Monday, September 20, 2010

सात्विक संतापाच्या चारोळ्या

गणपतीच्या मिरवणूकीला
रात्री दहाचा चाप आहे
आयपीएलच्या तमाशाला मात्र
सर्व काही माफ आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

गवयांच्या सवाईला चावला
समानतेचा साप आहे
रस्त्यावरच्या नमाजाला मात्र
सर्व काही माफ आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

कसाबला बिर्याणी अन्
अफझलला शांत झोप आहे
काश्मिरी पंडितांना मात्र
ट्रांझिट कँपचा शाप आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

अमरनाथाच्या भक्तांना
उघड्यावरच आसरा आहे
आपलीच जमीन मागताना
आपलाच आवाज कापरा आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

दादोजीं, रामदास खलनायक अन्
अफझलखान मात्र 'हाजी' आहे
ब्रिगेडवाल्या राज्यकर्त्यांची मात्र
मॅडमपुढे हांजी हांजी आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

त्यांनी लुटली अब्रू, अहो लुटू द्यावी!
सहिष्णूतेचा गुंता आहे
आपल्याच लोकांचा झालेला
वैचारिक सुंता आहे

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

जाता जाता एक खवचट (काहीच्या काही) चारोळी....

आज कुंकू मागासलेले अन्
टाईट जीन्सला 'पोच' आहे
आईचा सल्ला स्वेच्छा अन्
सासरची प्रथा 'जाच' आहे...

3 comments:

  1. जबरदस्त!!! आहे !!

    ReplyDelete
  2. चारोळ्यातून संताप व्यक्त होत आहे. अशाच भावना व्यक्त करत जा म्हणजे आमच्या सारख्या माणसाला त्या copy करून व्यक्त करता येतील FB वर वगरे ...

    ReplyDelete
  3. अप्रतिम !!!! शब्दाशब्दातून सात्विक संताप व्यक्त होतो आहे... मस्तच...

    ReplyDelete