Monday, April 11, 2022

मखत्राता श्रीराम

काल रामनवमी होती. रामरक्षा स्तोत्रात श्रीरामांना मखत्राता म्हटलं गेलंय. मखत्राता या शब्दाचा अर्थ यज्ञाचा त्राता असा आहे. 


आता हा शब्द आजच्या परिप्रेक्ष्यात समजून घेऊया.

यज्ञाला त्राता म्हणजे रक्षणकर्ता असण्याची आवश्यकता का भासावी? कारण काही लोकांना त्याचा ध्वंस करण्यात खूप रस होता. यज्ञात असं काय बरं होतं की ज्या कारणे त्यांचा ध्वंस करायला संख्याबळ आणि शस्त्रदल घेऊन यावं लागत होतं?

कारण यज्ञ म्हणजे फक्त त्यात वस्तू टाकून जाळणे इतकंच नव्हतं तर यज्ञातून काही फळे मिळत असत ज्यायोगे यज्ञ करणाऱ्यांचे सामर्थ्य वाढत असे. आता मानवांनी यज्ञ करून सामर्थ्य प्राप्त केलं तर ते दानवांना कसं मानवावं बरं? माणसे लढाऊ वृत्तीची होणे हे दानवांना झेपण्यासारखे नव्हतेच. म्हणूनच यज्ञांचा विध्वंस करायला यायचे. आणि म्हणूनच मखत्राता असण्याची आवश्यकता असायची.

याला मानवी स्वभावाच्या सार्वत्रिक आणि सर्वकालिक परिप्रेक्ष्यात बघा. हे तत्व पुराणकथेपुरते मर्यादित नाहीये, आजही तितकंच महत्वाचं आहे. अशांतीदूत हे तेच मखध्वंसी दानव आणि डावे त्यांचे शुक्राचार्य आहेत.

मखत्राता असण्याची गरज तेव्हा होती, आज आहे, आणि उद्याही असणार आहे... आणि आता कुणीही अवतार घेऊन येणार नाहीये.

तुझमें राम, मुझमें राम, सबमें राम समाया
फिर क्या हिंमत किसीकी जो हमें मारने हात उठाया?

पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा!

No comments:

Post a Comment