बस किंवा गाडीतून प्रवास करायचा नसून देखील ती वाहने दिसताच कुत्री भो भो भो वॅक् वॅक् वॅक् वॅक् वॅक् वॅक् वॅक् करत त्यांच्या मागे जीव खाउन धावू लागतात.
कुत्री अशी का वागतात या विषयावर संशोधन झाले आहे. वाहने विशिष्ठ वेगाने जवळून गेली असता ती भंजाळतात (disoriented होतात) आणि मग त्या भंजाळण्याच्या स्त्रोतावर हल्ला करतात.
त्याचप्रमाणे, न झेपणारा विषय असेल तर भंजाळून जाऊन, संपूर्ण विषय समजून न घेता, लेख असो किंवा टिप्पणी असो, लेखनातले एक दोन विशिष्ठ शब्द अथवा शब्दसमूह दिसताच भो भो भो वॅक् वॅक् वॅक् वॅक् वॅक् वॅक् वॅक् करत काही लोक धावून जात असावेत असा संशय आहे.
ऑनलाईन असलं, तरी वाचन ही एक कला असून ती प्रयत्नपूर्वक जोपासावी लागते. वाचेल तो वाचेल हे जरी खरे असले तरी त्यापुढे जाऊन असे म्हणणे संयुक्तिक ठरेल की वाचून समजेल तो वाचेल..
© मंदार दिलीप जोशी
वैशाख शु. १, शके १९३८
No comments:
Post a Comment