Tuesday, September 7, 2021

Nokku Kooli (टक लावून बघण्याची मजुरी)

केरळात तुम्हाला तुमच्या घरातलं सामानही युनियन मार्फतच उतरवून घ्यावं लागतं. मोडतोड व्हायच्या किंवा अव्वाच्या सव्वा मजूरी मागितली जाण्याच्या भीतीने तुम्हाला तसं करायचं नाहीये? हरकत नाही, युनियनवाले लांबूनच तुम्हाला सामान उतरवून घेताना बघत बसतील.

Nokku kooli

तुम्ही पूर्ण सामान उतरवून घेतलंत की युनियनवाले येतील आणि मजुरी मागतील. काम नाही केलं म्हणून काय झालं, तुम्हाला सामान उतरवून घेऊ दिलं ना. दुरून बघितलं, मोडतोड केली नाही...सामान असो की तुमचं डोकं, उपकारच नव्हेत का ते? त्याचीच तर मजुरी मागत आहेत ते! त्यालाच मल्याळममध्ये nokku kooli म्हणतात. बंगालमधेही हेच व्हायचं

म्हणूनच केरळात फारसे उद्योग नाहीत, म्हणूनच केरळचं GST कलेक्शन हरियाणाच्या एक तृतीयांश आहे, म्हणूनच तिकडच्या मुली आयसिसमध्ये आनंदाने सामील व्हायला जात असतात.

कम्युनिझम/समाजवाद ही राजकीय/आर्थिक विचारधारा नाही, फक्त आणि फक्त गुंडगिरी आहे, म्हणूनच जे राज्य किंवा प्रदेश यांच्या नियंत्रणात येते त्याचा संपूर्ण सत्यानाश होतो. याचं कारण कुठल्याही गुन्हेगारी समाजाचा विनाशच होतो मग ते आपल्या विचारधारेला राजकीय म्हणोत की मजहबी.

विकली गेलेली माध्यमे आणि विचारजंत यांच्याकडून केरळमधली ही लाल गुंडगिरी उघड होण्याची अपेक्षा नाहीच, पण अशा गोष्टींची माहिती घेऊन हे आपल्या दारापर्यंत पोहोचणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. 

आणि हो, केरळमध्ये मल्याळममध्ये ज्याला nokku kooli म्हणतात, त्याला महाराष्ट्रात 'खंडणी' म्हणतात, बरोबर ना?

🖋️ मंदार दिलीप जोशी



2 comments:

  1. महाराष्ट्रात माथाडी कामगार युनियन हेच करते, ठाण्यात कोणताही ट्रक अनलोड करायला त्यांनाच बोलवावं लागतं अन्यथा माल उतरवू सुद्धा देत नाहीत

    ReplyDelete
    Replies
    1. Agree, रांजणगाव midc मध्ये पण असेच होते, माथाडी chi गुंडगिरी चालते.

      Delete