Tuesday, May 23, 2017

थोडंसं तुमच्या मुलीबद्दल

थोडंसं तुमच्या मुलीबद्दल

जरा तुमच्या मुलींविषयी बोलायचं आहे. हो, तुमच्याच मुलीबद्दल. थोडा वेळ आहे का?

चित्रपट निर्माते अतुल तापकिर यांनी पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी वाचल्यापासून एक विचार मनात घोळत होता. म्हणजेच कलम ४९८(अ)चा गैरवापर झाल्यास सगळ्या कुटुंबावर अटकेची वेळ येते, त्यात आई, वडील, असेल तर भाऊ आणि बहीणही. गैरवापर झाला आहे हे सिद्ध करेपर्यंत सासरच्यांचं आयुष्य उध्वस्त झालेलं असतं. कुठलाही कायदा जेव्हा केला जातो तेव्हा त्याचे समाजावर दूरगामी परिणाम होत असतात. म्हणूनच अशा कुठल्याही कायद्याबद्दल समाजाने त्या कायद्याचे होणारे परिणाम समजून घेणे आवश्यक आहे. त्या कायद्याचा प्रभाव, होणारे फायदे व नुकसान लक्षात घेऊन त्या संदर्भात व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. मग या कायद्याला आपलं समर्थन असो की विरोध, त्याची प्रत्येक बाजू आणि होणारे परिणाम या विषयी समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत जागृती होणं आवश्यक आहे. एखाद्या कायद्यामुळे सत्कृतदर्शनी फायदा होतो आहे असं वाटलं किंवा सोय दिसत असली तरीही त्यावर समाधान न मानता खोलात जाऊन  कायद्याची चिकित्सा केली पाहिजे. आपल्या दुर्दैवाने सरकारने कायदा केला की हिंदू समाज तो मम म्हणून पटकन स्वीकारतो, त्याची फारशी चिकित्सा करत नाही. इतर धर्मीय मात्र जरा जरी प्रतिकूल वाटलं तरी त्याला कडाडून विरोध करुन सरकारला बेत रद्ध करायला भाग पाडतात आणि जरी कायदा स्वीकारला तरी त्यावर विचारमंथन करुन त्याच्या संभाव्य दुरुपयोगापासून स्वतःला संरक्षित (इन्सुलेट) कसं करायचं या कामाला लागतात. हिंदू नेते तर सोडाच पण सर्वसाधारण समाजही कुठल्याही कायद्याचा सर्व बाजूंनी विचार करत नाही.

हिंदू मुलींना माहेरच्या संपत्तीत वाटा देणारा जो कायदा आहे (त्यात झालेल्या सुधारणांसकट) की ज्यामुळे होणार्‍या फायद्याकडे बघताना दुर्दैवाने आपण त्याच्या एका पैलूकडे बघायला विसरलो. या कायद्याचा दुरुपयोग म्लेंछांकडून लव्ह जिहाद करता केला जातो आहे या संदर्भात काही घटना समोर येत आहेत. दुर्दैवाने अशा तर्‍हेने काही गंडवली गेलेली हिंदू कुटुंब आहेत पण अशी प्रकरणे सहन करण्याकडे प्रामुख्याने त्यांचा भर दिसतो. एक तर मुलगी मुसलमानाने पळवली म्हणून नाचक्की झालेलीच असते, त्यात मुलीने जावयाच्या सांगण्यावरुन संपत्ती धुवून नेली हे कुठल्या तोंडाने समाजाला सांगणार? मग शांतपणे नुकसान सहन करण्यापलिकडे त्यांच्याकडे काही पर्याय उरत नाही.

आता हे कसं केलं जातं त्याकडे पाहूया. आपण आपल्या मुलीचं वय १८ झाल्याशिवाय तिचं लग्न करु शकत नाही. इस्लाममधे मुलीच्या लग्नाचं एक असं वय निश्चित नाही. मुस्लिम मुलगी "वयात आली की" तिला लग्नासाठी योग्य समजलं जातं, त्यासाठी तिने वयाची १८ वर्ष पूर्ण केलेली असणं आवश्यक नाही, आणि कुठल्याही भारतीय कायद्यानुसार हा गुन्हा ठरू शकत नाही. थोडक्यात मुस्लिम मुलगी "वयात आली" की तिचं लग्न लाऊन देता येतं म्हणजे निकाह करुन देता येतो आणि तिचा नवरा तिच्याशी शारिरिक संबंधही ठेऊ शकतो, दोन्ही गोष्टींसाठी तिचं "वय" आड येत नाही.

दिनांक ३ अप्रिल २०१४ मधे लागू झालेल्या Criminal Law (Amendment) Act, 2013 नुसारपरस्परसंमतीने ठेवता येणार्‍या शरीरसंबंधांचं वय कमीतकमी १८ आहे. म्हणजेच मुलींचं वय १८ वर्षाच्या आत असेल आणि परस्परसंमतीने जरी शरीरसंबंध ठेवला गेलातरीही तो बलात्कार ठरतो आणि पुरुषाला शिक्षा होते, तशी अर्थातच कायद्यात तरतूद आहे.

इस्लाममधे मुलगी वयात आली की लग्न करता येतं हे आपण वर बघितलं. हे लग्नाचं वय साधारणपणे १५-१६असं असतं. १६ पेक्षा कमी असेल तर धर्मगुरूंच्या परवानगीने निकाह करता येतो. थोडक्यात, निकाह करता वयाची अट नाही. पण एक प्रमुख अट आहे ती म्हणजे निकाह करणारा पुरुष व स्त्री हे दोघेही मुसलमान हवेत. म्हणजेच, परधर्मीयांना स्वतःच्या धर्मात राहून मुसलमान व्यक्तीशी निकाह करता येत नाही, त्यासाठी इस्लाम स्वीकारावा लागतो. धर्मांतर करावं लागतं.

पुढे वाचण्याआधी वरचे तीन परिच्छेद पुन्हा वाचा.

वाचलेत?

ठीक. आता पुढे वाचा. याचाच अर्थ असा, की एखाद्या १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या पण "वयात आलेल्या" हिंदू मुलीने प्रेमाच्या भरात इस्लाम कबूल केला आणि नंतर तिने लग्न केलं तर त्यानंत‌रच्या शरीरसंबंधांना कायद्याने बलात्कार मानलं जात नाही. कारण अर्थातच ती मुलगी मुसलमान असल्याने आणि ती वयात आलेली असल्याने तिने केलेल्या निकाहाला आणि तिच्या शोहरला तिच्याशी केलेल्या शरीरसंबंधांना कायद्याने संरक्षण दिलं गेलेलं आहे. थोडक्यात, अशा तर्‍हेने एखाद्या हिंदू मुलीने धर्मांतर केलं आणि ती मुसलमान झाली तर कायदा काहीही करु शकत नाही.

तर, मुद्दा कायद्याच्या दूरगामी सामाजिक परिणांमांचा आहे. आता असे किस्से कानावर येऊ लागले आहेत की या दोन कायद्यांचा हिंदूंची संपत्ती ढापण्यासाठी अत्यंत सुनियोजित वापर म्लेंछांकडून केला जातो आहे. श्रीमंत किंवा सधन घरातली मुलगी शोधायची, मग ती धोक्याच्या चौदा ते सोळा या वयोगटातली असेल तर उत्तम. तिला प्रेमात पाडल्यावर इस्लाम कबूल करुन घ्यायला फार मतपरिवर्तन करावं लागत नाही, कारण एकदा प्रेमात आंधळं झालं की या बाबतीत स्वतःचं मत फारसं उरतच नाही. वयात आल्यावर तुम्ही कधीतरी पहिल्यांदा प्रेमात पडला असालच, त्यावेळी त्याला/तिला आवडतं म्हणून आपण आपल्या मनाविरुद्ध काय काय केलं ते आठवून पहा आणि त्यावेळी तुमचं वय काय होतं ते ही.  मुद्दा असा, की अशा तर्‍हेने अक्कल गहाण टाकून प्रेमात आंधळं होऊन प्रियकराशी लग्न करायला मुलगी पुरेशी आतुर झाली (डेस्परेट हा शब्द वापरणार होतो पण....असो) की मग तिला इस्लाम स्वीकारायला लावणं हे फारसं कठीण काम उरत नाही. कारण त्या वेळी ती मुलगी इतकी निकाहोत्सुक झालेली असते की तू इस्लाम स्वीकारला नाहीस तर तुझ्या नवर्‍याला जेल होईल मग तुमचं लग्न कसं होणार अशी भीती घातली जाते. एकदा ती मुलगी मुसलमान झाली की मग दोघांचा निकाह लाऊन द्यायला काहीच कायदेशीर अडचण येत नाही. मुलीकडच्यांनी कितीही हापटलं तरी कायदेशीररित्या ते काहीही करु शकत नाहीत, कारणबलात्काराची केस टाकायला आणि त्यासाठी १८ वर्ष ही वयोमर्यादाअसायला मुलगी आता हिंदूच उरलेली नसते. खरा धोका हा इस्लाम स्वीकारण्याच्या आधीच असतो, कारण नंतर वेळ उलटून गेलेली असते. एकदा का तिचा निकाह झाला की पुढच्या आयुष्याचा निकाल लागतो, कसा ते पुढे पाहू.

हिंदू मुलीचा माहेरच्या संपत्तीत अस‌लेला हक्क ती मुसलमान झाल्यावर नष्ट होतो अशी कुठेही तरतूद नाही. त्यामुळे निकाह झाल्यावर नव्याची नवलाई असताना मुलीला तिच्या माहेरच्या संपत्तीत हक्क मागायला लावण्याचे आणि भरपूर संपत्ती उकळली जाण्याचे किस्से घडलेले आहेत. त्यातला एक किस्सा सांगतो. यात मुलगी सज्ञान असणे या व्यतिरिक्त काही वेगळं नाही. किस्सा १००% खरा आहे. फक्त नाव आणि शहर सांगायची परवानगी नाही.

एक सधन घर. मोठी मुलगी, तिला एक धाकटा भाऊ. घरातलं वातावरण सर्वधर्मभावाने व्यापलेलं, अगदी इश्वर अल्ला सगळे समान वगैरे. वडील उद्योजक आणि आई शहरातल्या नामांकित महाविद्यालयात प्राचार्या. मुलगा आणि मुलगी दोघंही लाडके. कशाची कमतरता नाही. झालं असं की केबलवाल्या भाईजानने मुलीशी विशेष मैत्री वाढवली. एक दिवस काही कामाने बाहेर पडलेली मुलगी घरी परतलीच नाही. कुठूनतरी फोन केला की मी सुखरूप आहे, निकाह केला आहे, माझी काळजी करु नये.

अगदी सर्वधर्मसमभाववाले असले म्हणून काय झालं, शेवटी आईबापाचं काळीज. शोध शोध शोधलं पण मुलगी सापडली नाही. सज्ञान असल्याने ते फारसं काही करु शकलेही नसते. नाचक्की टाळण्यासाठी चौकशी आवरती घेतली गेली. ते कुटुंब लोकांच्यात फार मिसळणारं नसल्याने प्रकरणाचा फार बोभाटाही झाला नाही. बहुतेक हिंदू घरांमधे केलं जातं तेच यांनीही केलं, गप्प बसले.

काही महिन्यांनी मुलगी आपला शोहर आणि इतर सासरच्यांबरोबर दारात हजर झाली. वाढलेलं पोट तिच्या शोहरचा पराक्रम दाखवत होतंच. हा धक्का पचवण्याची ताकद गोळा करण्याचा विचार करत असतानाच मुलीच्या सासरच्यांनी बाँब टाकला, च‌क्क मागणी केली की मुलीचा तुमच्या संपत्तीत हक्क आहे तो तिला मिळावा. मुलीच्या सासरच्यांनी सोबत एक वकील साहेबपण याच कामासाठी आणलेले होते. वडील जरा सावरले आणि त्यांना दुसर्‍या दिवशी या असं सांगितलं. मुलीला म्हणाले बरेच दिवसांनी आली आहेस तर आजची रात्र रहा घरी. सासरच्यांनी आक्षेप घेतला पण हा मुद्दा फार ताणला नाही. ताणल्यावर शोहरने तलाक, तलाक, तलाक म्हटलं असतं तर संपत्तीतला वाटा कसा मागता आला असता? ते निघून गेल्यावर मुलीच्या वडीलांनी त्यांच्या ओळखीतल्या काही लोकांशी संपर्क साधला, रातोरात चक्र फिरवली - तपशीलात जायची गरज नाही पण एवढं सांगणं पुरेसं आहे की मुलीच्या सासरच्यांना वाटलं गोल्डफिश गळाला लागलाय पण तो शार्क निघाला. कालांतराने मुलीचं "पुनर्वसन" झालं. तिचं भलं झालं म्हणून पुढचे तपशील विचारायची गरज वाटली नाही.

व्यवस्थित श्रीमंत घर पाहून मुलीला पटवणं, मग पळवणं, आणि मग तिला दिवस गेल्यावर गर्भपाताची शक्यताही उलटून गेल्यावर तिच्या संपत्तीत हक्क मागणं आणि तो मागत असताना सोबत वकीलालाही घेऊन जाणं हे सगळं संपूर्णपणे सुनियोजित कार्यपद्धतीचा भाग निश्चितपणे वाटावा अशा पद्धतीचा एक ट्रेन्डच सद्ध्या कानावर येणार्‍या गोष्टींमधून दिसू लागला आहे.

या किश्शात योग्य लोकांची ओळख आणि त्यांचा प्रभाव या गोष्टींचा फायदा झाला. पण सगळ्यांना असा फायदा होतो असं नाही. बहुतेक लोक लुटले जातात.

याला आणखी एक पैलू आहे. आपल्याकडे अगदी लहानपणापासून मुलांच्या नावावर पैसे ठेवले जातात, दागिने केले जातात. बँकेत खातंही काढून दिलं जातं. त्यातून एटिएम वगैरे सारख्या माध्यमातून पैसे काढणं फारसं कठीण नाहीच. मुलगी सज्ञान असेल तर तर काय विचारायलाच नको. कुठेही गेलं तरी त्या पैशावर तिचाच कायदेशीर हक्क असतो. तेव्हा जरी संपत्तीत वाटा मागितला नाही, तरी तिचा असणारा पैसा आणि तिने पळून जाताना घेतलेले दागिने ही तिच्या शोहरचीच संपत्ती होते.

इस्लाम स्वीकार करुन निकाह केलेल्या हिंदू मुलीचा जरी तिच्या माहेरच्या संपत्तीवर हक्क अबाधित असला तरी मुसलमान स्त्रीला निकाह केल्यावर मात्र नवर्‍याच्या संपत्तीवर काहीही हक्क नसतो. तिच्या संप‌त्तीव‌र‌ही शोह‌र‌चाच ह‌क्क अस‌तो. ती संपूर्णपणे कफल्लक असते. इस्लाममधे महिलांना निकाह करताना शोहरकडून जी मेहेरची रक्कम मान्य केली जाते त्या व्यतिरिक्त एकाही नव्या पैशावर तिचा अधिकार नसतो. मेहेरच्या रकमेला मात्र तिचा शोहर हात लाऊ शकत नाही. पण मुळात वर म्हटल्यप्रमाणे प्रेमात आंधळं आणि निकाहातूर झालेल्या मुलीकडून मेहेरच्या तुटपुंज्या रकमेबद्दल सहमती मिळवणं हे फारच सोपं काम असतं.

आणि हो, आपण अजून तुमच्याच मुलींबद्दल बोलतो आहोत. तेव्हा न कंटाळता वाचताय असं गृहित धरतो.

मग शोहरने तलाक दिल्यावर, मग तो हल्ली बहुचर्चित असलेला आणि एकदम दिलेला तीन तलाक असो की मग काही विशिष्ठ दिवसांच्या अंतराने दिलेला तलाक असो, एकदा का तलाक मिळाला की तुमची मुलगी रस्त्यावर आलीच समजा. हो, आणखी एक गोष्ट. एकदा स्वेच्छेने इस्लाममधे प्रवेश केला, की तो सोडण्याची शिक्षा ही मौत आहे. त्या भीतीने तलाकशुदा मुलगी परत आपल्या आईवडिलांकडे जात नाही, आणि ती भीती नसली तरी बहुतेक वेळी आईवडिलही तिला मुसलमान नवर्‍यापासून झालेल्या पोराबाळांसकट स्वीकारत नाहीत (ही गोष्ट चांगली की वाईट यावर चर्चा नको, असंहोतं हे खरं आहे). त्यामुळे काहीही आधार नसलेल्या परिस्थितीत, विपन्नावस्थेत ती मुलगी पुढचं आयुष्य कंठायला मजबूर होते.

काही गोष्टी या कालसापेक्ष किंवा स्थानसापेक्ष नसतात. त्या सार्वकालिक आणि जागतिक सत्य असतात. दारिद्र्य आणित्याचा गुन्हेगारीशी असणारा संबंध ही अशीच बाब आहे. आता श्रीमंत आणि सुशिक्षितही गुन्हे करतातच, पण गुन्हे घडण्याची शक्यता ही गरिबीशी जास्त संबंधित आहे. तुम्ही बघितलं असेल तर श्रीमंत देश आणि लोक हे गुन्हेगार आणि गुन्हेगारीचे नियंत्रण करतात आणि प्रत्यक्ष गुन्हे करणारे (आणिपकडले जाणारे) बहुतेक वेळा दारिद्र्यामुळे गुन्हेगारीकडे वळलेले असतात. अगदी काश्मीरातले हुरियत कॉन्फरन्स वगैरे फुटीरतावादी लोक बघितले तर ते वातानुकूलीत घरात बसून आदेश देतात, आणि दगडफेक करायला शाळकरी गरीब मुलं आणि सामान्य नागरिक हेच पुढे असतात. आपल्या कुबेरांचा सनदी लेखपाल याकूब मेमन हा उच्चशिक्षित इसम सुद्धा दहशतवादी हल्ल्यांचं नियोजन करणारा होता, प्रत्यक्ष बाँब ठेवणारी मुलं ब‌हुतांशी ग‌रीब घ‌रात‌ली.

तेव्हा तुमच्या मुलीला संपत्ती आणि संततीसाठी व्यवस्थित उसा सारखं चिपाड होईपर्यंत पिळून घेतल्यावर तलाक मिळाला की तिच्याकडे उरलेल्या शून्य संपत्तीचं पर्यवसान तिच्या मुलांचं गुन्हेगारीकडे वळण्यापर्यंत होऊ शकतं. किंवा वाईटात वाईट, तुमच्या काळ‌जाचा तुक‌डा अस‌लेली ती आत्म‌ह‌त्या क‌र‌ते.

बारा तेरा वर्षांपासून आजकाल मुलांना राजकीय मते मांडता येऊ लागली आहेत आणि कुठला पक्ष कसा हे समजू लागलेलं आहे, तरीही राजकीय मताचे पर्यवसान मतदानात होण्यासाठी वयोमर्यादा १८ आहे. नशीबाने हा कायदा सर्वधर्मीयांना लागू आहे. मग तोच तर्क आणि तसाच कायदा धर्मांतरासाठी का नको? हिंदू हिताचा पत्कर घेणार्‍या संघटना आणिप्रामुख्याने राजकीय पक्षांना हिंदूंनी हा प्रश्न विचारायला हवा. या प्रकरणी किमान जनजागृती करण्यासाठी ते काय करत आहेत असा जाब हिंदूंनी विचारला पाहीजे. तलाक संपला तरी पुढचे परिणाम चुकत नाहीत, म्हणून अशा पक्षांनी तीन तलाक बंद करा म्हणून उड्या मारण्यापेक्षा समान नागरी कायदा आणण्यासाठी हिंदू जनतेनेच दबाव आणला पाहीजे. सबका साथ हवा असेल आणि सबका विकास करावयाचा असेल तर कायदाही समान हवा. खेळपट्टी ही दोन्ही संघांना तीच मिळायला हवी, इंग्रजीत म्हणतात तसं लेव्हल प्लेयिंग फिल्ड. हा झाला राजकीय जाणीवांचा भाग.

मुख्य आणि मूळ मुद्दा असा की मुलांशी सतत संवाद ठेवा. त्यांना या धोक्याची जाणीव करुन द्या. अथर्वशीर्ष शिकवलंत तर सोबत पवित्र वाळवंटी पुस्तकाचंही ज्ञान द्या. रामाने परत आणायला सीतेशी त्याचं लग्न झालं होतं, तुमच्या लाडाकोडात वाढलेल्या जानकीला लग्नाआधीच समाजातल्या मारीचांची वेळीच ओळख करुन द्या. नाहीतर तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती उरलं धुपाटणं याहून वाईट परिस्थिती ओढवेल आणि तुमच्या मुलीची पालीच्या तुटलेल्या शेपटीसारखी अवस्था होऊन असहाय्यपणे वळवळण्यापलिकडे त्या दरिद्री कन्येकडे काहीही पर्याय उरणार नाही.

आणि हो, आपण तुमच्या मुलीबद्दलच बोलत आहोत. लक्षात आहे ना?

© मंदार दिलीप जोशी
मूळ संकल्पना: श्री आनंद राजाध्यक्ष

टीपः लेखात मांडलेल्या मुद्द्यावरच बोलावे. विषयांतरवाल्या टिप्पण्यांना बंदी आहे. उडवल्या जातील.

वैशाख‌ कृ. १२, श‌के १९३९