Saturday, October 31, 2026

जैववैविध्य म्हणजे काय रे भाऊ

भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित प्रकल्पासाठी होत/होणार असलेल्या वृक्षतोडीबद्दल वाचताना आणि लिहिताना वनक्षेत्रात जे जैववैविध्य तयार आणि जमा होतं त्याबद्दल जी माहिती होती, त्यात इतक्या लवकर आणि अशी भर पडेल असं वाटलं नव्हतं. 


बऱ्याच महिन्यांनंतर सोसायटीतल्या मागच्या बाजूला उगवलेल्या गुलाबाच्या झाडाला एक फूल आलेलं दिसलं म्हणून तोडूया असा विचार केला, तर त्यावर लांबून बघितल्यावर एक पांढऱ्या डागासारखं काहीतरी दिसलं. नीट जवळ जाऊन पाहिलं तर हे साहेब त्यावर बागडताना दिसले. आम्ही फक्त कोळीष्टके काढताना जे कोळी बघितलेले तेवढंच आमचं ज्ञान त्यामुळे हा काय प्रकार आहे असं गुगलबाबाला फोटोशोध घेऊन विचारलं, तर पुढील माहिती मिळाली:

This is a flower crab spider (specifically from the genus Thomisus, such as the white crab spider, Thomisus spectabilis). 

  • Kingdom: Animalia
  • Phylum: Arthropoda
  • Subphylum: Chelicerata
  • Class: Arachnida
  • Order: Araneae
  • Infraorder: Araneomorphae
  • Family: Thomisidae
  • Genus: Thomisus 
  • Species: T. spectabilis

जर पुण्यासारख्या शहरात काँक्रीटच्या जंगलात सोसायटीच्या तुटपुंज्या जागेत उगवलेल्या गुलाबाच्या रोपावर हा आपण कधीही न बघितलेली कोळ्याची जात आढळत असेल, तर वनक्षेत्रात जे कोट्यवधी प्रकार आढळत असतील आणि ते नष्ट झाल्यावर आपण काय गमावून बसू (आणि आजवर काय गमावलं आहे) त्याची कल्पनाही करवत नाही. 

अनेक वैद्य हे आयुर्वेदिक औषधे एवढी महाग का याचं अधूनमधून विवेचन करत असतात. त्यात एके ठिकाणी वाचनात आलं की काही अगदी निवडक घटक आयात करावे लागतात. आपल्याकडे असाच अनिर्बंध विकास सुरू राहिला तर आपल्याला काही वर्षांनी बहुसंख्य आयुर्वेदिक औषधेच आयात करावी लागतील की काय अशी साधार भीती आहे. 

असो. तर, या साहेबांना बघून पटापट फोटो काढले आणि ते फूल तोडण्याचा बेत रद्द करून म्हटलं, "जा, जी ले अपनी जिंदगी." 😁

©️ मंदार दिलीप जोशी 
अश्विन कृ. ६, शके १९४८
विक्रम संवत २०८३