Wednesday, January 31, 2018

देशाची ७३% संपत्ती १% जनतेच्या हातात - ऑक्सफॅमचा अहवाल आणि आपण

देशाची ७३% संपत्ती १% जनतेच्या हातात अशा शीर्षकाचा एक अहवाल ऑक्सफॅम (Oxfam) नामक अनेक संस्थांचे कडबोळे असलेल्या संस्थेतर्फे प्रकाशित झाल्याचे वृत्त देशातील प्रमुख वृत्तपत्रांनी तसेच बातम्यांच्या वाहिन्यांनी प्रसारित केल्याचे सगळ्यांना आठवत असेलच.

बातमीचे शीर्षक आणि अहवालाचा निष्कर्ष पाहिल्यावरच काहीतरी काळबेरं असल्याचा संशय आला होता, पण वेळ मिळताच थोडं खोलात जाऊन बघू म्हणून तेव्हा काही प्रतिक्रिया दिली नव्हती. या संबंधात थोडं वाचन केल्यावर एक मात्र नक्की समजलं की कुठल्याही आंतरराष्ट्रीय संस्थेने फार भारताचं कौतुक केल्यावर हुरळून जाऊ नये, आणि टीका केल्यावर रागही मानू नये. कारण हे अहवाल ९९% वेळा वेगवेगळ्या हितसंबंधांवर आधारित असतात आणि भारताचं किंवा भारतातल्या गरीबांचं भलं वगैरे चिंतण्याचा अजिबात हेतू नसतो.

ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर लगेचच ज्या घराण्याला भारताच्या सम्राटपद वारसाहक्काने मिळायला हवं असं वाटतं त्या घराण्याच्या अठ्ठेचाळीस वर्षांच्या युवराजांनी त्या बातमीवर झडप घालून ऑक्स्फॅमचा अहवाल डाव्होसला गेलेल्या पंतप्रधान मोदींना वाचायला सांगितला. त्यांनी अहवालातला निष्कर्ष खरा मानला असेल तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ७१ वर्षांतली मधली साधारण १५ वर्ष वगळली तर भारतावर त्यांच्याच पक्षाचं राज्य होतं हे तथ्य ते सोयिस्कररित्या विसरले व नेहमीप्रमाणे स्वतःचं हसू करुन घेतलं.


अधिक विषयांतर न करता ऑक्सफॅमकडे वळूया. जागतिक राजकारणात पडद्यामागून सूत्र हलवणारे भलतेच असतात हे आता लपून राहिलेलं नाही. पडद्यामागे असणार्‍या व्यक्तींबरोबरच अनेक स्वयंसेवी संस्थाही (NGO) जागतिक राजकारणात आपापली प्यादी हलवत असतात. अशाच संस्थांपैकी ऑक्सफॅम आहे. ऑक्सफॅमचा संस्थापक कॅनन रिचर्ड मिलफॉर्ड (Canon Richard Milford) हा एक भूतपूर्व ख्रिश्चन मिशनरी होता इतकं सांगितलं तरी संस्थेचा हेतू काय हे वेगळं सांगायला लागू नये. पण इतकी माहिती पुरेशी नसल्याने आणखी सांगणे आवश्यक आहे. या संस्थेचा जन्म दुसर्‍या महायुद्धानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या काही ख्रिस्ती धर्मप्रसारक कार्यकर्त्यांनी (Students' Christian Movement) एका संस्थेची स्थापना केली. हीच संस्था पुढे ऑक्सफॅम म्हणून प्रसिद्ध झाली.

सुरवातीच्या आक्रमक धर्मप्रसाराची जागा हळूहळू समाजसेवेच्या आणि रुग्णसेवेच्या वेष्टनात गुंडाळलेल्या धर्मपरिवर्तनाने घेतली. चर्चशी संबंधित संस्थांचे लक्ष तिसर्‍या जगातल्या भारतासारख्या भरपूर गरीबी आणि 'मागास' असलेल्या देशांकडे गेले नसते तरच नवल होते. पण या सगळ्यात मूळ हेतू हा आपण ज्यांची 'सेवा' करत आहोत अशांना स्थानिक संस्कृतीपासून वेगळं पाडणे आणि त्यांचे धर्मपरिवर्तन करुन ख्रिस्ती करणे हाच होता. मॅगडेलिन विद्यापीठात शिकत असताना ख्रिश्चन विद्यार्थी चळवळीत सक्रीय असणारा कॅनन रिचर्ड मिलफॉर्ड याने त्यानंतर काही काळ भारतात त्रावणकोर आणि आग्रा येथे मिशनरी लोकांनी चालवलेल्या महाविद्यालयांत प्राध्यापकी केली. त्या नंतर तो इंग्लंडला परतला व लिवरपूल मधल्या ख्रिश्चन विद्यार्थी चळवळीचा अर्थात Students' Christian Movementचा सचिव झाला आणि मग काही काळ ऑक्स्फर्ड विद्यापीठातल्या चर्चचा म्हणजेच सेंट मेरीज ऑक्सफर्ड या चर्चचा धर्मगुरू म्हणजे व्हिकार म्हणून काम पाहिलं. १९४२ साली याच महशयांनी Oxford Committee for Famine Relief (ऑक्स्फर्ड दुष्काळ निवारण संस्था) अर्थात ऑक्सफॅमची स्थापना केली. १९८५ साली प्रकाशित एका मार्गदर्शक पुस्तिकेत ऑक्सफॅमने संस्थेने आपल्या कार्याची व्याप्ती थेट सेवेपुरती मर्यादित न ठेवता तिसर्‍या जगातील 'राहणीमानाचा दर्जा सुधारण्याच्या' दृष्टीने वाढवण्याची गरज व्यक्त केली. या कराता ऑक्सफॅमने आपल्या 'सेवा' आणि 'विकास' कार्यांना इतर संस्थांना सोपवण्यास सुरवात केली. रोमन कॅथोलिक ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी स्वतःच्या स्वयंसेवी  संस्था काढायला सुरवात केलीच होती. Evangelical Alliance Relief Fund (TEAR) व Catholic Agency for Overseas Development (CAFOD) या सारख्या संस्थांनी ऑक्सफॅमच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या 'सेवाकार्याचा' भर दुष्काळ निवारणावरुन हलवून 'राहणीमान विकासाकडे' वळवला. आता सेवाकार्यापेक्षा समग्र मानवतेच्या कल्याणाची काळजी त्यांना सतावू लागली होती.

हे सगळं करताना ऑक्सफॅमने स्वतःचा हेतू हा धर्मनिरपेक्ष सेवाकार्य असल्याचा आव व्यवस्थित आणला होता. उपरोक्त संस्था सुद्धा सेवाकार्य करताना आपला धर्मप्रसारणाचा हेतू आणि सेवाकार्याचा लाभ ख्रिश्चनांनाच मिळत असल्याची वस्तुस्थिती अगदी खर्‍याखुर्‍या धर्मनिरपेक्ष व शुद्ध हेतू असणार्‍या देणगीदारांपासूनही लपवण्यात यशस्वी झाल्या होत्या. ऐंशीच्या दशकात मात्र आपल्या 'सेवाकार्याचे' अवलंबत्व ऑक्सफॅमने ख्रिश्चन संस्थांकडून खूपच कमी करुन सरकारी आणि 'सेक्युलर' स्वयंसेवी संस्थांकडे सोपवलं. या संस्थांमधे अगदी प्राण्यांसाठी काम करणारी पेटा असो किंवा वरवर मानवी हक्कांची बाजू घेणारी अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल संस्थासुद्धा सामील आहेत असं त्यांच्या कारभाराकडे व कारवायांकडे पाहून म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. असं केल्याने त्यांच्या ख्रिश्चन अजेंड्याकडे जनतेचं आणि देणगीदारांचं  फारसं लक्ष जाणार नाही असा त्यांचा होरा होता आणि तो खराही ठरला. असं असलं तरी आपला मूळ हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने ऑक्सफॅमने ख्रिश्चन संस्थांशी आपले संबंध घनिष्टच ठेवले होते.

अशा संस्थांचा गरीबांना मदत करता करता आणखी एक हेतू साध्य करायचा होता आणि तो म्हणजे समाजात प्रस्थापितांबद्दल आणि सरकारबद्दल असलेल्या असंतोषाला खतपाणी घालत त्याचे रूपांतर अंतर्गत कलहात करुन बंडापर्यंत गोष्टी पोहोचवणे. या कामी ख्रिश्चन एड (Christian Aid) ही संस्था पूर्वी आघाडीवर होती. वरवर सेक्युलर अशी छबी पण आतून हेतू वेगळाच हेतू अशा अनेक स्वयंसेवी संस्था आजही यात जाणता अजाणता सहभागी आहेत. भारतात अशा स्वयंसेवी संस्थांचं आदिवासी/वनवासी लोकांकडे विशेष लक्ष असतं. आदिवासी/वनवासींच्या भागात असणार्‍या खाणी आणि कारखाने व तत्सम गोष्टींत ढवळाढवळ करणे ही अशा संस्थांच्या कार्यपद्धतीचा अविभाज्य भाग आहे. भारतात अशा एन.जी.ओ. संस्थांमधे कार्यरत असणार्‍या नावांत हत्येचा आरोप असलेल्या नक्षलसमर्थक नलिनी सुंदर, बेला भाटीया अशांचा समावेश बघता या संस्थांचे कार्य काय असू शकतं या विचारानेच थरकाप होतो. नक्षलवादग्रस्त जिल्ह्यात हिंदू साधूसंतांची हत्या होते आणि मिशनर्‍यांचे कार्य मात्र निर्विघ्नपणे कसं सुरु असतं याची कारणमिमांसाही यातूनच स्पष्ट होते.

यात अंबानीने नवीन मोबाईल किंवा मोबाईलचा प्लान काढला की तो कसा कमावणार आहे आणि तुम्ही कसे गरीब अशा कंड्या पिकवण्यापासून ते नुकत्याच झालेल्या कोरेगाव-भीमा आणि वढू इथून जाणूनबुजून पसर(व)लेली दंगल समाविष्ट आहे. आर्थिक विषमतेचा बागुलबुवा दाखवून निर्माण झालेल्या असंतोषाला खतपाणी घालण्याबरोबरच जातीय भावना भडकावून बंडसदृश्य दंगल घडवून आणण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. कोपर्डी बलात्कार व हत्याकांडाच्या वेळी काय घोषणा व पोस्ट फिरत होत्या त्याची आठवण करुन देण्याची गरज नाही. त्यात पोलीस व सरकारी वकिलांनाही सोडलं गेलेलं नव्हतं. उज्ज्वल निकम यांनी विनामोबदला खटला लढवायची तयारी दाखवूनही सरकारी सोपस्कार म्हणून त्यांना दिलं गेलेलं मानधनाचं पत्र सोशल मिडीयावर फिरवून पोलीसांनी बघा किती कष्ट केले आणि हा माणूस बघा किती मलिदा खातो अशा प्रकारची पोस्ट फिरत असलेली आपल्याला आठवत असेलच. यात दुसरं तिसरं काही नसून कुठून तरी तुम्ही दबलेले/दाबलेले, पिचलेले, अत्याचारित आहात आणि तुमच्यापेक्षा श्रीमंत हे स्वत:च्या बुद्धीने व कष्टाने झालेले नसून तुमच्या जीवावर व तुम्हाला पिळूनच झालेले आहेत हेच ठसवणं आहे, आणि या कामी अशा स्वयंसेवी संस्था सक्रीय असतात. कोपर्डीच्या खटल्याला असलेली जातीय किनार अशा संस्थांना गिधाडाला मेलेला प्राणी दिसल्यावर होणार्‍या आनंदापेक्षा जास्त मोहात पाडतो. अशा संस्थांना परदेशातून आणि देशातून किती आणि कसा पैसा येतो हे एका वेगळ्या लेखाचा व संशोधनाचा विषय आहे, तेव्हा ती चर्चा इथे नको.

थोडंसं मागे जाऊन बघितलं तर मुंबईत लोकल गाड्यांवर दगड फेकण्याचं प्रमाण खूप वाढलं होतं. ही दंगलीत होणारी दगडफेक नव्हे तर रेल्वेरुळांनजिकच्या झोपडपट्टीतल्याच भरकटलेल्या तरुणांनी अधुनमधून भिरकावलेला दगड असं त्या गोष्टीचं स्वरूप होतं. रेल्वे डब्याच्या दारात उभं असणार्‍या आणि खिडकीजवळच्या जागेत म्हणजे विंडो सीटवर बसलेल्या लोकांना अर्थातच याचा सर्वाधिक त्रास झाला. प्रमाण खूप वाढलं आणि याची चर्चा टीव्ही व वर्तमानपत्रात होऊ लागली तेव्हा या जीवघेण्या प्रकाराचं चक्क समर्थन करत ही दगडफेक म्हणजे "आहे रे" आणि "नाही रे" वर्गांतल्या संघर्षाचं प्रतीक असल्याचा निर्लज्ज युक्तीवाद तेव्हा या एन.जी.ओं.नी केल्याचेही स्मरते.

तेव्हा ऑक्सफॅमच्या कार्याची मुळं किती खोलवर आणि दूरवर पसरलेली आहेत हे लक्षात घेतलं की 'देशाची ७३% संपत्ती १% जनतेच्या हातात' अशा सनसनाटी मथळ्याची बातमी ही निव्वळ देशातली आर्थिक स्थितीवर भाष्य नसून असंतोष पेरण्याच्या अत्यंत मोठ्या आणि जटील कारस्थानाचा भाग आहे हे लक्षात घ्यायला हवं.

एखादी संस्था जेव्हा भारताच्या जी.डी.पी. किंवा एकूण आर्थिक परिस्थितीबद्दल व स्थिरतेबद्दल गौरवोद्गार काढते आणि ऑक्सफॅमसारखी संस्था देशाची ७३% संपत्ती १% जनतेच्या हातात असं सांगते तेव्हा त्याने अनुक्रमे हुरळून न जाता आणि दु:खी न होता त्या मागच्या हेतूकडे बघणे हे क्रमप्राप्त ठरते.

एका लोकप्रिय जाहिरातीचं वाक्य आठवतं. दिखावे पे न जाओ, अपनी अकल लगाओ. तेव्हा 'विद्येच्या' बाबतीत 'बाळ' न राहता इथे थोडीशी अक्कल वापरली, आणि ऑक्सफॅमची कुंडलीच हातात आली की राव!

संदर्भः
OXFORD HISTORY OF THE BRITISH EMPIRE Companion Series: Britain's Experience of Empire in the Twentieth Century, Edited by Andrew Thompson व इतर.

© मंदार दिलीप जोशी
पौष कृ. ८, शके १९३९








Sunday, November 5, 2017

लव्ह जिहाद: मुलींनो उघडा डोळे, बघा नीट

बघ मुली, त्याचा धर्म वेगळा, तो पण असा की ज्यात लग्न हे जन्मजन्मांतरीचं बंधन किंवा दोन जीवांचे मीलन, दोन कुटुंबांचा संबंध वगैरे मानला जात नाही. त्यांच्यासाठी लग्न म्हणजे शरीराची भूक भागवण्याचं आणि मुलं पैदा करण्याचं साधन असतं, म्हणून तर चार चार लग्न मान्य आहेत त्यांना!

आपल्या राहणीत, खाण्यापिण्यात, संस्कारात सगळ्यातच जमीनअस्मानाचा फरक आहे गं. आणि लग्न म्हणजे फक्त दोन शरीरांचं मीलन नाही ना, या लग्नात ना आपले ना त्यांचे नातेवाईक जोडले जातील. एक तर तुला मुसलमान करतील नाही तर तू मुसलमान होई पर्यंत छळ छळ छळतील. तिथून पुढे तुझा छळ थांबेलच असं नाही.

नाही हो बाबा, तुम्हाला माहित्ये का तो तसा अजिबाताच नाहीये. खूप काळजी घेणारा, प्रेमळ आहे तो. आणि त्याच्या कुटुंबात तर धार्मिक वातावरण वगैरे काहीच नाहीये. त्यांना जात धर्म यांची काहीच पडलेली नाही. खूप उच्चशिक्षित आणि पुढारलेलं कुटुंब आहे त्याचं, आणि तो तर एक यशस्वी डॉक्टर आहे. आणि बाबा, आमचं किनै एकमेकांवर खूप प्रेम आहे.

कोणत्याही हिंदू मुलीने मुसलमान मुलाशी लग्न करायची इच्छा प्रदर्शित केल्यावर तिच्यात आणि तिच्या पालकांत होणारा हा संवाद प्रातिनिधिक म्हटला पाहीजे. असाच काहीसा संवाद जमशेदपूर शहरात राहणारे आणि टाटा स्टीलचे निवृत्त कर्मचारी श्री अरुण कुमार यांच्यात झाला असला पाहीजे.

आता शक्यतेकडून सत्यतेकडे येऊया.

आदित्यपूरमधे असलेल्या मेड्रीटीना हॉस्पिटलमधे मिर्झा रफीक हक हा डॉक्टर आणि चयनिका कुमारी व्यवस्थापिका म्हणून काम करत. सहवासातून "प्रेम" निर्माण व्हायला वेळ लागला नाही. तीन वर्ष चाललेल्या या प्रेमसंबंधांची परिणीती लग्नात व्हावी असं आता चयनिकाला वाटू लागलं होतं.

पण रफीकची पहिली अट अर्थातच चयनिकाने इस्लाम कुबूल करावा, मग बाकीचं पाहू अशी होती. लग्न करायचं असेल तर धर्म कशाला बदलायला हवा असा प्रश्न पडलेली चयनिका रफीकला ती त्याच्या "प्रेमात" आकंठ बुडालेली असल्याची जितकी खात्री पटवून द्यायची, तितकं रफीक तिला ती राफीकशी एकनिष्ठ नसल्याचे आरोप करायचा.

रफीकच्या प्रेमात आंधळी झालेली चयनिका मग आपल्या एकनिष्ठ असण्याचे आणि रफीक करत असलेल्या घाणेरड्या आरोपांतून निर्दोष असण्याचे पुरावे हॉटेल जिंजरच्या एका खोलीतल्या बेडवर देऊ लागली. तब्बल तीन दिवस हा प्रकार चालू होता. मग असंच एकदा रफीकची बोटं तिच्या केसांतून फिरू लागली. के हळू हळू गळ्यावर स्थिरावली. चयनिकाला काही कळायच्या आत रफीकच्या हातांची पकड तिच्या गळ्यावर घट्ट झाली. चयनिकाचे ओठ नकळत चावले गेले, डोळे मोठे होत गेले....आणि काही क्षणांतच चयनिकाचे श्वास थांबले. सगळं शांत शांत झालं.

आता डॉक्टर रफीकच्या थंड जिहादी डोक्यात "बॉडी"ला हॉटेलच्या बाहेर कसं न्यावं याचा विचार सुरु झाला. एक सोयीस्कर उपाय सुचायला त्याला फार वेळ लागला नाही. जवळच्या बेस्तूपूर बाजारातून एक मोठी ट्रॉली बॅग विकत घेऊन त्यात चयनिकाचं अचेतन शरीर एक एक घडी करुन कोंबलं आणि रफीक तितक्याच थंडपणे हॉटेलमधून बाहेर पडला, रिक्षा मागवली आणि बॅग रिक्षात टाकून टाटानगर रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाला.

टाटानगर रेल्वे स्टेशनवर श्री अरुण कुमार यांची एकुलती एक तरूण मुलगी चयनिका कुमारी एका बेवारशी बॅगेत बेवारशी प्रेत बनून पडली होती.

#LoveJihad #लव्ह_जिहाद

बातमी:
Page 11 of ePaper
http://epaper.jagran.com/epaper/05-nov-2017-139-edition-Dhanbad-City-Page-1.html#

विशेष धन्यवाद: Kinkar Pandey

Thursday, September 21, 2017

दारात भारताच्या गर्दी अलोट आहे

आदेश हा किताबी संदेश आसमानी
दारात भारताच्या गर्दी अलोट आहे

शतके सहिष्णुता ही पोसून सोसली मी
अब्रू जमीन सारी गमवून आज आहे

एका अलिबाबाचे झाले चव्वे-चाळीस
प्रत्येक चोर पुन्हा राहतो गर्भार आहे

डाव्यांस खाज आज सुटली साम्यवादी
मोजून दाम घेतो विकत पत्रकार आहे

यात्रेस जावयाला भरतो आजही जिझिया
पाहुण्यांस आज माझ्या मी देतो भाडे आहे

आश्रयास कुणी अतिथी म्हणूनि आला
घर, भूमी, आणि कन्या मागून आज आहे

जन्मास शिवाजी ते यावे पण शेजारी
वृत्तीच आत्मघाती ठरणार आज आहे

उत्तिष्ठ आज कृष्ण म्हणतो उच्चारवाने
हाती खडग घेता तरणार पार्थ आहे

तस्मात सज्ज सारे देशरक्षणास व्हा रे
अन्यथा आज सारे होणार भस्म आहे

© मंदार दिलीप जोशी
अश्विन शु. १, शके १९३९

Tuesday, September 12, 2017

लाल सलामवाले लोकहो

(अ)प्रिय लाल सलामवाले लोकहो,

तुमचा कन्हैय्याकुमार म्हणाला की माझ्या सख्ख्या बहिणीने भगव्या रंगाचे कपडे घातले तर मी तिचे कपडे फाडेन.

आमचा कन्हैय्या मानलेल्या बहिणीची वस्त्र फेडली जात असताना तिची अब्रू झाकायला तिच्या मदतीला धावून येतो.

हाच फरक आहे तुमच्या आणि आमच्या कन्हैय्यात.

सोळा हजार बायकांवरुन सोशल मिडीयावर फालतू पोस्टी फिरवणं सोपं आहे, समाजात मानाने वावरता यावं म्हणून इतक्या स्त्रियांना नवरा म्हणून स्वत:चं नाव देणारा भगवान श्रीकृष्ण होणं अशक्य.

तेव्हा तुमच्या लाल चड्डीत रहा. राम, कृष्ण वगैरे झेपायचे नाहीत तुम्हाला.

©️ मंदार दिलीप जोशी

Wednesday, September 6, 2017

मोबाईल, बायको, पर्स, आणि आपण

मनुष्यास स्थितप्रज्ञ या पातळी पर्यंत पोहोचायचे असल्यास दोनच मार्ग उपलब्ध आहेत.

एक साड्यांच्या दुकानात सेल्समनची नोकरी करावी आणि दुसरा म्हणजे आठवड्यातून एकदा बायकोच्या किंवा आईच्या ज्या पर्समधे मोबाईल वाजतोय त्याच पर्समधून फोन वाजायचा थांबायच्या आत काढून पलिकडच्या माणसाला हेलो म्हणून दाखवण्याचा सराव करावा.

साड्यांच्या दुकानात सेल्समन होणे अवघड वाटत असल्यास दुसर्‍या पर्यायाचे अवलोकन करा.

मोबाईल फोन हा घरी असताना पर्समधे का ठेवला जातो हे मला न उमगलेलं कोडं आहे. आणि ठेवला तर ठेवला तो नवरे लोकांना का काढायला सांगतात हे दुसरं कोडं.

आधीच पर्समधे इतक्या वस्तू असतात की फोन वाजला की आकाशवाणी झाल्यासारखा अष्टदिशांनी आवाज येतोय असं वाटत राहतं. मग आपण घराच्या आकारमानानुसार स्वयंपाकघर, दिवाणखाना, बेडरूम, इतकंच काय बाथरूम सुद्धा फिरून येतो. नेमका कुठल्या पर्समधे फोन ठेवलाय हे आठवलं आणि मोबाईल शोधायला पर्स उघडली तर त्यातल्या पिना, पेन्सिली, एक बॉलपेन, एक मार्कर पेन, एक शाळेच्या काळापासून जपलेलं शाईचं पेन, लिप बाम, पेन बाम, खडू, मुलांचे क्रेयॉन, आपण मोबाईल शोधायला आत हात घालताच बोटांचा कचकावून चावा घेत मिटणार्‍या केसांच्या जादुई क्लिपा, टोकदार कानातली, गळ्यातले साधे, मोत्याचे, अमेरिकन असे वगैरे किमान चार पाच प्रकारची गळ्यातली, शँपूची पाकिटं, घरापासून किमान १० किलोमीटरवर असणार्‍या लेडीज टेलरच्या दोन अश्मयुगीन पावत्या, आधी हात आणि मग बेसावध राहिल्यास आपलंच तोंड काळं करणारी काजळाची कांडी, पॉकेट श्रीमद्भगवतगीता (बेटा, तुम्हारा इस पर्स में क्या है? जो था वो कल नहीं रहेगा, जो नहीं था वो कैसे मिलेगा, वगैरे), स्क्रू ड्रायव्हर (हो, हा पण निघाला होता एकदा. कशाला काय विचारता? नवर्‍याचे स्क्रू टाईत करायला ख्या ख्या ख्या), आणि आपण पर्समधे हात घातलाय की मुंग्यांच्या वारुळात असा प्रश्न डावा अशा वस्तू म्हणजे सुटे मोती, वावडिंग, बॉल बेअरिंग, वेलची, लवंगा इत्यादी वस्तूंचे अडथळे पार करुन मोबाईल पर्यंत पोहोचेपर्यंत तो वाजायचा बंद झालेला असतो.

ह्या, त्यात काय, कोणाचा आहे ते पाहून परत फोन करु असं आपण म्हणतो आणि कॉल हिस्टरीत जातो. नेमका तो नंबर साठवलेला नसतो. मग बायको, "काय हो, तुम्हाला इतकं नाही जमत!" असं म्हणत हातातून मोबाईल घेते आणि त्या नंबरला बिंधास्त फोन लावते. तो नेमका तिच्या बालमैत्रिणीने घेतलेला नवा नंबर असतो. "बघा, इतक्या वर्षांनी केलाय पमीने फोन, मी लावला नसता तर आणखी किती काळाने तिने केला असता कोण जाणे" असं आपल्याला पुन्हा ऐकावं लागतं.

नेमका अशा वेळी आपला फोन वाजतो आणि पलिकडे बायकोची सासू किंवा आपली सासू यांच्यापैकी एक जण असते. आपल्याला मोबाईल तिसरा हात असल्यासारखा जवळ ठेवायची सवय असल्याने उचलावाच लागतो आणि बायकोच्या बालमैत्रिणीशी (तिच्या - आपलं नशीब कुठलं इतकं चांगलं? - तिच्या) गप्पा संपेपर्यंत आपल्या फोनवर पलिकडे आपली सासू असल्यास "तुमची मुलगी कित्ती दमते हो कश्शा कश्शाला म्हणून वेळ नसतो तिला" अशी कौतुकं सांगत आणि बायकोची सासू असल्यास पटकन विषय बदलत "अगं आई आज मन्याने काय कमाल केली माहित्ये शाळेत" या ट्रॅकवर गाडी नेत काही वेळ काढावा लागतो. सुमारे असंख्य मिनीटांनी बालमैत्रिणीशी बोलून झाल्यावर बायको फोन ठेवते आणि आपली सासू असल्यास, "अहो काय हे, आधी नाही का सांगायचं आईचा फोन होता. काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल म्हणून इतका वेळ थांबली ती! आता तिची औषधांची वेळ आहे, उचलेल की नाही कोण जाणे फोन, काय बरं काम असेल?!" असं म्हणत फोन लावते आणि तिची सासू असल्यास, "दमले बाई, उद्या सकाळी लगेच करते फोन, आता झोपल्याही असतील सासूबाई" असं म्हणत सुस्करा सोडते.

स्थितप्रज्ञ होण्याकरता साड्यांच्या दुकानात सेल्समन होणे त्यापेक्षा सोपं वाटू लागतं.

-----------------------------------------------------------------
या लिखाणाचा कुठल्याही शहाण्या, अर्धवट, किंवा ठार वेड्या अशा मानसिक स्थिती असलेल्या व्यक्तींशी; जिवंत, अर्धमेल्या, किंवा मृत व्यक्तींशी; आणि त्यांच्या स्थान, भाषा, शिक्षण, आणि व्यवसाय वगैरेंशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
-----------------------------------------------------------------

© मंदार दिलीप जोशी

Monday, September 4, 2017

गावांतील देवळांचे महत्त्व

प्रत्येक गावात एक तरी प्रमुख देऊळ असावं आणि त्यातल्या देवतेचा एक तरी मोठा उत्सव असावा. आणि जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी दरवर्षी उत्सवाला हजेरी लावणारे ग्रामस्थ असावेत. नाही, हे निव्वळ स्वप्नरंजन नव्हे. ज्या गावांत असं एखादं तरी प्रमुख देऊळ असतं आणि त्याचा असा उत्सव असतो त्या गावाला शहरांकडे वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्थलांतरानंतरही तग धरुन राहणे सोपे जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे स्थानिक देवतेच्या वास्तव्यामुळे, तिच्या होणाऱ्या पूजाअर्चनेमुळे, एकत्र जमण्यामुळे लोकांची गावाशी नाळ जोडलेली राहते. म्हणूनच ग्रामीण भागात मंदिरे ही आजही लोकांना एकमेकांशी व स्थानिक संस्कृतीशी, आपल्या मातीशी (our roots) जोडून राहण्याची प्रेरणा देतात. भारतात काही ठिकाणी तर शैक्षणिक व खेळात जिंकलेली पदके व चषक मंदिरात ठेवलेले दिसून येतात. कारण उत्तुंग यश मिळवल्यावर ते ग्रामदेवतेच्या चरणी अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी जपली गेलेली आहे.

ग्रामदेवता या जन्ममृत्यू, पूर, दुष्काळ, शेतीतले अपयश, एखादी दुर्घटना इत्यादी स्थानिक समस्यांबाबत ग्रामस्थांची काळजी घेणार्‍या एका प्रकारे हिंदू देवतांच्या स्थानिक प्रतिनिधी असतात. माणसाने एक वेळ चारधाम यात्रा आयुष्यातून एकदाच करावी पण आपल्या ग्रामदेवतेच्या दर्शनाला वर्षातून एकदा तरी जावेच. अशा प्रकारच्या स्थानिक देवता या शहरात अभावानेच आढळून येतात. म्हणूनच अर्थार्जन इत्यादी कारणांसाठी आपल्या गावातून स्थलांतरित झालेल्यांनी, शक्य झाल्यास सहकुटुंब, वर्षातून किमान एकदा तरी गावी जाऊन आपल्या ग्रामदेवेतेची पूजा करावी व उत्सवाला हजेरी लावावी. गावातली मंदिरे ही साधी असली तरी त्यांचा प्रभाव थोर असतो हे वैय्यक्तिक अनुभूतीवरुन सांगू शकतो. वर्षातून एकदा जरी गावी गेलं तरी आपल्याला तिथल्या समस्या कळू शकतात. हा उद्देशही मनात असू द्यावा व दरवर्षी आपली उपस्थिती नोंदवून यथाशक्ति यथामति आपली सेवा देवतेच्या चरणी रुजू करावी व तिथल्या परंपरा जपण्यास मदत करावी.

असं म्हणतात की राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर लवकरच श्री अजित डोबाल यांनी आपल्या जवळ जवळ ओस पडलेल्या गावी जाऊन आपल्या ग्रामदेवतेचे दर्शन व आशीर्वाद घेतले होते. आता इतका व्यग्र माणूस हे करु शकतो, तर आपण का नाही? इच्छा ठेवा, मार्ग दिसेलच.

© मंदार दिलीप जोशी