दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळी व्हॅटिकनचे पोप पायस बारावे (XII) आणि हिटलरमधल्या संपर्कासंदर्भात एक लेख वाचनात आला. लेख खूप मोठा आहे आणि भविष्यात त्याचं भाषांतर करण्याचा प्रयत्न करेन पण त्याचा थोडक्यात गोषवारा असा:
तत्कालीन पोप महाशय हे हिटलरशी सातत्याने संपर्कात होते. त्यांचा भर हा हिटलरने चर्चच्या हितसंबंधांना धक्का लावू नये यावरच होता. हिटलरचं म्हणणं असं होतं की चर्चच्या पादऱ्यांनी आणि इतर मंडळींनी राजकारणात ढवळाढवळ करू नये. या दोघांच्यात प्रत्यक्ष आणि मध्यस्थांमार्फत झालेल्या चर्चांत कोणता भाग राजकारण आणि कोणता रिलिजियस यावर खल होत असे.
लक्षणीय बाब म्हणजे यात पोप महाशयांचे म्हणणे हिटलरने फक्त चर्च आणि चर्चच्या हितसंबंधांना इजा करू नये इतकंच होतं ― ज्यूंचे हिटलरने काहीही करावे त्याच्याशी चर्चला काहीही देणेघेणे नाही.
Pius XII had other priorities. As the head of a large international organization, his overriding aim in negotiations with Hitler’s emissary was protecting the institutional resources and prerogatives of the Roman Catholic Church in the Third Reich. If the only goal was to protect the welfare of the institutional Church, his efforts could well be judged a success. But for those who see the papacy as a position of great moral leadership, the revelations of Pius XII’s secret negotiations with Hitler must come as a sharp disappointment.
युद्ध जसे जसे पुढे सरकू लागले तसा हिटलरच्या शासनाचा आणि त्याच्या ज्यूंचा निर्वंश करण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा किमान तोंडदेखला निषेध करण्याचा दबाव पोप महाशयांवर वाढू लागला...
...पण शेवटपर्यंत दाखवायला सुद्धा हिटलरविरोधी एक शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडला नाही.
चैत्र कृ ८, शके १९४४