विचार न करता येणे किंवा पुढे काही घडले असल्यास त्याची नोंद न घेता येणे हा आहे. सिरीयाचे अध्यक्ष असलेले असाद हे लहान मुलांचे खूनी आहेत म्हणून यांना पदच्युत करा असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपण "असाद यांना पदच्युत करणे" या नंतरच्या परिणामांचा विचार करणे सोडून दिलेले असते. सद्दाम हुसेन यांना फाशी दिल्या क्षणी इराकचा विचार करणं आपण थांबवतो.

आणि आपण असिफाच्या तथाकथित बलात्कार्‍यांना/खुन्यांना फाशी द्या असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण ही घटना देशविघातक घटक सद्ध्या सत्तारूढ असलेलं सरकार खाली खेचायला किंवा त्या सरकारचं निव्वळ अस्तित्व हे हिंदूंच्या रानटी मनोवृत्तीचे प्रतीक असल्याचा तद्दन खोटा प्रचार करायला कसं वापरुन घेत आहेत याचा विचार करणं बंद केलेलं असतं.

काय आहे, भोळसट असायला हरकत नाही. पण देव, देश, आणि धर्म यांच्याबद्दल दुष्प्रचार करणारे आपल्याला वापरुन घेतील इतकं बावळट असणं कितपत योग्य हे ज्याचे त्याने ठरवावे.

© मंदार दिलीप जोशी व Satish Verma

त्याच्या आत्याबाईची शेजारीण

हे असलं शीर्षक? काय आहे अर्थ याचा? आणि कोण तो? कोण त्याची आत्याबाई? आणि कोण त्या आत्याबाईची शेजारीण? अहो ती शेजारीण म्हणजे आपण सगळे....हो तुम्ही आम्ही सगळे.

सांगतो. यातला तो म्हणजे लेओनिड निकोलाएव नावाचा रशियन. आता त्याच्या आत्याबाईबद्दल आणि तिच्या शेजारणीबद्दल जाणून घेण्याआधी आपण सरगेई किरोव्ह (Sergei Kirov) याच्याबद्दल जाणून घेऊया. आता हा कोण आला मधेच? सांगतो.

सरगेई किरोव्ह (Sergei Kirov) हा रशियाचा क्रूरकर्मा हुकूमशहा स्टॅलिनचा उजवा हात समजला जायचा. १ डिसेंबर १९३४ साली लेनिनग्रॅड शहरात त्याची गोळी घालून हत्या करण्यात आली. हत्या करणारा होता लेओनिड निकोलाएव नावाचा ३० वर्षांचा रशियन तरुण. या हत्येमुळे संपूर्ण सोवियत रशियात प्रचंड खळबळ माजली. खुद्द स्टॅलिन मॉस्कॉतून रेल्वेगाडीतून लेनिनग्रॅडला रवाना झाला.

१ डिसेंबरला निकोलएवला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्याला गोळी घालून मारण्यात यावं असा आदेश बजावण्यात आला. यात कारण असं बाहेर आलं की निकोलाएवच्या पत्नीशी किरोव्हने अनैतिक संबंध ठेवले होते म्हणून चिडून निकोलाएवने त्याची हत्या केली. पण सोवियत रशियात अशी कारणं किती खरी असतील याची कल्पना केलेलीच बरी.

तर निकोलाएवने ही हत्या कुणाचीही मदत न घेता एकट्यानेच केल्याचं सांगितलं. पण स्टॅलिननं या घटनेचा पुरेपूर फायदा घेतला, निकोलाएवशी संबंध असलेल्या नसलेल्या अनेकांना सरळ उचलून देहदंडाची शिक्षा सुनावण्याचा त्याने सपाटा लावला. या शिक्षेविरुद्ध कुठलंही अपील करता येत नसे. निकोलाएवशी तुमचा संबंध असणं हे एकच कारण सांगितलं की अपील तर सोडाच खटलाही धड चालवला जाण्याची शक्यता शून्य होती. उचलल्या जाणार्‍यांच्यात निकोलाएवचे नातेवाईक, मित्रपरिवार, शेजारी-पाजारी कुणालाही सोडलं गेलं नाही. यात एलिझाबेथ लेरमोलो नामक एका महिलेला देहदंड मिळण्याचं कारण तुम्हाला सांगितलं तर तुम्ही चाट पडाल. ही महिला निकोलएवच्या आत्याची शेजारीण होती.

किरोव्हच्या हत्येचं निमित्त करुन स्टॅलोनने भीषण हत्याकांड आरंभलं. कम्युनिस्ट पार्टीचे हजारो कार्यकर्ता आणि सामान्य जनतेतले कोट्यावधी निरपराध नागरिकांची हत्या केली गेली. या प्रकाराची दहशत इतकी होती की सर्वसामान्य माणूस श्वास घेतानाही विचार करत असे.

किरोव्ह स्टॅलिनच उजवा हात समजला जात होता खरा, पण खरंच स्टॅलिनला त्याच्याबद्दल इतकी आत्मीयता होती?

नाही. त्यावेळच्या साहित्याचा कानोसा घेतला तर अनेकांचं असं म्हणणं होतं की किरोव्हची हत्या स्टॅलिननेच घडवून आणली होती. किरोव्ह स्टॅलिनचा उजवा हात समजला जात होता याचा अर्था त्याची लोकप्रियता सुद्धा रशियन जनतेत वाढत होती. स्टॅलिनला असा संशय होता की त्याने व कम्युनिस्ट पार्टीने ज्या सातत्याने विरोधकांच्याच नव्हे तर सामान्य नागरिकांच्या हत्या घडवून आणल्या होत्या त्याने रशियन जनता विटली होती आणि कदाचित स्टॅलिनला पदच्युत करुन किरोव्हला राष्ट्राध्यक्षपदी बसवेल.

कदाचित किरोव्हच्या हत्येत स्टॅलिनचा हात नसेलही, पण त्याच्या मृत्यूचा फायदा स्टॅलिनने पुरेपूर उचलला. क्रूरतेची परिसीमा गाठत सत्तेवरची आपली पकड त्याने घट्ट केली.

पण त्याने किरोव्हला खरंच न्याय मिळाला? 

--------------------------------------

असिफाला पण न्याय मिळायलाच हवा. कारण जानेवारीमध्ये झालेल्या हत्येची आत्ता अचानक वर येणं ही बाब संशयास्पद आहे. जवळजवळ तीन महीने हे षडयंत्र रचलं जात होतं का? कधी बोंब ठोकायला सुरवात करायची, कुणाकुणाला उचलायचं, कुठल्या समूदायाची बदनामी करायची, कुठल्या चॅनलनी कुठला मुद्दा उचलायचा याची पटकथा तर लिहीली जात नव्हती? असिफा बकरवाल समाजाची होती. बकरवाल समाजाने कधीही पाकिस्तानचे समर्थन केलेलं नाही आणि कधीही काश्मीरी स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍यांच्या कच्छपी हा समाज लागलेला नाही. त्यातून वानी सारख्या बलत्काराचा आरोप असलेल्या आणि जिलानी या फुटीरतावादी नेत्याशी संबंध असलेल्या पोलीस अधिकार्‍याला बाहेरून तपासासाठी बोलवून घेणं ही बाब संशय वाढवणारी आहे. आणखी एक बाब म्हणजे सीबीआय चौकशीला दिलेला नकार आणि मुख्य्मंत्री मेहबूबा मुफ्ती यांची धक्कादायक विधाने.

असिफाला न्याय मिळायला हवा, तिच्यावर बलात्कार झालाच असेल तर बलात्कार्‍यांना शिक्षा व्हायलाच हवी. असं ऐकलं होतं की सैन्याला मोकळिक दिली गेली तेव्हा मेहबूबांनी त्याला विरोध केला होता, पण दिल्लीहून जवळजवळ रडतरडतच परत यावं लागलं होतं. And hell hath no fury greater than a woman scorned. मुलीच्या बदल्यात जहाल अतिरेक्यांना सोडणार्‍या बापाचं रक्त आहे ते, कधी ना कधी कुठे ना कुठे  आपला रंग दाखवणारच.

असिफाला न्याय मिळायला हवा. या घटनेची निःपक्षपाती चौकशी झालीच पाहीजे, आणि जे कुणी गुन्हेगार सापडतील त्यांची जात, धर्म, पद आणि समाजातील स्थान हे न बघता शिक्षा व्हायलाच हवी.

इथे एक गोष्ट आठवली ती जाता जाता सांगतो. सहसा हिंदू समाज एक धर्म म्हणून बलात्कार्‍यांचा साथ कधीच देत नाही. मुसलमानांची इतक्या वर्षांची सोबत असूनही हा दुर्गुण हिंदूंनी अजून अंगी बाणवलेला नाही. अलिगढमधे ख्वाजा चिश्तीच्या वंशजांनी घडवलेल्या मोठ्या यौन शोषण कांडात काही हिंदूनाही सामील करुन घेतलं होतं, पण जेव्हा ते पकडले गेले तेव्हा त्यांना हिंदू समाजाने साथ दिली नाही. त्यातल्या एकाने तर हा ताण सहन न होऊन आत्महत्या केली. निर्भया कांडातल्या आरोपीने देखील तुरुंगातच आत्महत्या केली होती हे तुम्हाला आठवत असेलच.  पण चिश्ती आरोपींना मुस्लीम समाजाने दूर लोटलं नाही. त्यांच्या मागे ते ठामपणे उभे राहिले. निर्भया कांडातला तथाकथित अज्ञान आरोपी मोहम्मद अफरोजच्या पाठीशी सुद्धा मुसलमान समाज उभा राहिला. एकाही मुसलमान नेत्याने त्याचा निषेध केला नाही. महालक्ष्मी येथील शक्ती मिल्स रेप प्रकरणात सापडलेल्या मुस्लीम आरोपीची आईच त्याच्या जन्माचा दाखला घेऊन कोर्टात आली होती. तो आता मोकळा झालं आहे आणि हप्ते वसुलीचा बिझनेस करतोय. त्याच्या समाजाने त्याला साथ दिल्यामुळे.

असिफाचं निमित्त करुन नाहक हिंदू समाजाला लक्ष्य केलं जातंय. आपली जम्मूतली जनता इतकी पोलीसविरोधी कशी झाली याचीही चौकशी व्हायला हवी. वानी नावाच्या त्या पोलीस अधिकार्‍याचे चरित्र जनतेसमोर यायला हवं, आणि त्याला बाहेरून या घटनेची चौकशी करायला का आणलं गेलं याचीही चौकशी केली जायला हवी.

आणि हो, असिफाला, आणि तिच्यासारख्या सर्वांनाच, न्याय मिळायलाच हवा.

आपली निकोलाएवच्या आत्याबाईची शेजारीण व्हायची नाहीतर!

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10155668427647326&id=652482325

- © मंदार दिलीप जोशी