Monday, December 27, 2021

मदर इंडिया - सिनेमा की प्रचारतंत्र?

अजूनही, अजूनही नवा सिनेमा लागला की लॉकडाऊनने कावलेले लोक कधी एकदा जाऊन थेटरात सिनेमा बघतोय असं करतात. मग दीड वर्षापूर्वीच बॉलीवूडला धडा शिकवायची शपथ घेतलेली सोयीस्कर विसरली जाते.

आज थोडं मदर इंडिया सिनेमाकडे नॅरेटिव्हच्या दृष्टीकोनातून बघूया.

Mother India Radha Meets Lala

मेहबूब प्रोडक्शन्सचं बोधचिन्ह डावीकडे बघा, अधिक काही सांगायची गरज नाही. प्रतीके वापरून लोकांच्या मनात द्वेष पेरणी कशी करावी, फॉल्टलाईन्सचा फायदा कसा घ्यावा याचं हे उत्कृष्ठ उदाहरण आहे. यासाठी एकच दृश्य उदाहरणार्थ घेऊया. या दृश्यात गावातला व्यापारी, सावकार "लाला", मदत मागायला आलेल्या गरीब "राधा"कडे वासनांध नजरेने बघतोय. राधा ओलेती, चिखलाने माखलेली दाखवली आहे, थोडक्यात कपडे पूर्ण घातलेले असले, तरी स्त्रीदेहाचा उभार व्यवस्थित दिसेल असं दाखवलं आहे. 

  • या दृश्यातला लाला हा 'लाला' आहे, शेटजी आहे तर त्याने एखाद्या ब्राह्मणासारखी शेंडी का ठेवलेली दाखवली आहे?
  • खांद्यांवर भगवी शाल कशासाठी?
  • दोघांच्या मधे बघा. फोकसमधे नसल्याने नीट दिसत नाही, पण राधाकृष्णाची तसबीर व्यवस्थित दिसते आहे. 

सिनेमाबद्दल जागृती आत्ता आत्ता निर्माण झाली आहे, पण तेव्हा भोळ्या मनांत (gullible minds) काय चित्र निर्माण झालं असेल या गोष्टी पाहून? 

"सावकारी पाश" हे ग्रामीण भागातील सत्य आहेच, पण त्याही पेक्षा शहरी भागातील कारखान्यात काम करणारे कामगारांत जबरदस्त दहशत असलेली "पठाण" नामक एक खाजगी सावकारी करणारी जमात मात्र हिंदी सिनेमावाल्यांना कधी दिसली नसावी. दिसली असणारच, मात्र या जमातीला व्यवस्थित दडवलं गेलं. आता हे पठाण कोण होते हे वेगळं सांगायला नको. त्यांना  कर्जवसूली करायला माणसं ठेवायची आणि कायदेशीरपणे वकील आणि पोलीस घेऊन गरजच पडायची नाही. कर्जाळू कामगारांच्या येण्याजाण्याचा रस्ताही त्यांना ठावूक असायचा आणि तारखेची आठवण करायला किंवा वेळेत न फेडल्यास  कर्ज घेणार्‍यांची गचांडी धरायला तो रस्त्यातच उभा असायचा (काही मराठी चित्रपटांत बघितल्याचं आठवतं, पण तिथेही तो कनवाळू दाखवायचे. आठवा: भावे साहेबांचा बालगंधर्व). 

असं असताना कम्युनिस्टांची लाल चादर पांघरलेल्या या सिनेमातल्या लांडग्यांना पठाण दिसलेच नाहीत, यात काही नवल नाही. किंबहुना, कुणाला ते दिसू नयेत, म्हणूनच लाल चादर पांघरली जायची. 

असेच जुने सिनेमे कधी बघाल, तेव्हा अशा विसंगती दिसतील त्याची नोंद ठेवा. आणि जमल्यास लिहा सुद्धा. 

© मंदार दिलीप जोशी
मार्गशीर्ष कृ अष्टमी, शके १९४३



2 comments:

  1. अशा खूप विसंगती दिसतात दादा, आणि कराचीवूड काय घाण आहे हे व्यवस्थित लक्षात आल्याने बहिष्कार कायमचाच आहे, वेबसिरिजेस मध्येही हीच घाण पसरतेच आहे. ज्यांच्या फक्त अभिनयाची स्तुती करून इतर वेळी विसरून जायचं अशा लोकांना डोक्यावर घेऊन नाचणारे आपलेच लोकं आहेत. या भोळेपणाची फार कीव येते.

    ReplyDelete