Wednesday, February 21, 2018

कोमलप्रीत कौर - एक सक्षम महिला

कोमलप्रीत कौर हे नाव किती जणांना माहित आहे?

बरं, गुरमेहर कौर हे नाव माहित आहे? हो, ती माहित असेलच. महिला सक्षमीकरण ही संज्ञा नक्की ठावूक असेल तुम्हाला. तर गुरमेहर कौरच्या आणि डाव्यांच्या मते गुरमेहर ही ट्रोल्सशी 'लढून' अधिकच 'सक्षम महिला' म्हणून उभी राहिलेली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तथाकथित झेंडा फडकवत ठेवणारी मिडियाचं लाडकं गोग्गोड बाळ असलेली गुरमेहर कौर सगळ्यांना आठवते आणि तिला महिला सक्षमीकरणाचं उदाहरण म्हणून आपल्यासमोर सतत नाचवलं जातं.

आता कोमलप्रीत कौर कोण ते सांगतो. कोमलप्रीत कौर ही कारगिलमधे लढताना हुतात्मा झालेल्या शिपाई बूटा सिंग यांची मुलगी. गरिबीशी झुंजत शिक्षण घेणारी, पंजाब मेडिकल प्रवेश परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावणारी आणि आता एम.बी.बी.एसचे शिक्षण घेत असलेली खर्या अर्थाने सक्षम मुलगी.

वयाच्या वीसाव्या वर्षी सैन्यात दाखल झालेले बूटा सिंग चार महिन्याच्या कोमलप्रीतला आणि अवघ्या वीस वर्षांच्या आपल्या पत्नीला मागे ठेऊन वयाच्या फक्त सव्वीसाव्या वर्षी कारगिलमध्ये हुतात्मा झाले. स्वतःचं दु:ख बाजूला ठेवून तिच्या आईने म्हणजे अमृतपाल कौर हिने कोमलला मोठं करण्याकडे सगळं लक्ष केन्द्रित केलं आणि आज आईचे कष्ट आणि स्वतःची मेहनत यांच्या बळावर कोमलप्रीत वैद्यकीय शिक्षण घेते आहे.

मात्र कोमलप्रीतला आज कुणीही ओळखत नाही. कारण ती आपल्या परिस्थितीचा बागुलबुवा न करता, अभिव्यक्तीच्या नावाखाली विकृती स्वातंत्र्याची कास न धरता, सोशल मिडियावर पडीक राहून आपल्या परिस्थितीबद्दल गळे न काढता, अपार कष्ट करत अभ्यासाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं राहण्याकडे अग्रेसर आहे. आयुष्याची लढाई, झगडत जगणं हे शब्द आजकाल फार स्वस्त झाले आहेत कारण सोशल मिडियावरच्या ट्रोल्सशी लढणं या चिल्लर गोष्टींना आज मिडियाने आणि डाव्यांनी ग्लॅमर प्राप्त करुन दिलेलं आहे. पण हेच शब्द, हीच आयुष्याची लढाई कोमलप्रीत अक्षरशः जगत आहे.

गरीबीतून वर आलेल्या पण आपल्या हातचं बाहुलं न बनलेल्या कुणाचंही कौतुक करण्याची दानत आजच्या मिडीयात आणि साम्यवादी विचारसरणीत नाही, किंबहुना कधीच नव्हती. काँग्रेसने त्यांना पोषक ठरण्यासाठी उभ्या केलेल्या व्यवस्थेचे हे वैशिष्ट्य आहे की गुरमेहर सारख्या हास्यास्पद व्यक्तींना आज आदर्श व्यक्तिमत्व म्हणून लोकांसमोर आणलं जातं आणि कोमलप्रीत कौर सारखे महिला सक्षमीकरणाचं प्रतीक म्हणावं अशी उदाहरणे समोर असतांना त्यांना मात्र अशा प्रकारे अज्ञातवासात घालवतं.

तर अशा या कोमलप्रीतला पुढील आयुष्याकरता अनेक शुभेच्छा.

©️ मंदार दिलीप जोशी
फाल्गुन शु. ६, शके १९३९

कोमलप्रीत कौर - एक सक्षम महिला



कोमलप्रीत कौर इस नाम से क्या आप परिचित है? नहीं?

चलिये ठीक है, गुरमेहर कौर यह नाम तो आपको ज्ञात होगा ?  महिला सक्षमीकरण इस संज्ञा से भी आप अवश्य परिचित . वामपंथीयों तथा पोषित मिडिया एवं स्वयं गुरमेहर कौर की माने तो वह सोशल मिडिया के ट्रोल्स से 'लडने' के बाद  एक अत्यधिक 'सक्षम महिला' के रूप में खडी है. इस लडाई को लडकर अभिव्यक्ति की स्वतंत्रता का झंडा फडकता हुआ रखने का श्रेय ले चुकी मिडिया की लाडली बच्ची गुरमेहर कौर का सबको स्मरण है और उसे महिला सक्षमीकरण के उदाहरण के तौर पर हमारे सामने अनगिनत बार नचाया जाता है.

अब आपको बतलाता हूं कोमलप्रीत कौर कौन है. कोमलप्रीत कौर कारगिल के युद्ध के हुतात्मा सिपाही बूटा सिंग की बेटी है. गरिबी से झगडते हुए कोमलप्रीतने अपनी पढाई पूरी की, पंजाब मेडिकल एन्ट्रन्स एग्झाम में अव्वल नंबरों से उत्तिर्ण हुई, और अब एम.बी.बी.एस.की शिक्षा ले रही वास्तविक रूप में सक्षम लडकी है कोमलप्रीत.

केवल बीस साल कि आयु में सेना में दाखिल हुए कोमल के पिता बूटा सिंगने जब कारगिल में लडते लडते अपनी जान देश के लिये न्योछावर कर दी, तब वे केवल छब्बीस वर्ष के थे. वे पीछे छोड गये अपनी केवल चार महीने की बेटी कोमलप्रीत एवं केवल बीस वर्ष की पत्नी अमृतपाल कौर को. केवल दो बार दो महिनों के छुट्टी पर आये अपने पती बूटा सिंग की अमृतपाल कौरजी के मन में केवल कुल चार महिनों की स्मृतियां हैं. अपने पती के इस जग से चले जाने के दुख को अपने मन मे रख अमृतपाल कौरजीने अपनी बेटी के भरणपोषण एवं शिक्षा पर ध्यान देने का निश्चय किया, जिसके फलस्वरूप आज कोमलप्रीत आज एक चिकित्सक (डॉक्टर) होने के पथ पर अग्रेसर है.

परंतु आज कोमलप्रीत को कोई नहीं जानता. क्योंकि कोमलने अपने हाल के लिये न तो युद्ध को उत्तरदायी ठहराया, न वो अभिव्यक्ती की स्वतंत्रता का झंडा उठाकर नाची. न उसने सोशल मिडिया पर रोनाधोना किया. आज कोमलप्रीत अपनी मां के एवं स्वयं अपने कष्टों के आधार पर एक डॉक्टर होने की राह पर है,

जिंदगी की लडाई, संघर्षपूर्ण जीवन यह शब्द आजकल बहुत सस्ते हो गये है, क्योंकि आजकल मिडिया तथा वामपंथी कुबुद्धीवादीयों ने सोशल मिडिया पर ट्रोल्स से लडना इस बात को ग्लॅमर एवं महत्त्वपूर्ण बना दिया है जैसे कुछ अक्षर टाईप करना या किसी को म्युट या ब्लॉक करना यह कोई शौर्य का प्रतीक हो. परंतु जिंदगी की लडाई, जीवन का संघर्ष इन्हीं शब्दों का जीवित उदाहरण है कोमलप्रीत का जन्म से लेकर आजतक का जीवन.

गरिबीसे उभरकर परंतु किसी घातक विचारधारा की कठपुतली न बनकर जीवन में यशस्विता प्राप्त करनेवाले किसी के प्रति न तो आजकलके मिडीया एवं वामपंथीयों को कोई ममत्व है न भूतकाल में कभी था.

काँग्रेसने उनके खडे किये गये पोषक व्यवस्था का यही वैशिष्ट्य है कि जहां आज गुरमेहर जैसी जोकरछाप अपरिपक्व व्यक्ती को आज लोगों के सामने आदर्श व्यक्तिमत्व के रूप में देश के सामने प्रस्तुत किया जाता है, वहीं कोमलप्रीत कौर जैसे सही मायने में सक्षम महिलाओं को गुमनामी के अंधेरे मे रखा जाता है.

ऐसी सक्षम कोमलप्रीत कौर को आगे की मेडीकल शिक्षा के लिये अनेक शुभकामनाएं एवं उनकी माताजी अमृतपालजी को शत शत नमन.

© मंदार दिलीप जोशी
फाल्गुन शु. ६, शके १९३९

Monday, February 5, 2018

यंटम - एक प्रगल्भ प्रेमकथा

कथा तीच. घासून गुळगुळीत झालेली. प्रेम तेच. अडनिड्या वयातलं, कॉलेजातलं. धडपडही तीच. तिचं नाव पत्ता शोधून काढण्याची. होकारही तसाच. वाट बघत असल्यासारखा.  अंहं, समीर आशा पाटील यांचा यंटम हा चित्रपट हा सैराटच्या पठडीतला नक्कीच नाही. प्रतिसाद देण्याची आणि प्रेम करण्याची, आणाभाका घेण्याची पद्धत मात्र संयमी, पोक्त, आणि विचार करण्याचीही. चित्रपटाची सुरवात होताच "अरे देवा, कुठे आलो या सिनेमाला" हे उद्गार सिनेमा संपेपर्यंत "मस्त होता, खूप आवडला" इतके बदलले होते.

चित्रपटाच्या रंगा (वैभव कदम) या नायकाचे रंगाचे वडील रावसाहेब (सयाजी शिंदे) हे सनईवादक, आपल्या दोन साथीदारांबरोबर 'सुपारी' घेऊन लग्नात सनईवादन करुन आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट . एकेकाळी आपल्या सनईवादनाने अनेक लग्नसमारंभ आणि कदाचित काही मैफिली गाजवलेले रावसाहेब आता वयोमानपरत्वे थकत चालले आहेत. तरीही हातावर पोट असल्याने आणि घरच्या जबाबदार्‍यामुळे काम करत राहणं हे त्यांना भाग आहे. हल्ली डीजेचा काळ असल्याने फारसं कुणी सनईवादकांना आमंत्रण देत नाही, त्यामुळे आताशा त्यांना फारशा 'तारखा' मिळत नाहीत. ढोल, ताशे, आणि डीजेच्या गदारोळात ऐकूही न जाणारी सनई यामुळे होणारा अपमान त्यांच्यातल्या हाडाच्या कलाकाराचं काळीज चिरत जातो. तरीही लग्नात ताशा वाजवणारा आपला मुलगा रंगा हाताशी यावा, त्याने सनई शिकून आपली जागा घ्यावी अशी त्यांची इच्छा असते. पण रंगाला सनई वाजवणं आवडत नाही, त्याला अजून आयुष्याची दिशा सापडलेली नाही. असेच दिवस ढकलत असताना तो त्याच्याच कॉलेजातल्या मीराच्या (अपूर्वा शेलगावकर) प्रथम तुज पाहता न्यायाने 'प्रेमात' पडतो. त्यावेळी ती कॉलेजच्या केमिस्ट्री लॅबमधे असल्याने त्यांची केमिस्ट्री लवकर जुळली असावी असा एक पाणचट विनोद करायची हुक्की शेजारच्या वटारलेल्या डोळ्यांच्या कल्पनेनेच मनातच राहिली. तर ते असो.

कमीतकमी संवादात प्रेमाची कबूली, आपल्या मित्रांच्या मदतीने त्यांच्याच बरोबर रंगा आणि मीराने पहिल्यांदा फिरायला जाणं, मीराने तिच्या आईचा उल्लेख करण आणि तिच्या काळजातला सल रंगापुढे मांडणं, आणि रंगाने तिची साथ देण्याचं वचन देणं हे ज्या पद्धतीने दिग्दर्शक समीर आशा पाटील आपल्यापुढे मांडतात त्याबद्दल त्यांचं कौतुक करायलाच हवं. टीनएज प्रेमकथा हा या चित्रपटाचा गाभा असला तरी चित्रपट फक्त याच मर्यादित परिघात हा फिरत राहत नाही. टीनएज मधलं प्रेम दाखवायचं म्हणजे एखादं काही विशिष्ठ मानसिकतेच्या प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेऊन दाखवलेलं आचकटविचकट गाणं, धुसमुसळे उत्तान प्रणयप्रसंग, कथेला असलेली जातीय किनार, नायिकेच्या बापाचा थयथयाट, आणि सगळ्यात प्रमुख म्हणजे नायकाने खांद्याच्या वर असलेल्या अवयवाचा उपयोग करण्यापेक्षा कमरेखालच्या अवयवाच्या इच्छा पुरवण्याच्या मागे लागणे यांपैकी कशाचाही उपयोग करुन घेण्याच्या आहारी न जाता लेखक-दिग्दर्शक समीर आपल्यापुढे एक सकस कथा सादर करतात.

आपल्या दोन इरसाल आणि टग्या मित्रांच्या मदतीने कॉलेजच्या ऑफिसातून मीराचा पत्ता धडपड करुन रंगा मिळवतो आणि मग सुरु होते त्यांची लवशिप अर्थात प्रेमकथा. सुरवातीला वडिलांनी आग्रह करुनही सनई शिकण्याला टाळाटाळ करणर्‍या रंगाची मीराला सनई ऐकायला आवडते हे ऐकून विकेट पडते. मग तो वडिलांकडून रीतसर सनईवादनाच प्रशिक्षण घ्यायला सुरवात करतो. दुर्दैवाने घरातली भिंत दादासाहेबांच्याच अंगावर पडून ते जखमी झाल्याने त्यांच्या निवृत्तीची प्रक्रिया वेग घेऊन रंगाच्या अंगावर त्याची पहिली 'तारीख' लवकरच येऊन पडते. रंगाला मिळालेल्या पहिल्या 'तारखेला' तो साथीदारांसोबत सनई कशी वाजवतो, मीरा आणि रंगाच्या प्रेमाचं पुढे काय होतं हे इथे सांगण्यात मजा नाही. ते चित्रपटगृहातच जाऊन पहा. दादासाहेबांच्या अंगावर पडलेली भिंत ही त्यांच्या निवृत्तीचं रूपक म्हणून आणि रंगाने एक जबाबदार मुलगा म्हणून दादासाहेबांची गादी पुढे चालवण्याचं, सनईवादक होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं रूपक म्हणून डागडूजी केलेली, पुन्हा उभी राहिलेली भिंत वापरण्याची कल्पना खूप आवडली. आणखी काही लिहीलं तर चित्रपटाची कथाच लिहील्यासारखं होईल. इथे स्पॉयलर देणार नाही.

चित्रपटातल्या सर्वांचंच काम चांगलं झालेलं आहे. यात रंगाच्या रम्या आणि जेड्या या मित्रांचं काम करणारे अनुक्रमे अक्षय थोरात आणि ऋषिकेश झगडे यांचंही काम उत्तम झालेलं आहे. सयाजी शिंदे यांच्या अभिनयाबद्दल मज पामाराने काय बोलावं, तो उत्तमच आहे. सयाजी शिंदे यांनी इतक्या वर्षांनंतरही स्वतःचा नाना पाटेकर होण्यापासून स्वतःला वाचवलेलं आहे त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र ठरतात.

हा चित्रपट बघताना ठायी ठायी सैराटशी तूलना करण्याचाही मोह आवरत नाही. टिनएज प्रेमकथा या जॉनरचे असंख्य चित्रपट आले आणि गेले. मात्र या जॉनरची इतकी उत्तम हाताळणी समीर यांच्याइतक्या चांगल्या पद्धतीने क्वचितच कुणी केली असेल. अडनिड्या वयात मुलामुलींना एकमेकांबद्दल वाटणारं आकर्षण, मग त्याला इन्फॅच्यूएशन म्हणा किंवा प्रेम, यांचं काय करायचं, पुढे काय इत्यादी प्रश्नांना फारसा विचार न करता बहुतेक अशा चित्रपटांत उथळपणाची फोडणी दिलेली आढळते. आता चित्रपट हा चित्रपटासारखा बघावा अशी प्रवचने देणार्‍यांनी जुगनू हा धर्मेन्द्रचा चित्रपट दोन डझन वेळा पाहून बँकेत तशाच पद्धतीने चोरी केल्याची कबूली एका गुन्हेगाराने दिली होती हे सोयीस्कररित्या विसरतात आणि सैराट प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमा बघून अंगात विशेष काहीही कर्तृत्व नसताना तशाच पद्धतीने पळून गेल्याच्या आणि मग पश्चात्ताप पावल्याच्या  बातम्यांकडे दुर्लक्षही करतात. चित्रपट या माध्यमाची ताकद कमी लेखणारे तरुणांना जबाबदारीची जाणीव आणि आयुष्याकडे प्रगल्भपणे बघण्याची दिशा देण्याचं काम क्वचितच करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर यंटम हा चित्रपट वैशिष्ठ्यपूर्ण ठरतो आणि कदाचित म्हणूनही समीर आशा पाटील यांना पाठीवर प्रेक्षकांच्या शाबासकीची थाप पडावी असा रास्त हक्कही पोहोचतो.

तर, या सिनेमाला मी किती तारे देईन? पूर्वार्धात बोअर केल्याबद्दल अर्धा आणि साधारण पंधरा मिनीटे लांबी कमी ठेऊ न शकल्याबद्दल अर्धा असा उगाचच एक गुण कापून ५ पैकी ४ तारे मी यंटमला देईन. ते पण मी एखाद्या चित्रपटाची इतकी स्तुती करतो आहे हे पाहून जनतेस झीट येऊ नये म्हणून. नाहीतर साडेचार तारे दिले असते. तर ते असो. यंटम बघायला चित्रपटगृहाच्या क्षमतेच्या एक पंचमांश सुद्धा प्रेक्षक नव्हते तेव्हा तो कधी जाईल सांगता येत नाही तेव्हा लवकर पाहून घ्या.

टळटीप (म्हणे लेख किंवा टीपा आवडल्या नाहीत तर टळा या अर्थाने):
(१) हा चित्रपट बघायचा की नाही याबद्दल लेखन वाचूनही शंका असेल तर एक टीप देतो. मला कुठल्याही चित्रपटाबद्दल इतकं चांगलं बोलताना बघितलंय? आता ठरवा.
(२) ही चित्रपट समीक्षा नव्हे. माझी वैय्यक्तिक मतं आहेत. मी चित्रपट आवडला तर त्याबद्दलची माझी मतं लिहीतो, आवडला नाही तर चित्रपटाची सालटी काढायला कमी करत नाही. तेव्हा यात व्यक्त झालेल्या मतांवर ठाम आहे. ती मला बदलायला सांगू नये. बदलणार नाहीत.

© मंदार दिलीप जोशी
माघ कृ. ४, शके १९३९

Friday, February 2, 2018

वनवासींच्या जमिनी बळकावणारे तथाकथित सामाजिक कार्यकर्ते उर्फ 'लोका सांगे Anti-ब्रह्मज्ञान'

नक्षलवाद्यांच्या समर्थकांपैकी एका व्यक्तीच्या ग्रामीण भागातल्या कारवायांकडे आपण आज पाहूया. वनवासींचा पुळका येऊन त्यांच्या भागात कुठलाच विकास होऊ नये म्हणून जंग जंग पछाडणार्‍या तथकथित सामाजिक कार्यकर्त्यांचा भंपकपणा आपल्याला विदीत आहेच. पण ज्याप्रमाणे दलित आणि वनवासी यांचा कैवार घेणारे नक्षलवादी त्यांच्याच जीवावर उठलेले आपण पाहिले आहेत, त्याच प्रमाणे वनवासींच्या जमिनीसाठी संघर्ष करायचं नाटक करणारे  सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याच जमिनींवर डोळा ठेवतात असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. कारण एकदा भ्रष्ट आचारविचार अंगिकारले, की पापाच्या दरीत किती खोल माणूस जातो त्याला काही धरबंध राहत नाही. अशाच एका वनवासींच्या जमिनीसाठी संघर्षरत असण्याचं सोंग वठवणार्‍या नवरा बायकोची ही गोष्ट आहे. मध्यप्रदेशातल्या निसर्गरम्य, शहराच्या गजबजाटापासून लांब असणार्‍या पंचमढी पर्वतरांगांतल्या हिरव्यागार जंगलावर साधारण नव्वदच्या दशकात एका व्यक्तीची वक्रदृष्टी पडली. या जंगलात आपला एक टुमदार बंगला असलाच पाहीजे असं तो ठरवतो, आणि सिनेमे काढून श्रीमंत झालेल्या त्याला ते फारसं कठीणही जात नाही. गंमत म्हणजे पर्यावरण रक्षण आणि वनवासींचा वनजमिनीवर असणारा हक्क या बाबत शहरी आणि विदेशी लोकांत जनजागृती करुन तो श्रीमंत झालेला आहे. काही वर्षांनंतर त्याच्याच वैचारिक जमातीमधल्या एका स्त्रीशी तो लग्न करतो. ती व्यक्ती त्याच्यासारखीच रणरागिणी 'सामाजिक कार्यकर्ती' आणि लेखिका असते. ब्राह्मणवादी मनुवादी भारत देश वनवासींच्या जमिनी घशात घालायलाच टपलेला आहे या गृहतिकाखाली ती काम करत असते. मला वाटतं आत्तापर्यंत तुम्हाला या जोडप्याचं नाव लक्षात आलं असेल. नसल्यास सांगतो, प्रदीप किशन आणि अरुंधती रॉय.

मुस्लिम दंगलपिडीतांना मदत म्हणून पैसे गोळा करुन ते स्वतःच्याच घशात घालणार्‍या तीस्ता सेटलवाड आणि तिचा नवरा जावेद आनंद यांच्या बद्दल आपण ऐकलं वाचलं असेलच. हे सगळे एकाच माणेचे मणी.

तर प्रदीप किशन आणि अरुंधती रॉय हे जोडपं आता वनवासी जनतेची गरीबी, त्यांच्याकडून हिरावून घेतल्या जाणार्‍या जमिनी, त्यांची एकंदर पिचलेली स्थिती याबद्दल त्याच वनवासींच्या जंगल जमिनीवर उभ्या असलेल्या आपल्या बंगल्यात आरामात बसून चिंतन करु लागले. असे चिंतन करायला लागणारी जागा अशाच निबीड अरण्यात मिळू शकते, नाही का? आता जुन्या ऋषीमुनींप्रमाणे यांनी काय कुट्या बांधून रहावयाचे? छे! हाऊ ओल्ड फॅशन्ड. त्यांना बंगलाच हवा.

काही काळाने त्याच भागात सरकारतर्फे पर्यटकांसाठी एक हॉटेल बांधायचा घाट घातला गेला तेव्हा मात्र प्रदीप किशन आणि अरुंधती रॉय यांना या विकासकामांमुळे तिथल्या निसर्गाचा र्‍हास होणार असल्याचा आणि मायबाप ब्रिटीश सरकारच्या काळातल्या हिल स्टेशनसदृश्य भागाचं विद्रूपीकरण होणार असल्याचा साक्षात्कार झाला. जंगलात बंगला बांधणं न परवडणार्‍या   सामान्य मध्यमवर्गीय पर्यटकांबरोबर त्याच हवेत श्वास घ्यायचा आणि ते चालतील त्याच रस्त्यांवर चालायचं म्हणजे किशन आणि रॉय यांचा वैचारिक अपमानच नाही का? अशा वेळी ते हॉटेल विरोधात बाह्या सरसावून उभे राहिले नसते तरच नवल होतं. हॉटेलबाबतचे आक्षेप नोंदवण्यासाठी नेमलेल्या समितीवर प्रदीप किशन याने स्वतःची वर्णी लावून घेतली आणि लुटारू भांडवलवाद्यांच्या विरोधात  "सामान्य जनतेची" बाजू मांडायला मदत केली. इथे सामान्य जनता वनवासी वगैरे नाही हो, असं वाटलंच कसं तुम्हाला? सामान्यजन म्हणजे नियम डावलून वनजमिनींवर बंगला बांधणारे स्वतः प्रदीप किशन आणि अरुंधती रॉय.

लवकरच प्रदीप किशन व अरुंधती रॉय यांना त्यांचा बंगला बेकायदेशीर असण्यासंबंधी पहिली नोटीस आली. त्या वेळी प्रसारमाध्यमातून त्यांच्या समर्थनार्थ लेख लिहीले गेले. त्यात दोन सूर प्रामुख्याने आळवण्यात आले होते. एक म्हणजे आमच्यापेक्षा कायदेभंग इतरांनी जास्त केला आहे आणि दुसरं म्हणजे आमचे शेजारी पहा आमच्याच वैचारिक जमातीतले आहेत म्हणून आम्ही इथेच राहणार.

नव्वदच्या दशकात सुरु झालेल्या केसमधला शेवटचा ज्ञात भाग म्हणजे २०१० साली स्थानिक न्यायालयात केस हरल्यावर होशंगाबादच्या विभागीय आयुक्तांकडे सुद्धा किशन व रॉय आपल्या बाजूने निकाल लावण्यास असमर्थ ठरले. सद्ध्या ही केस भारतीय न्यायव्यवस्थेत कुठेतरी हरवली आहे. हिंदू सणांवर निर्णय आणि टिप्पण्या करण्यात, रिक्त जागा कशा आहेत याबद्दल रडारड करण्यात, आणि आपली भांडणे चव्हाट्यावर आणण्यात व्यग्र असलेल्या आपल्या न्यायाधिशांना फुरसत मिळाली तर कदाचित काहीतरी निकाल ऐकायला मिळेलही. आणि तो जर त्यांच्या विरोधात लागलाच, तर पुन्हा भारत कसा असहिष्णू आहे आणि इथे रहावयास कशी भीती वाटते याच्या कहाण्याही ऐकायला मिळतील.

पण तो पर्यंत प्रदीप किशन आणि अरुंधती रॉय यांच्या वनवासी जमीन बळकावून त्यावर बंगला बांधण्याच्या या अद्वितीय वनवासी दीनदुबळ्या जनतेच्या चरणी रुजू केलेल्या समाजसेवेची कहाणी आपल्या मित्र, परिचित, आणि यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका.

संदर्भः
ऑपइंडिया, टेलीग्राफ, इंडियन एक्सप्रेस, टाईम्स ऑफ इंडिया, इंडिया टुडे, डिफेन्स डॉट पीके
https://goo.gl/DXcjPS  -   https://goo.gl/iYS36Y   -   https://goo.gl/YE7zob   -   https://goo.gl/cndNJS
-  https://goo.gl/3Qoyo3 - https://goo.gl/ST4cjy

© मंदार दिलीप जोशी
माघ कृ. २, शके १९३९