Friday, September 16, 2016

एका पुरोगाम्याचा कात्रज केला त्याची गोष्ट

पुरोगामी: मी माझ्या मुलीचं लग्न अमावस्येला रात्री बारा वाजता करणार आहे.

मी: अच्छा म्हणजे हा मुहूर्त आहे तर. बरं आहे सगळ्या निमंत्रितांना येता येईल.

पुरोगामी (आता चिडचिड सुरू झालेली आहे): मुहूर्तावर करायचं नाही लग्न म्हणून रात्री बारा वाजता करतो आहे.

मी: अहो म्हणजे शेवटी तो मुहूर्तच ना.

पुरोगामी (आता कपाळावर आठ्या स्पष्ट दिसू लागलेल्या आहेत): काहीही बोलू नका, अमावस्येला लग्न करुन काहीही अशुभ होत नाही हे मला दाखवून द्यायचे आहे.

मी: पण अमावस्या रात्री आठ बत्तीसला संपते आहे.

पुरोगामी (आता हा भडकला) म्हणून काय झालं?

मी: अहो रात्री बारा वाजता खरंच चांगला मुहूर्त आहे. रात्री ९ ते दुसर्‍या दिवशी पहाटे ५ पर्यंत शुभ काल आहे. झकास संसार होणार बघा तुमच्या मुलीचा.

पुरोगामी (पत्रिका माझ्या हातातून खेचून घेत): तुम्ही नाही आलात तरी चालेल.

मी: ख्या ख्या ख्या.

1 comment: