सांगोवांगीच्या गोष्टींवर अवलंबून न राहता स्वतःच्या अनुभव मांडणारी "कावळा" या विषयावरची एक छोटेखानी लेखमालिका (कावळा: भाग १, कावळा: भाग २)
---------------------
याला मी गंमतीने आजी म्हणतो. आमची काकूआजी २०२३ साली गेली आणि तेव्हापासून हा यायला लागला त्यामुळे. अर्थात कावळा आहे की कावळी आहे कळायला मार्ग नाही.
याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो जिथे खाण्याचं स्टीलचं छोटं भांडं बाल्कनीच्या रेलिंगला अडकवलेलं असतं तिथे येऊन काव काव करत नाही. तो खिडकीपाशीच येतो, तिथे बसतो, आणि मग आत बघत पुकारा चालू करतो. मग मी भांड्यात भात "वाढायचा," मग या आजी तिथे येऊन खाणार. आणि खाताना बघायचं नाही, नाहीतर आजी उडून जाणार.
तळटीपः कावळ्यात आत्मा नसतो माहित आहे, मी फक्त गंमतीने आजी म्हणतो.
© मंदार दिलीप जोशी
गुरुपौर्णिमा, शके १९४८


No comments:
Post a Comment