ग्रामोफोनवर चोरून ऐकत असताना चाल आवडल्याने भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना एकदा 'जयोस्तुते' लाईव्ह ऐकायची लहर आली. लागलीच त्यांनी मुंबईला सावरकरांना फोन लावला, तो साधारण आठवडाभराने लागला. नेहरू म्हणाले, "स्वातंत्र्यवीर, अब हमारा कोई भरवसा नहीं. आज है उद्या नहीं. जाने से पहले एक बार जयोस्तुते गाना लाईव्ह सूनना है."
[म्हातारचळ लागलेलं दिसतंय, असं म्हणून] सावरकरांनी ताबडतोब शेजारची चार कार्टी गोळा केली आणि गाणं बसवून घेतले. अखेर तो दिवस उजाडला. पंडित नेहरू लहानग्या इंदिरेसह सावरकरांच्या घरी आले. कार्ट्यांनी जबरदस्त गाणे म्हटले. दोघांना गाणं इतकं आवडलं की 'सागरा प्राण तळमळला' आणि इतर अनेक गाण्यांची फर्माईश नेहरूंनी केली आणि पोरांनी ती म्हटली.
पंडितजी साश्रूनयनांनी सावरकरांना म्हणाले देखील, "स्वातंत्र्यवीर, हमसे बडी गलती हो गयी, हमने तुमकू बहुत त्रास दिया. अब हम तुमकू भारतरत्न देना चाहते हैं."
यावर सावरकरांनी [काय पण रत्न आहे असे उद्गार काढून] विनम्रपणे त्यास नकार दिला. म्हणून मग नाईलाजाने नेहरूंनी ते भारतरत्न स्वतःलाच ठेऊन घेतलं.
हा इतिहास हे चड्डीवाले संघी तुम्हाला सांगणार नाहीत.
- सिमसिम मरुदे
जमात-ए-पुरोगामी टाईम्स कडून प्रमेय चिरडकरसह