Wednesday, January 9, 2013

सर्व स्वाभिमानी आणि देशभक्त भारतीय नागरिकांसाठी प्रतिज्ञामी भारताचा नागरिक आणि जगभरातील शांतताप्रिय जनतेचा एक भाग म्हणून अशी प्रतिज्ञा करतो की सरकारपातळीवर काहीही निर्णय झाला तरीही पाकिस्तान या देशाशी संबंधित असलेल्या कुठल्याही खेळाचे सामन्यांचे तिकीटे काढून प्रत्यक्ष दर्शन तर सोडाच, पण प्रक्षेपण आणि संबंधित कार्यक्रम—मग ते भारतीय संघाशी खेळत असले तरी—दूरदर्शन संचावर बघणार नाही, आकाशवाणीवर ऐकणार नाही आणि आंतरजालावर त्यासंबंधी कुठल्याही बातम्या वाचणार नाही किंवा धावसंख्या/गोलसंख्या वगैरे कुणालाही विचारणार नाही.

तसेच पाकिस्तान या देशाचे नागरिक सहभागी होत असलेला कुठलाही चित्रपट, मालिका, संगीताधारित कार्यक्रम बघणार नाही किंवा त्यासंबंधित कुठलीही बातमी वाचणार नाही.

पाकिस्तानी नागरिकांशी जगभरात कुठेही संबंध ठेवणार नाही. कुठल्याही पाकिस्तानी नागरिकाला—मग तो रुग्ण म्हणून समोर आला तरीही—कुठल्याही प्रकारची सेवा पुरवणार नाही.

इतकेच नव्हे तर पाकिस्तानी शिक्षक, शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ, शास्त्रज्ञ, लेखक, वैद्यक वगैरे—म्हणजेच पाकिस्तानचा कुठलाही नागरिक—सहभागी होत असलेल्या कुठल्याही समारंभात/कार्यक्रमात/सभेत सहभागी होणार नाही.