Wednesday, September 14, 2022

खर्रा इतिहास: किस्सा ए तालीम

शहजादा असताना औरंगजेब साहेबांना लहानपणापासून शिक्षणात फार रस नव्हता. व्होकेशनल कोर्सेस करण्याकडे त्यांचा अधिक कल असे. मग कुठल्यातरी वर्गात शिवणकामाचा तास सुरु असेल तिथे जाऊन टोप्या वीण, कुठे रफू कर, साडी फेड्....आपलं सॉरी...साडीला फॉल पिको कर, असे उद्योग चालत. मग ते तलवारबाजी शिकले. एकाच घरातल्या सगळ्याच भावांनी मुलुखगिरी करुन कशी चालेल म्हणून ते आपला भाऊ दाराला "दारा, शाळेत शिको" "दारा शिको" असे सतत म्हणत असत. त्यावरुनच भावाचे नाव पुढे दारा शिकोह पडले. पण हा इतिहास विकेंड इतिहासकार तुम्हाला सांगणार नाहीत.#किस्सा_ए_तालीम
मूळ फारसी लेखक: आकथूकुद्दीन खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
प्रस्तावना: विषवमनुद्दीन खान फोदरी
पान २६, ओळ ४

#म्हैत_नसलेला_औरंग्या #दर्द_ए_पितिहास #पीदरगीराचा_म्हैत_नसलेला_इतिहास #तुझ्यायची_अकबरी

© मंदार दिलीप जोशी
No comments:

Post a Comment