Monday, June 29, 2020

भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी लाईव्ह येऊन गातो, तू मला शिकविली गीते
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
भय इथले संपत नाही

ते झरे चंद्र शरदाचे, ती धरती हिरवी माया
शेवाळ्यावर घसरलो आपण, सर्दीत नाक पुसाया
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
भय इथले संपत नाही

तो बोल मंद हळवासा, पार डोक्यावरूनि गेला 
कोरोना प्रादुर्भावातील, जणु कोमट पाणी प्याला
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
भय इथले संपत नाही

नारळात कवटी अवघी, किंचाळत दुःख कुणाचे
हे पडता पडत नाही, सरकार तिघाडीचे
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
भय इथले संपत नाही
मी लाईव्ह येऊन गातो, तू मला शिकविली गीते
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते

🖋️ कवी डिसग्रेस
मंदार दिलीप जोशी
आषाढ शु. ९, शके १९४२

2 comments:

  1. खूप दिवसांनी खरे विडंबन काव्य वाचले !

    ReplyDelete