Wednesday, November 11, 2015

वागळेची दिवाळी

रोज खाई थोतरीत
नाम त्याचे वागळे
मारणारा एक जोशी
काम मोठे आगळे

दिवाळीतले फटाके
दे दणादण वाजती
घालुनी कानात बोटे
वागळेद्वय बैसती

वसुबारस पुजतो
गाय माता आमची
बीफ मी खातो चवीने
बरळला तो वागळे

वध नरकासुराचा
कृष्णहस्ते जाहला
आजही नथ्थुरामात
वागळे तो अडकला

लक्ष्मी पुजून मात्र आज
पैसा त्याने मोजला
 नवा काढलेला
चालवावया बैसला

ओवाळती भाऊराया
भगिनी प्रेमळ आमच्या
ठेऊन सणवारा नावे
एकटा तो बैसला

नोकरी तयाला पण
तरीही आज मिळेना
ओकायला गरळ रोज
माईक काही फळेना

© मंदार दिलीप जोशी
कार्तिक शुक्ल १, शके १९३७

Saturday, October 31, 2015

हाक

हाकेसरशी धावून येणं
सदैव पाठीशी असणं
काहीच पुरेसं नव्हतं
मान्य

तुझ्या आर्त मूक हाका
ऐकू आल्या नाहीत
खोट्या हास्यामागचं
वेदनांनी होरपळलेलं मन
दिसू शकलं नाही
मान्य

तरीही इतकं सारं बिघडण्याआधी
स्वतःहून साद घालणं
फार कठीण होतं का?

---------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

अश्विन कृ. ५, शालीवाहन शके १९३७
---------------------------------------------




Monday, October 19, 2015

रावणाचे वकील अर्थात डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट

दोन दिवस झाले फेसबुकवर एक छोटीशी हिंदी कविता फिरते आहे:

मैने महसूस किया है
उस रावण का दु:ख

जो सामने खडी भीड से
बारबार पूछ रहा था...

"सच सच बताओ तुम में से कोई राम है क्या?"

उपरोक्त कविता वर वर फार साधीसुधी वाटत असली तरी फार साळसूदपणे लिहीली गेली आहे. मग त्या कवितेला उत्तर म्हणून हिंदीतच एक कविता लिहीली. अधिक हिंदी लिखाण करण्याचा मानस नाही. मात्र उत्स्फूर्तपणे सुचलेले उत्तर लिहीण्याचा मोह आवरला नाही. हे ते उत्तरः

शायद वो लेकिन भूल गया
जब हर दहलीज पे रावण है

क्यों रामावतार की राह तकें?
जब हर नर मे नारायण है

क्यों रावण से बातें कहलवाकर
अपनीं ही रोटीं सेंकते हो

बतलाओ तुम कम से कम
कितने में बिक जाते हो

आज अयोध्या की गलींयों में
घुस आयें लंकावासी हैं

रावण की पैरवी करवाने
उनसे ही ये अलफाज लिखायें हैं