मनाला भावलेलं सगळं, मनात खदखदत असलेलं सगळं. काही परिचित, तर काही वेगळं. "दिसामाजि काहीतरी ते लिहावे..." असं रामदास स्वामी म्हणून गेले असले तरी कधी 'काही' तर कधी 'काहीच्या काही' असं वाचण्याची तयारी असू द्यावी.
Monday, October 9, 2023
Sunday, August 14, 2022
हे मातृभू
मूळ गाण्याच्या चालीवर मनातल्या मनात म्हणून पहा. आवाज चांगला असलेल्या कुणी हे गायचं मनावर घेतलं तरी त्यासाठी अनुमतीची आवश्यकता नाही, लेखनश्रेय दिले तरी पुरेसे आहे.
हे मातृभू
हे मातृभू, मम मातृभू
हे मातृभू सुजलाम रहा तू
राहिलो जगी अन्यदेशी हृदयी तूच तू
हे मातृभू, मम मातृभू
हे मातृभू, मम मातृभू
तव पुत्र म्हणोनी ओळखती या जगी मला
तव पुत्र म्हणोनी ओळखती या जगी मला
विहरलो जरी आकाशी मम अधिष्ठान रहा तू
विहरलो जरी आकाशी मम अधिष्ठान रहा तू
जाईन जिथे तूच तिथे माझी प्रेरणा
हे मातृभू सुजलाम रहा तू
हे मातृभू सुजलाम रहा तू
हे मातृभू
मम मातृभू
रक्षु तुला सदैव परचक्र परतवू
रक्षु तुला सदैव परचक्र परतवू
तुजसाठी त्यजू प्राण हे सुफलाम रहा तू
तुजसाठी त्यजू प्राण हे सुफलाम रहा तू
हे मातृभू सुजलाम रहा तू
हे मातृभू सुजलाम रहा तू
हे मातृभू
मम मातृभू
सुजलाम रहा तू, सुफलाम रहा तू
हे मातृभू
मम मातृभू
मम मातृभू
Tuesday, March 15, 2022
हम देखेंगे
अनिवार्य है की हम भी देखेंगे
जो ईश्वर वचन देता है
जो वेद पुराणो का रचयिता है
जब अत्याचारों के मेघ
रूई की भांति उड़ जाएँगे
हम भक्तो के पाँव-तले
जब धरती धड़-धड़ धड़केगी
तथा आतंकीयों के शीर्षपर
जब बिजली कड़-कड़ कड़केगी
जब पापीयों के ताबे से
सब मंदिर छुडवाये जाएँगे
सब पवित्रता के शिष्यगण
सिंहासन पे बिठाए जाएँगे
सब 'ताज' खोले जाएँगे
सब मदमत्त गिराए जाएँगे
बस नाम रहेगा रामलल्ला का
उपस्थित है जो अयोध्या में
जो न्यायी भी है द्रष्टा भी
उठ्ठेगा तत्वमसि का उद्घोष
जो मैं भी हूँ और तुम भी हो
और राज़ करेंगे सनातनी
जो मैं भी हूँ और तुम भी हो
© मंदार दिलीप जोशी
माघ द्वादशी, शके १९४३
Friday, May 17, 2019
Wednesday, May 9, 2018
चला न कॉम्रेड
एक मुडदा पाडू,
चला न, त्याच्यावर एक गोष्ट रचू
तयार करुन ठेवू,
पोस्टर, पेज आणि भरपूर कविता
मग करु त्यांचा गोळीबार योग्य वेळी
हे वारे, आपल्याला हवे तसे वाहत असतील तेव्हा
आणि हो कॉम्रेड, थोडं तिखटमीठही टाकू त्यात
तुमच्या स्वादानुसार,
आणि नेहमीप्रमाणे फोडू खापर,
हिंदुस्तान, देवीस्थान और ब्लडी "भक्त" यांच्यावर
कॉम्रेड, लॉजिक कसलं शोधताय?
त्याच्याशी आपल्याला काय देणंघेणं?
काय म्हणालात? लोहड़ी आणि मकर संक्रांतीच्या वेळी
देवळात कसं कुणी कुणाला लपवेल?
कॉम्रेड ते सगळं ठीक आहे हो,
#कॉम्रेड, पुन्हा गिधाडासारखं व्हा बरं,
यु नो, मुडदे खातात ती !
वेमुला, जुनैद, आणि आता हा !
आणि ब्रो, मुडदा हा मुडदा असतो!
जाब वगैरे विचारत नसतो तो,
या मुडद्यामुळे आणखी मुडदे पडले तरच काय तो फायदा !
चला न कॉम्रेड
एक मुडदा पाडू,
चला न, त्याच्यावर एक गोष्ट रचू
रूपांतरः मंदार दिलीप जोशी
मूळ हिंदी कविता: गौतम
------------------
चलो न कॉमरेड
------------------
चलो न कॉमरेड,
एक लाश गिराते हैं,
चलो न, उसपे कहानी बनाते हैं,
रच के रखते हैं,
पोस्टर, पेज और कविताएँ,
जो दागी जाएँगी ठीक समय पर,
ठीक तब, जब हमारा मौसम हो,
हाँ कॉमरेड, तुम्हारे टेस्ट के हिसाब से,
साल्ट एन पैपर भी रहेगा,
उसपे 'ऐज़ युज़ुअल' ब्लेम करेंगे,
हिंदुस्तान, देवीस्थान और ब्लडी "भक्त" को,
कॉमरेड लॉजिक क्यों ढूंढते हो,
उससे हमारा क्या लेना देना?
क्या ? लोहड़ी, मकर संक्रांति पर
मन्दिर में कोई कैसे छुपायेगा किसी को ?
कॉमरेड सब सही है,
#कॉमरेड बी लाइक अ वल्चर,
यु नो, वो लाशों को खाते हैं !
वेमुला, जुनैद, और अब ये लाश!
अरे लाश थोड़ी न हिसाब मांगती है ब्रो!
लाश तो लाश है,
इससे और लाशें गिरे तो कोई बात हो !
चलो न कॉमरेड,
एक लाश गिराते हैं,
चलो न, उसपे कहानी बनाते हैं
- गौतम
#कविता #OKDontMindHaan
Thursday, September 21, 2017
दारात भारताच्या गर्दी अलोट आहे
दारात भारताच्या गर्दी अलोट आहे
शतके सहिष्णुता ही पोसून सोसली मी
अब्रू जमीन सारी गमवून आज आहे
एका अलिबाबाचे झाले चव्वे-चाळीस
प्रत्येक चोर पुन्हा राहतो गर्भार आहे
डाव्यांस खाज आज सुटली साम्यवादी
मोजून दाम घेतो विकत पत्रकार आहे
यात्रेस जावयाला भरतो आजही जिझिया
पाहुण्यांस आज माझ्या मी देतो भाडे आहे
आश्रयास कुणी अतिथी म्हणूनि आला
घर, भूमी, आणि कन्या मागून आज आहे
जन्मास शिवाजी ते यावे पण शेजारी
वृत्तीच आत्मघाती ठरणार आज आहे
उत्तिष्ठ आज कृष्ण म्हणतो उच्चारवाने
हाती खडग घेता तरणार पार्थ आहे
तस्मात सज्ज सारे देशरक्षणास व्हा रे
अन्यथा आज सारे होणार भस्म आहे
© मंदार दिलीप जोशी
अश्विन शु. १, शके १९३९
Sunday, July 2, 2017
सलाम
सलाम
सबको सलाम
ज्याच्या हातात चॅनल त्याला सलाम,
पगाराच्या भयाने
डाव्या हातात माईकचं बोंडुक घेऊन
उजव्या हाताने सलाम,
बघणाऱ्याला सलाम,
न बघणाऱ्याला सलाम,
विकत घेणाऱ्याला सलाम,
विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला लाल सलाम,
सलाम, भाई, सबको सलाम.
चादर घातलेल्या प्रत्येल थडग्याला सलाम,
डिवायडर पीराला सलाम
देवळांना फोडून बांधलेल्या मशिदींना सलाम,
मशादीतल्या मौलवींच्याच्या धाकाला सलाम,
मशिदीतून, लाउडस्पीकरवरुन
बेंबीच्या देठापासून ओरडणाऱ्याला सलाम,
परवरदिगार आणि त्याच्या मजहबचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम,
रिकाम्या गर्भाशयात जीव भरण्यासाठी
निष्पाप मोहतरमाला नासवणाऱ्या बंगालीबाबाला सलाम
चाँदला सलाम
बकऱ्याला सलाम,
दहशतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम,
अम्मीच्या उरावर दुसरी अम्मी बसवणाऱ्या अब्बाला सलाम,
दुसऱ्या अम्मीला टरकावणाऱ्या तिसऱ्या अम्मीला सलाम,
सलाम, प्यारे भाईयों और बेहेनों,
सबको सलाम.
ज्याच्या हातात कोयता
त्याला सलाम,
ज्याच्या गळ्यात क्रूस
त्यालाही सलाम,
चर्चच्या पादऱ्यांना सलाम,
त्यांची वेसण धरणाऱ्या
व्हॅटिकनला सलाम,
ज्याच्या सेवेला नन त्याला सलाम,
तिला भोगणाऱ्या फादरला सलाम
तिचा गर्भपात करतो
त्यालाही सलाम
क्रिसमस आणि व्हॅलेन्टाइनच्या गर्दीला सलाम,
ती गर्दी झुलवणाऱ्या
जादूगारांना लाल सलाम,
भाईयों और बेहेनों सबको सलाम.
नाक्यावरच्या अनधिकृत चिकनशॉपला सलाम
शेजारच्या इल्लीगल गॅरेजला सलाम
ते चालवत वखवखलेल्या नजरेने सावज शोधणार्या वाहिदला सलाम
सोनं म्हणून आरडीएक्स स्मगल करणार्याला सलाम
ते वापरून बनवलेले बाँब ठेवणार्यांना सलाम
स्फोट झाल्यावर जिहादी जल्लोष करणार्यांना सलाम
त्यांना पकडू पाहणार्या पोलीसांना सलाम
त्यांचे ट्रक न तपासता जाऊ देणार्यांनाही सलाम
टायगर मेमनला सलाम,
त्याला श्रद्धांजली वाहणार्या
कुबेरांनाही सलाम,
लोकसत्तालाबी सलाम,
सकाळलाही सलाम,
काँग्रेसला बुडवणार्या राहुल गांधींना सलाम,
गांधींखाली चिरडलेल्या
प्रणवदांना, नरसिंह रावांना सलाम,
ज्याच्या हातात विळा हातोडा त्याला सलाम,
सैनिकांना बलात्कारी म्हणणार्यांना सलाम,
भारत तेरे टुकडे होंगे म्हणणार्यांना ,
कन्हैया कुमारला सलाम,
कविता कृष्णनला सलाम;
आनंद पटवर्धननांना सलाम,
कबीर कला मंचला सलाम,
निरपराध मुलांना बायकांना मारणार्या नक्षलवाद्यांना सलाम,
मौत सस्ती करणाऱ्या सर्वांना लाल सलाम,
सलाम, प्यारे दोस्तों, सबको सलाम.
फिल्म इन्स्टिट्युटला सलाम
त्यातल्या मध्यमवयीन विद्यार्थ्यांना सलाम,
काहीही त्रास नसलेल्यांना सलाम
पण सतत तुम्हाला कसलातरी त्रास आहे असं
पटवणार्या कॉम्रेडांना सलाम
गोळी घालणार्यांना सलाम
ती घालण्याच्या आदेश देणार्यांना सलाम
कॅपिटालिस्ट मालकांना सलाम
कम्युनिस्ट कामगार नेत्यांना सलाम
दिवाळी बोनसला सलाम
संपाला सलाम
उपासमारीला सलाम
युनियनच्या लिडरला सलाम,
संपात बरबाद झालेल्या कामगाराला सलाम
त्याच्या पिचलेल्या बायकोला सलाम
दीड खोलीत अभ्यास करणार्या
एकच गणवेश आठवडाभर वापरणार्या
त्यांच्या पोरांना सलाम
चीनला सलाम
सोवियत रशियाला सलाम
लाल झेंड्याला सलाम
सलाम, लाल सलाम
सलाम, भाईयों और बेहेनों, सबको सलाम.
या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम,
या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम,
याच देशात राहून त्याचे टुकडे करण्याच्या घोषणा देणार्यांना सलाम
गायीचं मांस खाणार्यांना सलाम
तिला रस्त्यावर कापणार्यांना सलाम
आमचा धर्म शांततेचा या सर्व बिलंदर घोषणांना सलाम,
हिंदूद्वेष्ट्या उकिरड्यांना सलाम,
या उकिउरडयांतून मजहबचं पीक काढणाऱ्यांना सलाम,
टोपी आणि बुरख्याला सलाम,
पंक्चरवाल्या मियाँला सलाम,
त्यांच्या शेकडो लौढ्यांना सलाम,
निवडणुकांना सलाम,
निवडणुक प्रचाराला सलाम,
निवडणुकांवर डोळा ठेऊन झालेल्या
निरनिराळ्या वांझोट्या आंदोलनांना ,
विद्यार्थी चळवळीला सलाम
नॉट इन माय नेमला सलाम
आद्य चळवळ बामण हटावला सलाम
लाल झेंडा हाती असलेल्या पारध्यांना सलाम,
त्यांच्या तैनातीतल्या गारद्यांना सलाम,
या सर्व अत्याचार करणाऱ्यांना सलाम,
या बातम्या वाचणाऱ्या सर्व षंढांना लाल सलाम,
सलाम, भाईयों और भैनों, सबको सलाम.
वरपासून खालपर्यंत आरक्षणाचा देश म्हटले
तर डोके फोडतील ,
भत्ताखाऊ फुकट्यांचा देश म्हटले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदले जाणाऱ्या पत्रकारांचा देश म्हटले
तर मोर्चे काढतील,
दगडाला देव आणि गायीला माता म्हटलं
तर हिंदू दहशतवादी म्हणून दम देतील
मोर्चात जातो म्हटले
तर नोकरीवरून काढतील;
म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या माझ्या
शेख्युलर हिरव्या देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.
लाल सलाम
प्यारे भाईयों और बेहेनों, सबको सलाम,
अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिन माफ़ करना भाईयों,
हात तर दोनच
आणि त्यातला उजवा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त
डाव्या हाताने सलाम,
सलाम, सबको लाल सलाम
भाईयों और बेहेनों, सबको सलाम.
© मंदार दिलीप जोशी
आषाढ शु. ८, शके १९३९
Monday, October 24, 2016
लिबरल
मानवता का पाठ पढाया
तो हिंदू फरमाया
की मेरे लिबरल भाया
अपनी औकात न भूल
तेरे जैसे तो उस पानी के गिलास की तरह है
जो समंदर से पूछ रहा हो
"तू जानता ही क्या है मेरे बारे में?"
तो मेरे लिबरल भाया, अपनी औकात मे रह
बचकानी बाते ना कर
मैं तो हूं विशाल बोधीवृक्ष
और तू सिर्फ मोह माया.
-~-~-~-~-~-~-~-~
© मंदार दिलीप जोशी
Monday, October 17, 2016
दिसत जावं माणसानं
दिसत जावं माणसानं
कालगतीच्या तीव्र प्रवाही
पोहत जावं त्वेषानं
क्षणभंगुर जीवनात या पण
दिसत जावं माणसानं
आठवणींचा साठा मोठा
क्षणात विस्कटू नये कधी
मैत्र जीवांचे होऊन हृदयी
बोलत जावं माणसानं
हसर्या चेहर्यांमागे काही
दु:ख मानसी बाळगती
हात घेऊन हाती मित्राचा
बसत जावं माणसानं
वाटून घ्यावं माणसानं
कोण कुठवर सोबत असतो
कोणा असते ठावूक ते
भेटण्याची कारणे नित्यनूतन
विणत जावी माणसानं
ओझरती कधी भेट घडावी
रंगवावी मैफिल कधी
कधी हाकेसरशी खिडकीत
दिसत जावं माणसानं
भेटीगाठीतून आठवणींचा
साठा ताजा ठेवावा
म्हणून म्हणतो उगाचच्या उगाच सुद्धा
दिसत जावं माणसानं
------------------------------
© मंदार दिलीप जोशी
अश्विन कृ. २, शके १९३८
------------------------------
मूळ हिंदी कविता:
मिलते जुलते रहा करो
धार वक़्त की बड़ी प्रबल है,
इसमें लय से बहा करो,
जीवन कितना क्षणभंगुर है,
मिलते जुलते रहा करो।
यादों की भरपूर पोटली,
क्षणभर में न बिखर जाए,
दोस्तों की अनकही कहानी,
तुम भी थोड़ी कहा करो।
हँसते चेहरों के पीछे भी,
दर्द भरा हो सकता है,
यही सोच मन में रखकर के,
हाथ दोस्त का गहा करो।
सबके अपने-अपने दुःख हैं,
अपनी-अपनी पीड़ा है,
यारों के संग थोड़े से दुःख,
मिलजुल कर के सहा करो।
किसका साथ कहाँ तक होगा,
कौन भला कह सकता है,
मिलने के कुछ नए बहाने,
रचते-बुनते रहा करो।
मिलने जुलने से कुछ यादें,
फिर ताज़ा हो उठती हैं,
इसीलिए यारों नाहक भी,
मिलते जुलते रहा करो।
- कवी अज्ञात
Monday, January 18, 2016
असा मिडिया मिडीया...
Tuesday, January 5, 2016
तो वीर हुतात्मा झाला
Monday, October 19, 2015
रावणाचे वकील अर्थात डेव्हिल्स अॅडव्होकेट
Wednesday, October 7, 2015
एका सूनबाईंच्या ओव्या
डोक्यात विखार, भरलासे
सापडे सावज, खानदानी खास
लग्न ती सत्वर, करतसे
आल्या आल्या तिने, दीराला गिळले
सासू व नवरा, सावकाश
देश खाऊनिया, पोट न भरे
ढेकरही तिजला, येत नसे
मूल मतिमंद, कन्या गतिमंद
जावई मवाली, निपजले
चिरंजीव झेप, गुरूग्रहापुढे
तर्क त्याचा भारी, एस्केपतो
गरीबी ती एक, असे मनोवस्था
भर सभेत तो, बरळला
कन्या रोज घाली, जीन्स ती टाईट
निवडणूक येता, साडी नेसे
बंगला ती बांधी, बंगला ती पाडी
देश तिच्या 'बा'ची, मालमत्ता
जावई छपरी, केला तो केला
वर डोक्यावरी, बसविला
मग जाई सत्ता, साफ होई पत्ता
चोर चव्वेचाळ, उरलेले
पंतप्रधान ते, एक ब्रह्मचारी
देशसेवा व्यसन, जडलेले
लागले धडक, कामाला जोरात
जोर त्यांचा हिला, भिववतो
काळा पैसा आता, कैसा कमवावा
मानवावे कैसे, ऐदीपण
सुचे एक युक्ती, मिळे पक्षा मुक्ती
बंद पाडूनिया, संसदेला
होऊच न द्यावे, काम काही तिथे
लोकां भडकावी, बाहेर ती
आज आंदोलने, उद्या धोंडाफेक
परवा कुणास, पेटवावे
भाऊ भाऊ तिने, भिडविले सारे
फोडाफोडी केली, घरातच
व्हॅटिकन देई, शाब्बाशी तिजला
क्रूस आणि चाँद, आनंदित......
येडी घालोनिया, सदासर्वकाळ
जनता ती फसे, किती दिन
फेसबुक देखे, देखे ती ट्विटर
जनता अडाणी, भासे हिला
जन होती सूज्ञ, देशसेवा यज्ञ
अज्ञतेचा ज्वर, त्यागोनिया
पापांचा तो घडा, भरलासे आता
जनता ती मजा, बघतसे
पुन्हा निवडावे, मग कमळास
रक्तपाती हात, नाकारुन
पाच वर्ष पुन्हा, प्रधानसेवक
आणावे ते मग, निवडून
हातामध्ये हात, त्याची वाताहात ।
होई भविष्यात, मंद्या म्हणे ।।
© मंदार दिलीप जोशी
भाद्रपद कृ. १०, शालीवाहन शके १९३७
Wednesday, August 12, 2015
अस्तनीतले पत्रनिखारे
Thursday, January 29, 2015
देश कसा बुडवावा
ऐक, फार काही करावं लागत नाही मित्रा
देशनिंदा अतिशय सोपी गोष्ट आहे
देशभक्ती आचरटपणा
आ़णि द्रोह करणं फ्याशन आहे
तत्परतेने शत्रूची बोट उडवली रे उडवली
की सैन्यदलांना नावे ठेव
जाब विचार, साधे स्मगलर हो ते
दहशतवादी नाहीच्चेत मुळी, अशी कशी उडवली?
बघ, देश बुडतो की नाही
आपल्याच देशात आपल्याच घरातून हाकललेल्या
मारलेल्या, बलात्कारलेल्या, विस्थापित काश्मीरी पंडितांची व्यथा दाबून टाक,
दुर्लक्ष कर, मग जोरात कांगावा करुन विचार,
काय घंट्याचा त्रास होतो आहे त्यांना?
बघ, देश बुडतो की नाही
एकदा कुणीतरी सिनेमा काढेल
देवळात जाणार्यांना मूर्खात काढेल
पण तू मात्र त्याचा उदो उदो कर
त्याचंच कसं बरोबर म्हणत सिनेमा हिट कर
बघ, देश बुडतो की नाही
भगवदगीतेला राष्ट्रीय ग्रंथ करा म्हटल्यावर
तू लगेच माइकचं बोंडकं घेऊन जा
मिळतील तितक्या शिव्या गोळा कर
गीतेला त्वेषाने, उच्चारवाने त्या घाल
बघ, देश बुडतो की नाही
पण दुसरं एखादं पुस्तक राज्यघटनेपेक्षा उच्च आहे म्हटल्यावर
शांत बसून रहा, काहीही करु नको
बातमी बाहेर पडणार नाही असं बघ, मुस्कटदाबी कर
कारण कुणाच्या तरी भावना दुखावतील
बघ, देश बुडतो की नाही
देशाला जे जे भूषणावह, जो जो महान
त्याला त्याला पदोपदी हिणवायला विसरू नको
अपमानास्पद बोल, तेजोभंग कर
समाधान नाही झालं, तर शेलक्या विशेषणांनी विद्ध कर
बघ, देश बुडतो की नाही
भ्रष्टाचाराला पाठिंबा दे, पोलीसांना दोष दे
सगळे सगळे कसे हरामखोर
याची लांबलचक यादी दे
तू मात्र काहीही करु नकोस
स्वतःला काहीही तोशीस पडू देऊ नकोस
बघ, देश बुडतो की नाही
मग विरंगुळा म्हणून एक जोक मार
त्यात आठवणीने, खुबीने, शब्दांच्या कसरती करत
धार्मिक भावना दुखवायला विसरू नकोस
समोरचा रागावला तर तुम्हीच कसे हिंसक,
असा कांगावा करता येईलच
बघ, देश बुडतो की नाही
हे सगळं करताना, तुला विरोध करणार्याला जातीयवादी म्हण
त्याला धक्का बसेल, तो अवाक् होईल
मग नाईलाजाने, तोंड दाबून गप्प बसेल
मग तू विजयोन्मादात उत्सव साजरा कर
बघ, देश बुडतो की नाही
Friday, December 26, 2014
...का आज सारे गप्प
आपल्यांची हाक आली!
कुंपणापार ती निरागस
अन् आसामी का निराळी?
तेव्हा पेटले गहिवर वन्हि
झाल्या मेणबत्त्यांच्या मशाली
आज आपुलेच वाहता रक्त
का वाटे व्यथा निराळी?
तुम्हा न गोड लागे
तेव्हा अन्न अन् पाणी
गात्रे आज ती थिजली
अन् बसली दातखीळ साली!
ना शब्द करुणा ल्याले
ना ओल डोळा आली
आज पुन्हा का तुमची
विवेकबुद्धी नग्न झाली?
ना निषेध दिसला कोठे
ना दिसल्या षंढ चर्चा
का आज शब्द रुसले
अन् मने रिकामी झाली?
माणुसकीचा येता गहिवर
व्हा आपल्यांचेही वाली, अन्यथा...
कळणार नाही दहशत
अंगणात केव्हा आली!
Saturday, December 20, 2014
माणुसकीचा येता गहिवर
आठवा त्यांचे अत्याचार
लुटलेली माताभगिनींची अब्रू
अन् स्वाहा केलेले घरदार
युद्धामध्ये सातत्याने
खाल्ली माती झाली हार
मग सोडले जिहादी पिल्लू
अन् सुरु जाहले अत्याचार
ठेउनी जा तुमच्या बायकापोरी
ध्वनीक्षेपकांचे आठवा चित्कार
भोसकलेले कोवळे जीव
अन् माजवलेला हाहा:कार
काश्मीरी शालीवर पडली
आमच्याच रक्ताची लाली फार
काश्मीरी जनता जाहली
पाकी गोळ्यांची शिकार
समाधान होईना तयांचे
बॉम्बस्फोटांनी केले बेजार
अश्राप कोवळ्या जीवांनी गमावले
आई-बाप अन् मित्रही फार
शरीरात आजही काचा
शस्त्रक्रियांनी आजही बेजार
तुमच्या फुकाच्या गहिवराने
जखमा मनाच्याही नाही भरणार
चालवली बस आम्ही तेव्हा
कवितांमधुनीही दाखविले प्यार
सुरा खुपसला पाठीमध्ये
कारगिलचा तो आठवा वार
मग आले दहा नराधम
बरसल्या पुन्हा गोळ्या फार
लहानगे कोवळी जीवही होते ना
झेलत रक्तरंजित अत्याचार?
लहान, तरूण, वृद्ध, आणि महिला
क्षणात संपले इहलोकी अवतार
नाही दिसल्या मेणबत्त्या तेव्हा
पण वाटले पेढे कुंपणा पार
डोळे सातत्याने होती ओले
फुलतो रोमरोमात अंगार
आठवता ते अकाली मृत्यू अन्
अगणित झालेले बलात्कार
त्यांच्या शाळा त्यांचे शिक्षण
शिकवित नाहीत भारतप्यार
तयार होती तिथे निरंतर
सैनिक जिहादी करण्या अत्याचार
येतोच कसा तुम्हा उमाळा
विसरुन ते जहरी फुत्कार
माणुसकीचा येता गहिवर
आठवा त्यांचे अत्याचार
आतापर्यंत सहन करित आलो
हाच संयम आणि हेच संस्कार
अस्थानी गहिवराच्या शब्दांचे भाले
आम्ही आता नाही झेलणार
Thursday, November 14, 2013
स्मायली
कृत्रिम होऊन स्मायली झालं
तेव्हाच मी ओळखलं
आता काही खरं नाही
संभाषणात अट्टाहासाने पेरलेले स्मायली
स्वल्पविरामांची जागा घेतल्यासारखे पसरले
तेव्हाच मी ओळखलं
आता काही खरं नाही
मग वास्तवातल्या मुखवट्यांवरही मात करण्यापर्यंत
याच स्मायलींची मजल गेली
तेव्हाच मी ओळखलं
आता खरंच काही खरं नाही
- मंदार
१४.११.२०१३
कार्तिक शु. १२, चातुर्मास समाप्ती, शके १९३५