Tuesday, May 2, 2017

बाहुबली द कन्क्लुजन - एकदा तरी नक्की पहावी अशी भव्यकलाकृती

मी दक्षिणेतले डब केलेले चित्रपट फारसे बघायला जात नाही. फारसे कशाला, बघतच नाही. चित्रपटगृहातच नव्हे तर घरी सुद्धा नाही. रोजा हा शेवटचा डब केलेला सिनेमा चित्रपटगॄहात जाऊन बघितलेला आठवतो. याला मुरड घालून बघितलेले दोन चित्रपट म्हणजे अर्थातच बाहुबली द बिगिनिंग आणि गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला बाहुबली द कन्क्लुजन.

पहिला भाग बाहुबली द बिगिनिंग काही कारणांमुळे चित्रपटगृहात बघता आला नाही, पण मुलांच्या कृपेने अगणित वेळा टीव्हीवर पारायणे झालेली आहेत. पण टीव्हीवर पाहण्यात मजा नाही हे लक्षात आलेच होते.
चित्रपट निर्मात्यांनी रामायण, महाभारत आणि इतर इतिहासातल्या अनेक घटना आणि घटनाक्रम कथानकात वापरल्या आहेत. निवर्तलेल्या राजाच्या सद्वर्तनी आणि महपराक्रमी मुलाला सत्ता न मिळता अनीती आणि कुमार्गावर चालणार्‍या त्याच्या भावाला मिळणे, त्या सन्मार्गी मुलाने सत्तात्यागच नव्हे तर राजप्रासादाचा सुद्धा त्याग केल्यावरही त्याच्या जीवावर उठलेला अन्यायी भाऊ आणि त्याचे सल्लागार मंडळ, राजघराण्यातली कटकारस्थाने, ऐन वेळी चुकीच्या व्यक्तीचा आदेश ऐकून न्याय्य पक्षावर अन्याय करावा लागणं यात झालेला कटप्पाचा भीष्माचार्य, आणि बैलांच्या शिंगांना लावलेले पेटते पलीते अशा अनेक ऐतिहासिक संदर्भ असलेल्या गोष्टी या चित्रपटात आहेत.

पहिल्या भागात जाणवलेली आणि दुसर्‍या भागात विशेषकरुन ठसठशीतपणे समोर आलेली उल्लेखनीय बाब म्हणजे चित्रपट हे संपुर्णपणे एका हिंदू साम्राज्यावर बेतलेला असून त्यात ठायी ठायी असलेल्या हिंदू देवतांच्या मूर्ती किंवा त्यांची आणि सणांची ठसठशीत प्रतीके व गाणी. या गोष्टी निश्चितपणे डोळे आणि जीवाला सुखावून जातात. याचं विशेष कारण म्हणजे आजवर हिंदीत बनलेले चित्रपट हे प्रामुख्याने धर्मांध आणि कत्तलखोर मुघल राज्यकर्त्यांची प्रतिमा व्हाईटवॉश करण्यासाठीच बनवले गेलेले होते. इतकंच नव्हे, तर नायक, नायिका आणि त्यांचं आख्खं खानदान हिंदू असले तरी चित्रपटात किमान एक कौवाली असणे किंवा प्रेमगीत असल्यास मौला, बुल्ला, खुदा किंवा तत्सम शब्दांची रेलचेल असणे, सिनेमात किमान एक सहृदय शांतीदूत वगैरे अशा गोष्टी पाहून वीट आलेला होता. त्या पार्श्वभूमीवर वर उल्लेख केल्याप्रमाणे हिंदू दैवते व प्रतीके यांची ठसठशीत उपस्थिती दाखवल्याबद्दल संबंधितांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. नाही म्हणायला पहिल्या भागात असलम खान नामक शस्त्रविक्रेत्याची एक व्यक्तिरेखा होती पण त्यातही कटप्पा त्याच्या शस्त्रांचा पाणउतारा करताना दाखवला आहे.

आणखी एक सुखावणारी गोष्ट म्हणजे माहिष्मती साम्राज्याच्या 'राष्ट्रगीता' पासून ते सैन्याला दिल्या जाणार्‍या आदेशांपर्यंत अनेक ठिकाणी संस्कृत शब्दांचा केलेला वापर होय. सातत्याने उर्दू शब्द ऐकून किटलेल्या कानांनी आणि विटलेल्या मनांनी या बदलाचं निश्चितच जोरदार स्वागत केलं यात काही आश्चर्य नाही.
किती जणांच्या लक्षात आलं माहित नाही, पण बैलांच्या शिंगांना पेटते पलीते लावण्याची ही शिवाजी महाराजांची ही एकच कल्पना दिग्दर्शक राजामौलीने वापरलेली नाही. कुंतल देशाच्या राणीचा भाऊ कुमारवर्मामधे शौर्याची भावना उत्पन्न करुन त्याला पराक्रम गाजवायला भाग पाडणारा बाहुबली आणि मदत मागायला आलेल्या बुंदेल नरेश छत्रसालाला स्वतःचं स्थान निर्माण करायला प्रोत्साहन देणारे आपले महाराज यात मला विलक्षण साम्य आढळलं.

चित्रपटातील स्त्रियांचे केलेले चित्रण ही विशेष आवडलेली बाब. सम्राज्याचा गाडा यशस्वीपणे हाकणारी शिवगामिनी तर आहेच, पण कधी संकटसमयी तलवार तर कधी प्रियकरासाठी मोकळा सोडलेला केशसंभार अशी चतुरस्र देवसेनाही आहे. देवसेना स्त्रियांशी वावगं वागणाऱ्या सेनापतीची स्वतः बोटं छाटते, त्यासाठी नवऱ्याची वाट बघत बसत नाही. पहिल्या भागातल्या हिरविणीला अवंतिकाला मात्र या भागात फारसं काम नाही.

दोषच सांगायचे तर दक्षिणेतल्या चित्रपटातील साहसदृश्यात अतिशयोक्ती या शब्दालाही लाजवेल अशी दृश्ये असतात तशी या चित्रपटातही आहेत. बैलांची काही दृश्ये ही VFXच्या दृष्टीने जरा गडबड वाटतात, पण तरीही अंगावर रोमांच यावेत अशी आहेत. बोट हवेतून जाते हे स्वप्नदृष्य (dream sequence) आहे हे नंतर जाणवतं, तिथे संपादन (एडीटींग) दोष असावा असं वाटतं. अगदी रजनीकांतला सात जन्मात जमणार नाहीत अशी अतिशयोक्तीपूर्ण साहसदृश्ये शेवटाकडे आहेत. पण याबाबत माझं जरा वेगळं मत आहे. एक तर हे कथानक काल्पनिक आहे, त्याला कुठल्याही ऐतिहासिक सत्य परिस्थितीचा काडीचाही आधार नाही. शिवाय इतक्या मोठ्या पटलावर या गोष्टी आरामात खपून जातात. आपल्याला चमत्कृतीपूर्ण हॅरी पॉटर चालतो, तर अतिशयोक्तीपूर्ण बाहुबली का चालू नये?

या चित्रपटाच्या निमित्ताने एतद्देशीय राजे व संस्कृती निर्भीडपणे दाखवणारे चित्रपट बनायला सुरवात झाली तर सोन्याहून पिवळं असं म्हणता येईल. खानावळ आणि हीन दर्जाच्या घराणेशाहीने ग्रासलेल्या हिंदीत बनतील अशी अजिबात आशा नाही. पण जे कुणी ते निर्माण करेल, ते करताना या चित्रपटातले दोष हेरून ते दूर करण्याची प्रक्रियाही सातत्याने झाली पाहीजे.

- (भयानक कम्युनल चित्रपट चाहता) © मंदार दिलीप जोशी

तळटीपः चित्रपटाशी करण जोहरचं असलेलं नातं, VFX स्टुडीओ आणि पैसे कुणाकुणाचे लागले आहेत या संबंधातले टोमणे आधीच गृहित धरुन सांगतो, की त्यांचे पैसे वापरुन हिंदू संस्कृती चित्रपटातून दिसत असेल तर मी म्हणतो वापरा बिंधास. काय?

Thursday, March 9, 2017

गुरमेहर से सुहाना तक, सैफुल्ला के वालिद से होते हुए

कुछ लोगों के मन में उठा प्रश्न सटीक है - पहले भी मुस्लिम गायक हिंदू देवदेवताओं के स्तुतीपर गीत गा चुके हैं, तो फिर सुहाना के ऐसा करने पर बवाल क्यों?

मेरा आकलन यह है कि जब जब जो जो होना है, तब तब सो सो होता है.  अर्थात एम.एस.एम यानी मुख्यधारा के प्रसारमाध्यम एवं सोशल मिडिया पे कोई भी ट्रेन्ड यूंही नहीं चलता.  इसे अलग परिपेक्ष्य में देखना पडता है.  यहां कुछ भी समय से पहले, नसीब से ज्यादा, और कारण के अभाव में नहीं होता.

कुछ दिनो पहले ही गुरमेहर कौर की ट्विट से उठा बवाल आपको ज्ञात ही होगा.  उसने ट्विट में कहा था की मेरे पिता को पाकिस्तान ने नहीं मारा, युद्ध ने मारा.  इस बात पर राष्ट्रवादी गुस्से हो कर उसपे टूट पडे और मुख्यधारा के प्रसारमाध्यम एवं सोशल मिडिया पर मंडरा रहे असुर प्रकृति को अवसर मिल गया की कैसे देश मे असहिष्णुता एवं विचारस्वातंत्र्य का दमन हो रहा है.  किंतु जब वे भी जानते थे और आप-हम भी जानते हैं कि यह केवल अपने विचारों को प्रकट करने का विषय नहीं था.  अगर आप किसी पक्ष या व्यक्ती को कोसें तो वह विचारस्वातंत्र्य के अंतर्गत आ सकता है.  लेकिन गुरमेहर के इस ट्वीट का अन्वयार्थ यह था कि आज तक भारत के जितने भी सैनिक एवं और लोग मारे गये,  उन सब की मृत्यू का भारत एक देश के रूप में उतना ही उत्तरदायी है जितना पाकिस्तान.  अतः भारत को शांती प्रक्रिया को आगे ही बढाना चाहीये.  अब यह बात कितनी बचकानी एवं झूठी है यह तो आपको बताने की आवश्यकता नहीं है.  चूंकि अब मुख्यधारा के प्रसारमाध्यमों का दबदबा उतना नहीं रहा, इस बात की जमकर और विभिन्न कोणों से आलोचना हुई.  गुरमेहर एक लडकी है और केवल २० वर्ष आयु की है यह कुतर्क भी उसे बचा न पाये.  विरोध इतका बढ गया कि गुरमेहर को उसे किसीने बलात्कार की धमकी दी है ऐसा बोलना पडा.  इससे उसके विरोध में बोलने वालों में ही फूट पड गयी, और कईं लोग केवल इस धमकी वे विषय में क्यों न हो, गुरमेहर की तरफ हो लिये.  आखिर एक लडकी की इज्जत का सवाल था न! लेकिन बाद में जब यह ज्ञात हुआ कि उसे बलात्कार की धमकी देने वाला उसी के लिबरल गिरोह वाले किसी विद्यार्थी संघटन का सदस्य था, तो यह बात जैसे उछाली गयी थी उससे दोगुने गति गायब भी हो गयी.  फिर अखिल भारतीय विद्यार्थी संघटन के सदस्योंने ही पुलिस  में केस दर्ज करवाया.

खैर, आप को जो तथ्य पहले से ज्ञात हैं उन्हें फिरसे आप के सामने रखने के कारण क्षमाप्रार्थी हूं, परंतु सुहाना का दमन उछाले जाने के कारण तक पहुंचना है तो हमें गुरमेहर के विषय को थोडा देखना होगा इस कारण यह इतिहास लेखन करना पडा.  तो सुहाना का किस्सा क्या है? सुहाना सईद ने एक कन्नडा रियलिटी शो में एक हिंदू भक्तीगीत गाया था.  मैं इस गायक से अनभिज्ञ हूं लेकिन इस विषय में अधिक जानकारी लेने हेतु उसके एक दो गाने सुने.  भाषा तो समझ नही आयी परंतु यह ज्ञात हो गया की यह एक प्रसिद्ध गायिका है और लोगों को इसके गाने पसंद आते हैं.  तो सुहाना ने एक रियलिटी शो में एक हिंदू भक्तीगीत गाया और इसके पश्चात शुरू हुआ इस्लामियों की ओर से उसपे धमकीयोंका सत्र.  उसके विरोध में वही पुराने तर्क सुनने मिले की इन लोगों को ऐसा नहीं करना चाहिये क्योंकि देखो इस्लाम कितना अच्छा एवं शांतीपूर्ण धर्म है इत्यादि.  लेकिन सबसे बडा कुतर्क यह देखा गया की अगर गुरमेहर को अपनी बात रखने का अधिकार है तो सुहाना सईद को भी उसके जो मन मे आये वह गाने का अधिकार है. 



यूं तो महंमद रफी से लेकर कईं मुसलमान गायकों ने, इतनी पुरानी बातें छोड़िए , आजकल के गायकों ने भी हिंदू भक्तीगीत गाए हैं, तब तो कोई बवाल खडा नहीं हुआ, तो अब क्यों इसका उत्तर आप को अब तक संभवतः मिल गया होगा.  गुरमेहर मामले मे ठंडे किये गये मुख्यधारा माध्यक तथा सोशल मिडिया में लिबरल भाडे के टट्टूओं को गुरमेहर के नाम पर लगे धब्बे को धोने का अवसर चाहिये था, तो फिर वह क्या करते.  सारी दलीलें तो समाप्त हो चुकी थीं.  तो अचानक उनकी नजर एवं कान पडे सुहाना के गाए हुए हिंदू भक्ती संगीत पर.  

लिबरल गिरोह का मस्तिष्क टेढा ही चलने के कारण उन्होंने गुरमेहर की विषैले फल समान बात को, जो विष अब देश के कुछ विश्वविद्यालयों के कईं युवाओं मे फैल चुका है, उसे सुहाना के हिंदू भक्तीगीत गाने के अधिकार के समान स्तर पर लाकर खडा कर दिया, की देखो देशवासियों तुम वहां भी गलत थे यहां भी गलत हो.  दोनो ही विचारस्वातंत्र्य का ही हिस्सा हैं.  तो फिर काहे को सुहाना को गरिया रहे हो? क्या अधिकार है तुम्हें? हालाकि यह बात सुहाना को धमकाने वाले इस्लामी कट्टरपंथियों को कही गयी थी, परंतु इसका लक्ष्य गुरमेहर को विरोध करने वाले ही थे.  कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना.  

देखा आपने कैसे छल तथा चतुराई से दोनो लडकियों को एवं उनके विषयों को समक़क्ष लाकर खडा कर दिया गया?

और हां, अगर आप की सहानुभूति आयसिस के आतंकी सैफुल्ला के बाप से होकर सुहाना सईद की ओर बहने पर आमादा है, तो आप को इसका स्मरण करा दूं कि उसकी गायकी पैसे के लिये एवं कोई प्रतियोगिता मे विजयी होने हेतू है, कोई भगवान के प्रति श्रद्धा नहीं उमड पडी उसकी.

कुछ समझे?

© मंदार दिलीप जोशी
माघ शु. १३, शके १९३८


Saturday, March 4, 2017

गुरमेहर, समाज, और पालनपोषण

एक पुरानी आफ्रीकी कहावत है, "It takes a village to raise a child."

गुरमेहर बहुत छोटी थी जब इसके पिता काश्मीर मे आतंकवादियों के गोली का शिकार हुए. पेट्रोल पंप एवं मिली हुई बडी धनराशि से आय की समस्या तो हल हो गयी, परंतु पेट्रोल पंप संभालने का काम एवं घर की अन्य जिम्मेदारियों ने कदाचित इसकी मां को इस पर संस्कार करने का अवकाश नहीं दिया, और यह देशविघातक शक्तियों के लिये एक आसान सा लक्ष्य बन गयी.

अगर आपके आसपास ऐसा परिवार हो, तो उनके बच्चों की मित्रता अपने बच्चों से अवश्य करवाएं; ऐसे बच्चों को अपने घर खाने पर बुलाएं; उन्हे अपने साथ मंदिर, सिनेमा, अन्य सार्वजनिक एवं पारिवारिक कार्यक्रमों मे ले जाएं; उन्हे अच्छी किताबें भेंट करें; उनके मित्रपरिवार से परिचित हों; उनकी मां से, या अगर मां नहीं है और पिता हैं तो उनसे, बच्चों के भविष्य के विषय मे चर्चा करें; इत्यादि.

सहाय्यता केवल पैसों से नहीं की जाती.

और हां यह पहले होता था हमारी संस्कृति में, कोई आफ्रीका से आयात की हुई कल्पना नहीं है. आयात केवल कहावत है: It takes a village to raise a child.




 © मंदार दिलीप जोशी

Thursday, March 2, 2017

गुढी पाडव्याबाबतीत पसरवण्यात येणारा गैरसमज

शिवाजी महाराजांच्या जयंतीला तिथीनुसार आहे म्हणून विरोध करणारी बिग्रेड तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या हिंदूंच्या गुढीपाडव्याला मात्र विरोध करायचा म्हणून धर्मवीर संभाजी महाराजंच्या बलिदानाला तिथीनुसार स्वीकारते.

ज्या म्लेंच्छ औरंग्याने संभाजी महाराजांना इस्लाम धर्म स्वीकारत नाही म्हणून हालहाल करून ठार मारले त्या विषयी गप्प बसणारी ब्रिगेड "गुढीपाडव्याच्या आदल्यादिवशी संभाजी महाराजांना मारले म्हणून ब्राह्मणांनी आनंदासाठी गुढीपाडवा हा सन सुरु केला" अशी हिंदू समाजात फूट पडण्यासाठी सातत्याने दरवर्षी अफवा पसरवते.

आदर्शहीन समाजाला संपवणे सहज शक्य असल्याने हिंदूंच्या आदर्शांबद्दल गैरसमज पसरवून विश्वास नष्ट करणे या हेतूने भारत/हिंदू विरोधी शक्तींच्या पूर्ण अंकित असलेल्या संभाजी ब्रिगेडचा हा डाव आहे. गुढी पाडवा या सणाचा छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युशी संबंध जोडणे चुकीचे आहे त्याची कारणमिमांसा व त्या संदर्भातले पुरावे आपण पुढे पाहूच. हा सण कृषी संस्कृतीशी संबंधित असून  ‘गुढी’ हा शब्द याच मातीतला आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथामध्ये व मराठी भाषेतील साहित्यामध्ये  ‘गुढी’ हा शब्द इसवी सनाच्या १३व्या, १४व्या शतकापासून वापरला गेल्याचे आढळते.

संत चोखोबांनी एके ठिकाणी म्हटलेले आहे,

टाळी वाजवावी | गुढी उभारावी |
वाट हे चालावी । पंढरीची ।।

संत चोखोबांच्या अभंगातील चरण
(श्री सकल संतगाथा, खंड १ला, श्री संतवाङ्मय प्रकाशन मंदिर, पुणे; प्रकाशक-रमेश शंकर आवटे, प्र.आ.१९२३, दु.आ.१९६७, पृ.१२९)

संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून किमान पाच वेळा गुढ्या उभारण्याचा उल्लेख केला आहे.

श्रीकृष्णाच्या जन्मानंतर गोकुळात हर्षोल्हास पसरला आणि त्या आनंदाच्या भरात लोकांनी गुढ्या उभारल्या.

गोकुळीच्या सुखा | अंतपार नाही लेखा ॥
बाळकृष्ण नंदा घरीं | आनंदल्या नरनारी ॥

गुढिया तोरणे | करिती कथा गाती गाणे ॥ २८३९.१-४ ॥

संत तुकाराम महाराजांनीच आणखी एकदा म्हटलेले आहे,

रोमांच गुढियाडोलविती अंगें | भावबळें खेळविती सोंगें रे |
तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे | या विठोबाच्या अंगसंगें रे ॥ अ.क्र.१९२.५ ॥

कृष्णाने कालियामर्दन केल्यानंतर त्याच्या मित्रांना अतिशय आनंद झाला. त्यांच्यापैकी जो चपळ होता, त्याच्या हातात गुढी देऊन त्याला कृष्णाने आनंदाची बातमी देण्यासाठी पुढे पाठविले, हे नोंदविताना तुकारामांनी म्हटले आहे,

पुढ पाठविले गोविंदें गोपाळा । देउनि चपळा हातीं गुढी |।४५५३.२।।

आनंदाची ही बातमी गोकुळात पोचल्यानंतर तेथे काय घडले, ते सांगताना तुकाराम म्हणतात,

शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं । चेंडू वनमाळी घेउनि आले ॥
आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली गुढी हरुषें मात ॥ ४५५५.१,२ ।।

त्यानंतर कृष्ण गोकुळात आल्यावर तेथे किती आनंदाचे वातावरण होते, ते नोंदविताना तुकाराम म्हणतात,

नेणे वर्णधमर्जी आली समोरी | अवघी च हरी आळिंगिली ॥
हरि लोकपाळ आले नगरात | सकळांसहित मायबाप ॥
पारणे तयांचे जाले एका वेळे | देखिले सावळे परब्रह्म ॥
ब्रह्मानंदें लोक सकळ नाचती | गुढिया उभविती घरोघरीं ॥
घरोघरीं सुख आनंद सोहळा | सडे रंग माळा चौकदारी ॥ ४५५६.१-५ ॥

संत तुकाराम महाराजांचा मृत्यू इसवी सन १६५० मध्ये झाला. छत्रपती संभाजीराजांचा जन्म १६५७ मध्ये झाला. याचा अर्थ संभाजी महाराजांच्या जन्माच्या सुमारे ७ वर्षाआधी वैकुंठवासी झालेल्या संत तुकारामांचे सगळे अभंग इसवी सन १६५० पूर्वीच लिहीले गेले होते. म्हणून गुढी पाडव्याचा संभाजी महाराजांच्या मृत्युशी काहीही संबंध नाही.

आता संत ज्ञानेश्वर काय म्हणतात पाहू:

आइकैं संन्यासी तो चि योगी । ऐसी एकवाक्यतेची जगिं ।
गुढी उभिली अनेकीं । शास्त्रांतरी ।। ज्ञानेश्वरी ६.५२ ॥

‘स्मृतिस्थळ’ हा महानुभाव साहित्यामधील ग्रंथ सुमारे १४व्या शतकात लिहिला गेला आहे. या ग्रंथात ‘गुढी’ या शब्दाची ‘गुढ्या’ आणि ‘गुढेया’ ही रूपे पुढीलप्रमाणे आली आहेत:

१: आणि तुम्ही गुढ्यासरीसें यावे  (स्मृतिस्थळ ८३)
२: गुढेयासरिसें बैजोबा गाडेनिसिं निगाले  (स्मृतिस्थळ ८५)

 ‘शिशुपाळवध’ हा महानुभाव साहित्यातील एक महत्त्वाचा ग्रंथ होय. त्यामध्ये म्हटले आहे

घेत स्पर्शसुखाची गोडी श्रीकृष्ण आळिंगिला भुजादंडीं
तंव आत्मा उभितसे गुढी रोमांचमीसें ॥ शिशुपाळवध ६० ।।

राम आणि सीता यांचा विवाह झाल्यानंतर ते अयोध्येकडे निघाले असताना परशुराम आडवा आल्यानंतर राम आणि परशुराम यांच्यामध्ये झालेल्या संघर्षात रामाने परशुरामाचा पराभव केला. त्यानंतर दशरथांनी सर्व वर्‍हाडासह अयोध्येत प्रवेश केला. त्या वेळी अयोध्येतील प्रजेने ध्वज-पताका उभारल्याचे रामायणाने म्हटले आहे. ध्वज-पताका उभारल्या, म्हणजेच अयोध्येतील जनतेने आनंदाने गुढ्या उभारल्या, असा होतो.

उत्तर भारतात चांद्र मास पौर्णिमेला संपतात, म्हणजेच तिकडचे चांद्र मास पूर्णिमान्त असतात. दक्षिण भारतात चांद्र मास अमावस्येला संपून शुक्ल प्रतिपदेला नवीन महिना सुरू होतो. इसवी सन ७८ पासून ‘शके’ या कालगणनेचा जो प्रारंभ करण्यात आला आहे, त्या कालगणनेनुसार नव्या वर्षाची सुरवात चैत्र शुक्ल प्रतिपदेला होतो. सौर पद्धतीच्या कालगणनेनुसार वर्षाची नोंद करण्याच्या बाबतीत भारत सरकारने ‘शके’ या कालगणनेचाच स्वीकार केला आहे. या पद्धतीनुसार महाराष्ट्रात चैत्र शुक्ल प्रतिपदा हा चैत्र महिन्याचा प्रारंभ ठरतो. महाराष्ट्रातील निसर्गचक्राचा विचार करता चैत्र आणि वैशाख हे दोन महिने वसंत ॠतूचे मानले जातात. शिशिर ॠतूमध्ये पानगळ झालेल्या वृक्षांना चैत्रामध्ये वसंत ॠतूचे आगमन झाल्यानंतर नवीन पालवी फुटू लागते. या पालवीला ग्रामीण भागात ‘चैत्र-पालवी’ असे म्हटले जाते. याचा अर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदा हा दिवस वसंत ॠतूच्या आगमनाचा द्योतक आहे. तो चैत्र पालवीच्या आगमनाचा दिवस असल्यामुळे कृषिसंस्कृतीशी निगडित आहे. चैत्र महिना हा बारा महिन्यांपैकी पहिला महिना होय. स्वाभाविकच, चैत्र शुक्ल प्रतिपदा हा वर्षाचा पहिला दिवस ठरतो. ‘प्रतिपदा’ या शब्दाचेच पाडवा असे रूपांतर झाले आहे. त्यामुळे चैत्र शुक्ल पाडवा हा नववर्षाचा पहिला दिवस होय. म्हणून गुढी पाडवा हा सण नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती साजरा करावा व हिंदू संस्कृतीचे जतन करावे.

या दिवशी महाराष्ट्रात गुढीची पूजा केली जाते. तिच्या गळ्यात हार घातला जातो. हे पाहता या दिवशी गुढीचा अनादर केला जात नाही, तर तिच्याविषयी आत्यंतिक आदर व्यक्त केला जातो. गुढीसाठी स्त्रियांची वस्त्रे वापरणे, हा स्त्रियांचा अनादर असण्यापेक्षा मातृसत्ताक अथवा स्त्रीसत्ताक समाजपद्धतीमध्ये स्त्रियांना जे प्राधान्य दिले जात होते त्याचे द्योतक असल्याची शक्यता आहे. गुढीच्या टोकावर पालथे ठेवले जाणारे भांडे हे राणीच्या मस्तकावर ठेवल्या जाणार्‍या मुकुटाचे प्रतीक असू शकते.

गुढी पाडवा हा सण महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक, आंध्र, गोवा आणि गुजरात या राज्यांतूनही कोणत्या ना कोणत्या स्वरुपात साजरा केला जातो. चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी कडू लिंबाच्या पानांचा उपयोग कोणत्या ना कोणत्या प्रकारे करण्याची पद्धत महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र, गोवा आणि गुजरात या राज्यांमध्ये आढळते. या पानांचा थोडा का होईना रस चाखण्याची वा पिण्याची प्रथा या राज्यांमध्ये आहे. या दिवशी कच्च्या कैरीचे पन्हेही बनविले जाते. याचा अर्थ कडू आणि आंबट रस अनुभवले जातात. शिवाय गोड, तिखट, खारट आणि तुरट चवीचे पदार्थ भोजनात असतातच. याचा अर्थ, या दिवशी निसर्गाने निर्माण केलेल्या सर्व चावींचा आस्वाद घेतला जातो. मानवी जीवनातील सुख-दुःख वगैरे प्रकारच्या विविध अनुभवांना संतुलित वृत्तीने सामोरे जावे, असे वर्षाच्या पहिल्या दिवशी सुचविण्याचे कार्य विविध रसांच्या अनुभवांमुळे घडते, असे मानता येते.

वसंत ॠतुचे आगमन, कृषिजीवनाशी निकटचा संबंध, निसर्गाबरोबरचे नाते, नवीन वर्षाचा प्रारंभ इ. कारणांनी चैत्र शुक्ल प्रतिपदेचे स्वागत करण्यासाठी आनंदोत्सव साजरा करावा, या भावनेने गुढी पाडवा साजराकरण्याची कृषी परंपरा आहे. गुढी पाडवा साजरा करणे वा न करणे, ही बाब ऐच्छिक आहे. गुढी पाडवा साजरा करू इच्छिणार्‍यांना तसे करण्याचे स्वातंत्र्य आहे. तथापि, त्या दिवसाकडे इतर दिवसांपेक्षा वेगळा असाशुभ मुहूर्त म्हणून पाहण्याची आवश्यकता नाही. ज्यांना गुढी भगव्या पताकेच्या वा अन्य एखाद्या स्वरुपात उभी करण्याची इच्छा असेल, ते तसे करू शकतात.

आता काही शिवकालीन पुरावे पाहू:

१) शिवचरित्र साहित्य खंड १ या पुस्तकात पृ ५९ ते ६५ वर लेखांक ४१ म्हणून एक जुना महजर दिला आहे. महजर म्हणजे न्यायाधिशाचे अंतिम लिखित मत! हा महजर मार्गशीर्ष शुद्ध १ विरोधीनाम संवत्सर शके १५७१ अथवा सुहूर सन खमसेन अलफ म्हणजेच दि. २४ नोव्हेंबर १६४९ रोजीचा असून सदर महजरात “गुढीयाचा पाडवा” असा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणजे पाडव्याला गुढ्या उभारत असत हे स्पष्ट दिसते.

२) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २० (जुना खंड) या पुस्तकात पृ २३४ ते २३८ वर लेखांक १७६ म्हणून एक निवाडपत्र दिले आहे. सदर गृहस्थाला निवाड्यासाठी काही पुरावे म्हणून दाखवायला सांगितले असता त्याने दिलेल्या कागदपत्रातील संबंधीत मजकूर असा- “शके १५५२ मध्ये कार्तिक पौर्णिमा ग्रामस्थ कसबे वाई याणी ग्रहण काळी कडत जोसी क॥ (कसबे) मजकूर यास प्रतिवर्षी पासोडी येक व गहू व ‘गुढीयाचे पाडव्यास’ कुडव येक देऊ म्हणोन पत्र लेहूँ दिल्हे यास वर्षे तागायत १४८ होतात”. म्हणजे इ.स. १६३१-३२ मध्ये सुद्धा पाडव्याला गुढ्या उभारल्या जात असत हे येथे स्पष्ट होते.



३) श्री रामदासांची कविता खंड १ या पुस्तकात पृ ९६ वर समर्थ रामदासस्वामी श्रीराम रावणाचा वध करून पुन्हा महाराष्ट्रात आल्यावर महाराष्ट्रातील जनतेने ‘गुढ्या उभारल्या’ असे देतात- “ध्वजा त्या गुढ्या तोरणे उभविली ।”. अर्थात राम आल्यावर गुढ्या इत्यादी विषय बाजूला ठेवला तरी समर्थांची समाधी ही संभाजीराजांच्या मृत्युपूर्वी किमान ८ वर्षे असल्याने आणि त्याही पूर्वी समर्थांनी हे काव्य रचल्याने “गुढ्या” या महाराष्ट्राला नविन नव्हत्या हे दिसते.

४) शिवकालीन पत्रसारसंग्रह या पुस्तकात पृ ४७७ वर लेखांक १६२५ म्हणून एक नारायण शेणव्याचे मुंबईच्या गव्हर्नरला लिहीलेले चैत्र शुद्ध ८ शके १५९६ म्हणजेच दि. ४ एप्रिल १६७४ रोजीचे पत्र दिले आहे. यापत्रात नारायण शेणवी “निराजी पंडित पाडव्याकरीता आपल्या घरी आला” असा उल्लेख असून ऐन राज्याभिषेकाच्या दोन महिने आधी “पाडव्याचा सण” महत्वाचा होता असे दिसते.

एकूणच काय, हे सगळे स्पष्ट असताना आम्ही अजूनही अशा समाजात तेढ निर्माण करणार्‍या अफवांवर विश्वास ठेवायचा का? किमान सुज्ञ लोकांस तरी हे सांगणे न लगे!

केवळ जिज्ञासूंकरता:

चैतन्य/ऊर्जा प्राप्त करण्यास जगातील कोणत्याही संस्कृतीमध्ये जी प्रतीके निर्माण केली जातात त्या सगळ्यांत निमुळता भाग वर आणि रुंद भाग खालच्या दिशेला असतो. मंदिराचे कळस, पिरॅमिडस्, स्तूप इ. गुढी उभारताना तांब्या उलटा ठेवण्याचे कारणही हेच आहे.

मग मंगलकलश सरळ का ठेवतात? पुन्हा तेच कारण; कलशात नारळ ठेवला जातो. त्याचा टोकेरी/ निमुळता भागच वर असतो. शिवाय त्यात पाणीही असते. उलट्या तांब्यात पाणी भरता येत नाही हे सामान्य ज्ञान आहे!

विखारी असत्याला बळी न पडता पारंपरिक गुढीपाडवा साजरा करा!!

- मंदार दिलीप जोशी

संदर्भः
१. इतिहासाच्या पाऊलखुणा फेसबुक समूह (शिवराम कार्लेकर, कौस्तुभ कस्तुरे, इत्यादी)
२. अखिल भारतीय मराठा महासंघ (श्री. राजेंद्र कोंढरे, श्री. गुलाब गायकवाड, राष्ट्रीय सरचिटणीस जिल्हाध्यक्ष, पुणे)
३) डॉ परीक्षित शेवडे

Wednesday, March 1, 2017

वीरमाता - क्या घर घर से शिवाजी निकलेगा?

वीरमाता शब्द जब हम सुनते हैं, तो यहां महाराष्ट्र में हमें पहले तो शिवाजी महाराज की मां वीरमाता जीजाबाई का स्मरण होता है. लेकिन आजकल तो हमारी आकांक्षा घर में शिवाजी पैदा करने की तो रही नहीं. हम सोचते हैं कि शिवाजी पैदा तो हो, लेकिन वो मेरे पडोसी के घर पर हो तो अच्छा. हिंदू घर में बच्चे तो आजकल सिर्फ 'हम दो हमारे दो' के नारे हिसाब से चलते हैं. कईं घरों में तो 'हम दो हमारा एक' ही दिखाई देता है. आजकल तो वामींयों ने "हम औरत हैं तो क्या बच्चे जनना जरूरी है? नहीं चाहीये बच्चा!" यह गंदी सोच फैला रख्खी है. हम सोचते हैं जितने कम बच्चे हो उतना पालनपोषण अच्छा हो सकता है. अरे, थोडा भटक गये हम.

चलिये फिर शिवाजी की बात करते हैं. मुझे इस बात का पूरा यकीन है की अगर आज कहीं शिवाजी महाराज पैदा भी हो गये, तो उनको jingoist (युद्धखोर देशभक्त), हायपर नॅशनलिस्ट, और इस सूची मे ताजा दाखिल हुये  अपशब्द कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझम से निश्चित रूप से गरियाया जायेगा. तो बहनजी लेकिन शिवाजी नहीं तो ना सही, कमसे कम सिपाही तो पैदा कर ही सकती हैं ना आप?

आईये ऐसी ही एक वीरमाता की बात करते हैं जिसने एक नहीं, अपितु दो वीर सिपाहीयों को जन्म दिया. उनके पहले बेटे का नाम है......है नहीं, था...सौरभ. हाल ही में एक समारोह में उन्होने जो बातें कहीं वह तो हम सोच भी नहीं सकते.

२००३ के आसपास सेना मे दाखिल हुए सौरभ नंदकुमार फराटे १७ दिसंबर २०१६ को काश्मीर के पुलवामा जिले में आतंकवादीयों ने सेना के दल पर किये हमले में हुतात्मा हो गये. अपने परिवारसमेत दो महिनों की छुट्टी बिताकर और इस छुट्टी में अपने दोन जुडवा बेटीयों का जन्मदिन मनाकर फिर सेना में अपने नियुक्तिस्थान पर अक्तुबर में लौटे सौरभ की मृत्यू की खबर मिलते ही उसके परिवार तथा पूरे गांव मे दु:ख के घने बादल छा गये.

सकारात्मक खबरें देने वाले एक वेबसाईट भारतीयन्स डॉट कॉम का हाल ही मे एक अ‍ॅप निकला है. उसके उद्घाटन समारोह मे बात करते हुए सौरभ की मां ने कहा, कि अगर सब ऐसा सोचने लगे कि मेरा बेटा इंजिनिअर बनेगा, मेरा बेटा डॉक्टर बनेगा तो फिर अपने देश की रक्षा के लिये कौन जायेगा? अपना बेटा देश के लिये खोया है तो क्या हुआ, मेरा दूसरा बेटा भी सेना में ही जायेगा. [यह बात ध्यान देने लायक है कि उनका दूसरा बेटा भी उसी जगह नियुक्त है जिस जगह सौरभ की नियुक्ती हुई थी.] और यदि मुझे अवसर मिला, तो मेरा यह ३ वर्ष की आयु का पोता जो है, उसे मैं सेना मे दाखिल करवाउंगी.

सेना में दाखिल दो बेटों में से एक का हुतात्मा हो जाना, दूसरे बेटे का भी उसी स्थान पर नियुक्ती होना जहां उसके भाई की नियुक्ती हुई थी, और यह कहना की अवसर मिलते ही पोते को भी सेना में देश के लिये लडने के लिये भेजूंगी, यह कोई साधारण बात नहीं है. हम में से कोई इतना ऊँचा सोच भी नहीं सकता जितनी ऊँचा  सौरभ की माता की सोच है.

यह पढनेवाले लोगों में से कईं ऐसी होंगी जिनका अभी तक विवाह नहीं हुआ, या नयी नवेली दुल्हन है, या विवाह के पश्चात ज्यादा समय नहीं बीता है, या ऐसी भी होंगी जिनके बच्चे अभी तक स्कूल में पढ रहें है. और कुछ ऐसी भी होंगी जिनके परिवार और परिजनों में ऐये आयुगट की महिलाये होंगी. मै आपसे विनती करुंगा की आप इस विषय में सोचें और ऐसी महिलाओं को भी इस विषय में सोचने की विनती करें. अगर दूरस्थ गांव मे रहने वाले लोगों में पुलीस, सेना, एवं ऐसे ही सुरक्षा दलों मे दाखिल होने को लेकर ऐसी जागरूकता है, तो हम शहर वाले लोग जो अपने आप को ज्यादा परिपक्व समझेते हैं, क्यों नही सेना मे दाखिल होना एक विकल्प बना लेते हमारे बच्चों के लिये?

और हां, मुझे यह ज्ञात है कि केवल सेना में जाना ही देशभक्ति का प्रमाण नहीं है, परंतु यह एक महत्वपूर्ण संस्था है जिसमें अपना योगदान देने के लिये हर नागरिक को सोचना चाहीये.

इससे पहले कि कोई यह पूछे कि भाईसाहब आप अपने बेटे को सेना मे भेजेंगे? तो उसका उत्तर है - हां. मेरा बेटा ४ साल कि आयु से ही सेना मे जाने की इच्छा रखता है, और आज वह ६.५ साल का है और उसका निर्णय बदला नहीं है. हां मृत्यू की उसे बुनियादी जानकारी है, जितनी एक ६-७ साल के बच्चे को होती है. लेकिन फिर भी उसने सेना में जाने के अपने लक्ष्य को छोडा नहीं है. अगर उसने बडा होकर उसकी इच्छा किसी कारणवश बदल गयी, तो हम उसमें दखल अंदाजी नहीं करेंगे. परंतु अगर उसने बडा होने पर यह कहा की मुझे सेना में ही अपना करिअर बनाना है, तो न मैं तो उसे रोकूंगा न उसकी मां, अपितु हम दोनो उसे प्रोत्साहित ही करेंगे. हां अगर बेटी जाना चाहे तो भी.

तो आप सोचिये, आप कैसी माता बनना पसंद करेंगी. "बेटा, बाहर मत खेलो कहीं लग गया तो, ये लो मोबाईल और व्हिडिओ गेम खेलो" ये वाली मां, या खेलकर आये बच्चे के जख्मों पर दवा लगाते हुएं उसके जुझारू वृत्ती का गौरव करने वाली माता बनेंगी?

आरंभ मे एक प्रश्न पूछा था आप से. घर घर से शिवाजी न निकले तो न सही, परंतु सैनिक तो पैदा कर ही सकती हैं ना आप? चलिये कम से कम सोचना तो शुरु किजीये!!

© मंदार दिलीप जोशी

Tuesday, February 14, 2017

भगवान राम, इमाम-ए-हिंद, आणि बुद्धीभेद

जसा जसा राम मंदिराच्या भूमिपूजनाचा दिवस जवळ येत चालला आहे तसं तसं तथाकथित रामभक्त मुस्लिमांनी बुद्धीभेद सुरु केला आहे आणि त्यांनी रामाला इमाम-ए-हिंद म्हणायला पुन्हा सुरवात केली आहे. हिंदू म्हणून आपण नक्की कसल्या न्यूनगंडाखाली जगतो कुणास ठाऊक. कारण एखादी व्यक्ती किंवा एखाद्या समूहाला जेव्हा न्यूनगंडाने ग्रासलेलं असतं तेव्हा तो सतत इतरांच्या कौतुकासाठी आसुसलेला असतो आणि एखाद्या बाबतीत कौतुक वाटावं असा संशय जरी आला तरी तो प्रचंड हुरळून जातो.

काही मुस्लीम म्हणतात की ते सुद्धा कुराणात सांगितल्याप्रमाणे श्री राम, कृष्ण, किंवा भगवान शंकराला प्रेषित मानतात. या तिघांना उद्देशून म्लेंच्छगण 'नबी' हा शब्द वापरतात. आणि रामाला इमाम-ए-हिंद म्हणतात हे ही काही जणांकडून ऐकलेलं आहे. हे ऐकलं की आपल्यातले १०० पैकी ९९ लोक हुरळून जातात. खरं तर हे प्रचंड अपमानास्पद आहे आणि आपल्या देवांचा आणि अवतारी पुरुषांचा अपमान केला जातो आहे हे आपल्याला दुर्दैवाने कळतही नाही. या लबाडीला आपण फसण्याचं मुख्य कारण असं की बहुसंख्य हिंदूंना इस्लाम एकेश्वरवादी (खरं तर एकोपास्यवादी, पण या शब्दच्छलाबद्दल पुन्हा केव्हातरी) असून त्यांच्या देवाचं नाव अल्लाह आहे आणि मोहम्मद हा त्याचा शेवटचा प्रेषित आहे, या पलिकडे फारशी माहिती नसते. त्यामुळे ते जेव्हा या तिघांना नबी म्हणतात तेव्हा ते आपल्याकरता भूषणावह नसून अपमानास्पद आहे हे त्यांना पक्कं ठाऊक असतं.

भगवान राम आणि कृष्ण आणि भगवान शंकर हे प्रेषित म्हणण्यातली गोम लक्षात घ्या. एकदा या तिघांना अल्लाहचा प्रेषित म्हटलं की ते अल्लाहपेक्षा दुय्यम दर्जाचे ठरतात. हे मान्य आहे का तुम्हाला? राम व कृष्ण हे विष्णूचा अवतार आहेत असं आपण मानतो. भगवान शंकर हे तर प्रत्यक्ष देव. मग हे तिघे अल्लाहचे प्रेषित, त्याने पृथ्वीवर पाठवलेले, त्याच्याहून दुय्यम दर्जाचे?

आता दुसरा मुद्दा. इस्लाममध्ये अल्लाह ज्या व्यक्ती मार्फत मौखिक संदेश (व्हॉईस मेसेज) देतो त्याला नबी म्हणतात; तर अल्लाह ज्याला आपला संदेश पुस्तकरूपात किंवा लिखित स्वरूपात सुपूर्द करतो त्याला रसूल म्हणतात (Quran was "revealed" to Mohammed by Allah). दुसर्‍या शब्दात, रसूल हा नबी सुद्धा असतो, पण प्रत्येक नबी हा रसूल असू शकत नाही आणि तो रसूलपेक्षा खालच्या दर्जाचा संदेशवाहक असतो कारण रसूलकडे अल्लाहने पुस्तकरूपात दिलेला त्याचा संदेश असतो, जो नबीकडे नसतो. महंमदाच्या आधी अनेक नबी होऊन गेले, पण महंमद हा शेवटचा नबी आणि रसूल होय आणि म्हणून तो या सगळ्यांत श्रेष्ठ असल्याचं इस्लाम मानतो. अल्लाहने कुराण नामक पुस्तकरूपाने दिलेल्या संदेशाला लोकांपर्यंत पोहोचवणारा महंमद असल्याने त्याला रसूल ही पदवी प्राप्त आहे. म्हणजे भगवान राम आणि कृष्ण व भगवान शंकर हे तिघं नबी, आणि महंमद मात्र रसूल. आणि जेव्हा ते रामाला इमाम-ए-हिंद म्हणतात तेव्हा ते त्याला आणखी खाली आणत असतात, म्हणजे प्रेषिताहून खाली. थोडक्यात, या देशातल्या सगळ्या इमामांचा मुख्य इमाम. येतंय लक्षात?

थोडक्यात, भगवान राम आणि कृष्ण व भगवान शंकर या तिघांना नबी असं संबोधून फक्त अल्लाहपेक्षाच नव्हे तर महंमद हा रसूल असल्यानं त्याच्याहीपेक्षा कमी दर्जाचे असल्याचं हिंदूंना तोंडावर अपमानित केलं जातं पण आपल्याला ते समजत नाही.

असो. रसूल असो की नबी, तो अल्लाहने निवडलेला एक सामान्य मनुष्य असतो. हिंदू धर्मात 'अवतार' हा सामान्य माणूस नव्हे. अवतार याचा अर्थ देवाचा अवतार, दैवी अंश असलेला मनुष्य. या अर्थाने श्री राम व श्रीकृष्ण हे दैवी अंश असलेले महापुरुष ठरतात. आणि भगवान शंकर तर प्रत्यक्ष देवच आहेत. मग या तिघांना नबी असं संबोधून सामान्य मनुष्याच्या पातळीवर आणण्याचं प्रयोजन?

तेव्हा एखादा मुस्लिम तुम्हाला कधी असं म्हणला की श्री राम, श्रीकृष्ण आणि भगवान शंकर हे नबी आहेत, तर त्यांना अज्ञानी समजण्याची चूक करु नका. ते अज्ञानी किंवा भोळे नाहीत. ते मुद्दामून या तिघांना नबी असं संबोधून त्यांना अल्लाह आणि महंमद या दोघांच्या पायाशी आणून ठेवण्याचं कृत्य करत आहेत हे जाणून त्याचा तिथल्या तिथे जबरदस्त विरोध करा. यावर "तुमच्या देवतांचा सन्मानच करतो आहोत ना आम्ही" असं उत्तर येऊ शकतं. त्याला "गरज नाही, आमचे देव आणि त्यांचे अवतार यांचा तुम्ही सन्मान करावा इतकी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही" असं सांगा.

अशा प्रकारे आपल्या दैवतांना कमी लेखण्याचा कुणालाही अधिकार नाही. त्यांना ठणकावून सांगा की मग आम्ही सुद्धा तुमच्या श्रद्धेवर शंका घेऊ शकतो, आणि विश्वास ठेवा म्लेंच्छधर्मात अशी अगणित ठिकाणं आहेत जिथे आपण त्यांना खिंडीत गाठून अडचणीत आणणारे प्रश्न विचारू शकतो. तेव्हा त्यांनी असली बकवास करायला सुरवात केली तर हिंदूंकडून 'आमच्या श्रद्धेची टिंगल करायची असेल तर आम्हीही कित्येक पटीनी आणि संपूर्ण तार्किक दृष्ट्या हे तुमच्या श्रद्धांच्या बाबतीतही करु' आणि 'चुकूनही श्री राम आणि श्रीकृष्ण व भगवान शंकर यांना नबी म्हणण्याची हिंमत करु नका' हे संदेश  स्पष्टपणे त्यांना जाणं आवश्यक आहे.

लक्षात घ्या, एकदा का आपण श्री राम, श्रीकृष्ण, आणि भगवान शंकर यांना नबी किंवा इमाम-ए-हिंद म्हटल्यावर आनंदाने माना डोलवायला सुरवात केली, की मुल्लाला दिली ओसरी आणि मुल्ला हातपाय पसरी असं होतं अणि आपले अनेक देव, प्रथा, उत्सव हे 'त्यांचे' कधी होतात कळत नाही. शिवाय या तिघांना आपण अल्लाह आणि महंमदापेक्षा दुय्यम दर्जाचे मानायला परवानगी देतो ते वेगळंच. इस्लाम हा एक अविरतरित्या आक्रमक असणारा धर्म आहे तेव्हा आपले देवीदेवता, श्रद्धा, प्रथा, उत्सव यांच्या बाबतीत भाष्य करण्याचं म्लेंछांना काहीही अधिकार नाही आणि आपल्या दैवी पुरुषांचं नबीकरण आणि इमामीकरण करुन ते फक्त आणि फक्त सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करत आहेत हे त्यांच्यापर्यंत अत्यंत थेटपणे आणि त्यांच्यापेक्षा अधिक सातत्याने व तीव्रतेने पोहोचायला हवं.

 


© मंदार दिलीप जोशी
माघ कृ. ४, शके १९३८
अंगारक संकष्ट चतुर्थी

संपादितः श्रावण शु, दशमी, शके १९४२