Wednesday, November 11, 2015

वागळेची दिवाळी

रोज खाई थोतरीत
नाम त्याचे वागळे
मारणारा एक जोशी
काम मोठे आगळे

दिवाळीतले फटाके
दे दणादण वाजती
घालुनी कानात बोटे
वागळेद्वय बैसती

वसुबारस पुजतो
गाय माता आमची
बीफ मी खातो चवीने
बरळला तो वागळे

वध नरकासुराचा
कृष्णहस्ते जाहला
आजही नथ्थुरामात
वागळे तो अडकला

लक्ष्मी पुजून मात्र आज
पैसा त्याने मोजला
 नवा काढलेला
चालवावया बैसला

ओवाळती भाऊराया
भगिनी प्रेमळ आमच्या
ठेऊन सणवारा नावे
एकटा तो बैसला

नोकरी तयाला पण
तरीही आज मिळेना
ओकायला गरळ रोज
माईक काही फळेना

© मंदार दिलीप जोशी
कार्तिक शुक्ल १, शके १९३७

Saturday, October 31, 2015

हाक

हाकेसरशी धावून येणं
सदैव पाठीशी असणं
काहीच पुरेसं नव्हतं
मान्य

तुझ्या आर्त मूक हाका
ऐकू आल्या नाहीत
खोट्या हास्यामागचं
वेदनांनी होरपळलेलं मन
दिसू शकलं नाही
मान्य

तरीही इतकं सारं बिघडण्याआधी
स्वतःहून साद घालणं
फार कठीण होतं का?

---------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

अश्विन कृ. ५, शालीवाहन शके १९३७
---------------------------------------------




Monday, October 19, 2015

रावणाचे वकील अर्थात डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट

दोन दिवस झाले फेसबुकवर एक छोटीशी हिंदी कविता फिरते आहे:

मैने महसूस किया है
उस रावण का दु:ख

जो सामने खडी भीड से
बारबार पूछ रहा था...

"सच सच बताओ तुम में से कोई राम है क्या?"

उपरोक्त कविता वर वर फार साधीसुधी वाटत असली तरी फार साळसूदपणे लिहीली गेली आहे. मग त्या कवितेला उत्तर म्हणून हिंदीतच एक कविता लिहीली. अधिक हिंदी लिखाण करण्याचा मानस नाही. मात्र उत्स्फूर्तपणे सुचलेले उत्तर लिहीण्याचा मोह आवरला नाही. हे ते उत्तरः

शायद वो लेकिन भूल गया
जब हर दहलीज पे रावण है

क्यों रामावतार की राह तकें?
जब हर नर मे नारायण है

क्यों रावण से बातें कहलवाकर
अपनीं ही रोटीं सेंकते हो

बतलाओ तुम कम से कम
कितने में बिक जाते हो

आज अयोध्या की गलींयों में
घुस आयें लंकावासी हैं

रावण की पैरवी करवाने
उनसे ही ये अलफाज लिखायें हैं

Wednesday, October 7, 2015

एका सूनबाईंच्या ओव्या

बाप तो फॅसिस्ट, मुसोलीनी मित्र
डोक्यात विखार, भरलासे

सापडे सावज,  खानदानी खास
लग्न ती सत्वर, करतसे

आल्या आल्या तिने, दीराला गिळले
सासू व नवरा, सावकाश

देश खाऊनिया, पोट न भरे
ढेकरही तिजला, येत नसे

मूल मतिमंद, कन्या गतिमंद
जावई मवाली, निपजले

चिरंजीव झेप, गुरूग्रहापुढे
तर्क त्याचा भारी, एस्केपतो

गरीबी ती एक, असे मनोवस्था
भर सभेत तो, बरळला

कन्या रोज घाली, जीन्स ती टाईट
निवडणूक येता, साडी नेसे

बंगला ती बांधी, बंगला ती पाडी
देश तिच्या 'बा'ची, मालमत्ता

जावई छपरी, केला तो केला
वर डोक्यावरी, बसविला

मग जाई सत्ता, साफ होई पत्ता
चोर चव्वेचाळ, उरलेले

पंतप्रधान ते, एक ब्रह्मचारी
देशसेवा व्यसन, जडलेले

लागले धडक, कामाला जोरात
जोर त्यांचा हिला, भिववतो

काळा पैसा आता, कैसा कमवावा
मानवावे कैसे, ऐदीपण

सुचे एक युक्ती, मिळे पक्षा मुक्ती
बंद पाडूनिया, संसदेला

होऊच न द्यावे, काम काही तिथे
लोकां भडकावी, बाहेर ती

आज आंदोलने, उद्या धोंडाफेक
परवा कुणास, पेटवावे

भाऊ भाऊ तिने, भिडविले सारे
फोडाफोडी केली, घरातच

व्हॅटिकन देई, शाब्बाशी तिजला
क्रूस आणि चाँद, आनंदित......

येडी घालोनिया, सदासर्वकाळ
जनता ती फसे, किती दिन

फेसबुक देखे, देखे ती ट्विटर
जनता अडाणी, भासे हिला

जन होती सूज्ञ, देशसेवा यज्ञ
अज्ञतेचा ज्वर, त्यागोनिया

पापांचा तो घडा, भरलासे आता
जनता ती मजा, बघतसे

पुन्हा निवडावे, मग कमळास
रक्तपाती हात, नाकारुन

पाच वर्ष पुन्हा, प्रधानसेवक
आणावे ते मग, निवडून

हातामध्ये हात, त्याची वाताहात ।
होई भविष्यात, मंद्या म्हणे ।। 

-----------------------------------------------------------------
या ओव्यांचा कुठल्याही शहाण्या, अर्धवट, किंवा ठार वेड्या अशा मानसिक स्थिती असलेल्या व्यक्तींशी; जिवंत, अर्धमेल्या, किंवा मृत व्यक्तींशी; आणि त्यांच्या स्थान, भाषा आणि व्यवसाय वगैरेंशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
-----------------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
भाद्रपद कृ. १०, शालीवाहन शके १९३७

Monday, October 5, 2015

हाय फाय

एक दिवस अगोदर बनवायला टाकलेला चष्मा येण्याची वाट बघत कोथरुडातल्या ठरलेल्या दुकानात एका संध्याकाळी शिरलो तेव्हा आत अगोदरच एक जख्ख म्हातारी, तिचा तेवढाच जख्ख म्हातारा नवरा, त्यांची मुलगी, जावई, आणि शाळकरी नात कुठला चष्मा आणि फ्रेम निवडायची यावर तावातावाने चर्चा करताना दिसले. टिपीकल पुणेरी कोथरुडी अतीश्रीमंत हायफाय परिवार होता. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे.

आपण हायफाय आहोत हे दाखवण्याची एकही संधी ते सोडत नव्हते. आपापसात मधेमधे यथेच्छ इंग्रजी वाक्य पेरत आणि अधेमधे अतीव कष्टाने बोललेल्या मराठी वाक्यांवरही आपल्या तथाकथित हायफाय कल्चरची इंग्रजी छाप सोडत त्यांचं आपापसात आणि सेल्सगर्लशी संभाषण सुरू होतं. त्यांचे संभाषण ऐकून मलाच जाम कानकोंडं झाल्यासारखं झालं. कारण आपल्याच कुटुंबियांना भर दुकानात किती उद्धटपणे आणि काय बोलावं याचं तारतम्य साफ सुटल्यागत झालं होतं.

आजींना नवीन चष्मा/चष्मे करायचे होते. चष्म्यांची संख्या आणि फ्रेमचा दर्जा या दोन मुद्द्यांवर तावातावाने खल चालू असताना जावई हातात जुनी फ्रेम नाचवत एक मस्त आयडीयाची कल्पना सुचल्याच्या आनंदात म्हणाला, "एक स्पेअर करायचा असेल तर यातच नवीन काचा टाकूया की".

यावर त्याची बायको, म्हणजे त्या जख्ख दांपत्याची मुलगी फटकन् म्हणाली, "तू गप्प बस, my father is paying for it." आणि मग सेल्सगर्लला उद्देशून, "तुम्ही दाखवा हो, don't listen to my husband". तो बिचारा मंत्र्यालयाच्या सहाव्या मजल्यावर असलेला टवटवीत चेहरा एकदम महापालिकेतल्या चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यासारखा करत, फॉर द एन्टायर ड्युरेशन ऑफ द खरेदी, बारा वाजलेले भाव घेऊन स्वतःच्या स्मार्टफोनशी चाळे करत निमूट बसून होता.

खरं तर अशा वातावरणात मला गुदमरायला होतं. पण ही मुक्ताफळं ऐकल्या नंतर कानावर पडलेली अहंगंड, उद्धटपणा, अरेरावी, आणि श्रीमंतीचा माज यांनी ओतप्रोत भरलेली वाक्य मी एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने सोडून दिली. पण दुर्दैवाने एक वाक्य अक्षरशः कुणीतरी वितळलेलं गरम शिसं ओतावं तसं कानात शिरलं.

कुठली फ्रेम घ्यावी यावर अजूनही खल चालूच होता. आजींना जरा भारीतली फ्रेम घ्यावी असं त्यांच्या मुलीचं मत पडलं. अर्थात, तिचं काहीच जाणार नव्हतं...after all, her father was paying for it.

एका फ्रेमकडे अंगुलीनिर्देश करुन ती हातात घेऊन ती तिच्या मुलीला म्हणाली, "हीच घेऊ, चांगली आहे, after all, it might as well be her last frame" (नाहीतरी तिचीही शेवटचीच फ्रेम असणार आहे).

आता मी त्या कुटुंबाला ओळखत नव्हतो. त्यामुळे कोण जाणे, त्या म्हातारीला काही असाध्य आजारही झालेला असू शकत होता. अर्थात हा माझा त्या बाईच्या मुक्ताफळावरुन काढलेला अंदाज आहे. पण काहीही झालं असेल, कुठलाही आजार झालेला असेल, वय कितीही जास्त असेल, तरी "आपल्या आईचा हा शेवटचाच चष्मा", असं जाहीर बोलणं सोडाच, मनात तरी विचार येतोच कसा? इथे मात्र आजींची एक्स्पायरी डेट माहीत असल्यागत ती मुलगी बोलत होती.

तेवढ्यात मी मागवलेला चष्मा आला, आणि तो घेऊन मी घाईने तिथून बाहेर पडलो.

घरातल्या म्हातार्‍या माणसांनी जरी कधी, "आता काय आमचं राहिलंय", "आता सगळं झालं आता आम्ही डोळे मिटायला मोकळे", असं सहज जरी म्हणाली तरी आपण हेलावतो, आणि असं न बोलण्याबाबत त्यांना प्रेमाने दटावतो.

कालपासून विचार करतोय, त्या आजींना असं प्रेमाने कुणी दटावत असेल का? की, "जाऊदे ना आई, आता कितीसे दिवस उरलेत तुझे" असं घरीही बोललं जात असेल?"

---------------------------------------------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

भाद्रपद कृ. ८. शालीवाहन शके १९३७

Wednesday, August 12, 2015

अस्तनीतले पत्रनिखारे

याकुबने माझे पेपर चोरले त्याच वेळी
कलामांना गाडले जात होते
बातम्यांच्या ढिगात
पुस्तकातल्या जॉर्ज बर्नार्ड शॉला मी विचारलं
यांच्या लेखी कोण मोठा
म्हणालाआमच्यावेळी पत्रकर्त्यांना 
सायकल अपघात आणि संस्कृतीचा र्‍हास
यात फरक करता येत नसे
आता तर सगळंच बिघडलंय 
अगदी तुमच्या दत्ताचीही बरखा झाली 
आता बातम्याच्या महापुरातून 
कलामांचं कलेवर शोधून त्याला
पहिल्या पानावर मोठ्या टाईपात बसवणार तरी कोण?
मधेच टायगर गुरगुरला 
बदला घेईन याचा
आणि अंत्यदर्शनाला जमलेल्या पंधरा हजार 
हिरव्यागोल टोप्या म्हणाल्या
भगवीच्यांनो आता बघाच 
बड्या कबरीस्तानात 
किती मोठं स्मारक होतं तेअफझुल्ल्यापेक्षा मोठ्ठं 
अन् होतं की नाही पहा
त्याचं तीर्थस्थान
तेवढ्यात मेमनमाता कळवळली 
कितीही मोठ्या आगी लावा
पण त्या वन्हीत माझ्या छकुल्याचं सी..चं सर्टिफिकेट घालू नका रे
......आणि पुन्हा वर्तमानपत्रांना पान्हा फुटला
सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय विचारणार्‍यांपासून
डोके फिरूनच छापणार्‍यांपर्यंतचा प्रवास
सुफळ संपूर्ण झाला