Thursday, May 4, 2017

वामपंथी भारत विखंडन ३ - महागलेली देशभक्ती आणि चवताळलेला चीन

या मालिकेखाली हा लेख असला, तरी या भागाला जगत् विखंडन असेही म्हणता येईल.

 चवताळलेल्या चीन बद्दल आधी बोलूया. गेल्या दिवाळीच्या आधीची गोष्ट आहे. चीनने हाफीज सईदला अतिरेकी घोषित करण्याच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या मार्गात अडथळा निर्माण केला आणि कधी नव्हे तो अवघा भारत देश पेटून उठला. अंहं, म्हणजे चीनी वकिलातीवर मोर्चे, घोषणा वगैरे नाही. तर अत्यंत विधायक पद्धतीने जनताजनार्दनाने निषेध व्यक्त केला. तो म्हणजे चीनी वस्तूंवर बहिष्कार. बहिष्काराचे हे अस्त्र आधी स्नॅपडील वगैरेच्या माध्यमातून तावूनसुलाखून बाहेर पडलं होतं, आता त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर करावी अशी मोहीम सोशल मिडियातून सुरू झाली. चीनी मालाने बाजारपेठेत इतक्या खोलवर मुसंडी मारलेली आहे की संपूर्ण बहिष्कार ही अत्यंत अवघड होती. म्हणून मग दिवाळीच्या खरेदीतून तरी चीनी वस्तूंना लोकांनी हद्दपार करावे असे ट्रेन्ड सोशल मिडीयावर सुरु झाले आणि त्याचा परिणामही दिसू लागला.

दिवाळीत वापरले जाणारे कंदील, पणत्या, सजावटीचे सामान इत्यादी वस्तू चीनी नाहीत हे पाहून खरेदी केल्या जाऊ लागल्या. या वस्तू एक तर गेल्या वर्षीच्याच वापरायला लोक प्राधान्य देऊ लागले, किंवा रस्त्यावर विकायला बसलेल्या विक्रेत्यांकडून स्थानिक आणि ग्रामीण पातळीवर तयार झालेल्या वस्तू लोक विकत घेऊ लागले. सामान्य जनतेच्या मनातून आलेल्या या बहिष्काराची कल्पना इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल अशी कुणालाच अपेक्षा नव्हती, मात्र तो झाला हे खरे. इतका, की चीनला याची दखल घेत या बहिष्काराचा परिणाम भारतातल्या चीनच्या गुंतवणुकीवर होईल अशी चिंतावजा धमकी द्यावी लागली. मात्र या धमकीला न भीक घालता भारतीय सामान्य जनतेने हा बहिष्कार गेल्या दिवाळीपुरता का होईना यशस्वी करुन दाखवला. आम्ही काय खरेदी करावे, यावर कुणाचे नियंत्रण असूच शकत नाही, त्यामुळे चरफडत बसण्यापलिकडे चीनकडे दुसरा काहीच पर्याय उरला नाही.

चीन का चवताळला ते आपण बघितलं. आता देशभक्ती कशी महागते ते पाहूया. वर म्हटल्याप्रमाणे चीनी मालाने भारतीय बाजारपेठेत आपण कल्पनाही करु शकणार नाही अशा रीतीने खोलवर प्रवेश केला आहे. आपल्याला अर्थात ही गोष्ट माहित आहे की चीनचा हा प्रभाव त्याच्या वस्तूंच्या किंमतीवर प्रामुख्याने अवलंबून आहे. कुठलीही वस्तू किंवा सेवा यांची किंमतीमधला एक प्रमुख घटक म्हणजे त्यात गुंतलेल्या कर्मचार्‍यांचा पगार किंवा मेहनताना. कर्मचार्‍यांच्या वेतनाच्या प्रमाणात अनेक वस्तू किंवा सेवांची किंमत कमी-जास्त  होते.

इथे दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे एखादी वस्तू स्थानिक पातळीवर बनवणे महाग पडू लागले की ती बाहेर स्वस्तात बनवून घ्यावी असा विचार बळावतो. दुसरं म्हणजे आपल्यापेक्षा स्वस्तात बाहेर वस्तू बनवून मिळते हे कळलं की स्थानिक पातळीवर वस्तू बनवणे महाग आहे हे जाणवायला लागते. लक्षात घ्या एक म्हणजे "महाग पडू लागणे" आणि दुसरं म्हणजे "स्वस्त पर्याय" मिळणे.

जगात क्रमांक एकवर असणारी देशाची लोकसंख्या आणि एकाच विचारसरणीच्या पक्षाचा एकछत्री आणि मुख्य म्हणजे निरंकुश अंमल, आणि म्हणूनच प्रत्येक विरोध निर्दयपणे चिरडून काढता येण्याची क्षमता चीनकडे खचितच होती आणि आहे. वर उल्लेख केलेल्या दोन्ही गोष्टी चीनने केल्या. म्हणजे चीनने स्वस्त पर्याय उपलब्ध करुन दिलेच (मग दर्जा गेला तेल लावत, ते इकडच्या समजे पर्यंत चीन खूप खोलवर घुसला होता) पण म्हणजेच एखाद्या देशात वस्तू बनवणं महाग होईल अशी परिस्थिती निर्माण करणे हे अत्यंत कुशलतेने केलं.  इतर देशात वस्तू बनवणं महाग कसं करायचं? तर त्या देशातल्या कामगारांना आणि त्यातही प्रामुख्याने कामगार नेत्यांना हाताशी धरून विळा-हातोडावाल्या झेंड्याखाली संघटित होऊन "शोषक" मालकांच्या विरोधात लढायला फूस द्यायची. यात कामगारांनीही

लाल चीन आणि आणि त्याच्या आधी म्हणजे रशियाच्या विघटनापूर्वी अखंड सोवियत रशिया असताना क्रेमलिनचे मिंधे असलेल्या कामगार नेत्यांनी कधी न्याय्य मागण्या करुन तेवढंच पदरात पाडून घेण्यात समाधान मानलं नाही. मागण्या या कायम अवाजवी, अवास्तव, आणि मालकाला न परवडणार्‍या अशा ठेवत गेले आणि मागण्या कधीही संपू दिल्या नाहीत. मग त्या मान्य झाल्या नाहीत की संप केले गेले. हळू हळू एक तर कामगारांवर अती खर्च होत असल्यामुळे आणि अशा संपांमुळे कंपन्या चालू ठेवणं आणि त्यांत वस्तू बनवणं आणि विकणं हे उद्योजकांसाठी आणि विकत घेणं हे ग्राहकांसाठी "महाग पडू लागलं". परिणामस्वरूप त्या वस्तूंचे ग्राहक स्वस्त पर्याय शोधू लागणं साहजिकच म्हणायला हवं.

हेच धोरण चित्रपटांत राबवले गेले. पूर्वीचे सिनेमे आठवा - त्यांत मिलमालक आणि उद्योजक रक्तपिपासू, दुष्ट, संकुचित मनोवृत्तीचे आणि आप्पलपोटे दाखवले जायचे आणि आणि नायक असायचे गरीब पण मनाने उदार. मग ते कारखान्यात संप का घडवून आणेनात, आणि कामगारांना खायचे वांदे का होईनात, व्हिलन मात्र मालक! (त्यात हमखास नायकाचे प्रेम मिलमालकाच्या मुलीबरोबर किंवा बहिणीबरोबर जमायचे आणि त्याला विरोध करणारे मिलमालक अर्थातच व्हिलन. असो. हे विषयांतर झाले. हा विषय पुढच्या भागात नक्की). अगदी कोपर्‍यावरच्या किराणा किंवा कुठल्याही दुकानाचा मालक किंवा व्यापारी सुद्धा मारवाडी पोषाखातला अत्यंत स्थूल वा बेढब दिसणारा, काहीतरी सेठ वगैरे नाव असलेला, मुलींवर वाईट नजर असलेला (त्यात नायिका किंवा नायकाची बहीण हमखास), आणि लोकांना लुटायला तत्पर असा पूर्वीच्या सिनेमातून दाखवला जायचा.

मग दिवाळीच्या कंदिल आणि पणत्यांपासून वीजेवर चालणार्‍या उपकरणांपर्यंत आणि मुलांच्या खेळण्यांपासून ते रोजच्या वापरातल्या झाडू आणि सुपलीपर्यंत सगळ्या वस्तू या "बाहेरून" विकत घेणे हेच आर्थिक गणितात बसत असेल तर मुळातच गरीब असलेल्या या देशात चीनी वस्तूंनी हातपाय पसरणे यात काहीही आश्चर्य नाही. मग कोण खिशाला चाट लावून देशातच कारखाना काढून कामगार संघटनांच्या कटकटी सहन करत बसेल? दिवाळीत एका दुकानात एका चीनी खेळण्याची किंमत आणि त्यातल्या त्यात स्वस्त भारतीय खेळण्याची किंमत विचारली, तर दोन्हीत किमान दोनशे रुपयांचा फरक होता.

आहे की नाही देशभक्ती महाग?

© मंदार दिलीप जोशी
वैशाख शु. ९, शके १९३९

Tuesday, May 2, 2017

बाहुबली द कन्क्लुजन - एकदा तरी नक्की पहावी अशी भव्यकलाकृती

मी दक्षिणेतले डब केलेले चित्रपट फारसे बघायला जात नाही. फारसे कशाला, बघतच नाही. चित्रपटगृहातच नव्हे तर घरी सुद्धा नाही. रोजा हा शेवटचा डब केलेला सिनेमा चित्रपटगॄहात जाऊन बघितलेला आठवतो. याला मुरड घालून बघितलेले दोन चित्रपट म्हणजे अर्थातच बाहुबली द बिगिनिंग आणि गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला बाहुबली द कन्क्लुजन.

पहिला भाग बाहुबली द बिगिनिंग काही कारणांमुळे चित्रपटगृहात बघता आला नाही, पण मुलांच्या कृपेने अगणित वेळा टीव्हीवर पारायणे झालेली आहेत. पण टीव्हीवर पाहण्यात मजा नाही हे लक्षात आलेच होते.
चित्रपट निर्मात्यांनी रामायण, महाभारत आणि इतर इतिहासातल्या अनेक घटना आणि घटनाक्रम कथानकात वापरल्या आहेत. निवर्तलेल्या राजाच्या सद्वर्तनी आणि महपराक्रमी मुलाला सत्ता न मिळता अनीती आणि कुमार्गावर चालणार्‍या त्याच्या भावाला मिळणे, त्या सन्मार्गी मुलाने सत्तात्यागच नव्हे तर राजप्रासादाचा सुद्धा त्याग केल्यावरही त्याच्या जीवावर उठलेला अन्यायी भाऊ आणि त्याचे सल्लागार मंडळ, राजघराण्यातली कटकारस्थाने, ऐन वेळी चुकीच्या व्यक्तीचा आदेश ऐकून न्याय्य पक्षावर अन्याय करावा लागणं यात झालेला कटप्पाचा भीष्माचार्य, आणि बैलांच्या शिंगांना लावलेले पेटते पलीते अशा अनेक ऐतिहासिक संदर्भ असलेल्या गोष्टी या चित्रपटात आहेत.

पहिल्या भागात जाणवलेली आणि दुसर्‍या भागात विशेषकरुन ठसठशीतपणे समोर आलेली उल्लेखनीय बाब म्हणजे चित्रपट हे संपुर्णपणे एका हिंदू साम्राज्यावर बेतलेला असून त्यात ठायी ठायी असलेल्या हिंदू देवतांच्या मूर्ती किंवा त्यांची आणि सणांची ठसठशीत प्रतीके व गाणी. या गोष्टी निश्चितपणे डोळे आणि जीवाला सुखावून जातात. याचं विशेष कारण म्हणजे आजवर हिंदीत बनलेले चित्रपट हे प्रामुख्याने धर्मांध आणि कत्तलखोर मुघल राज्यकर्त्यांची प्रतिमा व्हाईटवॉश करण्यासाठीच बनवले गेलेले होते. इतकंच नव्हे, तर नायक, नायिका आणि त्यांचं आख्खं खानदान हिंदू असले तरी चित्रपटात किमान एक कौवाली असणे किंवा प्रेमगीत असल्यास मौला, बुल्ला, खुदा किंवा तत्सम शब्दांची रेलचेल असणे, सिनेमात किमान एक सहृदय शांतीदूत वगैरे अशा गोष्टी पाहून वीट आलेला होता. त्या पार्श्वभूमीवर वर उल्लेख केल्याप्रमाणे हिंदू दैवते व प्रतीके यांची ठसठशीत उपस्थिती दाखवल्याबद्दल संबंधितांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. नाही म्हणायला पहिल्या भागात असलम खान नामक शस्त्रविक्रेत्याची एक व्यक्तिरेखा होती पण त्यातही कटप्पा त्याच्या शस्त्रांचा पाणउतारा करताना दाखवला आहे.

आणखी एक सुखावणारी गोष्ट म्हणजे माहिष्मती साम्राज्याच्या 'राष्ट्रगीता' पासून ते सैन्याला दिल्या जाणार्‍या आदेशांपर्यंत अनेक ठिकाणी संस्कृत शब्दांचा केलेला वापर होय. सातत्याने उर्दू शब्द ऐकून किटलेल्या कानांनी आणि विटलेल्या मनांनी या बदलाचं निश्चितच जोरदार स्वागत केलं यात काही आश्चर्य नाही.
किती जणांच्या लक्षात आलं माहित नाही, पण बैलांच्या शिंगांना पेटते पलीते लावण्याची ही शिवाजी महाराजांची ही एकच कल्पना दिग्दर्शक राजामौलीने वापरलेली नाही. कुंतल देशाच्या राणीचा भाऊ कुमारवर्मामधे शौर्याची भावना उत्पन्न करुन त्याला पराक्रम गाजवायला भाग पाडणारा बाहुबली आणि मदत मागायला आलेल्या बुंदेल नरेश छत्रसालाला स्वतःचं स्थान निर्माण करायला प्रोत्साहन देणारे आपले महाराज यात मला विलक्षण साम्य आढळलं.

चित्रपटातील स्त्रियांचे केलेले चित्रण ही विशेष आवडलेली बाब. सम्राज्याचा गाडा यशस्वीपणे हाकणारी शिवगामिनी तर आहेच, पण कधी संकटसमयी तलवार तर कधी प्रियकरासाठी मोकळा सोडलेला केशसंभार अशी चतुरस्र देवसेनाही आहे. देवसेना स्त्रियांशी वावगं वागणाऱ्या सेनापतीची स्वतः बोटं छाटते, त्यासाठी नवऱ्याची वाट बघत बसत नाही. पहिल्या भागातल्या हिरविणीला अवंतिकाला मात्र या भागात फारसं काम नाही.

दोषच सांगायचे तर दक्षिणेतल्या चित्रपटातील साहसदृश्यात अतिशयोक्ती या शब्दालाही लाजवेल अशी दृश्ये असतात तशी या चित्रपटातही आहेत. बैलांची काही दृश्ये ही VFXच्या दृष्टीने जरा गडबड वाटतात, पण तरीही अंगावर रोमांच यावेत अशी आहेत. बोट हवेतून जाते हे स्वप्नदृष्य (dream sequence) आहे हे नंतर जाणवतं, तिथे संपादन (एडीटींग) दोष असावा असं वाटतं. अगदी रजनीकांतला सात जन्मात जमणार नाहीत अशी अतिशयोक्तीपूर्ण साहसदृश्ये शेवटाकडे आहेत. पण याबाबत माझं जरा वेगळं मत आहे. एक तर हे कथानक काल्पनिक आहे, त्याला कुठल्याही ऐतिहासिक सत्य परिस्थितीचा काडीचाही आधार नाही. शिवाय इतक्या मोठ्या पटलावर या गोष्टी आरामात खपून जातात. आपल्याला चमत्कृतीपूर्ण हॅरी पॉटर चालतो, तर अतिशयोक्तीपूर्ण बाहुबली का चालू नये?

या चित्रपटाच्या निमित्ताने एतद्देशीय राजे व संस्कृती निर्भीडपणे दाखवणारे चित्रपट बनायला सुरवात झाली तर सोन्याहून पिवळं असं म्हणता येईल. खानावळ आणि हीन दर्जाच्या घराणेशाहीने ग्रासलेल्या हिंदीत बनतील अशी अजिबात आशा नाही. पण जे कुणी ते निर्माण करेल, ते करताना या चित्रपटातले दोष हेरून ते दूर करण्याची प्रक्रियाही सातत्याने झाली पाहीजे.

- (भयानक कम्युनल चित्रपट चाहता) © मंदार दिलीप जोशी

तळटीपः चित्रपटाशी करण जोहरचं असलेलं नातं, VFX स्टुडीओ आणि पैसे कुणाकुणाचे लागले आहेत या संबंधातले टोमणे आधीच गृहित धरुन सांगतो, की त्यांचे पैसे वापरुन हिंदू संस्कृती चित्रपटातून दिसत असेल तर मी म्हणतो वापरा बिंधास. काय?

Thursday, March 9, 2017

गुरमेहर से सुहाना तक, सैफुल्ला के वालिद से होते हुए

कुछ लोगों के मन में उठा प्रश्न सटीक है - पहले भी मुस्लिम गायक हिंदू देवदेवताओं के स्तुतीपर गीत गा चुके हैं, तो फिर सुहाना के ऐसा करने पर बवाल क्यों?

मेरा आकलन यह है कि जब जब जो जो होना है, तब तब सो सो होता है.  अर्थात एम.एस.एम यानी मुख्यधारा के प्रसारमाध्यम एवं सोशल मिडिया पे कोई भी ट्रेन्ड यूंही नहीं चलता.  इसे अलग परिपेक्ष्य में देखना पडता है.  यहां कुछ भी समय से पहले, नसीब से ज्यादा, और कारण के अभाव में नहीं होता.

कुछ दिनो पहले ही गुरमेहर कौर की ट्विट से उठा बवाल आपको ज्ञात ही होगा.  उसने ट्विट में कहा था की मेरे पिता को पाकिस्तान ने नहीं मारा, युद्ध ने मारा.  इस बात पर राष्ट्रवादी गुस्से हो कर उसपे टूट पडे और मुख्यधारा के प्रसारमाध्यम एवं सोशल मिडिया पर मंडरा रहे असुर प्रकृति को अवसर मिल गया की कैसे देश मे असहिष्णुता एवं विचारस्वातंत्र्य का दमन हो रहा है.  किंतु जब वे भी जानते थे और आप-हम भी जानते हैं कि यह केवल अपने विचारों को प्रकट करने का विषय नहीं था.  अगर आप किसी पक्ष या व्यक्ती को कोसें तो वह विचारस्वातंत्र्य के अंतर्गत आ सकता है.  लेकिन गुरमेहर के इस ट्वीट का अन्वयार्थ यह था कि आज तक भारत के जितने भी सैनिक एवं और लोग मारे गये,  उन सब की मृत्यू का भारत एक देश के रूप में उतना ही उत्तरदायी है जितना पाकिस्तान.  अतः भारत को शांती प्रक्रिया को आगे ही बढाना चाहीये.  अब यह बात कितनी बचकानी एवं झूठी है यह तो आपको बताने की आवश्यकता नहीं है.  चूंकि अब मुख्यधारा के प्रसारमाध्यमों का दबदबा उतना नहीं रहा, इस बात की जमकर और विभिन्न कोणों से आलोचना हुई.  गुरमेहर एक लडकी है और केवल २० वर्ष आयु की है यह कुतर्क भी उसे बचा न पाये.  विरोध इतका बढ गया कि गुरमेहर को उसे किसीने बलात्कार की धमकी दी है ऐसा बोलना पडा.  इससे उसके विरोध में बोलने वालों में ही फूट पड गयी, और कईं लोग केवल इस धमकी वे विषय में क्यों न हो, गुरमेहर की तरफ हो लिये.  आखिर एक लडकी की इज्जत का सवाल था न! लेकिन बाद में जब यह ज्ञात हुआ कि उसे बलात्कार की धमकी देने वाला उसी के लिबरल गिरोह वाले किसी विद्यार्थी संघटन का सदस्य था, तो यह बात जैसे उछाली गयी थी उससे दोगुने गति गायब भी हो गयी.  फिर अखिल भारतीय विद्यार्थी संघटन के सदस्योंने ही पुलिस  में केस दर्ज करवाया.

खैर, आप को जो तथ्य पहले से ज्ञात हैं उन्हें फिरसे आप के सामने रखने के कारण क्षमाप्रार्थी हूं, परंतु सुहाना का दमन उछाले जाने के कारण तक पहुंचना है तो हमें गुरमेहर के विषय को थोडा देखना होगा इस कारण यह इतिहास लेखन करना पडा.  तो सुहाना का किस्सा क्या है? सुहाना सईद ने एक कन्नडा रियलिटी शो में एक हिंदू भक्तीगीत गाया था.  मैं इस गायक से अनभिज्ञ हूं लेकिन इस विषय में अधिक जानकारी लेने हेतु उसके एक दो गाने सुने.  भाषा तो समझ नही आयी परंतु यह ज्ञात हो गया की यह एक प्रसिद्ध गायिका है और लोगों को इसके गाने पसंद आते हैं.  तो सुहाना ने एक रियलिटी शो में एक हिंदू भक्तीगीत गाया और इसके पश्चात शुरू हुआ इस्लामियों की ओर से उसपे धमकीयोंका सत्र.  उसके विरोध में वही पुराने तर्क सुनने मिले की इन लोगों को ऐसा नहीं करना चाहिये क्योंकि देखो इस्लाम कितना अच्छा एवं शांतीपूर्ण धर्म है इत्यादि.  लेकिन सबसे बडा कुतर्क यह देखा गया की अगर गुरमेहर को अपनी बात रखने का अधिकार है तो सुहाना सईद को भी उसके जो मन मे आये वह गाने का अधिकार है. 



यूं तो महंमद रफी से लेकर कईं मुसलमान गायकों ने, इतनी पुरानी बातें छोड़िए , आजकल के गायकों ने भी हिंदू भक्तीगीत गाए हैं, तब तो कोई बवाल खडा नहीं हुआ, तो अब क्यों इसका उत्तर आप को अब तक संभवतः मिल गया होगा.  गुरमेहर मामले मे ठंडे किये गये मुख्यधारा माध्यक तथा सोशल मिडिया में लिबरल भाडे के टट्टूओं को गुरमेहर के नाम पर लगे धब्बे को धोने का अवसर चाहिये था, तो फिर वह क्या करते.  सारी दलीलें तो समाप्त हो चुकी थीं.  तो अचानक उनकी नजर एवं कान पडे सुहाना के गाए हुए हिंदू भक्ती संगीत पर.  

लिबरल गिरोह का मस्तिष्क टेढा ही चलने के कारण उन्होंने गुरमेहर की विषैले फल समान बात को, जो विष अब देश के कुछ विश्वविद्यालयों के कईं युवाओं मे फैल चुका है, उसे सुहाना के हिंदू भक्तीगीत गाने के अधिकार के समान स्तर पर लाकर खडा कर दिया, की देखो देशवासियों तुम वहां भी गलत थे यहां भी गलत हो.  दोनो ही विचारस्वातंत्र्य का ही हिस्सा हैं.  तो फिर काहे को सुहाना को गरिया रहे हो? क्या अधिकार है तुम्हें? हालाकि यह बात सुहाना को धमकाने वाले इस्लामी कट्टरपंथियों को कही गयी थी, परंतु इसका लक्ष्य गुरमेहर को विरोध करने वाले ही थे.  कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना.  

देखा आपने कैसे छल तथा चतुराई से दोनो लडकियों को एवं उनके विषयों को समक़क्ष लाकर खडा कर दिया गया?

और हां, अगर आप की सहानुभूति आयसिस के आतंकी सैफुल्ला के बाप से होकर सुहाना सईद की ओर बहने पर आमादा है, तो आप को इसका स्मरण करा दूं कि उसकी गायकी पैसे के लिये एवं कोई प्रतियोगिता मे विजयी होने हेतू है, कोई भगवान के प्रति श्रद्धा नहीं उमड पडी उसकी.

कुछ समझे?

© मंदार दिलीप जोशी
माघ शु. १३, शके १९३८