समजा तुम्हाला कुणी अतिरेकी कुत्रा म्हणालं तर? तुम्हाला राग येईल ना? जो म्हणेल त्याला तुम्ही मारायला धावाल ना? कदाचित नाही. तुम्ही त्याचा प्रतिवाद कराल. काय म्हणता....तुम्ही नक्की मारायला धावून जाल??
आता पुढचा परिच्छेद वाचा. जे.एन.यु.च्या एका डाव्या विचारवंताची ही वाक्य आहेत.
"सांप्रतकाळी या देशात जी सगळ्यात मोठी फुटीरतावादी शक्ती आहे ती म्हणजे ब्राह्मणवादी हिंदू राष्ट्रवाद होय.
हा राष्ट्रवाद कुठल्याही लोकप्रिय चेहर्याच्या रूपात प्रकट होऊ शकतो.
हे एक असं सत्य आहे की ज्याला स्वीकारणे ही या देशाच्या मुक्ती आणि स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेले पहिले जोमदार पाऊल असेल.
या सत्याचा स्वीकार करायला खऱ्या देशभक्तीची, सामाजिक प्रतिबद्धतेची, आणि साहसाची आवश्यकता आहे."
साम्यवादी आणि डाव्यांना अशा प्रकारचा युक्तीवाद करण्याचं रीतसर प्रशिक्षण दिलेलं असतं आणि ते या परिच्छेदातून स्पष्टच दिसतं आहे. यात त्याने त्याच्या मते गंभीर आणि खरीच अस्तित्वात आहे असं भासवून एक समस्या मांडली आहे, तिला जबाबदार कोण याचंही उत्तर हाच इसम देतो आहे, आणि त्यासाठी काय केलं पाहीजे हेही हाच सांगतो आहे. म्हणजे प्रश्न त्याचा, आणि उत्तरही त्याचंच. अशा प्रकारे त्याने अत्यंत हुशारीने व सुसूत्र पद्धतीने शब्दांची मांडणी करुन त्याला होऊ शकणारा विरोध गुंडाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला या परिच्छेदात राष्ट्रवादाला बदनाम करायचं आहे, म्हणून तो म्हणतोय की राष्ट्रवाद चुकीचा आहे. मग तो म्हणतो आहे राष्ट्रवाद कुठल्या रूपात दिसेल ते पहा. मग त्यावर तो उपाय सांगतो आहे,
"या सत्याचा स्वीकार करायला खर्या देशभक्तीची, सामाजिक प्रतिबद्धतेची, आणि साहसाची आवश्यकता आहे."
अरे वा रे वा. म्हणजे राष्ट्रवाद आणि देशभक्ती या वेगवेगळ्या संज्ञा आहेत? राष्ट्रवाद म्हणजे देशभक्ती नव्हे? आणि राष्ट्रवादाचा अर्थ हिंदू राष्ट्रवाद असाच होतो? बघा, म्हणजे याने जाता जाता राष्ट्रवादालाच कशी नावं ठेवली ती!
एखाद्या शब्दामागची भावना बदनाम कशी करावी याचा वरील परिच्छेद हा उत्तम वस्तुपाठ आहे. राष्ट्राच्या रक्षणासाठी, भल्यासाठी जगणाऱ्या आणि झटणाऱ्या प्रत्येकाला एका झटक्यात बदनाम करायचं असेल, हतोत्साहित करायचं असेल तर राष्ट्रवाद या शब्दालाच बदनाम करावं - या साम्यवाद्यांनी भारतात राबवलेल्या कल्पनेने आज मूर्त स्वरूप धारण केलं आहे. आपल्याला आठवत असेल तर काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांना भेटायला गेलेल्या काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर या घटिंगणाची मुलाखत घेऊ पाहणार्या रिपब्लिक वाहिनीच्या वार्ताहरालाच अय्यर साहेबांनी "मी देशद्रोही वाहिनीशी बोलत नाही" असं सुनावलं. या चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे शक्ती कपूरने इतरांना चारित्र्याचे धडे देण्यागत प्रकार होता. राहुल गांधींच्या प्रत्येक भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख हटकून 'धोकादायक विचारसरणी' म्हणून होणं, आणि देशाच्या भल्याचं चिंतणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची काँग्रेस आणि साम्यवाद्यांकडून "संघी" अशी संभावना होणं, या दोन्ही गोष्टींमागची कारणं सारखीच आहेत. एकदा का राष्ट्रवाद या संज्ञेला अस्पृश्यतेचं लेबल लावलं की त्याने प्रेरित असलेली प्रत्येक गोष्ट, व्यक्ती, संस्था, आणि कार्य हे आपोआप वाईट आहे हे सिद्ध करता येतं. हे उमगलेल्या डाव्यांनी मग देशभक्ती या शब्दाला राष्ट्रवादापासून वेगळं करुन या शाब्दिक युद्धासाठी दोन पार्ट्या तयार केल्या. ज्याला देशाबद्दल खरोखर काही पडलेली आहे, जो सदोदित देशाच्या भल्याचाच विचार करतो त्याला जहाल किंवा अतिरेकी राष्ट्रवादी म्हणून विरोधी पार्टीत उभं केलं जाऊ लागलं, आणि काँग्रेस आणि साम्यवादी घटिंगणांनी आपलंही देशावर प्रेम आहे हे सिद्ध करायला "देशभक्त" हे लेबल आपल्याला स्वतःच चिकटवून घेतलं (त्यांच्या दोन पंतप्रधानांनी स्वतःलाच भारतरत्न दिलं तसंच). यात सातशे शहाईंशीं आकडा धारक शांतीप्रिय लोक या लाटेवर स्वार झाले नसते तरच नवल होतं.
हे पुरेसं नव्हतं. कारण लोक तेच तेच ऐकून एक ना एक दिवस कंटाळतात. मग प्रखर राष्ट्रवादाला तो Jingoism किंवा Fascism यांचंच दुसरं रूप असल्याचं असत्य रेटलं जाऊ लागलं. Fascism या शब्दाचा अर्थ शब्दकोशात "A political theory advocating an authoritarian hierarchical government (as opposed to democracy or liberalism)" असा आहे. आर्यावर्तात हजारो वर्ष राजेशाहीच होती व अनेक ठिकाणी अत्यंत कल्याणकारी राजे राज्य करत असंत. आपल्याला लोकशाहीशी परिचय नव्हताच असे नव्हे, कारण चाणक्याच्या काळात मर्यादित लोकशाही असलेली जनपदं असल्याचे उल्लेख आहेत. पण प्रामुख्याने राजेशाही हीच आपल्याकडे राज्यपद्धती राहिलेली आहे, आणि राजेशाही Fascism च्या व्याख्येच्या (authoritarian hierarchical government) जराशी जवळ जाणारी आहे. आपली उज्ज्वल संस्कृती व बहुसंख्य दैदिप्यमान परंपरा निर्माण होण्याचा काळ हाच आहे. मग आपल्या संस्कृती व परंपरांचा आदर करणाऱ्या केवळ संघासारख्या संघटनेचाच नव्हे तर, संघाशी अजिबात संबंध नसलेल्या पण प्रखर राष्ट्रवादी असलेल्या व्यक्ती व संस्थांची Fascist असं लेबल लाऊन बदनामी करणं आणि मग हळू हळू जो राष्ट्रवादी तो फॅसिस्ट असं समीकरण रूढ करण्याचा प्रयत्न करणं हे साम्यवादी आणि शांतीप्रिय समुदायाच्या आधुनिक कार्यपद्धतीचा भाग होता आणि आहे.
दुसर्या भागात आपण पाहिलं होतं, की हिटलर शिस्तीचा भोक्ता असल्याने बाकी कुणीही शिस्तप्रिय असलं की त्याला नाव ठेवायला हिटलर म्हटलं जातं कारण त्या व्यक्तीला बदनाम करायला हिटलर हे संबोधन बरं पडतं. तीच क्लुप्ती सुक्याबरोबर ओलं जाळायला निघालेले, 'लिबरल' नामक कातडं पांघरलेले डावे / साम्यवादी वापरत असतात. वरची Fascismची व्याख्या वाचली तर त्यात राष्ट्रवाद अनुस्युत असतो. म्हणूनच तुम्ही राष्ट्रवादी असलात तर त्याच बरोबर तुम्ही फॅसिस्टही होता. हे म्हणजे आपल्या अपराधाबद्दल एखादा आपल्याला लाथ घालायला निघाला तर आपला अपमान लपवायला लाथ मारणाऱ्यालाच गाढव म्हणण्या सारखं आहे, कारण शेवटी लाथ मारण्याबद्दल गाढव हा प्राणी प्रसिद्ध आहे.
राष्ट्रवादाला नाकारायला भारतीय संविधानाचा हल्ली वापर केला जाऊ लागलेला आहे. सुरवातीला दिलेल्या वामी परिच्छेदातली क्लुप्ती इथेही आपल्याला दिसते. यात विरोधी मताची मुस्कटदाबी करायला वपरलं जाणारं एक वाक्य म्हणजे "आम्ही संविधान मानतो". या विधानात "तुम्ही संविधान मानत नाही" हे गृहित धरलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संविधानात राष्ट्रवाद हा शब्द नाही, त्याच्या संदर्भातले लेखन नाही, म्हणून राष्ट्रवाद हा देशविरोधीच आहे असा भंपक सिद्धांत मांडायचा. संविधानात बदल करण्याबद्दल कुणी भाष्य केलं की संविधानाला तुम्ही हात लावायचा नाही, संविधानाबद्दल तुम्ही काही बोलायचं नाही अशी दमदाटी सुरू होते. मग आत्तापर्यंत संविधानात झालेल्या शंभराहून अधिक (ताजा गुगल शोध) सुधारणांचं काय करायचं? ते रद्ध करायचे का? या बद्दल मात्र हाताची घडी तोंडावर बोट. गंमत म्हणजे, संविधानात घुसवलेला "सेक्युलर" हा शब्द सुद्धा एका सुधारणेद्वाराच घातलेला आहे. संविधानात बदल करायचे नसतील, म्हणजेच पर्यायाने आत्तापर्यंत केलेले बदलही रद्द करायचे असतील, तर "सेक्युलर" हा शब्दही हद्दपार करावा लागेल, हे या स्वयंघोषित संविधानरक्षकांना मान्य आहे का? असा प्रश्न विचारल्यास अर्थातच "आम्ही म्हणतो तेच संविधान, तुम्हां फॅसिस्टांना काय कळतंय त्यातलं / तुम्ही फासिस्ट आहात, तुम्हाला बोलायचा हक्क नाही" या प्रकारची विधानं येऊ लागतात. "तुम्ही फासिस्ट" हे ही ठरवणारे हेच. एका विशिष्ट पुस्तकातल्या मजकूरावर टीका झाल्यावर किंवा त्यात सुधारणा करण्याची गरज व्यक्त झाल्यावर ज्याप्रमाणे दमदाटी आणि हिंसा होते, तशीच दमदाटी संविधानाच्या नावावरही होईल अशी कल्पनाही खुद्द संविधानाच्या निर्मात्यांनीही केली नसेल.
दुसरी क्लुप्ती म्हणजे अस्तित्वात नसलेला शब्द निर्माण करायचा आणि समाजात विष पेरायला अशा शब्दांना सोडून द्यायचं. असा शब्द म्हणजे वरील वामी परिच्छेदातला Jingoism हा शब्द. हा शब्द पहिल्यांदा जॉर्ज होलिओक या ब्रिटीश इसमाने अठराशे अठ्याहात्तर साली निर्माण केला आणि वापरला. Jingoism या शब्दाचे शब्दकोषात "An appeal intended to arouse patriotic emotions" आणि "Fanatical patriotism" असे दोन अर्थ दिलेले आहेत. तर विकीपिडीया याच संज्ञेचं "Jingoism refers to nationalism in the form of aggressive foreign policy." असं वर्णन करतो. अतिरेकी राष्ट्रवाद नावाचा काही प्रकार अस्तित्वात असलाच तर तो Jingoism या संज्ञेच्या अधिक जवळ जातो. आपल्या राष्ट्राच्या रक्षणाबद्दल तीव्र भावना असणे व आक्रमक परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून त्या भावनेला जोपासणे हे नक्की कुठल्या दृष्टीकोनातून नकारात्मक आहे? पण राष्ट्रवादाला बदनाम करायचं असेल तर असे शब्द हे बनवत राहणं आणि ते वापरात आणत राहणं हे साम्यवाद्यांचं वैशिष्ठ्यच आहे. कालांतराने हे दोन शब्द इतके आलटून पालटून वापरले जाऊ लागले की त्यांचा अर्थ एकच असल्याचा समज व्हावा.
मी तुम्हाला पहिल्याच वाक्यात "तुम्हाला कुणी अतिरेकी कुत्रा म्हणालं तर" अशा अर्थाचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर आता पुढे देतो आहे. अठराशे सत्त्याहात्तर ते अठराशे अठ्याहात्तर या दरम्यान लढल्या गेलेल्या रशिया व तुर्किस्तान यांच्यातील युद्ध हे त्याची पार्श्वभूमी आहे. या युद्धाच्या तपशीलात जायचीगरज नाही. हे युद्ध सुरू असताना ब्रिटनभर असणार्या पब आणि संगीतसभांत एक गाणं म्हटलं जात असे. गायक जी. एच. मॅक्डरमॉट यांनी गायलेलं आणि जी. डब्ल्यू. हंट यांनी लिहीलेलं हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की अठराशे अठ्याहात्तर साली चक्क प्रिन्स ऑफ वेल्सने श्री मॅक्डरमॉट यांना स्वत:साठी खास खाजगी कार्यक्रम आयोजित करुन हे गाणं गायला लावलं. हे गाणं फारच जोशपूर्ण "बाय जीझस" या प्रार्थनावजा शपथेच्या जागी "बाय जिंगो" (by Jingo) हे शब्द वापरण्यात आले होते. एखाद्या ठिकाणी "बाय जीझस" म्हणायचं (swearing मधे जीझसला आणायचं) नसेल तर "बाय जिंगो" हे त्याकाळी सर्रास वापरले जाणारे उद्गारवाचकशब्द होते. ते गाणं असं:
We don't want to fight but by Jingo if we do
We've got the ships, we've got the men, we've got the money too
We've fought the Bear before, and while we're Britons true
The Russians shall not have Constantinople.
याच शब्दांचा वापर करुन ब्रिटीश नागरिक जॉर्ज होलिओक यांनी Jingoism हा शब्द निर्माण करुन तो डेली न्युज या वृत्तपत्राला पाठवलेल्या पत्रात प्रथम वापरला. कालांतराने हा शब्द सामान्य वापरात घुसला...म्हणजे प्रखर राष्ट्रवादाला विरोध करण्याकरता जगभरातील घरभेद्यांच्या हातात हे कोलित मिळालं. १९१६ साली ऑस्कर सीझर नामक अमेरिकन व्यंग्यचित्रकार यांनी कढलेल्या The American War-Dog या व्यंग्यचित्रात चितारलेल्या कुत्र्याचे नाव जिंगो असे होते. आता जगातल्या १०० सर्वाधिक लोकप्रिय श्वाननामात जिंगो या नावाचा समावेश होतो.
आता मला सांगा, समजा तुम्हाला कुणी Jingoist म्हणालं तर?
------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ शु. १४, वटपौर्णिमा, शके १९३९

वामपंथी भारत विखंडन ३

फार सुंदर आणि तर्कशुद्ध मांडणी आहे.
ReplyDelete