Showing posts with label इस्राइल. Show all posts
Showing posts with label इस्राइल. Show all posts

Saturday, May 22, 2021

आपण सगळे यिगल येहोशुआ

Yigal Yehoshua

हा फोटो ज्या व्यक्तीचा आहे त्या व्यक्तीचं नाव यिगल येहोशुआ होतं. 'होतं' म्हणजे तुम्हाला वाटतंय तेच, आता यिगलचा फोटो भिंतीवर आहे. इस्राइलच्या Lod शहराचा नागरिक असलेल्या या व्यक्तीला तिथे राहणाऱ्या अरब तरुणांनी दगडांनी ठेचून मारलं. यिगल येहोशुआ इस्राइलचे एक सामान्य नागरिक होते, आणि त्यांचा कुठल्याही राजकीय पक्षाशी, संस्थेशी, किंवा उपक्रमाशी (वाचा: कांडाशी) काडीमात्र संबंध नव्हता. वेगळ्या भाषेत सांगायचं तर यिगलला 'तटस्थ' म्हणता येईल.  यिगलचा मृत्यू अशा प्रकारे झाला नसता आणि नंतर कधीतरी नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू पावले असते तर आज त्यांचं नावही कुणाला कळलं नसतं. 

मग यिगल येहोशुआ नामक व्यक्तीच्या हत्येबाबत तुम्हाला काय आणि महत्वाचं म्हणजे का जाणून घेणं आवश्यक आहे?

त्यांना का मारलं म्हणजे त्यांना असं मारण्याबद्दल अरब लोकांचं काय मत आहे हे विचारलं गेलं तेव्हा एका अरब तरुणाने सांगितलं की हसौना (Hassouna) नामक एका अरब युवकाला गोळी घातली गेली त्याचा बदला म्हणून यिगलची अशी हत्या झाली. आम्ही जशास तसे 'न्यायाने' असाच सूड उगवत राहू!

ही त्या बातमीची लिंक https://tinyurl.com/dudyyps8. असंही 'Yigal Yehoshua' हे शब्द टाकून तुम्ही शोध घेतल्यास अनेक संकेतस्थळांवर ही बातमी आणि हा फोटो तुम्हाला सापडतील.

आता आपण पाहूया की या सध्या भासणाऱ्या घटनेचे विश्लेषण आवश्यक का आहे. कारण खरं तर फार सोपं आहे, पण हल्ली सोप्या गोष्टीच उलगडून सांगाव्या लागतात, आणि कठीण विषयांबद्दल लोकांचं मत आधिच बनलेलं असत! तर, या सध्या भासणाऱ्या घटनेचे विश्लेषण अत्यावश्यक आहे कारण यिगल येहोशुआ जसे सामान्य व्यक्ती होते तितक्याच सामान्य असलेल्या तुमच्या आमच्यासारख्यांशी याचा थेट संबंध आहे. इथे हे सांगताना यिगलला एक उदाहरण म्हणून वापरावं लागतंय हे त्यांचं दुर्दैव आहे. 

आधी हे लक्षात घ्या की यिगल जिथे मारले गेले ती जागा आणि तो भाग त्यांच्या नेहमीच्या वावरातला होता. ते आपल्या घरी किंवा ऑफिसला जे काही असेल तिथे जात होते, सांगण्याचा उद्देश हा की ये त्यांच्या नेहमीच्या रस्त्याने जात होते. त्याच मार्गावर त्यांना ठार केलं गेलं. याने काय होतं की सगळ्या 'टार्गेट ऑडियन्स' ला हा संदेश जातो की 'तुम्ही' 'आमच्यापासून' सुरक्षित नाही; आमची तुम्हाला मारून टाकण्याची इच्छा झाली तर जिथे सापडाल तिथे ठार करु. म्हणून तुम्ही आम्हाला सदैव घाबरून, आमच्या पासून सदैव दबून राहण्यातच शहाणपणा आहे.

आता स्मरणशक्तीला जरासा ताण देऊन पहा, हे जे 'जिथे सापडाल तिथे ठार करु' कुठेतरी वाचल्याचं किंवा ऐकल्याचं वाटतंय का? तसं वाटत असेल तर तुमचं बरोबरच आहे, तेच आणि तसंच आहे ते. त्या शिकवणीचा सार्वकालिक संदेश, अशा हत्या करणारे आपल्या कृतीतून व्यवस्थित समजवतात की बघा, तुम्ही आम्हाला जिथे सापडाल तिथे खलास करू. म्हणून आम्हाला घाबरून, दबून रहा. या शिकवणीला कुणाच्यातरी आत्मचरित्रात जेव्हा दैवी उपदेश म्हणून खपवलं जातं तेव्हा वेळीच त्याचा नायनाट न केल्यास त्याचे परिणाम भयंकर महागात पडतात. 

आपल्याकडे एक श्लोक आहे:
अग्नि: शेषं ऋण: शेषं शत्रु: शेषं तथैव च ।
ते पुन: पुन: प्रवर्धेत तस्मात् शेषं न कारयेत् ।।

इथे जिझिया कसा घ्यावा याचा उल्लेख आहे अशा 9:29 क्रमांकाच्या दुसऱ्या एका तथाकथित दैवी उपदेशाला समजून घेणं आवश्यक आहे. यात स्पष्टपणे म्हटलं आहे की ज्याला शत्रू मानलं आहे त्याच्या स्वाभिमानाचा चेंदामेंदा करावा; त्याच्याकडून फक्त एखादा कर वसूल करणे नव्हे तर शत्रूला कायम अपमानित आणि कमकुवत मानसिक स्थितीत ठेवायचं आहे की तुम्हाला हवं तसं त्याला लुटू शकाल, जेव्हा हवा तेव्हा आणि हवा तसा त्याचा अपमान करू शकाल पण त्याच वेळी शत्रूला त्या विरोधात न्याय मागण्याचा हक्कच असू नये. त्याची एकदम हिटलर किंवा स्टालिनच्या गोष्टीतील कोंबडी करून टाका.

हा तथाकथित दैवी उपदेश वाचल्यावर हिंदी सिनेमातल्या एका टिपिकल कथावस्तूची आठवण येते ज्यात बलात्कार होण्यापासून हिरो त्याच्या बहिणीला वाचवतो आणि त्या हाणामारीत बलात्कार करणारा मारला जातो म्हणून त्याचा भाऊ हिरोच्या संपूर्ण  खानदानाला मारून टाकतो. का, तर त्याच्या भावाला हीरोने मारलं म्हणून. म्हणजे त्याचा भाऊ हीरोच्या बहिणीवर बलात्काराचा प्रयत्न करत होता हा अपराध, पाप आहे वगैरे गोष्टींना त्याच्या लेखी शून्य महत्व असतं ― पण आपला भाऊ हीरोने मारला याचा सूड म्हणून त्याच्या पूर्ण खानदानाला ठार करणे हा त्याला न्याय वाटतो. त्याची हीच मानसिकता आहे आणि ही मानसिकता येते तथाकथित दैवी उपदेश क्रमांक 9:29 मधूनच येते. 'उमर का सुलहनामा' म्हणून ओळखला जाणारा एक शांतीकरार (खिक्) याच मानसिकतेचं एक्सटेन्शन आहे ― इब्न कसीर ची तफ़सीर बघितली तर हे पटकन लक्षात येतं. कुणीही शोधून वाचू शकतं, फुकट आहे!

या पार्श्वभूमीवर हे लक्षात घ्या की मारला गेलेला उपरोल्लेखित हसौना नामक अरब तरुण हा दंगलीत सहभागी असताना मारला गेला होता, त्याच्या घरात घुसून त्याला कुणी मारलेलं नव्हतं. हमासने सोडलेल्या क्षेपणास्त्रांचे प्रत्युत्तर इस्राइलने द्यायला सुरुवात केली म्हणून इस्राइली नागरिक असलेल्या अरबांनीच पहिल्यांदा दंगली सुरू केल्या. या दंगलींचा त्रास सामान्य इस्राइली नागरिकांनाच (वाचा: ज्यू) होत होता. म्हणजे आपल्याकडे मिनी-पाकिस्तान असतात तसे तिकडे मिनी-पॅलेस्टाइन आहेत. 

तर, अरबांनीच पहिल्यांदा दंगली सुरू केल्या, त्याचं प्रत्युत्तर इस्राइलने द्यायला सुरुवात केली, त्यात दंगलीत सामील असलेला तो अरब तरुण हसौना मारला गेला ― पण तरी तो दोषी नाही बरं का! तरी त्याच्या मृत्यूचा बदला कशाशी काही संबंध नसलेल्या एका निष्पाप इस्राइली नागरिकाला मारून घेतला जातो आणि त्या हत्येला न्याय म्हटलं जातं तेव्हा त्या विचारांच्या चारित्र्याचे विश्लेषण करून ते समजून घेणं आवश्यक ठरतं. आणि त्याला तथाकथित दैवी शिकवण म्हटलं जातं हा आणखी एक क्रूर विनोदच म्हणायला हवा.

हे सगळं जाणून घेणं आपल्याला का गरजेचं आहे? 

कारण आपण सगळेच यिगल येहोशुआ आहोत. 

अन्याय सहन करणारा, अन्याय करणाऱ्यापेक्षा मोठा गुन्हेगार असतो. 

एक प्रयोग करून पहा, यिगल येहोशुआ यांची हत्या हा अन्याय आहे असं एखाद्या मिश्र ग्रुपात बोलून पहा. याच्यावर प्रतिक्रिया नक्कीच आश्चर्यचकित करणाऱ्या नसतील हे नक्की. अपेक्षितच प्रतिक्रिया असणार आहेत. तुम्हाला इनबॉक्सात गाठून पोस्ट किंवा मेसेज डिलीट करायला सांगणारा एखादा मोदींवर हिंदूंसाठी काहीही न केल्याचा मोदींवर सतत आरोप करणारा कट्टर हिंदुत्ववादीच निघायचा!

आणखी एक, जेक गार्डनरला विसरू नका बरं!

🖋️ मंदार दिलीप जोशी
माघ शु. दशमी, शके १९४३