Wednesday, July 11, 2018

केरळ: करक्किडकम अर्थात रामायण मासम् आरंभ


येत्या मंगळवारी म्हणजेच सतरा जुलै पासून केरळ राज्यात करक्किडकम अर्थात यंदाचा रामायण मासम् सुरु होत आहे. हा मास सोळा ऑगस्ट पर्यंत चालेल.

सूर्याचा मिथुन राशीतून करक्किडक राशीत प्रवेश होताना हा महिना सुरु होतो. या महिन्यात केरळमधील लोक काही व्रतांचे पालन करुन प्रभू श्रीरामांच्या दैदिप्यमान आणि पराक्रमी आयुष्यावर आधारित 'अध्यात्म रामायण किलिप्पपटू' या ग्रंथाचे पठण व श्रवण करतात.

पण हे अध्यात्म रामायण किलिप्पपटू आहे तरी काय? किलिप्पपटू याचा शब्दशः अर्थ होतो पोपटाने सांगितलेले. तथापि त्याचा भावार्थ वेगळा आहे. ते सांगण्याआधी त्याच्या किलिप्पपटूच्या थोर निर्मात्याबद्दल बोलावे लागेल.  सुमारे ४५० वर्षांपूर्वी केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यात जन्मलेल्या थुन्जथू रामानुजन एझुथचन यांनी सोळाव्या शतकात या अध्यात्म रामायणाची रचना केली आणि तेव्हापासूनच रामायण पठणाची प्रथा केरळमध्ये सुरु झाली. याच रामायणाचं वैशिष्ट्य असं की मल्याळी भाषेचे जनक म्हटल्या जाणार्‍या थुन्जथू रामानुजन एझुथचन यांनी  संस्कृत आणि मल्याळम् भाषेचं एक प्रकारचं व्याकरणप्रचूर क्लिष्ट मिश्रण असलेल्या मणिप्रवळम् पद्ध्तीची  भाषा टाळून, सामान्यांतल्या सामान्य माणसाला समजेल अशा अत्यंत सरळ, साध्या, आणि ओघवत्या मल्याळी भाषेत अध्यात्म रामायणाची रचना केली. अध्यात्म रामायणातून थुन्जथू रामानुजन यांनी मल्याळी भाषेला एक नेमकेपणा आणि प्रवाहीपणा बहाल केला जो आजही दैनंदिन वापरातील मल्याळीमधे वापरात आहे. थुन्जथू रामानुजन यांच्या कार्याची तूलना करायची झाली तर आपल्याकडे ज्ञानेश्वर माऊलींनी श्रीमद्भगवद्गीतेचे प्राकृतात रूपांतर करुन ज्ञानेश्वरी रचली त्याच्याशी करता येईल.

 आपल्याकडे जवळजवळ सगळे सण आणि प्रथा या चारही ऋतूंशी निगडित आहेत. करक्किडकम महिन्यातली अतिप्रचंड पर्जन्यवृष्टी आजार, गृहौपयोगी वस्तुंचे दुर्भिक्ष्य, अपघात अशा अनेक अरिष्टांना आमंत्रण देते. या महिन्यात केरळात शेतीवर आणि शेतीशी निगडीत उत्पादनांवरही विपरीत परिणाम होतो. म्हणूनच केरळमध्ये करक्किडकम महिन्याला परंपरागत मल्याळी भाषेत "पंज मासम्" अर्थात तीव्र दुर्भिक्ष्याचा महिना म्हणतात. कदाचित याच कारणामुळे लग्न व मुंज इत्यादी मंगलकार्ये आणि नव्या उपक्रमांची सुरवात या महिन्यात केली जात नाही.

अशा या अवघड कालखंडातून तरुन जाण्यासाठी या रामायणाचे पठण व श्रवण करणे ही व्यक्ती व समाजाकरता लाभदायक असल्याची इथल्या लोकांची श्रद्धा आहे. या मासात ओढवणार्‍या संकटांवर मात करण्यासाठी आणि अडचणीच्या निवारणार्थ करक्किडकम महिन्यातले सगळे म्हणजेच ३१ दिवस घराघरात आणि देवळांमध्ये संपूर्ण श्रद्धेने आणि नियमितपणे अध्यात्म रामायण किलिप्पपटूचे पठण करण्याची पद्धत आहे. समई (नीलविलक्कू)  समोर बसून त्या प्रकाशात लयबद्ध स्वरात रामायण पठण करावे आणि करक्किडकम मासाच्या शेवटाच्या दिवशी ते संपवावे(च) असा संकेत आहे. या मासात लोक कोट्टायम आणि थ्रिसूर येथे असलेल्या राम, लक्ष्मण, भरत, आणि शत्रुघ्न यांच्या मंदिरांनाही भेट देतात. याला नलम्बलम दर्शनम् असं म्हटलं जातं.



 निव्वळ अध्यात्मिक साधना किंवा उन्नती हे रामायण मास पाळण्याचं कारण नाही. आपल्या संस्कृतीतल्या प्रथा आणि परंपरा यांचे श्रद्धापुर्वक आणि निष्ठापूर्वक पालन व्हावे हा रामायण मासाचा प्रमुख उद्देश आहे. वाढती लोकसंख्या आणि तदनुषंगाने येणारे रोजगाराचे दुर्भिक्ष्य, आधुनिक जीवनशैलीमुळे धर्मकार्याकरता उपलब्ध असणारा वेळ हा कमी होत जाणे ही गोष्ट केरळमधेही होऊ लागली आहे. दोन पिढ्यांमधला संघर्ष हा ही याला कारणीभूत ठरतो आहे. यात भर म्हणजे केरळमधल्या साम्यवादी राजवटीमुळे हिंदूंना दहशतीखाली वावरावे लागणे. या गोष्टींचा परिणाम रामायण मासावर झाला नसता तरच नवल होतं. तथापि काही परंपरेचा यथोचित आदर करणार्‍या घरांत अजूनहीं रामायण मासांतल्या प्रथा पाळल्या जातात; यात घरातील वयोवृद्ध आजीआजोबांचा पुढाकार असतो हे सांगणे न लगे. जवळजवळ सर्व  देवळात, विशेषतः विष्णू मंदिरांत, करक्किडकम  महिन्यात रामायण पठण करण्याची पद्धत अजूनही तितक्याच निष्ठेने पाळली जाते. उत्तरेकडे ज्याप्रकारे सार्वजनिक मैदानात आणि सभागृहात रामलीला सादर केली जाते त्याच धर्तीवर काही धार्मिक/अध्यात्मिक संघटना 'रामायण पारायणम्' चे कार्यक्रम आयोजित करतात. स्थानिक प्रसारमाध्यमांतूनही अनेक वाहिन्यांवर रामायणावर उत्तम कार्यक्रम, चर्चासत्रे, पठणे इत्यादी कार्यक्रम करक्किडकम महिन्यात सादर केले जातात. आपल्याकडे कसं गणपतीत गुरुजी मिळाले नाहीत की काही घरात सीडी आणि डीव्हीडी लाऊन पूजा केली जाते तसंच हल्ली केरळातही रामायण पठणाच्या सीडी व डीव्हीडी उपलब्ध होतात.

 तथापि सीडी आणि डीव्हीडींची गरज पडू नये इतकी सोपी भाषा या अध्यात्म रामायण किलिप्पपटूची असल्याने अगदी दहा ते अकरा वर्षाचं लहान मूलही आपल्या घरातल्या मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली रामायणाचे पठण करु शकतं. या साध्या सरळ भाषेमुळेच काळाच्या ओघात इतक्या वर्षांनंतरही ही प्रथा टिकून राहिली आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनातही ज्यांना आपल्या प्रथा व परंपरांबद्दल आदर व श्रद्धा आणि रामायणाचे सार जाणून घेण्याची मनापासून इच्छा आहे ते या करता करक्किडकम मासात वेळ काढतातच. पूर्ण अध्यात्म रामायण पठणाकरता करक्किडकम मासाचे ३१ दिवस पुरेसे असतात. मन लावून संपूर्ण महिना लयीत रामायण वाचल्यास ते केवळ मन:शांती करताच नव्हे तर मन व शरीर अशा दोन्हींच्या शुद्धीसाठी खूप लाभकारक असते अशी तिथल्या लोकांची समजूत आणि अनुभव आहे.



पण रामायण पठणाचा एवढाच लाभ आहे का? करक्किडकम महिन्यात वाचायचा एक ग्रंथ एवढ्यापुरतं त्याचं महात्म्य मर्यादित आहे का? तर नाही. रामायणातून मिळणारा अध्यात्मिक आनंद ही फक्त एक बाजू आहे. रामायणाचा गाभा म्हणजे रामाचं पराक्रमी आणि अद्वितीय आयुष्य आहे. एका सद्वर्तनी मनुष्याच्या असाधारणपणाची कथा आहे. त्याच्या आई-वडील आणि गुरुजन आणि सर्व मोठ्यांबद्दलचा आदर करण्याच्या, समवयस्कांचा यथोचित मान राखण्याच्या, आणि आणि लहानांसमोर आदर्श घालून देण्याच्या गुणांची अनुकरणीय गाथा आहे. मोठ्या भावाचा  असा आदर्श समोर असताना आपलंही वर्तन आदर्शवत  कसं असावं याचा वस्तुपाठ लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न घालून देतात. सीतेच्या विशुद्ध पतीनिष्ठेची आणि सोशिकतेची कहाणी म्हणजे रामायण. आपल्या स्वामींप्रती असीम निष्ठा आणि भक्ती बाळगणार्‍या पवनपुत्र हनुमानाची गोष्ट म्हणजे रामायण. थोडक्यात, रामायणात बंधुता, राज्य व स्वामीनिष्ठा, मोठ्यांबद्दलचा आदर आणि आज्ञाधारकपणा, प्रचंड कष्ट, सहनशक्ती, आणि चिकाटीने अशक्यकोटीत असल्याचे भासणारे लक्ष्य गाठण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती या सार्‍या गोष्टी रामायणाचा गाभा आहेत. मुलांना निव्वळ शिकवून हे गुण मुलांच्यात बाणवता येणार नाहीत. त्या करता रामायणापेक्षा उत्तम ग्रंथ नाही.

संदर्भ:
(१) 'Ramayana month' begins in Kerala
(२) Kerala’s Ramayana Masam Holds Its Own Despite Having Reached The ‘Next-Gen’ Phase

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ कृ. १३, शके १९४०


Saturday, July 7, 2018

छाप तिलक सब

कुछ बातें ऐसी हो जाती है, जिससे पता चलता है कि हिन्दू अपने धर्म से आसानी से च्युत नहीं होते!

आज ऑफिस जाते हुए एक बड़ी प्यारी घटना हुई। 

पहले इस की कुछ पृष्ठभूमि बता दूँ - मैंने ट्विटर और फेसबुक पर पढ़ा था कि बगैर भूले माथे पर तिलक धारण कर के ही घर से निकलें, यह अपने धर्म के चिन्ह को गर्व के साथ दिखाने वाली बात है।  कई वर्षों से मेरा यह नित्यक्रम रहा है, सो आज भी तिलक लगा कर पूजा कर मैं घर से निकला। 

रस्ते में मेरी कार ने पैट्रोल माँगा, और धमकाया कि यदि न मिला, तो लौटते समय परेशानी करवाऊँगी! मजबूरन मैं पैट्रोल पम्प की ओर मुडा। पैट्रोल डलवा कर हवा भरवाने रुका था, कि अटेंडेंट ने कौतूहलवश पूछा, "जी, क्या आप पुणे से हैं?" मैंने हामी भरी, और उसके कुतूहल का कारण पूछा। उसने मेरा तिलक देखा था, और शायद उसके पूछने कर अर्थ यह था कि और शहरों के, ख़ास कर मुंबई के लोग अपने धार्मिक चिन्हों का इतना दिखावा नहीं करते है। 

उसके बाद उस की नजर मेरी कार पर लगे हनुमान २.० वाले स्टिकर पर पड़ी, और पूछने लगा कि क्या यह कार्टून है या कोई साधारण चित्र! मैंने उसे बताया कि केरल के किसी कलाकार ने इसे बनाया था, और आंतरजाल के माध्यम से यह विश्वभर फैल गया है, और आज कोई भी इसे बाजार से खरीद सकता है। 

आंतरजाल से शायद वह उतना परिचित न हो, यह जानकर मैंने मेरे पास के स्टिकर्स से एक हनुमान २.० का अंडाकार स्टिकर निकाल कर भेंट किया। उसे पा कर उसकी बाँछे खिल उठी!

इसी बीच गाडी में रखे रामचरितमानस को देखकर उसने पूछा क्या आप रोज पढ़ते हो? मैने कहा एखाद पन्ना रोज पढ़ लेता हूं.

मेरे कार के एक पहिए के वाल्व की टोपी गिर गई थी, सो उस ने खुद से नई लगा कर दी, और जब अगली बार खरीदने जाएं तो कौन सा ब्रैंड बेहतर होगा उस के बारे में भी बताया।  हम ने फिर एक दुसरे की विदा ली, और मैं अपनी राह चलता बना।

मेरे १० वर्ष के वाहन चालन के इतिहास में किसी पैट्रोल पम्प अटेंडेंट से यह मेरी पहली इतनी लम्बी बातचीत थी।  और वह भी मुस्कुराते हुए, बंधुत्व की भावना से! सिर्फ मेरे माथे के तिलक और कार पर सजे हनुमान २.० वाले स्टिकर की वजह से!

सोचा, यहां से अवश्य उभर सकते हैं हम.

दिन के इस से बेहतर प्रारम्भ की मैं कल्पना नहीं कर सकता हूँ!

जय श्रीराम! जय हनुमान!!

मूल लेखन ©️ मंदार दिलीप जोशी
हिंदी रुपांतर: ©️ कृष्ण धारासूरकर

जेष्ठ कृ. ८, शके १९४०

Wednesday, June 20, 2018

रजियाची गोष्ट आणि धडा

...आणि पासष्ट वर्षांचा म्हातारा मेहरदीन...रात्रभर रजियाच्या अप्रतिम सौंदर्यात न्हाऊन निघत राहिला.

एखाद्या संगमरवरात कोरलेल्या शिल्पासारखं आरस्पानी सौंदर्य. श्रावणातल्या कृष्णमेघ भासावेत असा कमरेपर्यंत पसरलेला केशसंभार. कोवळं वय....जेमतेम अठरा एकोणीसची असेल रजिया. मेहरदीनची नात तिच्याहून मोठीच होती.

रजिया चार दिवसांपूर्वीपर्यंत मेहरदीनचा मेहुणा शौकतची बायको होती. सौंदर्यखणी असलेल्या रजियाचा निकाह दोन वर्षांपूर्वीच शौकतशी झाला होता. अजून मुलंही झाली नव्हती तिला.

पण हाय रे नशीब! एक दिवस रागाच्या भरात शौकतने तिला तलाक देऊन टाकला.....तीन तलाक!!

शौकत अनाथ होता. त्याचे अम्मी-अब्बा तो लहान असतानाच इहलोक सोडून गेले होते. मोठी बहीण शगुफ्ता आणि मेहुणा मेहरदीन यांनीच त्याचं पालनपोषण केलं होतं. शौकत आपल्या बहिणीकडेच रहायचा आणि मेहरदीनकडून सुतारकाम आणि इतर कारागिरी शिकायचा. उपकाराने मिंधा झालेला शौकत मेहरदीनला बापासारखाच मान द्यायचा. त्यामुळे शौकतने उचललेल्या या आततायी पाऊलामुळे मेहरदीन चांगलाच नाराज झाला होता. पण आता जे व्हायचं ते होऊन गेलं होतं. तीन तलाक दिल्यावर आता रजिया शौकतला परस्त्रीसमान होती.

हलालाचा विषय निघताच शौकत रडत रडत मेहरदीनला म्हणाला, "जीजाजी, आता तुम्हीच मला या संकटातून सोडवू शकता. भलत्याच कुणाकडे हे काम जाण्यापेक्षा तुम्हीच हलाला करा. माझा फक्त तुमच्यावर भरवसा आहे!"

खूप मिन्नतवार्‍या केल्यावर एकदाचा मेहरदीन तयार झाला.

आणि अशा प्रकारे आज कोवळी रजिया ६५ वर्षांच्या मेहरदीनबरोबर झोपली.

इकडे शौकत रात्रभर कूस बदलत जागाच होता. कशीतरी बेचैनीत रात्र काढल्यावर तांबडं फुटण्याच्या वेळीच शौकत बहिणीच्या घरी हजर झाला.

रात्री उशीरापर्यंत जागरण केल्याने मेहरदीन सकाळी उशीरा उठला. तोपर्यंत रजिया आंघोळ वगैरे उरकून तयार झाली होती. पण आता शौकतच्या नजरेला नजर भिडवण्याची तिच्यात हिंमत उरलेली नव्हती.

मेहरदीनने आरामात उठून सकाळची आह्निके उरकली आणि शौकतला सामोरा गेला. इतक्यात चहा आला. चहाचे फुरके घेत मेहरदीन म्हणाला, "हे बघा शौकत मियाँ, माझं वय झालंय म्हणून म्हणा आणि इतर काही कटकटी म्हणा, आज रात्री काही मी रजियाशी संभोग करु शकलो नाही बुवा!"

"आणि तुला तर दीनचे नियम माहित आहेच. जो पर्यंत शारिरिक संबंध येत नाहीत तो पर्यंत हलाला पूर्ण झाल्याचं मानलं जात नाही."

पडद्याआडून हा संवाद ऐकत असलेली रजिया अंतर्बाह्य हादरली... "या अल्लाह, एवढा मोठा विश्वासघात, इतका खोटारडेपणा!" पण चरफडत बसण्यावाचून तिच्याकडे आणि डोकं धरून बसलेल्या शौकतकडे काहीही पर्याय नव्हता. रजिया परस्त्री असल्यामुळे खरंखोटं करायला तिच्याशी थेट बोलताही येत नव्हतं. मान खाली घालून परतण्याखेरिज शौकतकडे काही उपाय उरला नाही.

हाच प्रकार पुढचे अनेक दिवस सुरु राहिला....तेच बहाणे...तेच खोटं बोलणं....तोच विश्वासघात.

आता रजिया पूर्णपणे अस्वच्छ, सतत पान खाउन वास मारणार्‍या घाणेरड्या तोंडाच्या लोचट मेहरदीनच्या कर्‍ह्यात होती. तिच्या कोवळं, आरस्पानी सौंदर्याला आता रोज रात्री मेहरदीनकडून चुरगळलं जाण्याचा शाप लागला होता.

साधारण तीन चार महिने झाले असतील, रजियाला दिवस गेले! आता मेहरदीन पूर्णपणे सुरक्षित होता. कारण गरोदर स्त्रीला तलाक देता येत नाही! मजहब त्याची इजाजत देत नाही!!

या घटनेला आता अनेक वर्ष झाली होती. शौकतने दोन तीन वर्ष वाट पाहून दुसरी बायको आणली....आणि इकडे खरोखर वय झाल्याने मेहरदीन अल्लाहला प्यारे झाले!

ऐन तारुण्यात बेवा (विधवा) झालेली रजिया धुणीभांडी करुन आपला उदरनिर्वाह करु लागली आणि एकटीच आपल्या पोराला मोठं करु लागली. एका शौहरने रागाच्या भरात तलाक दिलेला. दुसर्‍याने फसवून तलाक दिलाच नाही,आणि त्याच्या मृत्यूनंतर कुणीही सांभाळ करायला नकार दिलेली रजिया पोरावर काय आणि कसे संस्कार करु शकणार होती? त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. आता तिचं पोरगं गर्दुल्लं झालं आहे. नशेत पूर्ण वाया गेलं आहे.

काल अचानक पन्नाशीला टेकलेली रजिया मला भेटली.  माझ्याचकडे येत होती. मी विचारलं, "कशी आहेस रजिया? बरी आहेस ना,?"

"हो पंडितजी, अल्लाहची कृपा आहे सगळी. एक काम होतं तुमच्याकडे. या २००० च्या नोटेचे सुट्टे करुन द्या ना ..."

तिच्या हातातून ती नोट घेऊन उलटसुलट करुन बघत असतानाच तिला विचारलं,  "सुट्टे कसे देऊ? म्हणजे, पाचशेच्या नोटा देऊ की शंभराच्या?"

ती म्हणाली "पंडितजी पाचशेच्या तीन द्या आणि बाकी शंभराच्या. रमजान सुरु होतोय. तीनचारशे तर मशिदीत दान द्यायचेत!"

हे ऐकून मी चक्रावलो. माझं डोकं सुन्न झालं.

ज्या मजहबने तिचं तारुण्य, तिचा संसार...तिचं सर्वस्वच तिच्याकडून हिरावून घेतलं.... अनाथ केलं, लोकाच्या घरी धुणीभांडी करुन जेमतेम पोट भरेल इतकीच कमाई होईल असं आयुष्य जगायला भाग पाडलं......

त्याच मजहब बद्दल मनात इतकी श्रद्धा ?!

इतकं सगळं होऊनही, धुणीभांडी झाडूलादी करुन करुन कमावलेल्या पैशातून चारशे रुपये मशीदीला दान?

आणि इथे कुठल्यातरी गावच्या "दानशूर" श्रेष्ठींनी तीन चार पिढ्यांच्या आधीच्या काळात वाड्यावर पूजा घातल्यावर, किंवा इकडे शहरात एखादी सत्यनारायणाची पूजा घातल्यावर, किंवा कुठल्यातरी देवळात, कधीतरी कुठल्यातरी भटजीबुवांना अकरा रुपयांची दक्षिणा दिल्यावर त्या श्रेष्ठींची नातवंडं पण कधीकाळी बापजाद्यांनी दिलेल्या त्या अकरा रुपयांवरुन आजही टोमणे मारताना दिसतात. देवळांना सरकारला किती कर द्यावा लागतो हे माहित नसलेले अर्धवटराव देवळात जमा झालेल्या नोटांच्या फोटोसकट व्हॉट्सॅपवर मेसेज ढकलताना दिसतात. उदाहरणं बरीच आहेत अशी.

नक्की कसं 'त्यांच्याशी' लढणार आहात तुम्ही?

अजून वेळ गेलेली नाही....जागे व्हा!

©️ मंदार दिलीप जोशी
जेष्ठ शु. ८, शके १९४०

https://bit.ly/2tnmEqD

मूळ हिंदी पोस्टः श्याम मणी त्रिपाठी (https://bit.ly/2lj8QKj)

और 65 साल का  बूढ़ा ...मेहरदीन ..रात भर रजिया के बेपनाह हुस्न में गोते लगाता रहा ..!
संगमरमर सा तराशा पारदर्शी जिस्म !
भादों के मेघ सी आच्छादित आगे कटि तक लहराती केशराशि .!
कमसिन उम्र ...! यही कोई अठारह उन्नीस की।।
उससे बड़ी तो मेहरदीन की पोती थी ..!!

रजिया ...चार दिन पहले तक मेहरदीन के साले शौकत की बीबी हुआ करती थी ।।

बेपनाह हुस्न की मलिका रजिया
अभी दो साल पहले ब्याह के आई थी ।।
अभी बाल बच्चे भी न हुए थे रजिया को ।।

पर इसे रजिया की किस्मत कहिये के शौकत ने गुस्से में आके तलाक दे दिया ... तीन तलाक ।।
शौकत अनाथ था ।।
मा बाप बचपन में चल बसे थे ।।
बहन शगुफ्ता और बहनोई मेहरीदीन ने ही उसे पाला था ।।
शौकत अपने बहन के घर ही रहता था ..!
और मेहरदीन से लकड़ी की कारीगरी सीखता था ।।
शौकत हमेशा ही मेहरदीन को बाप से भी बड़ा सम्मान देता था ।।
शौकत के इस कदम से मेहरदीन बहुत नाराज हुआ था ।।
पर जो होना था वो तो हो चुका था ।।
अब रजिया शौकत मियाँ के लिए पराई समान थी ।।
हलाला की बात चली तो ..शौकत ने रोते हुए मेहरदीन से कहा ...! दूल्हे भाई (जीजा ) अब आप ही मुझे इस मुसीबत से निकाल सकते हो ।।
किसी और के बजाय आप ही हलाला कर लो .!
आप पे मुझे भरोसा है ।।
मेहरदीन बड़ी मुश्किल से तैयार हुआ ।।
और इस तरह आज कमसिन रजिया  65 साल के मेहरदीन की हमबिस्तर हुई ।।

दूसरी ओर शौकत भी रात भर करवटें बदलता रहा ।। जैसे तैसे रात बीती ... और मुहं अंधेरे शौकत बहन के घर हाजिर हुआ ।।
देर रात तक जागने की वजह से मेहरदीन थोड़ी देर से सो के उठा ।।
तब तक रजिया नहा धो के तैयार हो चुकी थी ।।
पर वो अब शौकत से नजरें न मिला पा रही थी ।।
उधर मेहरदीन तसल्ली से उठा ..नित्य कर्म से फारिग हो के शौकत से मुखातिब हुआ ।।
चाय की चुस्की के बीच मेहरदीन बोला ...!
देखो शौकत मियाँ ..... कुछ उम्र का तकाजा समझिये और कुछ अन्य उलझने ...!!
आज की रात मैं रजिया से जिस्मानी ताल्लुकात न बना सका ..!
अब मियाँ तुम्हे तो दीनी मसायल का पता ही है ...
जब तक जिस्मानी ताल्लुकात न बन जाएं तब तक हलाला मुकम्मल नहीं होता ..!
मेहरदीन की बातें पर्दे के पीछे से सुन रही रजिया कांप उठी ..! या अल्लाह इतना बड़ा झूठ ..!!
उधर शौकत सर झुकाए जड़ हो चुका था ।।
और अब पराई हो चुकी रजिया से बात करने पे भी पाबन्दी हो चुकी थी ।।
इस तरह ये सिलसिला कुछ और रातों तक चलता रहा . ! वही आनाकानी ...वही झूठ ..वही फरेब ..!
अब रजिया पूरी तरह चीकट ..मलेच्छ ...बदबूदार पान के पीकों सी सड़ांध मारते मेहरदीन की गिरफ्त में थी ।।
अब वो हर रात मेहरदीन द्वारा भंभोड़ी जाने को अभिशप्त थी ।।

और इस तरह तीन चार महीने बीतते बिताते रजिया गर्भवती हो गई ।।।
अब मेहरदीन पूरी तरह सुरक्षित था ।।
क्योंकि गर्भवती रजिया को वो तलाक नही दे सकता था ..! ऐसा मजहब में पाबन्दी है ।।

इस वाकये को कई साल हो गए ..!
उधर दो तीन साल इंतजार के बाद शौकत मियाँ दूसरी ले आये ... और इधर मेहरदीन अल्ला को प्यारे हो गए ..!
भरी जवानी में विधवा हुई रजिया घरों में झाड़ू पोंछा का काम करने लगी ..!
और अकेले अपने बच्चे को पालती रही ।।
बच्चा बड़ा हो के नशेड़ी बन चुका है ।।
कल अचानक रजिया मुझे मिल गई .. ।।
यही कोई पैंतालीस पचास वय की हो रही है अब।।

मेरे ही पास आ रही थी ।। मैंने देखते ही पूंछा ..!
क्या हाल है रजिया .???
जी पंडी जी सब अल्ला का शुकर है ।।
मेरी ये दो हजार की नोट खुल्ला कर दो ।।
मैं उसके हाथ से नोट ले के उलट पलट रहा था ..!
और पूंछने लगा कैसे नोट दूँ ??
पांच सौ के चार दूँ या सौ सौ के ..?
वो बोली तीन पांच सौ के दे दो ..!और बाकी सौ सौ के ।।
रमजान शुरू होने वाले हैं ..! तीन चार सौ तो मस्जिद में ही दान देना है ..!!

ये सुन के मैं जड़वत हो गया ।। सर चकरा गया ..!

जिस मजहब ने उसका सब कुछ छीन लिया ।।
यतीम बना डाला ... बमुश्किल झाड़ू पोंछा कर के गुजर बसर को मजबूर कर दिया ..!
उस मजहब के प्रति इतनी श्रद्धा ..???
झाड़ू पोंछे से कमाए पैसों से चार सौ रुपये मस्जिद को दान ..??

यहाँ हमारे यहां अगर किसी जमींदार  ने तीन पीढ़ी पहले किसी मंदिर में .... किसी पुरोहित को दस रुपए दान दिए होंगें ...तो उनके पोते पोती आज भी उस दस रुपये का ताना मारते मिल जायँगे ..!
क्या खा के इनका  मुकाबला करोगे मियाँ  .??
अब भी समय है चेत जाओ ..!!

Friday, May 25, 2018

तुम्ही केलेत ते चमत्कार. आम्ही केले ते.....

तुम्ही केलेत ते चमत्कार. आम्ही केले ते.....

येशू ख्रिस्ताने जितके तथाकथित चमत्कार केल्याचं सांगितलं जातं त्याच्या कित्येक पटींनी चमत्कार आपल्या संतांनी ढिगावारी केलेले आहेत. तरीही "आपण सारी त्याची लेकरे" या सर्वसमावेशक सामायिक भावनेव्यतिरिक्त त्यांच्यापैकी कुणी थेट परमेश्वराचे पुत्र वगैरे असल्याचा दावा केलेला नाही.

उदाहरणार्थः मृत व्यक्तीला जिवंत करणे, पाण्यावर चालणे, फक्त टोपलीभर अन्नावर अख्ख्या गावाची भूक भागवणे इत्यादी. हं, आता ख्रिस्तासारखं कुणी पाण्यातून वाईन बनवलेली नाही कारण किमान संतांच्या लेखी आपल्याकडे दारूकडे सुदैवाने तितक्याशा आदराने पाहिलं गेलेलं नाही. निसर्ग, हवामानावर वगैरे असलेल्या नियंत्रणाचेही वेगवेगळे किस्से आहेत. नवनाथांच्या विषयी बोलायचं तर पोस्टची कादंबरी होईल. नाथपंथी संतांचे चमत्कारही कमी नाहीत.

ज्ञानेश्वरांचा विषय घेतला, तर त्यांच्या नावावर भिंत चालवण्याचा....नव्हे उडवण्याचा....चमत्कार नोंदवला गेलेला आहे, पण आज आपण एका वेगळ्या चमत्काराबाबत बोलणार आहोत. सगळ्या जिवंत प्राण्यांत परमेश्वरी तत्त्व आहे असं त्यांनी जेव्हा प्रतिपादन केलं तेव्हा त्यांची चेष्टा झाली. त्यांना आव्हान देण्यात आलं की बाबा रे हे खरं असेल तर  ‘तो जो पलीकडे पखाल वाहत आहे, त्या रेड्यासही ज्ञाना म्हणतात. तर त्याच्या पाठीवर चाबकाचे फटके मारले तर तुझ्या पाठीवर वळ उठतील काय?’ ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, ‘तोही माझा आत्माच आहे. उठतील  पाठीवर वळ.’ त्या रेड्यावर आसूड मारले गेले. त्यांचे वळ खरोखरच ज्ञानदेवांच्या पाठीवर उठले.

येशू ख्रिस्ताने पण असं काही केलं असतं तर मजा होती. म्हणजे त्याला मारलेल्या फटक्यांच्या वेदना ती सुनावणार्‍या गवर्नर पिलातला होणे, डोक्यावर ठेवलेल्या काटेरी मुकुटामुळे त्याच्यावर आरोप करणार्‍या ज्यू धर्मशिक्षकाच्या डोक्यावर जखम होऊन त्यातून रक्त वाहणे, किंवा उचललेल्या क्रूसाच्या वजनाने कुणीतरी भलतंच वाकणे. असं झालं असतं तर येशू ख्रिस्ताने समजा तिथेच स्वतःला काहीही घोषित केलं असतं तरी झाडून सगळे त्याच्या पायाशी लोळण घेऊन ख्रिस्ती झाले असते.  नंतरच्या काळात ख्रिस्तपूजा केल्यामुळे ज्या अगणित ख्रिश्चन लोकांना तत्कालीन राज्यकर्त्यांच्या हस्ते भयानक पद्धतिने मरण पत्करावं लागलं ते सगळे ख्रिस्ती बनल्यावर शांततेत दीर्घायुषी होऊन जगले असते.

ज्या येशूमुळे इतके लोक मेले त्यांची जबाबदारी येशूच्या माथी येत नाही का?

जो स्वतःला वाचवू शकला नाही तो इतरांना काय वाचवणार? घंटा?

=============================
मराठी स्वैर भाषांतरः मंदार दिलीप जोशी

अधिक ज्येष्ठ शु. ११, शके १९४०

मूळ हिंदी पोस्टः Anand Rajadhyaksha
=============================

Friday, May 11, 2018

"आजोळी आला आहेस, रिकाम्या हाताने कसं जाऊ देणार?"

"आजोळी आला आहेस, रिकाम्या हाताने कसं जाऊ देणार?"

मूळ हिंदी लेख:  © तनया प्रफुल्ल गडकरी (https://www.facebook.com/tanaya.gadkari/posts/1845350532199281)
मराठी रुपांतर: © मंदार दिलीप जोशी

हे शब्द फक्त प्रेम किंवा सामाजिक औपचारिकता नाहीत. हे समाजशास्र किंवा मानसशास्त्रात सांगितलेले सिद्धांत प्रत्यक्षात सिद्ध करायची उदाहरणे देखील नव्हेत.

हे शब्द म्हणजे धर्माचे प्राण आहेत. भारताचा आत्मा आहे.

दवबिंदूंसारखे मनाच्या प्रत्येक कोपर्‍याला हलकेच भिजवून शीतलता प्रदान करणारे हे शब्द साधारण साडेपाच वर्षांपुर्वी ऐकल्याचं आठवतं.

२०१२ सालच्या थंडीतली गोष्ट आहे. नवी दिल्ली येथे IBTL भारत संवाद च्या कार्यक्रमात आदरणीय श्रीमती निर्मला सीतारामन, डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी, श्री महेश गिरी,श्री शेषाद्रि चारी, श्रीमति मीनाक्षी लेखी यांच्या आधी एक अपरिचित गृहस्थ मंचावर आले.

श्री रामअवतार शर्मा जी।

सीतामाता, प्रभू श्रीराम, आणि लक्ष्मण यांच्या पदचिह्नांचा माग काढत अयोध्या ते रामेश्वरम् आणि तिथून जनकपुर पर्यंत चक्क सायकल दामटवत आले होते. त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितलं की त्यांच्या मार्गातील वनवासी बंधूभगिनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल असे बोलत होते जणू काही वेळापूर्वीच राम तिथून पुढे गेले असावेत.

जनकपुरात त्यांना आलेल्या एका सुंदर अनुभवाबद्दल बोलताना ते म्हणतात:

जनकपुरच्या मंदिराच्या महंतजींना मी भेटायला गेलो, तेव्हा मी त्यांचा कुणीच लागत नसतानाही एखाद्या जवळच्या नातेवाईकाचं करावं तसं त्यांनी माझं आदरातिथ्य केलं. एक संपूर्णपणे अनोळखी व्यक्ती असूनही!

मी जेव्हा तिथून निघालो, तेव्हा त्यांनी माझ्या हातात एक पाकीट ठेवलं. मला वाटलं, मंदिरातला अंगारा असेल. आगाऊपणे उघडून बघितलं तर त्यात शंभराची नोट होती! मी आश्चर्यचकित होऊन त्यांना विचारलं की "बाबाजी मी तर एक गृहस्थ आहे, खाऊन पिऊन सुखी आहे, नीट चाललंय सगळं, मग तुमच्या सारख्या महात्म्याने मला पैसे का द्यावेत?"

बाबाजी म्हणाले, "सीतेला काय म्हणता तुम्ही?"

मी म्हणालो, "सीतामाता...सीता आई आहे आमची."

त्यावर बाबाजी एकदम मान उंचावून गर्वाने म्हणाले, "अरे सीता माझी मुलगी आहे. आजोळी आला आहेस, रिकाम्या हाताने कसं जाऊ देणार?"
_________

श्री रामअवतारजींनी जेव्हा ही घटना सांगितली, तेव्हा ऐकणार्‍यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसली. मनात दाटलेल्या भावनांनी गंगाजमुना रूप घेऊन वहायला सुरवात केली.

आम्ही कुठे बाहेर गेलो, फिरायला गेलो, तीर्थक्षेत्री गेलो, कुठेही गेलो की माझे बाबा नेहमी म्हणायचे, "लोकांकडे एवढी श्रद्धा आणि ऊर्जा येते कुठून? त्यांच्यात एवढी विजिगिषा येते कुठून? काय आहे ती शक्ती? त्या स्त्रोताचा शोध घे!"

एकदम काहीतरी मनात चमकलं. मी वळून बाबांकडे बघितलं....त्यांचेही डोळे पाणावलेले होते.

हीच शक्ती आहे जिने सनातन धर्माचं मूळ सनातन स्वरूप जपलं आहे. सकाळी कॉलनीत झाडू मारणार्‍या मावशींना माझी, "राम राम मावशी, कशा आहात?" अशी आरोळी ऐकू आली नाही की ताडकन त्यांचा ठेवणीतला टोमणा ठरलेला असतो. त्यांना आणि मला जोडणारा माझा राम आहे. प्रभू रामचंद्र आणि सीतामातेचं चित्र गल्ल्यावर लाऊन लोकांची पादत्राणं शिवणारे काका याच सनातन धर्माला बळ देत असतात. प्रभू रामचंद्र आणि सीतामातेला भेटायला आलेल्या यात्रेकरूंच्या सेवेकरता मोठ्यातले मोठे श्रीमंत, अनवाणी धाव घेतात. त्यांच्यात आणि या तीर्थाटन करणार्‍या यात्रेकरूंच्यात पैसा, जात, पद, ओळखपाळख वगैरेंचा काही संबंध नसतो. ती सगळी प्रभू रामचंद्र आणि सीतामातेची लेकरं असतात.

आदरणीय गिरधारी लाल गोयल जी जेव्हा नमोंना दमात घेतात तेव्हा म्हणतात, "चार वर्ष साहेबांचं तोंड नाही बघितलं, आता आलेत आजोळच्या दारात आजीच्या डबोल्यावर डोळा ठेवून! हुं!!" या शब्दांत मला सनातनाला एकत्र बांधणारं हेच समान सूत्र दिसतं.

याचं आणखी एक उदाहरण रामअवतारजींनी दिलं. १९४७च्या आधी जनकपुरकडून अयोध्या प्रशासनाला काही रक्कम पाठवली जायची, जी राजर्षी जनक महाराजांकडून श्रीरामांना भेटीदाखल दिलेल्या जमीनीतून आलेल्या उत्पनातून दिली जायची. शतकानुशतकं चाललेली ही परंपरा १९४७ नंतर "स्वतंत्र" भारताच्या सरकारने बंद केली. जणू दोन देशांतल्या नातेसंबंधांना तिलांजली दिली, तो मान संपुष्टात आणला.

जेव्हा कम्युनिट चीन भारताच्या पूर्वोत्तर राज्यांत आपला प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने बौद्ध प्रतीकांना अस्त्रासारखं वापरून घेत होता, आम्ही "सेक्युलर स्टेट" होण्याचं प्रदर्शन करत आमचे जोडलेले संबंध विसरत आपल्याच माणसांना गमावत होतो.

मधे कुठेतरी हरवलेलं हे सूत्र आज परत मिळाल्यासारखं वाटतंय.

संपूर्ण भारतीय उपखंडासह दक्षिण पूर्वेकडचे समुद्राने वेढलेले देश उदाहरणार्थ कंबोडिया, वियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, थाईलँड, सिंगापुर वगैरे देश यांना मोत्यांची उपमा दिली तर या मोत्यांना ओवणारा बारीकसा दोरा कुठला, याची जाण भारताच्या सद्ध्याच्या पंतप्रधानांना आहे. म्हणूनच जेव्हा ते नेपाळचे पंतप्रधान खड्ग प्रसाद शर्मा ओली यांना "मेरे भाईसाहब" म्हणतात तेव्हा ते संबंध निव्वळ योगायोगाने, भौगोलिक परिस्थितीमुळे झालेल्या नैसर्गिक शेजार्‍यांमधले उरत नाहीत तर "आजोळ" आणि "मुलीचं सासर" यातले संबंध होऊन जातात.

याच मुळे सनातन भारताचं अस्तित्व अभंग आहे. बाकी दोन देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांमधे काय खेचाखेची चालायची ती चालूदे, ती चालतच राहणार. देशादेशात माणसं रेषा आखतात, त्या खोडल्याही जाऊ शकतात.

पण श्री रामनाम नामक सेतू ज्याने ओळखला, ज्याच्या मनःचक्षुंना दिसला, तो या समान सूत्राशी जोडला गेला किंवा त्याने स्वतःला जोडून घेतलं, असं समजा.

आता फक्त अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीची वाट बघुया.

बोला सियावर रामचंद्र महाराज की जय.

श्री रामअवतार शर्माजी यांचं वक्तव्य या लिंकमधे विशेषतः ७:३० आणि ८:१५ मिनीटे यांमधे पहा:


https://www.youtube.com/watch?v=gVSP8engVjY&feature=youtu.be



मूळ हिंदी लेख:  © तनया प्रफुल्ल गडकरी (https://www.facebook.com/tanaya.gadkari/posts/1845350532199281)
मराठी रुपांतर: © मंदार दिलीप जोशी
_____________________________________________

मूळ हिंदी लेख:  © तनया प्रफुल्ल गडकरी (https://www.facebook.com/tanaya.gadkari/posts/1845350532199281)

"नाना के घर आए हो, खाली हाथ कैसे जाओगे?"

ये शब्द महज़ स्नेह या लोक व्यवहार नहीं हैं! ये समाजशास्त्र या मानसशास्त्र को साधने की कला का उदाहरण भी नहीं हैं!

ये शब्द धर्म का प्राण हैं। भारत की आत्मा हैं!

आज से साढ़े पाँच वर्ष पहले सुने थे, तब से ओस की बूंदें बनकर हृदय को सींचते आए हैं... ये शब्द!

2012 की सर्दियाँ थीं। नई दिल्ली में आयोजित IBTL भारत संवाद प्रारंभ हुआ। (आदरणीय): श्रीमति निर्मला सीतारमण, डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी, श्री महेश गिरी, श्री शेषाद्रि चारी, श्रीमति मीनाक्षी लेखी इत्यादि नामों से पहले एक अपरिचित सज्जन मंच पर आए...
रामअवतार शर्मा जी।

साइकल से सीता-राम-लक्ष्मण के पदचिह्नों का अनुसरण करते हुए अयोध्या से रामेश्वरम् और जनकपुर तक यात्रा कर आए थे।

उन्होंने गाथा बताई.. कैसे राह भर के वनवासी श्री राम के विषय में यूँ बात करते मानों कुछ समय पहले ही राम वहाँ से होकर गए हों!

जनकपुर के विषय में एक सुंदर घटना कही। उन्हीं के शब्दों में:
__________
"जनकपुर का जो मंदिर है.. उसके महंत जी के पास मैं गया। उन्होंने मुझे रिश्तेदार की तरह रखा। अनजान आदमी को! जब मैं चलने लगा, उन्होंने मुझे एक लिफाफा दिया। मैंने सोचा, बाबा ने भभूत दी होगी! फिर मैंने बेईमानी से खोलकर देखा तो उसमें 100 रुपए का नोट था !!!
मैंने पूछा: बाबा मैं तो गृहस्थ हूँ, मेरी दाल रोटी चल रही है.. आप महात्मा होकर मुझे पैसे क्यों देते हैं?

बाबा बोले- सीता को क्या मानते हो?

मैंने कहा- सीता हमारी माँ है।

तो वो बड़े गर्व से बोले-सीता मेरी बेटी है। और तुम नाना के घर आए हो, खाली हाथ जाओगे क्या? "
_________

मुझे याद है... यह सुनकर सबकी आँखें जगमगा उठी थीं। भावों ने अश्रुओं का रूप धर लिया था!

अक्सर बाऊ 'जन दर्शन' कराते हुए कहते थे... "लोक इतनी श्रद्धा और ऊर्जा कहाँ से पाता है? यह जीवट कहाँ से आता है? वह शक्ति क्या है? उस स्रोत को खोजो!"

लगा कि जैसे 'स्रोत' का पता मिल गया है! मैंने पलटकर बाऊ को देखा.. उनकी भी आँखें नम थीं।

यही शक्ति है जो सनातन को सनातन रखे हुए है। सुबह सकारे कॉलोनी में झाड़ू देती, कचरा उठाती काकी को यदि मेरा " राम-राम सा। कैसे हैं ?" सुनाई ना दे तो फट से ताना मिल जाता है। उन्हें और मुझे मेरा राम जोड़ता है। सीताराम का चित्र अपने गल्ले पर लगाकर जूते सिलते बाऊजी सनातन को संबल देते हैं। सीताराम के नाम पर बड़े-बड़े धनिक श्रेष्ठी , जातरुओं की सेवा को नंगे पाँव दौड़ जाते हैं। उनमें और जातरुओं में धन, जाति, पद, परिचय का संबंध नहीं है.. पर सब सीताराम के बेटे-बेटी हैं।

आदरणीय गिरधारी लाल गोयल जी जब नमो को उलाहना देते हैं : "चार साल से पापाजी का तो मुंह तक नहीं देखा ,अब जेब खर्च के लिए नानी की गुल्लक पर निगाह गढ़ा के चल दिए ननसाल? हुँह!" तब मुझे यही सम्बन्ध सूत्र नज़र आता है। :)

इसका एक और उदाहरण राम अवतार जी ने दिया था। 1947 से पहले तक जनकपुर से अयोध्या प्रशासन को कुछ राशि भेजी जाती थी जो राजा जनक द्वारा अयोध्या को उपहार में दी भूमि से मिलती थी। सहस्त्राब्दियों की इस परंपरा को 47 के बाद बंद कर दिया भारत सरकार ने। दो देशों के मध्य रिश्तेदारी का मान खत्म कर दिया!

जब कम्युनिस्ट चीन उत्तर-पूर्वी भारत में अपना प्रभाव बढ़ाने के लिए बौद्ध प्रतीकों को अस्त्र बना रहा था, हम अपने रक्त संबंध भुलाकर 'सेक्युलर स्टेट' होने का प्रदर्शन कर अपनों को खो रहे थे।

मध्यांतर में खोया वह सम्बन्ध सूत्र आज पुनः मिला है।

भारत के वर्तमान प्रधानमंत्री को संपूर्ण भारतीय उपमहाद्वीप, दक्षिण पूर्व व महासागरीय देशों जैसे कंबोडिया, वियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, थाईलैंड, सिंगापुर इत्यादि को जोड़ने वाले इस धागे का पता है।

जब वह नेपाल के प्रधानमंत्री खड्ग प्रसाद शर्मा ओली को 'मेरे भाईसाहब' कहते हैं तो सम्बंध केवल संयोग से भौगोलिक पड़ोसी होने का नहीं रह जाता, 'नाना का घर' और 'बेटी का ससुराल' वाला हो जाता है।

इसी से सनातन भारत का अस्तित्व अखंड है । बाकी विदेश मंत्रालयों के मध्य खींचातानी का क्या है,वह तो चलती रहती है। इंसानों की खींची लकीरें बनती और मिटती रहती हैं।

श्री सीताराम नाम सेतु है। जो समझ गया सो जुड़ जाएगा, जोड़ लेगा।

बस अब अयोध्या में भव्य मंदिर की प्रतीक्षा है।

जयतु श्री सीता राम।

[ * देखें श्री रामावतार शर्मा जी का वक्तव्य। विशेषतः 7मिनट 30 सेकण्ड और 8:15 का भाग। ]

- © तनया प्रफुल्ल गडकरी (https://www.facebook.com/tanaya.gadkari/posts/1845350532199281)

Wednesday, May 9, 2018

चला न कॉम्रेड

चला न कॉम्रेड
एक मुडदा पाडू,
चला न, त्याच्यावर एक गोष्ट रचू

तयार करुन ठेवू,
पोस्टर, पेज आणि भरपूर कविता
मग करु त्यांचा गोळीबार योग्य वेळी
हे वारे, आपल्याला हवे तसे वाहत असतील तेव्हा
आणि हो कॉम्रेड, थोडं तिखटमीठही टाकू त्यात
तुमच्या स्वादानुसार,
आणि नेहमीप्रमाणे फोडू खापर,
हिंदुस्तान, देवीस्थान और ब्लडी "भक्त" यांच्यावर

कॉम्रेड, लॉजिक कसलं शोधताय?
त्याच्याशी आपल्याला काय देणंघेणं?
काय म्हणालात? लोहड़ी आणि मकर संक्रांतीच्या वेळी
देवळात कसं कुणी कुणाला लपवेल?
कॉम्रेड ते सगळं ठीक आहे हो,
#कॉम्रेड, पुन्हा गिधाडासारखं व्हा बरं,
यु नो, मुडदे खातात ती !
वेमुला, जुनैद, आणि आता हा !
आणि ब्रो, मुडदा हा मुडदा असतो!
जाब वगैरे विचारत नसतो तो,
या मुडद्यामुळे आणखी मुडदे पडले तरच काय तो फायदा !

चला न कॉम्रेड
एक मुडदा पाडू,
चला न, त्याच्यावर एक गोष्ट रचू
रूपांतरः मंदार दिलीप जोशी
मूळ हिंदी कविता: गौतम

------------------
 चलो न कॉमरेड
------------------

चलो न कॉमरेड,
एक लाश गिराते हैं,
चलो न, उसपे कहानी बनाते हैं,
रच के रखते हैं,
पोस्टर, पेज और कविताएँ,
जो दागी जाएँगी ठीक समय पर,
ठीक तब, जब हमारा मौसम हो,
हाँ कॉमरेड, तुम्हारे टेस्ट के हिसाब से,
साल्ट एन पैपर भी रहेगा,
उसपे 'ऐज़ युज़ुअल' ब्लेम करेंगे,
हिंदुस्तान, देवीस्थान और ब्लडी "भक्त" को,


कॉमरेड लॉजिक क्यों ढूंढते हो,
उससे हमारा क्या लेना देना?
क्या ? लोहड़ी, मकर संक्रांति पर
मन्दिर में कोई कैसे छुपायेगा किसी को ?
कॉमरेड सब सही है,
#कॉमरेड बी लाइक अ वल्चर,
यु नो, वो लाशों को खाते हैं !
वेमुला, जुनैद, और अब ये लाश!
अरे लाश थोड़ी न हिसाब मांगती है ब्रो!
लाश तो लाश है,
इससे और लाशें गिरे तो कोई बात हो !
चलो न कॉमरेड,
एक लाश गिराते हैं,
चलो न, उसपे कहानी बनाते हैं

- गौतम

#कविता #OKDontMindHaan

Monday, April 30, 2018

माझ्या समानतेच्या लढ्याची किंमत माझ्या तान्हुल्या नातीला मोजावी लागेल का?

मागे अमेरिकेतील सु/कु प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका आणि विचारवंत मॅलरी मिलेट यांच्या भगिनी केट मिलेट यांनी लिहीलेला एक लेख शेअर केला होता. आज इंग्लंडमधल्या एक प्रसिद्ध स्त्रीवादी कार्यकर्त्या जॉनेट कॉप्फरमॅन यांनी स्वतः व्यक्त केलेल्या भावना तुमच्यापुढे मांडतो आहे. (या लेखाचा स्वैर अनुवाद)

---------------------

माझ्या समानतेच्या लढ्याची किंमत माझ्या तान्हुल्या नातीला मोजावी लागेल का?

आजच्या महिलांना भेडसावणारी भावनिक पोकळी पाहून एकोणीसशे साठच्या दशकापासूनच्या प्रसिद्ध स्त्रीवादी (फेमिनिस्ट) जॉनेट कॉप्फरमॅन यांनी व्यक्त केलेल्या भावना.

माझ्या नातीचा अँबर अ‍ॅनचा जन्म झाल्यावर काही तासातच तिला मी माझ्या हातांत घेतलं आणि छातीशी कवटाळलं. त्याच वेळी मनात दाटलेल्या असंख्य गुंतागुंतीच्या भावनांनी काहूर माजवलं, मी पार गोंधळून गेले. मला तेव्हा नक्की काय वाटत होतं हे शब्दात वर्णन करणं कदाचित अवघड आहे, कदाचित नातीच्या जन्मामुळे झालेला उन्मुक्त आनंद आणि तिच्या भविष्याची धास्ती यांचं मिश्रण असं त्या भावनांचं वर्णन करता येऊ शकेल.

माझं पहिलं नातवंडं. अतिशय बांधेसूद शरीर, डोळ्यांत असलेली चमक, माझ्या बोटांत हळूच गुंतलेली तिची बोटं - आई कशाला, आजीलाही ओळखतात बरं का बाळं! अँबरचा जन्म हा एक चमत्कार मानावा लागेल. अर्थात, जन्माला आलेलं प्रत्येक सुदृढ बाळ हे एक चमत्कारच असतं, पण अ‍ॅम्बरच्या आईला, म्हणजे माझ्या सूनबाई ईव्हाला गर्भाशयाच्या अंतःस्तराचा क्षोभ (एन्डोमेट्रिओसिस) हा आजार असल्याने तिला आपण कधी आई होऊ शकू असं वाटतंच नव्हतं. शिवाय त्यांच्या लग्नाच्या वेळी दोघांची वयं पन्नाशीच्या पुढे होती - माझा मुलगा इलियास होता ५२ वर्षांचा आणि ईव्हा होती ५० वर्षांची. त्यामुळे मला नातवंडांची कितीही हौस असली तरी माझ्या वयाची सत्तरी ओलांडल्यावर मी ती आशा जवळजवळ सोडून दिली होती. आणि मग तो चमत्कार झाला. माझ्या पंचाहातराव्या वाढदिवसाला मला ईव्हाने मला गोड बातमी दिली आणि या संपूर्णपणे अनपेक्षित पण सुखद धक्क्याने मी खुर्चीवरुन जवळजवळ पडलेच. ईव्हाला दिवस गेले होते!

लहानगी अँबर हलकेच माझ्या कुशीत शिरत असताना मला तो दिवस आठवत होता, आणि मनात तो भावनांचा कोलाहल गोंधळ घालत होता. नातीच्या जन्माने मनात निर्मळ आनंद दाटण्याऐवजी भावनांचं जरासं कटूगोड असं मिश्रण भरून राहिलं होतं. आता आम्ही तिचा हात धरू, एखाद्या कुंभारासारखं तिच्या वकूबानुसार तिच्या आवडीनिवडींना आकार देऊ, पण पुढे काय? तिच्या भविष्यात काय वाढून ठेवलंय? का असं वाटत होतं मला?

त्याचं कारण होतं त्याच दिवशी वर्तमानपत्रात मी वाचलेली एक बातमी. शाळेत जाणार्‍या मुलींना शारिरिकदृष्ट्या अक्षम असतानाच त्यांच्याच वयाच्या मुलामुलींकडून कौमार्य गमावण्याची जबरदस्ती कशी केली जाते याचा उल्लेख त्यात होता. कौमार्य गमावणं ही गोष्ट काहीतरी मोठी डिग्री मिळवावी अशा पद्धतीने इकडे मिरवतात. त्याच बातमीत पुढे अनेक अस्वस्थ करणार्‍या गोष्टींचं वर्णन होतं — किशोरवयीन मुलामुलींमध्ये झालेला नैराश्याचा (depression) प्रादुर्भाव, त्यातून स्वतःलाच इजा करुन घेणं, खाण्याच्या सवयी इतक्या बिघडलेल्या की जवळजवळ त्याला कुपोषण म्हणता येईल अशी परिस्थिती, शाळेत विद्यार्थ्यांचा त्यांच्याच शाळासोबत्यांकडून होणारा क्रूर मानसिक छळ (bullying), भ्रमणध्वनी (मोबाईल) वरुन होत असलेली लैंगिक स्वरूपाच्या संदेशांची देवाणघेवाण (sexting), आणि एकंदर लैंगिक बाबतीत निर्माण केला जाणारा गोंधळ. या गोष्टींना अधिकाधित किशोरावस्थेतली मुलं बळी पडत असल्याचं त्या बातमीत म्हटलं होतं.

हे फार भयंकर होतं. आम्ही स्त्रीमुक्ती चळवळीत सक्रीय असताना पुढच्या पिढीसाठी - विशेषतः पुढच्या पिढीतील आमच्या मुलींसाठी एका उज्ज्वल भविष्याची कल्पना केली होती. एक असं जग ज्यात स्वप्न बघायला आणि ती अंमलात आणायला आकाश कमी पडेल, आपले निर्णय आपण घेण्याचं स्वातंत्र्य आणि त्यातून प्रगती साधता येईल, आणि कुठल्याही क्षेत्रात कर्तृत्व गाजवण्यासाठी संधींची समान उपलब्धता असेल. बास, याच गोष्टींसाठी मी आणि अनेक स्त्रीयांनी साठच्या दशकात तीव्र लढा दिला होता. अशाच जगाची कल्पना आमच्या मुलींसाठी आम्ही केली होती.

जॉनेट कॉप्फरमॅन पुढे म्हणतात की आज याच स्त्रीवादाने आजच्या मुलींच्या आयुष्यात काय उलथापालथ माजवली आहे ते पाहून मी हादरून गेले. समानतेचा लढा आम्ही स्त्री"वादा" कडे घेऊन जाण्याने आजच्या मुलींना नक्की फायदा झालाय की नुकसान हे तपासणं मला गरजेचं वाटू. माझ्या मते दुर्दैवाने आजचा काळ हा महिलांसाठी भावनिकदृष्ट्या अत्यंत उदास आणि रोगट असाच आहे.

लैंगिक सूख हे दैवी आनंद देणारं असायला हवं. शरीराला मिळणार्‍या सुखाचा मार्ग हा मनातून जायला हवा. पण आज सेक्सचा फक्त शारीरिक कंगोराच उरला आहे. दुर्दैवाने दैनंदिन आयुष्याच्या जवळजवळ प्रत्येक भागाला पॉर्न संस्कृतीने ग्रासलं आहे. याचं मूळ साठच्या दशकाती स्त्रीवादी आंदोलनांचा भाग असलेल्या लैंगिक स्वातंत्र्याच्या हाकांत आहे. हवं तितकं शारीरिक सूख मिळवा, तुम्हाला हव्या त्या व्यक्तीबरोबर ते मिळवा, एकाने समाधान झालं नाही तर अनेक व्यक्तींबरोबर झोपा, तडस लागे पर्यंत जेवता तसं एकमेकांची शरीरं भोगा, ओरबाडा.

प्रणयाराधन आणि शय्यासोबतीतल्या अत्यंत खाजगी असायला हव्यात अशा गोष्टी आज खुलेपणाने मोठ्या पडद्यावर दिसतात. छोट्या पडद्याने आपल्या मोठ्या भावाला या बाबतीत केव्हाच मागे टाकलं आहे. इकडे आयटीव्ही टू वाहिनीवर उघड उघड स्वैराचाराला प्रोत्साहन देणारा एक प्रेमाचं बेट (Love Island) नावाचा रिअ‍ॅलिटी शो होऊन गेला. शिसारी येणारी गोष्ट म्हणजे त्यात भाग घेणारे लोक माणसं आहेत की शरीरं भोगणारे यंत्रमानव असा प्रश्न पडावा. [आपल्याकडे बिग बॉस या कार्यक्रमाचं रूपांतर लवकरच अशाच हिडीस शो मध्ये येत्या काही वर्षातच होईल अशी मला खात्री आहे]

काळानुसार बदल हा अपरिहार्य आहे पण स्त्री आणि पुरुषांच्या सगळ्याच पारंपारिक भूमिका आज वैचारिक तिरस्काराचा विषय झाल्या आहेत — इतक्या की एक काळ असा होता की टीव्हीवर जाहीरातींतून गृहिणी आणि आई या दोन भूमिकांत स्त्री दिसूच नये असा अचाट अलिखित नियमच ठरून गेला होता. का? तर म्हणे स्त्री आणि पुरुष यांच्या "जुनाट" आणि "बुरसटलेल्या" पारंपारिक भूमिकांचं सरसकटीकरण (gender stereotyping) होऊ नये म्हणून.

स्त्रीमुक्तीवादाच्या चळवळींनी महिलांना प्रगतीच्या अनेक संधी नक्कीच मिळवून दिल्या, पण त्याच बरोबर आजचं जगणं स्त्रीमुक्तीवादाने अधिक संघर्षपूर्ण, वेदनादायी, किचकट आणि मनःशांती हिरावून घेणारं बनवल्याने त्या संधी या अशा गोष्टींमुळे केव्हाच खुज्या ठरल्या आहेत.

आज मला आम्ही त्या काळी दिलेल्या घोषणा आठवतात, "स्त्रीयांनो, आपले ब्रा जाळा, मिनीस्कर्ट घाला. मुक्त व्हा!" पण खरंच आजची स्त्री मुक्त आहे का? अशा घोषणांनी नक्की काय साध्य केलं? व्हिक्टोरियन काळातल्या कपड्यांच्या थरांनी गळ्यापासून पायापर्यंत गच्च आवळलेल्या गृहिणीचा प्रवास आपल्या शरीराचं प्रदर्शन मांडायला सोकावलेल्या मुलींपर्यंत झाला तो अशाच घोषणांच्या प्रभावाने. पन्नासच्या दशकात आपले पायही झाकलेले हवेत म्हणून स्त्रीया बॉबी सॉक्स या विशिष्ट प्रकारचे पायमोजे घालत असंत. त्या स्त्रीयांवर हे बंधन होतं, आजच्या मुलींवर अधुनमधून एखादा तरी कमी कपड्यांतला, तोंडाचा चंबू करुन काढलेला सेल्फी सोशल मिडीयावर टाकणं अनिवार्य वगैरे आहे की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे.

दैवदुर्विलास असा की एकीकडे स्त्रीस्वातंत्र्याचं कारण पुढे करुन इंग्लंडमधल्या बहुसंख्य समाजातल्या महिलांपैकी अनेक जणींचा कल हिणकस पद्धतीने शरीरप्रदर्शन करण्याकडे आहे, दुसरीकडे त्याच इंग्लंडमधल्या धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्य असलेल्या लोकसंख्येतील स्त्रीया मात्र आजही कपड्यांच्या बाबतीत व्यवस्थित मर्यादा पाळताना दिसतात. त्यांच्या म्हणण्यानुसार एक स्त्री म्हणून आमच्या शरीराचं पावित्र्य जपण्यासाठी, आमची स्पेस जपण्याकरता आम्ही असं करतो. आहे की नाही गंमत? यांच्या पैकी कोण बंधनात आहे आणि कोण मुक्त आहे?

खूप जास्त लांबीचा सुका बोंबिल वाटावा असं पोट खपाटीला गेलेलं, हाडं दिसू लागलेलं, गालफडं बसलेलं, आणि डोळे निस्तेज आणि खोल गेलेलं कुपोषित शरीर असणार्‍या सेलिब्रिटींचं अनुकरण करण्याचा रोग समाजात पसरेल अशा भविष्याची कल्पना आमच्यापैकी कुणीच करु शकलं नव्हतं.

शरीर आणि मन यांना एकत्र वाढू देण्याऐवजी वेळेआधीच दिलं जाणारं लैंगिक "शिक्षण" आज मुलांच्या मनातला गोंधळ वाढवण्याचं आणि त्यांना अकाली मोठं करण्याचं काम काम करत आहे. शरीराची पूर्ण वाढ होण्याअगोदरच आजच्या मुलींना लहान ब्रा/बिकीनी घालायला आज उद्युक्त केलं जातं. अर्वाच्य शब्द आणि लैंगिक व्यवहारांचं एक मोठं जग आज टीव्ही आणि इंटरनेटच्या माध्यमातून आज मुलांना नासवतंय.

आमच्या काळात एक आई म्हणून असलेल्या परीक्षेत नापास होणं, नको असलेलं गर्भारपण, अतिरिक्त मद्यपान या आणि तत्सम चिंता अगदीच मिळमिळित वाटाव्यात अशा भयानक चिंता संधी, पर्याय, आणि प्रगतीच्या अगणित संधी आणि स्वातंत्र्याची लयलूट असलेल्या आजच्या जगात मला माझ्या अँबर बद्दल आज भेडसावतात.

तरुणपणात सळसळत्या रक्ताच्या धगधगत्या आदर्शवादाची झिंग डोक्यात घेऊन त्याकाळी आम्ही दिलेल्या स्त्रीवादी लढ्यांनी मात्र आजच्या मुलींमध्ये "वाद" तेवढा शिल्ल्क ठेवला आणि त्यांच्यातल्या स्त्रीलाच मारुन टाकलं. एक स्त्री म्हणून आम्हाला परमेश्वराने दिलेलं अत्यंत अमूल्य, अद्वितीय, आणि अलौकिक असं काहीतरी आम्ही हरवून बसलो आहोत.

माझा जन्म दुसर्‍या महायुद्धाच्या काळात झाला. युद्ध संपल्यावर मला घेऊन आई आणि बाबा लंडनला परतले. त्याकाळी शालेय शिक्षण हे फक्त परीक्षेत चांगले गुण मिळवण्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर तुम्ही पुढे कुठल्यही क्षेत्रात गेलात तरी न बिचकता आत्मविश्वासाने काम करत यावं या दृष्टीने व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास कसा करावा यावर भर असे. कालांतराने वयाच्या चौदाव्या वर्षाच्या आसपास बॉयफ्रेन्ड आयुष्यात आले, तरी तेव्हा त्या नव्या नात्यात सेक्स करायलाच हवं असा कोणताही वैय्यक्तिक किंवा सामाजिक दबाव आमच्यावर नव्हता.

बॉयफ्रेन्ड सिनेमाला घेउन गेल्यावर तिथल्या अंधारात घेतलेल्या चोरट्या चुंबनांपलीकडे कधी आमची मजल जात नसे. आणि पहिलं चुंबन मिळवण्यासाठी सुद्धा बॉयफ्रेन्ड मंडळींना भरपूर प्रणयाराधन करावं लागे. हां, आणि आम्ही गरमागरम प्रेमपत्र सुद्धा पाठवायचो बरं का! आपलं कौमार्य जपणं हे त्या काळी किमान साखरपुडा होईपर्यंत केलं जायचं किंवा किमान लग्नाचं विश्वासार्ह आणि ठाम आश्वासन मिळेपर्यंत तरी. आपल्या शरीर असं का, सेक्स म्हणजे काय वगैरे ज्ञान क्वचित आईकडून तर बरंचसं चोरून वाचलेल्या पुस्तकांतून आणि मित्रमैत्रिणींकडून मिळायचं. एक गोष्ट मात्र आमच्या पापभिरू मनावर कोरली गेली होती, ती म्हणजे कितीही इच्छा बळावली तरी ती पुर्णत्वाकडे कधीही न्यायची नाही. असं करणं म्हणजे फक्त नको असलेलं गर्भारपण ओढवून घेणं इतकंच नव्हे तर सगळ्यांसाठी ती गोष्ट एका भयंकर दुर्घटने सारखी होती.

आज एखाद्या किशोरवयीन मुलीला तिच्या बॉयफ्रेन्डने सेक्स्टिंग (sexting) केलं तर त्याच्या उत्तरादाखल आपला एक उत्तान कपडे घातलेला हॉट सेल्फी पाठवावा की आणखी काही करावं असा प्रश्न पडतो. त्यात तिला समवयस्कांकडून एकाहून एक भयानक असे सल्ले मिळत असतात. जणू काही त्या वयातल्या एखाद्या मुलीने करायच्या या अत्यंत सामान्य गोष्टी आहेत.

अँबरने या गोष्टी सहजपणे अंगिकाराव्यात असं मला वाटतं का? एका मुलीने करायच्या या अगदी सामान्य गोष्टी आहेत असं तिला वाटावं का? तिला कधी एखादं सुंदर प्रेमपत्र मिळेल की तिला फक्त शरीराची भूक असलेल्या भावनाशून्य नात्यांना तोंड द्यावं लागेल? ज्या मुलींच्या वाट्याला या गोष्टी येतील, त्यांच्याबद्दल मला खूप वाईट वाटतं. स्वतंत्र आयुष्य जगायच्या नादात स्वैराचाराची बंधनं लादून घेतली की काय होतं याची आजची पिढी हे उदाहरण आहे.

आमच्यात आणि आजच्या काळात एक मूलभूत फरक असा की आम्हाला मर्यादांची जाणीव होती. काही वेळा याच मर्यादा जाचक वाटल्या तरी आमच्याकडून काय अपेक्षित आहे हे ठावूक असल्याने आमचा पाय कधी घसरला नाही. आमच्या आईवडिलांशी आमचे कडाक्याचे वादही व्हायचे, पण तरीही आम्ही आज्ञाधारक होतो. आपण वेगळं वागलो, तर त्यांना आवडणार नाही हा प्रेमळ धाक होता. माझ्या बाबांना मी काजळ लावलेलं आवडायचं नाही, आणि मी ते मुद्दामून लावून त्यांना डिवचायचे. आमच्या मनासारखं झालं नाही तर आम्ही घर सोडून जाऊ अशी धमकीही आम्ही द्यायचो पण तसं करण्याची हिंमत कधीच झाली नाही. आपण कसे वागलो म्हणजे आईबाबांना आवडेल, हा विचार कायम मनात असायचा.

लोकांनी काय, किती (कमी), आणि कसं खावं हे सांगणारे धंदेवाईक तज्ञ आणि जाहीरातींचा मारा करणार्‍या कंपन्या तेव्हा नव्हत्या. आम्हाला एक वेळचा नाश्ता आणि दोन वेळचं भरपूर जेवायला मिळत असे. मधल्या वेळीतर भूक लागली तर सँडविच मिळत. तरीही आम्ही बारीक होतो, पण कुठल्याही व्यायामशाळा किंवा स्वतःची उपासमार करुन घेऊन नव्हे, तर या बारीकपणामागचं खरं कारण भरपूर चालणे आणि नाचकाम हे होतं. त्यामुळे आमच्या कंबरेचा "कमरा" कधी झालाच नाही. एखादं गुटगुटीत बाळ बघितलं की आपलंही असंच बाळ हवं असं लोकांना वाटायचं, आणि किशोरवयात जरासं जाडसर पोर बघितलं की कुणी हेटाळनी करायचं नाही. मुलींना त्यांच्या शरीरयष्टीवरुन हिणवलं जायचं नाही. आजचा काळ शस्त्रक्रीयेने चरबी काढण्याचा आहे. पण तरीही प्रचंड सुटलेली लठ्ठ शरीरं हा प्रकार त्या काळात सर्रास नव्हताच. दुर्दैवाने वेगवेगळ्या फळांचे रस, बारीक होण्याची घातक औषधं, आणि सूपरफूड यांची रेलचेल असलेल्या आजच्या काळात आजच्या मुली आपल्या शरीराबाबत समाधानी नाहीत.

लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केल्यावर मी काही काळ नृत्यांगना आणि मॉडेल म्हणून काम केलं. मग न्युयोर्कला गेले आणि संशोधक ग्रंथपाल (research librarian) म्हणून काम केलं. मग लग्न केलं आणि वयाच्या चोवीसाव्या वर्षी लंडनला परतले.

निसर्गाच्या विरोधात जाऊन घेतलेला समानतेच्या शोधाबद्दलची माझी अस्वस्थता साधारण १९७९ साली माझ्या The MsTaken Body या माझ्या पहिल्या पुस्तकातून. समानतेचा ढोल वाजवणर्‍या महिलांचा अतिरेक तेव्हाच मला दिसू लागला होता. आज प्रसूतीबद्दल कुठलीही गोष्ट नैसर्गिक पद्धतीने करण्यात बायकांना वाढत्या प्रमाणात वाटणारी भीती आणि "आणल्या जाणार्‍या" कळा या गोष्टी निश्चितच योगायोगाच्या नाहीत.

स्त्री असण्यामागचा आध्यात्मिक आणि शारिरिक आनंद आज यांत्रिकतेत जखडला गेला आहे. मूल जन्माला घालणं यातला आनंद "मा लाईफ मा चॉईस" मुळे केव्हाच हरवला. फार पुर्वी घरी सुईण येऊन मूल जन्माला येताना तुम्हाला मदत करायची. आता पुरुषी ढवळाढवळ वाढल्याने म्हणा किंवा प्रसूती आरामदायक व्हावी या करता औषधांचा मारा वाढल्याने म्हणा, स्त्रीयांना स्वतःबद्दल, स्वतंच्या शरीराबद्दल पुरेसा आत्मविश्वासच उरलेला नाही. समानतेमागे धावता धावता नवर्‍यांनी प्रसूतीदरम्यान हजर राहण्याचं फॅड निघालं आणि प्रसूतीसाठी तज्ञांचा ताफा हजर राहू लागला, आणि स्त्रीयांना आपण हे दिव्य एकटीने पार पाडू शकतो हा विश्वासच उरला नाही. आता मला सांगा, अशा समानतेचा काय उपयोग?

एक गोष्ट मात्र नक्की की पुरुषांची बरोबरी करण्याच्या मागे लागता लागता आज स्त्रियांची मक्तेदारी असलेली क्षेत्रे आज उरलेलीच नाहीत. मला असं वाटतं की स्त्रीच्या पारंपारिक भूमिकांचं सरसकटीकरण (stereotyping) हे खरं तर स्त्रीलाच एक वेगळी ओळख आणि सुरक्षितता प्रदान करतं. मुलं जन्माला घालणं आणि घराची काळजी घेणं याचा अर्थ तुम्ही जखडला गेला आहात असा नाही, तर तुम्हाला तुमच्या स्त्रीपणाचा सोहळा साजरा करण्याचं. स्वातंत्र्य मिळालं आहे असा होतो.

मला दोन मुलं पदरात असताना मी दोन डिग्र्या घेतल्या, काही काळ शिक्षिकेच्या भूमिकेत शिरले आणि मग लेखक आणि ब्रोडकास्टर म्हणून नाव कमावलं. हे करत असतानाच मी घरही सांभाळत होते. घरच्यांसाठी स्वयंपाक करत होते, मुलांशी खेळत होते, त्यांचा अभ्यास घेत होते आणि कधी कधी या सगळ्याचा ताण असह्य होऊन कोलमडतही होते. पण मी माझ्या मुलांमागे नेहमीच ठामपणे उभी होते. माझ्या आयुष्यातून काही शिकण्यासारखं असेल तर ते हे की आयुष्यात असलेले लोक महत्त्वाचे आहेत आणि एक बायको, आई, आणि बाई म्हणून ज्या ज्या म्हणून भूमिका त्यात अध्याहृत असतील त्या सगळ्या भूमिकांसकट माझं तिथे असणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि अनिवार्य आहे.

मी फक्त ४४ वर्षांची असताना माझा नवरा जॅक्स कर्करोगाने गेला. त्या वेळी तो ६१ वर्षांचा होता. एक आई म्हणून माझ्या मुलीवर मी कदाचित जास्तच भार टाकला असेल, पण त्या वेळी माझ्यात सुपरवुमन घुसली होती, आणि हा शब्द किती फसवा आहे हे आता लक्षात येतंय.

मी आजही "अग्गं बाई, बाईनेच का बरं ही कामं करायची" असा विचार न करता पदर खोचून स्वयंपाकघरात घुसू शकते, झाडलोट करु शकते, आणि घरातली कोणतीही कामं आनंदाने करते. मग ती करताना मी बाहेर कोण म्हणून वावरते त्याचा काहीही संबंध नसतो. रोजची घरातली कामं करणं ही देखील एक स्त्री म्हणून व्यक्त होण्याची एक पद्धत आहे आणि त्यातून चक्क आध्यात्मिक आनंद मिळवता येतो. जगण्याकरता भरपूर पर्याय समोर उपलब्ध असणं यात आयुष्याची परिपूर्णता नाही हे माझ्या केव्हाच लक्षात आलंय.

एक आजी म्हणून माझी अशी इच्छा आहे की माझ्या अँबरने असंच आयुष्य जगावं. तिने आयुष्यात काहीही करावं, पण तिला छान स्वयंपाक करता यावा, तिने घरासमोरच्या बागेत शांतपणे बसून पुस्तक वाचावं, उत्तम संगीताची तिला जाण असावी, आणि मुलांना घेऊन समुद्रावर फिरायला तिला जाता यावं— आणि मुख्य म्हणजे या सगळ्यासाठी तिला भरपूर वेळ मिळावा — जो आजच्या मुलींकडे उरलाच नाहीये. समानतेच्या मागे जाताना तिने दारूत स्वतःला बुडवून घेऊ नये आणि निरर्थक शारीरिक संबंधांनी स्वतःला नासवूनही घेऊ नये. तिने संवेदनक्षम, दयाळू, आणि सर्जनशील असावं पण त्याही पेक्षा एक बाई म्हणून आत्मविश्वासाने वावरावं. पुरुषांची बरोबरी करायला न जाता तिने आपलं स्त्रीत्व जपावं, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचा सोहळा साजरा करावा.

एक स्त्री म्हणून, आई म्हणून देवाकडे लई नाही मागणं !

© मंदार दिलीप जोशी (मराठी रूपांतर/भाषांतर)
फाल्गुन कृ. ७, शके १९३९ | ८ मार्च इसवी सन २०१८

मार्क्सवादी स्त्रीमुक्ती चळवळीचे भयाण वास्तव

मार्क्सवादी स्त्रीमुक्ती चळवळीचे भयाण वास्तव: अमेरिकन स्त्रीवादी चळवळीची मुकुटमणी केट मिलेट यांची धाकटी बहीण मॅलरी मिलेट यांच्या शब्दातः

या लेखाच्या सुरवातीलाच मॅलरी त्यांच्या बालपणीची एक गोष्ट सांगतात. हायस्कूल नंतर मॅलरी मिलेटना त्यांच्या शाळेतल्या एका ननने विचारलं की पुढे काय करायचा विचार आहे. मॅलरीने उत्तर दिलं आता स्टेट युनिवर्सिटीत प्रवेश घेईन. यावर ननच्या चेहर्‍यावर पसरलेले उदास भाव पाहून मॅलरीने त्यांना कारण विचारलं. नन म्हणाली, मला वाईट वाटतं की चार वर्षांनंतर तू एक डाव्या विचारसरणीची नास्तिक बनूनच बाहेर पडशील. मॅलरी म्हणतात, "मला हसू आलं. किती भोळसट आणि बावळट विचार आहेत यांचे." मग मॅलरी विद्यापीठात गेल्या आणि चार वर्षांनी आपल्या सहा वर्षांनी मोठ्या असलेल्या आपल्या केट मिलेट या बहिणीसारख्याच डाव्या विचारसरणीच्या नास्तिक बनून बाहेर पडल्या. त्या ननने वर्तवलेलं भविष्य खरं ठरलं होतं.

हा प्रसंग पाहिला तर डाव्यांनी अमेरिकेत किती घट्ट पाय रोवले होते याचा अंदाज येइल. हिटलरने पार्श्वभागावर लाथ मारून हाकललेले फ्रँकफर्ट स्कूलवाले अमेरिकेत पोहोचले आणि तिथे अमेरिकेची संस्कृतिक वाट लावण्याचे काम जोमाने केलं. आज आपण जी अमेरिका पाहतो, जे त्यांचं संस्कृतिक व कौटुंबिक जीवन पाहतो तसं ते नेहमीच तसं नव्हतं. अमेरिकन असले तरी कुटुंबाचं महत्त्व त्यांच्या दृष्टीनेही होतंच. डाव्यांच्या क्रिटिकल थिअरीने अमेरिकन संस्कृतीची पूर्ण वाट लावली आणि भ्रष्ट केलं. आता अमेरिका करते म्हटल्यावर त्याचं अनुकरण जगाने करणं हे ओघाने आलंच. आपल्याकडे अशा विचारांचं आकर्षण हे अशा पद्धतीने आयात केलेल्या विचारांचं आहे.

या लेखात मॅलरी आपल्या बहिणीच्याच आग्रहावरुन न्यू यॉर्कला स्थलांतरित झाल्यावाच्या एका प्रसंगाचं वर्णन करतात. केटने त्यांना आपली मैत्रिण लिली कार्पच्या घरी एका कार्यक्रमाला बोलावलं. कार्यक्रमाच्या सुरवातीला अध्यक्षस्थानी असणार्‍या केटने शाळेत घोकून घ्यावी तशी काही उत्तरं घोकून घेतली. ती अशी होती:

"आपण इथे का जमलो आहोत?" - केट
"क्रांती करायला" - सगळ्यांनी एका सुरात उत्तर दिलं.

"कुठल्या प्रकारची क्रांती?" - केट
"संस्कृतिक क्रांती" - सगळे

"आणि आपण ही संस्कृतिक क्रांती कशी करणार आहोत?" - केट
"अमेरिकन कुटुंबसंस्थेचा नाश करुन" - सगळे

आणि अमेरिकन कुटुंबसंस्थेचा नाश कसा करणार?" - केट
"अमेरिकन बापाचा नाश करुन" - सगळे

"आणि अमेरिकन बापाचा नाश कसा करणार?" - केट
"त्याची शक्ती खलास करुन" - सगळे

"आणि ती कशी खलास करणार?" - केट
"लग्नसंस्थेवरची निष्ठा खतम करुन" - सगळे

"आणि ती कशी खतम होणार?"

मॅलरी लिहीतात, की यावर जे उत्तर आलं त्यामुळे त्यांना जबर धक्का बसला. त्या म्हणतात, माझा श्वासच अडकला, कानांवर विश्वास बसेना. कोण होते हे सगळे? मी नक्की पृथ्वीवर चाललेल्या कार्यक्रमातच बसले होते की भलत्याच ग्रहावर?

ते उत्तर होतं:
"स्वैराचार, कामुकता, वेश्यावृत्ती, आणि समलैंगिकतेला प्रोत्साहन देऊन (आम्ही लग्नसंस्था आणि कुटुंबव्यवस्थेला) खतम करणार."

--------------

केटने अनेक पुस्तकं लिहीली, त्यातली अनेक महाविद्यालयांत अभ्यासालाही लावली गेली. केट लवकरच अमेरिकन स्त्रीवादाची मुकुटमणी बनली. तिचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ मानला जाऊ लागला.

--------------

लेखात मॅलरी आणखी एक मुद्दा मांडतात. त्या म्हणतात की आज मी माझ्या बहिणीच्या नादाला लागून बरबाद झालेल्यांकडे पाहते तेव्हा हृदय विदीर्ण होतं. म्हातारं सगळ्यांनाच एक ना एक दिवस व्हायचं आहे, मात्र या सगळ्या जणी आज स्त्रीवादाची शिकार झाल्याने भीषण एकाकीपणाने ग्रस्त आहेत. त्यांनाही आजी होता आलं असतं, आणि ज्या कुटुंबसंस्थेचा स्वतःच्या हाताने नाश केला तेच नातेसंबंध आज त्यांना हवेहवेसे वाटत आहेत पण ते आता त्या कधीच अनुभवू शकणार नाहीत. मॅलरी या केटच्या बहीण असल्याचं जेव्हा लोकांना कळतं तेव्हा "तुझ्या बहिणीच्या पुस्तकांमुळे माझ्या बहिणीचं (किंवा जी कोण असेल तिचं) आयुष्य बरबाद झालं असं अनेकदा ऐकवलं जातं.

आपल्याकडे हिंदूंच्या दुर्दैवाने या इंग्रजी डाव्यांच्या पुस्तकांचे पुरेसे अनुवाद झाले नाहीत (हे डावे उच्चविद्याविभूषित असूनही) पण त्यांच्या कल्पना मात्र इथे राबवल्या गेल्या. त्याने जे नुकसान झालं ते झालंच, आणि अजूनही चालू आहे. संस्कृतिक विध्वंस कसा करायचा या संबंधी फ्रॅकफर्ट स्कुलोत्पन्न घटिंगणांनी भरपूर लेखन केलेलं आहे आणि त्यांच्या कल्पना इकडे राबवून इथल्या डाव्यांनी आपलं भरपूर नुकसानही केलेलं आहे. लव्ह जिहादला याच कारणाने प्रोत्साहन मिळालेलं आहे, पण त्यासंबंधातला लेख पुन्हा केव्हा तरी. दुर्दैवाने आपल्याक्डे हिंदुत्ववादी संघटनांनी बौद्धिक योद्ध्यांना तयार करण्यात अक्षम्य चालढकल केली आणि या पुस्तकांचं भाषांतर केलंच नाही. त्या इंग्रजी पुस्तकांचं देशी भाषांत रूपांतर करायला अजूनही वेळ गेलेली नाही.

देशाला कळायला हवं, की हे विष आहे.

असो. मॅलरी मिलेट यांचा मूळ इंग्रजी लेख तुम्हाला इथे वाचता येईल.
https://www.frontpagemag.com/fpm/240037/marxist-feminisms-ruined-lives-mallory-millett

 https://photos.app.goo.gl/vNZueF3xipoDmOiv1


  © मंदार दिलीप जोशी
     शके १९३९