"आजोळी आला आहेस, रिकाम्या हाताने कसं जाऊ देणार?"
मूळ हिंदी लेख: © तनया प्रफुल्ल गडकरी (https://www.facebook.com/tanaya.gadkari/posts/1845350532199281)
मराठी रुपांतर: © मंदार दिलीप जोशी
हे शब्द फक्त प्रेम किंवा सामाजिक औपचारिकता नाहीत. हे समाजशास्र किंवा मानसशास्त्रात सांगितलेले सिद्धांत प्रत्यक्षात सिद्ध करायची उदाहरणे देखील नव्हेत.
हे शब्द म्हणजे धर्माचे प्राण आहेत. भारताचा आत्मा आहे.
दवबिंदूंसारखे मनाच्या प्रत्येक कोपर्याला हलकेच भिजवून शीतलता प्रदान करणारे हे शब्द साधारण साडेपाच वर्षांपुर्वी ऐकल्याचं आठवतं.
२०१२ सालच्या थंडीतली गोष्ट आहे. नवी दिल्ली येथे IBTL भारत संवाद च्या कार्यक्रमात आदरणीय श्रीमती निर्मला सीतारामन, डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी, श्री महेश गिरी,श्री शेषाद्रि चारी, श्रीमति मीनाक्षी लेखी यांच्या आधी एक अपरिचित गृहस्थ मंचावर आले.
श्री रामअवतार शर्मा जी।
सीतामाता, प्रभू श्रीराम, आणि लक्ष्मण यांच्या पदचिह्नांचा माग काढत अयोध्या ते रामेश्वरम् आणि तिथून जनकपुर पर्यंत चक्क सायकल दामटवत आले होते. त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितलं की त्यांच्या मार्गातील वनवासी बंधूभगिनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल असे बोलत होते जणू काही वेळापूर्वीच राम तिथून पुढे गेले असावेत.
जनकपुरात त्यांना आलेल्या एका सुंदर अनुभवाबद्दल बोलताना ते म्हणतात:
जनकपुरच्या मंदिराच्या महंतजींना मी भेटायला गेलो, तेव्हा मी त्यांचा कुणीच लागत नसतानाही एखाद्या जवळच्या नातेवाईकाचं करावं तसं त्यांनी माझं आदरातिथ्य केलं. एक संपूर्णपणे अनोळखी व्यक्ती असूनही!
मी जेव्हा तिथून निघालो, तेव्हा त्यांनी माझ्या हातात एक पाकीट ठेवलं. मला वाटलं, मंदिरातला अंगारा असेल. आगाऊपणे उघडून बघितलं तर त्यात शंभराची नोट होती! मी आश्चर्यचकित होऊन त्यांना विचारलं की "बाबाजी मी तर एक गृहस्थ आहे, खाऊन पिऊन सुखी आहे, नीट चाललंय सगळं, मग तुमच्या सारख्या महात्म्याने मला पैसे का द्यावेत?"
बाबाजी म्हणाले, "सीतेला काय म्हणता तुम्ही?"
मी म्हणालो, "सीतामाता...सीता आई आहे आमची."
त्यावर बाबाजी एकदम मान उंचावून गर्वाने म्हणाले, "अरे सीता माझी मुलगी आहे. आजोळी आला आहेस, रिकाम्या हाताने कसं जाऊ देणार?"
_________
श्री रामअवतारजींनी जेव्हा ही घटना सांगितली, तेव्हा ऐकणार्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसली. मनात दाटलेल्या भावनांनी गंगाजमुना रूप घेऊन वहायला सुरवात केली.
आम्ही कुठे बाहेर गेलो, फिरायला गेलो, तीर्थक्षेत्री गेलो, कुठेही गेलो की माझे बाबा नेहमी म्हणायचे, "लोकांकडे एवढी श्रद्धा आणि ऊर्जा येते कुठून? त्यांच्यात एवढी विजिगिषा येते कुठून? काय आहे ती शक्ती? त्या स्त्रोताचा शोध घे!"
एकदम काहीतरी मनात चमकलं. मी वळून बाबांकडे बघितलं....त्यांचेही डोळे पाणावलेले होते.
हीच शक्ती आहे जिने सनातन धर्माचं मूळ सनातन स्वरूप जपलं आहे. सकाळी कॉलनीत झाडू मारणार्या मावशींना माझी, "राम राम मावशी, कशा आहात?" अशी आरोळी ऐकू आली नाही की ताडकन त्यांचा ठेवणीतला टोमणा ठरलेला असतो. त्यांना आणि मला जोडणारा माझा राम आहे. प्रभू रामचंद्र आणि सीतामातेचं चित्र गल्ल्यावर लाऊन लोकांची पादत्राणं शिवणारे काका याच सनातन धर्माला बळ देत असतात. प्रभू रामचंद्र आणि सीतामातेला भेटायला आलेल्या यात्रेकरूंच्या सेवेकरता मोठ्यातले मोठे श्रीमंत, अनवाणी धाव घेतात. त्यांच्यात आणि या तीर्थाटन करणार्या यात्रेकरूंच्यात पैसा, जात, पद, ओळखपाळख वगैरेंचा काही संबंध नसतो. ती सगळी प्रभू रामचंद्र आणि सीतामातेची लेकरं असतात.
आदरणीय गिरधारी लाल गोयल जी जेव्हा नमोंना दमात घेतात तेव्हा म्हणतात, "चार वर्ष साहेबांचं तोंड नाही बघितलं, आता आलेत आजोळच्या दारात आजीच्या डबोल्यावर डोळा ठेवून! हुं!!" या शब्दांत मला सनातनाला एकत्र बांधणारं हेच समान सूत्र दिसतं.
याचं आणखी एक उदाहरण रामअवतारजींनी दिलं. १९४७च्या आधी जनकपुरकडून अयोध्या प्रशासनाला काही रक्कम पाठवली जायची, जी राजर्षी जनक महाराजांकडून श्रीरामांना भेटीदाखल दिलेल्या जमीनीतून आलेल्या उत्पनातून दिली जायची. शतकानुशतकं चाललेली ही परंपरा १९४७ नंतर "स्वतंत्र" भारताच्या सरकारने बंद केली. जणू दोन देशांतल्या नातेसंबंधांना तिलांजली दिली, तो मान संपुष्टात आणला.
जेव्हा कम्युनिट चीन भारताच्या पूर्वोत्तर राज्यांत आपला प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने बौद्ध प्रतीकांना अस्त्रासारखं वापरून घेत होता, आम्ही "सेक्युलर स्टेट" होण्याचं प्रदर्शन करत आमचे जोडलेले संबंध विसरत आपल्याच माणसांना गमावत होतो.
मधे कुठेतरी हरवलेलं हे सूत्र आज परत मिळाल्यासारखं वाटतंय.
संपूर्ण भारतीय उपखंडासह दक्षिण पूर्वेकडचे समुद्राने वेढलेले देश उदाहरणार्थ कंबोडिया, वियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, थाईलँड, सिंगापुर वगैरे देश यांना मोत्यांची उपमा दिली तर या मोत्यांना ओवणारा बारीकसा दोरा कुठला, याची जाण भारताच्या सद्ध्याच्या पंतप्रधानांना आहे. म्हणूनच जेव्हा ते नेपाळचे पंतप्रधान खड्ग प्रसाद शर्मा ओली यांना "मेरे भाईसाहब" म्हणतात तेव्हा ते संबंध निव्वळ योगायोगाने, भौगोलिक परिस्थितीमुळे झालेल्या नैसर्गिक शेजार्यांमधले उरत नाहीत तर "आजोळ" आणि "मुलीचं सासर" यातले संबंध होऊन जातात.
याच मुळे सनातन भारताचं अस्तित्व अभंग आहे. बाकी दोन देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांमधे काय खेचाखेची चालायची ती चालूदे, ती चालतच राहणार. देशादेशात माणसं रेषा आखतात, त्या खोडल्याही जाऊ शकतात.
पण श्री रामनाम नामक सेतू ज्याने ओळखला, ज्याच्या मनःचक्षुंना दिसला, तो या समान सूत्राशी जोडला गेला किंवा त्याने स्वतःला जोडून घेतलं, असं समजा.
आता फक्त अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीची वाट बघुया.
बोला सियावर रामचंद्र महाराज की जय.
श्री रामअवतार शर्माजी यांचं वक्तव्य या लिंकमधे विशेषतः ७:३० आणि ८:१५ मिनीटे यांमधे पहा:
https://www.youtube.com/watch?v=gVSP8engVjY&feature=youtu.be
मूळ हिंदी लेख: © तनया प्रफुल्ल गडकरी (https://www.facebook.com/tanaya.gadkari/posts/1845350532199281)
मराठी रुपांतर: © मंदार दिलीप जोशी
_____________________________________________

"नाना के घर आए हो, खाली हाथ कैसे जाओगे?"
ये शब्द महज़ स्नेह या लोक व्यवहार नहीं हैं! ये समाजशास्त्र या मानसशास्त्र को साधने की कला का उदाहरण भी नहीं हैं!
ये शब्द धर्म का प्राण हैं। भारत की आत्मा हैं!
आज से साढ़े पाँच वर्ष पहले सुने थे, तब से ओस की बूंदें बनकर हृदय को सींचते आए हैं... ये शब्द!
2012 की सर्दियाँ थीं। नई दिल्ली में आयोजित IBTL भारत संवाद प्रारंभ हुआ। (आदरणीय): श्रीमति निर्मला सीतारमण, डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी, श्री महेश गिरी, श्री शेषाद्रि चारी, श्रीमति मीनाक्षी लेखी इत्यादि नामों से पहले एक अपरिचित सज्जन मंच पर आए...
रामअवतार शर्मा जी।
साइकल से सीता-राम-लक्ष्मण के पदचिह्नों का अनुसरण करते हुए अयोध्या से रामेश्वरम् और जनकपुर तक यात्रा कर आए थे।
उन्होंने गाथा बताई.. कैसे राह भर के वनवासी श्री राम के विषय में यूँ बात करते मानों कुछ समय पहले ही राम वहाँ से होकर गए हों!
जनकपुर के विषय में एक सुंदर घटना कही। उन्हीं के शब्दों में:
__________
"जनकपुर का जो मंदिर है.. उसके महंत जी के पास मैं गया। उन्होंने मुझे रिश्तेदार की तरह रखा। अनजान आदमी को! जब मैं चलने लगा, उन्होंने मुझे एक लिफाफा दिया। मैंने सोचा, बाबा ने भभूत दी होगी! फिर मैंने बेईमानी से खोलकर देखा तो उसमें 100 रुपए का नोट था !!!
मैंने पूछा: बाबा मैं तो गृहस्थ हूँ, मेरी दाल रोटी चल रही है.. आप महात्मा होकर मुझे पैसे क्यों देते हैं?
बाबा बोले- सीता को क्या मानते हो?
मैंने कहा- सीता हमारी माँ है।
तो वो बड़े गर्व से बोले-सीता मेरी बेटी है। और तुम नाना के घर आए हो, खाली हाथ जाओगे क्या? "
_________
मुझे याद है... यह सुनकर सबकी आँखें जगमगा उठी थीं। भावों ने अश्रुओं का रूप धर लिया था!
अक्सर बाऊ 'जन दर्शन' कराते हुए कहते थे... "लोक इतनी श्रद्धा और ऊर्जा कहाँ से पाता है? यह जीवट कहाँ से आता है? वह शक्ति क्या है? उस स्रोत को खोजो!"
लगा कि जैसे 'स्रोत' का पता मिल गया है! मैंने पलटकर बाऊ को देखा.. उनकी भी आँखें नम थीं।
यही शक्ति है जो सनातन को सनातन रखे हुए है। सुबह सकारे कॉलोनी में झाड़ू देती, कचरा उठाती काकी को यदि मेरा " राम-राम सा। कैसे हैं ?" सुनाई ना दे तो फट से ताना मिल जाता है। उन्हें और मुझे मेरा राम जोड़ता है। सीताराम का चित्र अपने गल्ले पर लगाकर जूते सिलते बाऊजी सनातन को संबल देते हैं। सीताराम के नाम पर बड़े-बड़े धनिक श्रेष्ठी , जातरुओं की सेवा को नंगे पाँव दौड़ जाते हैं। उनमें और जातरुओं में धन, जाति, पद, परिचय का संबंध नहीं है.. पर सब सीताराम के बेटे-बेटी हैं।
आदरणीय गिरधारी लाल गोयल जी जब नमो को उलाहना देते हैं : "चार साल से पापाजी का तो मुंह तक नहीं देखा ,अब जेब खर्च के लिए नानी की गुल्लक पर निगाह गढ़ा के चल दिए ननसाल? हुँह!" तब मुझे यही सम्बन्ध सूत्र नज़र आता है। :)
इसका एक और उदाहरण राम अवतार जी ने दिया था। 1947 से पहले तक जनकपुर से अयोध्या प्रशासन को कुछ राशि भेजी जाती थी जो राजा जनक द्वारा अयोध्या को उपहार में दी भूमि से मिलती थी। सहस्त्राब्दियों की इस परंपरा को 47 के बाद बंद कर दिया भारत सरकार ने। दो देशों के मध्य रिश्तेदारी का मान खत्म कर दिया!
जब कम्युनिस्ट चीन उत्तर-पूर्वी भारत में अपना प्रभाव बढ़ाने के लिए बौद्ध प्रतीकों को अस्त्र बना रहा था, हम अपने रक्त संबंध भुलाकर 'सेक्युलर स्टेट' होने का प्रदर्शन कर अपनों को खो रहे थे।
मध्यांतर में खोया वह सम्बन्ध सूत्र आज पुनः मिला है।
भारत के वर्तमान प्रधानमंत्री को संपूर्ण भारतीय उपमहाद्वीप, दक्षिण पूर्व व महासागरीय देशों जैसे कंबोडिया, वियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, थाईलैंड, सिंगापुर इत्यादि को जोड़ने वाले इस धागे का पता है।
जब वह नेपाल के प्रधानमंत्री खड्ग प्रसाद शर्मा ओली को 'मेरे भाईसाहब' कहते हैं तो सम्बंध केवल संयोग से भौगोलिक पड़ोसी होने का नहीं रह जाता, 'नाना का घर' और 'बेटी का ससुराल' वाला हो जाता है।
इसी से सनातन भारत का अस्तित्व अखंड है । बाकी विदेश मंत्रालयों के मध्य खींचातानी का क्या है,वह तो चलती रहती है। इंसानों की खींची लकीरें बनती और मिटती रहती हैं।
श्री सीताराम नाम सेतु है। जो समझ गया सो जुड़ जाएगा, जोड़ लेगा।
बस अब अयोध्या में भव्य मंदिर की प्रतीक्षा है।
जयतु श्री सीता राम।
[ * देखें श्री रामावतार शर्मा जी का वक्तव्य। विशेषतः 7मिनट 30 सेकण्ड और 8:15 का भाग। ]
- © तनया प्रफुल्ल गडकरी (https://www.facebook.com/tanaya.gadkari/posts/1845350532199281)

No comments:
Post a Comment