"For historians ought to be precise, truthful, and quite unprejudiced, and neither interest nor fear, hatred nor affection, should cause them to swerve from the path of truth, whose mother is history, the rival of time, the depository of great actions, the witness of what is past, the example and instruction of the present, the monitor of the future."
- Author Unknown
विशिष्ट अभिनिवेश व काही घटकांबद्दल द्वेष मनी धरून समाजात वावरणारे लोक यांचाच आवाज आज मोठा आहे आणि त्यांना राजकीय पाठिंबाही आहे. अशा लोकांची इच्छा सत्य जाणून घेणे नाही तर निव्वळ हुल्लडबाजी आणि गुंडगिरी करणे इतकीच असते आणि त्यांच्यासमोर डोकं आपटत बसण्यापेक्षा लिहिणं बंद करणं हा निर्णय आज अनेक चांगल्या इतिहास संशोधक व लेखकांनी घेतलेला आहे. आज खलनायकांना सद्गुणांचा पुतळा तर नायकांचं चारित्र्य संशयास्पद ठरवण्याची कारस्थानं व्यापक पातळीवर सुरू असताना सत्याचे आवाज एकामागोमाग एक असे बंद होणं या गोष्टीची किंमत केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला चुकवावी लागणार आहे.
तैलबुद्धी समोर बैलबुद्धी बलवान असण्याचाच हा समय आहे, दुर्दैवाने.
خردمندى را که در زمرة اوباش سخن ببندد شگفت مدار که آواز بربط با غلبهُ دهل بر نیاید و بوی عبیر از گند سیر فرو ماند
खुर्दमंदी रा के दर ज़मुरत ए औबाश सुखन बबंदद शिगुफ्त मदार के आवाज़ ए बरबत बा घलबीए दुहुल बर नियायद व बु ए अबीर अज़ गंद ए सैर फरु मांद
Don't be surprised by a wise man who is silenced by the vulgar, for the sound of a lute cannot compete with the boom of a drum, and the scent of ambergris is overwhelmed by the stench of garlic.
एखाद्या शहाण्या माणसाला मुर्ख आणि असभ्य माणसांनी गप्प बसवले तर त्याचे आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण ढोलाच्या कर्कश्य आवाजापुढे सतारीचे स्वर्गीय स्वर ऐकू येत नाहीत आणि कस्तुरी सारखा उच्च सुगंध देखील लसणाच्या घाणेरड्या आणि उग्र दर्पा पुढे मार खातो !
~ शेख सादी शिराझी याच्या 'गुलिस्तान' मधून
शेख शिराझी याच्या 'गुलिस्तान' मधून आणखी एक:
A great man was asked, "With all the superiority the right hand has, why do people put rings on their left hands!"
He replied, "Don't you know that the learned are always deprived ! "
एका महान माणसाला एकाने विचारले, "उजवा हात शक्तिशाली असून देखील लोक डाव्या हातात अंगठी का घालतात?"
यावर तो महान माणूस उत्तरला, "विद्वान माणसाची नेहमी उपेक्षा होते हे तूला ठाऊक नाही का?"
~ शेख सादी शिराझी याच्या 'गुलिस्तान' मधून
🖋️ मंदार दिलीप जोशी, सत्येन वेलणकर