Thursday, September 18, 2014

टाटा लोकसत्ता

आदरणीय(!) संपादक साहेब गिरीश कुबेर साहेबांस,

[लोकसत्तात मराठीची काय वाट लागलेली आहे याचा मी उल्लेखही करत नाही याची कृपया नोंद घ्या (किंवा घेऊ नका....आम्हाला काय त्याचे?)[]

मी मूळचा इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी. इयत्ता दुसरीत मराठी वाचायला शिकलो तेव्हापासून लोकसत्ता वाचतो आहे. माझ्या सुरवातीच्या मराठी वाचनात लोकसत्ताचा मोठा वाटा आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. सातेक वर्षांपूर्वी पुण्यात स्थलांतरित झालो तेव्हा सुरवातीला पेपरच घेत नव्हतो. आम्ही उभयतां नोकरी करत असल्याने छापील अंक वाचायला दोघांनाही वेळ नव्हता. आता मुलं शाळेत जाऊ लागली म्हणून त्यांना चांगलं मराठी वाचायला मिळेल या आशेने पावरफुल आणि पवारफुल सकाळ न घेता लोकसत्ता घेणे पसंत केले कारण लोकसत्तावरचे प्रेम आणि श्रद्धा.....हो श्रद्धा. 

माधव गडकरी लोकसत्ताच्या संपादकपदावर होते तो पर्यंत लोकसत्ता हा वाचनीय होता. नंतर उतरती कळा लागली. अरुण टीकेकर, कुमार केतकर यांनी यथास्थित गरळ ओकून झाल्यावर आता तुम्ही लोकसत्ताला ढगात पाठवण्याच्या कामी कुठलीही कसर सोडलेली दिसत नाही. लोकसत्ताचे हल्लीचे लिखाण प्रचंड एकांगी होत चालले आहे. हिंदूंच्या बाजूने बोलणार्‍या त्यांचे प्रश्न मांडणार्‍या कुणीही काहीही बोलले, किंवा एखादा विषय मांडला, किंवा काही घटना घडली की लगेच त्यावर इयत्ता तिसरी ड च्या उत्साहात बातमी छापलीच पाहीजे असा पायंडा अलिकडे लोकसत्तात पडला होता. आता तर या गरळओकीत मोदी सरकार आल्याने नवा जोम आला आहे. एखाद्या घटनेशी, गोष्टीशी, किंवा केलेल्या विधानाशी संबंधित असलेल्या आणि असू शकणार्‍या असंख्य गोष्टींचा एकत्रितपणे विचार आणि अभ्यास करुन अन्वयार्थ काढायचा व मगच अग्रलेख लिहायचा असतो किंवा बातमी द्यायची असते हे लोकसत्ताच्या गावीही उरलेले नाही.

थोडासा ट्रॅक बदलतो. अनिसच्या भूमिकेनुसार "समाजामध्ये काम करताना थेट देवावर विश्वास/श्रद्धा ठेवू नका असे सांगत काम करता येत नाही, त्यामुळे बहुसंख्य समाज दूर जातो. त्यापेक्षा थेट अंधश्रद्धांवर (बुवाबाजी, ज्योतिष इत्यादी) हल्ला चढवत, त्यांचे दुष्परिणाम सांगत लोकांपर्यंत अधिक चांगले पोचता येते, प्रबोधन करता येते." याचाच अर्थ असा की आधी उघड दिसणार्‍या अंधश्रद्धांवर हल्ला चढवायचा. मग हळू हळू एक एक श्रद्धा ही अंधश्रद्धा आहे हे पटवत पटवत लोकांना देव आणी श्रद्धा वगैर सब झूठ या पातळीवर यायला प्रवृत्त करायचं. उदाहरणतः नारळ फोडणे ही अंधश्रद्धा आहे, कोंबडी कापू नका, इत्यादी. मग हे भंपक आणि भेकड लोक बकरे कापणार्‍यांना जाऊन सांगणार नाहीत. कारण ते सेक्युलर आहेत. हा हलकटपणा लोक खपवून घेत नाहीत हे चांगलंच आहे. इथे कोणीही 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी'  हे पाळत नाही आणि स्वतः कष्ट करतोच. ते करत असताना आम्ही काही सण साजरे करत असलो आणि काही प्रथा पाळत असलो तर त्या आम्ही पाळणारच.

दाभोलकर हत्येनंतर ज्याप्रमाणे हिंदू संघटनांना लक्ष्य करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न झाला त्यामुळे तर आधीच हास्यास्पद असलेली अनिसची विश्वासार्हता खड्ड्यात जात चाललेलीच आहे. त्यांच्याबरोबर लोकसत्तानेही बहुतेक आपली निष्ठा विकून स्वतःच्या अब्रूला चितेवर चढवून अनिसबरोबर सती जायची तयारी केलेली दिसते.

तेव्हा हिरवी हवा डोक्यात गेलेले संपादक महाशय गिरीश कुबेर, पेपर चालवताय तर बातम्या देण्याचे काम करा. उगाच समाजाला मार्ग दाखवण्याच्या नावाखाली ऊठसूठ हिंदूना(च) अक्कल शिकवण्याचा आगाऊपणा करत जाऊ नका. वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाजप्रबोधन करायला तुम्ही "लोकमान्य" नाही आणि या उचापत्यांनी हेही स्पष्ट आहे की तुमची नियतही साफ नाही. 

कुठलेही वर्तमानपत्र किंवा अंक हा एकांगी असेल आणि त्याचा गाभा हा द्वेषमूलक असेल तर तो फार काळ दर्जा आणि लोकप्रियता टिकवून ठेवू शकत नाही. माझ्यासारखे अनेक जण केवळ इतक्या वर्षांची सवय मोडता येत नाही म्हणून लोकसत्ता घेत होते. त्यातल्या मी फक्त माझ्यापुरता एक निर्णय घेतला आहे. तुमचा पेपर मी माझ्यापुरता या महिन्यापासून बंद करतो आहे. सकाळी सकाळी डोक्याला शॉट लाऊन घेण्याची माझी इच्छा नाही. आत्तापर्यंत चालू होता कारण काही लेख वाचायला आवडत असे. आता आवडणारे लेख ऑनलाईन वाचत जाईन आणि वाटलंच तर आवडणार्‍या लेखांचे प्रिन्टाआउट काढत जाईन.

आपला,
लोकसत्तावरची श्रद्धा उडालेला,

मंदार दि. जोशी
51 comments:

 1. लेख उत्कृष्ट आहे. हल्ली कुणी पण उठतो आणी हिंदुंवर तोंडसुख घेतो. लेखणी हातात आली कि आपणच कसे धर्मनिरपेक्षतेचे पुजारी आहो आणी त्याचा ठेका कसा आपल्याकडे आहे हे सांगायला यांची लेखणी सळसळत असते मग.

  ReplyDelete
  Replies
  1. आणि कधी कधी तोंढघशी पण पडतात. जसे नुकतेच पडले आहेत अग्रलेख लिहून.

   प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद

   Delete
 2. चांगले लिहिले आहे. आपल्या लेखणीला धार आहे

  ReplyDelete
 3. लोकसत्ता की एकसत्ता?
  छान लेख

  ReplyDelete
  Replies
  1. सद्ध्या त्यांचा "झोक"सत्ता झालाय :D

   Delete
 4. U r biased & have brahmanical ideology ........

  ReplyDelete
  Replies
  1. Oh i see so U r s.brigade and anti hindu guy.

   Delete
  2. महेश, बिनडोक विधानांना अजिबात उत्तर द्यायला जाऊ नका. आपण सारे एक आहोत हे अनेकांना समजत नाही हे दुर्दैव.

   Delete
 5. chandrashekhar nehateAugust 1, 2015 at 10:18 AM

  Pseudo secular and fanatic doghehi waait

  ReplyDelete
 6. I agree with you Mandar. I am sure you can elaborate with specific fault lines of other faiths against which the psedusecularists are keeping mum. Keep it up.

  ReplyDelete
  Replies
  1. Thank you Mohan. I will do that surely in my subsequent articles.

   Delete
 7. Agreed 100 percent Mandar ji. Loksatta should be banned. Thank you for your concern.

  ReplyDelete
  Replies
  1. अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद. यापुढे अधिक छान लेखन करण्याचा प्रयत्न असेल.

   http://www.facebook.com/mandarkelshikar

   Delete
 8. Mi dekhil shaalet asalyapasun...lokasattachi juni vaachak.ani...kumaar Ketkar aseparyant...mi dekhil lokasatta vaachat hote...tyanche lekh vaachtana...baryavh goshti patat navatya...ji mazi opinions hote....te perfect shabdaat ani teekshna lekhanitun utarlele baghun khup chhan vaatal...he kharay...konihi uthaav ani hindunvar tondsukh ghyaav...ha trend ahe halli....anyways......nice to read you sir.....ashi clear ani dhaardaar lekhani halli baghaila ani vaachaila milat naahi....lekh uttam....

  ReplyDelete
  Replies
  1. अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद. यापुढे अधिक छान लेखन करण्याचा प्रयत्न असेल.

   Delete
 9. विनोद शिनकरAugust 1, 2015 at 3:43 PM

  लेख खुप छान लिहला आहे. मी सुद्धा "लोकसत्ता" वाचन दोन वर्षा पूर्वी ह्याच कारणामुळे सोडले. सेक्युलरिसम च्या नावाखाली हिंदू धर्मा विरुद्ध लिहने, राजकारणात एकाच पक्षा शी बांधीलकि आणि लोकसत्ता संपदकांना हे ही लक्षात येत नाही की राष्ट्रवादी लिखाण करता आहे का राष्ट्रविरोधी.

  ReplyDelete
  Replies
  1. अगदी खरे बोललात विनोदजी.

   Delete
 10. I agree with ur views mandar keep writing

  ReplyDelete
  Replies
  1. Thank yoy Ajoy. Will try my best to keep improving my writing.

   Delete
 11. Not only Loksatta but all Print and TV media were given more coverage to Yakub's case.

  On that day two persons buried. About how one made us proud (APJ Kalam sir) and the other made our heads hang in shame (Yakub). But the Times of India seems to think differently. The first 6 pages in edition of TOI are devoted to Yakub, who along with other family members was responsible for nearly 300 people being killed, whilst APJ Abdul Kalam is pushed to page 13. And mind you, there is not a word on the families of those who perished or suffered due to the blasts. The text and the pictures make Yakub a wronged hero. This coming from a media house of national standing exposes our media's priorities where traitors and their family get sympathy on the front pages whilst National heros are pushed behind.

  THIS IS OUR REAL SHAME!

  ReplyDelete
 12. मंदार जोशी यांच्याशी पूर्ण सहमत ! एक दमड़ी सुद्धा लोकसत्ता साठी देणार नाही . Over and out !!

  ReplyDelete
  Replies
  1. सुमेधा, अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.

   Delete
 13. धन्यवाद ! आमच्या सारख्यांच्या भावनांना योग्य भाषेत व्यक्त केल्याबद्दल.
  माधव गडकरी असेपर्यंत न चुकता लोकसत्ता वाचत होतो.... अरुण टिकेकरांनी आम्हाला लोकसत्ता बंद करायला " मजबूर " केले...
  कुमार केतकरांबद्दल न बोललेच बरे..
  हेमंत गडकरी
  औरंगाबाद

  ReplyDelete
  Replies
  1. कुमार केतकरांबद्दल न बोललेच बरे >> अगदी खरे आहे.

   Delete
 14. Mandar मी पूर्ण पणे सहमत आहे,लोकसत्ता म टा हे पेपर्स विकले गेलेत.प्रेस्टिटुट असं सुब्रमण्यम स्वामी का बोलले हे सिद्ध होतय.कदाचित कॉँग्रेस चे घाणेरड् राजकारण पडद्यामागे सूरू झाले असे वाटतय.

  ReplyDelete
 15. Superb article Mandar Josh. Bolaycha khup asta pan te shabdat mandta yet nahi... Thank you for doing this effectively and efficiently.... Kudos

  ReplyDelete
  Replies
  1. Thanks Rashmi. If you write on ANY topic regularly, then you will also find words to write. There is nothing big in that. Give it a try.

   Delete
 16. लोकसत्ता बद्दल आपण प्रकट केलेले विचार 100% खरे आहे;I इतरांचे विचारांचा आपण अभ्यास करावा ह्या शुद्ध हेतुनेच ;लोकसत्ता आजपर्यंत वाचत आलो;आपल्या विचारानी प्रेरित होउन् आज पासूनच हे वर्तमानपत्र बंद केले आपले आभार आणि अभिनन्दन!

  ReplyDelete
  Replies
  1. अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.

   Delete
 17. sarang paravnjpe nagpurAugust 2, 2015 at 1:06 PM

  अप्रतिम लेख मन्दार आमच्या मनातल अचूक तुम्ही कागदावर उतरवलत
  लोकसत्ता आम्ही पण बन्द केला दीड वर्षांपूर्वी पण संजय ओक यांचे लेख छान असतात
  Keep it up
  All the best

  ReplyDelete
  Replies
  1. Thanks Sarang for your compliments and wishes. Will try to improve my writing continuously. keep reading.

   Delete
 18. Me pan loksatta cha 15 varshapasun wachak ahe ata ti godi hi nahi an facts pan describe hot nahit

  ReplyDelete
 19. Mi sudha MATA band kela kahi varhapurvi. Gondya Talwatkarane Sobat kat G VA BEHARE YANCHYA DUKHAD NIDHANACHI BATAMI YACH HINDU DVESH VA TATHAKTHIT SAMAJVAD / PSEUDO SECULARISM MULE DILI NAHI.

  ReplyDelete
  Replies
  1. Khup vaeet chally sagalikade. Newspapers are not newspapers anymore

   Delete
 20. हे कुमार केतकर ही कोंग्रेसचे spokeperson आहेत...कळायला थोडा उशीर झाला.

  ReplyDelete
 21. अप्रतिम लेखन

  ReplyDelete
 22. I am in full agreement with you on your views on Loksatta. I am trying to break my habit of Loksatta & hopefully will unsubscribe it soon.
  But then which Marathi newspaper can we have in Pune ?? Not a single name comes to my mind.

  ReplyDelete
  Replies
  1. That is also true. What you can do is selectively read Loksatta, Sakal, MaTa - But only Online.

   Delete
 23. Sir I'm Hindu by religion n I'm proud of it...Even I'm fully agree with ur views on Yakub Menon... But we also need to ban Sanatan Prabhats newspaper as they are spreading wrong and violent views in society. They are projecting wrong image of Hindu religion. Our religion is very progressive but Sanatan Prabhat is very orthodox organisation. Even sometime they spread hatred. This is not good for our religion.
  So we need to fight on this front also. We should reform some of our bad practices. There are many things for which we need to fight like eradication of caste system to unite all Hindus.
  Im hopeful that we can curb radical n extreme religious views from our religion so that our religion will become ideal for other religions of the world.
  Let's try together to make Hindu religion best religion, a religion of humanity...

  Thank you
  Satya mev Jayate.

  ReplyDelete
  Replies
  1. तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे थोडेसे. सनातन प्रभात मला अजिबात आवडत नाही. मी तो पेपर नियमितपणे वाचत नाही. अगदी अनियमित म्हणावे इतकाही वाचत नाही. तरीही ते मांडतात ते सगळे वाईट किंवा बेकायदेशीर असते असे नव्हे. ते यडचाप लोकं आहेत. यडचापपणा हा बेकायदेशीर झाला तर त्यांच्यावर नक्कीच बंदी येईल. हाहा.

   Delete
 24. I agree with you sir.Loksatta editorial is always totally against the janmanas.I observed since BJP govt has come not a single compliment is given except India Bangladesh border.

  ReplyDelete
 25. डॉ.संजय उपाध्ये(पुणेनिवासी) यांचे लोकसत्तेवरील 'घणा'चे श्लोक :

  *डॉ. संजय उपाध्ये - :
  बहिष्कार टाका

  अती बुद्धीवादाची होय खाखा
  अशा लोकसत्ता बहिष्कार टाका

  लिही लेख ऐसा जया अग्र नाही
  जया वाटतो देश हा देशद्रोही
  कुबेराघरी बुद्धी दारिद्र्य कैसे
  जसे गोस्तना झोंबे गोचीड जैसे
  द्या लेखना ह्या लोक सत्ता तडाखा
  अशा लोकसत्ता बहिष्कार टाका

  तसे पत्र ह्याची जुनी हीच खोड्
  जणू पीत पत्रा पती नित्य द्वाड्
  जरी पाहिले अन्न सुग्रास काही
  तरी कावळा बावळा शेण खाई
  अशा लेखनाला समुद्रात फेका
  अशा लोकसत्ता बहिष्कार टाका

  जिथे नांदते नित्य पाणी कपात्
  सकाळी असो लोकसत्ता खिशात
  सकाळीच त्याची करा नित्य रद्दी
  तशी त्यासही आदत गंदीगंदी
  अशा लेखका पाठवा पाक ढाका
  अशा लोकसत्ता बहिष्कार टाका

  बहुसंख्य हिंदूंस ना धर्म माज
  जगी सर्वज्ञानी असा हा समाज
  कलामांस श्रद्धांजली मन्मनाने
  तुटे जीव हा आमुचा कणकणाने
  अशा ज्ञाननगरीमधे मूर्ख नाका
  अशा लोकसत्ता बहिष्कार टाका

  अशा मूर्ख लोकांवरी प्रेम नाही
  अजूनी किती संपवू मीच शाई
  तुम्हा वाचकांना कळे सर्व काही
  उगा होतसे अंतरी लाही लाही
  चला सांगुया हे जना एकमेका
  अशा लोकसत्ता बहिष्कार टाका

  अती बुद्धीवादाची होय खाखा
  अशा लोकसत्ता बहिष्कार टाका

  डॉ. संजय उपाध्ये

  ReplyDelete