Tuesday, October 26, 2021

माझ्यापुरतं सांगायचं तर...

मी झब्बा आणि धोतर नेसलं की कपाळावर गंध लावतोच, पण धोतराऐवजी पायजमा आला तरी मी कपाळावर गंध लावतो. फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट घातली तरी माझ्या कपाळावर गंध असतंच. टीशर्ट-जीन्स घातली तरी कपाळावर गंध लावतोच आणि जीन्सची जागा बरमुडाने घेतली तरी कपाळावर गंध लावतोच. मला ते आवडतं आणि कूल सुद्धा वाटतं, आरशात पाहून एक प्रकारचा आत्मविश्वासही वाटतो. 

पाश्चात्य कपड्यांवर अर्थात वेस्टर्न आउटफिट्सवर कपाळावर गंध लावलेलं शोभून दिसत नाही ही कूल वगैरे दिसण्याच्या प्रेशरमध्ये स्वतःच्या मनाची मी समजूत घालून घेत नाही आणि मन मोडून तडजोड करत नाही.

मुळातच कूल म्हणजे काय हे जाहीरात कंपन्यांना आणि जाहीरातीतल्या मॉडेल्सना मी ठरवू देत नाही कारण एकदा ठरवू दिलं की मी कायम त्याला बळी पडत राहणार आणि एक एक करत आपली धार्मिक चिन्हे 'टाकत' जाणार. पण मी तसं करणार नाही.

हे मी माझ्यापुरतं तरी ठरवलं आहे. 

© मंदार दिलीप जोशी
अश्विन कॄ ६, शके १९४३

1 comment:

  1. विचार आवडले आणि भावले सुद्धा

    ReplyDelete