Sunday, July 2, 2017

सलाम

(मंगेश पाडगावकरांची माफी न मागता )

सलाम
सबको सलाम
ज्याच्या हातात चॅनल त्याला सलाम,
पगाराच्या भयाने
डाव्या हातात माईकचं बोंडुक घेऊन
उजव्या हाताने सलाम,
बघणाऱ्याला सलाम,
न बघणाऱ्याला सलाम,
विकत घेणाऱ्याला सलाम,
विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला लाल सलाम,
सलाम, भाई, सबको सलाम.

चादर घातलेल्या प्रत्येल थडग्याला सलाम,
डिवायडर पीराला सलाम
देवळांना फोडून बांधलेल्या मशिदींना सलाम,
मशादीतल्या मौलवींच्याच्या धाकाला सलाम,
मशिदीतून, लाउडस्पीकरवरुन
बेंबीच्या देठापासून ओरडणाऱ्याला सलाम,
परवरदिगार आणि त्याच्या मजहबचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम,
रिकाम्या गर्भाशयात जीव भरण्यासाठी
निष्पाप मोहतरमाला नासवणाऱ्या बंगालीबाबाला  सलाम
चाँदला सलाम
बकऱ्याला सलाम,
दहशतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम,
अम्मीच्या उरावर दुसरी अम्मी बसवणाऱ्या अब्बाला सलाम,
दुसऱ्या अम्मीला टरकावणाऱ्या तिसऱ्या अम्मीला सलाम,
सलाम, प्यारे भाईयों और बेहेनों,
सबको सलाम.

ज्याच्या हातात कोयता
त्याला सलाम,
ज्याच्या गळ्यात क्रूस
त्यालाही सलाम,
चर्चच्या पादऱ्यांना सलाम,
त्यांची वेसण धरणाऱ्या
व्हॅटिकनला सलाम,
ज्याच्या सेवेला नन त्याला सलाम,
तिला भोगणाऱ्या फादरला सलाम
तिचा गर्भपात करतो
त्यालाही सलाम
क्रिसमस आणि व्हॅलेन्टाइनच्या गर्दीला सलाम,
ती गर्दी झुलवणाऱ्या
जादूगारांना लाल सलाम,
भाईयों और बेहेनों सबको सलाम.

नाक्यावरच्या अनधिकृत चिकनशॉपला सलाम
शेजारच्या इल्लीगल गॅरेजला सलाम
ते चालवत वखवखलेल्या नजरेने सावज शोधणार्‍या वाहिदला सलाम
सोनं म्हणून आरडीएक्स स्मगल करणार्‍याला सलाम
ते वापरून बनवलेले बाँब ठेवणार्‍यांना सलाम
स्फोट झाल्यावर जिहादी जल्लोष करणार्‍यांना सलाम
त्यांना पकडू पाहणार्‍या पोलीसांना सलाम
त्यांचे ट्रक न तपासता जाऊ देणार्‍यांनाही सलाम
टायगर मेमनला सलाम,
त्याला श्रद्धांजली वाहणार्‍या
कुबेरांनाही सलाम,
लोकसत्तालाबी सलाम,
सकाळलाही सलाम,
काँग्रेसला बुडवणार्‍या राहुल गांधींना सलाम,
गांधींखाली चिरडलेल्या
प्रणवदांना, नरसिंह रावांना सलाम,
ज्याच्या हातात विळा हातोडा त्याला सलाम,
सैनिकांना बलात्कारी म्हणणार्‍यांना सलाम,
भारत तेरे टुकडे होंगे म्हणणार्‍यांना ,
कन्हैया कुमारला सलाम,
कविता कृष्णनला सलाम;
आनंद पटवर्धननांना सलाम,
कबीर कला मंचला सलाम,
निरपराध मुलांना बायकांना मारणार्‍या नक्षलवाद्यांना सलाम,
मौत सस्ती करणाऱ्या सर्वांना लाल सलाम,
सलाम, प्यारे दोस्तों, सबको सलाम.

फिल्म इन्स्टिट्युटला सलाम
त्यातल्या मध्यमवयीन विद्यार्थ्यांना सलाम,
काहीही त्रास नसलेल्यांना सलाम
पण सतत तुम्हाला कसलातरी त्रास आहे असं
पटवणार्‍या कॉम्रेडांना सलाम
गोळी घालणार्‍यांना सलाम
ती घालण्याच्या आदेश देणार्‍यांना सलाम
कॅपिटालिस्ट मालकांना सलाम
कम्युनिस्ट कामगार नेत्यांना सलाम
दिवाळी बोनसला सलाम
संपाला सलाम
उपासमारीला सलाम
युनियनच्या लिडरला सलाम,
संपात बरबाद झालेल्या कामगाराला सलाम
त्याच्या पिचलेल्या बायकोला सलाम
दीड खोलीत अभ्यास करणार्‍या
एकच गणवेश आठवडाभर वापरणार्‍या
त्यांच्या पोरांना सलाम
चीनला सलाम
सोवियत रशियाला सलाम
लाल झेंड्याला सलाम
सलाम, लाल सलाम
सलाम, भाईयों और बेहेनों, सबको सलाम.

या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम,
या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम,
याच देशात राहून त्याचे टुकडे करण्याच्या घोषणा देणार्‍यांना सलाम
गायीचं मांस खाणार्‍यांना सलाम
तिला रस्त्यावर कापणार्‍यांना सलाम
आमचा धर्म शांततेचा या सर्व बिलंदर घोषणांना सलाम,
हिंदूद्वेष्ट्या उकिरड्यांना सलाम,
या उकिउरडयांतून मजहबचं पीक काढणाऱ्यांना सलाम,
टोपी आणि बुरख्याला सलाम,
पंक्चरवाल्या मियाँला सलाम,
त्यांच्या शेकडो लौढ्यांना सलाम,
निवडणुकांना सलाम,
निवडणुक प्रचाराला सलाम,
निवडणुकांवर डोळा ठेऊन झालेल्या
निरनिराळ्या वांझोट्या आंदोलनांना ,
विद्यार्थी चळवळीला सलाम
नॉट इन माय नेमला सलाम
आद्य चळवळ बामण हटावला सलाम
लाल झेंडा हाती असलेल्या पारध्यांना सलाम,
त्यांच्या तैनातीतल्या गारद्यांना सलाम,
या सर्व अत्याचार करणाऱ्यांना सलाम,
या बातम्या वाचणाऱ्या सर्व षंढांना लाल सलाम,
सलाम, भाईयों और भैनों, सबको सलाम.

वरपासून खालपर्यंत आरक्षणाचा देश म्हटले
तर डोके फोडतील ,
भत्ताखाऊ फुकट्यांचा देश म्हटले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदले जाणाऱ्या पत्रकारांचा देश म्हटले
तर मोर्चे काढतील,
दगडाला देव आणि गायीला माता म्हटलं
तर हिंदू दहशतवादी म्हणून दम देतील
मोर्चात जातो म्हटले
तर नोकरीवरून काढतील;
म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या माझ्या
शेख्युलर हिरव्या देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.
लाल सलाम
प्यारे भाईयों और बेहेनों, सबको सलाम,

अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिन माफ़ करना भाईयों,
हात तर दोनच
आणि त्यातला उजवा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त
डाव्या हाताने सलाम,
सलाम, सबको लाल सलाम
भाईयों और बेहेनों, सबको सलाम.

© मंदार दिलीप जोशी
आषाढ शु. ८, शके १९३९

No comments:

Post a Comment