चुन्नीलाल शल्ला
इन्स्पेक्टर ऑफ पोलीस, जम्मू-काश्मीर राज्य
राहणार सोपोर
कार्यभूमी: लानगेट, कूपवाडा
-----------------------------
यहाँ क्या चलेगा, निझाम-ए-मुस्तफा
ला शर्कीया, ला गर्बीया, इस्लामिया इस्लामिया
इथे काय चालेल, राज्य मुस्तफाचं
ना पौर्वात्य, ना पाश्चिमात्य, फक्त इस्लामचं फक्त इस्लामचं
काश्मीरात रस्तोरस्ती, मशीदींवरच्या भोंग्यांवरुन, आणि दफनभूमींमधे दिल्या जाणार्या जिहादी आरोळ्यांनी आता जोर पकडला होता. नुकतंच अफगाणीस्तानवरचा आपला ताबा सोडून रशियाने आपलं सैन्य नुकतंच माघारी बोलावलं होतं. त्यानंतर बराच काळ त्यासंबंधीच्या बातम्या टीव्हीवर दिसत असत. टीव्हीवर रशियन रणगाडे माघारी जात असल्याची आणि अफगाणिस्तानातले मुजाहिद हवेत गोळीबार करत असल्याची दृष्य पाहून काश्मीरमधल्या मुसलमानांच्या घराघरात जल्लोष केला जायचा. एखाद्या सामन्यात आपल्या देशाचा संघ जिंकल्यावर जसा आनंद आपल्याला होतो तसाच मिनी आनंदोत्सव अशी दृष्य पाहून साजरा व्हायचा. काय संंबंध होता रशियाच्या अफगाणीस्तानातून माघारीचा आणि इथे साजरा केल्या जाणार्या आनंदाचा? खरं तर काहीच नाही. पण काश्मीरी मुसलमानांच्या दृष्टीने फक्त हा विजय फक्त अमेरीकापुरस्कृत अफगाणी स्वातंत्र्यसैनिकांचा नव्हता, तिथे फक्त अफगाणी मुजाहिद जिंकत नव्हते, तर हा विजय इस्लामचा होता. इराण आणि पाकिस्तानच्या जवळच इस्लामी जगतावर आलेलं रशियन संकट दूर झालेलं होतं. अफगाणिस्तानात लवकरच अलाहच्या अंमल प्रस्थापित होणार होता. मुस्तफाचं राज्य येणार होतं. येणार काय, रशियाच्या माघारीने आलेलंच होतं. आता तिथल्या विजयाची पुनरावृत्ती काश्मीरात करायला अल्लाहच्या बंद्यांना कितीसा वेळ लागणार होता? दुर्दैव असं की हे अल्लाहचे बंदे स्वातंत्र्याच्या चुकीच्या कल्पनांनी पछाडले होते. दार-उल-हरब (युद्धभूमी, अजून इस्लामच्या अंमलाखाली नसलेला) असलेला काश्मीर त्यांना दार-उल-इस्लाम (इस्लामचं राज्य असलेला) करायचा होता.
म्हणूनच अशा घोषणा ऐकल्या की काश्मीरी पंडितांच्या छातीत धडकी भरत असे आणि त्यांच्या मुसलमान शेजार्यांच्या मनात उकळ्या. कारण आता त्यांच्या भागातल्या काफिरांचा अंजाम जवळ आल्याचा तो आगाझ होता. गिरीजा टिक्कू, सतीशकुमार टिक्कू, आणि अशा कित्येक काश्मिरी पंडितांच्या हत्येला त्यांच्याच शेजारी, तथाकथित मित्र, सहकारी अशा अनेक परिचितांनी कधी इस्लामी दहशतवाद्यांना माहिती देणं व इतर मदत करणं तर कधी प्रत्यक्ष हत्येत सहभाग अशा स्वरूपात भागही घेतला होता. याचाच एक भयानक उदाहरण म्हणजे चुन्नीलाल शल्ला.
चुन्नीलाल शल्ला. जम्मू काश्मीर राज्य सरकारच्या पोलीस खात्यात लानगेट इथे नेमणूक झालेले एक पोलीस निरिक्षक (इन्स्पेक्टर). जवळजवळ सहा महिन्यानंतर लानगेट येथील पोस्टिंगवरुन चुन्नीलाल यांना सोपोरमधल्या घरच्यांना भेटायला जाण्यासाठी सुट्टी मिळाली आणि त्याच आनंदात ते सोपोरला जाण्यासाठी बस मधे बसले. त्यांच्याबरोबर त्यांच्या हाताखाली काम करणारा एक मुसलमान हवालदार पण त्याच बसमधे बसला. सोपोरमधे त्या सुमारास जमात-ए-इस्लामी या दहशतवादी संघटनेने धुमाकूळ घालायला सुरवात केली होती. या कारणास्तव आपल्याला कुणी पटकन ओळखू नये म्हणून चुन्नीलाल यांनी भरघोस दाढी वाढवली होती. दहशतवाद्यांना चुन्नीलाल या बसने येत असल्याचा सुगावा लागला होता. बस सोपोरला पोहोचली आणि दोन अतिरेकी चुन्नीलाल यांना शोधत बसमधे घुसले. बसमधे सगळीकडे नजर टाकल्यावरही चुन्नीलाल काही त्यांना 'दिसले' नाहीत. त्यांची फारच निराशा झालेली होती. ते याच वैतागात बसबाहेर पडणार तेवढ्यात त्याच बसमधे बसलेल्या चुन्नीलाल यांच्या हाताखाली काम करणार्या मुसलमान हवालदाराने त्यांना हाका मारून परत बोलावलं आणि चुन्नीलाल कोण आहेत याकडे त्यांच लक्ष वेधलं.
पण पुढे जे झालं ते इतकं भयानक होतं की ज्याची कल्पना स्वतः चुन्नीलाल यांनाही करता आली नसणार. त्या दोन दहशतवाद्यांनी चुन्नीलाल यांना गोळ्या घातल्या तर ते पटकन मरतील असं वाटलं म्हणून की काय, त्या दोघांनी काही करण्याची वाट न बघता त्या हवालदाराने आपल्याजवळचा एक चाकू काढला आणि चुन्नीलाल यांच्या उजव्या गालावर चालवून वाढवलेल्या दाढीसकट संपूर्ण उजव्या बाजूचा गाल कापून काढला. रक्ताळलेला आणि मांस लोंबत असलेला चुन्नीलाल यांचा चेहरा आता खूपच भेसूर दिसू लागला. अत्यंत अनपेक्षित अशा या हल्ल्याने चुन्नीलाल यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यातून सावरण्याची त्यांना संधी न देता त्या हवालदाराने त्यांचा बखोट पकडून, "अरे डुकरा, तुला मी असा बरा आमच्यासारखी दाढी ठेवू देईन दुसर्या गालावर सुद्धा!" असं म्हणून त्यांचा दुसरा गालही कापून काढला. आता आपण इथे जे करायला आलो होतो ते करायला न मिळालेल्या त्या दोन दहशतवाद्यांनी त्या हवालदाराच्या मदतीने चुन्नीलाल यांना बसमधून फरफटत बाहेर काढलं आणि "तुझ्यावर बंदुकीच्या गोळ्या पण फुकट घालवणार नाही" असं हिणवत त्यांच्या आधीच जखमी चेहर्यावर हॉकी स्टीक्सच्या फटक्यांचा वर्षाव केला.
आणि चुन्नीलाल शल्ला यांना तिथेच रस्त्यात तडफडत मरायला सोडून ते तिघे तिथून निघून गेले.
परवा एका व्हॉट्सॅप ग्रूपवर एकाने मला टोमणा मारला. तुला फक्त अतिरेकीच भेटलेले दिसतात! काय आहे की व्हॉट्सॅपवर टोमणेबाजी पटकन करता येते. त्याला फार डोकं चालवावं लागत नाही. पण त्याला उत्तर द्यायला वेळ लागतो. उत्तरादाखल नुकतीच वाचलेलं एक अप्रतीम लेखन इथे उधृत करतो. नाही, मला फक्त अतिरेकी नाही तर मला सगळाच्या सगळा फुटबॉल संघ भेटला आहे. कसा? सांगतो. इस्लामचे पाईक हे एखाद्या फुटबॉल संघासारखे असतात. अतिरेकी हे स्ट्रायकर्स सारखे असतात. प्रत्यक्ष 'गोल' करणारे. जहालमतवादी हे मिडफील्डर्स सारखे असतात जे अतिरेक्यांना थेट रसद पुरवतात. डिफेन्डर मंडळी म्हणजे इस्लाममधली तथाकथित मवाळ मुसलमान. हे सगळे एकच असले तरी डिफेन्डर सतत दाखवण्याचा प्रयत्न करतात की आमचा अतिरेक्यांशी काही संबंध नाही बुवा, पण प्रत्यक्षात त्यांचं काम इस्लामवर होणार्या रास्त टीका आणि आरोपांना उत्तर देणं असतं. उदारमतवादी म्हणजे गोलकीपर. परिस्थिती हाताबाहेर जात आहे असं वाटलं की बचावासाठी हे उतरतात. म्हणजे इस्लाम म्हणजे शांततेचा धर्म, तुम्ही समजता तसा इस्लाम नाहीच, अमुकचा आम्ही निषेध करतो अशी थापेबाजी करण्याचं काम यांच्याकडे असतं.
चुन्नीलाल शल्ला यांना मारायला आलेले अतिरेकी आणि त्यांना सक्रीय मदत करणारा चुन्नीलाल यांच्याच हाताखालचा तो मुसलमान हवालदार, हे या फुटबॉल संघात कुठे बसतात हे तुम्हीच तपासून पहा.
काश्मीरमधली आणखी एक घोषणा आठवली.
झलझला आया है कुफ्र के मैदान में
लो मुजाहिद आ गये मैदान में
काफिरांच्या प्रदेशात भूकंप आला आहे,
मुजाहिद मैदानात उतरलेत.
काश्मीरात सगळाच्या सगळा संघ मैदानात उतरलाय आता. एका डोळे झाकलेल्या वृत्तवाहिनीच्याच भाषेत सांगायचं तर उघडा डोळे, बघा नीट!
--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
आषाढ कृ. ४, शके १९३८
२३ जुलै इसवी सन २०१६
--------------------------------------------------------
Vidarak....perfect example of football
ReplyDeleteसुन्न झालो
ReplyDeletenice artical, what do the goverment
ReplyDeleteअस्वस्थ करणारं भीषण सत्य
ReplyDeleteशब्दच नाहीत सर धन्यवाद
ReplyDeleteवाचल्याबद्दल धन्यवाद. आपली एकी होणे महत्त्वाचे आहे फारच.
ReplyDelete