मागच्या लेखात डाव्या विचारसरणीचा मानसशास्त्रावरचा पगडा आणि त्याचा लहान मुलांवर होणारा थेट परिणाम आपण बघितला. आजचा लेख थोडा वेगळा आहे.
भारत विखंडन २ - हिटलर कुठला!!
एक प्रश्न विचारतो. त्याचं उत्तर तुम्ही तुमच्या मनातच द्यायचं आहे. अत्याधिक शिस्तीचा भोक्ता असलेल्या व्यक्तीला तुम्ही काय म्हणाल? मग तो कुणीही असो - आईवडिलांपासून ते शिक्षक, बॉस, नवरा, बायको, वगैरे. यांच्यापैकी कुणीही नियमपालनाच्या बाबतीत अतिशय कडक असतील म्हणजे शिस्तीच्या बाबतीत कोणताही ढिलेपणा ते खपवून घेत नसतील, तर त्यांना तुम्ही काय म्हणता? अर्थात, हे नाव ठेवणं त्या त्या व्यक्तींच्या मागेच होत असणार हे नक्की. पार सातासमुद्रापलिकडच्या त्या व्यक्तीचं नाव इथे भारतात शिस्तप्रिय माणसाला हिणवायला का बरं वापरलं जातं? कोण होता तो माणूस? आठवलं ना ते विशिष्ठ नाव?
तुमच्या पैकी ९९% लोकांच्या मनातलं नाव सांगू? बरोब्बर. या प्रश्नाचं नाव अर्थातच जर्मनीचा हुकूमशहा हिटलर. बाकीचे अशा लोकांना हिटलर म्हणून मोकळे व्हायचे पण मला नेहमी प्रश्न पडायचा की अतिशय शिस्तप्रिय व्यक्तीला नेहमी हिटलरच का म्हणतात? तुमच्यापैकी कुणाला असा प्रश्न पडला असेल तर मला खूप आनंद होईल. कारण भारताविषयी आशावादी असण्यासाठी ते एक कारण असेल.
तर, वळूया या प्रश्नाकडे. हिटलरच का?
कारण, या गोष्टीवर खूप गांभिर्याने विचार करा, कारण डाव्यांनी, म्हणजे डाव्या विचारसरणीच्या लोकांनी इतकी वर्ष आपल्याला असा विचार करायला भाग पाडलेलं आहे. आपलं व्यवस्थित कंडिशनिंग केलेलं आहे. अधिकारपदावरील शिस्तप्रिय व्यक्ती हे प्रत्येक समाजात नेहमीच आढळून आलेले आहेत, येतात. तसेच, जर्मनीचा सर्वेसर्वा म्हणून हिटलरचा कार्यकाळही फक्त १९३३ ते १९४५ इतकाच आहे. त्यातही गंमत म्हणजे हिटलरच्या विध्वंसाची सर्वाधिक झळ बसलेल्या युरोपीय देशात, इतकंच काय, खुद्द जर्मनीत शिस्तप्रिय व्यक्तींना कधीही हिटलर अशी उपमा दिली गेल्याची इतिहासात नोंद नाही. मग आपल्याकडेच का?
या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आधी आपल्याला हिटलरच्या कारकीर्दीबद्दल थोडी माहिती बघावी लागेल. नाझी पार्टीचा नेता आणि एक अत्यंत क्रूर हुकूमशहा म्हणून जग हिटलरला ओळखतं, पण सुशिक्षित जर्मन समाजाने त्याचा नेता म्हणून मुळात स्वीकार तरी का केला याची कारणं समजून घेणं आपल्या भाग पडतं.
पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला. व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीवर प्रचंड अपमानास्पद राजकीय आणि आर्थिक अटी लादण्यात आल्या. या ओझ्याखाली दबलेला जर्मनी पिचत चालला होता. एक पिढी तर नष्ट झालेलीच होती, उरलेल्या जनतेला रोज आर्थिक विवंचनेत जगावं लागत होतं. अशा परिस्थितीत जर्मनांच्या स्वाभिमानाला फुंकर घालून हिटलरने त्याच्या पक्षाला सत्तेत आणण्याची मागणी केली. सत्तेत आल्यावर ताबडतोब हिटलरने व्हर्सायच्या तहाला केराची टोपली दाखवली आणि सगळ्या अटी झुगारून दिल्या. सहा वर्षात हिटलरने जर्मनीचा कायापालट केला आणि जर्मन नागरिकांना गौरवांकित केलं. हं, हे साध्य करायला आणि त्या नंतर हिटलरने जे मार्ग अवलंबले, ते मार्ग निश्चितपणे समर्थनीय मानले जाऊ शकत नाहीत आणि मीही त्या सगळ्या मार्गांचं समर्थन करत नाही. पण फक्त सहा वर्षात जर्मनीला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणं हे खायचं काम नाही. अर्थात, या यशात मुळातच शिस्तप्रिय असणार्या जर्मन नागरिकांचा तितकाच मोठा वाटा आहे. कुणीतरी फेसबुकवर लिहील्याचं आठवतं - हिटलरसारखा नेता तेव्हाच सत्तेवर येतो जेव्हा त्याला पूरक अशी जनता असते. आणि म्हणूनच मोदीजींची समजा हिटलर होण्याची इच्छा झालीच तरी ते होऊ शकणार नाहीत कारण....असो.
विषयांतर आवश्यक होतं कारण ही पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. आता काही गोष्टी समजून घेऊ व मग मूळ मुद्द्यावर येऊ.
हिटलरच्या पक्षाच्या नावात समाजवादी हा शब्द होता आणि आपल्या घोषणापत्रात त्या पक्षाने समाजवादाच्याच मार्गाने जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. हिटलर स्वतःला खराखुरा समाजवादी म्हणवून घ्यायचा आणि रशियाच्या समाजवादाला बोल्शेविक कम्युनिझम असं म्हणून हिणवायचा. असं असलं तरी साम्यवाद्यांनी हिटलरच्या नाझी पक्षाशी शय्यासोबत करण्यात कुठलाच विधीनिषेध बाळगला नाही. रशियाचं आणि साम्यवाद्यांचं हिटलरशी वैर निर्माण झालं ते त्याने रशिया आणि जर्मनीमधे झालेला अनाक्रमणाचा करार मोडून थेट रशियावर हल्ला चढवल्यावर. या दु:साहसामुळे रशियासारखा बलाढ्य देश दुसर्या महायुद्धात उतरला आणि त्याचा परिणाम हिटलरला आणि जर्मनीला पराभवाच्या स्वरूपात भोगावा लागला. स्वतः हिटलर जीवानिशी गेला. अर्थातच जेते इतिहास लिहीत असल्याने दुसर्या महायुद्धात विजयी ठरलेल्या दोस्त राष्ट्रांनी आपल्या मर्जीने इतिहास लेखन केलं; जसं भारतात आधी इस्लामी आक्रमकांनी आणि मग इंग्रजांनी केलं तसंच. त्या काळात भारतात स्वातंत्र्य चळवळ जोरात होती आणि सुभाषबाबूंनी जर्मनीकडून त्या करता मदतही मागितली होती, पण ती मिळू शकली नाही.
आता भारतीय कम्युनिस्टांकडे वळूया. आधी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही पाश्चात्य देशात अतिशय शिस्तप्रिय माणसाला हिटलर हे विशेषण लावलं जात नाही. पण भारतातच हे का? हिटलरच्या उदयाची जी कारणं आपण वर बघितली त्यातलं अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे राष्ट्रवाद. आणि जोडीला जर्मन वंश शुद्धतेचा आग्रह. एक जनता, एक नेता (eine volk, eine Fuhrer) आणि एका पराभूत, हतप्रभ राष्ट्राला पुन्हा सर्वश्रेष्ठ बनवण्याचं आश्वासन (Deutschland uber alles = Germany above everything) या दोन गोष्टींनी जर्मन जनतेच्या आत धगधगत असलेल्या राष्ट्रभावनेला वणव्याचं स्वरूप दिलं. दुर्दैवाने जर्मनीला प्रगतीपथावर यशस्वीरित्या नेणार्या हिटलरने 'अति सर्वत्र वर्जयेत' हे न समजल्याने देशाला युद्धात लोटून शेवटी स्वतःचाही नाश ओढवून घेतला.
डाव्या विचारसरणीच्या, कम्युनिस्ट वगैरे लोकांच्या कार्यपद्धतीची तुम्हाला माहिती असेल तर राष्ट्रवाद या शब्दाची त्यांना भयानक अॅलर्जी असते. आठवा - "भारत तेरे तुकडे होंगे" वाले लालभाई. दुसरी गोष्ट म्हणजे सत्ता हस्तगत करण्यासाठी अराजक (chaos) सदृश्य परिस्थिती निर्माण करणे हा त्यांचा प्रमुख हेतू असतो. सतत कुठलं ना कुठलं तरी आंदोलन करत रहायचं. प्रत्येक समस्येवर प्रस्थापित व्यवस्थेला उद्वस्त करणं हाच एक उपाय असल्याचा त्यांचा दावा असतो. अर्थात, प्रस्थापितांना पायउतार व्हायला लावून कम्युनिस्टांनी जिथे सत्ता हस्तगत केली आहे तिथे असलेली परिस्थिती आणखी बिबिघडून लोकांना "मग आधीचेच काय वाईट होते" असं वाटायला लागलं हा भाग अलाहिदा. आझादीच्या नावाने सत्तेत आल्यावर मात्र आझादीचं नावही कम्युनिस्ट काढत नाहीत हा जगभरातला त्यांचा ढळढळीत इतिहास आहे.
जिथे शिस्त असते तिथे अराजक निर्माण करणं अवघड होऊन बसतं. मग राष्ट्रवाद आणि शिस्तीच्या जोरावर हतवीर्य झालेल्या जर्मनीला अवघ्या सहा वर्षात पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार्या हिटलर हा कम्युनिस्टांच्या, विशेषतः भारतीय कम्युनिस्टांच्या दृष्टीने, अन्यायाचा पोस्टर बॉय झाला. लक्षात घ्या, कम्युनिस्टांच्या दृष्टीने खरी समस्या हिटलर नसून शिस्त म्हणजे डिसिप्लिन आहे. हिटलर हा जगन्मान्य क्रूरकर्मा होता, म्हणूनच कम्युनिस्टांच्य दृष्टीने हिटलरने जे काही केलं ते त्या सगळंच वाईट, मग तो शिस्तप्रिय असल्याने शिस्तही वाईटच. मग सुरू झाला एक सुनियोजित प्रचार. ज्या व्यक्तीला शिस्तप्रिय कारभार करण्यात रस आहे तो हिटलर. एखादी व्यक्ती कडक शिस्तीची असेल तर ती व्यक्ती हिटलर. एक हरलेला विनाशकारी हुकूमशहा. हा प्रचार इतका खोलवर रुजवला गेला की हिटलरच्या कोणत्याही कृत्याला चांगलं म्हणायला तुम्ही गेलात की तुमच्यावर नाझी, फॅसिस्ट (आता समाजवादी नाझीवाद आणि फॅसिझम यात बराच फरक आहे हा भाग अलाहिदा, पण अपप्रचार करायला हे शब्द शिवीसारखे बरे पडतात), हुकूमशाहीचे समर्थक, वंशवादी - काय वाट्टेल ती लेबले काढून चिकटवली जातात. आपल्या मनात इतकी शिताफीने ही गोष्ट वर्षानुवर्ष ठसवली गेली की आपण हा आपलाच विचार असल्यागत "हिटलर कुठला" असे शब्द अगदी नित्याच्या व्यवहारात वापरत असतो.
समाज शिस्तप्रिय असेल तर तो कुठल्याही शत्रूचा निकराने सामना करु शकतो ही गोष्ट ठावूक असल्याने कम्युनिस्टांना, विशेषतः भारतीय कम्युनिस्टांना, आपल्या विरोधकांमधे नेमकी हीच गोष्ट सहन होत नाही. यांचा विरोध करणार्या प्रत्येकाला जेव्हा "संघी फॅसिस्ट" म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्यांना अज्ञानी म्हणून विषय सोडून देऊ नका. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कम्युनिस्टांच्या दृष्टीने शिस्त आणि राष्ट्रवादाचं प्रतीक आहे आणि अर्थातच त्यांच्या मार्गातला धोंडा आहे. याच कारणास्तव ते संघाला बदनाम करण्यासाठी विशेष जोर लावतात आणि व्यवस्थित प्रचार केल्याने ते काही अंशी यशस्वीही झाले आहेत.
कम्युनिस्टांचं यश बघायचं असेल तर आत्ताच्या जर्मनीकडे बघा. वंशशुद्धतेला पाप ठरवून मल्टी-कल्चरलिझमच्या नावाखाली इस्लामी निर्वासितांचा कॅन्सर आयात करवला आणि देशाची वाट लावली. हाच मल्टीकल्चरलिझम नामक रोग सगळ्या युरोपात पसरवून इस्लामचं सर्दीपडसं कायम चिकटवून दिलं त्याचे परिणाम आज त्या संपूर्ण खंडात दिसत आहेत. भारतात काँग्रेसवाल्यांना हाताशी धरून निर्वासितांच्या नावाखाली बांग्लादेशी मुसलमानांची बेकायदेशीर घुसखोरी अनिर्बंध चालू देण्यामागे बंगालातले कम्युनिस्टच तर आहेत!
आपल्याकडे शाळेत एन.सी.सी.चं महत्त्व पद्धतशीरपणे कमी करण्यात आलं. १९६३ साली सक्तीचं करण्यात आलेलं एन.सी.सी. प्रशिक्षण अचानक १९६८ साली पुन्हा ऐच्छिक करण्यात आलं. कारण युद्धात एन.सी.सी.चा झालेला उपयोग बघता संपूर्ण तरुणाई जर राष्ट्रभावनेने प्रेरित होऊन शिस्तबद्ध रीतीने काम करु लागली तर कम्युनिस्टांना त्यांचा कार्यक्रम रेटणं अवघड होऊन बसलं असतं. आपल्याकडे कन्ज्युमरिझम म्हणजेच उपभोक्तावादाला प्रोत्साहन देण्यामागे ग्राहकाला राजा करण्याचा हेतू नव्हता. उलट यातून ग्राहकाला आणि पर्यायाने भारतीय जनतेत "मी राजा आहे म्हणजे मला सगळं आयतं आणि बसल्याजागी मिळालं पाहीजे" या मनोवृत्तीला आणि आळशीपणाला चित्रपट आणि जाहीरातींच्या माध्यमातून पद्धतशीरपणे खतपाणी घातलं गेलं. हा विचार करताना कम्युनिस्ट मतप्रणालीच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांचं या दोन्ही उद्योगांवर असलेलं वर्चस्व लक्षात ठेवणं आवश्यक आहे. भारतीय लोक शिस्तप्रियतेसाठी कधीच प्रसिद्ध नव्हते पण आपल्यात बेशिस्त आणि आळशीपणा बळावण्याला हे दोन उद्योग प्रामुख्याने जबाबदार आहेत.
खूप मोठा लेख होईल पण चित्रपट व्यवसायाचा उल्लेख झालाच आहे तर त्यातील अनेक उदाहरणांपैकी दोन सांगितल्यावाचून हे लेखन अपूर्ण राहील.
प्रसिद्ध चित्रपट शोले तुम्ही बघितलाच असेल. नसेल तर नक्की बघा. त्यात असरानीची भूमिका ही खूप शिस्तप्रिय असलेल्या जेलरची आहे, आणि त्याच्यावर चित्रित झालेली दृश्ये बघण्यासारखी आहेत. कडक शिस्तीचा भोक्ता असलेला तो जेलर कैद्यांकडूनही पोलीस किंवा सैनिकांसारखी कवायत घेत असतो. आपण किती शिस्तीचे आहोत हे दाखवायला एक वाक्य त्याच्या तोंडात कायम असतं आणि ते म्हणजे "हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं". नेहमी तोंडाने इंग्रजांच्या शिस्तप्रियतेचा वारसा चालवण्याचा जप चालू असला तरी असरानीचा चित्रपटातला गेटअप हा तंतोतंत हिटलरसारखाच ठेवण्यात आलेला होता. हिटलरसारख्याच मिशा आणि तसाच गणवेश त्याला चित्रपटात दाखवण्यात आला आहे. शिवाय त्याचा चित्रपटातील वावर हा विनोदनिर्मितीसाठी करुन घेण्यात आला होता. थोडक्यात काय शिस्तप्रियता ही चेष्टा करण्यायोग्य आणि हसण्यावारी नेण्याची गोष्ट असल्याचे ही दृश्ये आपल्या मनावर ठसवण्याची एकही संधी सोडत नाहीत.
दुसरं उदाहरण म्हणजे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जींच्या "खूबसूरत" या चित्रपटाचं. हृषिदांचे चित्रपट मी सुरवातीला जेव्हा पाहिले तेव्हा खुसखुशित व दर्जेदार विनोद आणि मध्यमवर्गाचं दर्शन या गोष्टींमुळे मला खूप आवडले होते. त्या वेळी मला काही बाबी खटकत असत पण नेमकं का ते कळत नसे. बाकी सगळ्यांना काहीच वाटत नाही मग मी का बोलून वाईटपणा घेऊ म्हणून मी तेव्हा गप्प बसत असे. पण नंतर नंतर मी जेव्हा कम्युनिझम अर्थात साम्यवादाविषयी वाचन सुरू केलं तेव्हा त्या चित्रपटांतली खरी गोम लक्षात आली आणि मुळापासून हादरलो. कारण अल्प प्रमाणात असलेले अपवाद वगळले तर त्यांच्या चित्रपटात नियमबाह्य वर्तन (खूबसूरत), शुद्ध हिंदीची चेष्टा आणि उर्दूची अनावश्यक भलामण (बावर्ची - राजेश खन्ना आणि पेंटल यांच्यातला संवाद आठवा), भारतीय वेशभूषेची व संस्कृतप्रचूर हिंदीची चेष्टा (गोलमाल), आणि भाषाशुद्धीला मूर्ख ठरवणं (चुपके चुपके) अशी कम्युनिस्ट अजेंड्याचा छुपा प्रचार करणार्या चित्रपटांची रांगच लागलेली दिसून आली.
तर, आपण बोलत होतो यांपैकी "खूबसूरत" या चित्रपटाबद्दल. अंजू या आपल्या मोठ्या बहिणीच्या सासरी सुट्टीत मजा करायला गेलेली मंजू (रेखा) त्या घरातल्या नियमबद्ध आणि शिस्तप्रिय वातावरणात गुदमरू लागते. तिच्या मोठ्या बहिणीला, अंजूला, काहीच त्रास होत नाही. सासरच्यांकडून मिळणारी मुलीसारखी वागणूक आणि प्रेम यांनी ती आनंदी असल्याने तिला घरातल्या कडक शिस्तीचं काहीच वाटत नाही. पण मंजूला हे सगळं पाहून स्वस्थ बसवत नाही. ती स्वतः बंड करते आणि कहर म्हणजे अंजूच्या सासरच्यांनाही तसं करायला उचकवते. ती जे काही करते त्यासाठी तिच्याकडे एक सोप्पं स्पष्टीकरण असतं - यात काहीच चूक नाही. आपल्याला यातून फक्त निर्मळ आनंद (निर्मल आनंद) मिळवायचा आहे, त्यामुळे कसलाही अपराधगंड मनात बाळगू नका. आपलं बेशिस्त वागणं पटवायला "निर्मल आनंद" हे शब्द ती घोषणेसारखे वापरते आणि त्या बरोबर अत्यंत गोड हसू सुद्धा. इतकंच काय मधल्यामधे अंजूचा धाकटा दीर तिच्या प्रेमात पडतो. अंजूच्या सासूची पाठ वळल्यावर होणार्या या उचापती मंजू एक नाटकवजा गाणं घराच्या गच्चीवर बसवते तेव्हा कळस गाठतात. हा चित्रपट बघितला तेव्हा हे खेळकर गाणं मला खूप आवडलं होतं. पण या गाण्याचे शब्द आज कानावर पडले तर काहीतरी वेगळीच भावना मनाचा कब्जा घेते आणि इतकी वर्ष नक्की काय विष आपल्या मनात कालवण्यात आलं ते आठवून घाबरायला होतं.
चित्रपट म्हणून खूबसूरत अत्यंत मजेशीर होता. पण चित्रपटकलेत वामियां [वामी (डावे) आणि मियां] वाक्बगार असतात. प्रत्येक विषयात आणि परिस्थितीत काही ना काही खुसपटं काढून लोकांची कशी घुसमट होते आहे हे दाखवणं ही कम्युनिस्ट भाषणांचा आणि साहित्याचा एक प्रमुख भाग असतो. यातच चित्रपटही आले. मियां लोकांची पद्धत हीच, पण जरा वेगळी असते. कदाचित म्हणूनच म्हणतात की सिनेमा बघायला जाताना डोकं घरी ठेवून जायचं असतं. पण या वाक्याचा कम्युनिस्टांना अभिप्रेत असलेला अर्थ असा की तुम्ही चित्रपट बघताना काहीही विचार करु नका, कोणतेही प्रश्न, शंका मनात येऊ देउ नका; आणि चित्रपट दाखवेल ते निमूटपणे बघा. खरंच डोकं घरी ठेवून गेलं तरी चित्रपट लोकांच्या मनावर काहीच प्रभाव सोडत नाहीत असं नक्कीच होणार नाही. तुम्ही इंटरनेट वापरत असताना तुमच्याही नकळत तुमच्या कॉम्प्युटरवर कुकीज (cookies) आणि टेम्पररी इंटरनेट फाइल्स (Temporary Internet Files) जमा होत जातात त्याच प्रमाणे कोणताही चित्रपट हा प्रेक्षकांच्या मनात भविष्यातील विचारांची बीजं रोवत जातोच.
तर, क्लासिक कम्युनिस्ट अजेंडा वाटावं असं खूबसूरत चित्रपटातलं गाण उद्धृत करुन आपली रजा घेतो.
सारे नियम तोड़ दो । नियम पे चलना छोड़ दो ।
अरे सारे नियम तोड़ दो । नियम पे चलना छोड़ दो ।
इंकलाब ज़िंदाबाद ! इंकलाब ज़िंदाबाद !
आप भी बोलिए - इंकलाब ज़िंदाबाद ! इंकलाब ज़िंदाबाद !
खाओ पियो मजा करो, खिलखिलाकर हंसा करो
कल की चिंता करेंगे कल, आज को आज ही जिया करो

दिन के चौबीस घंटों में, आठ घंटे सोना है
और चार है खाना पीना, दो है रोने धोने के
कुल बाकी चार ही बचते हैं
चार में कितना काम करे, खेले या आराम करें
जिस बात में आनंद मिले, वो करने में हर्ज नहीं
हर चीज जहां पर महंगी है, हर चीज का चढ़ता पारा है
भाड़े से ऊंची बिल्डिंग में, बिल्डिंग से ऊंचा भाड़ा है

हर चीज जहां पर महंगी है, हंसने पर खर्च नहीं

निरमा वॉशिंग पावडर कशामुळे लक्षात राहते? तिच्या टीव्हीवरच्या जाहीरातीमुळे. काय विशेष आहे त्या जाहिरातीत? तर हॅमरिंग. त्या जाहिरातीतले वारंवार हॅमर केलेले शब्द म्हणजे त्या उत्पादनाचं नाव. दूध सी सफेदी, निरमा से आये, रंगीन कपडे भी खिल खिल जायें. सबकी पसंद निरमा; वॉशिंग पावडर निरमा! निरमा!! निरमा!! बघा निरमा हे नाव किती वेळा हॅमर केलंय जाहिरातीत. तसंच या गाण्यात "सारे नियम तोड दो, नियम पे चलना छोड दो" आणि "इंकलाब ज़िंदाबाद! इंकलाब ज़िंदाबाद!" हे शब्द किती वेळा बोलून हॅमर केले गेलेत ते मोजा. काय बिशाद आहे कुणी शिस्तीप्रिय बनेल!!!
ता.क. अजून भारत कम्युनिस्टांच्या प्रभावाखाली पूर्णपणे गेलेला नाही याचा प्रत्यय आणणारा दिलासादायक परिणाम दाखवणारा कालखंड नुकताच येऊन गेला. नोटबंदीच्या काळात काँग्रेसच्या पप्पूपासून ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांपर्यंत सगळ्यांनी कामगार व शेतकरी वर्ग आणि मध्यमवर्गीयांचा कैवार घेऊन ते किती त्रासात आहेत हे दाखवून "देशात दंगली होतील" असे थेट इशारे देत जनतेला सरकारविरुद्ध हिंसात्मकरित्या भडकवण्याचा प्रयत्न केला. पण देशात राष्ट्रवादाची नव्याने पेरणी केलेल्या पंतप्रधान मोदीजींनी जनतेच्या मनावर असं काही गारुड केलं की जनतेने अशांना अभूतपूर्व संयम व शिस्तीचं दर्शन घडवत व्यवस्थित फाट्यावर मारलं.
© मंदार दिलीप जोशी - मराठी रूपांतर व संपादन
प्रेरणास्त्रोत / मूळ हिंदी लेखन - आनंद राजाध्यक्ष
पौष शु. ५, शके १९३८
या आधीचा लेखः वामपंथी भारत विखंडन १ - छडी लागे छम छम