मागे अमेरिकेतील सु/कु प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका आणि विचारवंत मॅलरी मिलेट यांच्या भगिनी केट मिलेट यांनी लिहीलेला एक लेख शेअर केला होता. आज इंग्लंडमधल्या एक प्रसिद्ध स्त्रीवादी कार्यकर्त्या जॉनेट कॉप्फरमॅन यांनी स्वतः व्यक्त केलेल्या भावना तुमच्यापुढे मांडतो आहे. (या लेखाचा स्वैर अनुवाद)
---------------------
माझ्या समानतेच्या लढ्याची किंमत माझ्या तान्हुल्या नातीला मोजावी लागेल का?
आजच्या महिलांना भेडसावणारी भावनिक पोकळी पाहून एकोणीसशे साठच्या दशकापासूनच्या प्रसिद्ध स्त्रीवादी (फेमिनिस्ट) जॉनेट कॉप्फरमॅन यांनी व्यक्त केलेल्या भावना.
माझ्या नातीचा अँबर अॅनचा जन्म झाल्यावर काही तासातच तिला मी माझ्या हातांत घेतलं आणि छातीशी कवटाळलं. त्याच वेळी मनात दाटलेल्या असंख्य गुंतागुंतीच्या भावनांनी काहूर माजवलं, मी पार गोंधळून गेले. मला तेव्हा नक्की काय वाटत होतं हे शब्दात वर्णन करणं कदाचित अवघड आहे, कदाचित नातीच्या जन्मामुळे झालेला उन्मुक्त आनंद आणि तिच्या भविष्याची धास्ती यांचं मिश्रण असं त्या भावनांचं वर्णन करता येऊ शकेल.
माझं पहिलं नातवंडं. अतिशय बांधेसूद शरीर, डोळ्यांत असलेली चमक, माझ्या बोटांत हळूच गुंतलेली तिची बोटं - आई कशाला, आजीलाही ओळखतात बरं का बाळं! अँबरचा जन्म हा एक चमत्कार मानावा लागेल. अर्थात, जन्माला आलेलं प्रत्येक सुदृढ बाळ हे एक चमत्कारच असतं, पण अॅम्बरच्या आईला, म्हणजे माझ्या सूनबाई ईव्हाला गर्भाशयाच्या अंतःस्तराचा क्षोभ (एन्डोमेट्रिओसिस) हा आजार असल्याने तिला आपण कधी आई होऊ शकू असं वाटतंच नव्हतं. शिवाय त्यांच्या लग्नाच्या वेळी दोघांची वयं पन्नाशीच्या पुढे होती - माझा मुलगा इलियास होता ५२ वर्षांचा आणि ईव्हा होती ५० वर्षांची. त्यामुळे मला नातवंडांची कितीही हौस असली तरी माझ्या वयाची सत्तरी ओलांडल्यावर मी ती आशा जवळजवळ सोडून दिली होती. आणि मग तो चमत्कार झाला. माझ्या पंचाहातराव्या वाढदिवसाला मला ईव्हाने मला गोड बातमी दिली आणि या संपूर्णपणे अनपेक्षित पण सुखद धक्क्याने मी खुर्चीवरुन जवळजवळ पडलेच. ईव्हाला दिवस गेले होते!
लहानगी अँबर हलकेच माझ्या कुशीत शिरत असताना मला तो दिवस आठवत होता, आणि मनात तो भावनांचा कोलाहल गोंधळ घालत होता. नातीच्या जन्माने मनात निर्मळ आनंद दाटण्याऐवजी भावनांचं जरासं कटूगोड असं मिश्रण भरून राहिलं होतं. आता आम्ही तिचा हात धरू, एखाद्या कुंभारासारखं तिच्या वकूबानुसार तिच्या आवडीनिवडींना आकार देऊ, पण पुढे काय? तिच्या भविष्यात काय वाढून ठेवलंय? का असं वाटत होतं मला?
त्याचं कारण होतं त्याच दिवशी वर्तमानपत्रात मी वाचलेली एक बातमी. शाळेत जाणार्या मुलींना शारिरिकदृष्ट्या अक्षम असतानाच त्यांच्याच वयाच्या मुलामुलींकडून कौमार्य गमावण्याची जबरदस्ती कशी केली जाते याचा उल्लेख त्यात होता. कौमार्य गमावणं ही गोष्ट काहीतरी मोठी डिग्री मिळवावी अशा पद्धतीने इकडे मिरवतात. त्याच बातमीत पुढे अनेक अस्वस्थ करणार्या गोष्टींचं वर्णन होतं — किशोरवयीन मुलामुलींमध्ये झालेला नैराश्याचा (depression) प्रादुर्भाव, त्यातून स्वतःलाच इजा करुन घेणं, खाण्याच्या सवयी इतक्या बिघडलेल्या की जवळजवळ त्याला कुपोषण म्हणता येईल अशी परिस्थिती, शाळेत विद्यार्थ्यांचा त्यांच्याच शाळासोबत्यांकडून होणारा क्रूर मानसिक छळ (bullying), भ्रमणध्वनी (मोबाईल) वरुन होत असलेली लैंगिक स्वरूपाच्या संदेशांची देवाणघेवाण (sexting), आणि एकंदर लैंगिक बाबतीत निर्माण केला जाणारा गोंधळ. या गोष्टींना अधिकाधित किशोरावस्थेतली मुलं बळी पडत असल्याचं त्या बातमीत म्हटलं होतं.
हे फार भयंकर होतं. आम्ही स्त्रीमुक्ती चळवळीत सक्रीय असताना पुढच्या पिढीसाठी - विशेषतः पुढच्या पिढीतील आमच्या मुलींसाठी एका उज्ज्वल भविष्याची कल्पना केली होती. एक असं जग ज्यात स्वप्न बघायला आणि ती अंमलात आणायला आकाश कमी पडेल, आपले निर्णय आपण घेण्याचं स्वातंत्र्य आणि त्यातून प्रगती साधता येईल, आणि कुठल्याही क्षेत्रात कर्तृत्व गाजवण्यासाठी संधींची समान उपलब्धता असेल. बास, याच गोष्टींसाठी मी आणि अनेक स्त्रीयांनी साठच्या दशकात तीव्र लढा दिला होता. अशाच जगाची कल्पना आमच्या मुलींसाठी आम्ही केली होती.
जॉनेट कॉप्फरमॅन पुढे म्हणतात की आज याच स्त्रीवादाने आजच्या मुलींच्या आयुष्यात काय उलथापालथ माजवली आहे ते पाहून मी हादरून गेले. समानतेचा लढा आम्ही स्त्री"वादा" कडे घेऊन जाण्याने आजच्या मुलींना नक्की फायदा झालाय की नुकसान हे तपासणं मला गरजेचं वाटू. माझ्या मते दुर्दैवाने आजचा काळ हा महिलांसाठी भावनिकदृष्ट्या अत्यंत उदास आणि रोगट असाच आहे.
लैंगिक सूख हे दैवी आनंद देणारं असायला हवं. शरीराला मिळणार्या सुखाचा मार्ग हा मनातून जायला हवा. पण आज सेक्सचा फक्त शारीरिक कंगोराच उरला आहे. दुर्दैवाने दैनंदिन आयुष्याच्या जवळजवळ प्रत्येक भागाला पॉर्न संस्कृतीने ग्रासलं आहे. याचं मूळ साठच्या दशकाती स्त्रीवादी आंदोलनांचा भाग असलेल्या लैंगिक स्वातंत्र्याच्या हाकांत आहे. हवं तितकं शारीरिक सूख मिळवा, तुम्हाला हव्या त्या व्यक्तीबरोबर ते मिळवा, एकाने समाधान झालं नाही तर अनेक व्यक्तींबरोबर झोपा, तडस लागे पर्यंत जेवता तसं एकमेकांची शरीरं भोगा, ओरबाडा.
प्रणयाराधन आणि शय्यासोबतीतल्या अत्यंत खाजगी असायला हव्यात अशा गोष्टी आज खुलेपणाने मोठ्या पडद्यावर दिसतात. छोट्या पडद्याने आपल्या मोठ्या भावाला या बाबतीत केव्हाच मागे टाकलं आहे. इकडे आयटीव्ही टू वाहिनीवर उघड उघड स्वैराचाराला प्रोत्साहन देणारा एक प्रेमाचं बेट (Love Island) नावाचा रिअॅलिटी शो होऊन गेला. शिसारी येणारी गोष्ट म्हणजे त्यात भाग घेणारे लोक माणसं आहेत की शरीरं भोगणारे यंत्रमानव असा प्रश्न पडावा. [आपल्याकडे बिग बॉस या कार्यक्रमाचं रूपांतर लवकरच अशाच हिडीस शो मध्ये येत्या काही वर्षातच होईल अशी मला खात्री आहे]
काळानुसार बदल हा अपरिहार्य आहे पण स्त्री आणि पुरुषांच्या सगळ्याच पारंपारिक भूमिका आज वैचारिक तिरस्काराचा विषय झाल्या आहेत — इतक्या की एक काळ असा होता की टीव्हीवर जाहीरातींतून गृहिणी आणि आई या दोन भूमिकांत स्त्री दिसूच नये असा अचाट अलिखित नियमच ठरून गेला होता. का? तर म्हणे स्त्री आणि पुरुष यांच्या "जुनाट" आणि "बुरसटलेल्या" पारंपारिक भूमिकांचं सरसकटीकरण (gender stereotyping) होऊ नये म्हणून.
स्त्रीमुक्तीवादाच्या चळवळींनी महिलांना प्रगतीच्या अनेक संधी नक्कीच मिळवून दिल्या, पण त्याच बरोबर आजचं जगणं स्त्रीमुक्तीवादाने अधिक संघर्षपूर्ण, वेदनादायी, किचकट आणि मनःशांती हिरावून घेणारं बनवल्याने त्या संधी या अशा गोष्टींमुळे केव्हाच खुज्या ठरल्या आहेत.
आज मला आम्ही त्या काळी दिलेल्या घोषणा आठवतात, "स्त्रीयांनो, आपले ब्रा जाळा, मिनीस्कर्ट घाला. मुक्त व्हा!" पण खरंच आजची स्त्री मुक्त आहे का? अशा घोषणांनी नक्की काय साध्य केलं? व्हिक्टोरियन काळातल्या कपड्यांच्या थरांनी गळ्यापासून पायापर्यंत गच्च आवळलेल्या गृहिणीचा प्रवास आपल्या शरीराचं प्रदर्शन मांडायला सोकावलेल्या मुलींपर्यंत झाला तो अशाच घोषणांच्या प्रभावाने. पन्नासच्या दशकात आपले पायही झाकलेले हवेत म्हणून स्त्रीया बॉबी सॉक्स या विशिष्ट प्रकारचे पायमोजे घालत असंत. त्या स्त्रीयांवर हे बंधन होतं, आजच्या मुलींवर अधुनमधून एखादा तरी कमी कपड्यांतला, तोंडाचा चंबू करुन काढलेला सेल्फी सोशल मिडीयावर टाकणं अनिवार्य वगैरे आहे की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे.
दैवदुर्विलास असा की एकीकडे स्त्रीस्वातंत्र्याचं कारण पुढे करुन इंग्लंडमधल्या बहुसंख्य समाजातल्या महिलांपैकी अनेक जणींचा कल हिणकस पद्धतीने शरीरप्रदर्शन करण्याकडे आहे, दुसरीकडे त्याच इंग्लंडमधल्या धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्य असलेल्या लोकसंख्येतील स्त्रीया मात्र आजही कपड्यांच्या बाबतीत व्यवस्थित मर्यादा पाळताना दिसतात. त्यांच्या म्हणण्यानुसार एक स्त्री म्हणून आमच्या शरीराचं पावित्र्य जपण्यासाठी, आमची स्पेस जपण्याकरता आम्ही असं करतो. आहे की नाही गंमत? यांच्या पैकी कोण बंधनात आहे आणि कोण मुक्त आहे?
खूप जास्त लांबीचा सुका बोंबिल वाटावा असं पोट खपाटीला गेलेलं, हाडं दिसू लागलेलं, गालफडं बसलेलं, आणि डोळे निस्तेज आणि खोल गेलेलं कुपोषित शरीर असणार्या सेलिब्रिटींचं अनुकरण करण्याचा रोग समाजात पसरेल अशा भविष्याची कल्पना आमच्यापैकी कुणीच करु शकलं नव्हतं.
शरीर आणि मन यांना एकत्र वाढू देण्याऐवजी वेळेआधीच दिलं जाणारं लैंगिक "शिक्षण" आज मुलांच्या मनातला गोंधळ वाढवण्याचं आणि त्यांना अकाली मोठं करण्याचं काम काम करत आहे. शरीराची पूर्ण वाढ होण्याअगोदरच आजच्या मुलींना लहान ब्रा/बिकीनी घालायला आज उद्युक्त केलं जातं. अर्वाच्य शब्द आणि लैंगिक व्यवहारांचं एक मोठं जग आज टीव्ही आणि इंटरनेटच्या माध्यमातून आज मुलांना नासवतंय.
आमच्या काळात एक आई म्हणून असलेल्या परीक्षेत नापास होणं, नको असलेलं गर्भारपण, अतिरिक्त मद्यपान या आणि तत्सम चिंता अगदीच मिळमिळित वाटाव्यात अशा भयानक चिंता संधी, पर्याय, आणि प्रगतीच्या अगणित संधी आणि स्वातंत्र्याची लयलूट असलेल्या आजच्या जगात मला माझ्या अँबर बद्दल आज भेडसावतात.
तरुणपणात सळसळत्या रक्ताच्या धगधगत्या आदर्शवादाची झिंग डोक्यात घेऊन त्याकाळी आम्ही दिलेल्या स्त्रीवादी लढ्यांनी मात्र आजच्या मुलींमध्ये "वाद" तेवढा शिल्ल्क ठेवला आणि त्यांच्यातल्या स्त्रीलाच मारुन टाकलं. एक स्त्री म्हणून आम्हाला परमेश्वराने दिलेलं अत्यंत अमूल्य, अद्वितीय, आणि अलौकिक असं काहीतरी आम्ही हरवून बसलो आहोत.
माझा जन्म दुसर्या महायुद्धाच्या काळात झाला. युद्ध संपल्यावर मला घेऊन आई आणि बाबा लंडनला परतले. त्याकाळी शालेय शिक्षण हे फक्त परीक्षेत चांगले गुण मिळवण्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर तुम्ही पुढे कुठल्यही क्षेत्रात गेलात तरी न बिचकता आत्मविश्वासाने काम करत यावं या दृष्टीने व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास कसा करावा यावर भर असे. कालांतराने वयाच्या चौदाव्या वर्षाच्या आसपास बॉयफ्रेन्ड आयुष्यात आले, तरी तेव्हा त्या नव्या नात्यात सेक्स करायलाच हवं असा कोणताही वैय्यक्तिक किंवा सामाजिक दबाव आमच्यावर नव्हता.
बॉयफ्रेन्ड सिनेमाला घेउन गेल्यावर तिथल्या अंधारात घेतलेल्या चोरट्या चुंबनांपलीकडे कधी आमची मजल जात नसे. आणि पहिलं चुंबन मिळवण्यासाठी सुद्धा बॉयफ्रेन्ड मंडळींना भरपूर प्रणयाराधन करावं लागे. हां, आणि आम्ही गरमागरम प्रेमपत्र सुद्धा पाठवायचो बरं का! आपलं कौमार्य जपणं हे त्या काळी किमान साखरपुडा होईपर्यंत केलं जायचं किंवा किमान लग्नाचं विश्वासार्ह आणि ठाम आश्वासन मिळेपर्यंत तरी. आपल्या शरीर असं का, सेक्स म्हणजे काय वगैरे ज्ञान क्वचित आईकडून तर बरंचसं चोरून वाचलेल्या पुस्तकांतून आणि मित्रमैत्रिणींकडून मिळायचं. एक गोष्ट मात्र आमच्या पापभिरू मनावर कोरली गेली होती, ती म्हणजे कितीही इच्छा बळावली तरी ती पुर्णत्वाकडे कधीही न्यायची नाही. असं करणं म्हणजे फक्त नको असलेलं गर्भारपण ओढवून घेणं इतकंच नव्हे तर सगळ्यांसाठी ती गोष्ट एका भयंकर दुर्घटने सारखी होती.
आज एखाद्या किशोरवयीन मुलीला तिच्या बॉयफ्रेन्डने सेक्स्टिंग (sexting) केलं तर त्याच्या उत्तरादाखल आपला एक उत्तान कपडे घातलेला हॉट सेल्फी पाठवावा की आणखी काही करावं असा प्रश्न पडतो. त्यात तिला समवयस्कांकडून एकाहून एक भयानक असे सल्ले मिळत असतात. जणू काही त्या वयातल्या एखाद्या मुलीने करायच्या या अत्यंत सामान्य गोष्टी आहेत.
अँबरने या गोष्टी सहजपणे अंगिकाराव्यात असं मला वाटतं का? एका मुलीने करायच्या या अगदी सामान्य गोष्टी आहेत असं तिला वाटावं का? तिला कधी एखादं सुंदर प्रेमपत्र मिळेल की तिला फक्त शरीराची भूक असलेल्या भावनाशून्य नात्यांना तोंड द्यावं लागेल? ज्या मुलींच्या वाट्याला या गोष्टी येतील, त्यांच्याबद्दल मला खूप वाईट वाटतं. स्वतंत्र आयुष्य जगायच्या नादात स्वैराचाराची बंधनं लादून घेतली की काय होतं याची आजची पिढी हे उदाहरण आहे.
आमच्यात आणि आजच्या काळात एक मूलभूत फरक असा की आम्हाला मर्यादांची जाणीव होती. काही वेळा याच मर्यादा जाचक वाटल्या तरी आमच्याकडून काय अपेक्षित आहे हे ठावूक असल्याने आमचा पाय कधी घसरला नाही. आमच्या आईवडिलांशी आमचे कडाक्याचे वादही व्हायचे, पण तरीही आम्ही आज्ञाधारक होतो. आपण वेगळं वागलो, तर त्यांना आवडणार नाही हा प्रेमळ धाक होता. माझ्या बाबांना मी काजळ लावलेलं आवडायचं नाही, आणि मी ते मुद्दामून लावून त्यांना डिवचायचे. आमच्या मनासारखं झालं नाही तर आम्ही घर सोडून जाऊ अशी धमकीही आम्ही द्यायचो पण तसं करण्याची हिंमत कधीच झाली नाही. आपण कसे वागलो म्हणजे आईबाबांना आवडेल, हा विचार कायम मनात असायचा.
लोकांनी काय, किती (कमी), आणि कसं खावं हे सांगणारे धंदेवाईक तज्ञ आणि जाहीरातींचा मारा करणार्या कंपन्या तेव्हा नव्हत्या. आम्हाला एक वेळचा नाश्ता आणि दोन वेळचं भरपूर जेवायला मिळत असे. मधल्या वेळीतर भूक लागली तर सँडविच मिळत. तरीही आम्ही बारीक होतो, पण कुठल्याही व्यायामशाळा किंवा स्वतःची उपासमार करुन घेऊन नव्हे, तर या बारीकपणामागचं खरं कारण भरपूर चालणे आणि नाचकाम हे होतं. त्यामुळे आमच्या कंबरेचा "कमरा" कधी झालाच नाही. एखादं गुटगुटीत बाळ बघितलं की आपलंही असंच बाळ हवं असं लोकांना वाटायचं, आणि किशोरवयात जरासं जाडसर पोर बघितलं की कुणी हेटाळनी करायचं नाही. मुलींना त्यांच्या शरीरयष्टीवरुन हिणवलं जायचं नाही. आजचा काळ शस्त्रक्रीयेने चरबी काढण्याचा आहे. पण तरीही प्रचंड सुटलेली लठ्ठ शरीरं हा प्रकार त्या काळात सर्रास नव्हताच. दुर्दैवाने वेगवेगळ्या फळांचे रस, बारीक होण्याची घातक औषधं, आणि सूपरफूड यांची रेलचेल असलेल्या आजच्या काळात आजच्या मुली आपल्या शरीराबाबत समाधानी नाहीत.
लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केल्यावर मी काही काळ नृत्यांगना आणि मॉडेल म्हणून काम केलं. मग न्युयोर्कला गेले आणि संशोधक ग्रंथपाल (research librarian) म्हणून काम केलं. मग लग्न केलं आणि वयाच्या चोवीसाव्या वर्षी लंडनला परतले.
निसर्गाच्या विरोधात जाऊन घेतलेला समानतेच्या शोधाबद्दलची माझी अस्वस्थता साधारण १९७९ साली माझ्या The MsTaken Body या माझ्या पहिल्या पुस्तकातून. समानतेचा ढोल वाजवणर्या महिलांचा अतिरेक तेव्हाच मला दिसू लागला होता. आज प्रसूतीबद्दल कुठलीही गोष्ट नैसर्गिक पद्धतीने करण्यात बायकांना वाढत्या प्रमाणात वाटणारी भीती आणि "आणल्या जाणार्या" कळा या गोष्टी निश्चितच योगायोगाच्या नाहीत.
स्त्री असण्यामागचा आध्यात्मिक आणि शारिरिक आनंद आज यांत्रिकतेत जखडला गेला आहे. मूल जन्माला घालणं यातला आनंद "मा लाईफ मा चॉईस" मुळे केव्हाच हरवला. फार पुर्वी घरी सुईण येऊन मूल जन्माला येताना तुम्हाला मदत करायची. आता पुरुषी ढवळाढवळ वाढल्याने म्हणा किंवा प्रसूती आरामदायक व्हावी या करता औषधांचा मारा वाढल्याने म्हणा, स्त्रीयांना स्वतःबद्दल, स्वतंच्या शरीराबद्दल पुरेसा आत्मविश्वासच उरलेला नाही. समानतेमागे धावता धावता नवर्यांनी प्रसूतीदरम्यान हजर राहण्याचं फॅड निघालं आणि प्रसूतीसाठी तज्ञांचा ताफा हजर राहू लागला, आणि स्त्रीयांना आपण हे दिव्य एकटीने पार पाडू शकतो हा विश्वासच उरला नाही. आता मला सांगा, अशा समानतेचा काय उपयोग?
एक गोष्ट मात्र नक्की की पुरुषांची बरोबरी करण्याच्या मागे लागता लागता आज स्त्रियांची मक्तेदारी असलेली क्षेत्रे आज उरलेलीच नाहीत. मला असं वाटतं की स्त्रीच्या पारंपारिक भूमिकांचं सरसकटीकरण (stereotyping) हे खरं तर स्त्रीलाच एक वेगळी ओळख आणि सुरक्षितता प्रदान करतं. मुलं जन्माला घालणं आणि घराची काळजी घेणं याचा अर्थ तुम्ही जखडला गेला आहात असा नाही, तर तुम्हाला तुमच्या स्त्रीपणाचा सोहळा साजरा करण्याचं. स्वातंत्र्य मिळालं आहे असा होतो.
मला दोन मुलं पदरात असताना मी दोन डिग्र्या घेतल्या, काही काळ शिक्षिकेच्या भूमिकेत शिरले आणि मग लेखक आणि ब्रोडकास्टर म्हणून नाव कमावलं. हे करत असतानाच मी घरही सांभाळत होते. घरच्यांसाठी स्वयंपाक करत होते, मुलांशी खेळत होते, त्यांचा अभ्यास घेत होते आणि कधी कधी या सगळ्याचा ताण असह्य होऊन कोलमडतही होते. पण मी माझ्या मुलांमागे नेहमीच ठामपणे उभी होते. माझ्या आयुष्यातून काही शिकण्यासारखं असेल तर ते हे की आयुष्यात असलेले लोक महत्त्वाचे आहेत आणि एक बायको, आई, आणि बाई म्हणून ज्या ज्या म्हणून भूमिका त्यात अध्याहृत असतील त्या सगळ्या भूमिकांसकट माझं तिथे असणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि अनिवार्य आहे.
मी फक्त ४४ वर्षांची असताना माझा नवरा जॅक्स कर्करोगाने गेला. त्या वेळी तो ६१ वर्षांचा होता. एक आई म्हणून माझ्या मुलीवर मी कदाचित जास्तच भार टाकला असेल, पण त्या वेळी माझ्यात सुपरवुमन घुसली होती, आणि हा शब्द किती फसवा आहे हे आता लक्षात येतंय.
मी आजही "अग्गं बाई, बाईनेच का बरं ही कामं करायची" असा विचार न करता पदर खोचून स्वयंपाकघरात घुसू शकते, झाडलोट करु शकते, आणि घरातली कोणतीही कामं आनंदाने करते. मग ती करताना मी बाहेर कोण म्हणून वावरते त्याचा काहीही संबंध नसतो. रोजची घरातली कामं करणं ही देखील एक स्त्री म्हणून व्यक्त होण्याची एक पद्धत आहे आणि त्यातून चक्क आध्यात्मिक आनंद मिळवता येतो. जगण्याकरता भरपूर पर्याय समोर उपलब्ध असणं यात आयुष्याची परिपूर्णता नाही हे माझ्या केव्हाच लक्षात आलंय.
एक आजी म्हणून माझी अशी इच्छा आहे की माझ्या अँबरने असंच आयुष्य जगावं. तिने आयुष्यात काहीही करावं, पण तिला छान स्वयंपाक करता यावा, तिने घरासमोरच्या बागेत शांतपणे बसून पुस्तक वाचावं, उत्तम संगीताची तिला जाण असावी, आणि मुलांना घेऊन समुद्रावर फिरायला तिला जाता यावं— आणि मुख्य म्हणजे या सगळ्यासाठी तिला भरपूर वेळ मिळावा — जो आजच्या मुलींकडे उरलाच नाहीये. समानतेच्या मागे जाताना तिने दारूत स्वतःला बुडवून घेऊ नये आणि निरर्थक शारीरिक संबंधांनी स्वतःला नासवूनही घेऊ नये. तिने संवेदनक्षम, दयाळू, आणि सर्जनशील असावं पण त्याही पेक्षा एक बाई म्हणून आत्मविश्वासाने वावरावं. पुरुषांची बरोबरी करायला न जाता तिने आपलं स्त्रीत्व जपावं, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचा सोहळा साजरा करावा.
एक स्त्री म्हणून, आई म्हणून देवाकडे लई नाही मागणं !
© मंदार दिलीप जोशी (मराठी रूपांतर/भाषांतर)
फाल्गुन कृ. ७, शके १९३९ | ८ मार्च इसवी सन २०१८