आदरणीय वंदनीय माननीय विवेकवादी अंधश्रद्धानि
कोपरापासून नमस्कार.
लोकसत्ता घ्यायचे बंद केल्यापासून आणि ते तुम्हाला कारणांसहित कळवल्यापासून एका वर्षाच्या आत तुम्हाला पुन्हा पत्र लिहायची वेळ येईल असे वाटले नव्हते. पण तुम्ही तुमच्या असामान्य लेखनप्रतिभेने अप्रतीम संपादकीय अग्रलेख लिहून तुमच्याशी संवाद साधायला भाग पाडलेत त्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुमचा हा लेख फॉरवर्ड मधून आला तेव्हा आधी तुमच्याच वृत्तपत्रात विनोदी सदर लिहीणार्या तंबी दुराई सदृश्य कुणीतरी लिहीला आहे असा आधी समज झाला होता, पण तो अखेर गैरसमज ठरला. या लेखाबद्दल तुमचा तीव्र निषेध.
फाशीबाबत, देहांत शासनाबाबत मतभेद असल्यास गैर नाही. मात्र त्याच्या नावाखाली एका देशद्रोह्याचे, दहशतवाद्याचे किती उदात्तीकरण करायचे? सारासार विचार करण्याच्या नावाखाली सामान्य जनतेचा बुद्धीभ्रम करण्याचा किती प्रयत्न करायचा? आपण लेखाच्या सुरवातीला म्हणता, याकुब मेमन माफीचा साक्षीदार ठरला, आणि अपराधी देखील. हे साफ चूक आहे. तो माफीचा साक्षीदार कधीही नव्हता, आणि तो शरणही आला नाही. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्याने आणि त्याच्या कुटुंबियां
मग त्या कटातला पाकिस्तानचा सहभाग उघड करावा या अटीवर त्याला भारत सरकारने माफीचा साक्षीदार करण्याचा करार केला हे कुठल्या आधारावर लिहीता? मुळात भारतात होत असलेल्या घातपाती कारवायात आणि दहशतवादी घटनात पाकिस्तानचा सहभाग आहे हे तो पर्यंत अनेको वेळा सिद्ध झालेले असताना आणि अगदी १९९३ बाँबस्फोटांचा तपास करतानाही अन्य मार्गाने निदर्शनास आलेले असताना आपण पाकिस्तानचे नक्की काय वाकडे केले जे याकुबच्या खुलाशाने करु शकणार होतो? मग ज्यातून पुढे काहीही कारवाई करता येणार नाही आणि मिळाली तरी जिची विश्वासार्हता संशयास्
वादासाठी आपण गृहित धरू की सरकारने त्याच्याशी काही गुप्त करार केला होता. तुम्हाला एक बाळबोध उदाहरण देतो. माझ्या घरात एक उंदीर धुमाकूळ घालतो आहे. मी त्याला पकडायला आत बुंदीचा लाडू ठेऊन एक पिंजरा लावतो. तो त्या पिंजर्यात फसतो. आता तुम्ही मला सांगा, निव्वळ विध्वंसक अशी ओळख असलेल्या उंदराला मी मारून टाकावे की त्याला प्रेमाने मांडीवर घेऊन प्रेमाने तो लाडू खायला द्यावा आणि मग सोडून द्यावे?
पुढे तुम्ही तोडलेले तारे तुम्हाला कदाचित पुढचा मेगासेसे किंवा गेला बाजार बुकर पुरस्कारही देऊन जातील. "मेमन कुटुंबीय मूळचे गुजरातेतले आणि आद्य व्यवसाय चांदीची तस्करी". मेमन कुटुंबीयांच्या या स्मगलिंगच्या धंद्याबाबत हे वाक्य तुम्ही इतक्या सहजपणे लिहून जाता, की वाचणार्यांचा समज व्हावा की चांदीची तस्करी म्हणजे एखाद्याचे रस्त्यालगत असलेले सायकलचे पंक्चर काढायचे अनधिकृत दुकान असावे किंवा रेल्वेत सीटखाली सापडलेली
तुम्ही म्हणता की एका अशक्त व्यवस्थेने दुसर्या अशक्ताचा बळी घेतला. खालच्या दोन कोर्टात चाललेले खटले, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, मग याकुबने दाखल केलेले क्युरेटीव्ह पेटीशन, राष्ट्रपतींकडे केलेले दयेचे
हाच अशक्त याकुब एक धंदेवाईक चार्टर्ड अकाउंटंट होता. म्हणजेच तुमच्या भाषेत सनदी लेखपाल होता. ही परीक्षा किती कठीण असते हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. सनदी लेखपाल म्हणजे अशिक्षित, अडाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी नव्हे. इतका हुशार असलेल्या हा अशक्त याकुबला आपण ज्याच्या "चोरट्या" धंद्यांचे पैसे फिरवतो आहोत, लेखापरिक्षण
पुढचा भाग अधिक मनोरंजक आहे. टायगरचे दहशतवादी धंदे जर त्याच्या कुटुंबियांस माहित नव्हते, तर त्याचे वडील पाकिस्तानात आय.एस.आय.च्या कचाट्यात काय फिरत फिरत चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गेले की सहज पर्यटनाला गेले असताना ते आय.एस.आय ने त्यांना कचाट्यात पकडले? म्हणे, 'बाँबस्फोट चौकशीत टायगरचा हात असल्याचे उघड झाले तेव्हा पाकिस्तानात आय.एस.आय.च्या कचाट्यात असलेल्या त्याच्या वडिलांनी कुटुबाच्या देखत त्याला चोपले'. आईआईगं. हे वाचून माझे ड्वाले पाणावले हो. कुणीतरी म्हटल्याप्रमाणे भारतात शामच्या आईनंतर थेट टायगरचे बाबाच.
आपण टायगरला पकडू शकत नाही, दाऊदला लटकावू शकत नाही याचा अर्थ आपण हातात सापडलेल्या याकुबला सोडून द्यायला हवा होता? जिथे निर्विवादपणे पाकिस्तानातून आलेल्या दहशतवादी कसाबविषयी देखील अनेकांना माणूसकीचे उमाळे येतात, त्या आपल्या भारत देशात सापडलाय तर "लटकावून टाका फासावर" इतकं सोपं आहे?
आपल्या या अचाट आणि अतर्क्य संपादकीयात आपण याकुबच्या धर्माचा उल्लेख करुन तुम्ही योग्य तो खोडसाळपणा केलेला आहेच. भारतात आतापर्यंत फाशी दिलेल्या कैद्यांपैकी किती जण मुसलमान होते ते तपासून बघणार का जरा? त्यातच संजय दत्तचाही उल्लेख करुन तुम्ही तुमचा अजेंडा स्पष्ट केलेला आहे आणि त्या तूलनेत याकुबचा गुन्हा
आणखी एक. बॉम्बस्फोटात मेलेल्या २५७ निरपराध नागरिक आणि शेकडो जखमींची चौकशी करा जरा. आमचा उन्माद जाऊद्या हो, किमान चाळीसहून अधिक शस्त्रक्रिया झालेल्या आणि अजूनही काचा अंगात असलेल्या, आणि ते कमी म्हणून की
गिरीश कुबेर साहेब, मी मूळचा इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी. इयत्ता दुसरीत मराठी वाचायला शिकलो तेव्हापासून लोकसत्ता वाचतो आहे. मला मराठी वाचनाची गोडी निर्माण होण्यामागे लोकसत्ताचे नियमित वाचन हे आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. सातेक वर्षांपूर्वी पुण्यात स्थलांतरित झालो तेव्हा सुरवातीला पेपरच घेत नव्हतो. मुलं शाळेत जाऊ लागली म्हणून त्यांना चांगलं मराठी वाचायला मिळेल या आशेने पावरफुल आणि पवारफुल सकाळ न घेता लोकसत्ता घेणे पसंत केले कारण लोकसत्तावरचे प्रेम आणि श्रद्धा.....हो श्रद्धा. ती एक मोठी अंधश्रद्धा होती हे आपण मागेच सिद्ध केले होतेत, आणि आज हे संपादकीय लिहून तेव्हाचा लोकसत्ता घेणे बंद करण्याचा माझा निर्णय किती योग्य होता हे तुम्ही मला दाखवूनच दिलेत.
माधव गडकरी लोकसत्ताच्या संपादकपदावर होते तो पर्यंत लोकसत्ता हे एक वाचनीय वर्तमानपत्र होता. नंतर त्याला उतरती कळा लागली. अरुण टीकेकर, कुमार केतकर यांनी यथास्थित गरळ ओकून झाल्यावर आता तुम्ही लोकसत्ताला ढगात पाठवण्याच्या कामी कुठलीही कसर सोडलेली दिसत नाही. लोकसत्ताचे हल्लीचे लिखाण प्रचंड एकांगी होत चालले आहे. कुणीही काहीही बोलले, किंवा एखादा विषय मांडला, किंवा काही घटना घडली की लगेच त्यावर इयत्ता तिसरी ड च्या उत्साहात बातमी छापलीच पाहीजे असा पायंडा अलिकडे लोकसत्तात पडला होता, त्या बालीश गरळोओकीत नंतर मोदी सरकार आल्याने नवा जोम आला. एखाद्या घटनेशी, गोष्टीशी, किंवा केलेल्या विधानाशी संबंधित असलेल्या आणि असू शकणार्या असंख्य गोष्टींचा एकत्रितपणे विचार आणि अभ्यास करुन अन्वयार्थ काढायचा व मगच अग्रलेख लिहायचा असतो किंवा बातमी द्यायची असते हे लोकसत्ताच्या गावीही उरलेले नाही. तोच वारसा आपण समर्थपणे पुढे चालवत आहात हे पाहून संतोष जाहला. कुठलेही वर्तमानपत्र किंवा अंक हा एकांगी असेल आणि त्याचा गाभा हा द्वेषमूलक असेल तर तो फार काळ दर्जा आणि लोकप्रियता आणि पर्यायाने खपही टिकवून ठेवू शकत नाही.
तेव्हा संपादक गिरीश कुबेरमहाशय, पेपर चालवताय तर बातम्या देण्याचे काम करा. देशाच्या न्यायव्यवस्थेचा आणि न्यायालयांचा आदर करायला शिका. उगाच समाजाला मार्ग दाखवण्याच्या नावाखाली शाब्दिक कोलांट्याउड्या मारण्
नाही.
पुन्हा एकदा, या संपादकीयाबद्दल लोकसत्ता व तुमचा तीव्र निषेध.
आपला नम्र
मंदार दिलीप जोशी
जालनिशी | फेसबुक
ता.क. मी लोकसत्ता का बंद केला ते सांगणारे जुने विपत्र
http://mandarvichar.blogspot.