[काही लोकांना #त्रागा / मालिकांवरच्या पोस्ट दिसल्या की लगेच "तुम्ही बघता कशाला?" असले अतार्किक प्रश्न घेऊन लोक परत परत हजर होतात. आमच्या वेळेचा कसा सदुपयोग करायचा ते आम्हाला उत्तम समजतं, आणि टीव्ही समोर बसून सगळ्या मालिका बघू लागलो तर नोकरी/व्यवसाय सोडून घरी बसायला लागेल. घरी किंवा शेजारी नुसतं इकडून तिकडे गेलं टीव्ही असलेल्या खोलीतून तरी सगळ्या मालिकेचा फील येतो. एकाच घरात राहताना कान आणि डोळे बंद करुन बसता येत नाही, अगदी दुसरी खोली असेल तरीही. शिवाय, एका मिनीटाची जाहीरात जरी बघितली तरी मालिकेत काय चाललं आहे ते स्पष्ट कळतं. तेव्हा "तुम्ही बघता कशाला?" याला उत्तर एकच, "तुम्ही त्रागा दिसला की त्याच पोस्ट का वाचता? दुर्लक्ष करा!"]
अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणार्या कला क्षेत्रातल्या लोकांनी हे समजून घ्यावं की आम्हाला हे माहीत आहे की आर्थिक गरजा कुणाला चुकल्या नाहीत, शेवटी पोटासाठी करावं लागतं, त्यामुळे तुम्ही फालतू मालिकेत टुकार भूमिका करत असाल तर त्यात गैर काही नाही...पण मग टीका सहन करायला तयार राहावं माणसाने. दुर्लक्ष करता येत नसेल तर काही लोक सरळ ब्लॉक करुन मोकळ्या होतात, तसंही करायला हरकत नाही. अग्गंबाई सासूबाई वगैरे सारख्या भंगार मालिकेत काम केल्यावर काय स्तुतीसुमने उधळायची का लोकांनी तुमच्यावर? एकदा तुम्ही कॅमेर्यासमोर आलात की दिसणार्या आणि ऐकू येणार्या प्रत्येक गोष्टीवर टीका करण्याचा प्रेक्षक म्हणून आम्हाला अधिकार आहे. आम्ही नाटकाची व सिनेमाची तिकिटे, केबलचे पैसे, आणि वीज खर्च करतो.
कलाकार किंवा तत्सम लोक म्हणजे काही सैनिक, वैद्यकीय व्यावसयिक व कर्मचारी, पोलीस बँक कर्मचारी, जीवनावश्यक वस्तूंची ने आण करणारे वाहतुक व्यवसायिक वगैरे नाहीत जीवावर उदार व्हायला. कुणीतरी जीव धोक्यात घालून केलेलं काम आम्ही मनोरंजन म्हणून बघू इतक्या कोत्या आणि असंवेदनशील मानसिकतेचे आम्ही वाटलो का? रसिकांवर कसले उपकार करत आहात तुम्ही? तुम्ही ज्या व्यवसायात राहून पैसा कमावत आहात तोच मुळात लोकाश्रित आहे. लोकांचे उपकार आहेत तुमच्यावर. पैसा फेको तमाशा देखो. तुमच्या मालिका बंद झाल्या तर रसिक दुसरे मार्ग शोधतील (किंबहुना शोधतातच). तुम्ही काहीही तुमचं आयुष्य धोक्यात घालून करत नाही आहात हे, पैसे घेताय त्याचे निर्मात्याकडून. तेव्हा आमच्यासाठी जीवावर उदार होत आहात या गैरसमजातून कलाकारांनी लवकरात लवकर बाहेर आलं तर बरं. या असल्या मालिकांपेक्षा खाली डोंबारी आला तर त्याचा खेळ बघेन मी. तो खरं तर जीव धोक्यात घालतो दोरीवर चालून.
आणखी एक, "तुमच्या कामाचा असा जाहीर पंचनामा केला तर चालेल का?" असा बावळट प्रश्न एके ठिकाणी वाचला. आमचं काम जितक्या लोकांसमोर आम्ही करतो तितक्या लोकांसमोर आमच्या कामाचं नियमित मूल्यमापन होत असतं. आम्ही ऑफिसात काय काम करतो, कसं करतो म्हणजे पद्धत काय, आमच्या कामाचा इतरांवर काय परिणाम होतो याचा दर तीन, सहा, किंवा बारा महिन्यांनी आमच्या ठराविक बॉस समोर मूल्यमापन उर्फ पंचनामा होत असतो. अधुनमधून टोचायला मॅनेजर लोक असतातच. शिवाय कॉलवर क्लायंट आमची जी शाळा घेतो ती वेगळीच. तेव्हा असा बावळट प्रश्न पुन्हा विचारू नका. तेव्हा चूक झाली की किंवा अपेक्षित काम नाही झालं की लोक आम्हाला नावं ठेवतातच. कलाकार म्हणजे कुणीतरी परग्रहावरचे आहात हा समज दूर करा.
बाकी तुमच्या इतर मतांबद्दल निकोलस टालेब यांनी लिहीलेली वाक्ये जशीच्या तशी द्धृत करतो आहे, ती हॉलीवुडच्या कलाकारांबद्दल लिहीली असली तरी ती सगळ्याच कलाकारांना लागू पडतात:
1) To understand why what happens in Hollywood is irrelevant to the rest of humans: 1) How many ACTORs do you have among your friends? 2) How many ACTOR friends do your friends have? Actors rarely mix with real people.
2) Romans banned actors from marrying, even mixing with citizens. Same dynamics in modern times, but self-inflicted: engineers can mix w/gynecologists... actors stay with actors. Look at the funerals of "gens du spectacle".
3) I do not know many industries where people are hired either
a) on looks, or
b) ability to impersonate what one is not.
4) Actors should not be the ones lektchuring the rest of us on ethics & morality. They also have a tendency to conflate virtue and its external manifestation, given that everything in their world is appearance.
5) And for the slow thinkers on the thread, you don't see gynecologists or train engineers lektchuring the rest of the world on virtue. Actors do. Gabish?
6) Remember: actors are trained to not seem stupid.
7) Now a harder questchon: what is the proportion of actors who voted for Hilary Monsanto-Malmaison?
8) OK, let me be blunt. How many professions do you know, other than the ones where physical attributes are essential, where the modus "sleep your way up" prevails?
© मंदार दिलीप जोशी
- एक अत्यंत संतापलेला प्रेक्षक
तळटीपः यातली काही वाक्ये काही मित्रांच्या पोस्ट व टिप्पण्यांतून घेतली आहेत, टंकायचा कंटाळा म्हणून. श्रेय न दिल्यास रागवू नये.