Monday, June 29, 2020

पेंगळ्यांची शाखा फुले (विडंबनः बगळ्यांची माळ फुले)

पेंगळ्यांची शाखा फुले (विडंबनः बगळ्यांची माळ फुले) 

पेंगळ्यांची शाखा फुले सोनियाच्या अंगणात
राडा आपुला स्मरशी काय भूतकाळात

जमती कवटीत बीन थेंब पावसाचे
झोल्या मंत्र्यास खुले रान वादळाचे
आश्वासन देत फिरतो मग कोकणात
पेंगळ्यांची शाखा फुले सोनियाच्या अंगणात

त्या गाठी, त्या गोष्टी, खंडणीच्या (प)खाली
मांडवली तव घरटी भर दिवसा झाली
पर्यवसान होईल का विकल कोथळ्यात
पेंगळ्यांची शाखा फुले सोनियाच्या अंगणात

हातांसह धनुष्याची गाठ बांधताना
घड्याळाचे दोन काटे मिळुनि फिरवताना
उसापरी मिळुनि सारे सतत पिळतात
पेंगळ्यांची शाखा फुले सोनियाच्या अंगणात

तू गेलीस तोडुनि ती माळ, सर्व धागे
मळमळणे पेंविनचे अन् गंजका, खंजीर उरे मागे
सलते ती तडफड का कधी तुझ्या पक्षात?

पेंगळ्यांची शाखा फुले सोनियाच्या अंगणात
राडा आपुला स्मरशी काय भूतकाळात

🖋️कवी: सा. रा. शांत
मंदार दिलीप जोशी  

टळटीप: ताल, लय आणि सूर हे जुळवून आणण्यासाठी पेंग्विन बाबा की जय.

2 comments: