सोशल मीडियावर, उदाहरणार्थ फेसबुकवर, तुमची एखाद्या व्यावसायिकाची ओळख होते.
त्या व्यक्तीकडून तुम्ही व्यावसायिक कन्सलटेशन घेता―मग ते धंदा, करियर कौंसेलिंग, आर्थिक नियोजन अशा कुठल्याही बाबतीत असेल. पैसे देऊन असो किंवा ओळखीखातर पैसे न घेता असो.
नंतर काही कारणाने तुमचं त्या व्यक्तीशी फिस्कटतं. परिणामत: ती व्यक्ती तुम्हाला किंवा तुम्ही त्या व्यक्तीला अनफ्रेंड करता. तुम्ही फारसा गवगवा करत नाही आणि तो गोष्ट तिथेच सोडून देता. त्या व्यक्तीच्या इतर कमेंट्सकडे दुर्लक्ष करता.
कालांतराने तुमच्या कन्सलटेशनचे तपशील तुमच्या ओळखीसकट अंशतः किंवा पूर्णत्वाने फेसबुकवरच्या एका पोस्टवरील कमेंटमध्ये झळकतात, ते ही पूर्णपणे वेगळ्या संदर्भात, इतरांचे गैरसमज होतील अशा पद्धतीने.
तात्पर्य: फेसबुकवरच्या ओळखीतून जरा जपूनच.
🖊️ मंदार दिलीप जोशी
विजयादशमी, शके १९४८
टीप: काहीही झालं तरी खाजगी संभाषण आणि व्यावसायिक तपशील गुप्त ठेवणारेही अनेक व्यावसायिक आहेतच, तरी असे वैफल्यग्रस्त लोकही अस्तित्वात असल्याने अखंड सावधान असावे हे उत्तम.
