Saturday, May 7, 2016

वाचन कला

बस किंवा गाडीतून प्रवास करायचा नसून देखील ती वाहने दिसताच कुत्री भो भो भो वॅक् वॅक् वॅक् वॅक् वॅक् वॅक् वॅक् करत त्यांच्या मागे जीव खाउन धावू लागतात.
कुत्री अशी का वागतात या विषयावर संशोधन झाले आहे. वाहने विशिष्ठ वेगाने जवळून गेली असता ती भंजाळतात (disoriented होतात) आणि मग त्या भंजाळण्याच्या स्त्रोतावर हल्ला करतात.

त्याचप्रमाणे, न झेपणारा विषय असेल तर भंजाळून जाऊन, संपूर्ण विषय समजून न घेता, लेख असो किंवा टिप्पणी असो, लेखनातले एक दोन विशिष्ठ शब्द  अथवा शब्दसमूह दिसताच भो भो भो वॅक् वॅक् वॅक् वॅक् वॅक् वॅक् वॅक् करत काही लोक धावून जात असावेत असा संशय आहे.
ऑनलाईन असलं, तरी वाचन ही एक कला असून ती प्रयत्नपूर्वक जोपासावी लागते. वाचेल तो वाचेल हे जरी खरे असले तरी त्यापुढे जाऊन असे म्हणणे संयुक्तिक ठरेल की वाचून समजेल तो वाचेल..

© मंदार दिलीप जोशी
वैशाख शु. १, शके १९३८

Friday, March 18, 2016

माफीवीर गिरीश कुबेर

वैचारिक दारिद्र्याचे मेरुमणी लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर यांचा पुन्हा एकदा निषेध. या भेकड माणसाने पुन्हा शेण खाल्लं. हिंदूंचा द्वेष आणि संबंधित सगळ्या गोष्टींची टिंगल करण्यापासून ते फाशी गेलेला अतिरेकी याकुब मेमनचे समर्थन करण्यापर्यंत मजल गेलेले गिरीश कुबेर आज आणखी घसरले. कधी नव्हे ते भंपक ख्रिस्ती संत मर्डर टेरेसांच्या संतपदाबद्दल टीकात्मक अग्रलेख लिहीला आणि म्हणे कुठल्याशा फादर की कुणाच्यातरी भावना दुखावल्या म्हणून चक्क मागे घेतला. संपादक म्हणून फक्त हिंदूंच्याच भावना दुखावता येतात, बाकीच्यांवर बोललं की मग पार्श्वभागाला पाय लाऊन अग्रलेख मागे घेतला जातो...

...आणि अग्रलेख मागे कसा घेणार हो. व्हायरल झाला तो. इथे देतोय परत.लोकसत्ताचा लेख कधी स्वतःच्या ब्लॉगवर देईन असे वाटले नव्हते, पण तुमची लायकी दाखवायला टाकतो आहे. तेल लावत गेल्या संबंधितांच्या भावना.












तर, माफीवीर लोकसत्ता संपादक गिरीश कुबेर, थू तुमच्यावर.

© मंदार दिलीप जोशी
फाल्गुन शु. १०, शके १९३७

Thursday, March 17, 2016

Secular Disease #1: Libtard Obsessive Compulsive Disorder

L-OCD = Libtard Obsessive Compulsive Disorder.

Sometimes also known as C-OCD or the Congress Obsessive Compulsive Disorder, L-OCD is very similar to the usual run-of-the-mill OCD, being characterised by obsession with RSS accompanied by an undercurrent of fear, thereby resulting in a compulsion to bring RSS into every issue, however unrelated or out of context it may be. This is almost always accompanied the mention of BJP.

For example, the chutney not being sufficiently green can be termed as an RSS or RSS/BJP joint conspiracy to dilute the secular fabric of your dosa/idli/sandwich/whatever.

Warning: This might be accompanied by Embarassistic CongressI Pappunia*

*More on this disease later.

© Mandar Dilip Joshi

Saturday, March 12, 2016

जेव्हा माझ्या कर्जांना (एका बँकरचे गार्‍हाणे)

जेव्हा माझ्या कर्जांना उधळी मुजोर माल्ल्या
माझा न राहतो मी हरवून हा 'सहारा'

काँग्रेस भाळ होते, होती प्रफुल्ल दक्षी
ओढून कर्ज घेते, हे राष्ट्रवादी पक्षी
शरदास सिंचनाच्या नाही मुळी फवारा | जेव्हा माझ्या कर्जांना...

डोळे मिटून घेतो, पण व्याजही फिटेना
हे कर्ज कोट्यावधींचे, लाखांतही चुकेना
देऊन थकलो मी सारखा तुला इशारा | जेव्हा माझ्या कर्जांना...

नोटांस हा बिअरचा, का सांग वास येतो
जिवंत कॅलेंडराचा, नुसताच भास होतो
केव्हा किंगफिशरचा उगवेल सांग तारा | जेव्हा माझ्या कर्जांना...

 © मंदार दिलीप जोशी
फाल्गुन शु. ४, शके १९३७

Wednesday, March 2, 2016

सारे जहां से अच्छा, इशरत जहां हमारा

सारे जहां से अच्छा
इशरत जहां हमारा
हम मोहताज हैं जिसकी
मौत का हमें सहारा

भारत में हों अगर हम,
रहता है दिल रोम में।
समझो फॅसिस्ट हमें भी,
मुसोलिनी बाप हमारा।। सारे...

घोटाला जिसका गहरा,
हमसाया काँग्रेसी का।
वो मंतरी हमारा,
वो पासबाँ हमारा।। सारे...

स्विसबँक में खेलते हैं,
जिसके हज़ारों खाते।
गुलशन है जिसके दम से,
ये जे.एन.यु हमारा।। सारे....

ऐ रोम-ए-नेप-ए-फ्लोरेन्स!
वो दिन है याद तुझको।
जीती जब मैंने दिल्ली,
वो राजीव जब दिल हारा ।। सारे...

मज़हब हमें सिखाता,
मजहब तू बदल देना।
काँगी हैं हम वतन हैं,
पाकीस्ताँ हमारा।। सारे...

केसरी-ओ-मिश्रा-ओ-सिंदीया,
सब मिट गए जहाँ से।
अब तक है मोदी बाक़ी,
नाम-ओ-निशाँ तुम्हारा।। सारे...

कुछ बात है कि हस्ती,
मिटती नहीं है इसकी।
सदियों बनाया दुश्मन,
सी.बी.आय. को तुम्हारा।। सारे..

ऐ 'सोनिया' तेरा पप्पू,
होता नहीं सयाना । 
मालूम कब प्रियांका,
जीते चुनाव हमारा।। सारे...


© मंदार दिलीप जोशी
माघ कृ ८, शके १९३७

Friday, February 5, 2016

टवाळा आवडे विनोद

आज हापिसात एक सॉलिड जोक झाला. जेवणाच्या सुट्टीनंतर मी घातलेला घट्ट स्वेटर काढायचा प्रयत्न करत होतो...तेव्हा


एक भोचक कलीगः अय्या मंदार, तू नक्की काय करतो आहेस? स्वेटरमधे घुसण्याचा प्रयत्न करतो आहेस की त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न? हँ हँ हँ हँ हँ हँ

मी: तू इकडे बघू नको. असं कपडे काढताना बघू नये कुणाकडे.

बाकीचे:  हँ हँ हँ हँ हँ हँ.


--------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
 पौष कृ. १२, शके १९३७
--------------------------------------------------