Tuesday, June 23, 2020

छोटे स्थानिक व्यवसाय आणि आपण: हिंदू अर्थव्यवस्था - भाग २

#VocalForLocal

एक पूजा साहित्य विक्री करणारे दुकान आणि एक किराणा व इतर सामानाचे प्रसिद्ध दुकान यांची संकेतस्थळे पाहून लक्षात आलेल्या काही गोष्टी. 

✔️ काही प्रमुख दुकानांनी लवकरात लवकर ऑनलाइन सेवा देणे सुरू करणे गरजेचे आहे. 

✔️ अनेक दुकानांची संकेतस्थळाच्या नावाखाली फक्त अगदी बेसिक साईट असते. कधी कधी तर फक्त होम पेज असतं. आणि त्यावर नाव आणि पत्ता आणि इतर तुटपुंजी माहिती असते जी फक्त दुकानात पोहोचण्यासाठी आपल्याला मदत करते. 

पण ऑनलाइन यादी आणि ऑर्डर करता येणे या सोयी या संकेतस्थळांवर अजूनही नाहीत. अनेकदा दुकानात फोन केल्यावर ऑर्डर पाठवायचा व्हाट्सप क्रमांक मिळतो. तोच संकेतस्थळावर देता येणार नाही का?

संकेतस्थळ काढून मग माहिती अद्ययावत करण्याचे विसरणे हे करू नये. तत्सम अनेक बाबी आहेत.

✔️ तात्पर्य हे की आता फक्त गल्ल्यावर बसून असेल गिऱ्हाईक तर येईल दुकानात असा विचार न करता ऑनलाईन सर्च मार्गाने नवीन गिऱ्हाईक जोडणे आणि उपरोक्त सोयी देऊन नियमित गिऱ्हाईकांना बांधून ठेवणे हे अत्यावश्यक झालेले आहे. 

आधीचा भाग: इथे क्लिक करा


🖋️  ©️ मंदार दिलीप जोशी

छोटे स्थानिक व्यवसाय आणि आपण: हिंदू अर्थव्यवस्था - भाग १


#VocalForLocal

बरेच दिवस लिहू लिहू म्हणत होतो तेवढ्यात काल बेलापुरे काकांची पोस्ट बघितली.

गेले अनेक दिवस चर्चा सुरू आहे की फक्त "स्थानिक" विक्रेत्यांकडून विकत घ्या वगैरे वगैरे, पण हे नेमकं कसं करायचं याबद्दल हे थोडं मुक्तचिंतन. आधी सोबत जोडलेली पोस्ट वाचून घेतलीत तरी चालेल. त्यात महत्त्वाच्या सूचना आहेत.

आपल्या शेजारी पाजारी, इमारतीत, सोसायटीत, मित्रमंडळींत, ऑफिसात कुणी ना कुणीतरी हिंदू व्यक्ती किंवा कुटुंब असेलच की जे घरात विविध खाद्यपदार्थ, मसाले, वगैरे घरीच बनवतात. आपल्या परिचयातले अनेक जण आयुर्वेदिक वैद्य आहेत जे उटणी किंवा तत्सम उत्पादने बनवतात. अशांची एक यादी तयार करा आणि वेळोवेळी ती अद्ययावत करत रहा.

✔️ आपल्या सोसायटीचा व्हॉट्सअप गृप असेलच, त्यावर मेसेज करुन अशी माहिती आपल्याला सहज मिळू शकते आणि पसरवता येते. एकदा दर्जा अणि व्यक्तीबद्दल खात्री झाली की अशी माहिती वेळोवेळी पसरवत रहावी. मग तिथे आपल्याला त्यातून काय मिळेल हा विचार करु नये. 
✔️ आज प्रत्येक जण व्हॉट्सअप, फेसबुक अशा सोशल मिडियावर आहे. अशा ठिकाणी लहानसे मेसेज तयार करुन आपण वेळोवेळी पोस्ट करत राहू शकतो. 
✔️ आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्यापैकी अनेकांना जुजबी फोटो एडिटिंग (उदा. फोटोशॉप) येतंच. अशा उत्पादनांचं मार्केटींग करताना आकर्षक रंगसंगती वापरून ती व्यक्ती जे पदार्थ किंवा मसाले वगैरे बनवते त्याची जाहीरात बनवता येईल. 
✔️ अशी जाहीरात करत असताना खाली त्या व्यक्तीला विचारून घेतलेला फोन्/व्हॉट्सअप नंबर अवश्य द्यावा म्हणजे संपर्क साधणे सोपे जाईल. ईमेल असेल तरी उत्तम.

असा व्यवसाय करणार्‍यांनी आपला दर्जा राखणं आवश्यक आहे, तसेच आपण घरगुती पातळी वर करत असल्यास मधेच कंटाळा आला म्हणून बंद करु नये, दीर्घकाळ करण्याची तयारी ठेवावी. कमाईचा मुख्य स्त्रोत नोकरी असल्यास व्यवसायात बनवत असलेल्या किमान एका गोष्टीचं उत्पादन बंद करु नये. मग पुढे वाढवता आणि कमी करता येतं. पण तुम्ही मधेच आणि सगळंच बंद करता आणि पुन्हा सुरु करता हे नियमित ग्राहकांच्या दृष्टीने गैरसोयीचं ठरू शकतं आणि मग गिर्‍हाइके बांधून ठेवता येत नाही. कारण असे व्यवसाय बऱ्याच प्रमाणात माऊथ पब्लिसिटीवर चालत असल्याने ही काळजी घेतली पाहिजे.



हे झालं घरच्या पातळीवर व्यवसाय करणार्‍यांच्या बाबतीत. या संबंधी इथे चर्चा करुया. 

पुढचा भाग: इथे क्लिक करा

🖋️ ©️ मंदार दिलीप जोशी

Tuesday, June 9, 2020

निसर्ग चक्रीवादळ: कोकणवासियांच्या मदतीसाठी आवाहन: Nisarga Cyclone Appeal for Help for Affected Konkan Areas

निसर्ग चक्रीवादळ: कोकणवासियांच्या मदतीसाठी आवाहन: Nisarga Cyclone Appeal for Help for Affected Konkan Areas 

आपणा सर्वांना ठावूकच असेल की ३ जून २०२० रोजी आलेल्या निसर्ग वादळाने आपल्याला पर्यटनाचा अपरिमित आनंद देणार्‍या कोकणातल्या अनेक जिल्ह्यांत धुमाकूळ घातला. अनेक गावांत एकही वाडी धड शिल्लक राहिली नाही; आजवर आपल्याला कोकणचा मेवा देणारी झाडे मुळापासून उपटून पडली, फेकली गेली. आंबा, फणस, कोकम, सुपारी, पोफळी, नारळ, इत्यादींनी भरलेल्या बागा आणि वाड्या नष्ट झाल्या. या सर्व गावांची अर्थव्यवस्था नष्ट झाली. घरा मागच्या वाडीत जिथे दहा-पंधरा फुटांपलीकडे दिसायचे नाही, तिथे आता घरा बाहेर पडल्यावर थेट समुद्र दिसू लागला आहे. वीजेचे लोखंडी खांब वाकले आहेत आणि गावांत वीज नाही. लँडलाईन व मोबाईल बंद आहेत. घरांची कौले व पत्रे वादळामुळे उडून तरी गेले आहेत किंवा झाडे व वीजेचे खांब पडल्याने त्यांच्यासकट घरांचे व गोठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

आजवर आपल्याला पर्यटन व फळफळावळ यांचा आनंद देणार्‍या कोकणचा आधार व्हायची संधी आपल्याला चालून आली आहे. या करता मदतीचे दोन स्त्रोत आपल्याला निर्माण करायचे आहेत. वस्तू खरेदी करुन द्यायच्या झाल्यास सोबत जोडलेले चित्र पहा व तिथे दिलेल्या व्यक्तींशी संपर्क साधा. (चित्रात उल्लेख केलेला मंदार जोशी मी नव्हे, पण माझ्याइतकाच विश्वास त्याच्यावरही टाकू शकता). 

स्थानिकांच्या मदतीसाठी रोटरी क्लब ठाणे तर्फे निधी संकलन करण्यात येणार आहे. आपणा सर्वांनी या सेवाकार्यात हातभार लावावा हि नम्र विनंती.

हिंदी

आप सभी जानते ही हैं कि ३ जून २०२० के दिन निसर्ग चक्रवात ने कोंकण का कितना नुकसान किया है। लाखो पर्यटकों को असीम आनंद देनेवाले कोंकण भूमि पर इस चक्रवात ने विनाश का तांडव किया।कई गावों मेंं एक भी "वाडी" साबुत न रही। कोंकण का मेवा देनेवाले पेड आमूल उखडे गये। आम, कटहल,कोकम, सुपारी, नारियल के बाग विनष्ट हुए। इन सब गावों की अर्थ व्यवस्था नष्ट हो गई।

बाग इतने घने थे कि दस पंद्रह फीट के पार जहाँ कुछ दिखाई न देता, वहाँ अब सीधे समुद्र दिखने लगा है। बिजली के लोहे के खंभे झुक कर मुड गये हैं, बिजली कट गयी है। लँडलाइन और मोबाइल बंद हैं। घरों के छप्पर या तो उड गये हैं या फिर उनपर पेड या बिजली के खंभे गिर जाने से उनका और घरों से जुडे गोईठों का बहुत नुकसान हुआ है।

फोटो व व्हिडिओ: https://photos.app.goo.gl/JEyxhhJrSeC8xfnM9

आज हमें अवसर मिला है कोंकण को आधार देने का। इसलिये सहायता के दो स्रोत हमें निर्माण करने हैं। अगर वस्तुएँ खरीद कर देनी हैं तो संलग्न चित्र देखें और वहाँ उल्लेखित व्यक्तिओं से संपर्क करें। (वह मंदार जोशी मैं नहीं हूँ लेकिन आप उनपर भी उतना ही विश्वास कर सकते हैं।)

स्थानिकों की सहायता के लिये रोटरी क्लब ठाणे द्वारा निधि संकलन किया जा रहा है। आप से सहयोग की विनम्र प्रार्थना है।

THE THANE ROTARY CHARITY TRUST
A/C No :- 004310100015939
IFSC BKID0000068
BANK OF INDIA
PANCHPAKHADI BRANCH

अधिक माहितीसाठी संपर्क :-
मंदार मोहन जोशी - 9833836394

आपला,
अच्युत दामले
अध्यक्ष,रोटरी क्लब ठाणे.