Monday, October 19, 2015

रावणाचे वकील अर्थात डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट

दोन दिवस झाले फेसबुकवर एक छोटीशी हिंदी कविता फिरते आहे:

मैने महसूस किया है
उस रावण का दु:ख

जो सामने खडी भीड से
बारबार पूछ रहा था...

"सच सच बताओ तुम में से कोई राम है क्या?"

उपरोक्त कविता वर वर फार साधीसुधी वाटत असली तरी फार साळसूदपणे लिहीली गेली आहे. मग त्या कवितेला उत्तर म्हणून हिंदीतच एक कविता लिहीली. अधिक हिंदी लिखाण करण्याचा मानस नाही. मात्र उत्स्फूर्तपणे सुचलेले उत्तर लिहीण्याचा मोह आवरला नाही. हे ते उत्तरः

शायद वो लेकिन भूल गया
जब हर दहलीज पे रावण है

क्यों रामावतार की राह तकें?
जब हर नर मे नारायण है

क्यों रावण से बातें कहलवाकर
अपनीं ही रोटीं सेंकते हो

बतलाओ तुम कम से कम
कितने में बिक जाते हो

आज अयोध्या की गलींयों में
घुस आयें लंकावासी हैं

रावण की पैरवी करवाने
उनसे ही ये अलफाज लिखायें हैं

Wednesday, October 7, 2015

एका सूनबाईंच्या ओव्या

बाप तो फॅसिस्ट, मुसोलीनी मित्र
डोक्यात विखार, भरलासे

सापडे सावज,  खानदानी खास
लग्न ती सत्वर, करतसे

आल्या आल्या तिने, दीराला गिळले
सासू व नवरा, सावकाश

देश खाऊनिया, पोट न भरे
ढेकरही तिजला, येत नसे

मूल मतिमंद, कन्या गतिमंद
जावई मवाली, निपजले

चिरंजीव झेप, गुरूग्रहापुढे
तर्क त्याचा भारी, एस्केपतो

गरीबी ती एक, असे मनोवस्था
भर सभेत तो, बरळला

कन्या रोज घाली, जीन्स ती टाईट
निवडणूक येता, साडी नेसे

बंगला ती बांधी, बंगला ती पाडी
देश तिच्या 'बा'ची, मालमत्ता

जावई छपरी, केला तो केला
वर डोक्यावरी, बसविला

मग जाई सत्ता, साफ होई पत्ता
चोर चव्वेचाळ, उरलेले

पंतप्रधान ते, एक ब्रह्मचारी
देशसेवा व्यसन, जडलेले

लागले धडक, कामाला जोरात
जोर त्यांचा हिला, भिववतो

काळा पैसा आता, कैसा कमवावा
मानवावे कैसे, ऐदीपण

सुचे एक युक्ती, मिळे पक्षा मुक्ती
बंद पाडूनिया, संसदेला

होऊच न द्यावे, काम काही तिथे
लोकां भडकावी, बाहेर ती

आज आंदोलने, उद्या धोंडाफेक
परवा कुणास, पेटवावे

भाऊ भाऊ तिने, भिडविले सारे
फोडाफोडी केली, घरातच

व्हॅटिकन देई, शाब्बाशी तिजला
क्रूस आणि चाँद, आनंदित......

येडी घालोनिया, सदासर्वकाळ
जनता ती फसे, किती दिन

फेसबुक देखे, देखे ती ट्विटर
जनता अडाणी, भासे हिला

जन होती सूज्ञ, देशसेवा यज्ञ
अज्ञतेचा ज्वर, त्यागोनिया

पापांचा तो घडा, भरलासे आता
जनता ती मजा, बघतसे

पुन्हा निवडावे, मग कमळास
रक्तपाती हात, नाकारुन

पाच वर्ष पुन्हा, प्रधानसेवक
आणावे ते मग, निवडून

हातामध्ये हात, त्याची वाताहात ।
होई भविष्यात, मंद्या म्हणे ।। 

-----------------------------------------------------------------
या ओव्यांचा कुठल्याही शहाण्या, अर्धवट, किंवा ठार वेड्या अशा मानसिक स्थिती असलेल्या व्यक्तींशी; जिवंत, अर्धमेल्या, किंवा मृत व्यक्तींशी; आणि त्यांच्या स्थान, भाषा आणि व्यवसाय वगैरेंशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
-----------------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
भाद्रपद कृ. १०, शालीवाहन शके १९३७

Monday, October 5, 2015

हाय फाय

एक दिवस अगोदर बनवायला टाकलेला चष्मा येण्याची वाट बघत कोथरुडातल्या ठरलेल्या दुकानात एका संध्याकाळी शिरलो तेव्हा आत अगोदरच एक जख्ख म्हातारी, तिचा तेवढाच जख्ख म्हातारा नवरा, त्यांची मुलगी, जावई, आणि शाळकरी नात कुठला चष्मा आणि फ्रेम निवडायची यावर तावातावाने चर्चा करताना दिसले. टिपीकल पुणेरी कोथरुडी अतीश्रीमंत हायफाय परिवार होता. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे.

आपण हायफाय आहोत हे दाखवण्याची एकही संधी ते सोडत नव्हते. आपापसात मधेमधे यथेच्छ इंग्रजी वाक्य पेरत आणि अधेमधे अतीव कष्टाने बोललेल्या मराठी वाक्यांवरही आपल्या तथाकथित हायफाय कल्चरची इंग्रजी छाप सोडत त्यांचं आपापसात आणि सेल्सगर्लशी संभाषण सुरू होतं. त्यांचे संभाषण ऐकून मलाच जाम कानकोंडं झाल्यासारखं झालं. कारण आपल्याच कुटुंबियांना भर दुकानात किती उद्धटपणे आणि काय बोलावं याचं तारतम्य साफ सुटल्यागत झालं होतं.

आजींना नवीन चष्मा/चष्मे करायचे होते. चष्म्यांची संख्या आणि फ्रेमचा दर्जा या दोन मुद्द्यांवर तावातावाने खल चालू असताना जावई हातात जुनी फ्रेम नाचवत एक मस्त आयडीयाची कल्पना सुचल्याच्या आनंदात म्हणाला, "एक स्पेअर करायचा असेल तर यातच नवीन काचा टाकूया की".

यावर त्याची बायको, म्हणजे त्या जख्ख दांपत्याची मुलगी फटकन् म्हणाली, "तू गप्प बस, my father is paying for it." आणि मग सेल्सगर्लला उद्देशून, "तुम्ही दाखवा हो, don't listen to my husband". तो बिचारा मंत्र्यालयाच्या सहाव्या मजल्यावर असलेला टवटवीत चेहरा एकदम महापालिकेतल्या चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यासारखा करत, फॉर द एन्टायर ड्युरेशन ऑफ द खरेदी, बारा वाजलेले भाव घेऊन स्वतःच्या स्मार्टफोनशी चाळे करत निमूट बसून होता.

खरं तर अशा वातावरणात मला गुदमरायला होतं. पण ही मुक्ताफळं ऐकल्या नंतर कानावर पडलेली अहंगंड, उद्धटपणा, अरेरावी, आणि श्रीमंतीचा माज यांनी ओतप्रोत भरलेली वाक्य मी एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने सोडून दिली. पण दुर्दैवाने एक वाक्य अक्षरशः कुणीतरी वितळलेलं गरम शिसं ओतावं तसं कानात शिरलं.

कुठली फ्रेम घ्यावी यावर अजूनही खल चालूच होता. आजींना जरा भारीतली फ्रेम घ्यावी असं त्यांच्या मुलीचं मत पडलं. अर्थात, तिचं काहीच जाणार नव्हतं...after all, her father was paying for it.

एका फ्रेमकडे अंगुलीनिर्देश करुन ती हातात घेऊन ती तिच्या मुलीला म्हणाली, "हीच घेऊ, चांगली आहे, after all, it might as well be her last frame" (नाहीतरी तिचीही शेवटचीच फ्रेम असणार आहे).

आता मी त्या कुटुंबाला ओळखत नव्हतो. त्यामुळे कोण जाणे, त्या म्हातारीला काही असाध्य आजारही झालेला असू शकत होता. अर्थात हा माझा त्या बाईच्या मुक्ताफळावरुन काढलेला अंदाज आहे. पण काहीही झालं असेल, कुठलाही आजार झालेला असेल, वय कितीही जास्त असेल, तरी "आपल्या आईचा हा शेवटचाच चष्मा", असं जाहीर बोलणं सोडाच, मनात तरी विचार येतोच कसा? इथे मात्र आजींची एक्स्पायरी डेट माहीत असल्यागत ती मुलगी बोलत होती.

तेवढ्यात मी मागवलेला चष्मा आला, आणि तो घेऊन मी घाईने तिथून बाहेर पडलो.

घरातल्या म्हातार्‍या माणसांनी जरी कधी, "आता काय आमचं राहिलंय", "आता सगळं झालं आता आम्ही डोळे मिटायला मोकळे", असं सहज जरी म्हणाली तरी आपण हेलावतो, आणि असं न बोलण्याबाबत त्यांना प्रेमाने दटावतो.

कालपासून विचार करतोय, त्या आजींना असं प्रेमाने कुणी दटावत असेल का? की, "जाऊदे ना आई, आता कितीसे दिवस उरलेत तुझे" असं घरीही बोललं जात असेल?"

---------------------------------------------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

भाद्रपद कृ. ८. शालीवाहन शके १९३७

Wednesday, August 12, 2015

अस्तनीतले पत्रनिखारे

याकुबने माझे पेपर चोरले त्याच वेळी
कलामांना गाडले जात होते
बातम्यांच्या ढिगात
पुस्तकातल्या जॉर्ज बर्नार्ड शॉला मी विचारलं
यांच्या लेखी कोण मोठा
म्हणालाआमच्यावेळी पत्रकर्त्यांना 
सायकल अपघात आणि संस्कृतीचा र्‍हास
यात फरक करता येत नसे
आता तर सगळंच बिघडलंय 
अगदी तुमच्या दत्ताचीही बरखा झाली 
आता बातम्याच्या महापुरातून 
कलामांचं कलेवर शोधून त्याला
पहिल्या पानावर मोठ्या टाईपात बसवणार तरी कोण?
मधेच टायगर गुरगुरला 
बदला घेईन याचा
आणि अंत्यदर्शनाला जमलेल्या पंधरा हजार 
हिरव्यागोल टोप्या म्हणाल्या
भगवीच्यांनो आता बघाच 
बड्या कबरीस्तानात 
किती मोठं स्मारक होतं तेअफझुल्ल्यापेक्षा मोठ्ठं 
अन् होतं की नाही पहा
त्याचं तीर्थस्थान
तेवढ्यात मेमनमाता कळवळली 
कितीही मोठ्या आगी लावा
पण त्या वन्हीत माझ्या छकुल्याचं सी..चं सर्टिफिकेट घालू नका रे
......आणि पुन्हा वर्तमानपत्रांना पान्हा फुटला
सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय विचारणार्‍यांपासून
डोके फिरूनच छापणार्‍यांपर्यंतचा प्रवास
सुफळ संपूर्ण झाला

Friday, July 31, 2015

लोकसत्ताचे डोके ठिकाणावर आहे काय?

आदरणीय वंदनीय माननीय विवेकवादी अंधश्रद्धानिर्मूलनपटू राजमान्य राजश्री श्री गिरीश कुबेर साहेब,

कोपरापासून नमस्कार.

लोकसत्ता घ्यायचे बंद केल्यापासून आणि ते तुम्हाला कारणांसहित कळवल्यापासून एका वर्षाच्या आत तुम्हाला पुन्हा पत्र लिहायची वेळ येईल असे वाटले नव्हतेपण तुम्ही तुमच्या असामान्य लेखनप्रतिभेने अप्रतीम संपादकीय अग्रलेख लिहून तुमच्याशी संवाद साधायला भाग पाडलेत त्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुमचा हा लेख फॉरवर्ड मधून आला तेव्हा आधी तुमच्याच वृत्तपत्रात विनोदी सदर लिहीणार्या तंबी दुराई सदृश्य कुणीतरी लिहीला आहे असा आधी समज झाला होतापण तो अखेर गैरसमज ठरला. या लेखाबद्दल तुमचा तीव्र निषेध.

फाशीबाबत, देहांत शासनाबाबत मतभेद असल्यास गैर नाही. मात्र त्याच्या नावाखाली एका देशद्रोह्याचे, दहशतवाद्याचे किती उदात्तीकरण करायचे? सारासार विचार करण्याच्या नावाखाली सामान्य जनतेचा बुद्धीभ्रम करण्याचा किती प्रयत्न करायचा? आपण लेखाच्या सुरवातीला म्हणता, याकुब मेमन माफीचा साक्षीदार ठरला, आणि अपराधी देखील. हे साफ चूक आहेतो माफीचा साक्षीदार कधीही नव्हता, आणि तो शरणही आला नाही. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्याने आणि त्याच्या कुटुंबियांनी भारतात परतण्याचा निर्णयही घेतला नाही. रॉ संस्थेच्या ज्या रामन साहेबांच्या लेखाचा आपण हवाला देता, त्याच रामन साहेबांनी एका लेखात स्पष्टपणे म्हटलं आहे की पाकिस्तानच्या आय.एस.आयया गुप्तहेर संघटनेच्या देखरेखीखाली असलेल्या मेमन कुटुंबियांनी याकूबला 'भारतात परतणे कितपत श्रेयस्करयाचा आढावा घ्यायला नेपाळमधे असलेल्या त्याच्या नातेवाईकाशी एका वकीलाशी सल्लामसलत करायला नेपाळला पाठवलं होतं. या दोघांनीही त्याला पुन्हा कराचीला परतण्याचा सल्ला दिला. तो कराचीला परस्पर पळून जाण्यासाठी विमान पकडण्याच्या तयारीत असताना नेपाळ पोलीसांनी त्याला ओळखला, आणि वेगाने त्याची रवानगी भारतात करण्यात आली. बरं आपण रामन यांचे सोडून देऊ. गेले बिचारे. त्यांची साक्ष काही काढता येत नाही आता. पण विमानतळावर त्याला पकडणार्या नेपाळी पोलीस अधिकार्याची मुलाखत आपण हे अचाट संपादकीय लिहीण्याच्या आधी बघितली का? माझ्या अंदाजाप्रमाणे नसेलच.

मग त्या कटातला पाकिस्तानचा सहभाग उघड करावा या अटीवर त्याला भारत सरकारने माफीचा साक्षीदार करण्याचा करार केला हे कुठल्या आधारावर लिहीता? मुळात भारतात होत असलेल्या घातपाती कारवायात आणि दहशतवादी घटनात पाकिस्तानचा सहभाग आहे हे तो पर्यंत अनेको वेळा सिद्ध झालेले असताना आणि अगदी १९९३ बाँबस्फोटांचा तपास करतानाही अन्य मार्गाने निदर्शनास आलेले असताना आपण पाकिस्तानचे नक्की काय वाकडे केले जे याकुबच्या खुलाशाने करु शकणार होतो? मग ज्यातून पुढे काहीही कारवाई करता येणार नाही आणि मिळाली तरी जिची विश्वासार्हता संशयास्पदच आहे अशी माहिती 'उघड' करण्यास कारणीभूत ठरणारा असा वेडगळ आणि तद्दन निरुपयोगी करार भारत सरकारने कसा काय केला असेल असे मज पामराच्या बुद्धीलाही पडणारे प्रश्न तुम्हाला पडले नसतील असे आम्ही कसे मानावे?

वादासाठी आपण गृहित धरू की सरकारने त्याच्याशी काही गुप्त करार केला होता. तुम्हाला एक बाळबोध उदाहरण देतो. माझ्या घरात एक उंदीर धुमाकूळ घालतो आहे. मी त्याला पकडायला आत बुंदीचा लाडू ठेऊन एक पिंजरा लावतो. तो त्या पिंजर्यात फसतो. आता तुम्ही मला सांगा, निव्वळ विध्वंसक अशी ओळख असलेल्या उंदराला मी मारून टाकावे की त्याला प्रेमाने मांडीवर घेऊन प्रेमाने तो लाडू खायला द्यावा आणि मग सोडून द्यावे?

पुढे तुम्ही तोडलेले तारे तुम्हाला कदाचित पुढचा मेगासेसे किंवा गेला बाजार बुकर पुरस्कारही देऊन जातील. "मेमन कुटुंबीय मूळचे गुजरातेतले आणि आद्य व्यवसाय चांदीची तस्करी". मेमन कुटुंबीयांच्या या स्मगलिंगच्या धंद्याबाबत हे वाक्य तुम्ही इतक्या सहजपणे लिहून जाता, की वाचणार्यांचा समज व्हावा की चांदीची तस्करी म्हणजे एखाद्याचे रस्त्यालगत असलेले सायकलचे पंक्चर काढायचे अनधिकृत दुकान असावे किंवा रेल्वेत सीटखाली सापडलेली दहाची नोट एखाद्या प्रवाशाने खिशात टाकावी इतकी क्षुल्लक बाब!

तुम्ही म्हणता की एका अशक्त व्यवस्थेने दुसर्या अशक्ताचा बळी घेतला. खालच्या दोन कोर्टात चाललेले खटले, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, मग याकुबने दाखल केलेले क्युरेटीव्ह पेटीशन, राष्ट्रपतींकडे केलेले दयेचे अर्ज, आणि डेथ वॉरंटवर स्टे आणण्याचे प्रयत्न हे सगळे सगळे आपल्या न्यायव्यवस्थेने त्याला बचावाच्या पुरेपूर संधी दिल्या याची साक्ष नव्हे कायमग तुमच्याकडे तुमच्या "वस्तुस्थिती" "निर्विवाद सत्य" या शब्दांपलिकडे जाऊन तीन न्यायालयातज्यात अर्थात सर्वोच्च न्यायालय आहेच, जे पुरावे सादर होऊन गुन्हा सिद्ध झाला त्यांच्याहून वरचढ पुरावा आहे का? नसल्यास तुम्ही व्यवस्थेला अशक्त असे संबोधून खालच्या न्यायालयांचाच नव्हे तर फाशी जायच्या दिवशीही पहाटे साडेचार वाजता याकुबचे म्हणणे ऐकून घेणार्या सर्वोच्च न्यायालयाही अवमान करत आहात याची तुम्हांस जाणीव आहे काय?

हाच अशक्त याकुब एक धंदेवाईक चार्टर्ड अकाउंटंट होता. म्हणजेच तुमच्या भाषेत सनदी लेखपाल होता. ही परीक्षा किती कठीण असते हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. सनदी लेखपाल म्हणजे अशिक्षितअडाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी नव्हे. इतका हुशार असलेल्या हा अशक्त याकुबला आपण ज्याच्या "चोरट्या" धंद्यांचे पैसे फिरवतो आहोतलेखापरिक्षण करतो आहोत तो आपला सशक्त थोरला भाऊ टायगर काय धंदे करतो आहे याची कल्पना नव्हती असे "अधिकृत वस्तुस्थिती"च्या नावाखाली तुम्ही ठोकून देताना तुम्ही किती तर्कदुष्ट विधान करत आहात याची तुम्हालाच जाणीव नसावी. त्याच्याच पुढे तुम्ही म्हणता "त्याचे (म्हणजे टायगरचे) चोरटे व्यापार कुटुंबियांस ठाऊक होते" आणि मग लगेच "परंतू त्यापुढे जाऊन तो दहशतवादी कृत्यात सहभागी आहे हे कुटुंबास ज्ञात नव्हते". हे म्हणजे ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा बोरीवली ते चर्चगेट रेल्वे प्रवास करणारा एक चाकरमानी साईड बिझनेस म्हणून प्रवासात पाकीटमारीचा धंदा करीत असे आणि ते त्याच्या कुटुंबीयांस ठावूक नसे अशी एखादी सुरस कथा कथा सांगावी अशा प्रकारे आपण सांगता. तसेच, एकीकडे याकुबला 'काही म्हणजे काही माहित नव्हतं हो' असा टाहो फोडतानाच "तो माफीचा साक्षीदार होता आणि आहे. याचा दुसरा अर्थ असा की तो निरपराध नाही." असेही म्हणून जाता. कुबेर साहेबएक पे रेहेना, एक तो काही माहित नै बोलना नैतो निरपराध बोलना. लेकीन प्लीजच कोलांट्याउड्या मत मारना.

पुढचा भाग अधिक मनोरंजक आहे. टायगरचे दहशतवादी धंदे जर त्याच्या कुटुंबियांस माहित नव्हते, तर त्याचे वडील पाकिस्तानात आय.एस.आय.च्या कचाट्यात काय फिरत फिरत चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गेले की सहज पर्यटनाला गेले असताना ते आय.एस.आय ने त्यांना कचाट्यात पकडले? म्हणे, 'बाँबस्फोट चौकशीत टायगरचा हात असल्याचे उघड झाले तेव्हा पाकिस्तानात आय.एस.आय.च्या कचाट्यात असलेल्या त्याच्या वडिलांनी कुटुबाच्या देखत त्याला चोपले'. आईआईगंहे वाचून माझे ड्वाले पाणावले हो. कुणीतरी म्हटल्याप्रमाणे भारतात शामच्या आईनंतर थेट टायगरचे बाबाच.

आपण टायगरला पकडू शकत नाही, दाऊदला लटकावू शकत नाही याचा अर्थ आपण हातात सापडलेल्या याकुबला सोडून द्यायला हवा होता? जिथे निर्विवादपणे पाकिस्तानातून आलेल्या दहशतवादी कसाबविषयी देखील अनेकांना माणूसकीचे उमाळे येतात, त्या आपल्या भारत देशात सापडलाय तर "लटकावून टाका फासावर" इतकं सोपं आहे?

आपल्या या अचाट आणि अतर्क्य संपादकीयात आपण याकुबच्या धर्माचा उल्लेख करुन तुम्ही योग्य तो खोडसाळपणा केलेला आहेचभारतात आतापर्यंत फाशी दिलेल्या कैद्यांपैकी किती जण मुसलमान होते ते तपासून बघणार का जरा? त्यातच संजय दत्तचाही उल्लेख करुन तुम्ही तुमचा अजेंडा स्पष्ट केलेला आहे आणि त्या तूलनेत याकुबचा गुन्हा चक्क किरकोळ ठरवून काय सुचवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे समजण्याइतके आता तुमचे वाचक दुधखुळे राहिलेले नाहीत. संजय दत्तला सवलती मिळतात, ते कायद्याने. दाऊद टायगरला परत आणण्यात आपण अयशस्वी ठरलो आहोत ते आपले सरकार अंतर्गत आंतरराष्ट्रीय कायदे पाळत असल्यानेच. आणि आता याकुब फासावर गेलाय तो ही सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावरच. तेव्हा 'उचलला याकुब, लटकवला फासावर' हे वाक्य 'उचलली जीभ लावली टाळ्याला' शैलीत आपण बरळू नये, हेच उत्तम.

आणखी एक. बॉम्बस्फोटात मेलेल्या २५७ निरपराध नागरिक आणि शेकडो जखमींची चौकशी करा जरा. आमचा उन्माद जाऊद्या हो, किमान चाळीसहून अधिक शस्त्रक्रिया झालेल्या आणि अजूनही काचा अंगात असलेल्याआणि ते कमी म्हणून की काय उजवा हातही निकामी झालेल्या माणसाबद्दल किंवा वयाच्या तेराव्या वर्षी आईचा तुकडे तुकडे झालेला मृतदेह बघायला ज्याला लागला त्या व्यक्ती विषयी जरा उमाळा येऊ द्या.

गिरीश कुबेर साहेब, मी मूळचा इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी. इयत्ता दुसरीत मराठी वाचायला शिकलो तेव्हापासून लोकसत्ता वाचतो आहेमला मराठी वाचनाची गोडी निर्माण होण्यामागे लोकसत्ताचे नियमित वाचन हे आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. सातेक वर्षांपूर्वी पुण्यात स्थलांतरित झालो तेव्हा सुरवातीला पेपरच घेत नव्हतो. मुलं शाळेत जाऊ लागली म्हणून त्यांना चांगलं मराठी वाचायला मिळेल या आशेने पावरफुल आणि पवारफुल सकाळ घेता लोकसत्ता घेणे पसंत केले कारण लोकसत्तावरचे प्रेम आणि श्रद्धा.....हो श्रद्धाती एक मोठी अंधश्रद्धा होती हे आपण मागेच सिद्ध केले होतेत, आणि आज हे संपादकीय लिहून तेव्हाचा लोकसत्ता घेणे बंद करण्याचा माझा निर्णय किती योग्य होता हे तुम्ही मला दाखवूनच दिलेत.
माधव गडकरी लोकसत्ताच्या संपादकपदावर होते तो पर्यंत लोकसत्ता हे एक वाचनीय वर्तमानपत्र होता. नंतर त्याला उतरती कळा लागली. अरुण टीकेकर, कुमार केतकर यांनी यथास्थित गरळ ओकून झाल्यावर आता तुम्ही लोकसत्ताला ढगात पाठवण्याच्या कामी कुठलीही कसर सोडलेली दिसत नाही. लोकसत्ताचे हल्लीचे लिखाण प्रचंड एकांगी होत चालले आहे. कुणीही काहीही बोलले, किंवा एखादा विषय मांडला, किंवा काही घटना घडली की लगेच त्यावर इयत्ता तिसरी च्या उत्साहात बातमी छापलीच पाहीजे असा पायंडा अलिकडे लोकसत्तात पडला होतात्या बालीश गरळोओकीत नंतर मोदी सरकार आल्याने नवा जोम आला. एखाद्या घटनेशी, गोष्टीशी, किंवा केलेल्या विधानाशी संबंधित असलेल्या आणि असू शकणार्या असंख्य गोष्टींचा एकत्रितपणे विचार आणि अभ्यास करुन अन्वयार्थ काढायचा मगच अग्रलेख लिहायचा असतो किंवा बातमी द्यायची असते हे लोकसत्ताच्या गावीही उरलेले नाही. तोच वारसा आपण समर्थपणे पुढे चालवत आहात हे पाहून संतोष जाहला. कुठलेही वर्तमानपत्र किंवा अंक हा एकांगी असेल आणि त्याचा गाभा हा द्वेषमूलक असेल तर तो फार काळ दर्जा आणि लोकप्रियता आणि पर्यायाने खपही टिकवून ठेवू शकत नाही.

तेव्हा संपादक गिरीश कुबेरमहाशय, पेपर चालवताय तर बातम्या देण्याचे काम करा. देशाच्या न्यायव्यवस्थेचा आणि न्यायालयांचा आदर करायला शिका. उगाच समाजाला मार्ग दाखवण्याच्या नावाखाली  शाब्दिक कोलांट्याउड्या मारण्याच्या आगाऊपणा करत जाऊ नका. वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाजप्रबोधन करायला तुम्ही "लोकमान्य" नाही आणि तुमच्या या संपादकीयावरुन पुन्हा सिध्द झालेले आहे की तुमची नियतही साफ नाही. तेव्हा लवकर सुधारा. नाहीतर मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधे रस्त्यावरच्या मवाल्यागत वागून थोतरीत खाणारा राजदीप आणि अनेकांनी तोंडात शेण घातलं तरी रोज  चुकता बरळणारा निखिल वागळे यांच्या रांगेत लो तुम्हाला कधी नेऊन बसवतील तुम्हालाच पत्ता लागावयाचा 
नाही.  

पुन्हा एकदा, या संपादकीयाबद्दल लोकसत्ता  तुमचा तीव्र निषेध.
आपला नम्र

मंदार दिलीप जोशी
जालनिशी | फेसबुक

ता.. मी लोकसत्ता का बंद केला ते सांगणारे जुने विपत्र इथे वाचावयास मिळेल.
http://mandarvichar.blogspot.in/2014/09/blog-post.html