Monday, April 9, 2012

चिरंजीव परशुराम भूमी प्रांगण, बुरोंडी

अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः ।
इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।

अर्थः चार वेद मुखोद्गत आहेत (संपूर्ण ज्ञान) आणि पाठीवर बाणासह धनुष्य आहे (शौर्य) - म्हणजेच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही असल्याने शाप अणि शस्त्र अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग जो जाणतो [तो परशुराम].

ज्ञान, शक्ती, त्याग आणि सृजन यांचा साक्षात्कार म्हणजेच भगवान श्री विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम. आपल्या काळातील अत्याचारी आणि समाजविघातक राज्यकर्त्यांना आणि शक्तींचं निर्दालन करुन समाजजीवन सुरक्षित करणारे चिरंजीव भगवान परशुराम. अपरांत भूमीची निर्मिती करणारे आणि राजा शिवछत्रपतींच्या प्रेरणास्थानांपैकी एक असणारे भगवान परशुराम. पहिला ब्रह्मक्षत्रिय म्हणून ओळखले गेलेले जमदग्नीपुत्र परशुराम.

तरुण पिढीला अशा चिरंजीव परशुरामांचे मूर्त रूपात प्रेरणादायी दर्शन घडावे या हेतूने इनोव्हेटिव्ह टेक्नोमिक्स प्रायव्हेट लिमिटेड, भोसरी आणि न्यु मॉडर्न ऑप्टिशियन्स, पुणे चे संचालक श्री. अनिल गोविंद गानू आणि सौ. अश्विनी अनिल गानू यांनी चिरंजीव परशुराम भूमी प्रांगणाची निर्मिती केली आहे. हा प्रकल्प भगवान परशुरामांनीच निर्माण केलेल्या कोकणभूमीत दापोलीपासून साधारण १०-१२ किलोमीटरवर असलेल्या बुरोंडी या गावात टेकडीवर उभा राहिलेला आहे.



 

४० फूट व्यास असलेल्या अर्धगोलाकृती पृथ्वीवर श्री. ज्ञानेश्वर शिवाजी गाजूल यांनी फायबर ग्लास मधे घडवलेली परशुरामांची २१ फुटांची उत्तराभिमुख भव्य मूर्ती डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. पृथ्वीच्या अर्धगोलाकृती अंतर्भागात सप्तचिरंजीवांचे स्मरणस्थान असून त्यात भविष्यात तारांगण आणि बाहेर Optic Garden तयार करण्याची योजना आहे.




कोकणातला एक निसर्गचमत्कार म्हणून ओळखल्या जाणार्‍या तामसतीर्थ नामक सागरतीराचे या ठिकाणाहून दर्शन होते. समुद्राचा फक्त याच भागाचे पाणी तांबडे दिसते म्हणून त्याला तामसतीर्थ असे म्हणतात. चहूबाजूने हिरवाई ल्यालेले पर्वत आणि मधे भगवान परशुरामांचा भव्य पुतळा हे दृश्य बघताना भान हरपते.

श्री परशुराम भूमी प्रांगणातून होणारे तामसतीर्थाचे मनोहारी दर्शन:

इतर छायाचित्रे:






चिरंजीव परशुराम भूमी या वास्तूचे शिल्पकारः
  • डॉ. बाळकृष्ण नारायण दिवेकर, Ph.D, Concrete Technology, पुणे
  • श्री. हेमंत शरद साठ्ये, B. Arch, पुणे
  • श्री. पद्मनाभ प्रभाकर लेले, ठेकेदार, AMIE, पुणे
  • श्री. सुहास गजानन जोशी, B.E., M.Tech, AMIE, पुणे
  • श्री. सदानंद सुरेश ओक, DCE, पुणे
  • श्री. आशुतोष आपटे, BFA, पुणे

विशेष सहकार्यः
  • सौ. मधुवंती व श्री. प्रफुल्लचंद्र देव, इनोव्हेटिव्ह टेक्नोमिक्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे
  • सौ. पौर्णिमा व श्री. राजेंद्र मनोहर
  • सौ. अपर्णा व श्री. अतुल केतकर
  • श्री. विवेक गोगटे
  • श्री. पांडुरंग पांगारे

2 comments:

  1. या पावन तीर्थाचे दर्शन घेण्याचे भाग्य नुकतेच लाभले. तेज:पुंज राज राजेश्वर परशुरामंचे हे शिल्प आपल्या सर्वांच्या चित्तवृत्ति सदैव जागृत करो

    ReplyDelete
  2. जय जय श्री परशुराम... आप सभी को अनंत साधुवाद

    ReplyDelete