तर मेहेरबान, ऑस्करचे कदरदान, आणि ईमोशनल साहिबान,
थोडक्यात पार्श्वभूमी अशी की ऑस्कर सोहळ्यात क्रिस रॉकने विल स्मिथच्या बायकोच्या केसांवरुन एक विनोद केला आणि मग विल स्मिथने स्टेजवर जाऊन क्रिसला ठोसा मारला. हे झाल्या झाल्या अखिल सेंटीमेंटल जगताला पान्हा फुटला आणि या गोष्टींवर चर्चा लगेचच सुरु झाल्या: (१) विल स्मिथभोवती बायकोच्या सन्मान रक्षणार्थ दिवे ओवाळणे [बघा शिका काहीतरी असे टोमणे बोनस म्हणून] (२) कशावरही विनोद करता काय, मग अस्संच पाहीजे बरी अद्दल घडली छाप पोस्ट आणि ट्विट (३) मिसेस स्मिथ यांना असलेला आणि केस गळण्यासाठी/कापण्यासाठी कारणीभूत ठरलेला अॅलोपेसिया एरेटा नामक रोग.
ज्यांना स्त्री सन्मान वगैरे वगैरे वरुन फार पुळका आलेला होता त्यांच्यासाठी प्रामुख्याने ही पोस्ट आहे, आणि इतरांसाठीही. इथे मी मिस्टर व मिसेस स्मिथ यांचे खाजगी आयुष्य, त्यांचे लग्न, लफडी यात अजिबात जात नाहीये. काही संवेदनशील भावनिक मुद्दे (Emotional trigger points) असतात. त्यात 'स्त्रियांचा सन्मान' म्हटलं की खेळण्याला चावी दिल्यागत सगळ्यांचे व्हर्च्युअल अश्रू वाहायला लागतात तसे ते इथेही वाहू लागले. म्हणूनच म्हणतो, विल स्मिथने हे बायकोच्या सन्मानाच्या रक्षणासाठी उत्स्फूर्तपणे केलं आणि सगळं खरोखरच घडलं असं मनापासून वाटणाऱ्यांना साष्टांग दंडवत आहे. दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ.
गेली अनेक वर्ष ऑस्कर सोहळा हा गोरे विरुद्ध काळे, मग ट्रम्प विरुद्ध बाकी सगळे या Wokeपणा आणि भंपकपणाने ओसंडून वाहत असल्याने तो सोहळा बघणं सोडून कित्येक वर्ष झाली. म्हणूनच ऑस्कर सोहळा कधी आहे वगैरे माझ्या गावीही नसतं तसं यंदाही नव्हतं. या वर्षी ठोसा कांड झाल्याने विलने क्रिसला मारलेल्या ठोशाचे फोटो आणि त्यावरच्या भावनिक भाष्याने ओथंबून वाहणार्या पोस्ट सगळीकडे दिसू लागल्याने सगळे कळलं की आज ऑस्कर सोहळा आहे म्हणजे तेव्हा, २७ मार्चला होता. मात्र सिनेक्षेत्राचा नीचपणा ठावूक असल्याने आणि अशा गोष्टींच्या बाबतीत 'लॉजिकल' विचार करायला शिकल्याने हा स्टंट आहे हे लगेच लक्षात आलं होतं पण कारण हे ऑस्करची घटती लोकप्रियता असावं असं आधी वाटलं. नंतर एकाने आणखी एक कारण सांगितलं आणि ते जास्त संयुक्तिक वाटलं. आज तर त्याचे पुरावेच मिळाले. कारण कोणतं ते सोबतच्या चित्रांतून दिसेलच, त्यामुळे वेगळं सांगायला नको.
क्रिस रॉकला ठोसा मारल्यावर कळवळायच्या ऐवजी तो अजिबात न बिचकता पुढे डायलॉगबाजी पण करतो (याला लोकांनी अभिनय म्हटलं, पण खरा ठोसा खाल्ल्यावर काय होतं ते अमिताभ बच्चनला जाऊन विचारा), त्यामुळे खरं तर सिनेमा ऐवजी याच सीनला ऑस्कर द्यायला हवा होता.
तर मेहेरबान, ऑस्करचे कदरदान, आणि ईमोशनल साहिबान पेश है अनेकांच्या फुग्याला टाचणी. यातल्या दोन लिंक म्हणजे फायझरची स्वतःची त्यांच्याच संकेतस्थळावरची प्रेस रिलीज आहे आणि दुसरी एक ट्विट आहे.
पुन्हा ठळक मुद्दे देतो:
(१) फायझर ट्रायल घेत असलेले एक औषध अॅलोपेसिया एरेटाच्या औषधोपचारांसाठी असणे
(२) फायझर ऑस्करच्या स्पॉन्सर्स पैकी एक असणे
(३) क्रिस रॉकने विल स्मिथच्या बायकोच्या केसांवरुन एक अप्रत्यक्ष विनोद करणे
(४) मग विल स्मिथने क्रिसला ठोसा मारणे (क्रिस अजिबात न कळवळणे वगैरे पुनरुक्ती करत नाही)
(५) नेमकं विल स्मिथच्या बायकोला अॅलोपेसिया एरेटा असणे आणि त्यावर समाजमध्यमांवर भावनिक पूर येणे
© मंदार दिलीप जोशी
फाल्गुन शु. चतुर्दशी, शके १९४३
ता.क. कुठल्याही रोगाचा अशा रीतीने जाहीर वापर करुन घेणार्या हॉलीवूड आणि फायझरसकट सर्व संबंधितांना माझा सविनय आक् थू!