Showing posts with label दैनंदिनी. Show all posts
Showing posts with label दैनंदिनी. Show all posts

Tuesday, September 8, 2020

गतानुगतिको लोकः

१९९७ साली कॅलिफोर्नियात नेथन जॉनर नामक एका १४ वर्षीय शालेय विद्यार्थ्याने एक पेटीशन तयार केलं: Ban Dihydrogen Monoxide.

त्याचं म्हणणं होतं की हे रसायन अतिशय खतरनाक असून अनेक कारखान्यांच्या औद्योगिक कचऱ्यात अर्थात वेस्ट प्रॉडक्ट मध्ये त्याचा समावेश होतो. याचा आण्विक ऊर्जा प्रकल्पात याचा उपयोग केला जातो. आग विझवायलाही हे रसायन वापरतात. पण हेच कर्करोगाने ग्रस्त पेशींतही आढळते. हृदय आणि मूत्रपिंडाच्या विकारांनी ग्रस्त रुग्णांत याचे आधिक्य आढळते. हेच धोकादायक रसायन प्रक्रिया केलेल्या अन्न प्रक्रिया उद्योगात, औषधांत, आणि सौंदर्यप्रसाधनांत याचा सर्रास वापर होतो. म्हणून यावर बंदी घालायलाच हवी.

नेथनच्या या पेटीशनवर अक्षरशः हजारो लोकांनी सह्या केल्या. सह्या करणाऱ्यांत अनेक विद्यापीठात शिकवणारे प्राध्यापक, पीएचडी धारक, बुद्धिजीवी विचारवंत, आणि सिनेटर (लोकप्रतिनिधीही) सुद्धा सामील होते.

हा प्रयोग त्या मुलाने फक्त हे दाखवण्यासाठी केला होता की लोक कसे विचार न करता आणि विषयाची माहिती न घेता आलेल्या प्रत्येक प्रचाराच्या लोंढ्यात वाहून जातात.

नेथन जॉनर खोटं बोलत होता का? नाही. त्याने केलेला प्रत्येक दावा खरा होता. 

पण ते खतरनाक रसायन नेमकं काय होतं? डाईहायड्रोजन मोनोऑक्साइड अर्थात H2O अर्थात आपलं सरळ साधं पाणी!

म्हणून प्रत्येक बातमीच्या प्रत्येक शीर्षकामागे अर्थात हेडलाईनमागे धावण्याआधी हा विचार करा ― आपल्याला त्या विषयातलं किती कळतं? तुम्हाला असलेली माहिती किती खरी आहे? ― हा विचार केला नाहीत, तर तुमच्यावर डाईहायड्रोजन मोनोऑक्साइडवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांच्या रांगेत उभं राहिलेलं आणि नंतर पोपट झालेला बघण्याची वेळ येईल.

©️ मंदार दिलीप जोशी

मूळ हिंदी: ©️ डॉ राजीव मिश्रा

Monday, August 17, 2020

बॉलिवुडचे तरुण(!) 'तुर्क', काँग्रेस, आणि आंतरराष्ट्रीय लागेबांधे

आज आमिर खान सबंधातली एक बातमी वाचली आणि गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर मधली एक बातमी आठवली.

काँग्रेस पक्ष अर्थात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने तुर्कस्थानात इस्तंबुल इथं आपलं एक कार्यालय उघडल्याची ती बातमी होती. ही माहिती 'इंडियन ओव्हरसीज काँग्रेस' नावाच्या गटातर्फे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे तुर्कीश माध्यमांना देण्यात आली. 'इंडियन ओव्हरसीज काँग्रेस' हा भारताबाहेर राहणाऱ्या काँग्रेस समर्थकांचा एक गट आहे आणि पूर्वी स्व. राजीव गांधींचे खास असलेले आणि आताच राहुल गांधींचे अत्यंत विश्वासू निकटवर्तीय 'हुआ तो हुआ' फेम सॅम पित्रोदा ह्या गटाचे अध्यक्ष आहेत. या कार्यालयाची धुरा मोहोम्मद युसूफ खान नामक एक इसम सांभाळेल. काँग्रेस पक्षाचे सदस्य असलेल्या या मोहोम्मद युसूफ खान या व्यक्तीबद्दल मात्र आंतरजालावर फारशी माहिती मिळत नाही.


हे कार्यालय उघडण्यामागे काँग्रेस पक्षाचा हेतू सांगताना प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं की भारत व तुर्कस्थान यांच्यातले द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत व्हावेत या करता काँग्रेस पक्षाने हा पुढाकार घेतला आहे. यातली गोम अशी की असं करण्याचा राजमार्ग अर्थात भारतीय सरकारची अधिकृत वकीलात तिथे असताना काँग्रेस पक्षाचे आंतरराष्ट्रीय पिल्लू असलेल्या इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या या कार्यालयाचं औचित्य काय?

काही तथ्ये लक्षात घेतली तर काँग्रेस पक्षाची ही कृती किती धोकादायक आहे हे लक्षात येईल. तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांना इस्लामी जगताचा खलिफा बनण्याची सुरवातीपासूनक्सह स्वप्न पडत आली आहेत आणि त्यांनी तुर्कस्थानला मजहबी कट्टरतेच्या दिशेने नेण्यात एकही कसर बाकी ठेवलेली नाही. तुर्कस्थानचे पहिले राष्ट्राध्यक्ष केमाल पाशा अतातुर्क यांनी केलेल्या सुधारणांच्या बरोबर उलट दिशेला तुर्कस्थानला नेण्याचा त्यांनी चंगच बांधलेला आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये काश्मीरातून कलम ३७० निष्प्रभ केल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने बहुसंख्येने हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे सांगत योग्य विधाने केली. मात्र राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांच्या नेतृत्वाखालील तुर्कस्थानने मात्र भारताला या मुद्द्यावर विरोध केला.

राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांची ही पहिलीच खोडी नव्हती. या आधी २०१७ साली एप्रिल ३० ते १ मे या कालावधीत भारत दौऱ्यावर असताना काश्मीर प्रश्नावर बहुपक्षीय चर्चा व्हावी असे विधान करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. यात लक्षणीय बाब अशी की २००२ साली राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळताना मात्र त्यांनी काश्मीर प्रश्न शिमला कराराअनुसार द्विपक्षीय चर्चेनेच सोडवला जावा अशी भूमिका घेतली होती. अर्थात पाकिस्तान ज्याप्रमाणे काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पटलावर मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो त्याच प्रमाणे तुर्कस्थानच्या ग्रीसशी असलेल्या वादात ग्रीस सायप्रस बाबत तेच करत असतो ही पार्श्वभूमी त्या भूमिकेमागे होती. पण हा यु टर्न भारतासाठी आश्चर्यकारक असल्याने त्यावेळी भारताकडून या विधानाचा स्पष्ट शब्दात निषेध नोंदवण्यात आला होता व काश्मीर प्रश्न हा द्विपक्षीय मामला असल्याचे भारताने ठामपणे पुन्हा सांगितले होते.

अवांतर: याच दौऱ्यात एर्डोगन महाशयांना जामिया मिलिया इस्लामीया विद्यापीठातर्फे मानद पदवी प्रदान करण्यात आली, आणि तेव्हा त्यांनी तुर्कीश भाषेत भाषण केले होते.

इतर इस्लामिक देश - जरा सुधारणा करतो - अनेक अरब देश राष्ट्रहिताकडे डोळा ठेऊन भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यास प्राधान्य देत असताना इस्लामी जगताचे नेतृव करण्याची स्वप्ने बघणारा तुर्कस्थान आणि पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खानने शब्द टाकला म्हणून इस्लामी जिहादी विचार पसरवणाऱ्या झाकीर नाईकला आश्रय देणारा मलेशिया हे मजहबी कट्टरतेकडे झुकलेले देश मात्र काश्मीर प्रश्नावर सातत्याने इस्लामी दहशतवादाचा कारखाना असलेल्या पाकिस्तानला पाठिंबा देताना दिसतात.  हाच झाकीर नाईक राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांची उघडपणे इस्लामची तळी उचलल्या बद्दल तोंड फाटेस्तोवर स्तुती करतो.आता तुर्कस्थान, मलेशिया आणि पाकिस्तानच्या महाआघाडीत आता ओमानही आपली सुन्नी कट्टरता पोसायला सामील झाला आहे. राजकीय पाठिंबा इथवर ही गोष्ट थांबत नाही. भारताने एर्डोगन पाठिंबा सेट असलेल्या टर्किश संघटनांकडून काश्मीर व केरळमधल्या कट्टरतावादी इस्लामी संघटनांना पुरवला जाणारा पैसा या बाबतीत अनेकदा निषेध नोंदवलेला आहे.

अवांतर: हे लिहीत असतानाच अरब देश भारताशी मित्रत्वाचे संबंध ठेवण्यास उत्सुक आहेत हे दर्शवणारी एक आश्वासक बातमी आली. बहारीनमध्ये गणपतीच्या मूर्तीची नासधूस केल्याच्या आरोपावरुन एका बुरखाधारी महिलेवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. एर्डोगन मजहबी कट्टरतेची खुर्ची आपल्याकडे खेचून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न का करत आहे हे देखील अशा घटनांतून मिळणार्‍या संकेतांमधून  कळते. 

या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसने तुर्कस्थानात आपलं कार्यालय उघडणं हे निव्वळ संशयास्पदच ठरत नाही तर सरळ सरळ देशविरोधी भूमिका ठरते. पण मनमोहन सिंग पंतप्रधान आणि प्रत्यक्षात घटनाबाह्य सत्ताकेंद्र सोनिया गांधी अशी व्यवस्था राबवणाऱ्या काँग्रेसने अधिकृत भारतीय वकीलात असताना त्याला वळसा घालून वेगळं कार्यालय उघडण्यात खरं तर काहीच आश्चर्य नव्हे. कायम भारताच्या हिताला बाधा पोहोचेल अशी विधाने व कृती करणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून ऑटोमन साम्राज्याच्या दिशेने जायची इच्छा बाळगणाऱ्या मजहबी कट्टर एर्डोगन यांच्या देशात वेगळे कार्यालय उघडणे हे काँग्रेसच्या बाबतीत नैसर्गिकच म्हणायला हवे.

अवांतर: २०१९ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७४व्या सर्वसाधारण सभेच्या वेळी न्यू यॉर्क पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान, मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद आणि आपले उत्सवमूर्ती एर्डोगन हे भेटले आणि या भेटीत त्यांच्यात 'इस्लामोफोबिया' शी लढायला एक टीव्ही चॅनल सुरू करण्यावर एकमत झालं.

आता आमिर खानच्या बातमीकडे वळूया.

बॉलिवूड आणि त्याला पोसणाऱ्या पाकिस्तानी अंडरवर्ल्डचे संबंध आता काही गुपित राहिलेले नाहीत. तथापि इतर कट्टर मजहबी देश आणि बॉलिवूड यांच्यातल्या संबंधांबाबत फारशी माहिती उजेडात येत नाही. गेलाबाजार पीके सिनेमात भगवान शंकरांच्या बाबतीत खोडसाळपणा करणाऱ्या, हिंदू देवळांच्या बाबतीत डोस पाजणारा, आणि एकंदर हिंदू धर्माबद्दल यथेच्छ गरळ ओकणारा आमिर खान हज यात्रेला जाऊन तिथे विविध देशातील मौलवींची गळाभेट घेताना फोटो चमकवतो त्याला प्रसिद्धी मिळते, पण ते तेवढंच. न्यू इअर पार्टी करून साजरे करण्याचे खूळ भारतात पुरेपुर असताना एकेकाळी उदारमतवादी व प्रगत होऊ बघणारा तुर्कस्थान हा बॉलिवुडमधल्या मंडळींच्या आवडत्या देशांपैकी एक देश आहे. आजही तिथे अनेक नाईटक्लब आहेत. अशाच एका नाईटक्लबात ख्रिस्ती नवीन वर्षाच्या स्वागत पार्टीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात झालेल्या गोळीबारात बॉलिवूडचे चित्रपट निर्माते अबिस रिझवी आणि त्यांची मैत्रीण खुशी शहा हे मृत्युमुखी पडल्याचे वृत्त वाचलं आणि पहिल्यांदा बॉलिवूडच्या टर्किश कनेक्शनकडे लक्ष गेलं.

तर आमिर खान सबंधातली ती बातमी कोणती? तर फॉरेस्ट गम्प या टॉम हँक्स अभिनित हॉलिवूडच्या प्रसिद्ध चित्रपटाची नक्कल असलेल्या लालसिंग चढ्ढा या आपल्या सिनेमाचे शेवटचे काही चित्रीकरण आटपण्यासाठी आमिर खान तुर्कस्थानात होता. ही संधी साधत आमिरने १५ ऑगस्ट रोजी आपली द्वितीय हिंदू पत्नी किरण राव हिच्यासह राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांची पत्नी इमिन एर्डोगन यांची हुबेर मॅन्शन या त्यांच्या अध्यक्षीय प्रासादात भेट घेतली. आपल्या पानी फाउंडेशन या आपल्या एनजीओच्या दुष्काळ निवारण व पाणी संवर्धनाच्या क्षेत्रातल्या कामाची माहिती देण्यासाठी ही भेट होती असे समजते. श्रीमती एर्डोगन यांनी आमिर खानची तो आपल्या चित्रपटांमधून 'सामाजिक प्रश्नांची' धाडसी मांडणी [courageous handling of social problems] (!) केल्याबद्दल स्तुती केली.

ही भेट इथली साधी सरळ असणार असे समजण्याचे काहीच कारण नाही. कारण आपल्या नव-ऑटोमन धोरणानुसार चालणाऱ्या तुर्कस्थानने दक्षिण आशियातल्या मुसलमानांत आपला प्रभाव वाढवायला सुरवात केली आहे. आधी उल्लेख केल्याप्रमाणे राष्ट्राध्यक्ष एर्डोगन हे स्वतःला गैर-अरब इस्लामी जगताचा खलिफा किंवा सम्राट म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. याच धोरणाचा भाग म्हणून मलेशिया आणि पाकिस्तानशी संधान बांधलं असून या देशांच्या मदतीने दक्षिण आशिया व प्रामुख्याने भारतीय मुसलमानांना लक्ष्य करून तिथं आपलं कट्टर इस्लामी प्रभावक्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. आमिर खान व एर्डोगन पत्नीची भेट ही या परिप्रेक्ष्यात बघितली पाहिजे.

एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा अशीच परिस्थिती या खानावळीची असली तरी पाकिस्तानला गुड नेबर अर्थात चांगला शेजारी म्हणणारा शाहरुख खान आणि उघड गुंडासारखी वागणूक ठेऊन ती झाकायला बिइंग ह्युमन काढणारा हरणमाऱ्या सलमान खान यांच्यापेक्षा भारतीयांच्याच जीवावर कोट्यवधी कमावून मग २०१५ साली बायकोला भारतात असुरक्षित वाटतं असं साळसूद विधान करणारा आणि दक्षिण आशियाई देशांत इस्लामी कट्टरतेचा प्रभाव वाढवू बघणाऱ्या एर्डोगन यांच्या पत्नीची भेट घेणारा आमिर खान हा जास्त धोकादायक वाटतो.

ही सगळी माहिती आणि बातम्या अर्थातच उघड आहेत, म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये आहेत, तरी राष्ट्रीय महत्वाच्या प्रश्नांपेक्षा बॉलिवूडच्या चाळ्यांना अधिक प्राधान्य देणाऱ्या जनतेला त्याचं महत्व आणि धोक्याची जाणीव झालेली दिसत नाही. आज एका नटाच्या संशयास्पद मृत्यूने पेटून उठणाऱ्या त्याच्या चाहत्यांनी आणि तो कोण होता याची अचानक जाणीव झालेल्या इतरांनी बॉलिवूडमधली घराणेशाही, नेपोटीझम, वगैरेंत यथेच्छ डुंबून झाल्यावर त्याच्याकडे कसलेसे स्वामित्व हक्क म्हणजेच पेटंट होते आणि ते चोरले गेले वगैरे जागृती आली. हे प्रकरण आणि जे या मृत्यूस कारणीभूत ठरले आहेत किंवा यात गुंतले आहेत असे जे आरोप होत आहेत ते बघता एक-दोन संशयास्पद मृत्यू आणि बॉलिवूडच्या ताऱ्यांचा पाकिस्तानी अंडरवर्ल्डशी संबंध इतका आपल्या माहितीचा परीघ मर्यादित न ठेवता देशविरोधी शक्तींशी बॉलिवूडचे आंतरराष्ट्रीय संबंध या विरोधात व्यापक जनजागृती होण्याची आवश्यकता आहे.

या परिप्रेक्ष्यात बघितल्यास काँग्रेस पक्षाचे तुर्कस्थानात वेगळे कार्यालय उघडणे आणि तुर्कस्थानच्या मजहबी कट्टर राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीशी आमिर खानच्या अहो रुपम अहो ध्वनी थाटाच्या गप्पा या एकटीदुकटी घटना उरत नाही, तर एका मोठ्या सुनियोजित आणि दीर्घकाळ चालणाऱ्या भारत आणि हिंदूद्वेषी राजकारणाचा एक भाग असल्याचं स्पष्ट होतं.

मात्र काँग्रेसच्या वळचणीला जाणाऱ्या नवनिधर्मांध पक्षांच्या लक्षात हे दुवे आलेले तरी दिसत नाहीत किंवा लक्षात येऊनही दुर्लक्ष केलं जातं आहे. ही बाब अशा पक्षांच्या अस्तित्वासाठी ही धोक्याची घंटा आहे हे नक्की. पण तो विषय वेगळा. 

चीनी व्हायरसमुळे उद्भवलेल्या नव्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज अनेक लोक अनावश्यक गोष्टींचा त्याग करत असताना आपणही अशी यादी तयार करून अशा अनावश्यकच नव्हे तर राष्ट्रविघातक गोष्टींना अंगावर बसलेल्या माशीप्रमाणे झटकून टाकणे आणि शक्य झाल्यास ठेचणे आवश्यक आहे.

© मंदार दिलीप जोशी
श्रावण कृ १३, शके १९४२


Monday, August 3, 2020

सहज सुचलं म्हणून - अखंड सावधान रहावे

प्रतिभाहीन महत्वाकांक्षा हिंसक असते, आपल्या जीवनप्रवासात जिथे जिथे जाते तिथल्या वातावरणालाही दूषित करत जाते. विलक्षण प्रतिभेचे धनी असलेले लोक तिचे नेहमी लक्ष्य ठरत राहणार.

तुम्ही सेलिब्रिटी झालात, किंवा कोट्यावधी संपत्तीचे धनी झालात तरी आर्थिक व्यवहार स्वतःकडेच ठेवा. नेट बँकिंग, एटीएम/क्रेडिट कार्ड, ऑनलाईन शॉपिंग यातलं मला काहीही कळत नाही किंवा त्यामार्गे व्यवहार करायचा कंटाळा येतो या सबबी चालणार नाहीत. शेअर्स वगैरेंचे व्यवहार ब्रोकरच्या डोक्यावर टाकून निश्चित राहू नका, स्वतः शिकून घ्या आणि मगच इतरांना जबाबदारी द्या आणि त्यावर लक्ष ठेवा; नपेक्षा करू नका. अगदी प्रेम आणि लग्न करतानाही विचार करण्याचा अवयव हा कमरेखाली नसून मानेच्यावर आहे हे लक्षात ठेवा. तुमच्या हुशारीवर भुलल्याचे दाखवणारी प्रत्येक व्यक्ती आणखी बरंच काही मनात ठेवून असू शकते. ओरबडणारी आणि कुरतडणारी माणसं अवतीभोवती जमतील असे वागू नका.

A chain is as strong as it's weakest link and a democracy is as firm as it's corruptest leaders. त्यामळे अखंड सावधान असावे.

©️ मंदार दिलीप जोशी
श्रावण पौर्णिमा, शके १९४२

Tuesday, July 14, 2020

केप फियर: तिटकाऱ्याची परिसीमा

Cape Fear नावाचा इंग्रजी सिनेमा आहे. त्यात बलात्काराच्या गुन्ह्याखाली १४ वर्ष शिक्षा भोगून आलेला मॅक्स हा त्याच्या वकीलाच्या मागे लागतो. खटल्या दरम्यान वकिलाने काही पुरावे दडवल्याने त्याची शिक्षा कमी होऊ शकणार असते ती झालेली नसते. कदाचित मॅक्स निर्दोष सुटू शकला असता ते ही अर्थातच होऊ शकलेलं नसतं.  

तुरुंगात वकिली शिकलेल्या मॅक्सच्या मनात यामुळे त्याच्या सॅम बावडेन या वकिलाबद्दल इतका द्वेष भरलेला असतो की तो त्याच्या व त्याच्या कुटुंबियांच्या आणि आप्तस्वकीयांच्या मागे अत्यंत भयानकपणे लागतो. 

मॅक्स म्हणजे रॉबर्ट डी निरोची संवादफेक इतकी प्रभावी आहे की आपण अनेकदा डोकं धरून बसतो. आपल्या छातीतली धडधड शेवटपर्यंत थांबत नाही. सॅम इतका बोलतो, इतका बोलतो की अगदी चित्रपटाच्या शेवटी मॅक्स केडी बोटीबरोबर जखडला गेल्याने नदीत ओढला जातो त्या शेवटच्या क्षणापर्यंत तो सतत बोलत, गरळ ओकत असतो. 

हा कधी एकदाचा मरतो आणि याची कारस्थाने थांबतात आणि याचं बोलणं बंद होतं असं आपल्याला वाटत राहतं. 


Robert De Niro in White Shirt and Cap With Nick Nolte in Cape Fear ...

रॉबर्ट डी निरोच्या अफलातून अभिनयासाठी आणि अप्रतिम दिग्दर्शनासाठी हा सिनेमा एकदा तरी नक्की बघा.


🖋️ मंदार दिलीप जोशी
🎞️ चित्रपट रसास्वादक, 📗 पुणे ग्रीनकार्ड होल्डर 


Monday, July 13, 2020

देवाचिये द्वारी गुदमरे जीव

खूप पूर्वी 'दी ओमेन' नावाचा एक इंग्रजी हॉरर सिनेमा बघितला होता. त्यात जन्माला आल्यावर थोड्याच वेळात बाळ मृत झाल्याने हॉस्पिटलचा फादर त्या बाळाच्या वडिलांना म्हणजे रोबर्टला गुप्तपणे दुसरंच बाळ त्याचंच आहे असं त्याच्या बायकोला म्हणजे कॅथरीनला भासवत दत्तक घ्यायला लावतो. ते बाळ म्हणजे डेमियन (संपूर्ण कथा नेटवर उपलब्ध आहे म्हणून इतकंच सांगतो की डेमियन हा अँटीख्राईस्ट/माणूस नसलेला/सैतान/वगैरे असतो). 

डेमियनला एकदा रॉबर्ट आणि कॅथरीन त्याला चर्चमध्ये घेऊन जायला म्हणून निघतात. जसेजसे ते चर्चच्या जवळ येतात तसतसा डेमियन अधिकाधिक अस्वस्थ होऊ लागतो आणि शेवटी तो इतका हिंसक होतो की त्याला परत घरी घेऊन जावं लागतं.

आज ग्रेगरी पेकचा एक दुसरा सिनेमा बघताना हा सिनेमा सहज आठवला. अगदी सहज.

https://youtu.be/LO3KlIShoHo

देवाचिये द्वारी गुदमरे जीव
दिशा चुकलेल्या मनुष्याचा

🖋️ मंदार दिलीप जोशी
🎞️ चित्रपट रसस्वादक, 📗 पुणे ग्रीन कार्ड होल्डर

Friday, July 10, 2020

विकास दुबेच्या निमित्ताने

विकास दुबे अमुक पक्षाचा समर्थक आणि अमुक जातीचा आहे म्हणून त्याला मारणार नाहीत असा दावा करणारे आता त्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी ठोकल्यावर म्हणत आहेत की त्याने तोंड उघडू नये म्हणून मारलं. अशी डबल ढोलकी सगळीकडे आहेत.

मला सांगा, असं आजवर किती वेळा झालंय की कुख्यात गुंड किंवा गुन्हेगार कोर्टात उभा राहिला आणि त्याच्या साक्षीने नेते मंडळी तुरुंगात गेली आहेत? शून्य!

तेलगीला विसरलात का? नार्को टेस्टमध्ये ज्या कुणाचं नाव घेतलं होतं त्याने तो गेला का आत? अबू सालेम ने नावे तरी घेतली का? हे तर गुन्हेगारी आणि खंडणीखोरीचा दैदिप्यमान इतिहास असलेलं उत्तर प्रदेश आहे जे आता कुठे योगीजींच्या ताब्यात आलंय.

हिंदू डॉन वगैरे ठीक आहे पण यातून दोन प्रश्न उद्भवतात: (१) आजवर त्याने हिंदुत्वासाठी काय केलं?
(२) पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत होतेच कशी? असं करणाऱ्या कुणाचीही अशीच अवस्था व्हायला हवी. (गंमत अशी की हिंदू डॉन नेहमी आपल्याच लोकांचे शोषण करतो तर म्लेंच्छ डॉन आपल्या लोकांचा जास्तीत जास्त फायदा आणि काफिरांचे शोषण होईल असे बघतो. त्यामुळे हा मुद्दाही निकालात निघतो. पण तो विषय जरासा वेगळा आणि मोठा आहे, पुन्हा केव्हातरी.)

सर्वांना सारखा न्याय हवा हे मान्य. पण तो हिंदू होता म्हणून मारला, ब्राह्मण होता म्हणून मारला अशी बकवास करायची हौस असेल तर त्यांनी लवकर मानसोपचार घ्यावेत.

गुन्हेगारांच्या मागच्या खऱ्या चेहऱ्यांचा एन्काऊंटर झाला पाहिजे किंवा ते पकडले गेले पाहिजेत वगैरे बरोबर आहे पण आधी हे लक्षात घ्या की या खऱ्या चेहऱ्यांना आपणच निवडून देतो आणि योग्यतेपेक्षा कितीतरी मोठं करतो. मूल्यांपेक्षा व्यक्तीला अधिक महत्व देतो. मग यांच्या नावावर साधी एक चारचाकी गाडी नसते पण संपूर्ण राज्याला वेठीला धरण्याइतके उपद्रवमूल्य ते नक्कीच बाळगून असतात आणि खरोखर प्रामाणिक व काम करणाऱ्या माणसांना जातीवरून, शरीरयष्टीवरून, घरातल्या महिलांवरून टोमणे मारून आणि इतर सर्व मार्गांनी टोचून टोचून हैराण करतात. याला लोकच जबाबदार आहेत.

🖋️ मंदार दिलीप जोशी
📃 रोखठोक
आषाढ कृ ५, शके १९४२

Friday, June 26, 2020

युवराजांच्या पणजोबांचे 'उद्योग' आणि चीन

आज चीनबद्दल बोलताना आपण नेहरूंना दोष देतो आणि त्यावर काँग्रेसी चवताळताना दिसतात. 

प्रख्यात लेखक भैरप्पा यांच्या आवरण कादंबरीत एक सुंदर वाक्य आहे त्या वाक्याचा उत्तरार्ध आजच्या कोंग्रेसींना बरोब्बर लागू ठरतो. भैरप्पा आवरणच्या प्रस्तावनेत् म्हणतात., "मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्यांशी नातं जोडून आपण त्यांचेच वारसदार या भावनेत आपण अडकणार असू तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारी स्विकारावी लागेल". आवरणमध्ये मांडलेला हा मुद्दा किती यथार्थ आहे हे आपल्याला रोजच्या जीवनात सतत जाणवते, विषेशत: राजकीय घडामोडींचे विश्लेषण करताना. आधी इंग्रजांनी आणि मग नेहरूप्रणित समाजवादाने प्रभावित लोकांनी आपल्या लोकांचे केलेले ब्रेनवॉशींग किती खोलवर भिनले आहे आणि आपले सध्याचे (अ)राजकारणी आणि संभावित निधर्मीवादी, मार्क्सवादी, साम्यवादी, आणि निर्भीड (!) व निष्पक्ष (!!) पत्रकार देखील हेच धोरण कसे राबवत आहेत हेच "आवरण" वाचताना आपल्याला ठायी ठायी आठवत राहतं. इथे पु. ल. देशपांडेही आठवतात. त्यांच्या म्हैस कथेत, "बसच्या धक्क्यामुळे बहुतेक मंडळी 'होय होय होय होय, नाय नाय नाय नाय', म्हणजे साधारणत: भारताच्या परराष्ट्रीय धोरणासारखं..." हे वाक्य तुम्हाला आठवत असेलच. 

या अनुषंगाने नेहरूंच्या चुकांचा पाढा आज वाचला जाणार असेल तर ते योग्यच आहे. भोगविलासी, अप्रामाणिक, व अकार्यक्षम माणूस सर्वोच्च निर्णयस्थानी असल्याचा परिणाम फक्त परराष्ट्र धोरणाचा बट्ट्याबोळ होण्यापुरता एवढाच मर्यादित नसतो. नेहरूंकडे बहुमत होते. सर्व जनतेचा विश्वास होता. देशाची उद्योग धोरणे काय असावीत हे त्यांच्या हातात होते. त्यांनी जाणीवपूर्वक बेंगरूळ समाजवादाचीकास धरली आणि भारतातल्या खाजगी उद्योगांचा गळा घोटायचा अव्यापारेषू व्यापार केला. सबकुछ सरकार का असे बिनडोक आणि घातक धोरण अवलंबले.

भारतात उद्योजकांची कमतरता कधीच नव्हती.  अगदी चाणक्याच्या काळापूर्वीपासून शून्यातून अफाट पैसे मिळवणारे उद्योजक भारताने पाहिले आहेत. जुन्यापद्धतीच्या व्यापारात, औद्योगिक क्रांती झाल्यावर नव्या उत्पादनाच्या व्यापारात भारताने अनेक कल्पक, प्रतिभावान व्यावसायिक घडवले. बिर्ला, टाटा हे पहिल्या महायुद्धाच्या काळात घडलेले उद्योजक आहेत. पण नेहरूंच्या भोंगळ धोरणाप्रमाणे उद्योजक हे रक्तपिपासू, दुष्ट, स्वार्थी लोक असे रंगवले गेले. उलट उद्योगपती मात्र कपाळावर गंध लावणारे, मारवाडी पोषाखातले, स्थूल, सेठ धरमदास वगैरे सूचक नावे असणारे व्हिलन, गोरगरीबांना लुटणारे असेच दाखवले जायचे.
 
पण हे अत्यंत घातक धोरण होते. सरकारने उद्योग चालवले खरे पण त्यामुळे ना गरीबांचे भले झाले ना सरकारला पैसे मिळाले. समस्त बाबू लोकांचे उखळ मात्र पांढरे झाले. अत्यंत भ्रष्ट, नगण्य उत्पादनक्षमता असलेले अनेक पांढरे हत्ती जन्माला घालून भारताची परिस्थिती अधिकच खालावण्याला हे समाजवादी धोरण जबाबदार आहे.  त्याकरता नेहरू हा एकमेव माणूस आणि त्याचे चमचे जबाबदार आहेत.  नेहरु कन्येने हेच धोरण आणखी चार पावले पुढे नेऊन आणखी वाटोळे केले. त्यात चीनने युनियनबाजीला प्रोत्साहन देऊन उद्योगांची जी वाट लावली ती रोखण्याचा कुठलाही प्रयत्न नेहरू संस्कृतीतल्या काँग्रेस कडून झाला नाही. 

जुन्या भारतात फोन सेवा, बँक सेवा, वीज ही काय दर्जाची होती हे एकदा आठवून पहा. आज बीएसएनएलच्या पतनावर नक्राश्रू ढाळणार्‍या लालभाईंना हे सांगा. यामुळेच आपण समस्त जगाच्या कित्येक दशके मागे फेकलो गेलो आहोत.

कितीतरी उद्योजकांना जाचक धोरणांपायी सिंगापूर, थायलंड वा अन्य देशात उद्योग न्यावे लागले. तिथे ते यशस्वीही झाले पण त्यात नुकसान झाले ते भारताचेच .

भारतात अत्यंत अतर्क्य कायदे करून उद्योगांच्या गळ्याला नख लावण्याचे प्रकार झाले आहेत. परकीय चलनावर अतिरेकी निर्बंध, कंपनीने किती फायदा करावा ह्यावर निर्बंध, परकीय गुंतवणूकीवर अत्यंत जाचक निर्बंध - ह्या सगळ्यामुळे आपले अतोनात नुकसान झालेले आहे.

नेहरुच्या समाजवादामुळे पाया भक्कम झाला असे म्हणणे म्हणजे बिन लादेनने विमानाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन बिल्डिंग उडवून नव्या इमारतींचापाया भक्कम केला म्हणण्यासारखे हास्यास्पद आहे.

होते ते उद्योग नष्ट करुन त्याजागी पांढरे हत्ती बनवून देशाच्या कमकुवत आर्थिक स्थितीला अधिकच खिळखिळी बनवण्याचे कधीही समर्थन करता येणार नाही.

ह्याकरता लोकांचा नेहरूंवर रोष असेल तर त्यात आश्चर्य वाटायला नको. त्यात काँग्रेसप्रणित राजीव गांधी फाउंडेशनने थेट चीनकडून देणग्या स्वीकारल्याचे आज उघड होत असताना कोंग्रेसच्या युवराजांना नेहरूंच्या पापांपासून लांब पळता येणारच नाही.

✒️ © मंदार दिलीप जोशी (🗒️ संपादित)
आषाढ शु. ५/६, शके १९४२

Friday, May 29, 2020

दुसरा पुलवामा हल्ला आणि काही निरीक्षणे

काल पुलवामा इथेच आणखी एक दहशतवादी हल्ला लष्कराने उधळून लावला. 

४० जवान गमावलेल्या या आधी झालेल्या हल्ल्याला एक वर्ष होऊन गेलेलं आहे तो अजूनही आपल्या स्मरणात ताजा आहे. कारण तो झाला होता. यात काही वेगळं नाही, कारण सर्वसाधारण मानवी स्वभावाचा एक भाग असा आहे की एखादे संकट ओढवले तर त्याच्या स्मृती मनात कोरल्या जातात आणि जी संकटे आपल्या कळत नकळत टाळली जातात त्यांना आपले मन विस्मृतीच्या कप्प्यात ढकलते आणि त्या भोवताली घडणार्‍या घटनांना महत्त्व दिले जात नाही. मात्र प्रत्येक घटना जोडून बघितली तर ती टळलेली संकटे घडण्यामागे किती भानगडी दडलेल्या आहेत हे लक्षात येतं. 

अधिक खोलात जाण्याआधी काल नेमकं काय घडलं ते थोडक्यात पाहूया. तब्बल ६० किलो हून अधिक आयईडी स्फोटके भरलेली मोटार उडवून देऊन 'पुलवामा'सारखा भीषण दहशतवादी हल्ला घडवण्याचा मोठा कट सुरक्षा दलांनी गुरुवारी उधळला (काही ठिकाणी हा उल्लेख ४५ किलो आहे पण हे प्रमाणही कमी नाही व त्याने घटनेचे गांभीर्यही कमी होत नाही). याचा व्हिडिओ आपण बघितला असेलच, सहज उपलब्ध आहे. स्फोटकांच्या वजनावरुन साधारणतः सर्वसामान्य जनतेला त्याची तीव्रता कळत नाही. पण तूलना केली तर पटकन लक्षात येतं. ६० किलो स्फोटके काय हाहा:कार घडवू शकतात हे समजून घेण्याकरता या संदर्भात एक उदाहरण पाहूया. आंतरजालावर शोध घेतला तर आपल्याला सहज ही माहिती मिळू शकेल की ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे वॉरहेड म्हणजे स्फोटके असलेला भाग हा २०० किलोचा असतो. या कार मधली स्फोटके जवळजवळ त्याच्या एक तृतियांश होती. आता क्षणभर थांबून विचार करा. ६०+ किलो स्फोटके. लष्कराच्या सुमारे पन्नासएक जवानांना घेऊन जाणार्‍या एखाद्या बसवर किंवा इतर साधारण वाहनावर याचा काय परिणाम झाला असता याचा विचार करा. मागचा पुलवामा हल्ला आठवून बघा. आता आलं ध्यानात?


आपल्या जबरदस्त सैन्याने हा हल्ला उधळून लावताना निव्वळ एक दहशतवादी हल्ला टाळलेला नाही, तर एक मोठा लष्करी कारवाई देखील टाळलेली आहे. मागच्या वेळी बालाकोट प्रतिहल्ला करुन पाकीस्तानची जिरवून खरोखर 'करुन दाखवणार्‍या' केंद्र सरकारकडून त्याहून तीव्र आणि कितीतरी पटीने मोठ्या स्वरुपाची प्रतिशोधात्मक कारवाई केली जावी म्हणून दबाव आला असता आणि ते एरवी योग्यही झालं असतं, पण संपूर्ण जगासहित भारतही चीनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी झुंजत असताना या कारवाईचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामाजिक जीवनावर होणारे परिणाम अजिबात परवड्ण्यासारखे ठरले नसते आणि ठरणार नाहीत. अर्थात पाकिस्तानही कोरोनाबाधित आहेच, पण अस्मानी आदेश असताना ते सदसद्विवेक बुद्धीने वागतील ही अपेक्षा ठेवणे म्हणजे घोर मूर्खपणा आहे. शिवाय चीनच्या सीमेवरील कुरापती आणि अचानक धूमजाव करुन सामंजस्याचे नाटक करणे या घडामोडीही दुर्लक्षित करुन चालणार नाहीत. भारताने चीनसमोर लष्करी आणि राजकीय कणखरता दाखवल्याने नरम पडल्याचा देखावा करणारा चीन स्वस्थ बसला असेल असं अजिबात नाही. भारत-चीन सीमेवरुन भारतीय सैन्यबळ आणि जगाचं लक्ष भारताच्या पश्चिम सीमेकडे वळवून भारताला कोंडीत पकडण्यासाठी त्यांनी पाकिस्तानला "छू" केलं असल्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही. 

आता काही थेट गोष्टी या हल्ल्याच्या परिप्येक्ष्यात बघू:

एकः
आणखी एक  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गेल्या साधारण महिनाभरात केलेल्या काही ट्वीट्स पहा. त्या अशा अर्थाच्या होत्या की "पाकिस्तान भारतात दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे खोटे आरोप भारत करत आहे. पाकिस्तानवर बलप्रयोग करण्याचे भारत कारण शोधत असून असे निमित्त भारत स्वतःच्याच भूमीत एक खोटा हल्ला घडवून आणण्याची योजना आखत आहे". असे खोटारडे आरोप करणार्‍या इम्रान खानच्या एक नव्हे तर तब्बल चार ट्वीट्स सापडल्या. इतक्या वेळा बोंब ठोकण्यामागचे कारण उघड आहे. पाकिस्तान पुलवामा येथे नव्याने हल्ला घडवून आणण्याची योजना खूप पूर्वीपासून आखत होता आणि आपण त्या गावचेच नाही असं जगासमोर भासवण्याचा तो केविलवाणा प्रयत्न होता. दुर्दैवाने जगात मूर्खांचा आणि भारतात घरभेद्यांचा आणि एकंदरच कुठेही लिबरलांचा तुटवडा नसल्याने अनेकांचा त्यावर विश्वासही बसला असता. 

इम्रान खानच्या ट्विट्स

दोन:
काही दिवसांपूर्वी आम्ही काही मित्रमंडळी साकेत गोखले नामक एका इसमाने केलेल्या एका ट्वीट बद्दल एका ग्रूपवर बोलत होत. या इसमाने १३ मे रोजी एक ट्विट केलं होतं त्यात लष्करी तपासणी नाक्यावर वारंवार इशारे देऊनही न थांबून गाडी तशीच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार्‍या एका २५ वर्षीय इसमाला काश्मीरमधल्या बुडगाम येथे भारतीय लष्कराने गोळी घालून ठार मारलं असा उल्लेख केला होता. साकेत गोखलेने ट्विटमध्ये 'आता जगातील सर्वात मोठी लोकशाही ट्रॅफिकचे नियम मोडले म्हणुन जनतेला गोळ्या घालत आहे' अशी मखलाशी केलेली होती.  ट्रॅफिकचे नियम मोडणं आणि काश्मीरमध्ये तपासणी नाक्यावर न थांबता वाहन तसेच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणे यातला फरक गोखले साहेबांना कळत नसावा असं नाही, पण या निमित्ताने दहशतवादी हल्ला करायची पूर्वतयारी किंवा सराव म्हणून ज्या घटनेकडे बघता येईल त्या घटनेला या ट्विटमधून ट्रॅफिक नियमांचे साधं उल्लंघन या सदराखाली किरकोळीत काढण्याचा प्रयत्न केला होता. या इसमाने रिट्वीट केलेली एक ट्वीटही इथे देतो आहे. किती जबरदस्त वातावरणनिर्मितीची तयारी असते पहा. तपासणी नाक्यांचा अदमास घेण्याचा प्रयत्न करणारी असू शकेल अशी ही घटना १३ मेला घडते आणि २८ मेला ६०+ किलो स्फोटकांनी भरलेली गाडी लष्कराने उडवून देत आणखी एक मोठा दहशतवादी हल्ला टाळणे हा विलक्षण योगायोग म्हणावा लागेल. पण खरंच तो योगायोग असेल का, याचा सूज्ञ वाचकांनीच विचार करावा. 

Thursday, May 7, 2020

गणिती कलोपासनेचा निर्घृण अंत (अर्थात एक न छापताच मागे घेतलेला अग्रलेख)

लहानगा रियाझ सकाळी उठला तो ठो ठो आवाजानेच. त्याचे अब्बू त्याला सांगत होते की तू झोप, बाहेर नेहमीचीच गडबड सुरु आहे. पण निरागस रियाझला त्याची बालसुलभ उत्सुकता स्वस्थ बसू देईना. कालच त्याने खिडकीतून हळूच वाकून तिकडून इकडे येणार्‍या तीन हजार सातशे शहाऐंशी आणि पलिकडे जाणार्‍या पाच हजार आठशे बहात्तर गोळ्या मोजल्या होत्या. सरळमार्गी रियाझ नाईकुला गणिताची आवड निर्माण झाली ती अशी. त्याच्या घरच्यांचं त्याला प्रोत्साहन होतंच. त्याचे अब्बू त्याच्या अम्मीला त्याच्या छोटे छोटे शेणगोळे कसे मोजायचे ते शिकवलं होतं. एकदा एका शेणगोळ्यात अम्मीची पिन अडकली असे समजून निरागस रियाझने ती काढून अम्मीला दिली आणि शेणगोळाच तो असं म्हणून खिडकीतून बाहेर फेकून दिला. पण खालून अचानक मोठ्ठा आवाज झाला आणि अचानक ठो ठो ठो असे लहान आवाज पटापट येऊ लागले. अब्बू म्हणाले ते बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज आहेत. तेव्हापासून रियाझला गोळ्या मोजण्याची आणि पर्यायाने गणिताची आवड निर्माण झाली. रियाझला चित्रकलेचीही आवड होती ति त्याने कशी जोपासली ते पुढे येईलच.

सनदी लेखपाल असलेल्या याकुब मेमन याचा त्याने आदर्श ठेवला व मोठा झाल्यावर गावातील इतर मुलांनाही गणिताची आवड निर्माण व्हावी असा ध्यास त्याने घेतला. पण फक्त गोळ्या मोजून त्याचे समाधान होईना. प्रत्येक गोष्टीच्या सम....सॉरी.... उगमाशी जायचे बाळकडू त्याला लहानपणापासूनच मिळाले होते. म्हणूनच आपला उगम कुठून झाला असाही प्रश्न त्याला पडत असे. पण त्याला निर्माण झालेल्या या सायंटेफिक टेंपरबद्दल पुन्हा केव्हातरी. तर, त्या गोळ्या येतात कुठून आणि सोडल्या जातात कुठून याचा शोध घ्यायचे त्याने ठरवले. मुळातच काश्मीरी जनता परस्पर सहकार्यासाठी प्रसिद्ध. तेव्हा त्याच्या या शिक्षणाची जबाबदारी गावातील जेष्ठांनी घेतली व बाहेरून काही शिक्षक मागवले. त्या शिक्षकांनी रियाझला बंदूक म्हणजे काय, त्यातून गोळ्या कशा बाहेर पडतात, त्या माणसाला लागल्यावर काय होते, त्या का चालवाव्यात वगैरे आवश्यक आणि फुटकळ माहिती दिली.  काश्मीरी लोकांचे आणि या बाहेरून आलेल्या शिक्षकांची सामाजिक जाणीव आपल्याला वाखाणलीच पाहीजे. कारण बाहेरचे निष्ठूर जग पदोपदी धनाची हाव ठेऊन पैसे मागत असताना आणि समाजकार्याचीही किंमत वसूल करत असताना रियाझला निर्माण झालेल्या बालसुलभ उत्सुकता शमवायला व त्याच्या गणिती ज्ञानार्जनासाठी दिलेल्या या शिक्षणासाठी मात्र त्या अमूर्त निर्गुण निराकार इंटानॅशनल शाळेच्या शिक्षकांनी एकही पैसा घेतला नाही. उलट बाहेरून आलेल्या या शिक्षकांनी त्याच्या अब्बू आणि अम्मीला या दिव्य कार्यासाठी तुमचा रियाझ आता आमचा (विद्यार्थी) झाला असे सांगून स्वतःहून पैसे दिले. 

रियाझला चित्रकारही व्हायचं होतं हे आपल्याला विदीत आहेच. विशेषतः गुलाबाच्या पाकळ्यांचे चित्र काढून त्यात लाल रंग भरायला त्याला फार आवडत असे. पण आपली ही आवड जोपासत असताना खूप वेळ वाया जात आहे असे त्याच्या लक्षात आलं. तसेच फक्त वेडीवाकडी चित्रे काढून देशविदेशात प्रदर्शने भरवण्यातही त्याला रस नव्हता. यावर त्याच्या शिक्षकांनी त्याला एक नामी युक्ती सुचवली. निर्जीव कागदावर त्याहून निर्जीव रंग भरण्यापेक्षा त्याने त्याच्या गणिती ज्ञानाच्या ध्यासापोटी मिळवलेले गोळ्या सोडायचे ज्ञान वापरून सजीव माणसांतच लाल रंग भरावेत असे त्यांनी सुचवले. मग सुरु झाला रियाझचा गणिती कलोपासनेचा रक्तरंजित....सॉरी हं.....रंगरंजित प्रवास.

हळूहळू रियाझ मोठा होत होता. त्याला आता मिसरुड फुटलं होतं. आता रियाझचं गणित इतके पक्के होऊ लागले होते की तो दुसर्‍यांच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळ्याच काय त्याने स्वतः बंदुकीतून सोडलेल्या गोळ्या देखील त्याला मोजता येऊ लागल्या होत्या. आता त्याच्या निर्गुण निराकार इंटरनॅशनल शाळेने शिक्षक पाठवायचे कमी करुन पर्यवेक्षक अर्थात सुपरवायझर पाठवणे सुरु केले होते. त्या पर्यवेक्षकांना रियाझची गोळ्या मोजण्याची विलक्षण बुद्धीमत्ता खूप भावली, कारण त्यांनी गणिती सरावासाठी तसेच प्रत्यक्ष प्रयोगासाठी पुरवलेल्या गोळ्यांचा हिशेब त्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांना देणे सोयीचे ठरू लागले. परिणामी शिक्षण व प्रत्यक्ष प्रयोगाकरता शाळेने करावयाचा पुरवठा भरमसाठ वाढला. 

रियाझने आता तारुण्यात पदार्पण केलं होतं. नाकाखाली असलेल्या मिसरुडाबरोबर तो आता हनवटीवरही डौलदार दाढीसंभार बाळगू लागला होता. रियाझने आता अनेक मुलांना आपल्या पंखाखाली घेऊन त्यांच्याही अनौपचारिक शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. कधी तो एकटाच तर कधी त्या मुलांन घेऊन तो इंटरनॅशनल शाळेत शैक्षणिक सहलींन जात असे. हळुहळू रियाझने आपल्यासारखे अनेक जण गणितात तयार केले. पण आता त्या शाळेला रियाझने पुस्तकी ज्ञानातले लक्ष कमी करुन प्रत्यक्ष प्रयोगांकडे अधिक लक्ष द्यायला हवे असे वाटू लागले. रियाझही एव्हाना फक्त थिअरीला कंटाळला होताच. रियाझचे शिक्षक ज्या शाळेतून यायचे त्या शाळेची एक शाखा होती हिजबुल मुजाहिदीन अर्थात पवित्र योद्धे. या शाखेच्या प्रमुखपदी त्याची नेमणूक करण्यात आली. आता त्याने भारतीय बंदुकधारी सैन्य, इतर नागरिक, दुकानदार, अशा सजीवांसमोर आपल्या गणिती कलोपासनेचे रक्तरंजित....सॉरी हं.....रंगरंजित प्रयोग सुरु केले. 

पण २००२...सॉरी...२०१४ आणि २०१९ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांनंतर कलेचा व गणिताचा र्‍हास सुरु झाला व सायंटेफिक टेंपर नसलेल्यांची चलती सुरु झाली. आपल्याकडे असहिष्णुता तेव्हापासूनच आणखी वाढली. याचेच पर्यावसान आधी बुरहान वाणी नामक मुख्याध्यापकपुत्राच्या प्राणोत्क्रमणात झाले. पण एवढ्यावर समाधान मानतील ते भारतीय बंदुकधारी सैन्याधिकारी कसले. रियाझ नाईकूला आपल्या कलेचे प्रात्यक्षिक आपण कसे दाखवले याचा व आपल्या गणिती ज्ञानाचा व कलोपासनेचा साप्ताहिक हवाल त्याला आपल्या निर्गुण निराकार इंटरनॅशनल शाळेच्या शिक्षकांना शुक्रवारी नजिकच्या प्रार्थनास्थळात द्यावयाचा होता. पण आधी काहीतरी भव्यदिव्य कार्य ताबडतोबीने करावयास हवे म्हणोन तो बुधवारी बाहेर पडला आणि घात झाला. तो कुठे आहे याचा सुगावा सैन्याला लागला व त्याला भारतीय बंदूकधारी सैन्याने त्याच्याच कलोपासनेचे प्रयोग त्याच्यावरच करुन त्याला या भौतिक जगातून कायमचे नाहीसे केले. 

जा रियाझ जा, या जगात, ज्या देशात तुझ्या कलेची कदर नाही अशा देशात राहून अवहेलना झेलण्यापेक्षा त्या तुझ्या निर्गुण निराकार निर्मात्याकडे जा. तिथे तुझ्या गणिती कलोपासनेचे तुला निश्चितच बक्षिस मिळेल. तुझे गणित चांगले असल्यामुळे तुला बहात्तर पर्यंत आकडे नक्की मोजता येतील असा आम्हाला विश्वास आहे. तुझा उगम कुठे झाला हे ही तुला तिथेच समजेल. 

#वक्रोक्ती #Sarcasm

 

Riyaz Naikoo Encounter: Hizbul Mujahideen Chief Riyaz Naikoo, Most ...


© पिरिष गूबेर (मंदार दिलीप जोशी)

Tuesday, April 7, 2020

कलियुगातली भरत "भेट"

सद्ध्या रामायण मालिका सुरू आहे.

महाराज दशरथांनी माता कैयेयीला दिलेल्या दोन वरांची पूर्तता करायला राम अगदी सहज वनवास मान्य करुन अयोध्येतून निघून जातो. त्याच्यासोबत पत्नी सीता आणि धाकटा भाऊ लक्ष्मणही. आजोळी गेलेल्या भरताला हे कळल्यावर तो आईची कठोर शब्दांत निर्भत्सना करतो आणि रामाला आणायला सगळ्यांसोबत वनात जातो. रामाने नकार दिल्यावर तो त्याच्या पादुका अयोध्येत सिंहासनावर ठेवतो आणि रामाच्या वतीने राज्य करतो. धर्मपालन करण्याकरता, दिलेला शब्द पाळण्याची आपल्या कुळाची परंपरा आहे तिची प्र्तिष्ठा राखायला आपल्या हक्काचं असलेलं राज्य सहज दुसर्‍याला देऊन टाकणारा राम आणि आपल्या हक्काचं नसलेलं पण आयतं मिळालेल्या राज्याचा राजा म्हणून उपभोग घ्यायचं नाकारून ते रामाला परत द्यायला निघालेला आणि रामाच्याच पादुका सिंहासनावर ठेऊन त्याच्या वतीने राज्य करणारा भरत अशी देवमाणसे होती म्हणून आपलं राष्ट्र मोठं झालं.

भरत मिलाप आज: श्रीराम और भरत का हुआ ...

असं आजच्या काळात घडू शकेल का? असं आज कोण करेल? दोन घराच्या मधलं कुंपण एक इंच इकडे की तिकडे यावरुन पिढ्यानपिढ्या कोर्ट्कज्जे करणार्‍याया लोकांच्या काळात भरतासारखी वृत्ती कुणाची असेल? असा विचार मनात आला आणि लगोलग एका मित्राने सांगितलेला किस्सा आठवला. तो सांगतो आहे अशा पद्धतीने हा किस्सा तुमच्या समोर मांडतो आहे:

"मी आमच्या गावी हल्ली सहा सात वर्षांपासून नियमित जाऊ लागलोय. माझ्या जन्माच्या फार आधीपासून, म्हणजे साधारण २०-२५ वर्ष आधीपासूनच, आजीने घरचे संबंध तोडले होते किंबहुना तिला तोडायला लावले गेले असं म्हणणं संयुक्तिक ठरेल. साधारण १९६५ च्या दरम्यान घडलेली ही गोष्ट आहे. आजीचे आणि इतर घरच्यांचे काही गंभीर स्वरूपाचे वैयक्तिक वाद झाले आजीला बाबांच्या चुलत्यांनी घराबाहेर काढलं. आजीने फक्त जुजबी कपडे आणि तेव्हा दहा वर्षाच्या माझ्या बाबांना कडेवर घेऊन घर सोडलं आणि बदलापूरात निघून आली.

वडिलांचा मामा इकडे राहत असे, त्याने एक घर पाहून दिले, आजीला नोकरी लावून दिली. मग आजीने २०-२५ वर्ष नोकरी करुन बाबांना मोठं केलं. लग्न लावून दिलं. आजोबा तिकडेच राहायचे, आणि वर्षातून एकदा दोनदा इकडे त्यांना न सांगता इकडे आजीला आणि बाबांना भेटायला याय. त्यांनी घरच्यांना विरोध केला नाही म्हणून आजीचा त्यांच्यावरचा राग कधीच गेला नाही. 

ती चुलत्यांची पिढी नंतर कालौघात संपली आणि जवळजवळ पन्नास वर्षांनि आता माझे जे चुलत चुलते आहेत, त्यांच्यापैकी दोन नंबरचे काकाआजोबा आहेत त्यांचा मुलगा सहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ मध्ये आजीला शोधत इकडे आले. मला गावी घेऊन गेले आणि सगळी कायदेशीर कारवाई करून सगळीकडे सातबाऱ्यावर, घरावर आमची आजीची, आईची, आणि माझी नावे लावून घेतली (माझे बाबा हयात नाहीत). हे माझे चुलत चुलते सांगतात, ती लोक सगळी नालायक होती आमच्या काकूशी अशी वागली. आम्ही लहान होतो तेव्हा. जे झालं ते झालं, पण आता ज्यांच्या हक्काचं जे आहे ते त्यांना मिळायला हवंच. 

हे एवढावरच थांबलं नाही. त्यांनी मध्यंतरी जमिनीचे व्यवहार करायचे होते तेव्हा मला बोलवून  घेतले आणि माझा त्यात हिस्सा आहे म्हणून माझ्या परवानगीने सगळे सोपस्कार पार पाडले. त्या व्यवहारात जे पैसे मिळाले त्याचा हिशोब मला देऊन ते पैसे माझ्या खात्यातही भरले. त्यांंचं म्हणणं असं की आम्हाला आमचं आहे अजून काय करायचं आहे अधिक हाव ठेवून?! त्या काकाने असं करायचं कारण म्हणजे त्याची आई.. जी आमची दोन नंबरची काकूआजी.. तिने हे सगळं ठरवून मोठ्या मनाने केलं.. आता ते घर आणि तिथलं सगळं ही काकूआजी पाहते. ती एकदम देव माणूस आहे. 

गावचं घर पाहणारे आमचे चुलत काका भजनीबुवा आहेत. टिळा लावून पांढरा झब्बा लेंगा घालून फिरणारे. गुरुवारी तिथल्या दत्ताच्या देवळात, शनिवारी मारुती मंदिरात भजनाला टाळ घेऊन असतात. कधीही घरी गेलो की सकाळी वाडीतल्या बागेत धोतर नेसून परडीत फुलं काढताना, नाहीतर दुपारी वाडीत वालीच्या खोप्यात बंदूक घेऊन माकडांना हुसकवताना दिसतात. नाहीतर चुलीसाठी लाकडं आणताना दिसतात. काकू परसदारी हौदात कपडे धुताना नाहीतर भांडी घासताना दिसते. काकूआजी पडवीतल्या झोपाळ्यावर बसून सुपारी कातरताना दिसते. खळ्यात काजू नाहीतर कोकम वाळत घातलेली दिसतात. टिपिकल कोकणातल्या घरातलं दृश्य.

मग मी आता चार सहा महिन्यांनी पडीक असतो तिकडे. येताना मला घरची कोकमं, मोहरी, वाली, मिऱ्या, काजू, गरे बांधून दिले जातात. 

जाताना हलका जाणारा मी येताना आनंदाचं ओझं घेऊन घरी येतो.

आजकालच्या काळात असा विचार मनात येणं हीच मोठी गोष्ट. बरं आला जरी, तरी इतक्या वर्षांपूर्वी दुरावलेल्या नातेवाईकांना चिकाटीने शोधून काढणं ही त्याहून मोठी गोष्ट. आणि वर तरुण वारसाला सोबत घेऊन सगळीकडे कागदोपत्री नावे लावणे म्हणजे कहर आहे. धन्य ती मित्राची काकू आजी आणि धन्य ते चुलते ज्यांनी हे सगळं घडवून आणलं. 

भारतातल्या एकूण हिंदू लोकसंख्येपैकी १% लोक जरी असं वागायला लागले, तर रामराज्य नाही तरी त्याचे वारे नक्की वाहू लागतील हे नक्की.

शुभ रात्री मित्रांनो. जय श्रीराम |

© मंदार दिलीप जोशी
चैत्र चतुर्दशी, हनुमान जयंतीचा उपवास, शालीवाहन शके १९४२

Tuesday, February 25, 2020

त्यांना घरं का मिळत नाहीत - उपकथानक

काही दिवसांपूर्वी मित्र ब्रिजेश मानव राणा यांना आलेल्या एका भूत बंगल्याबद्दलचा अनुभव मांडला होता. सुरवात करण्यापूर्वी सांगतो की मागील लेख वाचून मला अनेकांनी फोन, व्हॉट्सएप, व फेसबुकवर आपापले अनुभव सांगितले. ते पाहून मनातली उरलीसुरली शंकाही संपली.

तुम्हाला आठवत असेल तर मागील लेखात ब्रिजेशही म्हणाले होते की त्या घरातल्या मुलांशी मैत्री झाल्यावरही त्यांच्या मित्रमंडळींपैकी कुणीच तिथे पाणी सुद्धा पीत नसे, पण ते मात्र तिथे पाणी पीत व त्याचे त्यांना परिणामही भोगायला लागले. त्या लेखाचा विषय वेगळा असल्याने त्यांनी तो पुन्हा केव्हातरी त्याबद्दल सांगू असं सांगितलं होतं, तो ही अनुभव आज तुमच्यापुढे मांडत आहे.

माझ्या शेजार्‍याच्या बंगल्यातून 'भूत' गेलं होतं आणि त्य घरातल्यांना येणारे भलतेसलते अनुभव येणं सुद्धा थांबलं होतं. पण फक्त मी त्यांच्या घरचं पाणी पीत असे म्हणून...

रात्री मी गाढ झोपेत असताना मधेच आपण एखाद्या काळोख्या खोल विहीरीत पडत आहोत असा मला भास होत असे. माझा मेंदू मला सांगायचा की अरे तू घरी बिछान्यावर झोपलेला आहेस, पण पडत असताना खाली गार गार वारा लागतो आहे असं स्पष्टपणे जाणवत असे. कितीही प्रयत्न केले तरी उठता येत नसे. असा काही वेळ गेल्यावर कधीतरी वाटत असे की आता तळ आलाय आणि आपण जोरदार आपटणार, तेवढ्यात खडबडून जाग यायची आणि उठल्यावर सर्वांगाला दरदरून घाम फुटलेला असायचा. हे पहाटे साधारण १ ते २ च्या मधे होत असे. हे प्रकार दर दोन ते चार महिन्यांनी व्हायचे पण हळूहळू असे अनुभव आलेल्या दोन रात्रींमधला काळ कमी होऊ लागला.

आता हा प्रकार दर ४-५ दिवसांनी होऊ लागला. आईने कुठलाही उपचार करायचं शिल्लक ठेवलं नव्हतं. भारताच्या उत्तर भागातला एकही वैद्य तिने शिल्ल्क ठेवला नसेल. भयंकर कडू औषधे आणि काढे घेऊन झाले, पण काहीही परिणाम झाला नाही. या प्रकारांना घाबरून मी रात्री झोपायलाच घाबरत असे. डोळे लाल दिसायचे पण शरीराला थकवा जाणवत नसे.

त्या वर्षी मी झज्जर पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतला आणि तिथल्या हॉस्टेलवर राहू लागलो. पण तिथेही तोच प्रकार. सलग पाच-सहा दिवस झोपेची बोंब. रात्र रात्र मी बाहेर भटकत असे, पण जागेपणी काहीच त्रास झाला नाही.

झज्जरहून घरी येण्याचे दोन मार्ग होते, एक म्हणजे झज्जर ते सोनीपत थेट बसने आणि दुसरा म्हणजे झज्जर ते बहादुरगड, बहादुरगड ते नरेला, आणि नरेला ते सोनीपत ट्रेनने. दुसरा मार्ग लांबचा असला तरी मधे आराम करायला वेळ मिळायचा म्हणून मी याच मार्गाने यायचो.

एक दिवस असाच परतत असताना नरेला स्टेशनवर ट्रेन सुटायला खूप उशीर झाला. नरेला फक्त दोन प्लॅटफॉर्म असणारं एक लहानसं स्टेशन आहे. दुपारची वेळ होती, स्टेशनवर शुकशुकाट दिसला म्हणून इकडेतिकडे पाहिलं तर लांब एका झाडाखाली बरेच लोक जमलेले दिसले. मी तिथे पोहोचेपर्यंत ह्या गर्दीचा केंद्रबिंदू असलेल्या एका माणसाने आपलं चंबुगबाळं आवरायला सुरवात केली होती. फिरते वैदू असतात तसा तो इसम दिसत होता. इतके उपाय करुन झालेत तर यालाही सांगू म्हणून मी मला होत असलेला त्रास त्याला  सांगितला. आजूबाजूला पाहून तो किंचित हसला. मी तिथे पोहोचल्यापासून सुरु झालेलं आजूबाजूच्या कुत्र्यांचं भुंकणं माझ्या लक्षात नव्हतं आलं, पण त्याने ते अचूक हेरल्याचं त्याच्या नजरेत दिसलं.

"येत्या गुरूवारी माझ्याकडे ये", तो म्हणाला.

"पण तुमचा पत्ता..."

"धान्य बाजारात विचार, छोटे पंडितजी कुठे राहतात, कुणीही सांगेल." तो उत्तरला.

नरेला स्टेशन लहान असलं तरी तिथला धान्य बाजार त्या काळी आशिया खंडातला सगळ्यात मोठा धान्य बाजार होता, आताचं ठाऊक नाही, कदाचित अजूनही तो आपला रुबाब टिकवून असेल.

घरी येऊन आईला विचारलं तर ती म्हणाली ये जाऊन.

छोटे पंडितजींचं ठिकाण नरेला धान्य बाजारापासून अर्धा किलोमिटरवर होतं. तिथे पोहोचल्यावर एका घरी एका शेठजींना विचारल्यावर ते म्हणाले की पंडितजी इथेच पुढच्या खोलीत राहतात. त्यांचे आभार मानून मी त्या खोलीत शिरलो. ती खोली म्हणजेधान्याच्या एका मोठ्या कोठारासारखी होती, आणि छोटे पंडितजी एका कोपर्‍यात निरंजन लावून बसलेले होते. मी त्यांना नमस्कार केला, तसं मला त्यांनी खुणेनेच बसायला सांगितलं. दोन मिनिटांनंतर त्यांनी एका कागदाच्या चिठोर्‍यावर बोटानेच काहीतरी लिहीलं आणि मला तो चिठोरा दिला. झोपताना उशाखाली ठेव असं बजावून पुढच्या शनिवारी यायला सांगितलं आणि मला निरोप दिला.

त्यांनी सांगितल्यासारखं मी केलं, आणि पुढचा पूर्ण आठवडा शांत झोप लागली. किंबहुना इतकी शांत झोप मला कधी लागल्याचं आठवत देखील नाही. ठरल्याप्रमाणे पुढच्या शनिवारी मी परत त्याच घरी, त्याच खोलीत पोहोचलो. छोटे पंडितजी तिथेच कोपर्‍यात निरंजन लावून बसले होते. त्यांनी माझ्याकडून कागद घेऊन तो निरंजनाच्या ज्योतीवर जाळला. कागदाचा तेवढा कपटा जळायला मिनिटभर सुद्धा लागलं नसतं तिथे तो कागद जवळजवळ २० मिनिटं जळत होता. हे काहीतरी भलतंच होतं.काअ

कागद पुर्ण जळाल्यावर त्यांनी मला निरोप दिला.

घरून निघताना आईने मला त्यांना दक्षिणा म्हणून अर्पण करण्याकरता काही पैसे आणि कापड दिलं होते. ते त्यांना देऊ लागताच त्यांनी घ्यायला साफ नकार दिला आणि सांगितलं या कापडाचं तूच काहीतरी शिवून घाल.

पंडितजींचा आशीर्वाद म्हणून मी त्या कापडाचे कपडे शिवून वापरू लागलो.

त्या आठवड्यात लागलेली शांत झोप तशीच पुढेही लागली. आता मी पूर्ण 'बरा' झालो होतो.

साधारण महिन्याभरानंतर पुन्हा माझ्या गाडीला उशीर झाला, ते ही तब्बल दोन तास. म्हटलं अनायसे वेळ आहे तर छोटे पंडितजींकडे चक्कर टाकून येऊया, त्यांचा आशीर्वादही मिळेल.

त्या घरी पोहोचल्यावर पुढच्या खोलीत बघितलं तर कुणीच नव्हतं. फक्त गव्हाची पोतीच पोती होती तिथे. मी त्या शेटजींना विचारलं की छोटे पंडितजी कुठे गेले? त्यावर मला मिळालेलं उत्तर बुचकळ्यत टाकणारं होतं. शेटजी म्हणाले, "कोण छोटे पंडितजी, इथे कुणी पंडित नाही राहत."

"अहो पण जेमतेम महिन्याभरापूर्वी तुम्हालाच विचारलं होतं आणि तुम्हीच म्हणालात ते तिथे पुढच्या खोलीत राहतात", मी म्हणालो.

"अहो मी तुम्हाला आधी कधीच भेटलो नाही. त्या खोलीचं म्हणाल तर ती खोली फक्त कोठार म्हणून वापरली जाते आणि तिथे कुणी पंडितजी वगैरे राहत नाही आणि आधीही राहत नव्हतं. कदाचित तुम्ही पत्ता चुकला असाल, दुसरीकडे चौकशी करा."

आता मला काही कळायचं बंद झालं होतं. घरी येऊन आईला झालेला प्रकार सांगितला. आई विचारात पडली आणि मग म्हणाली, असेल कुणी पवित्र आत्मा (तिला spirit guide म्हणायचं असावं)तुझ्यासाठी खास आलेला.  मला कळेना, पूर्ण शुद्धीत असताना माझ्या डोळ्यांसमोर सगळं घडलं आणि आता जाऊन बघतो तर काहीच न घडल्यासारखं सगळं दिसत होतं.

तेच घर, तेच शेठजी, तीच ती बाहेरची खोली, पण छोटे पंडितजी गायब आणि असं कुणी अस्तित्वातच नसल्याचा त्या शेठजींचा दावा.अस

असं कसं होईल?

🖋️  मंदार दिलीप जोशी
फाल्गून शु २, शके १९४१

सहाय्य: श्री ब्रिजेश राणा व श्री आनंद राजाध्यक्ष

Sunday, February 16, 2020

"त्यांना" घरे का मिळत नाहीत?

शीर्षटीप: तुमचा आत्मा, नजर लागणे, मूठ मारणे, भूत बंगला वगैरे गोष्टींवर विश्वास असेल तर वाचून सावध व्हा. विश्वास ठेवावा की नाही अशा संभ्रमात असाल तर नक्कीच वाचा. विश्वास नसेल तर वाचाच वाचा, आणि किमान एकदा घरी जाऊन विचार करा.

फेसबुकवरचे मित्र ब्रिजेश मानव राणा यांनी सांगितलेली ही हकीकत आहे.

"त्यांना" घरे का मिळत नाहीत
काही वर्षांपूर्वी प्रसिद्धीमाध्यमांतून 'त्यांना' भाड्याने घरे मिळत नाहीत अशी बोंबाबोंब झाली होती. वातावरण खराब होतंय, भेदभाव होतो आहे, वगैरे छापाची ही बोंब होती. प्रत्येक घटनेच्या वेळी हिंदूंना दोष दिला जायचा कारण अर्थातच घरं हिंदुंचीच असायची, हिंदू कशाला त्यांच्या वस्तीत जाऊन राहतील नाही का! नंतर जेव्हा या घटनांमागची कारणं पुढे यायला लागली तेव्हा मिडियातली ही बोंबाबोंब बंद झाली कारण त्यांचा डाव आता त्यांच्यावरच उलटण्याची परिस्थिती ओढवली होती.

पण उघड झालेल्या कारणांत सुद्धा घरातल्या आणि वस्तीतल्या आयाबहिणींशी अभद्र व्यवहार व इतर भौतिक कारणे होती, पण अशीही कारणे असतात की जी आपण मस्करी केली जाईल या भीतीपोटी उघड बोलायला कचरतो. पण बोलायला तर हवीच कारण कोण जाणे एखाद्या हिंदू कुटुंबाचं नुकसान व्हायला नको. अशीच एक विचित्र, गूढ पण माझ्या समोर घडलेली एक गोष्ट तुमच्यापुढे ठेवतो.

१९८८-९८ या दरम्यान आम्ही सोनीपतमध्ये रहायचो. आम्ही रोज संध्याकाळी घराच्या समोरच असलेल्या खेळाच्या मैदानावर खेळायला जायचो. तिथे जवळच एक घर होतं जी वास्तू भूत बंगला म्हणून कुप्रसिद्ध होती. त्यावेळी मी सातवीत होतो.

ही वास्तूचा साध्या घरापासून ते भूत बंगल्यापर्यंत झालेला प्रवास मी स्वतः बघितलेला असल्यामुळे जसं आठवेल तसं तुमच्यापुढे माझ्या आठवणींची शिदोरी उघडी करतो.

झालं असं की त्या घरात राजस्थानातून एक पाच वेळा प्रार्थना करणारे एक शांतीप्रिय महाशय भाड्याने राहू लागले. हल्ली भाडेकरार सर्रास केला जातो पण त्याकाळी बहुतेक व्यवहार विश्वासावर चालत असल्याने असा भाडेकरार करणं लोकांना आवश्यक वाटत नसे.

सुमारे वर्षभरानंतरची गोष्ट आहे. आम्ही नेहमीप्रमाणे संध्याकाळी मैदानात खेळत असताना घरमालक आणि हे मियां यांचं जोरदार भांडण सुरु होतं. आम्ही तिथे मजा बघत उभे होतो.

गोष्ट अशी होती की घरमालक, हे हिंदू होते, त्यांना त्या घरात रहायला यायचं होतं म्हणून ते त्या भाडेकरू मियाँजींना घर सोडायला सांगत होते आणि मियाँजी घर सोडायला तयार नव्हते.

दुसऱ्या दिवशी घरमालक पोलीस घेऊन आले आणि त्यानंतर मियाँजींनी आठवडाभरात घर सोडलं.

त्यांनी घर सोडल्यावर दोनेक दिवसांनी त्या घरमालक साहेबांनी घराची चांगलीसाफसफाई करून घेतली आणि आपल्या कुटुंबासहित तिथे राहू लागले. त्यानंतर एकाच आठवड्यात त्यांच्या नवविवाहित तरुण मुलाचा आकस्मिक मृत्यू झाला; मग त्यांची मुलगी आजारी पडली. मन विटल्याने त्यांनी ते घर सोडलं आणि दुसरीकडे गेले.

या नंतर जवळपास दोन वर्ष त्या घरात तब्बल १४ वेगवेगळे भाडेकरू राहून गेले. या सगळ्यांच्याच बाबतीत  त्या घरात काही अनाकलनीय आणि अभद्र घटना घडत गेल्या. आसपास असलेल्या इतर घरांमध्ये मात्र सगळं आलबेल होतं.

एक दिवस अचानक राजस्थानच्याच एका हिंदू इसमाने ते घर विकत घेतल्याचं कानावर आलं. शहरापासून तीन किलोमीटरवर त्यांचा कसलासा व्यवसाय होता.

ते येऊन राहू लागल्यावर त्यांनाही त्या भाडेकरूंना आले तसेच अनुभव येऊ लागले. आता त्यांनी आपल्या गावाकडून एका 'जाणकार' इसमाला बोलावून घेतलं. त्याने काही विधी केलेले आम्ही पाहिले, सहा तास लागले त्याला.

आमचं तिकडे येणं जाणं असल्याने त्या नव्या घरमालकाच्या मुलांशी मैत्रीही झाली होती. पण आमच्यापैकी मी सोडून कुणीच त्या घरचं पाणीही पीत नसे. त्याचे परिणाम मला नंतर भोगायला लागले, पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी.

सात आठ महिन्यांनी हिवाळा सुरू झाला. त्यांच्या कारखान्यातील अनेक गोष्टी बाहेर आवारात पडलेल्या असत, म्हणून ते रात्रीच सायकलवर टांग मारून तिकडे जाऊन झोपत.

एके दिवशी असेच कारखान्यात जाताना त्यांना कुणीतरी सायकलला मागून खेचतय असं वाटलं. पण थांबून बघितलं तर मागे कुणीच नव्हतं. असं त्या दिवशी अनेकदा झालं. एक दिवस संध्याकाळी पाऊस पडू लागला तो थेट रात्री दहा वाजता थांबला, तेव्हा ते फॅक्टरीत जायला निघाले. त्या दिवशी त्यांची सायकल अचानक जाम झाली आणि ते पडले. पुन्हा सायकलवर टांग मारून काही अंतर गेले आणि पुन्हा सायकल जाम झाली. या वेळी ते सावध होते म्हणून पडले मात्र नाहीत. असं वाटत होतं की त्यांना चालत जायला भाग पाडलं जात होतं. त्या रात्री त्यांनी कसातरी कारखाना गाठला.

दुसऱ्याच दिवशी त्यांनी राजस्थानवरून त्याच 'जाणकार' इसमाला बोलावून घेतलं. या वेळी त्यांनी कसलंसं अनुष्ठान केलं आणि पूर्ण कुटुंबाला रक्षसूत्र बांधलं आणि आणखी काहीतरी दिलं.. या नंतर त्यांच्या घरात किंवा कुटुंबियांना काही त्रास झाला नाही.

आता यात काय नुकसान झालं, कुणाचं झालं...त्या वेळी मला समजत नव्हतं पण आता लक्षात येतंय.

आता विचार करा, या घटना कधी सुरू झाल्या, तर त्या पाच वेळच्या नमाजी मियाँना भाड्याच्या घरातून जायला लागलं तेव्हा. जेव्हा त्यांना लक्षात आलं की आता आपल्याला घर सोडायलाच लागेल तेव्हा त्यांनी काहीतरी केलं किंवा करवलं ज्यामुळे अनेक कुटुंबांना त्रास भोगावा लागला आणि घराची 'भूत बंगला' म्हणून बदनामी झाली ती वेगळीच. आधीच्या मालकाला घर कवडीमोल भावात विकावं लागलं. त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट म्हणजे विकत घेणारा हिंदूच होता, शातीदूत असता तर पूर्ण कॉलनीचा सत्यानाश नक्की होता.

तर ही झाली ब्रिजेश राणा यांनी सांगितलेली सत्यघटना. तुम्हाला आठवत असेल तर बरोबर वर्षभरापूर्वी २०१९ साली पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मी एका वेगळ्या संदर्भात लिहिलं होतं - "जिहादी शत्रू सीमापार राहत नाही हो. तो तुमचा रिक्षावाला, प्लंबर, पंक्चरवाला, सिनेमाचा हीरो, फळ विक्रेता, सुफी गायक, चिकन दुकानदार, सुतार, आणि शिंपी आहे. तो साडी विकणारा, इंजिनियर, आणि डॉक्टर सुद्धा आहे. जो पर्यंत तुम्ही त्यांच्याकडून सेवा आणि वस्तू घेऊन पैसे मोजत रहाल, तोपर्यंत जिहादला पैशाचा कधीच तुटवडा जाणवणार नाही."

"तेव्हा संताप आलेल्या माझ्या प्रिय हिंदू बंधू आणि भगिनींनो, तुम्ही या समस्येचा एक भाग आहात."

पण या सगळ्या भौतिक (physical) गोष्टी झाल्या, अगदी शांतीपूर्ण समाजाच्या भाडेकरूंना घरातून हाकलूही शकू आपण. एखाद्या प्लबरचा वाईट अनुभव आला तर पुढच्या वेळी माणूस बदलू सुद्धा.

प्लंबर, सुतार, इलेक्ट्रीशियन, गवंडी वगैरे मंडळींचं घरातल्या अशा कोपऱ्यात काम असतं जिथे काही गोष्टी नादुरुस्त किंवा बिघाडग्रस्त होईपर्यंत आपलं तिथे लक्षही जात नाही. आजकालच्या कन्सिल्ड पाइपिंग आणि वायरिंगच्या काळात एखाद्याने काम करता करता पाईप, नळ, टाईल, किंवा वायरिंगच्या मागे तावीज़, गंडा किंवा अशीच एखादी लहानशी 'मंतरलेली' वस्तू ठेऊन गेला तर आपल्याला कळणारही नाही. भौतिक गोष्टींशी आपण लढू देखील, पण ज्या डोळ्यांना दिसत नाहीत आणि कुठल्याही प्रयोगशाळेत व्हायरससारख्या बनवल्याही जाऊ शकत नाहीत त्यांच्याशी आपण कसे लढणार आहोत?

गंमत म्हणजे या शांतीपूर्ण लोकांशी तुमचं काही वैयक्तिक शत्रुत्व असण्याची गरज नसते. भारतावर आक्रमण करणाऱ्या सुलतान, बादशहा, आणि वेगवेगळ्या सरदारांच्या सैन्याला इकडे कुणाशी वैयक्तिक शत्रुत्व नव्हतं. तरी त्यांनी इकडे येऊन फक्त लुटणे आणि राज्य करणे इतकंच केलं नाही तर अत्याचार, बलात्कार, खून, इत्यादी सुद्धा केलं, हा इतिहास आहे.

मुळात तुम्हाला हरप्रकारे त्रास देणं आणि त्यांचा तेजोभंग करणं हा त्यांना मिळालेला दैवी आदेश आहे. विश्वास बसत नसेल तर 9:120 असं गुगलून बघा. नेटवर सहज उपलब्ध आहे, आणि ते सुद्धा पुर्णपणे फु-क-ट.

तुम्हाला असा एखादा अनुभव आला असल्यास जरुर सांगा. या गोष्टीही लोकांना कळणे ही एक प्रकारची जनजागृतीच आहे.

तात्पर्य असं की या लोकांपासून जितकं लांब राहता येईल तितकं लांब रहा. सावधान रहा, सतर्क रहा.

🖋️  मंदार दिलीप जोशी
माघ कृ. नवमी, शके १९४१

सहाय्य: श्री ब्रिजेश राणा व श्री आनंद राजाध्यक्ष

Wednesday, February 12, 2020

बडे अच्छे लगते हैं

काही गाणी अचानक उमगतात, समजतात, आणि खरी वाटू लागतात त्यातलं हे एक.

बड़े अच्छे लगते है...
क्या?
ये धरती, ये नदिया, ये रैना...
...और?
और तुम!


आपल्याला फक्त माणसांबद्दल जिव्हाळा नसतो, तर वस्तू, वास्तू, आणि जागांबद्दलही आत्मीयता असते.

तुम इन सबको छोड़के कैसे कल सुबह जाओगी
मेरे साथ इन्हें भी तो तुम याद बहुत आओगी


काही जुने इंग्रजी आणि त्यावरून ढापलेले हिंदी सिनेमे बघितले असतील, तर त्यात चारचाकी गाडीला जीव किंवा स्वतःचं मन आहे या मध्यवर्ती कल्पनेभोवती चित्रपटाची कथा फिरत असे हे नक्की आठवेल. अनेक कठीण प्रसंगांतून ती गाडी आपल्या मालकाला किंवा त्याच्या मुलाला बाहेर काढत असे. जगात सुष्ट शक्ती आहेत तशाच दुष्ट शक्ती सुद्धा म्हणून एका चित्रपटात एक दुष्ट खुनशी काळी गाडी  'मुख्य भूमिकेत' दाखवण्यात आली होती.

मगर सच्चे लगते हैं,
ये धरती, ये नदिया, ये रैना,
और?
और तुम!


आपली गाडी, शाईचे निबाचे पेन, म्युझिक सिस्टिम, अगदी वॉशिंग मशीन सारख्या घरगुती वस्तू या आपण एकहाती रहाव्या असं म्हणतो त्यामागे व्यक्तीपरत्वे वापरण्याची पद्धत बदलत असल्याने वस्तूंची झीज लवकर होऊ शकते, वस्तू लवकर बिघडू शकते हा साधा तर्कशुद्ध विचार आहे, पण त्यापलीकडे जाऊन माणसांना जशी माणसांबरोबरच निर्जीव वस्तूंबद्दलही जिव्हाळा असतो तसाच जिव्हाळा झाडं, नदी, आपल्या गावची माती अशा वस्तूंनाही माणसांबद्दल वाटू शकतो असं मला तरी वाटतं.

एखादी स्कुटर फक्त आपल्याच लाथेने सुरू होते, तर एखाद्या जुन्या टीव्हीला त्याच्याच मालकाने टपलीत मारल्यावर सुरू व्हायची खोड असते. एखाद्या सवयीच्या किंवा आवडीच्या झाडाखाली आपण बसलो तर एरवी माणसं पाहताच तिथे न फिरकणारे पक्षी आपल्या डोक्यावर घोंघावू लागतात आणि आपण त्या झाडाच्या आणि ते झाड आपल्या सानिध्यात शांतावल्यासारखं वाटतं, तर कधी नदीच्या किंवा स्वच्छ पाण्याच्या ओढ्याच्या संथ वाहणाऱ्या पाण्यात पाय सोडून बसल्यावर लहानगे मासे पायांभोवती निर्धास्त घोटाळू लागतात. कधी वाहतं पाणी पायाशी घुटमळून तळपायाला गुदगुल्या करुन पुढे गेल्याचा भास होतो. वर्षभर बंद असणारं आपलं गावाकडचं घर कुटुंबासहित कुलूप उघडून आत शिरल्यावर एकदम जिवंत होऊन उठतं तर कधी तेच घर आपण एकटे गेल्यावर 'बाकीचे कुठे आहेत, मुलं दिसत नाहीत ती..मग बरोबर मंडळी पण नाही आली ते', असं अपूर्णतेने व्याकूळ होऊन विचारतंय असा भास होतो.

ओ माझी रे, जइयो पिया के देस
ढोबळ विचार केला तर इथे पिया का देस म्हणून फक्त प्रिय व्यक्तीचा देस नव्हे तर आपलं शहरातलं किंवा गावाकडचं घर, अगदी बरीच वर्षे काम करत असलेलं ऑफिस, मित्रांबरोबर चकाट्या पिटायची जागा, देऊळ आणि त्यापुढंचं पटांगण, असं काहीही असू शकतं. जी जागा आपला भावनिक कम्फर्ट झोन असते, तोच पियाका देस.

फक्त ते आपलं असायला, वाटायला हवं. ते नातं सहजीवनाला पूरक अर्थात symbiotic असलं तरच हे शक्य होतं, परजीवी म्हणजे parasitic असलं तर नाही. आपण बहुतांशी symbiotic आहोत म्हणूनच आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलं:
अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् |
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ||
 
(महोपनिषद्, अध्याय ४, श्‍लोक ७१)
अर्थात: हा आपला बंधू, तर तो आपला बंधू नव्हे तर परका आहे, असा विचार कोत्या मनाची माणसे करतात. उदार अंत:करणाच्या लोकांकरता हे संपूर्ण जगच कुटुंबासमान आहे.

एका कुटुंबातली लोकं ज्याप्रमाणे वागतात तसं symbiotic वागलं तर माणसं, वस्तू, आणि वास्तूच काय पण संपूर्ण देश तुम्हाला सामावून घ्यायला सरसावतील. Parasitic माणसं मात्र स्वतःच्याही देशात तिरस्करणीय ठरतात. सुज्ञांंस अधिक सांगणे न लगे.

खरंच आहे, काही गाणी अचानक उमगतात, समजतात, आणि नुसतीच वाटू लागत नाहीत तर त्यांचे वेगळे अर्थही लागू लागतात.

🖋️ मंदार दिलीप जोशी
माघ शु, चतुर्थी, शके १९४१

Saturday, February 1, 2020

कोरोनास्य कथा: रम्या:

अमेरिकन फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात एफबीआयच्याएजंटस् नी नुकतंच बॉस्टनमधल्या विद्यापीठ व एका रुग्णालयाशी संलग्न असलेल्या तीन जणांवर हेरगिरीचे आरोप ठेवले. या तिघांपैकी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

हार्वर्ड विद्यापीठाच्या रसायनशास्त्र व रासायनिक जीवशास्त्र विभागाचे अध्यक्ष डॉ चार्ल्स लिबर (Dr. Charles Lieber) यांनी त्यांना चीनकडून दरमहा मिळालेल्या ५०,००० डॉलर रकमेबाबत व एरवी मिळालेल्या कोट्यवधी डॉलर्सबद्दल संरक्षण खात्याला खोटी माहिती दिल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली.

मॅसेच्युसेट्सचे अ‍ॅटर्नी जनरल अ‍ॅन्ड्र्यू लेलिंग (Andrew Lelling) यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ चार्ल्स लिबर यांना गेल्या अनेक वर्षात ही रक्कम चीनमधील संस्थांसाठी संशोधन करण्याच्या मोबदल्यात त्यांना देण्यात आली. डॉ लिबर यांना त्यांच्या हार्वर्ड विद्यापीठातील कार्यालयात अटक करुन सक्तीच्या प्रशासकीय सुट्टीवर पाठवण्यात आले. अटकेच्या काळात अर्थातच त्यांना विद्यापीठात अध्यापन आणि संशोधनात्मक कार्यात सहभागी होता येणार नाही. डॉ चार्ल्स लिबर हे चौकशीत पूर्ण सहकार्य करत असून या प्रकरणातील त्यांच्या सहभागाचे पुनरावलोकन करत आहेत असं हार्वर्ड विद्यापीठाकडून प्रसूत करण्यात आलेल्या माहितीत म्हटलं आहे.

आरोप ठेवण्यात आलेले इतर दोन जणं चीनी "विद्यार्थी" असून हे बॉस्टनमधील विद्यापीठात संशोधन सहाय्यक अर्थात रिसर्च असिस्टंट म्हणून काम करत होते.

यातली एक जण यँकिंग ये (Yanqing Ye) ही चक्क चीनच्या सैन्यात लेफ्टनंट म्हणून अजूनही कार्यरत आहे. अमेरिकन व्हिसासाठी अर्ज करताना तिने ही माहिती लपवली होती. तिने एप्रिल २०१९ साली बॉस्टन विद्यापीठ सोडले असून ती सद्ध्या चीनमधे असल्याने अर्थातच तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, आणि सगळ्या आंतरराष्ट्रीय संकेतांना खुंटीवर टांगून ठेवण्याच्या चिनी दादागिरीच्या पद्धतीमुळे तशी शक्यताही नाही. Yeकडच्या उपकरणांत रोबोटीक्स आणि संगणक वैज्ञानिक असलेल्या दोन अमेरिकन नागरिकांची माहिती सापडली.

झाओसंग झेंग (Zaosong Zheng) या दुसर्‍या 'सहाय्यकाला' तो चीनला परतण्याच्या प्रयत्नात असताना लोगन विमानतळावर एफबीआयच्या मते "संवेदनशील जैविक नमूने" (Sensitive Biological Samples) असलेल्या तब्बल २१ कुप्यांसकट अटक करण्यात आली. तो हार्वर्ड विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीवर बेथ इस्रायल मेडिकल सेंटरमध्ये संशोधक म्हणून कार्यरत होता.

एक सांगायचंच राहीलं, हे पैसे डॉ चार्ल्स लिबर यांना चीनमध्ये रासायनिक-जैविक प्रयोगशाळा उभारण्याकरता देण्यात आले होते. त्यांनी जी रासयनिक-जैविक प्रयोगशाळा उभारायला चीनला मदत केली होती, ती प्रयोगशाळा मध्य चीनमधील वुहान तंत्रज्ञान विद्यापीठात आहे.

जगभरात झपाट्याने पसरत असलेल्या आणि हजारोंच्या संख्येने लोकांना बाधित करत असलेल्या कोरोना व्हायरसचा उगम हा याच वुहान मधल्या एका प्रयोगशाळेत झाला. आत्तापर्यंत जगभरात कोरोना व्हायरसच्या तब्बल दहा हजार रुग्ण सापडल्याच्या बातम्या आहेत. चीनमधे या व्हायरसने आजारी पडलेल्या आणि दगावलेल्यांच्या बातम्या भारतात येऊन धडकू लागताच आपल्याकडे टिपिकल "मेले साप-विंचू कुत्री-मांजरी काहीही खातात आणि मग आजारी पडतात" अशा स्वरूपाच्या टिपिकल प्रतिक्रिया ऐकू येऊ लागल्या, आणि आपली जनता 'आपल्याला काय त्याचं' म्हणून आपापल्या कामाला लागली, आणि सद्ध्या बजेट-बजेट खेळायच्या मनस्थितीत आहे. तेव्हा या बातमीक्डे दुर्लक्ष झाल्यास नवल नाही.


© मंदार दिलीप जोशी
माघ शु. सप्तमी (रथसप्तमी), शके १९४१

(विस्तृत माहिती)

Friday, January 10, 2020

अश्रू विकणे आहे


आपण भारतीय फारच संवेदनशील असतो आणि त्यामुळे आपल्याला भावुक करून टीआरपी वाढवणं हा सर्वभाषिक वाहिन्यांच्या हातचा मळ झालेला आहे.

सिनेमा नाटकात गरजच असते, पण हे लोण आता तथाकथित रिएलिटी शो पासून मुलाखतीपर्यंत सगळीकडे पसरलेलं आहे. पहावं तिथे रडारड. अगदी मास्टरशेफ सारख्या कार्यक्रमात सुदधा माझी आई/वडील, त्यांनी खाल्लेल्या खस्ता, आमची गरिबी, लोक मला कसे टोचून बोलत होते हो असं टँण टँण टँण ब्लाह ब्लाह ढसा ढसा अश्रूपात करत सुरू असतं.

मुलाखतीतल्या लोकांचं कार्यक्षेत्र आणि त्या मागचा प्रवास आणि त्यासंबंधीचे विचार या पुरता कार्यक्रम मर्यादित असेल तर यांना बहुतेक पैसे मिळत नसावेत, म्हणून ओढूनताणून अश्रू काढायचे प्रकार चालतात. त्यात मुलाखत देणारे लोक अभिनयक्षेत्राशी संबधित असतील तर आपल्याला त्यांच्या उत्कृष्ठ अभिनयाचं दर्शनही होतं. कहर म्हणजे मुलाखतीतल्या लोकांच्या भावनांच्या विहिरीला त्यांच्या दिवंगत आईवडीलांचे फोटो दाखवून किंवा तुम्ही त्यांना काय सांगाल अशा प्रश्नांचे रहाट लावून डोळ्यांतून अश्रूंचे पाट वहायला लावणे.

गंमत म्हणजे बऱ्याच लोकांना ते खरं वाटतं. रिएलिटी शो असो किंवा मुलाखत, अशा कार्यक्रमात जवळजवळ प्रत्येक वेळी सगळं सराव करून घेतलेलं अर्थात रिहर्स केलेलं असतं हो. प्रश्न सुद्धा आधी द्यावे लागतात, हे काही मोठं गुपित नव्हे.

सामान्य जनतेतील एखादा दमलेला बाबा आपली मुलं काय करत असतील या  वेळी शाळेत असा विचार करत असतो तर ऑफिसमधून येताना ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर एखाद्या आईचा अर्धा जीव पिल्लांपर्यंत पोहोचून तिचे डोळे पाणावलेले असतात. एखादी बहीण आपल्या भावाचा इंटरव्ह्यू आज नीट होऊदे अशी परमेश्वराकडे प्रार्थना करत असते तर एखादा भाऊ बहिणीच्या लग्नासाठी जुळवाजुळव करत असतो. एखादा मित्र आपल्या जायबंदी मित्राला ऑफिसात सोडायला वाट वाकडी करून आणि खिशाला खार लावून जातो तर कुणी आणखी काही करत असतं.

थोडक्यात, आम्हाला तुमची पाककला दाखवा, अभिनय दाखवा, खेळ दाखवा - हं त्या संदर्भातला संघर्षही दाखवा म्हणजे आम्ही काही शिकू त्यातून. बाकी रडारड आणि रोजच्या आयुष्यातला संघर्ष जनतेच्या पाचवीला पुजलेली आहे. त्याबाबतीत सामान्य लोकांकडून तुम्हीच शिकाल.

So please spare us the artificial sentimental overflow. तुमची रडारड तुमच्याकडे ठेवा.

🖋️ मंदार दिलीप जोशी
पौष पौर्णिमा, शके १९४१

Sunday, June 2, 2019

जेम्स बॉन्ड - शेकन, नॉट स्टर्ड म्हणजे काय रे भाऊ?

आपण जेम्स बॉन्डच्या प्रत्येक चित्रपटात पाहिलं असेल, की त्याचे आवडते पेय म्हणजे मार्टिनी. तो जिथे कुठे हे पेय घईल, ते देणार्‍याला म्हणजे सर्व करणार्‍याला तो फक्त एवढंच सांगून थांबत नाही. तो पुढे म्हणतो, "शेकन, नॉट स्टर्ड". याचं काहीही बोध न होणारं विनोदी मराठी भाषांतर म्हणजे "हलवून दे, ढवळून नको".

आता हे शेकन, नॉट स्टर्ड म्हणजे नेमकं काय? नक्की काय शेकवायचं...आपलं...हलवायचं असतं...आणि ते स्टर्ड म्हणजे ढवळायचं का नसतं? तर ते शेकन म्हणजे काय असतं ते आधी पाहू. मार्टिनी हा एक कॉकटेलचा प्रकार आहे. तर शेकन कॉकटेले एकात दुसरं मिसळून ढवळून चालत नाहीत. ती व्यवस्थित हलवून तयार करण्याकरता बाजारात पूर्णपणे स्टीलपासून बनवलेला एक खास 'शेकर' मिळतो. या शेकरचे एकूण तीन भाग असतात. तळाकडचा म्हणजे खालचा स्टीलचा मोठा कप असतो त्यात पेये घातली जातात. या भागाला दोन भागांचे असलेले एक स्टीलचेच झाकण असते. ते दोन भाग म्हणजे एक गाळणी आणि त्यावर असलेला एक स्टीलचा कप. आधी म्हटल्याप्रमाणे हा शेकर संपूर्ण स्टीलचा बनवलेला असल्याकारणाने ही चाळणी आणि कपही स्टीलचेच असतात.



जेम्स बॉन्डला जर त्याची लाडकी मार्टिनी शेकन करुन द्यायची असेल तर त्यात व्होडका आणि व्हर्मूथ (vermouth) अशी दोन पेये वापरावी लागतात. व्हर्मूथ म्हणजे ड्राय अर्थात चवीला कडूसर. व्हर्मूथ हा एक व्हाईट वाईनचा प्रकार असून त्यात साखर अगदी अत्यल्प असते. अशा या कडूसर व्हाईट वाईनमध्ये काही वनस्पतींचा अर्क उतरवला की व्हर्मूथ तयार होते. आपल्याकडे जसं एखादी रेसिपीत "मीठ चवीप्रमाणे" असं लिहीलेलं असतं तसं यातही चवीनुसार जास्तीची साखर घालतात. व्हर्मूथचे च्या अनेक ब्रॅण्डपैकी 'मार्टिनी' याच नावाचा व्हर्मूथचा ब्रॅण्ड लोकप्रिय आहे. तर त्याची कृती अशी, की एक 'मार्टिनी ग्लास' फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचा. मग एकास चार या प्रमाणात व्हर्मूथ व व्होडका घ्यायची...अंहं, एकत्र करायची नाही. पण यांचेही प्रमाण साधारण १४ मिली व्हर्मूथ आणि ५६ मिली व्होडका असे ठरलेले आहे. आता वर उल्लेख केलेल्या शेकरमधला कप भरून बर्फ घ्यायचा आणि त्यात व्हर्मूथ टाकायची. पण यात बर्फ आणि व्हर्मूथ एकत्र करणे हा उद्देश नसून त्या बर्फाला व्हर्मूथने 'ओले' करणे एवढाच आहे. त्यामुळे ताबडतोब कपावर गाळणी लावली जाते आणि ती व्हर्मूथ लगेच गाळली जाते. मग त्या शेकरमधल्या व्हर्मूथयुक्त बर्फात व्होडका टाकली जाते. आता गाळणीचे झाकण लाऊन मग शेकर पूर्ण बंद करून तो व्यवस्थित हलवायचा. म्हणजे उरलेले औषध संपवायला आपण त्यात पाणी घालून हलवतो तसे...ख्या ख्या. आता हे शेकलेले अर्थात शेकन अर्थात हलवलेले मिश्रण शेकरच्या गाळणीद्वारे त्या थंड केलेल्या ग्लासात गाळायचे. पुन्हा चवीकरता हवे असल्यास त्यात एक लिंबाचे साल टाकायचे.

झाली बॉन्ड साहेबांची 'व्होडका मार्टिनी, शेकन नॉट स्टर्ड' तयार!

'स्टर्ड' मार्टिनी तयार करताना फरक इतकाच की व्होडका शेकरमध्ये ओतली की हलवायच्या ऐवजी बारीकश्या चमच्याने थोडीशी ढवळली जाते. ती त्या थंड ग्लासात गाळली की झाली तयार 'मार्टिनी, स्टर्ड नॉट शेकन'!

पण जेम्स बॉन्डला शेकनच का लागते? स्टर्ड मार्टिनी तयार करण्याच्या कृतीचा आणि त्या पेयाची मजा घेण्याचा काय संंबंध? तर जेम्स बॉन्ड कोण आहे? तर गुप्तहेर. आता तो गावभर...आपलं....जगभर "बॉन्ड, जेम्स बॉन्ड" अशी ओळख देत बोंबलत फिरतो ते सोडा. तर, गुप्तहेराने नशा केली तर तो त्याचं काम कसं करणार? म्हणजे जिथे मार्टिनी मिळते अशा बारमधे किंवा हॉटेलात स्टाईलीत रुबाबात एन्ट्री तर मारायची असते, आणि तिथे आणखी शायनिंग मारत मद्यपान तर करायचं आहे, शिवाय नशाही हवी आहे, पण इतकीही नाही की झिंगून बेसावधपणा येईल - कारण त्याला त्याची कामगिरीही पार पाडायची आहे. पण मार्टिनी मूळ कशी तयार केली जाते, तर स्टर्ड अर्थात ढवळून. पण तसे केल्याने त्यातले अल्कोहॉलचे प्रमाण तसेच राहते. आता हे एका गुप्तहेराला कसे चालणार? म्हणून जेम्स बॉन्डला मार्टिनी शेकन हवी असते. वर दिलेल्या कृतीप्रमाणे हलवल्यामुळे कॉकटेलमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते, कारण हलवल्याने बर्‍यापैकी अल्कोहोल उडून जाते. त्यामुळे जेम्स बॉन्डला अपेक्षित न झिंगता नशा येऊन ताजेतवानेपणा आणणारे पेय तयार होते.

शॉन कॉनरी, रॉजर मूर, जॉर्ज लेझनबी, टिमथी डाल्टन, पिअर्स ब्रोस्नन यांनी ही शेकन नॉट स्टर्डची परंपरा सुरु ठेवली होती. डॅनियल क्रेगचा बॉण्ड मात्र कॅसिनो रॉयॅल (२००६) मधे जुगाराच्या एका टप्प्यात कोट्यावधी डॉलर हरल्यावर जेव्हा वेटर त्याला "सर, शेकन ऑर स्टर्ड?" असं आदबीने विचारतो, तेव्हा सटकून म्हणतो "डू आय लुक लाईक आय गिव्ह अ डॅम?"

असं करु नकोस बाबा, आम्हाला आपलं तू विचारल्यावर "शेकन नॉट स्टर्ड" असंच म्हणत जा रे.

© मंदार दिलीप जोशी
वैशाख कृ १४, शके १९४१

Monday, February 11, 2019

का रे भुललासी वरलिया रंगा: अमोल पालेकर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं प्रवचन

कालच प्रसिद्ध चित्रपट अभिनेते व निर्माते-दिग्दर्शक अमोल पालेकरांनी चित्रकार कै. प्रभाकर बर्वे यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात भलतीच टेप वाजवल्याने आयोजकांनी त्यांना विषयाला धरून बोलायचा आग्रह केला यावरून देशात गदारोळ उडाला (देशात म्हणजे ज्यांना याची काही पडली आहे अशा विश्वात, बाकी आमच्या कामवालीला अमोल पालेकर कोण हे ही माहीत नाही. तर ते असो). अमोल पालेकरांच्या कृत्याचं मुद्देसूद खंडन ते सात्विक संतापातून प्रच्छन्न शिवीगाळ अशा सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया त्यावर उमटल्या.
खूप पूर्वीपासून रुपेरी पडद्यावर दिसणाऱ्या चेहऱ्यांबद्दल आपल्याकडे प्रचंड गैरसमज दिसून येतात.



यातला प्रमुख गैरसमज असा की विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्तरातल्या, जातीधर्माच्या, आणि बुद्धीच्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या व्यक्तींना आपण सर्वज्ञ समजण्याची चूक करत आलो आहोत. त्यातही तथाकथित कलात्मक चित्रपटांबाबत ते सत्य दाखवतात हा आणि त्यात 'अभिनय' करणारे लोक म्हणजे बुद्धिजीवी आहेत हा सगळ्यात मोठा गैरसमज. गरीब आणि मध्यमवर्गांचं प्रतिबिंब दिसेल असे सिनेमे असतील तर मग काही विचारायलाच नको, लोकांनी डोक्यावर घेतले होते असे सिनेमे. उगाच नाही विक्रमी 'शोले' समोर 'गोलमाल'ने टिच्चून धंदा केला.

याबाबत नसीम निकोलस तलेब या मूळच्या लेबनीज अमेरिकन असलेल्या लेखक, विद्वान, सांख्यिकी तज्ञ, अर्थतज्ज्ञ, शेअर बाजार व्यापारी, वगैरे बरंच काही असणाऱ्या या विचारवंताचे विचार वाचण्यासारखे आहेत. नट नट्यांच्या विषयीचे त्यांचे विचार हे प्रामुख्याने हॉलीवूड अर्थात अमेरिकन चित्रपट उद्योगाशी संबंधित असले तरी कलाकारांची मानसिकता आणि समज ही नेहमीच स्थलातीत असल्याने भारतवर्षातील कुठल्याही चित्रपट उद्योगाला लागू होतात.

तलेब म्हणतात की "चित्रपटसृष्टीत काय घडतं याचा आणि आपण सर्वसामान्य लोक यांचा काहीही संबंध नसतो. तलेब  आपल्याला दोन प्रश्न विचारतात: एक तुमच्या मित्रपरिवारात किती अभिनेते आहेत? किती अभिनेते तुमच्या मित्रांचे मित्र आहेत? यात अस्तित्व आणि प्रचलन (presence and prevalence) यात गल्लत करू नये. काही अपवाद वगळता नटनट्या सामान्य लोकांत मिसळत नाहीत."

"रोमन साम्राज्यात तर नटांना लग्न करायलाही बंदी होती, इतकंच नव्हे तर त्यांना सर्वसामान्य जनतेशी मिसळायलाही बंदी असे. तुम्हाला एखादा स्त्रीरोगतज्ञ आणि इंजिनियर, गवंडी आणि वाहनचालक एकमेकांत मिसळताना दिसतील, पण अभिनेते हे त्यांच्याच जगात मशगुल दिसतात. किती क्षेत्र अशी आहेत जिथे लोकांना त्यांच्या दिसण्यावर आणि आपण जे नाही त्याचा अभिनय करण्यावर काम दिलं जातं? किती क्षेत्रात शरीराचा 'वापर' हा वर चढण्याकरता केला जातो?"

"इतर क्षेत्रातले लोक, उदाहरणार्थ स्त्रीरोगतज्ञ किंवा रेल्वे अभियंते, आपल्याला नैतिकतेची प्रवचनं देताना दिसत नाहीत. खरं तर बाह्य दिसणे यावरच ज्यांचं सगळं जग अवलंबून आहे अशा या प्रत्यक्ष वर्तन आणि वैयक्तिक मते यांच्यात प्रचंड तफावत असलेल्या या लोकांना आपल्याला नैतिकतेचे धडे देण्याचा काहीही अधिकार नाही."
मात्र नटनट्या हीच गोष्ट प्रत्येक सार्वजनिक मंचावर वारंवार करताना दिसतात आणि भोळसट (की बावळट?) लोक त्याला तितक्याच सातत्याने भुलताना दिसतात. याचं कारण म्हणजे नटनट्यांना आपला मंदपणा बाहेर दिसू नये याचं प्रशिक्षण दिलेलं असतं, त्यामुळे ते काहीही बडबडले तरी एखादा अत्यंत बुद्धिमान आणि विचारी माणूस आपल्याशी संवाद साधतो आहे असा भास निर्माण करण्यात ते यशस्वी ठरतात.

हा कार्यकारणभाव लक्षात घेतला की पैसे टाकून बनवलेला सिनेमा आणि विचारवंतांचा अभिनय करायला वर्षानुवर्ष पोसलेल्या नटनट्यांची अशी हंगामी वक्तव्य यात फारसा फरक उरत नाही हे आपल्याला समजतं.

इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे यातल्या बहुतेकांचा स्वभाव मुळातच विकृत आणि द्वेषाने भरलेला असतो आणि त्याला अनेक वर्ष पद्धतशीर खतपाणी मिळालेलं असतं.

म्हणूनच मग जाड काळ्या फ्रेमचा चष्मा लावलेला, पांढऱ्या केसांचा/ची, भलंमोठं कुंकू लावलेली, दाढीवाला, अशी कोणतीही आजी किंवा माजी नटमोगरी किंवा टोणगा हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, असहिष्णुता, वगैरे पढवलेली 'पेड' वाक्य बोलताना दिसले की एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. कारण 'बनवलेला' सिनेमा कुणी बघायलाच गेलं नाही तर तो आपटतो, आणि यांच्या वक्तव्याला भाव दिला नाही की ते हवेत विरून जातं.

आपण फार मनावर न घेता एवढंच लक्षात घ्यायचं ―
तो धंदा असतो आणि हा सुद्धा, फक्त चेहऱ्याला रंग फासून ज्या बाजारात बसायचं त्याचं ठिकाण प्रत्येक पटकथेच्या मागणीनुसार वेगळं असतं इतकंच.



©️ मंदार दिलीप जोशी
माघ शु. पंचमी शके १९४०

तळटीप: अपवादांनी वरील विवेचन स्वतःवर ओढवून घेऊ नये.

Wednesday, February 21, 2018

कोमलप्रीत कौर - एक सक्षम महिला

कोमलप्रीत कौर हे नाव किती जणांना माहित आहे?

बरं, गुरमेहर कौर हे नाव माहित आहे? हो, ती माहित असेलच. महिला सक्षमीकरण ही संज्ञा नक्की ठावूक असेल तुम्हाला. तर गुरमेहर कौरच्या आणि डाव्यांच्या मते गुरमेहर ही ट्रोल्सशी 'लढून' अधिकच 'सक्षम महिला' म्हणून उभी राहिलेली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तथाकथित झेंडा फडकवत ठेवणारी मिडियाचं लाडकं गोग्गोड बाळ असलेली गुरमेहर कौर सगळ्यांना आठवते आणि तिला महिला सक्षमीकरणाचं उदाहरण म्हणून आपल्यासमोर सतत नाचवलं जातं.

आता कोमलप्रीत कौर कोण ते सांगतो. कोमलप्रीत कौर ही कारगिलमधे लढताना हुतात्मा झालेल्या शिपाई बूटा सिंग यांची मुलगी. गरिबीशी झुंजत शिक्षण घेणारी, पंजाब मेडिकल प्रवेश परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावणारी आणि आता एम.बी.बी.एसचे शिक्षण घेत असलेली खर्या अर्थाने सक्षम मुलगी.

वयाच्या वीसाव्या वर्षी सैन्यात दाखल झालेले बूटा सिंग चार महिन्याच्या कोमलप्रीतला आणि अवघ्या वीस वर्षांच्या आपल्या पत्नीला मागे ठेऊन वयाच्या फक्त सव्वीसाव्या वर्षी कारगिलमध्ये हुतात्मा झाले. स्वतःचं दु:ख बाजूला ठेवून तिच्या आईने म्हणजे अमृतपाल कौर हिने कोमलला मोठं करण्याकडे सगळं लक्ष केन्द्रित केलं आणि आज आईचे कष्ट आणि स्वतःची मेहनत यांच्या बळावर कोमलप्रीत वैद्यकीय शिक्षण घेते आहे.

मात्र कोमलप्रीतला आज कुणीही ओळखत नाही. कारण ती आपल्या परिस्थितीचा बागुलबुवा न करता, अभिव्यक्तीच्या नावाखाली विकृती स्वातंत्र्याची कास न धरता, सोशल मिडियावर पडीक राहून आपल्या परिस्थितीबद्दल गळे न काढता, अपार कष्ट करत अभ्यासाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं राहण्याकडे अग्रेसर आहे. आयुष्याची लढाई, झगडत जगणं हे शब्द आजकाल फार स्वस्त झाले आहेत कारण सोशल मिडियावरच्या ट्रोल्सशी लढणं या चिल्लर गोष्टींना आज मिडियाने आणि डाव्यांनी ग्लॅमर प्राप्त करुन दिलेलं आहे. पण हेच शब्द, हीच आयुष्याची लढाई कोमलप्रीत अक्षरशः जगत आहे.

गरीबीतून वर आलेल्या पण आपल्या हातचं बाहुलं न बनलेल्या कुणाचंही कौतुक करण्याची दानत आजच्या मिडीयात आणि साम्यवादी विचारसरणीत नाही, किंबहुना कधीच नव्हती. काँग्रेसने त्यांना पोषक ठरण्यासाठी उभ्या केलेल्या व्यवस्थेचे हे वैशिष्ट्य आहे की गुरमेहर सारख्या हास्यास्पद व्यक्तींना आज आदर्श व्यक्तिमत्व म्हणून लोकांसमोर आणलं जातं आणि कोमलप्रीत कौर सारखे महिला सक्षमीकरणाचं प्रतीक म्हणावं अशी उदाहरणे समोर असतांना त्यांना मात्र अशा प्रकारे अज्ञातवासात घालवतं.

तर अशा या कोमलप्रीतला पुढील आयुष्याकरता अनेक शुभेच्छा.

©️ मंदार दिलीप जोशी
फाल्गुन शु. ६, शके १९३९

Wednesday, June 14, 2017

बालादपि सुभाषितम् ग्राह्यं आणि हाताला लागेल ते हत्यार

विषादप्यमृतं ग्राह्यं बालादपि सुभाषितम् ।
अमित्रादपि सद्वृत्तममेध्यादपि काञ्चनम् ॥

या श्लोकातील बालादपि सुभाषितम् ग्राह्यं हा भाग महत्त्वाचा आहे. याचा ढोबळ अर्थ लहान मुलांकडूनही अनेकदा आपल्याला काहीतरी महत्त्वाचं शिकता येतं. शाळा सुरू होण्याचे हे दिवस आहेत. आजच मुलांच्या पालकसभेला जाऊन आलो आणि शाळेत बाईंनी मुलांची आगाऊच केलेली एक तक्रार ऐकून डोक्यात लख्ख प्रकाश पडला. शाळेत मुलं मारामार्‍या करतात अशी ती तक्रार होती. वर्ष सुरू होत आहे, तेव्हा तुमच्या मुलांना आत्ताच समजावून सांगा असं त्यांचं म्हणणं होतं. इतर सूचनांमधे स्टीलची पट्टी मुलांना शाळेत देऊ नका, लाकडी द्या, कारण, मारामारी करताना मुलं अक्षरशः हाताला लागेल ती वस्तू फेकून मारतात. त्यात निरुपद्रवी खोडरबरापासून टोकदार पेन्सिली, तीर्थरूपांची हळूच ढापलेली पेनं, पट्टी, प्लॅस्टीक आणि स्टीलचे जेवणाचे डब्बे या सगळ्या वस्तू आल्या. आता आजकालची मुलं अधिक आक्रमक किंवा हिंसक होत आहेत हा मुद्दा जरा बाजूला ठेवूया. पण आपणही कधीतरी त्यांच्या वयाचे होतोच. समोरच्या मुलाने आपल्याला मारल्यावर हाताला लागेल ती वस्तू फेकून मारण्याची लहान मुलांकडे किंवा लहानपणी असलेली कल्पकता मोठेपणी कुठे जाते? मोठं झाल्यावर आपला मेंदू इतका गोठल्यासारखा का होतो? मी हे काय बोलतो आहे कळत नाही आहे ना? सांगतो.

केरळ आणि बंगालमधे हिंदूंची काय स्थिती आहे तुम्हाला वेगळं सांगायला नको, ते सगळं बातम्या आणि सोशल मिडीयामार्फत जगजाहीर झालेलं आहे. उत्तर प्रदेश, बिहार, आणि अगदी महाराष्ट्रात सुद्धा जिथे जिथे शांतीदूतांचा प्रादुर्भाव आहे तिथे तिथे हिंदूविरोधी हिंसा होतेच. या सगळ्या बातम्यांत एका गोष्टीकडे आपलं लक्ष जायला हवं. "घरात घुसून घरातल्यांच्या समोर अमक्याला मारलं किंवा तमक्याचा खून केला". मग प्रश्न असा आहे की त्यावेळी घरातले काय करत होते? याचं उत्तर अशा बातम्यांत "घरातल्यानी हल्लेखोरांकडे खूप गयावया केली", "जो मारला जात होता त्याच्या जीवासाठी हल्लेखोरांकडे भीक मागितली", "रडारड केली" या घरातल्यांच्या तत्कालीन प्रतिक्रिया अत्यंत पराभूत मानसिकतेच्या निदर्शक आहेत.

अरे! याला काही अर्थ? मान्य आहे, घरात परवान्याशिवाय हत्यारं ठेवायला परवानगी नाही. मात्र घरात स्वयंपाकघराची उपकरणं ठेवायला अजून तरी बंदी आलेली नाही. गरम पातेलं उचलायला चिमटा वापरत असालच. मारा फेकून. काही घरांत हातानी कुटलं जात असल्यास मिनी खलबत्ताही असेल. अगदी बाकी काही नाही तरी भाजी कापायची सुरी तरी असेलच. मांसाहारी असाल तर मासे किंवा मटण कापायची सुरी असेल तर आणखी उत्तम. उचला आणि जोरदार प्रतिहल्ला करा. आपल्याकडे एक म्हण आहे, "भित्यापाठी ब्रह्मराक्षस". घरातल्या कर्त्या पुरुषावर हल्ला झाल्यावर तुम्ही रडारड केलीत, हल्लेखोरांकडे त्याच्या प्राणांची भीक मागितलीत तरी तुम्ही काही सत्यवानाची सावित्री नव्हे आणि हल्लेखोर हे यमराज त्याहून नव्हेत. त्यामुळे या रडण्याभेकण्याचा काहीही परिणाम होणार नाही. झालाच, तर हल्लेखोर स्वतःच्या कृत्यावर खूष होण्याचीच शक्यता जास्त. कारण घरातला कर्ता पुरुष मारला जात असताना / गेल्यावर घरात जो हलकल्लोळ माजतो, त्याचा उपयोग इतरांवर दहशत बसवण्यासाठी त्यांना होत असतो. त्यामुळे त्यांना ब्रह्मराक्षस होण्याची संधी न देता हाताला लागेल ती वस्तू हत्यार समजून त्यांच्यावर फेकून मारा, किंवा ती वस्तू घेऊन त्यांच्यावर धावून जा.

लक्षात घ्या. पुन्हा म्हण सांगतो. भित्यापाठी ब्रह्मराक्षस. तुम्ही घाबरता म्हणून समोरचा तुम्हाला घाबरवतो, मारतो, हल्ला करतो.

दोन घटना सांगतो. पहिली बातमी नुकतीच वर्तमानपत्रात वाचलेली आहे, तर दुसरी पुर्वी सत्यघटनांवर आधारित दूरदर्शनवर सकस कार्यक्रम दाखवायचे त्या काळात अशाच एका कार्यक्रमात पाहिलेली गोष्ट आहे. हल्ली फक्त सांगितिक जल्लोष, तर्कहीन फालतू मालिका, आणि विमानापेक्षा जास्त लोक पॅनलवर बसवतात अशी चर्चावजा भांडणं यातून असल्या मनोरंजनाच्या चिखलातून असल्या बातम्या तुमच्या नजरेला पडल्याच तर त्या व्यक्तीचे कौतुक करण्याबरोबरच त्या व्यक्तीची कृती ही आपल्या स्मृतीपटलावर कोरून ठेवा.

एक. न घाबरणारी पन्नाशी ओलांडलेली एखादी महिला मोटारसायकलवरुन आलेल्या दोन चोरांना चोपून काढते आणि चोरी न करताच पळून जायला भाग पाडते.
दोन. स्वयंपाकघरापर्यंत घुसलेला चोर पाहून एखादी प्रसंगावधानी गृहिणी गॅसवर ठेवलल्या पातेल्यातलं उकळतं पाणी त्याच्या चेहर्‍यावर फेकून तो कळवळत असताना यशस्वीरित्या बाहेर पळ काढून गर्दी जमवते.

घरात घुसून जेव्हा हत्या होते तेव्हा प्रतिहल्ला होणार नाही या हिशेबानेच हल्ला झालेला असतो. मग तुम्हाला जो धक्का बसतो, तोच धक्का त्यांना द्यायला काय हरकत आहे? म्लेंछ क्रूर असतात, पण तितकेच भित्रेही असतात. त्यांच्यावर प्रतिहल्ला झाला, मग तो कशाने होतो याला महत्त्व नाही, आणि त्वेषाने प्रतिहल्ला झाला तर त्यांना स्वतःचं रक्त सुद्धा बघायला आवडत नाही. त्यात नको तिथे तुमचा वार बसला तर भळाभळा रक्तस्त्राव होऊन जागच्या जागी हल्लेखोर कोसळू शकतो. तुम्ही जितकी गयावया कराल, तितका त्यांना आनंद होतो. आणि मरायचंच असेल तर जीव वाचवता वाचवता मरा ना, कुत्र्याच्या मौतीने का मरता? स्वसंरक्षणार्थ प्रतिहल्ला केला आणि त्यात हल्लेखोर मेला तर प्रतिहल्ला करणार्‍याला म्हणजेच आपल्याला कायद्याचं सुद्धा संरक्षण आहे. तेव्हा तुमच्या प्रतिहल्ल्यात त्यांच्यापैकी एखादा मेला आणि त्याचा मृतदेह तुमच्या घरात सापडला तर तो तुमच्यावर त्याने तुमच्यावर प्रथम हल्ला केल्याचा एक महत्त्वाचा पुरावा होतो.

सुरवातीला लहान मुलांचं उदाहरण दिलं होतं. आता आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकलेल्या एका मोठ्या माणसांच्या गोष्टीकडे वळूया. अकबर बादशहाविषयी काहीही मत असलं तरी मठ्ठ अकबर आणि त्याला शहाणपणा शिकवणारा बिरबलाच्या गोष्टी फारच आवडत्या. तर अशाच एका गोष्टीत एकदा अकबर बादशहाच्या दरबारात 'सगळ्यात चांगले हत्यार कोणते?' याविषयी चर्चा चालू होती. अकबराचे सरदार निरनिराळे पर्याय उत्तम हत्यार म्हणून सांगत होते. कुणी म्हणे "तलवारीसारखं उत्तम हत्यार नाही." तर कुणी म्हणे की "दांडपटाही जोडीला हवाच". आणखी एक जण म्हणाला, "धनुष्य बाण उत्तम, सुरक्षित अंतरावरुन शत्रूवर हल्ला करता येतो". एकाने तर बंदुका आणि तोफांची नाव घेतलं. कुणी काही तर कुणी काही. या सगळ्या जोरदार चाललेल्या चर्चेत बिरबल मात्र गप्प होता. ते पाहून बादशहाने त्याला मुद्दाम विचारलं, "क्यों पंडित बिरबल, तुम क्या कहते हो?" बिरबलाने शांतपणे उत्तर दिलं, "जी हुजूर, खाविंदांच्या मान्यवर सरदारांनी सांगितलेली ही सगळी हत्यारं खासच आहेत, पण माझ्या मते जो ऐन वख्त पर हाथ लगे वो हथियार ही खास होता है". अकबराला हे उत्तर जरा जास्तच अनपेक्षित होतं, "नहीं बिरबल, ये बात हमें ठीक नहीं लगी. आखिर कोई एक हथियार तो सबसे खास होगा ही!"

"आप कहते हैं तो होगा जहांपनाह, लेकिन मेरी तो यही राय रहेगी". बादशहाला आणि त्याच्या इतर दरबार्‍यांना हे उत्तर जरा अगोचरपणाचं वाटलं, पण बिरबल नेहमीच अशी वेगळी उत्तरं देतो म्हणून सगळ्यांनी ते हसून सोडून दिलं.

या नंतर काही दिवसांनी अशाच एके दिवशी बिरबल त्याच्या नेहमीच्या रस्त्याने देवदर्शनाला चालला होता. देवळात जाताना त्याला एके ठिकाणी एका चिंचोळ्या गल्लीतून जावे लागत असे. आज तो ती गल्ली अर्धी ओलांडल्यावर बघतो तर काय, समोरून एक महाकाय पिसाळलेला हत्ती जो समोर येईल त्याला पायाखाली तुडवत, सोंडेनं फेकून देत धावत येत होता. आता मात्र बिरबल घाबरला. तो देवदर्शनाला निघाल्याने त्याच्याकडे काहीच हत्यार नव्हतं, ना तलवार, ना भाला, ना धनुष्यबाण. प्रत्येक क्षणी हत्ती आणि त्याच्यातलं अंतर कमी होत चाललेलं होतं. त्याने इकडेतिकडे पाहिलं....आणि त्याला जवळच एक रस्त्यावरचे उकिरडे हुंगणारं कुत्रं दिसलं. बिरबलाने निमिषभर विचार करुन त्या कुत्र्याचं तंगडं धरून ते हवेत गरागरा फिरवलं आणि हत्ती पुरेसा जवळ येताच त्याच्या दिशेने फेकून मारलं ते नेमकं त्याच्या गंडस्थळावर आदळलं! बरं आदळलं ते आदळलं वरतून ते तिथून घसरून पडू नये म्हणून आपल्या पंजे रोवून तिथे चिकटण्याचा प्रयत्न करु लागलं.

नको तिथे काहीतरी आदळल्याने आणि वर त्याच्या बोचकारण्याने हत्ती बावचळला आणि ताबडतोब पीछे मुड करुन विरूद्ध दिशेला पळत सुटला. अशा रीतीने बिरबलाने सुटकेचा निश्वास टाकला. दिल्लीतल्या भर रस्त्यात ही घटना घडल्याने बादशहाच्या कानापर्यंत जायला फार वेळ लागला नाही. तेव्हा त्याला मनोमन कबूल करावंच लागलं, "ऐन वख्त पर हाथ लगे वो हथियार ही खास होता है".

ही गोष्ट फक्त अकबराची फजितीची मजा घ्यायला आणि बिरबलाच्या बुद्धीमतेचं आणि प्रसंगावधानाचं कौतुक करायला नव्हे, तर त्यातून बोध घेण्याकरता आहे. आपल्या घरच्यांवर हल्ला झाला, तर दिसेल त्या वस्तूने प्रतिहल्ला करा. भाजी कापायची सुरीने सपासप मारत सुटा; मिसळणाच्या डब्यातलं तिखट डोळ्यात जाईल असं फेका, नाही तर आख्खा स्टीलचा डबाच फेकून मारा; पोळ्या करायचं लाटणं डोक्यात घाला; कचर्‍याची बादली फेकून मारा - पण स्वस्थ बसू नका. काही घरात किरकोळ दुरुस्तीची काही सामुग्री असते. त्यात स्क्रूड्रायव्हर, हातोडा, आणि खिळे ही सगळ्यात उपयुक्त सामुग्री आहे. आता नवीन तंत्रज्ञानामुळे भिंतीत खिळे ठोकायला हातोडा लागत नाही. त्यासाठी बंदुकीतून गोळी मारल्यासारखे खिळे भिंतीत मारता येतात अशी यंत्रे निघालेली आहेत. मी तुम्हाला पर्याय सांगतो आहे, शेवटी काय, उपलब्ध असेल आणि हाताला लागेल ते हत्यार. एकदा तुम्ही भ्यायचं सोडलंत तर ब्रह्मराक्षसाला पळवून लावणं हे फार कठीण नाही.

जाता जाता, जमलं तर सेल्युलर (Cellular) हा इंग्रजी सिनेमा बघा. आपल्यावर किंवा कुटुंबियांवर हल्ला करणार्‍या माणसाला रोखायला त्याला कुठलंतरी हत्यार घेऊन अनेकदा भोसकायला लागतं असं नाही. सिनेमातल्या नायिकेच्या घरावर काही बदमाश हल्ला करुन सगळ्यांना ओलीस ठेवतात. कथेच्या खोलात जाण्यात अर्थ नाही, पण आपल्यावर हल्ला करणार्‍या एका बदमाशाला जीवशास्त्राची शिक्षिका असलेली नायिका दंडातल्या एका धमनीच्या जागी काचेच्या तुकड्याने वार करुन कशी ठार करते, ते बघण्यासारखं आहे. हा संपुर्ण सिनेमा थरारक आहेच, पण प्रस्तुत लेखाच्या अनुषंगाने हा प्रसंग साडेत्रेपन्नाव्या (53:30) मिनीटापासून पहा.



तेव्हा, आत्मानं सततं रक्षेत - आपले सातत्याने रक्षण करा!

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ कृ. ४, शके १९३९ 

Wednesday, October 12, 2016

मी आणि माझा होऊ पाहणारा शत्रूपक्ष

आमच्या सोसायटीच्या चेअरमनबाईंनी नुकतीच एक कुत्री पाळली आहे. तिचं नाव लायका. कुत्री असल्यामुळे नाव लायकी असावं असं मी म्हणालो, म्हणजे मनातल्या मनात म्हणालो. आम्ही मनातच म्हणायचे. पण अंतराळात गेलेला पहिला प्राणी म्हणजे रशियाने पाठवलेली (आणि परत न आलेली) लायका ही कुत्री म्हणून तिचे ते नाव तसे असल्याचे समजले.

परवा काही कामानिमित्त त्यांच्या घरी गेलो असता "ती काही करत नाही, आपण स्वस्थ उभं रहायचं" हे पुल्देश्पांडे नावाच्या द्रष्ट्या माणसाने लिहीलेलं वाक्य पुन्हा ऐकायला आलं. बरमुडा घालून गेल्याने दोन्ही पायांना गधडीने तेल आणि उटणं रगड रगड रगडल्यागत चाट चाट चाटलं आणि हा मनुष्यप्राणी उपद्रवी नसल्याची खात्री पटल्यावर पाडवा साजरा झाल्याचा आनंद झाल्यासारखी आत निघून गेली.

आत गेल्यावर काम करत बसलो होतो तेवढ्यात बाईसाहेब (म्हणजे लायका, चेअरमनबाई नव्हे) आतून परत बाहेर आल्या. लायकाला मी खूपच आवडलो होतो की काय कळेना कारण तिने माझ्याकडे मोर्चा वळवला. ते बघताच तिचा पट्टा धरून बाईसाहेब (म्हणजे चेअरमनबाई, लायका नव्हे) त्यांच्या ऑफिसातला एक तरुण डायनिंग टेबलवर बसला होता त्याच्याकडे बोट दाखवून "लायका, यु आर डुइंग अ व्हेरी बॅड बॅड काम बरं का" या चालीवर त्या म्हणाल्या, "अं हं, असं नाही करायचं, तिकडे जा तो बघ दादा आलाय!"

लायकाच्या दादाकडे माझी पाठ असल्याने त्याचा खर्रकन् उतरलेला चेहरा मला दिसू शकला नाही पण जाहीरातीत दाखवतात तसं इज्जत का फालुद्याची काच खळ्ळकन फुटल्याचा आवाज ऐकल्याचा भास मात्र नक्की झाला.

© मंदार दिलीप जोशी
कार्तिक शु. १, शके १९३८