Showing posts with label भारत विखंडन. Show all posts
Showing posts with label भारत विखंडन. Show all posts

Thursday, January 17, 2019

वामपंथी भारत विखंडन ४ - कम्युनिस्टांचं आणि पितृसत्ताक पद्धतीचं एवढं काय हो वाकडं?


राजीव मिश्रांची ही पोस्ट वाचल्यावर आधी फारशी पटली नाही, कारण अनुभव त्याच्या बरोबर उलट होते. मात्र ही पोस्ट पुन्हा पुन्हा वाचल्यावर आणि बराच विचार केल्यावर त्यातला मतितार्थ लक्षात आला. अर्थात पोस्टमधे काही मुद्द्यांचा राजीवजींनी उल्लेख केलेला नाही, पण एका जुन्या लेखाची आठवण झाल्यावर ट्युब पेटली.


साम्यवादी फ्रैंकफर्ट स्कूलचा विद्वान मानसशास्त्रज्ञ एरिक फ्रॉम्म याच्या म्हणण्यानुसार - "आईच्या प्रेमाच्या बरोब्बर विरुद्ध वडिलांचं प्रेम असतं. वडिलांचं प्रेम हे 'अटी आणि नियम लागू' यात मोडतं. यातला सगळ्यात त्रासदायक प्रमार हा की वडिलांचं प्रेम मिळायला मुलांना त्याच्या लायक बनावं लागतं. जर तुम्ही ऐदी आणि नालायक निपजलात तर तुम्हाला वडिलांचं प्रेम मिळत नाही....पण काही झालं तरी आईचं प्रेम मात्र मिळतंच.
हे एक अचानक केलेलं निरीक्षण नव्हे, तर साम्यवादाच्या संपूर्ण विचारसरणीच्या केंद्रस्थानी असलेला हा विचार आहे. फ्रैंकफर्ट स्कूलच्या विचारवंतांचं आयुष्य बघितलं तर एकाचंही आपल्या बापाशी पटलं नाही. जवळजवळ सगळी श्रीमंत बापाची बिघडलेली कार्टी होती. त्यांच्यापैकी एकालाही कामधंदा करायची कोणतीही महत्त्वाकांक्षा नव्हती. सगळेच्या सगळे बापाच्या पैशावर ऐश करण्यात धन्यता मानत असत. या सगळ्यांच्या तीर्थरुपांना असं वाटत असे की आपल्या मुलाने काहीतरी कामधंदा करावा, पण हे मात्र आपल्या कष्टाने यशस्वी आणि श्रीमंत झालेल्या बापाचा दुस्वास करत.

यांच्या ऐश करण्याला काही मर्यादाच नव्हत्या. रंडीबाजी, दारूबाजी आणि सर्व प्रकारची व्यसने असलेले, आणि उपजिविकेसाठी काम करणं म्हणजे काहीतरी क्षुद्र प्रकार आहे असं समजणारे हे सम्यवादी विद्वान, आपल्या दैनंदिन खर्चाचे पैसे मात्र त्याच बापाकडून घ्यायचे. जर्मनीने युद्धात पडणे, लढणे, हरणे, आणि त्यानंतर कर्ज, गरीबी आणि मंदीत बुडणे या प्रकारांचा कुठलाही विपरीत परिणाम न झालेल्या गर्भश्रीमंत ज्यूंच्या या नतद्रष्ट अवलादी होत. यांचं आयुष्य म्हणजे ऐषआरामाच्या एका गटारगंगेतून न्हाऊन पुन्हा दुसर्या ऐषारामाच्या गटारगंगेत उडी हेच होतं. यातूनच साम्यवाद्यांच्या क्रिटिकल थिअरीचा जन्म झाला ज्यात pratyek समाजात मान्यता असलेल्या प्रत्येक संस्कार आणि मर्यादा यांना तिलांजली देण्याचा पुरस्कार केला गेलेला आहे.
अशा नालायकांना बापाचं प्रेम कसं मिळणार होतं? वेगळं सांगायला नको की आपापल्या बापांशी यांचे संबंध ताणलेलेच होते.

समाजात विकृत लोकांचं एक वैशिष्ट्य आसतं - जे मला मिळालं नाही ते इतरांनाही मिळू नये. साम्यवाद हा एक प्रकारची विकृती असल्यामुळे त्यांनी कुटुंबव्यवस्था आणि प्रामुख्याने पितृसत्ताक पद्धतीचा सर्वनाश हेच आपलं ध्येय मानलं.

अपवाद आहेत, शिस्त हा प्रकार आपल्याकडे प्रामुख्याने वडिलांकडूनच येतो. उदाहरणादाखल सातच्या आत घरात आलं नाही तर आई भुवया उंचावून तुमच्याकडे बघेल, दहाच्या आत आलं नाही तर जेवलात का विचारेल, आणि बारा वाजून गेले तर तुमच्या खोलीत येऊन येऊन तुमच्या डोक्यावरुन हात फिरवून झोपल्याची खात्री करेल. पण वडिलांना मात्र या उशिराचा हिशोब द्यावा लागतो. तुम्ही केलेल्या कृत्यांची कारणं ही वडिलांना पटावी लागतात, अर्थात वडील accountability मागतात. याचा अर्थ वडिलांचं हृदय तुमच्यासाठी तुटत नाही किंवा त्यांचं तुमच्यावर प्रेम नाही असं नाही, पण वडील त्याही आधी तुमच्या कृत्यांच्या परिणामांचा विचार करत असतात.
जिथे शिस्त असते तिथे अराजक निर्माण करणं अवघड होऊन बसतं. मग राष्ट्रवाद आणि शिस्तीच्या जोरावर हतवीर्य झालेल्या जर्मनीला अवघ्या सहा वर्षात पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार्या हिटलर हा कम्युनिस्टांच्या, विशेषतः भारतीय कम्युनिस्टांच्या दृष्टीने, खर्या खोट्या अन्यायाचा पोस्टर बॉय झाला. लक्षात घ्या, कम्युनिस्टांच्या दृष्टीने खरी समस्या हिटलर नसून शिस्त म्हणजे डिसिप्लिन आहे. हिटलर हा जगन्मान्य क्रूरकर्मा होता, म्हणूनच कम्युनिस्टांच्या दृष्टीने हिटलरने जे काही केलं ते त्या सगळंच वाईट, मग तो शिस्तप्रिय असल्याने शिस्तही वाईटच. मग सुरू झाला एक सुनियोजित प्रचार. ज्या व्यक्तीला शिस्तप्रिय कारभार करण्यात रस आहे तो हिटलर. एखादी व्यक्ती कडक शिस्तीची असेल तर ती व्यक्ती हिटलर. एक हरलेला विनाशकारी हुकूमशहा. हा प्रचार इतका खोलवर रुजवला गेला की अत्याधिक शिस्तीचा भोक्ता असलेल्या कुठल्याही व्यक्तीला 'हिटलर' हे संबोधन वापरलं जाऊ लागलं, अगदी आपल्या वडिलांनाही. हीच कल्पना वडील आणि मुलांचे संबंध बिघडवायला उपयोग केली गेली.

म्हणूनच म्हणतो, ज्या मुलांना लहानपणी वडीलांचं प्रेम मिळत नाही, ते पुढे जाऊन साम्यवादी  होतात. शिस्त महत्त्वाचीच, पण आपल्या मुलांवर हातचं न राखता प्रेम करा, धपाटा घालणार्‍या हाताला गोंजारण्याचंही भान असू द्या. त्यांना योग्य मार्गदर्शन करताना त्यांच्या स्वाभिमानाचा चक्काचूर करु नका, नाहीतर पोरगं कधी टुकडे टुकडे गँगवाल्या कम्युनिस्ट गँगमधे जाईल सांगता येणार नाही.

© मंदार दिलीप जोशी
पौष शु. ११, शके १९४०

Sunday, December 23, 2018

रवांडातील वांशिक नरसंहारात चर्चचा सहभाग: भाग २ - विश्वासघात आणि उपसंहार



पहिला भाग इथे वाचता येईल 

चर्चने केलेला विश्वासघात
पहिल्या भागात उल्लेख केल्याप्रमाणे रवांडातील राजकारणात आणि समाजकारणात चर्चची प्रत्यक्ष पण तरीही अनिर्बंध सत्ता होती. आधी जर्मनी आणि मग बेल्जियमला चर्चने त्यांच्या वसाहतवादी सत्तेची पकड मजबूत करायला भरपूर मदत केली. "रिलिजियन हा सामान्य जनतेसाठी अफूसारखा आहे (Religion is the opium of the masses)" या तत्त्वावर चालणार्‍या साम्यवादाचा वारा टुट्सींना लागण्यापूर्वी त्यांचेही चर्चशी उत्तम संबंध होते. टुट्सी अभिजनवर्गाबरोबर संगनमत  करुन रवांडातील सामान्य जनतेच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रावर चर्चने ताबा मिळवला होता. टुट्सींच्या साम्यवादावरच्या वाढत्या प्रेमामुळे हादरलेल्या चर्चने मग हुटूंशी संधान बांधलं आणि टुट्सी राज्यकर्त्यांना सत्तेतून खाली खेचलं.

आता रवांडातील राज्यकर्ते हुटू होते आणि अधिकाधिक सत्ता चर्चच्या ताब्यात जात  होती. आर्चबिशप आंद्रे पेरौदिन यांनी साम्यवादाच्या अनुयायांना सैतान आणि गॉडचे शत्रू घोषित करुन टाकलं. टुट्सींना राक्षस संबोधलं जाऊ लागलं. चर्चमधे पाद्री जी प्रवचनं देत त्यात टुट्सींद्वेष ठासून भरलेला असे. टुट्सी हे गॉडच्या पृथ्वीवरील राज्यस्थापनेच्या मार्गातील अडसर असल्याचे सांगून म्हणूनच त्यांचा नायनाट केला पाहिजे हा त्या प्रवचनांमधे सांगितलं जाऊ लागलं. चर्चच्याच मदतीने सत्तेत आलेल्या हुटूंनी चर्चला सरकारच्या प्रत्येक स्तरावर स्थान देत पाद्री मंडळींची महत्त्वाच्या पदांवर नेमणूक केली. आर्चबिशप महाशय तर चक्क केंद्रीय सरकारमध्ये विराजमान होते. चर्चमधे जे सांगितलं जाईल त्याला देवाचा आणि सरकारचा आदेश मानून तो पाळण्याची सक्ती केली गेली. चर्च हे रवांडाच्या सरकरचा एक अविभाज्य अंग बनलं, आणि चर्चच्या विरोधात बोलणं हे सरकारच्या विरोधात बोलण्याइतकाच मोठा गुन्हा मानला गेला. सरकार पातळीवरच हुटू आणि टुट्सी यांच्यात असलेल्या वांशिक फरकावर बोट ठेवत टुट्सींच्या विरोधात जोरदार प्रचार सुरु झाला आणि वर म्हटल्याप्रमाणे चर्चमधे तर टुट्सींना सैतानाची माणसं म्हणून रंगवलं जाऊ लागलं.

हे सगळंं सुरु असताना टुट्सी स्वस्थ बसणं शक्यच नव्हतं. काही स्थानिक आणि परागंदा टुट्सी तरूण मंडळींनी रवांडन पेट्रिओटिक फ्रन्ट अर्थात आरपीएफची स्थापना करुन रवांडावर आक्रमण करायची तयारी केली. यात आरपीएफला यशही मिळालं पण त्याची किंमत त्यांना त्यांच्या भाइबंदांच्या प्राणांनी चुकवावी लागली. इथे आपल्याला वर उल्लेख झालेल्या अरुशा शांतता कराराकडे पहावं लागेल. राष्ट्राध्यक्ष हबयारीमाना यांनी १९९३ साली आरपीएफचे नेते पॉल कगामे यांच्याशी केलेला हा करार चर्चच्या मर्जीविरुद्ध जाऊन केलेला असल्याने तो अर्थातच चर्चला मान्य नव्हता. साक्षात चर्च या करारावर नाराज असल्याने कधीच नीट पाळला गेला नाही. साम्यवादी  हुटूंना सैतानाची माणसं घोषित केल्यामुळे चर्चच्या मते गॉड आणि सैतान यांच्यात कसलाच करार होऊ शकत नव्हता.

त्यामुळे चर्चने या करारावर सह्या झाल्या झाल्या टूट्सींविरुद्ध विखारी प्रचाराला सुरवात केली. इतकंच नव्हे, तर चर्चमधून उघडपणे टुट्सींचा खातमा करायला लोकांना प्रोत्साहित केलं गेलं. पास्टर इग्नेस यिरिर्वाहन्दी याने तर या नरसंहारात सक्रीय सहभाग घेतला आणि लोकांना टुट्सींना नामशेष कसं केलं जावं याचं चक्क प्रशिक्षण दिलं. प्रचंड प्रमाणावर बुद्धीभेद सुरु होताच. टुट्सींना ठार मारणं न्याय्य ठरवण्याकरता बायबल मधले संदर्भ दिले गेले. लोकांच्या मनावर 'तुम्ही गॉडच्या शत्रूंविरुद्ध लढत असून गॉड तुमच्या बाजूने असल्याने तुम्ही विजयी होणार आहात' हे सतत बिंबवलं गेलं. चर्चने रवांडाच्या सरकारला आणि नरसंहार करणार्या  सैन्याला पूर्ण पाठींबा जाहीर केला.

सिनेमातून आणि इतर प्रचारातून पाद्री आणि पास्टर दयाळू आणि नन अतीदयाळू ही प्रतिमा उभी करण्यात ख्रिश्चन जमात यशस्वी झाली आहे. एरवीही तसाच प्रचार सुरु असतो. पण हुटूंच्या तावडीतून जीव वाचवून कॅथलिक चर्चचा आश्रय घेणार्‍या टुट्सींना मात्र चर्च म्हणजे काय याचा अगदी प्रत्यक्ष आणि विपरीत अनुभव आला. हुटूंच्या तावडीतून कॅथलिक चर्चकडे पळणार्‍या टुट्सींची स्थिती एका कसायाच्या तावडीतून दुसर्याक कसायाकडे गेलेल्या थँक्सगिव्हिंगच्या टर्कीसारखी अवस्था झाली. प्रेमाचा धर्म म्हणून आपली जाहीरात करणार्या  आणि दयाळू म्हणवल्या जाणार्यास येशूच्या आश्रयाला गेलेल्या टुट्सींची निर्दयपणे हत्या करण्यात आली.

काही ठिकाणी विश्वासाने आश्रय मागायला गेलेल्या टुट्सींचं पाद्री आणि नन यांनी स्वागत केलं आणि मग विश्वासघात करत त्यांची हत्या केली,तर काही ठिकाणी हे काम चर्चशी संगनमत असलेल्या हुटू सैनिकांवर सोपवलं गेलं. चर्चचे पाद्री आणि नन आपल्या डोळ्यांसमोर होत असलेल्या हत्याकांडाचे मूक साक्षीदार बनून राहिले. त्यांच्या "गॉडचे शत्रू" मारले जात असताना त्यांना मधे पडायचं काहीच कारण दिसलं नाही. लोकांना चर्चमध्ये टुट्सींवर बलात्कार आणि खून करायला प्रोत्साहन देणारा फादर वेन्सेसलास मुनीश्यॅक हा दुर्दैवाने मोकळा फिरतो आहे.

एकट्या न्टारामा (Ntarama) कॅथलिक चर्चमध्ये ५००० टुट्सींचं हत्याकांड केलं गेलं. अशाच हत्या न्यामाटा (Nyamata), न्यारुबुये (Nyarubuye), स्याहिंडा (Cyahinda), न्यान्गे (Nyange)), आणि सेंट फॅमील (Saint Famille) इथे केल्या गेल्या.

यातल्या न्यान्गे पॅरीश (चर्च) येथील हत्याकांडाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. न्यान्गे पॅरीश मध्ये झालेल्या २,००० टुट्सींचे हत्याकांड तिथल्या चर्चमधले फादर अथानासे सिरोम्बा यांच्या मार्गदर्शनाखाली घडलं. फादर अथानासे याने प्रथम टुट्सींना तुतीस चर्चमध्ये आश्रय घेण्यास सांगितले आणि नंतर संपूर्ण इमारत बुलडोझरने जमीनदोस्त केली. हे पुरेसे वाटले नाही म्हणून की काय, फादर अथानासे याने हत्यारबंद हुटूंना बोलावून घेऊन इमारतीच्या ढिगार्याहतून बचावलेल्या टूट्सींना गोळ्या घालायला सांगितलं. आर्चबिशप पेरौदिनने हुटू बंडखोरांनी चालवलेल्या हत्याकांडाला चक्क बायबलमधले संदर्भांचे आधार दिले. इतकंच नव्हे पेरौदिनने स्वतः नरसंहारात उत्साहपूर्वक भाग घेतला. फादर वेंसेसलास मुन्येशयाका यांनी  तर लोकांना चक्क टुट्सी स्त्रियांवर बलात्कार आणि त्यांची हत्या करण्यास प्रोत्साहन दिले.

चर्चला संलग्न असलेल्या शाळांमध्येही विद्यार्थी आणि शिक्षकांची हत्याकांडं घडली. आपण ज्यांच्यावर विश्वास टाकला, अशा चर्चमधल्या फादर आणि नन यांनीच आपला विश्वासघात केला ही भावना जनतेसाठी सगळ्यात वेदनादायी होती.

उपसंहार
या हत्याकांडांच्या नंतर सुरवातीची काही वर्ष चर्चने त्यांच्याकडून काही अपराध घडले होते हेच नाकारलं. शेवटी तब्बल बावीस वर्षांनी चर्चने त्यांचे अपराध स्वीकारत एक माफीनामा प्रसिद्ध केला. या नरसंहारात कधी थेट तर कधी विश्वासघाताने मारल्या गेलेल्या लाखो निरपराध लोकांच्या पदरी चर्चकडून गुन्ह्याची स्वीकारोक्ती आणि एक माफीनामा या स्वरूपात क्रूर थट्टा वाट्याला आली. मालकांनी कोंबड्यांची झुंज लावावी, आणि त्यांनी काहीही विचार न करता कोणत्याही सबळ कारणाशिवाय रक्तबंबाळ होईपर्यंत किंवा अगदी जीव जाईपर्यंत एकमेकांशी झुंझत बसावं तसा हा प्रकार होता. जसं जगभर झालं, तसं इथेही मालकांच्या जागी चर्च होतं आणि झुंजणार्‍या दोन कोंबड्यांच्या जागी टुट्सी आणि हुटू.

चर्चचा हत्याकांडातील प्रत्यक्ष सहभाग रवांडातील शांतताप्रिय नागरिक आणि विशेषतः टुट्सी कधीच विसरले नाहीत. याच कारणास्तव राष्ट्राध्यक्ष पॉल कगामे यांनी अक्षरशः हजारो चर्च आणि मशीदी बंद केल्या. या नरसंहारातून धडा घेतलेल्या रवांडाच्या नागरिकांना फसवून केलेल्या धर्मांतरातून लादल्या गेलेल्या रिलिजियनसचा धोका ध्यानात आलेला आहे. त्यांच्या सुदैवाने त्यांना पॉल कगामे यांच्या रूपात अशा रक्तपिपासू वृत्तीच्या रिलिजियनस पासून आपल्या देशाला वाचवण्यासाठी सातत्याने कार्यशील असणार्‍या व्यक्तीच्या रुपात योग्य नेता मिळालेला आहे.


© मंदार दिलीप जोशी
मार्गशीर्ष कृ १, शके १९४०

टीपः आपल्याला परिचित असलेला याच विषयावरचा हॉटेल रवांडा हा सिनेमा आपण बघितला असेलच. नसेल तर आवर्जून बघा. याच बरोबर 'समटाईम्स इन एप्रिल' हा चित्रपटही बघण्यासारखा आहे.

संदर्भः
(१) विविध वर्तमानपत्रे व माहितीपट
(२) https://bit.ly/2EH9ixH

Saturday, December 22, 2018

रवांडातील वांशिक नरसंहारात चर्चचा सहभाग: भाग १ - आफ्रिकेतली गोष्ट

लहानपणी घरात मोठी माणसं काही महत्त्वाचं बोलत असली आणि आम्ही लहान मुलांनी मधेच "काय झालं, काय झालं" असा भोचकपण केला, की मोठी माणसं आमची ब्याद टळावी म्हणून "काही नाही, आफ्रिकेतली गोष्ट आहे" असं म्हणत असत आणि आम्ही तिथून सुरक्षित अंतर लांब जाईपर्यंत पुन्हा बोलणं सुरु करत नसत. तेव्हापासून आफ्रिका म्हणजे काहीतरी गूढ, अनाकलनीय असा समज मनात रुजला तो रुजलाच.

हळू हळू मोठं होता होता एक एक गोष्टी समजत गेल्या आणि या खंडाबद्दलचं कुतूहूल वाढतच गेलं. शाळेत असताना जगाचा नकाशा बघताना आफ्रिका खंडाच्या नकाशाने लक्ष वेधून घेतलं. असं काय होतं त्या नकाशात?  अनेक देशांमधली आंतरराष्ट्रीय सीमारेषा ही अक्षरशः फुटपट्टीने सरळ रेषा आखावी तशी सरळ आहे आणि अनेक ठिकाणी चक्क नव्वद किंवा पंचेचाळीस अंशाचे कोन दिसून येतात. पाश्चात्य देशांनी चर्चच्या सहाय्याने जगभरात ज्या पाचर मारून ठेवल्या आहेत त्यापैकी सगळ्यात भयानक आपल्याला आफ्रिका खंडात आढळतात.

गेल्या एका लेखात पंतप्रधान मोदींनी रवांडा देशाला त्यांच्याच गिरिन्का योजने अंतर्गत तिथूनच २०० गायी खरेदी करुन गरीब कुटुंबांना देण्याकरता भेट दिल्या त्याबद्दल लिहीलं होतं. या दौर्याहच्या निमित्ताने रवांडाबद्दलचं कुतुहूल पुन्हा जागृत झालं. या आधी एक हॉटेल रवांडा नामक चित्रपट येऊन गेला होता, पण तेव्हा तो काही ना काही कारणाने बघता आला नव्हता. तो ही या निमित्ताने पाहून घेतला.

या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी ज्या अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी केल्या त्यातली एक म्हणजे किगाली वंशहत्या स्मारकाला दिलेली भेट. रवांडात झालेला हा वंशविच्छेदाचा प्रयत्न म्हणजे बहुसंख्य हुटू जमातीने अल्पसंख्य टुट्सी जमातीचे केलेले भयानक वांशिक हत्याकांड होय. तब्बल शंभर दिवस चाललेल्या या हत्याकांडात आठ लाख टुट्सी अणि मवाळ हुटूंना आपले प्राण गमवावे लागले होते. हे हत्याकांड म्हणजे बहुसंख्यांना डावलून सातत्याने अल्पसंख्यांकांना लांगूलचालन केले की एक ना एक दिवस बहुसंख्य जनतेचा जो स्फोट होतो त्याचे प्रातिनिधिक उदाहरण मानले पाहीजे. या हत्याकांडाचे बरेचसे तपशील तेव्हा प्रकाशित झालेल्या आणि वृत्तवाहिन्यांमध्ये दाखवलेल्या बातम्यांच्या माध्यमातून जगभर पोहोचले देखील होते. दुर्दैवाने एक गोष्ट मात्र मुद्दामून पुढे येऊ दिली गेली नाही आणि ती म्हणजे या हत्याकांडात असलेला चर्चचा सक्रीय सहभाग. हो, सक्रीय सहभाग. ही गोष्ट अगदी चर्चने या हत्याकांडातील सहभागाबद्दल २० नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर माफी मागितल्यानंतरही बेमालूमपणे दडपून टाकण्यात माध्यमे यशस्वी झाली.

आफ्रिकेचा इतिहास हा अनेक टोळ्यांचा इतिहास आहे. अनेक लहान लहान राज्य आणि त्यांचे राजे किंवा प्रमुख यांचा इतिहास आहे (जुन्या हिंदी चित्रपटातले 'कबीले के सरदार' डोळ्यापुढे आणा). आफ़्रिकेतील टोळ्या हे प्रकरण आपल्या आकलनशक्तीच्या पलिकडचे आहे. त्यांना अशा प्रकारे देशात विभागून वर उल्लेख केल्याप्रमाणे कृत्रीम आणि विचित्र सीमारेषा आखणं हा पाश्चात्यांचा अमानुषपणा होता. कारण या टोळ्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांची संस्कृती सामायिक होती. पण आधी जर्मनी आणि मग बेल्जियम या वसाहतवादी राज्यकर्त्यांनी त्यांच्यात हेतूपुरस्सर दुहीचे वीष कालवले. याचाच अर्थ, आपण समजतो तसे ते वीष परंपरागत नाही.

रवांडा हा देश जर्मनीच्या ताब्यात असलेल्या पूर्व आफ्रिकेच्या भागातला एक देश. १८९४ ते १९१८ पर्यंत जर्मनीच्या ताब्यात असलेला रवांडा पहिल्या महायुद्धात झालेल्या जर्मनीच्या पराभवानंतर शेजारच्या बुरुंडी सकट बेल्जियमची वसाहत बनला. इथूनच खर्याव अर्थाने या देशाच्या ससेहोलपटीला सुरवात झाली आणि रवांडाच्या इतिहासातल्या सगळ्यात भयानक वंशविच्छेदी दंगलींचा पाया रचला गेला. त्यावेळी रवांडाच्या लोकसंख्येपैकी हुटू जमातीची टक्केवारी ८५% आणि टुट्सी जमातीचे १५% लोक होते. सातत्याने बहुसंख्य हुटू जमातीला डावलून अल्पसंख्य टुट्सी जमातीला सगळीकडे प्राधान्य दिलेले होते. अल्पसंख्य असूनही टुट्सी जमातीचा सरकारमधे दबदबा होता आणि सरकारमधील प्रमुख पदांवर त्यांचीच नेमणूक होत असे. अर्थातच बहुसंख्य हुटू हे विकासाच्या पटलावर फार मागे फेकले गेलेले होते. बेल्जियन मंडळींनी या गोष्टीचा फायदा घेत अल्प्संख्य टुट्सीना हाताशी धरून त्यांच्या मार्फत चर्चच्या माध्यमातून रवांडावर  राज्य करायला सुरवात केली. बेल्जियन राज्यकर्त्यांनी हुटू आणि टुट्सी यांच्यात आधीच धगधगत असलेल्या असंतोषाला आणखीच खतपाणी घालून दोघांमधली दरी सांधायच्या ऐवजी आणखी मोठी करण्याकडे भर दिला. याकरता त्यांनी हुटू आणि टुट्सी यांच्यात शारीरिक उंची, आकार, आणि नाकाची ठेवण यात असलेल्या नैसर्गिक फरकाच्या आधाराने भेदभाव करायला सुरवात केली.

टूट्सी जमातीत शिक्षणाचं प्रमाण भरपूर असल्याने आपल्या आसपास आणि जगात काय चाललंय याबद्दल चांगलीच जागरुकता होती तसेच नवनवीन कल्पना आणि विचारधारांबद्दल वाचन होते. यापैकी टुट्सींना साम्यवादी विचारसरणी अधिक भावली व अधिकाधिक टूट्सी त्याकडे आकर्षित होऊ लागले. साम्यवादी विचारसरणीत धर्माला स्थान नसल्याने (आठवा: धर्म ही अफूची गोळी वगैरे वगैरे) या गोष्टीमुळे चर्च हादरले आणि त्यांनी साम्यवादाला सैतानी, ख्रिस्ती विरोधी आणि निषिद्ध घोषित केले.

आतापावेतो साम्यवादी विचारसरणीने टुट्सी लोकांत चांगलाच जम बसवला होता. आता रवांडाला एक स्वतंत्र साम्यवादी देश घोषित करावे म्हणून टुट्सी लोकांनी अनेक जोरदार निदर्शने करायला सुरवात केली. आता मात्र बेल्जियन राज्यकर्त्यांचा संयम संपला आणि त्यांनी टुट्सी जमातीबरोबर असलेले संबंध तोडले व बहुसंख्य हुटू जमातीला हाताशी धरले. फार मोठा काळ टुट्सींच्या वर्चस्वाखाली होरपळलेल्या हुटूंनी पलटवार करायला सुरवात केली नसती तरच नवल होतं. आता परिस्थिती उलट झाल्याने टुट्सींची अवस्था बिकट व्हायला सुरवात झाली. अशातच १९५९ साली हुटूंनी मोठा उठाव केला आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक टुट्सींनी देशाबाहेर पलायन केले. मोठ्या प्रमाणावर टुट्सींना निर्वासित व्हावे लागल्यामुळे रवांडात आधीच अल्पसंख्य असलेल्या टुट्सींची संख्या आणखी रोडावली. एकोणिसशे साठच्या सुरवातीला म्हणजेच १९६१ साल येईपर्यंत हुटूंनी रवांडाच्या टुट्सी राजाला पदच्युत करुन रवांडाला प्रजासत्ताक घोषित केलं. परिस्थिती हाताबाहेर गेलेली पाहून १९६२ साली बेल्जियमने औपचारिकरित्या रवांडाला स्वातंत्र बहाल केलं.

देश स्वतंत्र झाला असला तरी त्यानंतरही रवांडात वांशिक हिंसा थांबली नाहीच. १९७३ साली हुटू जमातीतले मेजर जनरल जुवेनाल हबयारीमाना (Juvenal Habyarimana) सत्तेवर आले आणि पुढची दोन दशके त्यांनी रवांडावर राज्य केले. १९५९ साली झालेल्या उठावामुळे आणि सातत्याने होणार्याआ वांशिक हिंसाचारामुळे टुट्सी आजूबाजूच्या काही देशात परागंदा झालेले होते. त्यांच्यापैकी युगांडात पळालेल्या काहीनी रवांडीज पेट्रिओटिक फ्रन्ट अर्थात Rwandan Patriotic Front (RPF) नामक बंडखोरांची सेना स्थापन करुन १९९० साली रवांडावर आक्रमण केले. हे युद्ध तब्बल तीन वर्ष चालले. याचा उद्देश अर्थातच हुटूंची सत्ता उलथून टाकण्याचा होता. १९९३ साली राष्ट्राध्यक्ष जुवेनाल हबयारीमाना यांनी चर्चच्या मर्जीविरुद्ध जात आरपीएफचे नेते पॉल कगामे (Paul Kagame) यांच्याशी शांततेचा करार केला. हा करार अरुशा शांतता करार या नावाने ओळखला जातो. या कराराअंतर्गत एक काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात येऊन त्यात टुट्सींचा सहभाग असणार होता. या करारामुळे हुटूंमधला जहाल गट भडकला आणि त्यांनी या कराराविरोधात उठावाची तयारी केली. अध्यक्ष हबयारीमाना यांनीही परिस्थितीचा अंदाज घेऊन Interahamwe नामक एका हुटू बंडखोर गटाच्या स्थापनेत सहकार्य केले. Interahamwe गटाचा एकमेव उद्देश हुटू जमातीला संपवणे हाच आणि इतकाच होता. या गटाची स्थापना केल्याने आफ्रिकेच्याच नव्हे तर संपूर्ण जगात सगळ्यात क्रूर आणि अमानुष म्हणून ओळखलेल्या गेलेल्या वांशिक नरसंहाराचा पाया रचला गेला होता.


टुट्सींवर सूड उगवायची संधीच शोधणार्‍या हुटू बंडखोरांना आयतं निमित्त मिळालं ते हबयारीमाना प्रवास करत असलेलं विमान पाडलं गेल्याने. हबयारीमाना यांचं विमान विद्यमान अध्यक्ष पॉल कगामे यांच्या आदेशावरुन पाडलं गेलं असा हुटू बंडखोरांनी आरोप केला आणि टुट्सी लोकांवर भयानक अत्याचार सुरु केले. टुट्सींच्या रक्ताला चटावलेल्या हुटूंनी पुढचे शंभरावर दिवस टुट्सींची अक्षरशः कत्तल केली. आरपीएफने प्रतिकार सुरु केलेलाच होता. शेवटी आरपीएफने राजधानी किगालीवर ताबा मिळवल्यावरच परिस्थिती नियंत्रणात येऊ शकली. या नंतर अध्यक्ष पॉल कगामे यांनी रवांडामध्ये पुन्हा अशा प्रकारच्या वांशिक नरसंहाराची पुनरावृत्ती होऊ नये या करता आधीच्या सरकारने केलेल्या चुका टाळून आणि सुधारुन अनेक चांगले निर्णय घेतले. वांशिक संघर्ष टाळण्याकरता घेतलेल्या या निर्णयांपैकी सगळ्यात महत्वाचा निर्णय म्हणजे चर्च आणि मशीदींवर धडक कारवाई सुरु करणे.

चर्चचे राज्यकारभारवरील नियंत्रण आपण या भागात वाचलं. पण चर्चचा रवांडातील नरसंहारातील प्रत्यक्ष सहभाग होता तरी कसा? याबद्दल पुढच्या भागात.

© मंदार दिलीप जोशी
मार्गशीर्ष पौर्णिमा शके १९४०

संदर्भः
(१) विविध वर्तमानपत्रे व माहितीपट
(२) https://bit.ly/2EH9ixH


Saturday, April 21, 2018

कठुआ, सिरीया, आणि आपण

कठुआ येथे झालेल्या तथाकथित बलात्कार आणि खून प्रकरणानंतर तसेच अमेरिका, फ्रान्स, आणि ब्रिटन यांनी सिरीयावर पुन्हा सुरु केलेल्या बॉम्बवषावाच्या निमिताने माध्यमांनी आणि इतर घटकांनी जी राळ उधळली आहे त्यातून तरुन जायचं असेल तर काही तथ्यांचा आणि तर्कांचा खोलवर जाऊन विचार करणे भाग आहे.

मनुष्याला मन आहे आणि मन म्हटलं की भावना आल्याच. वरवर उदात्त हेतू असल्याचं दाखवत मनुष्यस्वभावातील कमकुवत बाजूंचा व्यवस्थित अभ्यास करुन त्यांचा उपयोग छुपे घाणेरडे हेतू साध्य करायला वापर केला जातो, जात आहे याची नोंद आपण घेणं आवश्यक आहे. लहान मुलांना होणारे त्रास हा विषय निघाला की साहजिकच आपण भावुक होतो. त्यातही मातृसुलभ भावनेमुळे सगळ्याच स्त्रीया लहान मुलांच्या बाबतीत खूप हळव्या असतात, मग अशा घटना घडल्यावर या हळव्या बाजूचा गैरफायदा घ्यायला काही भामटे सरसावले नाहीत तरच नवल आहे.  ही गोष्ट अधिक स्पष्ट करायला एक उदाहरण पाहूया. समजा तुम्हाला बातमी सांगितली गेली की 'सिरीयात एक ३० वर्षीय तरुण बॉम्बवर्षावात मेला" तर त्यावर तुमची प्रतिक्रिया ही फार फार तर "अरेरे वाईट झालं" या उद्गारांपलिकडे नसेल. पण वयाच्या याच आकड्यातून शून्य काढून तुम्हाला सांगितलं की 'सिरीयात बॉम्बवर्षावात ३ वर्षांचा मुलगा दगावला' तर त्यावर त्वेषाने व्यक्त होणं आणि ज्यानी कुणी हे घडवून आणलं त्याचा निषेध करणं हे तुम्हाला तुमचं नैतिक कर्तव्य वाटेल.

आपल्याला जेव्हा हे सांगितलं जातं की एका ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला, तेव्हा आपल्या मेंदूतला मातृपितृसुलभ सहानुभूतीचा कोपरा जागृत होतो, पण त्यानंतर जो भावनांचा महापूर येतो त्याच्यात मात्र दुष्प्रचार करणार्‍यांनी पेरलेल्या खोट्या बातम्यांखेरीज काहीही नसतं. कठुआत घडलेल्या घटनेनंतर आपल्या मनाच्या याच कमकुवत बाजूचा फायदा घेत सहानुभूती आणि रोषाचा ओघ हा आपल्याच धर्माची आणि संस्कृतीची बदनामी करण्याकडे वळवायचा. आणि दुसरीकडे मेलेल्या लहान मुलांचे खरेखोटे फोटो पसरवून युरोपात बहुसंस्कृतिवादाचा प्रसार करायचा आणि सिरीयातील असाद सरकारला अस्थिर करायची मोहीम चालवायची.

लहान मुलांबद्दल आपल्याला असलेल्या नैसर्गिक सहानुभूतीचा फायदा घेऊन त्याचा उपयोग भलत्याच गोष्टीसाठी करुन घेणे ही नवीन गोष्ट राहिलेली नाही. जरा मागे गेलं तर युगोस्लाव्हिया आणि सर्बियाचे नेते स्लोबोदान मिलोसोविच यांना असाद यांच्या प्रमाणेच बदनाम करुन अमेरिका आणि नेटोच्या हवाईदलांनी कोसोवो आणि सर्बियावर इतका बॉम्बवर्षाव केला की मिलोसोविच यांच्यावर जितकी मुलंमाणसं मारण्याचा आरोप होता त्याच्या कित्येक पटींनी माणसं या बॉम्बवर्षावात मारण्यात आली. वर दिलेल्या उदाहरणाचा प्रयोग अमेरिकेत करुन बघितला तरी परिणाम तोच होईल. अमेरिकेत कुणालाही विचारा की सिरीयात अमेरिकेने हस्तक्षेप करावा का? तर उत्तर नाही असंच येईल. पण हा प्रश्न विचारताना "असाद सरकारमुळे आज २० मुलं मेली" हे शेपूट जोडून दिलंत, की तीच व्यक्ती फेफरे आल्यागत उच्चरवाने मुलांचा खुनी असादला खाली खेचायचा सल्ला देईल. मग त्याचे परिणाम अधिक मुलांच्या मृत्यूमध्ये होणार असल्याचं त्याच्या गावीही नसेल.

लहान मुलांबद्दल आपल्याला असलेल्या सहानुभूतीची कारणं जैविक तर आहेतच पण इतिहासाला योग्य परिप्येक्षातून बघायला आपण अजूनही न शिकणं हे कारणही तितकंच महत्त्वाचे आहे. माध्यमं आणि इतर घटकांनी चालवलेल्या मोहिमांत लहान मुलांच्या डोक्यावर निरपराध असल्याचा शिका उमटतो आणि तशी ती खरोखरच निरपराध असतातही, पण हे जग इतकं साधं सोपं नाही. लहान मूल हे आकाशातून पडलेलं रत्न नसतं, तर ते फक्त भूतकाळ आणि भविष्यकाळ यातील एक दुवा म्हणून काम करत असतं. ते कितीही निरपराध असलं तरी ते स्वतःला भूतकाळातून आलेल्या नाचणार्‍या भुतांपासून आणि क्रूर भविष्यकाळापासून वाचवू शकत नाही. आयुष्य जगताना, जगण्यासाठी त्याच्या पूर्वजांनी ज्या पर्यायांची निवड केली त्यांची, किंमत त्याला चुकवावीच लागते भले ते पर्याय निवडण्यात त्याचा काहीही हात नसला तरीही. उदाहरणतः आपल्या पूर्वजांनी ज्या पर्यायांची निवड केली त्याचे परिणाम आपण भोगतोच आहोत; यात सद्गुण विकृतीने पछाडलेल्या हिंदू राजांचा आणि देश चालवायला काँग्रेसला उत्तम पर्याय समजणार्‍या आपल्या वाडवडिलांचाही समावेश करावा लागेल. माझ्या मुलांनाही मी निवडलेल्या पर्यायांच्या परिणामांना सामोरे जावे लागेल, त्यात त्यांचा काहीही निर्णयाधिकार नसला तरी. इतिहास हा एक कालखंड नसून सतत घडणार्‍या घटनांची एक साखळी आहे, त्यामुळे कुठल्याही घटनेला भावनावेगात वेगळं कढून पुढचे, मागचे, आणि आजूबाजूचे संदर्भ वगळून तपासल्याने त्यातले प्रयोगसिद्ध वास्तविकता बदलत नाही.

याचा विचार केला तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला "पुढे काय?" याचा विचार न करता येणे किंवा पुढे काही घडले असल्यास त्याची नोंद न घेता येणे हा आहे. सिरीयाचे अध्यक्ष असलेले असाद हे लहान मुलांचे खूनी आहेत म्हणून यांना पदच्युत करा असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपण "असाद यांना पदच्युत करणे" या नंतरच्या परिणामांचा विचार करणे सोडून दिलेले असते. सद्दाम हुसेन यांना फाशी दिल्या क्षणी इराकचा विचार करणं आपण थांबवतो.

आणि आपण असिफाच्या तथाकथित बलात्कार्‍यांना/खुन्यांना फाशी द्या असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण ही घटना देशविघातक घटक सद्ध्या सत्तारूढ असलेलं सरकार खाली खेचायला किंवा त्या सरकारचं निव्वळ अस्तित्व हे हिंदूंच्या रानटी मनोवृत्तीचे प्रतीक असल्याचा तद्दन खोटा प्रचार करायला कसं वापरुन घेत आहेत याचा विचार करणं बंद केलेलं असतं.

काय आहे, भोळसट असायला हरकत नाही. पण देव, देश, आणि धर्म यांच्याबद्दल दुष्प्रचार करणारे आपल्याला वापरुन घेतील इतकं बावळट असणं कितपत योग्य हे ज्याचे त्याने ठरवावे.

© मंदार दिलीप जोशी व Satish Verma

त्याच्या आत्याबाईची शेजारीण

हे असलं शीर्षक? काय आहे अर्थ याचा? आणि कोण तो? कोण त्याची आत्याबाई? आणि कोण त्या आत्याबाईची शेजारीण? अहो ती शेजारीण म्हणजे आपण सगळे....हो तुम्ही आम्ही सगळे.

सांगतो. यातला तो म्हणजे लेओनिड निकोलाएव नावाचा रशियन. आता त्याच्या आत्याबाईबद्दल आणि तिच्या शेजारणीबद्दल जाणून घेण्याआधी आपण सरगेई किरोव्ह (Sergei Kirov) याच्याबद्दल जाणून घेऊया. आता हा कोण आला मधेच? सांगतो.

सरगेई किरोव्ह (Sergei Kirov) हा रशियाचा क्रूरकर्मा हुकूमशहा स्टॅलिनचा उजवा हात समजला जायचा. १ डिसेंबर १९३४ साली लेनिनग्रॅड शहरात त्याची गोळी घालून हत्या करण्यात आली. हत्या करणारा होता लेओनिड निकोलाएव नावाचा ३० वर्षांचा रशियन तरुण. या हत्येमुळे संपूर्ण सोवियत रशियात प्रचंड खळबळ माजली. खुद्द स्टॅलिन मॉस्कॉतून रेल्वेगाडीतून लेनिनग्रॅडला रवाना झाला.

१ डिसेंबरला निकोलएवला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्याला गोळी घालून मारण्यात यावं असा आदेश बजावण्यात आला. यात कारण असं बाहेर आलं की निकोलाएवच्या पत्नीशी किरोव्हने अनैतिक संबंध ठेवले होते म्हणून चिडून निकोलाएवने त्याची हत्या केली. पण सोवियत रशियात अशी कारणं किती खरी असतील याची कल्पना केलेलीच बरी.

तर निकोलाएवने ही हत्या कुणाचीही मदत न घेता एकट्यानेच केल्याचं सांगितलं. पण स्टॅलिननं या घटनेचा पुरेपूर फायदा घेतला, निकोलाएवशी संबंध असलेल्या नसलेल्या अनेकांना सरळ उचलून देहदंडाची शिक्षा सुनावण्याचा त्याने सपाटा लावला. या शिक्षेविरुद्ध कुठलंही अपील करता येत नसे. निकोलाएवशी तुमचा संबंध असणं हे एकच कारण सांगितलं की अपील तर सोडाच खटलाही धड चालवला जाण्याची शक्यता शून्य होती. उचलल्या जाणार्‍यांच्यात निकोलाएवचे नातेवाईक, मित्रपरिवार, शेजारी-पाजारी कुणालाही सोडलं गेलं नाही. यात एलिझाबेथ लेरमोलो नामक एका महिलेला देहदंड मिळण्याचं कारण तुम्हाला सांगितलं तर तुम्ही चाट पडाल. ही महिला निकोलएवच्या आत्याची शेजारीण होती.

किरोव्हच्या हत्येचं निमित्त करुन स्टॅलोनने भीषण हत्याकांड आरंभलं. कम्युनिस्ट पार्टीचे हजारो कार्यकर्ता आणि सामान्य जनतेतले कोट्यावधी निरपराध नागरिकांची हत्या केली गेली. या प्रकाराची दहशत इतकी होती की सर्वसामान्य माणूस श्वास घेतानाही विचार करत असे.

किरोव्ह स्टॅलिनच उजवा हात समजला जात होता खरा, पण खरंच स्टॅलिनला त्याच्याबद्दल इतकी आत्मीयता होती?

नाही. त्यावेळच्या साहित्याचा कानोसा घेतला तर अनेकांचं असं म्हणणं होतं की किरोव्हची हत्या स्टॅलिननेच घडवून आणली होती. किरोव्ह स्टॅलिनचा उजवा हात समजला जात होता याचा अर्था त्याची लोकप्रियता सुद्धा रशियन जनतेत वाढत होती. स्टॅलिनला असा संशय होता की त्याने व कम्युनिस्ट पार्टीने ज्या सातत्याने विरोधकांच्याच नव्हे तर सामान्य नागरिकांच्या हत्या घडवून आणल्या होत्या त्याने रशियन जनता विटली होती आणि कदाचित स्टॅलिनला पदच्युत करुन किरोव्हला राष्ट्राध्यक्षपदी बसवेल.

कदाचित किरोव्हच्या हत्येत स्टॅलिनचा हात नसेलही, पण त्याच्या मृत्यूचा फायदा स्टॅलिनने पुरेपूर उचलला. क्रूरतेची परिसीमा गाठत सत्तेवरची आपली पकड त्याने घट्ट केली.

पण त्याने किरोव्हला खरंच न्याय मिळाला? 

--------------------------------------

असिफाला पण न्याय मिळायलाच हवा. कारण जानेवारीमध्ये झालेल्या हत्येची आत्ता अचानक वर येणं ही बाब संशयास्पद आहे. जवळजवळ तीन महीने हे षडयंत्र रचलं जात होतं का? कधी बोंब ठोकायला सुरवात करायची, कुणाकुणाला उचलायचं, कुठल्या समूदायाची बदनामी करायची, कुठल्या चॅनलनी कुठला मुद्दा उचलायचा याची पटकथा तर लिहीली जात नव्हती? असिफा बकरवाल समाजाची होती. बकरवाल समाजाने कधीही पाकिस्तानचे समर्थन केलेलं नाही आणि कधीही काश्मीरी स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍यांच्या कच्छपी हा समाज लागलेला नाही. त्यातून वानी सारख्या बलत्काराचा आरोप असलेल्या आणि जिलानी या फुटीरतावादी नेत्याशी संबंध असलेल्या पोलीस अधिकार्‍याला बाहेरून तपासासाठी बोलवून घेणं ही बाब संशय वाढवणारी आहे. आणखी एक बाब म्हणजे सीबीआय चौकशीला दिलेला नकार आणि मुख्य्मंत्री मेहबूबा मुफ्ती यांची धक्कादायक विधाने.

असिफाला न्याय मिळायला हवा, तिच्यावर बलात्कार झालाच असेल तर बलात्कार्‍यांना शिक्षा व्हायलाच हवी. असं ऐकलं होतं की सैन्याला मोकळिक दिली गेली तेव्हा मेहबूबांनी त्याला विरोध केला होता, पण दिल्लीहून जवळजवळ रडतरडतच परत यावं लागलं होतं. And hell hath no fury greater than a woman scorned. मुलीच्या बदल्यात जहाल अतिरेक्यांना सोडणार्‍या बापाचं रक्त आहे ते, कधी ना कधी कुठे ना कुठे  आपला रंग दाखवणारच.

असिफाला न्याय मिळायला हवा. या घटनेची निःपक्षपाती चौकशी झालीच पाहीजे, आणि जे कुणी गुन्हेगार सापडतील त्यांची जात, धर्म, पद आणि समाजातील स्थान हे न बघता शिक्षा व्हायलाच हवी.

इथे एक गोष्ट आठवली ती जाता जाता सांगतो. सहसा हिंदू समाज एक धर्म म्हणून बलात्कार्‍यांचा साथ कधीच देत नाही. मुसलमानांची इतक्या वर्षांची सोबत असूनही हा दुर्गुण हिंदूंनी अजून अंगी बाणवलेला नाही. अलिगढमधे ख्वाजा चिश्तीच्या वंशजांनी घडवलेल्या मोठ्या यौन शोषण कांडात काही हिंदूनाही सामील करुन घेतलं होतं, पण जेव्हा ते पकडले गेले तेव्हा त्यांना हिंदू समाजाने साथ दिली नाही. त्यातल्या एकाने तर हा ताण सहन न होऊन आत्महत्या केली. निर्भया कांडातल्या आरोपीने देखील तुरुंगातच आत्महत्या केली होती हे तुम्हाला आठवत असेलच.  पण चिश्ती आरोपींना मुस्लीम समाजाने दूर लोटलं नाही. त्यांच्या मागे ते ठामपणे उभे राहिले. निर्भया कांडातला तथाकथित अज्ञान आरोपी मोहम्मद अफरोजच्या पाठीशी सुद्धा मुसलमान समाज उभा राहिला. एकाही मुसलमान नेत्याने त्याचा निषेध केला नाही. महालक्ष्मी येथील शक्ती मिल्स रेप प्रकरणात सापडलेल्या मुस्लीम आरोपीची आईच त्याच्या जन्माचा दाखला घेऊन कोर्टात आली होती. तो आता मोकळा झालं आहे आणि हप्ते वसुलीचा बिझनेस करतोय. त्याच्या समाजाने त्याला साथ दिल्यामुळे.

असिफाचं निमित्त करुन नाहक हिंदू समाजाला लक्ष्य केलं जातंय. आपली जम्मूतली जनता इतकी पोलीसविरोधी कशी झाली याचीही चौकशी व्हायला हवी. वानी नावाच्या त्या पोलीस अधिकार्‍याचे चरित्र जनतेसमोर यायला हवं, आणि त्याला बाहेरून या घटनेची चौकशी करायला का आणलं गेलं याचीही चौकशी केली जायला हवी.

आणि हो, असिफाला, आणि तिच्यासारख्या सर्वांनाच, न्याय मिळायलाच हवा.

आपली निकोलाएवच्या आत्याबाईची शेजारीण व्हायची नाहीतर!

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10155668427647326&id=652482325

- © मंदार दिलीप जोशी

Sunday, March 4, 2018

रावण का उदात्तीकरण, रामनवमी, रक्षाबंधन, दशहरा, और हम

कई दिनों से इस विषय पर लिखना चाहता था, लेकिन अब रक्षाबंधन का त्यौहार करीब आ रहा है, और इस विषयपर नकारात्मक पोस्ट्स का सैलाब-सा आएगा, इसलिए लिखना आवश्यक मानता हूँ! गत कई दिनों से रावण की बड़ाई, और राम पर दोषारोपण करनेवाला एक व्होट्सऐप सन्देश चल रहा है, और कई लोगोंके पास उस में उठाए मुद्दोंपर कोई जवाब नहीं है. उस सन्देश में एक लडकी अपनी माँ से कहती है, कि उसे रावण जैसा भाई चाहिए, राम जैसा नहीं! राम ने सीता का त्याग करना, और रावण का अपनी बहन शूर्पनखा के लिए युद्ध कर अपने प्राणोंका बलिदान देना, इतना ही नहीं, सीता हरण के पश्चात् उसे स्पर्श तक नहीं करना, इन सब बातोंको इस के कारण के स्वरुप बताती है. माँ यह सुन कर अवाक रह जाती है.

अब हम इसमें से एक-एक मुद्दे की बात करेंगे. पहला मुद्दा सीता के त्याग का.

मूलत: सीता के त्याग का प्रसंग ‘उत्तर रामायण’ (उत्तर काण्ड) में पाया जाता है. ‘उत्तर’ इस संस्कृत शब्द का अर्थ होता है ‘के पश्चात’, जैसे आयुर्वेद में ‘उत्तरतंत्र’ पाया जाता है. यह उत्तरतंत्र मूल संहिता में किसी और लेखक ने जोड़ा होता है. संक्षेप में कहे, तो मूल रामायण की रचना के पश्चात उत्तर रामायण उस में जोड़ दिया गया है, और महर्षी वाल्मीकि उस के रचयिता है ही नहीं! उनका लिखा रामायण युद्धकाण्ड पर समाप्त होता है. रामायण की फलश्रुती युद्धकाण्ड के अंत में पायी जाती है, यह बात भी इसका एक प्रमाण है. किसी भी स्तोत्र के अंत में फलश्रुती होती है. फलश्रुती के समाप्ति पर रचना समाप्त होती है, यह सादा सा नियम यहाँ भी लागू होता है.

जो बात मूल रामायण में है ही नहीं, उसे बेचारे राम के माथे मढ़ने का काम यह ‘उंगली करनेवाले’ लोग करते है. लेकिन ऐसा करते हुए सीतामाता के धरणीप्रवेश के बाद प्रभु रामचन्द्रजी ने किए विलाप का जो वर्णन उत्तर रामायण में आता है, उसे वे आसानी से भुला देते है. पूरी रामायण पढ़े बगैर खुदको अक्लमंद साबित करने के लिए कपोलकल्पित बातोंकी जुगाली करने का काम करते है ये विद्वान!

कुछ अतिबुद्धिमान लोग कहेंगे, कि लव और कुश का क्या? क्या उनका जन्म हुआ ही नहीं? और उनका जन्म वाल्मीकी आश्रम में हुआ था, उस बात का क्या?

उसका जवाब यह, कि राम और सीता अयोध्या लौट आने के बाद उनके संतान नहीं हो सकती क्या? कैसे कह सकते है, कि लव और कुश का जन्म अयोध्या में नहीं हुआ था? उनका कोई जन्म प्रमाणपत्र है क्या?

फर्ज कीजिए, सीता को वन में भेज दिया गया था. क्या हम उसका कारण सिर्फ यह दे सकते है, कि ‘राम ने सीता का त्याग किया’? क्या कुछ दूसरा कारण नहीं हो सकता? धार्मिक मामलों में राजा के सलाहगार, कभी कभार तो डांट तक देनेवाले ऋषिमुनी सामान्य जनता के बनिस्पत निश्चय ही कहीं ज्यादा कट्टर होंगे. इसलिए, इस बात की संभावना लगभग न के बराबर है, कि सीता को वाल्मीकि आश्रम भेजने का निर्णय किसी की सलाह के बगैर लिया गया हो. आज के सन्दर्भों में सोचा जाए, तो उसे गर्भावस्था में अधिक सात्त्विक, निसर्गरम्य वातावरण में दिन बिताने के लिए भेजा जाना ही तर्कनिष्ठ लगता है. जिस सीता को चरित्रहीन होने के शक में त्यागा गया होता, उसे आम लोगोंसे ज्यादा ‘सनातनी’ ऋषिमुनि, साधूसंत अपने आश्रम में आराम से कैसे रहने देते? इस बारे में न तो उत्तर रामायण के रचनाकारोंने सोचा, न आज राम पर तोहमत लगाने वाले नकलची सोच रहे है.

अब अगर-मगर वाली भाषा थोड़ी परे रखते है. स्वयं सीतामाता को इच्छा हो रही थी कि उनके बच्चोंका जन्म ऋषि-आश्रम में हो, ऐसा रामायण में ही लिखा है! अब कहें!!!

अब रावण की ओर रुख करते है. रावण एक वेदशास्त्रसंपन्न विद्वान था, वीणावादन में निपुण कलाकार था, यह बात सच है. लेकिन सिर्फ यही बात उसे महान नहीं बनाती. याकूब मेमन एक चार्टर्ड अकाउंटेंट था, ओसामा बिन लादेन सिव्हिल इंजिनियर था. कई और आतंकी उच्चशिक्षित थे, और कई अन्य जीवित आतंकी भी है. उनकी शिक्षा का स्तर उन्हें महान नहीं बनाता. हम आज भी समाज में देख सकते है कि लौकिक शिक्षा सभ्यता का मापदंड नहीं हो सकती.

रावण महापापी था, लंपट था. उसकी नजर में स्त्री केवल भोगविलास की वस्तु थी. रावण ने सीता को न छूने के पीछे भी उसका एक पापकर्म छुपा हुआ है. एक दिन रावण देवलोक पर आक्रमण करने जा रहा था, और कैलास पर्वत पर उसके सैन्य ने छावनी बनाई हुई थी. उस समय उसने स्वर्गलोक की अप्सरा रम्भा को वहां से गुजरता देखा. उसपर अनुरक्त रावणने उस के साथ रत होने की इच्छा प्रकट की. (व्हॉट्सअॅरप नकलची लोगों के लिए आसान शब्दों में:- उसके साथ सोने की इच्छा प्रकट की). लेकिन रम्भा ने उसे नकारते हुए कहा, “हे रावण महाराज, मैं आप के बन्धु कुबेर महाराज के पुत्र नलकुबेर से प्यार करती हूँ, और उसे मिलने जा रही हूँ. तस्मात् मैं आप की बहू लगती हूँ. इसलिए, ऐसा व्यवहार आप को शोभा नहीं देता!”

रम्भा के इस बात का रावण पर कुछ भी असर नहीं हुआ. कहते है, कि कामातुराणां न भयं न लज्जा! रावण बोला – “हे रम्भे, तुम स्वर्गलोक की अप्सरा हो. अप्सराएं किसी एक पुरुष से शादी कर के बस नहीं सकती. तुम किसी एक की हो ही नहीं सकती!” ऐसी दलील दे कर रावण ने रम्भा का बलात्कार किया. कुबेरपुत्र नलकुबेर को जब इस बात का पता चला, तब क्रोधित हो कर उसने रावण को शाप दिया, कि तुमने रम्भा की इच्छा के बगैर उस का बलात्कार किया है, इसलिए आगे से तुम किसी भी स्त्री से उस की अनुमति के बगैर सम्बन्ध नहीं बना पाओगे. अगर तुमने ऐसा किया, तो तुम्हारे मस्तक के सात टुकडे हो कर तुम्हारी मृत्यु हो जाएगी.

इसी कारणवश सीता को प्रदीर्घ काल तक कारावास में रखने के बावजूद रावण उसे स्पर्श तक नहीं कर सका. इस बात में उसकी सात्त्विकता नहीं, बल्कि उसकी मजबूरी नजर आती है. ठीक वैसे ही, जैसे आप सिग्नल पर पुलिसवाला तैनात देख कर चुपचाप रुक, अपनी बाइक जेब्रा क्रासिंग के पीछे ले जा कर भोली सूरत बना लेते हो!

इसीलिए रावण सीता को सिर्फ जान लेने की धमकी दे सका. अनगिनत मिन्नतों के बावजूद सीता को जब वश कर न सका, तब अभिशप्त रावण ने सीता को एक साल की मोहलत दी, और कहा, की एक साल के भीतर अगर वह रावण से सम्बन्ध बनाने के लिए राज़ी न हुई तो वह उसकी हत्या कर देगा. जब हनुमान सीता से मिलने लंका गए, तब उन्होंने रावण ने सीता से “अगर तुम मुझसे अपनी मर्जी से सम्बन्ध बनाने के राज़ी न हुई तो दो महीनों के बाद मैं तुम्हारी हत्या कर दूँगा!” ऐसा कहते सुना था.

रावण सिर्फ चाटुकारिता भरी बातें सुनने का आदि था. बड़े-बुजुर्ग और हितचिंतकोंसे सलाह लेना वह हत्थक समझता था. इसलिए उसने सीतामाता को वापस भेजने और राम से शत्रुता न मोल लेने की सलाह देनेवाले अपने सगे भई बिभीषण को उसने देशनिकाला दे दिया. मंत्री शुक और खुद के दादा माल्यवान, दोनों की सही, लेकिन पसंद न आनेवाली सलाह ठुकरा कर उनको भी दूर कर दिया.

इसके ठीक विपरीत राम ने पिता के दिए वर का सम्मान करते हुए वनवास जाना पसंद किया. इतना ही नहीं, वापस बुलाने के लिए आए भाई भरत को उन्होंने राज्य की धुरा सौंप वापस भेज दिया था.

ऐसा कहा जाता कि बहन शूर्पनखा के अपमान का बदला लेने के लिए रावण ने राम से युद्ध किया. लेकिन उसी बहन के साथ रावण के बर्ताव पर कोई ध्यान नहीं देता. शूर्पनखा का वास्तविक नाम मीनाक्षी था. जवान होने पर उसने अपनी मर्जी से, रावण की अनुमति के बगैर दुष्टबुद्धि नाम के असुर के साथ विवाह तय कर लिया. दुष्टबुद्धि महत्वाकांक्षी था. रावण को ऐसा डर था कि इस शादी के पीछे दुष्टबुद्धि की मंशा रावण का राज्य हथियाने की थी. इसलिए रावण इस विवाह के खिलाफ था. लेकिन जब पत्नी मंदोदरी ने उस से प्रार्थना की, कि बहन की इच्छा मान ली जाए, रावण पसीज गया, और विवाह की अनुमति दे दी. लेकिन रावण के मन में गुस्सा अन्दर ही अन्दर सुलग रहा था. इसी के चलते बाद में उसने दुष्टबुद्धि पर हमला कर उसे मार डाला. इस बात को हम आज के समय में क्या कहते है? हां, सही पहचाना हॉनर किलिंग! क्या बहन के पति की हत्या करने वाला रावण आप को महात्मा और आदर्श भई प्रतीत होता है?

ज़ाहिर है कि इस बात से शूर्पनखा बड़ी व्यथित हो उठी. प्रतिशोध की भावना उसके मन में धधक उठी. अपने पति के हत्या के प्रतिशोध के लिए वह तड़पने लगी. ऐसे में इधर-उधर भटकते हुए उसे राम और लक्ष्मण इन रघुकुलके दो वीर पुरुष दिखाई दिए, और उस के मन में पनपती प्रतिशोध की भावना ने एक षडयंत्र पैदा हुआ. पहले राम और बादमें लक्ष्मण के प्रति अनुराग दिखाने वाली शूर्पनखा जब सीता पर झपटी, लक्ष्मण ने उसे रोक उस के नासिका और कर्ण छेद दिए. इस बात की शिकायत उसने पहले उसके भाई राक्षस खर से की. खर और दूषण दक्षिण भारत में रावण के राज्य की रखवाली करते थे. इन दो राक्षसों ने राम और लक्ष्मण पर हमला किया, और राम-लक्ष्मण ने उन का बड़ी आसानी से पारिपत्य किया. रावण का राज्य थोड़ा ही क्यों न हो, कुतरा गया, इस विचार से हर्षित शूर्पनखा रावण के सम्मुख राम और लक्ष्मण की शिकायत ले गई. अब रावण प्रचंड क्रोधित हुआ. क्यों कि राम-लक्ष्मण ने उसके राज्य में सेंध लगाकर उसकी बहन को विरूप किया, और उसके दो भाईयोंकी ह्त्या की थी. अब तक बहन के सम्मान के बारे में पूर्णतया उदासीन रावण अपने राज्य पर हमले की बात से आगबबूला हो गया, और प्रतिशोध स्वरुप उसने राम की पत्नी सीता का अपहरण किया. आगे का घटनाक्रम सर्वविदित है, मैं उसे दोहराना नहीं चाहूंगा!

रावण की हवस के बारे में और एक कथा है. एक दिन हिमालय में घूम रही रावण को ब्रह्मर्षी कुशध्वज की कन्या वेदवती दिखाई दी. स्वभाव से ही लंपट रावण का उस पर लट्टू हो जाना कोई आश्चर्य की बात न थी. उसे देखते ही रावण ने उस से बात करने की कोशिश की, और पूछा, कि वह अबतक अविवाहित क्यों थी. उसने रावण को बताया कि उसके पिता की इच्छा उसका विवाह भगवान विष्णु से करने की थी. इसका पता चलते ही वेदवती की चाहत पाने के इच्छुक एक दैत्यराज ने उनकी हत्या कर दी. पति की हत्या में ग़मगीन उस की माँ ने भी अपनी जान दे दी. तब से अपने पिता की इच्छा की पूर्ति के लिए वह श्री विष्णु की आराधना कर रही थी. अनाथ और जवान कन्या देख कर रावण का मन डोल गया और उस ने उससे उसे अपनाने की प्रार्थना की. लेकिन वेदवती का निश्चय अटल था. उसने रावण को मना कर दिया. रावण अपनी फितरत के अनुसार उसके बाल पकड़ कर उस पर जबरदस्ती करने की कोशिश करने लगा. वेदवती ने अपने बाल काट कर खुद को छुड़ा लिया और अग्निप्रवेश कर जान दे दी. मरते हुए उसने रावण को श्राप दिया कि “मैं तो अब मर जाऊंगी, लेकिन मैं फिर से जन्म ले कर तुम्हारे मृत्यु का कारण बनूँगी”!

इसके आगे की कहानी कई पर्यायों में है. एक में अग्निप्रवेश कर चुकी वेदवती को अग्निदेव बचा लेते है, और उसे अपनी पुत्री की तरह पालते है. बाद में जब रावण सीता का हरण कर ले जा रहा होता है, तब वे वेदवती और सीता को आपस में बदल देते है, और सीता को अपने पास रख लेते है. बाद में जब सीता राम को यह बात बता कर वेदवती का पत्नी के रूप में स्वीकार करने की बात कहती है, तो राम उसे एक पत्नीव्रत का हवाला दे कर मना कर देते है. तब वेदवती पुन: अग्निप्रवेश करती है. आगे पद्मावती के नाम से जन्म लेने पर वेदवती से विवाह कर श्रीनिवास के रूप में श्रीविष्णु वेदवती के पिता की इच्छा का आदर करते है.

ऐसा भी कहा जाता है कि वेदवती ही सीता के रूप में जन्म ले कर रावण के मृत्यु का कारण बनी. ऐसा है, कि मैं तो खुद उस काल में उपस्थित नहीं था. लेकिन राम पर मनगढ़ंत आरोप करनेवाले हिन्दू द्वेषी भी वहाँ थे नहीं, और उनके अनर्गल संदेशोंको सच मान नक़लचेप करनेवाले बेअक्ल लोग भी तो नहीं थे.

अत: सगी बहन के पति की शक के बिनाह पर हत्या करने वाला और दिखाई पड़ने वाली हर सुन्दर स्त्री का बलात्कार, या वैसी कोशिश करनेवाला रावण आजके बहन का आदर्श कैसे हो सकता है, यह बात मेरे समझ के परे है!

रावण की अगर तुलना करनी ही है, तो वह आज के बिल क्लिंटन, टायगर वुड्स या वैसे ही लंपट बलात्कारी से हो सकती है. सत्ता के लिए, कुर्सी बचाकर रखने के लिए जी-जान की कोशिश करने वाले आधुनिक स्वयंघोषित कमीने राजनेताओं से हो सकती है. अनेक प्रलोभनों का सामना कर आखिर तक एक-पत्नि-व्रत का पालन करने वाले राम से तो हरगिज नहीं हो सकती.

पाठकों, आप एक बड़े षडयंत्र का शिकार हो रहे है. कई तरीकोंसे हमारे मानसपटल पर यह अंकित करने की कोशिश हो रही है कि हर भारतीय चीज बेकार है. हर त्यौहार के बारे में वह त्यौहार कैसे प्रदूषण फैलाता है, कैसे प्राकृतिक संसाधनों का नाश करता है, ऐसी बाते फैलानेवाले सन्देश सोशल मीडिया पर फैलाए जा रहे है. भारतीयोंके श्रद्धास्थान राम, कृष्ण, इनपर छींटाकशी के प्रयास होते है, इतना ही नहीं, डाक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम जैसे ऋषितुल्य व्यक्तित्व को “Bomb Daddy” और संघ का लड़ाकू अजेंडा आगे ले जाने वाले भारतीय पुरुषसत्ताक पद्धति का पुरस्कर्ता कहा जाना वगैरह इसमें शामिल है. अगर यकीन न हो तो राजदीप सरदेसाई की पत्नि सागरिका घोष के लेख आन्तरजाल पर खोज कर देखें.

दुर्भाग्यवश हम भारतीयों की एक बुरी आदत है – आत्मक्लेश, आत्मपीडा! इस बारे में डाक्टर सुबोध नाइक का लिखा हुआ एक परिच्छेद उद्धृत करना चाहता हूँ: “खुद में अपना परीक्षक होना अपनी प्रगति के लिए बड़ी अच्छी बात है. लेकिन आप के अन्दर का यह समीक्षक कब आप का मूल्यमापन करने से आप का अवमूल्यन करने पर उतरता है, इसका आप को कई बार पता ही नहीं चलता. खुद के हर बात पर आप खुद को सिर्फ गरियाते है. “मेरे पास कुछ भी मूल्यवान नहीं है, मैं कभी अच्छा था ही नहीं” ऐसा आप का विश्वास बनता जाता है. खुद को गरियाए बगैर आप को अच्छा ही नहीं लगता. एक तरह से आप आत्मक्लेशक (masochist) बनते हो, और इसी में आप खप जाते हो. तब साक्षात ब्रह्मदेव भी आप की सहायता नहीं कर सकते.

जैसे यह निजी स्तर पर होता है, वैसे ही राष्ट्रीय स्तर पर भे होता है.”

प्रभु रामचंद्र साक्षात मर्यादा पुरुषोत्तम थे. उनके पैर के नाखून तक की हमारी औकात नहीं है. इसलिए इस तरह की आत्मक्लेश सहाय्यक अलगाववादी ताकतोंको प्रोत्साहन न दें. राम की आड़ में हिन्दुओं के श्रद्धास्थानों पर निशाना लगाने वाली ताकतों को बल न दें!

जाते जाते बता दूँ, शम्बूक वध की कहानी भी मूल रामायण में नहीं है!

संदर्भः
१) वाल्मीकी रामायण
२) **वैद्य परीक्षित शेवडे, डोंबिवली
३) डॉ सुबोध नाई़क
४) रामायण संबंधीत अनेक स्त्रोत

मूल लेखकः श्री मंदार दिलीप जोशी
हिंदी भाषांतर/रूपांतरः श्री कृष्णा धारासुरकर

https://goo.gl/L6L32z

Wednesday, January 31, 2018

देशाची ७३% संपत्ती १% जनतेच्या हातात - ऑक्सफॅमचा अहवाल आणि आपण

देशाची ७३% संपत्ती १% जनतेच्या हातात अशा शीर्षकाचा एक अहवाल ऑक्सफॅम (Oxfam) नामक अनेक संस्थांचे कडबोळे असलेल्या संस्थेतर्फे प्रकाशित झाल्याचे वृत्त देशातील प्रमुख वृत्तपत्रांनी तसेच बातम्यांच्या वाहिन्यांनी प्रसारित केल्याचे सगळ्यांना आठवत असेलच.

बातमीचे शीर्षक आणि अहवालाचा निष्कर्ष पाहिल्यावरच काहीतरी काळबेरं असल्याचा संशय आला होता, पण वेळ मिळताच थोडं खोलात जाऊन बघू म्हणून तेव्हा काही प्रतिक्रिया दिली नव्हती. या संबंधात थोडं वाचन केल्यावर एक मात्र नक्की समजलं की कुठल्याही आंतरराष्ट्रीय संस्थेने फार भारताचं कौतुक केल्यावर हुरळून जाऊ नये, आणि टीका केल्यावर रागही मानू नये. कारण हे अहवाल ९९% वेळा वेगवेगळ्या हितसंबंधांवर आधारित असतात आणि भारताचं किंवा भारतातल्या गरीबांचं भलं वगैरे चिंतण्याचा अजिबात हेतू नसतो.

ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर लगेचच ज्या घराण्याला भारताच्या सम्राटपद वारसाहक्काने मिळायला हवं असं वाटतं त्या घराण्याच्या अठ्ठेचाळीस वर्षांच्या युवराजांनी त्या बातमीवर झडप घालून ऑक्स्फॅमचा अहवाल डाव्होसला गेलेल्या पंतप्रधान मोदींना वाचायला सांगितला. त्यांनी अहवालातला निष्कर्ष खरा मानला असेल तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ७१ वर्षांतली मधली साधारण १५ वर्ष वगळली तर भारतावर त्यांच्याच पक्षाचं राज्य होतं हे तथ्य ते सोयिस्कररित्या विसरले व नेहमीप्रमाणे स्वतःचं हसू करुन घेतलं.


अधिक विषयांतर न करता ऑक्सफॅमकडे वळूया. जागतिक राजकारणात पडद्यामागून सूत्र हलवणारे भलतेच असतात हे आता लपून राहिलेलं नाही. पडद्यामागे असणार्‍या व्यक्तींबरोबरच अनेक स्वयंसेवी संस्थाही (NGO) जागतिक राजकारणात आपापली प्यादी हलवत असतात. अशाच संस्थांपैकी ऑक्सफॅम आहे. ऑक्सफॅमचा संस्थापक कॅनन रिचर्ड मिलफॉर्ड (Canon Richard Milford) हा एक भूतपूर्व ख्रिश्चन मिशनरी होता इतकं सांगितलं तरी संस्थेचा हेतू काय हे वेगळं सांगायला लागू नये. पण इतकी माहिती पुरेशी नसल्याने आणखी सांगणे आवश्यक आहे. या संस्थेचा जन्म दुसर्‍या महायुद्धानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या काही ख्रिस्ती धर्मप्रसारक कार्यकर्त्यांनी (Students' Christian Movement) एका संस्थेची स्थापना केली. हीच संस्था पुढे ऑक्सफॅम म्हणून प्रसिद्ध झाली.

सुरवातीच्या आक्रमक धर्मप्रसाराची जागा हळूहळू समाजसेवेच्या आणि रुग्णसेवेच्या वेष्टनात गुंडाळलेल्या धर्मपरिवर्तनाने घेतली. चर्चशी संबंधित संस्थांचे लक्ष तिसर्‍या जगातल्या भारतासारख्या भरपूर गरीबी आणि 'मागास' असलेल्या देशांकडे गेले नसते तरच नवल होते. पण या सगळ्यात मूळ हेतू हा आपण ज्यांची 'सेवा' करत आहोत अशांना स्थानिक संस्कृतीपासून वेगळं पाडणे आणि त्यांचे धर्मपरिवर्तन करुन ख्रिस्ती करणे हाच होता. मॅगडेलिन विद्यापीठात शिकत असताना ख्रिश्चन विद्यार्थी चळवळीत सक्रीय असणारा कॅनन रिचर्ड मिलफॉर्ड याने त्यानंतर काही काळ भारतात त्रावणकोर आणि आग्रा येथे मिशनरी लोकांनी चालवलेल्या महाविद्यालयांत प्राध्यापकी केली. त्या नंतर तो इंग्लंडला परतला व लिवरपूल मधल्या ख्रिश्चन विद्यार्थी चळवळीचा अर्थात Students' Christian Movementचा सचिव झाला आणि मग काही काळ ऑक्स्फर्ड विद्यापीठातल्या चर्चचा म्हणजेच सेंट मेरीज ऑक्सफर्ड या चर्चचा धर्मगुरू म्हणजे व्हिकार म्हणून काम पाहिलं. १९४२ साली याच महशयांनी Oxford Committee for Famine Relief (ऑक्स्फर्ड दुष्काळ निवारण संस्था) अर्थात ऑक्सफॅमची स्थापना केली. १९८५ साली प्रकाशित एका मार्गदर्शक पुस्तिकेत ऑक्सफॅमने संस्थेने आपल्या कार्याची व्याप्ती थेट सेवेपुरती मर्यादित न ठेवता तिसर्‍या जगातील 'राहणीमानाचा दर्जा सुधारण्याच्या' दृष्टीने वाढवण्याची गरज व्यक्त केली. या कराता ऑक्सफॅमने आपल्या 'सेवा' आणि 'विकास' कार्यांना इतर संस्थांना सोपवण्यास सुरवात केली. रोमन कॅथोलिक ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी स्वतःच्या स्वयंसेवी  संस्था काढायला सुरवात केलीच होती. Evangelical Alliance Relief Fund (TEAR) व Catholic Agency for Overseas Development (CAFOD) या सारख्या संस्थांनी ऑक्सफॅमच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या 'सेवाकार्याचा' भर दुष्काळ निवारणावरुन हलवून 'राहणीमान विकासाकडे' वळवला. आता सेवाकार्यापेक्षा समग्र मानवतेच्या कल्याणाची काळजी त्यांना सतावू लागली होती.

हे सगळं करताना ऑक्सफॅमने स्वतःचा हेतू हा धर्मनिरपेक्ष सेवाकार्य असल्याचा आव व्यवस्थित आणला होता. उपरोक्त संस्था सुद्धा सेवाकार्य करताना आपला धर्मप्रसारणाचा हेतू आणि सेवाकार्याचा लाभ ख्रिश्चनांनाच मिळत असल्याची वस्तुस्थिती अगदी खर्‍याखुर्‍या धर्मनिरपेक्ष व शुद्ध हेतू असणार्‍या देणगीदारांपासूनही लपवण्यात यशस्वी झाल्या होत्या. ऐंशीच्या दशकात मात्र आपल्या 'सेवाकार्याचे' अवलंबत्व ऑक्सफॅमने ख्रिश्चन संस्थांकडून खूपच कमी करुन सरकारी आणि 'सेक्युलर' स्वयंसेवी संस्थांकडे सोपवलं. या संस्थांमधे अगदी प्राण्यांसाठी काम करणारी पेटा असो किंवा वरवर मानवी हक्कांची बाजू घेणारी अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल संस्थासुद्धा सामील आहेत असं त्यांच्या कारभाराकडे व कारवायांकडे पाहून म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. असं केल्याने त्यांच्या ख्रिश्चन अजेंड्याकडे जनतेचं आणि देणगीदारांचं  फारसं लक्ष जाणार नाही असा त्यांचा होरा होता आणि तो खराही ठरला. असं असलं तरी आपला मूळ हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने ऑक्सफॅमने ख्रिश्चन संस्थांशी आपले संबंध घनिष्टच ठेवले होते.

अशा संस्थांचा गरीबांना मदत करता करता आणखी एक हेतू साध्य करायचा होता आणि तो म्हणजे समाजात प्रस्थापितांबद्दल आणि सरकारबद्दल असलेल्या असंतोषाला खतपाणी घालत त्याचे रूपांतर अंतर्गत कलहात करुन बंडापर्यंत गोष्टी पोहोचवणे. या कामी ख्रिश्चन एड (Christian Aid) ही संस्था पूर्वी आघाडीवर होती. वरवर सेक्युलर अशी छबी पण आतून हेतू वेगळाच हेतू अशा अनेक स्वयंसेवी संस्था आजही यात जाणता अजाणता सहभागी आहेत. भारतात अशा स्वयंसेवी संस्थांचं आदिवासी/वनवासी लोकांकडे विशेष लक्ष असतं. आदिवासी/वनवासींच्या भागात असणार्‍या खाणी आणि कारखाने व तत्सम गोष्टींत ढवळाढवळ करणे ही अशा संस्थांच्या कार्यपद्धतीचा अविभाज्य भाग आहे. भारतात अशा एन.जी.ओ. संस्थांमधे कार्यरत असणार्‍या नावांत हत्येचा आरोप असलेल्या नक्षलसमर्थक नलिनी सुंदर, बेला भाटीया अशांचा समावेश बघता या संस्थांचे कार्य काय असू शकतं या विचारानेच थरकाप होतो. नक्षलवादग्रस्त जिल्ह्यात हिंदू साधूसंतांची हत्या होते आणि मिशनर्‍यांचे कार्य मात्र निर्विघ्नपणे कसं सुरु असतं याची कारणमिमांसाही यातूनच स्पष्ट होते.

यात अंबानीने नवीन मोबाईल किंवा मोबाईलचा प्लान काढला की तो कसा कमावणार आहे आणि तुम्ही कसे गरीब अशा कंड्या पिकवण्यापासून ते नुकत्याच झालेल्या कोरेगाव-भीमा आणि वढू इथून जाणूनबुजून पसर(व)लेली दंगल समाविष्ट आहे. आर्थिक विषमतेचा बागुलबुवा दाखवून निर्माण झालेल्या असंतोषाला खतपाणी घालण्याबरोबरच जातीय भावना भडकावून बंडसदृश्य दंगल घडवून आणण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. कोपर्डी बलात्कार व हत्याकांडाच्या वेळी काय घोषणा व पोस्ट फिरत होत्या त्याची आठवण करुन देण्याची गरज नाही. त्यात पोलीस व सरकारी वकिलांनाही सोडलं गेलेलं नव्हतं. उज्ज्वल निकम यांनी विनामोबदला खटला लढवायची तयारी दाखवूनही सरकारी सोपस्कार म्हणून त्यांना दिलं गेलेलं मानधनाचं पत्र सोशल मिडीयावर फिरवून पोलीसांनी बघा किती कष्ट केले आणि हा माणूस बघा किती मलिदा खातो अशा प्रकारची पोस्ट फिरत असलेली आपल्याला आठवत असेलच. यात दुसरं तिसरं काही नसून कुठून तरी तुम्ही दबलेले/दाबलेले, पिचलेले, अत्याचारित आहात आणि तुमच्यापेक्षा श्रीमंत हे स्वत:च्या बुद्धीने व कष्टाने झालेले नसून तुमच्या जीवावर व तुम्हाला पिळूनच झालेले आहेत हेच ठसवणं आहे, आणि या कामी अशा स्वयंसेवी संस्था सक्रीय असतात. कोपर्डीच्या खटल्याला असलेली जातीय किनार अशा संस्थांना गिधाडाला मेलेला प्राणी दिसल्यावर होणार्‍या आनंदापेक्षा जास्त मोहात पाडतो. अशा संस्थांना परदेशातून आणि देशातून किती आणि कसा पैसा येतो हे एका वेगळ्या लेखाचा व संशोधनाचा विषय आहे, तेव्हा ती चर्चा इथे नको.

थोडंसं मागे जाऊन बघितलं तर मुंबईत लोकल गाड्यांवर दगड फेकण्याचं प्रमाण खूप वाढलं होतं. ही दंगलीत होणारी दगडफेक नव्हे तर रेल्वेरुळांनजिकच्या झोपडपट्टीतल्याच भरकटलेल्या तरुणांनी अधुनमधून भिरकावलेला दगड असं त्या गोष्टीचं स्वरूप होतं. रेल्वे डब्याच्या दारात उभं असणार्‍या आणि खिडकीजवळच्या जागेत म्हणजे विंडो सीटवर बसलेल्या लोकांना अर्थातच याचा सर्वाधिक त्रास झाला. प्रमाण खूप वाढलं आणि याची चर्चा टीव्ही व वर्तमानपत्रात होऊ लागली तेव्हा या जीवघेण्या प्रकाराचं चक्क समर्थन करत ही दगडफेक म्हणजे "आहे रे" आणि "नाही रे" वर्गांतल्या संघर्षाचं प्रतीक असल्याचा निर्लज्ज युक्तीवाद तेव्हा या एन.जी.ओं.नी केल्याचेही स्मरते.

तेव्हा ऑक्सफॅमच्या कार्याची मुळं किती खोलवर आणि दूरवर पसरलेली आहेत हे लक्षात घेतलं की 'देशाची ७३% संपत्ती १% जनतेच्या हातात' अशा सनसनाटी मथळ्याची बातमी ही निव्वळ देशातली आर्थिक स्थितीवर भाष्य नसून असंतोष पेरण्याच्या अत्यंत मोठ्या आणि जटील कारस्थानाचा भाग आहे हे लक्षात घ्यायला हवं.

एखादी संस्था जेव्हा भारताच्या जी.डी.पी. किंवा एकूण आर्थिक परिस्थितीबद्दल व स्थिरतेबद्दल गौरवोद्गार काढते आणि ऑक्सफॅमसारखी संस्था देशाची ७३% संपत्ती १% जनतेच्या हातात असं सांगते तेव्हा त्याने अनुक्रमे हुरळून न जाता आणि दु:खी न होता त्या मागच्या हेतूकडे बघणे हे क्रमप्राप्त ठरते.

एका लोकप्रिय जाहिरातीचं वाक्य आठवतं. दिखावे पे न जाओ, अपनी अकल लगाओ. तेव्हा 'विद्येच्या' बाबतीत 'बाळ' न राहता इथे थोडीशी अक्कल वापरली, आणि ऑक्सफॅमची कुंडलीच हातात आली की राव!

संदर्भः
OXFORD HISTORY OF THE BRITISH EMPIRE Companion Series: Britain's Experience of Empire in the Twentieth Century, Edited by Andrew Thompson व इतर.

© मंदार दिलीप जोशी
पौष कृ. ८, शके १९३९








Tuesday, September 12, 2017

लाल सलामवाले लोकहो

(अ)प्रिय लाल सलामवाले लोकहो,

तुमचा कन्हैय्याकुमार म्हणाला की माझ्या सख्ख्या बहिणीने भगव्या रंगाचे कपडे घातले तर मी तिचे कपडे फाडेन.

आमचा कन्हैय्या मानलेल्या बहिणीची वस्त्र फेडली जात असताना तिची अब्रू झाकायला तिच्या मदतीला धावून येतो.

हाच फरक आहे तुमच्या आणि आमच्या कन्हैय्यात.

सोळा हजार बायकांवरुन सोशल मिडीयावर फालतू पोस्टी फिरवणं सोपं आहे, समाजात मानाने वावरता यावं म्हणून इतक्या स्त्रियांना नवरा म्हणून स्वत:चं नाव देणारा भगवान श्रीकृष्ण होणं अशक्य.

तेव्हा तुमच्या लाल चड्डीत रहा. राम, कृष्ण वगैरे झेपायचे नाहीत तुम्हाला.

©️ मंदार दिलीप जोशी

Thursday, June 8, 2017

वामपंथी भारत विखंडन ४: चोराच्या उलट्या बोंबा आणि अर्थारोपण

समजा तुम्हाला कुणी अतिरेकी कुत्रा म्हणालं तर? तुम्हाला राग येईल ना? जो म्हणेल त्याला तुम्ही मारायला धावाल ना? कदाचित नाही. तुम्ही त्याचा प्रतिवाद कराल. काय म्हणता....तुम्ही नक्की मारायला धावून जाल??

आता पुढचा परिच्छेद वाचा. जे.एन.यु.च्या एका डाव्या विचारवंताची ही वाक्य आहेत.

"सांप्रतकाळी या देशात जी सगळ्यात मोठी फुटीरतावादी शक्ती आहे ती म्हणजे ब्राह्मणवादी हिंदू राष्ट्रवाद होय.
हा राष्ट्रवाद कुठल्याही लोकप्रिय चेहर्याच्या रूपात प्रकट होऊ शकतो.
हे एक असं सत्य आहे की ज्याला स्वीकारणे ही या देशाच्या मुक्ती आणि स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेले पहिले जोमदार पाऊल असेल.
या सत्याचा स्वीकार करायला खऱ्या देशभक्तीची, सामाजिक प्रतिबद्धतेची, आणि साहसाची आवश्यकता आहे."

साम्यवादी आणि डाव्यांना अशा प्रकारचा युक्तीवाद करण्याचं रीतसर प्रशिक्षण दिलेलं असतं आणि ते या परिच्छेदातून स्पष्टच दिसतं आहे. यात त्याने त्याच्या मते गंभीर आणि खरीच अस्तित्वात आहे असं भासवून एक समस्या मांडली आहे, तिला जबाबदार कोण याचंही उत्तर हाच इसम देतो आहे, आणि त्यासाठी काय केलं पाहीजे हेही हाच सांगतो आहे. म्हणजे प्रश्न त्याचा, आणि उत्तरही त्याचंच. अशा प्रकारे त्याने अत्यंत हुशारीने व सुसूत्र पद्धतीने शब्दांची मांडणी करुन त्याला होऊ शकणारा विरोध गुंडाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला या परिच्छेदात राष्ट्रवादाला बदनाम करायचं आहे, म्हणून तो म्हणतोय की राष्ट्रवाद चुकीचा आहे. मग तो म्हणतो आहे राष्ट्रवाद कुठल्या रूपात दिसेल ते पहा. मग त्यावर तो उपाय सांगतो आहे,

"या सत्याचा स्वीकार करायला खर्‍या देशभक्तीची, सामाजिक प्रतिबद्धतेची, आणि साहसाची आवश्यकता आहे."

अरे वा रे वा. म्हणजे राष्ट्रवाद आणि देशभक्ती या वेगवेगळ्या संज्ञा आहेत? राष्ट्रवाद म्हणजे देशभक्ती नव्हे? आणि राष्ट्रवादाचा अर्थ हिंदू राष्ट्रवाद असाच होतो? बघा, म्हणजे याने जाता जाता राष्ट्रवादालाच कशी नावं ठेवली ती!

एखाद्या शब्दामागची भावना बदनाम कशी करावी याचा वरील परिच्छेद हा उत्तम वस्तुपाठ आहे. राष्ट्राच्या रक्षणासाठी, भल्यासाठी जगणाऱ्या आणि झटणाऱ्या प्रत्येकाला एका झटक्यात बदनाम करायचं असेल, हतोत्साहित करायचं असेल तर राष्ट्रवाद या शब्दालाच बदनाम करावं - या साम्यवाद्यांनी भारतात राबवलेल्या कल्पनेने आज मूर्त स्वरूप धारण केलं आहे. आपल्याला आठवत असेल तर काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांना भेटायला गेलेल्या काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर या घटिंगणाची मुलाखत घेऊ पाहणार्‍या रिपब्लिक वाहिनीच्या वार्ताहरालाच अय्यर साहेबांनी "मी देशद्रोही वाहिनीशी बोलत नाही" असं सुनावलं. या चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे शक्ती कपूरने इतरांना चारित्र्याचे धडे देण्यागत प्रकार होता. राहुल गांधींच्या प्रत्येक भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख हटकून 'धोकादायक विचारसरणी' म्हणून होणं, आणि देशाच्या भल्याचं चिंतणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची काँग्रेस आणि साम्यवाद्यांकडून "संघी" अशी संभावना होणं, या दोन्ही गोष्टींमागची कारणं सारखीच आहेत. एकदा का राष्ट्रवाद या संज्ञेला अस्पृश्यतेचं लेबल लावलं की त्याने प्रेरित असलेली प्रत्येक गोष्ट, व्यक्ती, संस्था, आणि कार्य हे आपोआप वाईट आहे हे सिद्ध करता येतं. हे उमगलेल्या डाव्यांनी मग देशभक्ती या शब्दाला राष्ट्रवादापासून वेगळं करुन या शाब्दिक युद्धासाठी दोन पार्ट्या तयार केल्या. ज्याला देशाबद्दल खरोखर काही पडलेली आहे, जो सदोदित देशाच्या भल्याचाच विचार करतो त्याला जहाल किंवा अतिरेकी राष्ट्रवादी म्हणून विरोधी पार्टीत उभं केलं जाऊ लागलं, आणि काँग्रेस आणि साम्यवादी घटिंगणांनी आपलंही देशावर प्रेम आहे हे सिद्ध करायला "देशभक्त" हे लेबल आपल्याला स्वतःच चिकटवून घेतलं (त्यांच्या दोन पंतप्रधानांनी स्वतःलाच भारतरत्न दिलं तसंच). यात सातशे शहाईंशीं आकडा धारक शांतीप्रिय लोक या लाटेवर स्वार झाले नसते तरच नवल होतं.

हे पुरेसं नव्हतं. कारण लोक तेच तेच ऐकून एक ना एक दिवस कंटाळतात. मग प्रखर राष्ट्रवादाला तो Jingoism किंवा Fascism यांचंच दुसरं रूप असल्याचं असत्य रेटलं जाऊ लागलं. Fascism या शब्दाचा अर्थ शब्दकोशात "A political theory advocating an authoritarian hierarchical government (as opposed to democracy or liberalism)" असा आहे. आर्यावर्तात हजारो वर्ष राजेशाहीच होती व अनेक ठिकाणी अत्यंत कल्याणकारी राजे राज्य करत असंत. आपल्याला लोकशाहीशी परिचय नव्हताच असे नव्हे, कारण चाणक्याच्या काळात मर्यादित लोकशाही असलेली जनपदं असल्याचे उल्लेख आहेत. पण प्रामुख्याने राजेशाही हीच आपल्याकडे राज्यपद्धती राहिलेली आहे, आणि राजेशाही Fascism च्या व्याख्येच्या (authoritarian hierarchical government) जराशी जवळ जाणारी आहे. आपली उज्ज्वल संस्कृती व बहुसंख्य दैदिप्यमान परंपरा निर्माण होण्याचा काळ हाच आहे. मग आपल्या संस्कृती व परंपरांचा आदर करणाऱ्या केवळ संघासारख्या संघटनेचाच नव्हे तर, संघाशी अजिबात संबंध नसलेल्या पण प्रखर राष्ट्रवादी असलेल्या व्यक्ती व संस्थांची Fascist असं लेबल लाऊन बदनामी करणं आणि मग हळू हळू जो राष्ट्रवादी तो फॅसिस्ट असं समीकरण रूढ करण्याचा प्रयत्न करणं हे साम्यवादी आणि शांतीप्रिय समुदायाच्या आधुनिक कार्यपद्धतीचा भाग होता आणि आहे.

दुसर्‍या भागात आपण पाहिलं होतं, की हिटलर शिस्तीचा भोक्ता असल्याने बाकी कुणीही शिस्तप्रिय असलं की त्याला नाव ठेवायला हिटलर म्हटलं जातं कारण त्या व्यक्तीला बदनाम करायला हिटलर हे संबोधन बरं पडतं. तीच क्लुप्ती सुक्याबरोबर ओलं जाळायला निघालेले, 'लिबरल' नामक कातडं पांघरलेले डावे / साम्यवादी वापरत असतात. वरची Fascismची व्याख्या वाचली तर त्यात राष्ट्रवाद अनुस्युत असतो. म्हणूनच तुम्ही राष्ट्रवादी असलात तर त्याच बरोबर तुम्ही फॅसिस्टही होता. हे म्हणजे आपल्या अपराधाबद्दल एखादा आपल्याला लाथ घालायला निघाला तर आपला अपमान लपवायला लाथ मारणाऱ्यालाच गाढव म्हणण्या सारखं आहे, कारण शेवटी लाथ मारण्याबद्दल गाढव हा प्राणी प्रसिद्ध आहे.

राष्ट्रवादाला नाकारायला भारतीय संविधानाचा हल्ली वापर केला जाऊ लागलेला आहे. सुरवातीला दिलेल्या वामी परिच्छेदातली क्लुप्ती इथेही आपल्याला दिसते. यात विरोधी मताची मुस्कटदाबी करायला वपरलं जाणारं एक वाक्य म्हणजे "आम्ही संविधान मानतो". या विधानात "तुम्ही संविधान मानत नाही" हे गृहित धरलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संविधानात राष्ट्रवाद हा शब्द नाही, त्याच्या संदर्भातले लेखन नाही, म्हणून राष्ट्रवाद हा देशविरोधीच आहे असा भंपक सिद्धांत मांडायचा. संविधानात बदल करण्याबद्दल कुणी भाष्य केलं की संविधानाला तुम्ही हात लावायचा नाही, संविधानाबद्दल तुम्ही काही बोलायचं नाही अशी दमदाटी सुरू होते. मग आत्तापर्यंत संविधानात झालेल्या शंभराहून अधिक (ताजा गुगल शोध) सुधारणांचं काय करायचं? ते रद्ध करायचे का? या बद्दल मात्र हाताची घडी तोंडावर बोट. गंमत म्हणजे, संविधानात घुसवलेला "सेक्युलर" हा शब्द सुद्धा एका सुधारणेद्वाराच घातलेला आहे. संविधानात बदल करायचे नसतील, म्हणजेच पर्यायाने आत्तापर्यंत केलेले बदलही रद्द करायचे असतील, तर "सेक्युलर" हा शब्दही हद्दपार करावा लागेल, हे या स्वयंघोषित संविधानरक्षकांना मान्य आहे का? असा प्रश्न विचारल्यास अर्थातच "आम्ही म्हणतो तेच संविधान, तुम्हां फॅसिस्टांना काय कळतंय त्यातलं / तुम्ही फासिस्ट आहात, तुम्हाला बोलायचा हक्क नाही" या प्रकारची विधानं येऊ लागतात. "तुम्ही फासिस्ट" हे ही ठरवणारे हेच. एका विशिष्ट पुस्तकातल्या मजकूरावर टीका झाल्यावर किंवा त्यात सुधारणा करण्याची गरज व्यक्त झाल्यावर ज्याप्रमाणे दमदाटी आणि हिंसा होते, तशीच दमदाटी संविधानाच्या नावावरही होईल अशी कल्पनाही खुद्द संविधानाच्या निर्मात्यांनीही केली नसेल.

दुसरी क्लुप्ती म्हणजे अस्तित्वात नसलेला शब्द निर्माण करायचा आणि समाजात विष पेरायला अशा शब्दांना सोडून द्यायचं. असा शब्द म्हणजे वरील वामी परिच्छेदातला Jingoism हा शब्द. हा शब्द पहिल्यांदा जॉर्ज होलिओक या ब्रिटीश इसमाने अठराशे अठ्याहात्तर साली निर्माण केला आणि वापरला. Jingoism या शब्दाचे शब्दकोषात "An appeal intended to arouse patriotic emotions" आणि "Fanatical patriotism" असे दोन अर्थ दिलेले आहेत. तर विकीपिडीया याच संज्ञेचं "Jingoism refers to nationalism in the form of aggressive foreign policy." असं वर्णन करतो. अतिरेकी राष्ट्रवाद नावाचा काही प्रकार अस्तित्वात असलाच तर तो Jingoism या संज्ञेच्या अधिक जवळ जातो. आपल्या राष्ट्राच्या रक्षणाबद्दल तीव्र भावना असणे व आक्रमक परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून त्या भावनेला जोपासणे हे नक्की कुठल्या दृष्टीकोनातून नकारात्मक आहे? पण राष्ट्रवादाला बदनाम करायचं असेल तर असे शब्द हे बनवत राहणं आणि ते वापरात आणत राहणं हे साम्यवाद्यांचं वैशिष्ठ्यच आहे. कालांतराने हे दोन शब्द इतके आलटून पालटून वापरले जाऊ लागले की त्यांचा अर्थ एकच असल्याचा समज व्हावा.

मी तुम्हाला पहिल्याच वाक्यात "तुम्हाला कुणी अतिरेकी कुत्रा म्हणालं तर" अशा अर्थाचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर आता पुढे देतो आहे. अठराशे सत्त्याहात्तर ते अठराशे अठ्याहात्तर या दरम्यान लढल्या गेलेल्या रशिया व तुर्किस्तान यांच्यातील युद्ध हे त्याची पार्श्वभूमी आहे. या युद्धाच्या तपशीलात जायचीगरज नाही. हे युद्ध सुरू असताना ब्रिटनभर असणार्‍या पब आणि संगीतसभांत एक गाणं म्हटलं जात असे. गायक जी. एच. मॅक्डरमॉट यांनी गायलेलं आणि जी. डब्ल्यू. हंट यांनी लिहीलेलं हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की अठराशे अठ्याहात्तर साली चक्क प्रिन्स ऑफ वेल्सने श्री मॅक्डरमॉट यांना स्वत:साठी खास खाजगी कार्यक्रम आयोजित करुन हे गाणं गायला लावलं. हे गाणं फारच जोशपूर्ण "बाय जीझस" या प्रार्थनावजा शपथेच्या जागी "बाय जिंगो" (by Jingo) हे शब्द वापरण्यात आले होते. एखाद्या ठिकाणी "बाय जीझस" म्हणायचं (swearing मधे जीझसला आणायचं) नसेल  तर "बाय जिंगो" हे त्याकाळी सर्रास वापरले जाणारे उद्गारवाचकशब्द होते. ते गाणं असं:

We don't want to fight but by Jingo if we do
We've got the ships, we've got the men, we've got the money too
We've fought the Bear before, and while we're Britons true
The Russians shall not have Constantinople.

याच शब्दांचा वापर करुन ब्रिटीश नागरिक जॉर्ज होलिओक यांनी Jingoism हा शब्द निर्माण करुन तो डेली न्युज या वृत्तपत्राला पाठवलेल्या पत्रात प्रथम वापरला. कालांतराने हा शब्द सामान्य वापरात घुसला...म्हणजे प्रखर राष्ट्रवादाला विरोध करण्याकरता जगभरातील घरभेद्यांच्या हातात हे कोलित मिळालं. १९१६ साली ऑस्कर सीझर नामक अमेरिकन व्यंग्यचित्रकार यांनी कढलेल्या The American War-Dog या व्यंग्यचित्रात चितारलेल्या कुत्र्याचे नाव जिंगो असे होते. आता जगातल्या १०० सर्वाधिक लोकप्रिय श्वाननामात जिंगो या नावाचा समावेश होतो.

आता मला सांगा, समजा तुम्हाला कुणी Jingoist म्हणालं तर?

------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ शु. १४, वटपौर्णिमा, शके १९३९
------------------------------------------

वामपंथी भारत विखंडन ३

Thursday, May 4, 2017

वामपंथी भारत विखंडन ३ - महागलेली देशभक्ती आणि चवताळलेला चीन

या मालिकेखाली हा लेख असला, तरी या भागाला जगत् विखंडन असेही म्हणता येईल.

 चवताळलेल्या चीन बद्दल आधी बोलूया. गेल्या दिवाळीच्या आधीची गोष्ट आहे. चीनने हाफीज सईदला अतिरेकी घोषित करण्याच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या मार्गात अडथळा निर्माण केला आणि कधी नव्हे तो अवघा भारत देश पेटून उठला. अंहं, म्हणजे चीनी वकिलातीवर मोर्चे, घोषणा वगैरे नाही. तर अत्यंत विधायक पद्धतीने जनताजनार्दनाने निषेध व्यक्त केला. तो म्हणजे चीनी वस्तूंवर बहिष्कार. बहिष्काराचे हे अस्त्र आधी स्नॅपडील वगैरेच्या माध्यमातून तावूनसुलाखून बाहेर पडलं होतं, आता त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर करावी अशी मोहीम सोशल मिडियातून सुरू झाली. चीनी मालाने बाजारपेठेत इतक्या खोलवर मुसंडी मारलेली आहे की संपूर्ण बहिष्कार ही अत्यंत अवघड होती. म्हणून मग दिवाळीच्या खरेदीतून तरी चीनी वस्तूंना लोकांनी हद्दपार करावे असे ट्रेन्ड सोशल मिडीयावर सुरु झाले आणि त्याचा परिणामही दिसू लागला.

दिवाळीत वापरले जाणारे कंदील, पणत्या, सजावटीचे सामान इत्यादी वस्तू चीनी नाहीत हे पाहून खरेदी केल्या जाऊ लागल्या. या वस्तू एक तर गेल्या वर्षीच्याच वापरायला लोक प्राधान्य देऊ लागले, किंवा रस्त्यावर विकायला बसलेल्या विक्रेत्यांकडून स्थानिक आणि ग्रामीण पातळीवर तयार झालेल्या वस्तू लोक विकत घेऊ लागले. सामान्य जनतेच्या मनातून आलेल्या या बहिष्काराची कल्पना इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल अशी कुणालाच अपेक्षा नव्हती, मात्र तो झाला हे खरे. इतका, की चीनला याची दखल घेत या बहिष्काराचा परिणाम भारतातल्या चीनच्या गुंतवणुकीवर होईल अशी चिंतावजा धमकी द्यावी लागली. मात्र या धमकीला न भीक घालता भारतीय सामान्य जनतेने हा बहिष्कार गेल्या दिवाळीपुरता का होईना यशस्वी करुन दाखवला. आम्ही काय खरेदी करावे, यावर कुणाचे नियंत्रण असूच शकत नाही, त्यामुळे चरफडत बसण्यापलिकडे चीनकडे दुसरा काहीच पर्याय उरला नाही.

चीन का चवताळला ते आपण बघितलं. आता देशभक्ती कशी महागते ते पाहूया. वर म्हटल्याप्रमाणे चीनी मालाने भारतीय बाजारपेठेत आपण कल्पनाही करु शकणार नाही अशा रीतीने खोलवर प्रवेश केला आहे. आपल्याला अर्थात ही गोष्ट माहित आहे की चीनचा हा प्रभाव त्याच्या वस्तूंच्या किंमतीवर प्रामुख्याने अवलंबून आहे. कुठलीही वस्तू किंवा सेवा यांची किंमतीमधला एक प्रमुख घटक म्हणजे त्यात गुंतलेल्या कर्मचार्‍यांचा पगार किंवा मेहनताना. कर्मचार्‍यांच्या वेतनाच्या प्रमाणात अनेक वस्तू किंवा सेवांची किंमत कमी-जास्त  होते.

इथे दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे एखादी वस्तू स्थानिक पातळीवर बनवणे महाग पडू लागले की ती बाहेर स्वस्तात बनवून घ्यावी असा विचार बळावतो. दुसरं म्हणजे आपल्यापेक्षा स्वस्तात बाहेर वस्तू बनवून मिळते हे कळलं की स्थानिक पातळीवर वस्तू बनवणे महाग आहे हे जाणवायला लागते. लक्षात घ्या एक म्हणजे "महाग पडू लागणे" आणि दुसरं म्हणजे "स्वस्त पर्याय" मिळणे.

जगात क्रमांक एकवर असणारी देशाची लोकसंख्या आणि एकाच विचारसरणीच्या पक्षाचा एकछत्री आणि मुख्य म्हणजे निरंकुश अंमल, आणि म्हणूनच प्रत्येक विरोध निर्दयपणे चिरडून काढता येण्याची क्षमता चीनकडे खचितच होती आणि आहे. वर उल्लेख केलेल्या दोन्ही गोष्टी चीनने केल्या. म्हणजे चीनने स्वस्त पर्याय उपलब्ध करुन दिलेच (मग दर्जा गेला तेल लावत, ते इकडच्या समजे पर्यंत चीन खूप खोलवर घुसला होता) पण म्हणजेच एखाद्या देशात वस्तू बनवणं महाग होईल अशी परिस्थिती निर्माण करणे हे अत्यंत कुशलतेने केलं.  इतर देशात वस्तू बनवणं महाग कसं करायचं? तर त्या देशातल्या कामगारांना आणि त्यातही प्रामुख्याने कामगार नेत्यांना हाताशी धरून विळा-हातोडावाल्या झेंड्याखाली संघटित होऊन "शोषक" मालकांच्या विरोधात लढायला फूस द्यायची. यात कामगारांनीही

लाल चीन आणि आणि त्याच्या आधी म्हणजे रशियाच्या विघटनापूर्वी अखंड सोवियत रशिया असताना क्रेमलिनचे मिंधे असलेल्या कामगार नेत्यांनी कधी न्याय्य मागण्या करुन तेवढंच पदरात पाडून घेण्यात समाधान मानलं नाही. मागण्या या कायम अवाजवी, अवास्तव, आणि मालकाला न परवडणार्‍या अशा ठेवत गेले आणि मागण्या कधीही संपू दिल्या नाहीत. मग त्या मान्य झाल्या नाहीत की संप केले गेले. हळू हळू एक तर कामगारांवर अती खर्च होत असल्यामुळे आणि अशा संपांमुळे कंपन्या चालू ठेवणं आणि त्यांत वस्तू बनवणं आणि विकणं हे उद्योजकांसाठी आणि विकत घेणं हे ग्राहकांसाठी "महाग पडू लागलं". परिणामस्वरूप त्या वस्तूंचे ग्राहक स्वस्त पर्याय शोधू लागणं साहजिकच म्हणायला हवं.

हेच धोरण चित्रपटांत राबवले गेले. पूर्वीचे सिनेमे आठवा - त्यांत मिलमालक आणि उद्योजक रक्तपिपासू, दुष्ट, संकुचित मनोवृत्तीचे आणि आप्पलपोटे दाखवले जायचे आणि आणि नायक असायचे गरीब पण मनाने उदार. मग ते कारखान्यात संप का घडवून आणेनात, आणि कामगारांना खायचे वांदे का होईनात, व्हिलन मात्र मालक! (त्यात हमखास नायकाचे प्रेम मिलमालकाच्या मुलीबरोबर किंवा बहिणीबरोबर जमायचे आणि त्याला विरोध करणारे मिलमालक अर्थातच व्हिलन. असो. हे विषयांतर झाले. हा विषय पुढच्या भागात नक्की). अगदी कोपर्‍यावरच्या किराणा किंवा कुठल्याही दुकानाचा मालक किंवा व्यापारी सुद्धा मारवाडी पोषाखातला अत्यंत स्थूल वा बेढब दिसणारा, काहीतरी सेठ वगैरे नाव असलेला, मुलींवर वाईट नजर असलेला (त्यात नायिका किंवा नायकाची बहीण हमखास), आणि लोकांना लुटायला तत्पर असा पूर्वीच्या सिनेमातून दाखवला जायचा.

मग दिवाळीच्या कंदिल आणि पणत्यांपासून वीजेवर चालणार्‍या उपकरणांपर्यंत आणि मुलांच्या खेळण्यांपासून ते रोजच्या वापरातल्या झाडू आणि सुपलीपर्यंत सगळ्या वस्तू या "बाहेरून" विकत घेणे हेच आर्थिक गणितात बसत असेल तर मुळातच गरीब असलेल्या या देशात चीनी वस्तूंनी हातपाय पसरणे यात काहीही आश्चर्य नाही. मग कोण खिशाला चाट लावून देशातच कारखाना काढून कामगार संघटनांच्या कटकटी सहन करत बसेल? दिवाळीत एका दुकानात एका चीनी खेळण्याची किंमत आणि त्यातल्या त्यात स्वस्त भारतीय खेळण्याची किंमत विचारली, तर दोन्हीत किमान दोनशे रुपयांचा फरक होता.

आहे की नाही देशभक्ती महाग?

© मंदार दिलीप जोशी
वैशाख शु. ९, शके १९३९

Thursday, February 9, 2017

डर

डर, खौफ, भय...क्या क्या कराता है और क्या क्या करने नहीं देता इसकी सूची बडी लंबी है. और अगर डर न हो तो आदमी क्या क्या करता है इसकी भी.

हर किसी का चढता समय होता है, फिर उसका चरम समय होता है और अंत मे अस्त की ओर जाता ढलता समय. परंतु पेशवा बाजीराव के पराक्रम के केवल पहले दो प्रकार के समय थे, चढता और चरम. उन्होंने अपने जीवनकाल में कभी पराजय का मूंह तक नहीं देखा. श्रीमंत पेशवा बाजीराव का डर पुरे हिंदूस्थान में फैला हुआ था और उन्हें डर नामकी चीज पता नहीं थी. इसका केवल एक ही उदाहरण प्रस्तुत करता हूं.

यह कथा उस समय की है जब श्रीमंत बाजीराव की माताजी श्रीमंत राधाबाईसाहब साठ वर्ष की उम्र को पार कर चुकी थीं. यह ऐसा समय होता है जब मनुष्य को अपने जीवन का दूसरा किनारा नजर आने लगता है और तीर्थयात्रा की इच्छा होने लगती है. श्रीमंत राधाबाईसाहब को भी औरों की तरह यही अनुभूती होने लगी थी. इस यात्रा में चार महत्त्वपूर्ण तीर्थस्थल समझे जाते थे और वह थे मथुरा, गया, प्रयाग, एवं काशी.  इस यात्रा को काशीयात्रा कहा जाता था और उसका कारण था काशी का अंतिम पडाव होना. काशी में अगर यात्री की मृत्यू हो तो उसकी आत्मा का मोक्ष सुनिश्चित माना जाता था.

यह बात ध्यान मे रखिये की उस समय यातायात के साधन बहुत कम थे और कोई भी लंबी यात्रा खतरों से भरी रहती थी. यह तीर्थस्थान मुघल प्रदेश और उनके नियंत्रण में होने के कारण यात्रा से बिना कोई नुकसान पहुंचे लौटना बहुत ही कठीन था. अपने राज्य से बादशाही प्रदेश में जाना बहुत ही खतरनाक इस लिये भी था क्योंकी मुघल सरदार या किसी और राजा के सैनिकों से जान और माल दोनों को खतरा बना रहने के साथ साथ घने जंगल और असुरक्षित रास्तों पर न जाने कब जानवर, ठग, डकैत, चोर उचक्के मिल जायें. इसी लिये लोग बहुत बडे झुंडमें अथवा किसी मुहीम पर निकले हुये सैन्य के साथ ही जाया करते थे, लेकिन सब को यह अवसर कैसे प्राप्त हो?! इन्हीं कारणवश घर का कोई वृद्ध तीर्थयात्रा पे जाने की बात भी करता तो उसके घरवाले उदास हो जाते थे क्योंकि जानोमाल का खतरा तो था ही, परंतु यात्रा में बहुत समय - यहां तक की कुछ वर्ष - लगने के कारण यात्रा का जो अंतिम पडाव वाराणसी अर्थात काशी हुआ करता था वहां तक पहुंचते पहुंचते मनुष्य का अंतिम समय आ ही जाता था.

ऐसे समय में श्रीमंत राधाबाई माताजीने अपने पेशवा पुत्र के सामने उन्हें तीर्थयात्रा पर भेजने का प्रस्ताव रखा. चूंकि बाजीराव को डर नामकी चीज पता नहीं थी, उन्होंने तुरंत हामी भर दी. सन १७३५ के फरवरी महीने में श्रीमंत राधाबाई माताजी इस तीर्थयात्रा पर निकल पडीं. उनक साथ उनकी कन्या और बाजीराव की छोटी बहन भिऊबाई, भिऊबाई के पती आबाजी नाईक जोशी, और आबाजी के भाई बाबूजी नाईक थे.

नर्मदा पार करने के पश्चात श्रीमंत राधाबाई माताजी और उनके सहयात्री माळवा से होते हुए १८ मै को उदयपूर पहुंचे. वहां के राणाजीने माताजी को पूरे सन्मान के साथ राजप्रासाद मे ले जाकर गहने, वस्त्र, एवं नगद पैसे और अनेक भेटवस्तुएं देकर अतिउत्तम आदरसत्कार किया. उदयपूर में माताजी ने वर्षा ऋतू के पूरे चार माह बिताए. उदयपूर के पश्चात जयपूर के सवाई जयसिंगने भी माताजी का बहुत बढिया आदरसन्मान करते हुए एक हाथी और ढेरों रुपए दिये. अब इस बात पर ध्यान आकर्षित करना चाहूंगा की राधाबाई केवल पेशवा खानदान की एक बेचारी विधवा नहीं थीं अपितु राजनिती एवं कूटनीती की उच्च कोटि की जानकारी रखनेवाली चतुर महिला थीं. शनिवारवाडा में उनके राय को विशेष महत्त्व हुआ करता था. उदयपूर और जयपूर में उन्होंने स्वयं एवं अपने साथ आये पेशवा के राजनितीज्ञों द्वारा पर्याप्त राजनिती की बातचीत अवश्य की होगी. इस  पश्चात उदयपूर से निकलते समय जयसिंगने अपने वकीलों मे माध्यम से मुघल प्रदेश मे यात्रा आसान होने हेतू राधाबाई माताजी के लिये पारपत्रों का प्रबंध किया तथा उनके सुरक्षा के लिए कुल मिलाकर चार हजार सैनिकों को भेजा.

इसके बाद तीर्थयात्रा में राधाबाई माताजी का पहला पडाव था मथुरा. अब यहां जो हुआ वह पढकर आपको बहुत अचरज होगा परंतु वह बताने से पहले मैं आपसे अनुरोध करुंगा की आप इस लेख का पहला वाक्य फिरसे पढें - डर, खौफ, भय...क्या क्या कराता है और क्या क्या करने नहीं देता इसकी सूची बडी लंबी है.

मथुरा में उन्हे मिला वह मुघल सरदार जिसे श्रीमंत बाजीराव ने रण मे एक से अधिक बार पराजित किया था - महंमद खान बंगश. बंगश बाजीराव का शत्रू था. अगर रण मे वह सामने मिलते तो बाजीराव का सर काटने को वह उत्सुक होता. यहां तक कि किसी और समय में बाजीराव पेशवा के माताजी को वह आगे भी जाने न देकर वापस लौटा सकता था, या अपहरण कर बाजीराव से कुछ राजनयिक लाभ उठा सकता था. लेकिन बाजीराव के पराक्रम का डर पूरे हिंदूस्थान मे ऐसा फैला हुआ था कि श्रीमंत राधाबाई माताजी के मथुरा पहुंचते ही महंमद खान बंगशने उनका केवल आदरपूर्वक स्वागत ही नहीं किया अपितु माताजीका आग्रा की तरफ की यात्रा सुरक्षित हो इसका पक्का प्रबंध भी किया. इतना ही नहीं, पेशवा बाजीरव के दूत सदाशिव बल्लाळ ने पेशवा को लिखे खत मे कहा है की महंमद खान बंगश ने कहा की "मैं पेशवा की मां को मेरी मां से बिलकुल अलग नहीं समझता."


बंगशने माताजी एवं उनके सहयात्रीयों को पैसे की किसी प्रकार की कमी ना हो इसलिये उन्हें कुछ रुपये और भेंट वस्तुयें भी दी. महाराष्ट्र में खासकर ब्राह्मणों की विधवा औरतें एक विशिष्ट प्रकार की लाल साडी पहनती थीं जिसे "लाल आलवण" कहा जाता था. सर मुंडा हुआ होने के कारण उसी साडी के पहलू से हमेशा ढका हुआ रहता था. महंमद खान बंगश ने जो वस्तुएं माताजी को भेंट की उनमें ऐसी ही एक लाल साडी भी थी. अब उस समय में न तो इंटरनेट था और न टीव्ही. लेकिन किसी न किसी तरह बंगश को यह जानकारी थी की एक विधवा महिला को किस तरह की साडी देनी चाहिये और उसने वैसीही साडी को भेंट दी भी. कहा था न - डर, खौफ, भय...क्या क्या कराता है और क्या क्या करने नहीं देता इसकी सूची बडी लंबी है!

इस पश्चात माताजी एवं उनके सहयात्री काशी पहुंचे, उन्होने वहा बडा दानधर्म किया और अनेक घाट बनवाए तथा कई घाटों की मरम्मत करवायी. फिर दख्खन लौटने के पहले गया होकर वे १७३६ के  मई महिनें में पुणे लौटीं. लौटनें पर उनका पुणे के लोगों ने और शनिवारवाडा पर बडा आदरसत्कार किया गया.

यह केवल एक तीर्थयात्रा थी? बिलकुल नहीं. यह एक तीर्थयात्रा होने के साथ साथ श्रीमंत पेशवा बाजीराव के लिये एक राजनयिक विजय भी था. इस यात्रा में माताजी ने और उनके साथ गये दूतों ने न केवल राजनयिक बातचीत की उसका परिणाम ये हुआ कि दिल्ली के बादशहा महंमद शाह के दरबार में बाजीराव के पक्ष में सोचनेवाले सरदारों का एक गुट तैय्यार हुआ. आजकल लॉबींग का जो प्रभाव दिखता है यह कुछ उसी प्रकार की चीज थी.

डर, खौफ, भय...क्या क्या कराता है और क्या क्या करने नहीं देता और अगर डर न हो तो आदमी क्या क्या करता है इसका उदाहरण तो हमने देख लिया. अब अगर डर न हो तो आदमी क्या क्या करता है इसकी भी आज के समय का एक उदाहरण देखकर हम चर्चा करते हैं.

संजय लीला भन्साली के पास उसीके कथन के अनुसार बारह साल थे बाजीराव-मस्तानी फिल्म के विषय मे अनुसंधान करने हेतू. इंटरनेट के होते हुए, आधुनिक पुस्तकालय के होते हुए बारह साल के अनुसंधान के बाद उसने अपनी फिल्म में क्या दिखाया? श्रीमंत महापराक्रमी बाजीराव पेशवा की आदरणीय माताजी को सफेद साडी पहने हुए और मुंडन किये हुए सर को खुला छोड घूमनेवाली एक पागलपन का दौरा पडे महिला के रूप में पेश किया. फिल्म में पागलों की तरह कई दृश्यों मे हसते हुए दिखाया. अब माताजी को जो नहीं छोडता वह पेशवा के बाकी रिश्तेदारों को कैसे छोडता. बाजीराव की प्रथम पत्नी श्रीमंत काशीबाई साहेब के पैरों मे हमेशा दर्द रहा करता था जिस कारण वह ठीक से चल भी नहीं सकतीं थी. उन्हें मस्तानी के साथ अंग प्रत्यंग का घिनौना प्रदर्शन करते हुए नाचते हुए दिखाया गया. बाजीराव खुद मानसिक रूप से असंतुलित और उनके पुत्र नानासाहब दुष्ट और दुर्व्यवहारी दिखाया गया. और भी बहुत सी चीजें है लेकिन आप को और ज्यादा बोर नहीं करना चाहता.

जो जानकारी आजसे लगभग ढाईसो साल पहले महंमद खान बंगश को थी वह आज अनुसंधान के सारे आधुनिक संसाधन उपस्थित होते हुए भी भन्साली को नहीं होगी? सारे विश्व की खबर रखने वाले बॉलिवुडीया भन्साली को क्या यहां की औरते कैसे कपडे पहनती थीं इसकी जानकारी नहीं थी? क्या उसे बाजीराव के पुत्र नानासाहेब तथा प्रथम पत्नी काशीबाई के बारे में पर्याप्त जानकारी नहीं थी?

थी. अवश्य जानकारी थी. नहीं था तो केवल डर, खौफ, भय. गोलीयों की रासलीला रामलीला (रामलीला), बाजीराव-मस्तानी, और अब पद्मिनी जो महारानी पद्मिनी बन रही है, वो भी पद्नावती ऐसे नाम बदलकर, इन फिल्मों के जरीये भन्साली ने पूरे हिंदू समाज को खुलकर चुनौती दी है कि "देखो भै, मैं तो नही डरता आप असे. और जब डर न हो, तो आदमी क्या क्या करता है ये तो आपने देख ही लिया है. अरे  भै आप जैसे ही तो मेरी फिल्में हिट कराते हैं!"

दाऊद इब्राहीम और बाकी के अंडरवर्ल्ड का खौफ उनको व्हिलैन की तरह दिखाने की इजाजत नहीं देता, और हिंदूओं का डर रहा नहीं इसी लिये हिंदू महापुरुष और महिलाओं पर विकृत फिल्में बनाने की उद्दंडता बढती जाती है.

डर, खौफ, भय...क्या क्या कराता है और क्या क्या करने नहीं देता इसकी सूची बडी लंबी है. और अगर डर न हो तो आदमी क्या क्या करता है इसकी भी. अब दूसरे प्रकार का उदाहरण भी आपने देख लिया.

सोचिये, अगर हमारे राष्ट्रपुरुषों एवं महिलाओं का अपमान रोकना है, तो डर कैसे पैदा करना है. या फिर क्रियेटिव्हीटी देखने फिल्म देखनी है, तो देखिये. कुछ ही सालों बाद डर आपके दरवाजे तक होगा. सोचिये. बाकी जो है, सो हैई है.

इस विषय पर एक अलग लेख:  https://mandarvichar.blogspot.com/2017/02/blog-post_3.html

© मंदार दिलीप जोशी
माघ  शु. १३, शके १९३८

Sunday, February 5, 2017

भन्साळी पॅटर्न


हे नक्की कुठून सुरू झालंय माहित आहे? भन्साळीचा पॅटर्न लक्षात घ्या.

गोलीयों की रासलीला रामलीला
आधी त्याने सिनेमाचं नाव ठेवलं राम लीला. मग बोंबाबोंब झाल्यावर नाव बदललं गोलीयों की रासलीला रामलीला. आता बघा, सिनेमाचं नाव आणि बदललेलं नाव या दोन्हीत त्याने प्रचंड लबाडी केली आहे. सिनेमाचं नाव इतर काहीही ठेवता आलं असतं. चित्रपटातला मसाला (किंवा शेण) लक्षात घेतलं तर ऐंशी किंवा नव्वदच्या दशकातल्या कुठल्याही मसाला मारधाड चित्रपटाचं नाव उचललं असतं तरी चाललं असतं. उदाहरणत: आज का गुंडाराज, खून भरी मांग, खून और प्यार म्हणजे अक्षरशः काहीही. पण नाव काय ठेवलं? राम लीला. भारताचं सामूहिक आराध्य दैवत कोणतं? राजाधिराज रामचंद्र महाराज. मग त्यावरच हल्ला करा. तुम्ही अभिमान बाळगावा, भक्ती करावी, पूजा करावी, आदर्श जीवानाचा वस्तुपाठ घालून ध्यावा असं जे कुणी असेल त्यावरच घाला घातला जातो. रामाची भक्ती करता काय? तुम्हाला राम मंदिर बांधायचंय काय? थांबा एका थिल्लर नट, त्याहून थिल्लर नटी आणि अतिशय बकवास सिनेमाचं नावच रामलीला ठेवतो. का काय विचारता. अपमान? तो कसा काय? सिनेमातल्या हिरोंच नाव आहे ते. लीला नावाच्या हिरोईन बरोबरच्या त्याच्या लीला दाखवायच्या आहेत. मग नाव रामलीला ठेवलं तर बिघडलं कुठे?

बरं नाव बदलतानाही त्याने काय लबाडी केली आहे लक्षात आलंय का? गोलीयों की रासलीला रामलीला हे बदललेलं नाव. रासलीला हा शब्द कुणाशी संबंधित आहे? भगवान श्रीकृष्णांशी. बघा. रामलीला नाव ठेऊन एका गालावर थोबाडीत मारली. आणि मिळमिळीत विरोध बघून भन्साळीने तुमचं पाणी जोखलं आणि बदललेल्या नावाने दुसर्‍या गालावर पाच बोटं उमटवली. तुम्ही किती भेकड आहात हे त्याने एका उथळ सिनेमाच्या फक्त नावाशी खेळून तुम्हाला दाखवून दिलं. तुमचा विरोध लक्षात घेऊन नाव बदलतानाही तो तुमचा अपमान करायला विसरला नाही. आणि तुम्हीच त्याचा सिनेमा हिट केलात. वेडे रे वेडे.

बाजीराव-मस्तानी
हिंदूंवर हल्ला करुन झाला एका सिनेमात. आता पुढची पायरी म्हणजे मराठी माणूस. मराठी माणसाला तोडायचे प्रयत्न खूप पूर्वी सुरू झालेत. अगदी ऐंशीच्या दशकापासून. आणि ज्या क्लुप्त्या हिंदूंचा अपमान करण्यात वापरल्या जातात त्याच एक महत्त्वाचा फरक करुन मराठी माणसात भेदभावाची भावना रुजवण्यासाठी केले जातात. मराठा, दलित आणि ब्राह्मण यांना आपापसात झुंजवत ठेवायचं. काय बिशाद मराठी माणूस डोकं वर काढेल. आता या तीन वर्गातला फरक लक्षात घ्या. दलितांचा किंवा त्यांच्या प्रतीकांचा किंवा त्यांच्या नेत्यांचा अपमान झाल्याचा नुसता संशय जरी आला तरी अ‍ॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत तक्रार केली जाऊ शकते. या कायद्या अंतर्गत जामीन मिळू शकत नाही. शिवाय निदर्शनं आणि हिंसेची भीती आहेच. मराठा समाजाच्या प्रतीकांवर सिनेमा बनवायची कल्पनाही कुणी करु शकत नाही कारण ब्रिगेडसारख्या संघटनांची दहशत. मग ज्यांच्या प्रतीकांवर आणि आदरणीय पुरुषांवर हिणकस सिनेमा काढला तर कुणी ब्र सुद्धा काढणार नाही असं कोण? सगळ्यात उत्तम सॉफ्ट टार्गेट कोण? ब्राह्मण.

तुमच्यातला सगळ्यात पराक्रमी पुरुष कोण? आता यावर वाद होऊ शकेल पण त्यातही तुम्हाला ज्याची कमी माहिती आहे पण ज्याचा पराक्रम अतुलनीय आहे असा माणूस मी निवडणार. श्रीमंत बाजीराव पेशवे. आणि त्याचा पराक्रम अत्यंत हास्यास्पद पद्धतीने रजनीकांत काय मारामारी करेल असा दाखवणार. तो कसा, तर एकदम एक माणूस आणि शेकडो सैनिक आणि बाणाचा वर्षाव कापत पुढे जाणारा सुपरमॅन. ते पण मस्तानीच्या प्रेमात वेडा झालेला बाजीराव एकटा सैन्यात घुसतो असं दाखवणार. म्हणजे बाजीराव हा इष्कात वेडा होऊन राज्यकारभाराला गुंडाळून ठेवणारा आणि सणक आल्यावर लढाई करणारा होता असं मी दाखवणार. मग पालखेडच्या संघर्षात अजिबात लढाई न करताही निजामाला शरण यायला लावलं ते नेमकं कसं हे दाखवून डोकं वापरावंच लागू नये. चाळीस लढाया कशा केल्या, काय डोकं वापरलं, मस्तानी किती वर्ष त्याच्या आयुष्यात होती वगैरे तपशील दाखवणारच नाही. निजाम वाघाला कुरवाळत बसलेला आणि बाजीराव तिरसटासारखा पाण्यात पाय मारत मारत चालत त्याला भेटायला गेलेला दाखवणार. तुमच्या विधवा लाल आलवणात असल्या तरी बाजीरावाची आई मात्र पांढर्‍या साडीत वेडाच्या भरात बडबडत आपलं बोडकं डोकं मिरवताना दाखवणार. त्याच्या बायकोला पायाचं दुखणं असतानाही नाचताना दाखवणार. बाजीराव वेडसर, त्यांचे चिरंजीव नानासाहेब तिरसट आणि खुनशी, नाचकाम करणारी बायको, डोक्यावर परिणाम झालाय असं वाटावं अशी आई... हे अस्संच सगळं मी दाखवणार. काय कराल तुम्ही? मी घरी बसून मस्त निदर्शनं बघतोय. एका चित्रपटगृहात सिनेमा बंद पाडल्याने मला काहीही फरक पडत नाही हो, तुमच्या दोन्ही गालांवर थोबाडीत आणि पार्श्वभागावर लाथ मारण्याचे पैसे मला केव्हाच मिळालेत. ते बघा सोशल मिडियावर जातीजातीत भांडणं कशी मस्त चाललीयेत. तुमच्या घरंदाज स्त्रीयांना पडद्यावर आंघोळ घातली, त्यांना नाचवलं. वरणभातवाले पुळचट कुठले. ब्राह्मणवाद ब्राह्मणवाद म्हणून मला हिंदूंनाच अपमानित करायचं होतं ते मी केलं. बाकीचे करतात तस्संच. हा हा हा.

पद्मिनी
आता पुढचं लक्ष्य दुसरी पराक्रमी जमात, राजपूत. तुमचं आराध्य दैवत झालं. जातीजातीत भांडणं लावून झाली. आता पुढची पायरी. तुमच्या आदरणीय स्त्रीयांवर हल्ला. कुठलंही युद्ध झालं की त्यातला एक अविभाज्य भाग म्हणज शत्रूच्या स्त्रीयांचा शीलभंग करणं, त्यांची इज्जत लुटून त्यांना नासवणं. मग हा प्रकार सिनेमाच्या माध्यमातून मानसशास्त्रीय युद्ध खेळताना कसा वर्ज्य?

असंख्य स्त्रीयांची अब्रू लुटणार्‍या अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडवर हल्ला केल्यावर आपल्या सैन्याचा पराभव दिसू लागताच त्याने आपल्याला स्पर्शच काय आपलं नखही त्याला दिसायला नको म्हणून हजारो....हो हजारो राजपूत स्त्रीयांबरोबर आगीत उडी घेऊन जोहार करणारी महाराणी पद्मिनी - तुमचा अपमान करायला याहून योग्य कोणती उमेदवार असणार?

अरे तुम्ही दोन थपडा मारल्यात, कॅमेरा फोडलात, चित्रपट निर्माण संचाला मारहाण केलीत, बस्सं! याहून जास्त काय करणार तुम्ही? मला या सगळ्याचे पैसे मिळालेत, मिळतील. माझ्या खिशाला अजिबात भोक पडलेलं नाही. लोकेशनवर नाही करु दिलंत तर जसं बाजीराव मस्तानी मधे केलं तसं कॉम्प्युटर जनरेटेड इमेजरी वापरून राजस्थानी महाल उभे करीन. पण मी हा सिनेमा काढणार. तुमच्या छातीवर नाचणार. आणि हा सिनेमा तुम्हीच येऊन हिट कराल.

कारण माहित्ये? तुम्ही भेकड आहात. स्वार्थी आहात. प्रत्यक्ष भगवान रामाच्या वेळी कुणी आलं नाही. बाजीरावाच्या वेळी इतर लोक ब्राह्मण आणि मराठी समाजाच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. आता राजपूत लोकांच्या पाठीशी कसे उभे राहतात तेच मी बघतो. काय करणार तुम्ही?

घंटा?

#पद्मिनी

© मंदार दिलीप जोशी

हिंदी रूपांतर इथे आहे

भन्साली पॅटर्न

ये सारा कहाँ से शुरू हुआ है, पता है? भन्साली का पैटर्न समझ लें आप!

रामलीला
पहले उसने फिल्म का नाम रखा था 'रामलीला'! बाद में बवाल मचने पर बदल कर 'गोलियों की रासलीला रामलीला' रख दिया। मूल नाम और बदल कर रखे नाम दोनों में ही मक्कारी साफ झलकती है।

फिल्म का नाम कुछ और भी तो रखा जा सकता था। यह जिस कदर ठेठ मसाला (या गोबर) फिल्म थी, अस्सी या नब्बे के दशक की किसी भी फिल्म का नाम इसके लिए चल जाता, जैसे कि आज का गुंडाराज, खून भरी मांग, खून और प्यार... कुछ भी चल जाता! लेकिन नामकरण हुआ 'राम लीला'। भारत का सामूहिक आराध्य दैवत कौन है? राजाधिराज रामचंद्र महाराज। तो उसपर ही हमला किया जाए, जिस पर आपको गर्व हो! आप जिसे पूजते हो, आप जिनका का आदर्श के तौर पर अनुसरण करने की कोशिश कर रहे हो, उसी श्रद्धा स्थान पर हमला किया जाए!

राम भक्ति करते हो? राम मंदिर बनाना चाहते हो? रुको! एक दो कौड़ी का भांड़ और उससे भी टुच्ची एक नचनिया लेकर मैं एक निहायत बकवास फिल्म बनाऊँगा, और नाम रखूँगा 'रामलीला'! आप कौन होते हो आक्षेप लेनेवाले? अपमान? इसमें कहाँ किसी का अपमान है? यह फिल्म के नायक का नाम है। लीला नामक नायिका के साथ रचाई गई उसकी लीलाएँ दिखाई जाएगी, तो 'रामलीला' नाम गलत कैसे हुआ भाई?

वैसे नाम बदलते हुए भी क्या शातिर खेल खेला गया है, जानते हैं? 'गोलीयों की रासलीला रामलीला' यह बदला हुआ नाम है। रासलीला यह शब्द किससे संबंधित है? भगवान श्रीकृष्णसे। देखा? रामलीला नाम रख एक गालपर तमाचा जड़ा गया। और उसका नपुंसक, क्षीण विरोध देख भन्साली ने भाँप लिया कि यहाँ और भी गुंजाइश है, और बदले हुए नाम से उसने आप के दूसरे गाल पर और पाँच उंगलियों के निशान जड़ दिए!

एक बेकार-से फिल्म के नाम के साथ खिलवाड़ कर उसने आप को यह बताया है कि आप कितने डरपोक हैं। आप के विरोध का संज्ञान लेते हुए फिल्म का नाम बदलते हुए भी वह आप का अपमान करने से नहीं चूका। और आप ने उसी फिल्म को हिट बनाया! निरे बुद्धू हो आप!

बाजीराव-मस्तानी
हिंदूंओंपर हमले को एक फिल्म में अंजाम देने के बाद अगला पड़ाव था मराठी माणूस. मराठी समाज को तोड़ने की कोशिशें एक लंबे समय से जारी है। अस्सी के दशक से ही यह काम चल रहा है। और जो तरकीबें हिंदुओं का अपमान करने के लिए प्रयुक्त होती है, उनमें एक महत्त्वपूर्ण बदलाव ला कर मराठी समाज में भेदभाव के बीज बोने के काम में लाया जाता है। मराठा, दलित और ब्राह्मण इनको यदि आपस में भिडाए रखो, तो मराठी इन्सान की क्या बिसात कि वह उभर कर सामने आए!

सनद रहे, इन तीन वर्गों में बड़ा भारी अंतर है। दलितों का, उनके नेताओं का या फिर उनके प्रतीकों का अपमान होने का शक ही काफी है किसी को सलाखों के पीछे पहुंचाने के लिए! महाराष्ट्र में दलित उत्पीड़न प्रतिबंधन कानून के तहत पुलिस कंप्लेंट हो तो पुलिस तत्काल धर लेती है। बेल नहीं होती, बंदा लंबे समय तक जेल की हवा खाता है। प्रदर्शन और हिंसा की संभावना अलग से होती है। मराठा समाज स्थानिक दबंग क्षत्रिय जाति है। उसके प्रतीकों को ठेस पहुंचाओ तो संभाजी ब्रिगेड जैसे उत्पाती संगठनों के आतंक का सामना करना पड़ता है।

तो फिर जिनके प्रतीकों और आदरणीय व्यक्तित्वों पर आसानी से हमला किया जा सकता है, घटिया से घटियातर फिल्म उनके श्रद्धास्थान के बारे में बनाने पर भी जो पलटवार तो क्या, निषेध का एक अक्षर तक नहीं कहेंगे, ऐसा कौन है? सबसे बढ़िया सॉफ्ट टार्गेट कौन? ब्राह्मण।

आपके सबसे पराक्रमी पुरुष कौन? इस पर दो राय हो सकती है। उन पर्यायों में आप को जिसके बारे में जानकारी कम है, लेकिन जिसका साहस और पराक्रम अतुलनीय आहे ऐसे किरदार का चुनाव मैं करूँगा। श्रीमंत बाजीराव पेशवा और उनका पराक्रम मैं इस तरह बचकाना दिखाऊँगा कि रजनीकांत की मारधाड़ की स्टाइल भी मात खा जाए! एक आदमी तीरों की बौछार को काटता हुआ निकल जाए, ऐसा सुपरमैन! दिखाऊँगा कि मस्तानीके प्यार में पागल बाजीराव अकेले ही शत्रु सेना से भिड़ जाता है। बाजीराव इश्क में पागल हो सारा राजपाट छोडनेवाला, और सनकी योद्धा था, ऐसे मैं दिखाऊँगा, ताकि पालखेड़ के संघर्ष में बगैर किसी के उंगली भी उठाए, बगैर किसी युद्ध के निजाम शाह को शरण आने पर मजबूर करने वाली उसकी राजनीतिक सूझबूझ दिखाने की जरूरत न पडे! लगातार 40 युद्धों में अजेय कैसे रहे, कितनी बुद्धिमत्ता का परिचय दिया, मस्तानी का साथ कितने वर्षों का रहा... दिखाना जरूरी नहीं होगा। निजाम शेर के सिर पर हाथ फेरते हुए दिखाया जाएगा, और बाजीराव उससे बात करने के लिए किसी याचक की तरह पानी में से चलते हुए सामने खडा दिखाया जाएगा! बाजीराव की माँ पागलपन का दौरा पडी विधवा दिखाई जाएगी। वस्तुतः लगभग अपाहिज पत्नी को हल्की औरत की तरह नचाया जाएगा। बाजीराव खुद मानसिक रूप से असंतुलित और उनके पुत्र नानासाहब दुष्ट और दुर्व्यवहारी दिखाए जाएँगे....

आप क्या कर लोगे? बस, केवल कुछ प्रदर्शन? खूब कीजिए! मैं घर पर बैठे हुए टीवी पर उनका मजा लूँगा। एक सिनेमा हॉल में प्रदर्शन रोकने से मुझे कोई फर्क नहीं पड़ता। हाँ, आप के दोनों गालों पर तमाचे जड़ने और पिछवाड़े में एक लात लगाने के पैसे मुझे कबके मिल चुके हैं। देखो, सोशल मीडिया पर एक जाति दूसरीसे कैसे भिडी हुई है!

मैंने आप की कुलीन स्त्रियों को पर्दे पर नहलाया। उनको मनमर्जी नचाया। दालचावल खानेवाले डरपोक लोग हो आप! ब्राह्मणवाद का ठप्पा लगाकर मुझे हिंदुओं को अपमानित करना था, सो कर लिया! ठीक वैसे ही, जैसे और लोग करते हैं। हा हा हा.

पद्मिनी
अब अगला पडाव दूसरी पराक्रमी जाति, राजपूत! आपके आराध्य को चिढ़ाना हो चुका, और जातियों को आपस में लड़ाना हो चुका। अब अगला पायदान चढते हैं। आप की आदरणीय स्त्रियों पर हमला! शत्रु की स्त्रियों का शीलभंग, उनकी इज़्ज़त लूटकर उन्हें भ्रष्ट करना किसी भी युद्ध का अविभाज्य अंग होता है। तो फिल्मों के माध्यम से एक मानसशास्त्रीय युद्ध के दौरान इसे क्यों वर्जित माना जाए?

अनगिनत औरतों की अस्मत लूटनेवाले अल्लाउद्दीन खिलजी ने जब चित्तौड़गढ़ पर हमला किया और चित्तौड़गढ़ के पराजय के आसार दिखाई देने लगे तब शत्रुस्पर्श तो दूर, अपना एक नाखून तक उनके नजर न आएँ, इस सोच के साथ हजारों... हाँ, हजारों राजपूत स्त्रियों के साथ जौहर की आग में कूद कर जान देनेवाली महारानी पद्मिनी से बढकर अपमान करने लायक और कौन स्त्री हो सकती है?

अरे, आपने दो थप्पड़ जड़ दिए, कैमरा तोड़ दिया, मेरे क्रू से मारपीट की। बस्स! इससे अधिक क्या कर लोगे? मुझे इसके पूरे पैसे मिले हैं, मिलेंगे। मेरी जेब पप्पू जैसी फटी नहीं है। आप राजस्थान में लोकेशन पर मना करोगे तो जैसे बाजीराव मस्तानी में किया वैसे कम्प्यूटर से आभासी राजस्थानी महल बनाऊँगा, और हर हाल में यह फिल्म बनाऊँगा, आपकी छाती पर साँप लोटते हुए देखूँगा। और देख लेना, आप ही मेरी इस फिल्म को हिट बनाएंगे!

क्यों, पता है? आप डरपोक हो। खुदगर्ज हो। प्रत्यक्ष भगवान राम के लिए कोई उठ खड़ा नहीं हुआ। बाजीराव के समय लोग ब्राह्मण और मराठी समाज के पक्ष में खड़े नहीं हुए। अबकी देखूँगा, राजपूतों के साथ कौन, और कैसे खड़े होते हो!

क्या उखाड़ लोगे?

घंटा?

#पद्मिनी

मूल मराठी लेखः © मंदार दिलीप जोशी
हिंदी रूपांतर: © कृष्णा धारासुरकर

Tuesday, January 3, 2017

वामपंथी भारत विखंडन २ - हिटलर कुठला!!

मागच्या लेखात डाव्या विचारसरणीचा मानसशास्त्रावरचा पगडा आणि त्याचा लहान मुलांवर होणारा थेट परिणाम आपण बघितला. आजचा लेख थोडा वेगळा आहे.

भारत विखंडन २ - हिटलर कुठला!!

एक प्रश्न विचारतो. त्याचं उत्तर तुम्ही तुमच्या मनातच द्यायचं आहे. अत्याधिक शिस्तीचा भोक्ता असलेल्या व्यक्तीला तुम्ही काय म्हणाल? मग तो कुणीही असो - आईवडिलांपासून ते शिक्षक, बॉस, नवरा, बायको, वगैरे. यांच्यापैकी कुणीही नियमपालनाच्या बाबतीत अतिशय कडक असतील म्हणजे शिस्तीच्या बाबतीत कोणताही ढिलेपणा ते खपवून घेत नसतील, तर त्यांना तुम्ही काय म्हणता? अर्थात, हे नाव ठेवणं त्या त्या व्यक्तींच्या मागेच होत असणार हे नक्की. पार सातासमुद्रापलिकडच्या त्या व्यक्तीचं नाव इथे भारतात शिस्तप्रिय माणसाला हिणवायला का बरं वापरलं जातं? कोण होता तो माणूस? आठवलं ना ते विशिष्ठ नाव?

तुमच्या पैकी ९९% लोकांच्या मनातलं नाव सांगू? बरोब्बर. या प्रश्नाचं नाव अर्थातच जर्मनीचा हुकूमशहा हिटलर. बाकीचे अशा लोकांना हिटलर म्हणून मोकळे व्हायचे पण मला नेहमी प्रश्न पडायचा की अतिशय शिस्तप्रिय व्यक्तीला नेहमी हिटलरच का म्हणतात? तुमच्यापैकी कुणाला असा प्रश्न पडला असेल तर मला खूप आनंद होईल. कारण भारताविषयी आशावादी असण्यासाठी ते एक कारण असेल.

 तर, वळूया या प्रश्नाकडे. हिटलरच का?

कारण, या गोष्टीवर खूप गांभिर्याने विचार करा, कारण डाव्यांनी, म्हणजे डाव्या विचारसरणीच्या लोकांनी इतकी वर्ष आपल्याला असा विचार करायला भाग पाडलेलं आहे. आपलं व्यवस्थित कंडिशनिंग केलेलं आहे. अधिकारपदावरील शिस्तप्रिय व्यक्ती हे प्रत्येक समाजात नेहमीच आढळून आलेले आहेत, येतात. तसेच, जर्मनीचा सर्वेसर्वा म्हणून हिटलरचा कार्यकाळही फक्त १९३३ ते १९४५ इतकाच आहे. त्यातही गंमत म्हणजे हिटलरच्या विध्वंसाची सर्वाधिक झळ बसलेल्या युरोपीय देशात, इतकंच काय, खुद्द जर्मनीत शिस्तप्रिय व्यक्तींना कधीही हिटलर अशी उपमा दिली गेल्याची इतिहासात नोंद नाही. मग आपल्याकडेच का?

या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आधी आपल्याला हिटलरच्या कारकीर्दीबद्दल थोडी माहिती बघावी लागेल. नाझी पार्टीचा नेता आणि एक अत्यंत क्रूर हुकूमशहा म्हणून जग हिटलरला ओळखतं, पण सुशिक्षित जर्मन समाजाने त्याचा नेता म्हणून मुळात स्वीकार तरी का केला याची कारणं समजून घेणं आपल्या भाग पडतं.

पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला. व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीवर प्रचंड अपमानास्पद राजकीय आणि आर्थिक अटी लादण्यात आल्या. या ओझ्याखाली दबलेला जर्मनी पिचत चालला होता. एक पिढी तर नष्ट झालेलीच होती, उरलेल्या जनतेला रोज आर्थिक विवंचनेत जगावं लागत होतं. अशा परिस्थितीत जर्मनांच्या स्वाभिमानाला फुंकर घालून हिटलरने त्याच्या पक्षाला सत्तेत आणण्याची मागणी केली. सत्तेत आल्यावर ताबडतोब हिटलरने व्हर्सायच्या तहाला केराची टोपली दाखवली आणि सगळ्या अटी झुगारून दिल्या. सहा वर्षात हिटलरने जर्मनीचा कायापालट केला आणि जर्मन नागरिकांना गौरवांकित केलं. हं, हे साध्य करायला आणि त्या नंतर हिटलरने जे मार्ग अवलंबले, ते मार्ग निश्चितपणे समर्थनीय मानले जाऊ शकत नाहीत आणि मीही त्या सगळ्या मार्गांचं समर्थन करत नाही. पण फक्त सहा वर्षात जर्मनीला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणं हे खायचं काम नाही. अर्थात, या यशात मुळातच शिस्तप्रिय असणार्‍या जर्मन नागरिकांचा तितकाच मोठा वाटा आहे. कुणीतरी फेसबुकवर लिहील्याचं आठवतं - हिटलरसारखा नेता तेव्हाच सत्तेवर येतो जेव्हा त्याला पूरक अशी जनता असते. आणि म्हणूनच मोदीजींची समजा हिटलर होण्याची इच्छा झालीच तरी ते होऊ शकणार नाहीत कारण....असो.

विषयांतर आवश्यक होतं कारण ही पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. आता काही गोष्टी समजून घेऊ व मग मूळ मुद्द्यावर येऊ.

हिटलरच्या पक्षाच्या नावात समाजवादी हा शब्द होता आणि आपल्या घोषणापत्रात त्या पक्षाने समाजवादाच्याच मार्गाने जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. हिटलर स्वतःला खराखुरा समाजवादी म्हणवून घ्यायचा आणि रशियाच्या समाजवादाला बोल्शेविक कम्युनिझम असं म्हणून हिणवायचा. असं असलं तरी साम्यवाद्यांनी हिटलरच्या नाझी पक्षाशी शय्यासोबत करण्यात कुठलाच विधीनिषेध बाळगला नाही. रशियाचं आणि साम्यवाद्यांचं हिटलरशी वैर निर्माण झालं ते त्याने रशिया आणि जर्मनीमधे झालेला अनाक्रमणाचा करार मोडून थेट रशियावर हल्ला चढवल्यावर. या दु:साहसामुळे रशियासारखा बलाढ्य देश दुसर्‍या महायुद्धात उतरला आणि त्याचा परिणाम हिटलरला आणि जर्मनीला पराभवाच्या स्वरूपात भोगावा लागला. स्वतः हिटलर जीवानिशी गेला. अर्थातच जेते इतिहास लिहीत असल्याने दुसर्‍या महायुद्धात विजयी ठरलेल्या दोस्त राष्ट्रांनी आपल्या मर्जीने इतिहास लेखन केलं; जसं भारतात आधी इस्लामी आक्रमकांनी आणि मग इंग्रजांनी केलं तसंच. त्या काळात भारतात स्वातंत्र्य चळवळ जोरात होती आणि सुभाषबाबूंनी जर्मनीकडून त्या करता मदतही मागितली होती, पण ती मिळू शकली नाही.

आता भारतीय कम्युनिस्टांकडे वळूया. आधी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही पाश्चात्य देशात अतिशय शिस्तप्रिय माणसाला हिटलर हे विशेषण लावलं जात नाही. पण भारतातच हे का? हिटलरच्या उदयाची जी कारणं आपण वर बघितली त्यातलं अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे राष्ट्रवाद. आणि जोडीला जर्मन वंश शुद्धतेचा आग्रह. एक जनता, एक नेता (eine volk, eine Fuhrer) आणि एका पराभूत, हतप्रभ राष्ट्राला पुन्हा सर्वश्रेष्ठ बनवण्याचं आश्वासन (Deutschland uber alles = Germany above everything) या दोन गोष्टींनी जर्मन जनतेच्या आत धगधगत असलेल्या राष्ट्रभावनेला वणव्याचं स्वरूप दिलं. दुर्दैवाने जर्मनीला प्रगतीपथावर यशस्वीरित्या नेणार्‍या हिटलरने 'अति सर्वत्र वर्जयेत' हे न समजल्याने देशाला युद्धात लोटून शेवटी स्वतःचाही नाश ओढवून घेतला.

डाव्या विचारसरणीच्या, कम्युनिस्ट वगैरे लोकांच्या कार्यपद्धतीची तुम्हाला माहिती असेल तर राष्ट्रवाद या शब्दाची त्यांना भयानक अ‍ॅलर्जी असते. आठवा - "भारत तेरे तुकडे होंगे" वाले लालभाई. दुसरी गोष्ट म्हणजे सत्ता हस्तगत करण्यासाठी अराजक (chaos) सदृश्य परिस्थिती निर्माण करणे हा त्यांचा प्रमुख हेतू असतो. सतत कुठलं ना कुठलं तरी आंदोलन करत रहायचं. प्रत्येक समस्येवर प्रस्थापित व्यवस्थेला उद्वस्त करणं हाच एक उपाय असल्याचा त्यांचा दावा असतो. अर्थात, प्रस्थापितांना पायउतार व्हायला लावून कम्युनिस्टांनी जिथे सत्ता हस्तगत केली आहे तिथे असलेली परिस्थिती आणखी बिबिघडून लोकांना "मग आधीचेच काय वाईट होते" असं वाटायला लागलं हा भाग अलाहिदा. आझादीच्या नावाने सत्तेत आल्यावर मात्र आझादीचं नावही कम्युनिस्ट काढत नाहीत हा जगभरातला त्यांचा ढळढळीत इतिहास आहे.

जिथे शिस्त असते तिथे अराजक निर्माण करणं अवघड होऊन बसतं. मग राष्ट्रवाद आणि शिस्तीच्या जोरावर हतवीर्य झालेल्या जर्मनीला अवघ्या सहा वर्षात पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार्‍या हिटलर हा कम्युनिस्टांच्या, विशेषतः भारतीय कम्युनिस्टांच्या दृष्टीने, अन्यायाचा पोस्टर बॉय झाला. लक्षात घ्या, कम्युनिस्टांच्या दृष्टीने खरी समस्या हिटलर नसून शिस्त म्हणजे डिसिप्लिन आहे. हिटलर हा जगन्मान्य क्रूरकर्मा होता, म्हणूनच कम्युनिस्टांच्य दृष्टीने हिटलरने जे काही केलं ते त्या सगळंच वाईट, मग तो शिस्तप्रिय असल्याने शिस्तही वाईटच. मग सुरू झाला एक सुनियोजित प्रचार. ज्या व्यक्तीला शिस्तप्रिय कारभार करण्यात रस आहे तो हिटलर. एखादी व्यक्ती कडक शिस्तीची असेल तर ती व्यक्ती हिटलर. एक हरलेला विनाशकारी हुकूमशहा. हा प्रचार इतका खोलवर रुजवला गेला की हिटलरच्या कोणत्याही कृत्याला चांगलं म्हणायला तुम्ही गेलात की तुमच्यावर नाझी, फॅसिस्ट (आता समाजवादी नाझीवाद आणि फॅसिझम यात बराच फरक आहे हा भाग अलाहिदा, पण अपप्रचार करायला हे शब्द शिवीसारखे बरे पडतात), हुकूमशाहीचे समर्थक, वंशवादी - काय वाट्टेल ती लेबले काढून चिकटवली जातात. आपल्या मनात इतकी शिताफीने ही गोष्ट वर्षानुवर्ष ठसवली गेली की आपण हा आपलाच विचार असल्यागत "हिटलर कुठला" असे शब्द अगदी नित्याच्या व्यवहारात वापरत असतो.

समाज शिस्तप्रिय असेल तर तो कुठल्याही शत्रूचा निकराने सामना करु शकतो ही गोष्ट ठावूक असल्याने कम्युनिस्टांना, विशेषतः भारतीय कम्युनिस्टांना, आपल्या विरोधकांमधे नेमकी हीच गोष्ट सहन होत नाही. यांचा विरोध करणार्‍या प्रत्येकाला जेव्हा "संघी फॅसिस्ट" म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्यांना अज्ञानी म्हणून विषय सोडून देऊ नका. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कम्युनिस्टांच्या दृष्टीने शिस्त आणि राष्ट्रवादाचं प्रतीक आहे आणि अर्थातच त्यांच्या मार्गातला धोंडा आहे. याच कारणास्तव ते संघाला बदनाम करण्यासाठी विशेष जोर लावतात आणि व्यवस्थित प्रचार केल्याने ते काही अंशी यशस्वीही झाले आहेत.

कम्युनिस्टांचं यश बघायचं असेल तर आत्ताच्या जर्मनीकडे बघा. वंशशुद्धतेला पाप ठरवून मल्टी-कल्चरलिझमच्या नावाखाली इस्लामी निर्वासितांचा कॅन्सर आयात करवला आणि देशाची वाट लावली. हाच मल्टीकल्चरलिझम नामक रोग सगळ्या युरोपात पसरवून इस्लामचं सर्दीपडसं कायम चिकटवून दिलं त्याचे परिणाम आज त्या संपूर्ण खंडात दिसत आहेत. भारतात काँग्रेसवाल्यांना हाताशी धरून निर्वासितांच्या नावाखाली बांग्लादेशी मुसलमानांची बेकायदेशीर घुसखोरी अनिर्बंध चालू देण्यामागे बंगालातले कम्युनिस्टच तर आहेत!

आपल्याकडे शाळेत एन.सी.सी.चं महत्त्व पद्धतशीरपणे कमी करण्यात आलं. १९६३ साली सक्तीचं करण्यात आलेलं एन.सी.सी. प्रशिक्षण अचानक १९६८ साली पुन्हा ऐच्छिक करण्यात आलं. कारण युद्धात एन.सी.सी.चा झालेला उपयोग बघता संपूर्ण तरुणाई जर राष्ट्रभावनेने प्रेरित होऊन शिस्तबद्ध रीतीने काम करु लागली तर कम्युनिस्टांना त्यांचा कार्यक्रम रेटणं अवघड होऊन बसलं असतं. आपल्याकडे कन्ज्युमरिझम म्हणजेच उपभोक्तावादाला प्रोत्साहन देण्यामागे ग्राहकाला राजा करण्याचा हेतू नव्हता. उलट यातून ग्राहकाला आणि पर्यायाने भारतीय जनतेत "मी राजा आहे म्हणजे मला सगळं आयतं आणि बसल्याजागी मिळालं पाहीजे" या मनोवृत्तीला आणि आळशीपणाला चित्रपट आणि जाहीरातींच्या माध्यमातून पद्धतशीरपणे खतपाणी घातलं गेलं. हा विचार करताना कम्युनिस्ट मतप्रणालीच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांचं या दोन्ही उद्योगांवर असलेलं वर्चस्व लक्षात ठेवणं आवश्यक आहे. भारतीय लोक शिस्तप्रियतेसाठी कधीच प्रसिद्ध नव्हते पण आपल्यात बेशिस्त आणि आळशीपणा बळावण्याला हे दोन उद्योग प्रामुख्याने जबाबदार आहेत.

खूप मोठा लेख होईल पण चित्रपट व्यवसायाचा उल्लेख झालाच आहे तर त्यातील अनेक उदाहरणांपैकी दोन सांगितल्यावाचून हे लेखन अपूर्ण राहील.

प्रसिद्ध चित्रपट शोले तुम्ही बघितलाच असेल. नसेल तर नक्की बघा. त्यात असरानीची भूमिका ही खूप शिस्तप्रिय असलेल्या जेलरची आहे, आणि त्याच्यावर चित्रित झालेली दृश्ये बघण्यासारखी आहेत. कडक शिस्तीचा भोक्ता असलेला तो जेलर कैद्यांकडूनही पोलीस किंवा सैनिकांसारखी कवायत घेत असतो. आपण किती शिस्तीचे आहोत हे दाखवायला एक वाक्य त्याच्या तोंडात कायम असतं आणि ते म्हणजे "हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं". नेहमी तोंडाने  इंग्रजांच्या शिस्तप्रियतेचा वारसा चालवण्याचा जप चालू असला तरी असरानीचा चित्रपटातला गेटअप हा तंतोतंत हिटलरसारखाच ठेवण्यात आलेला होता. हिटलरसारख्याच मिशा आणि तसाच गणवेश त्याला चित्रपटात दाखवण्यात आला आहे. शिवाय त्याचा चित्रपटातील वावर हा विनोदनिर्मितीसाठी करुन घेण्यात आला होता. थोडक्यात काय शिस्तप्रियता ही चेष्टा करण्यायोग्य आणि हसण्यावारी नेण्याची  गोष्ट असल्याचे ही दृश्ये आपल्या मनावर ठसवण्याची एकही संधी सोडत नाहीत.

दुसरं उदाहरण म्हणजे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जींच्या "खूबसूरत" या चित्रपटाचं. हृषिदांचे चित्रपट मी सुरवातीला जेव्हा पाहिले तेव्हा खुसखुशित व दर्जेदार विनोद आणि मध्यमवर्गाचं दर्शन या गोष्टींमुळे मला खूप आवडले होते. त्या वेळी मला काही बाबी खटकत असत पण नेमकं का ते कळत नसे. बाकी सगळ्यांना काहीच वाटत नाही मग मी का बोलून वाईटपणा घेऊ म्हणून मी तेव्हा गप्प बसत असे. पण नंतर नंतर मी जेव्हा कम्युनिझम अर्थात साम्यवादाविषयी वाचन सुरू केलं तेव्हा त्या चित्रपटांतली खरी गोम लक्षात आली आणि मुळापासून हादरलो. कारण अल्प प्रमाणात असलेले अपवाद वगळले तर त्यांच्या चित्रपटात नियमबाह्य वर्तन (खूबसूरत), शुद्ध हिंदीची चेष्टा आणि उर्दूची अनावश्यक भलामण (बावर्ची - राजेश खन्ना आणि पेंटल यांच्यातला संवाद आठवा), भारतीय वेशभूषेची व संस्कृतप्रचूर हिंदीची चेष्टा (गोलमाल), आणि  भाषाशुद्धीला मूर्ख ठरवणं (चुपके चुपके) अशी कम्युनिस्ट अजेंड्याचा छुपा प्रचार करणार्‍या चित्रपटांची रांगच लागलेली दिसून आली.

तर, आपण बोलत होतो यांपैकी "खूबसूरत" या चित्रपटाबद्दल. अंजू या आपल्या मोठ्या बहिणीच्या सासरी सुट्टीत मजा करायला गेलेली मंजू (रेखा) त्या घरातल्या नियमबद्ध आणि शिस्तप्रिय वातावरणात गुदमरू लागते. तिच्या मोठ्या बहिणीला, अंजूला, काहीच त्रास होत नाही. सासरच्यांकडून मिळणारी मुलीसारखी वागणूक आणि प्रेम यांनी ती आनंदी असल्याने तिला घरातल्या कडक शिस्तीचं काहीच वाटत नाही. पण मंजूला हे सगळं पाहून स्वस्थ बसवत नाही. ती स्वतः बंड करते आणि कहर म्हणजे अंजूच्या सासरच्यांनाही तसं करायला उचकवते. ती जे काही करते त्यासाठी तिच्याकडे एक सोप्पं स्पष्टीकरण असतं - यात काहीच चूक नाही. आपल्याला यातून फक्त निर्मळ आनंद (निर्मल आनंद) मिळवायचा आहे, त्यामुळे कसलाही अपराधगंड मनात बाळगू नका. आपलं बेशिस्त वागणं पटवायला "निर्मल आनंद" हे शब्द ती घोषणेसारखे वापरते आणि त्या बरोबर अत्यंत गोड हसू सुद्धा. इतकंच काय मधल्यामधे अंजूचा धाकटा दीर तिच्या प्रेमात पडतो. अंजूच्या सासूची पाठ वळल्यावर होणार्‍या या उचापती मंजू एक नाटकवजा गाणं घराच्या गच्चीवर बसवते तेव्हा कळस गाठतात. हा चित्रपट बघितला तेव्हा हे खेळकर गाणं मला खूप आवडलं होतं. पण या गाण्याचे शब्द आज कानावर पडले तर काहीतरी वेगळीच भावना मनाचा कब्जा घेते आणि इतकी वर्ष नक्की काय विष आपल्या मनात कालवण्यात आलं ते आठवून घाबरायला होतं.

चित्रपट म्हणून खूबसूरत अत्यंत मजेशीर होता. पण चित्रपटकलेत वामियां [वामी (डावे) आणि मियां] वाक्बगार असतात. प्रत्येक विषयात आणि परिस्थितीत काही ना काही खुसपटं काढून लोकांची कशी घुसमट होते आहे हे दाखवणं ही कम्युनिस्ट भाषणांचा आणि साहित्याचा एक प्रमुख भाग असतो. यातच चित्रपटही आले. मियां लोकांची पद्धत हीच, पण जरा वेगळी असते. कदाचित म्हणूनच म्हणतात की सिनेमा बघायला जाताना डोकं घरी ठेवून जायचं असतं. पण या वाक्याचा कम्युनिस्टांना अभिप्रेत असलेला अर्थ असा की तुम्ही चित्रपट बघताना काहीही विचार करु नका, कोणतेही प्रश्न, शंका मनात येऊ देउ नका; आणि चित्रपट दाखवेल ते निमूटपणे बघा. खरंच डोकं घरी ठेवून गेलं तरी चित्रपट लोकांच्या मनावर काहीच प्रभाव सोडत नाहीत असं नक्कीच होणार नाही. तुम्ही इंटरनेट वापरत असताना तुमच्याही नकळत तुमच्या कॉम्प्युटरवर कुकीज (cookies) आणि टेम्पररी इंटरनेट फाइल्स (Temporary Internet Files) जमा होत जातात त्याच प्रमाणे कोणताही चित्रपट हा प्रेक्षकांच्या मनात भविष्यातील विचारांची बीजं रोवत जातोच.

तर, क्लासिक कम्युनिस्ट अजेंडा वाटावं असं खूबसूरत चित्रपटातलं गाण उद्धृत करुन आपली रजा घेतो.

सारे नियम तोड़ दो । नियम पे चलना छोड़ दो ।
अरे सारे नियम तोड़ दो । नियम पे चलना छोड़ दो ।
इंकलाब ज़िंदाबाद ! इंकलाब ज़िंदाबाद !
आप भी बोलिए - इंकलाब ज़िंदाबाद ! इंकलाब ज़िंदाबाद !

खाओ पियो मजा करो, खिलखिलाकर हंसा करो
कल की चिंता करेंगे कल, आज को आज ही जिया करो
सारे नियम तोड़ दो । नियम पे चलना छोड़ दो ।
अरे सारे नियम तोड़ दो । नियम पे चलना छोड़ दो ।
इंकलाब ज़िंदाबाद ! इंकलाब ज़िंदाबाद !

दिन के चौबीस घंटों में, आठ घंटे सोना है
और चार है खाना पीना, दो है रोने धोने के
कुल बाकी चार ही बचते हैं
चार में कितना काम करे, खेले या आराम करें

जिस बात में आनंद मिले, वो करने में हर्ज नहीं
हर चीज जहां पर महंगी है, हर चीज का चढ़ता पारा है
भाड़े से ऊंची बिल्डिंग में, बिल्डिंग से ऊंचा भाड़ा है
जिस बात में आनंद मिले, वो करने में हर्ज नहीं
हर चीज जहां पर महंगी है, हंसने पर खर्च नहीं
सारे नियम तोड़ दो । नियम पे चलना छोड़ दो ।
अरे सारे नियम तोड़ दो । नियम पे चलना छोड़ दो ।
इंकलाब ज़िंदाबाद ! इंकलाब ज़िंदाबाद !
सारे नियम तोड़ दो । नियम पे चलना छोड़ दो ।

निरमा वॉशिंग पावडर कशामुळे लक्षात राहते? तिच्या टीव्हीवरच्या जाहीरातीमुळे. काय विशेष आहे त्या जाहिरातीत? तर हॅमरिंग. त्या जाहिरातीतले वारंवार हॅमर केलेले शब्द म्हणजे त्या उत्पादनाचं नाव. दूध सी सफेदी, निरमा से आये, रंगीन कपडे भी खिल खिल जायें. सबकी पसंद निरमा; वॉशिंग पावडर निरमा! निरमा!! निरमा!! बघा निरमा हे नाव किती वेळा हॅमर केलंय जाहिरातीत. तसंच या गाण्यात "सारे नियम तोड दो, नियम पे चलना छोड दो" आणि "इंकलाब ज़िंदाबाद! इंकलाब ज़िंदाबाद!" हे शब्द किती वेळा बोलून हॅमर केले गेलेत ते मोजा. काय बिशाद आहे कुणी शिस्तीप्रिय बनेल!!!

ता.क. अजून भारत कम्युनिस्टांच्या प्रभावाखाली पूर्णपणे गेलेला नाही याचा प्रत्यय आणणारा दिलासादायक परिणाम दाखवणारा कालखंड नुकताच येऊन गेला. नोटबंदीच्या काळात काँग्रेसच्या पप्पूपासून ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांपर्यंत सगळ्यांनी कामगार व शेतकरी वर्ग आणि मध्यमवर्गीयांचा कैवार घेऊन ते किती त्रासात आहेत हे दाखवून "देशात दंगली होतील" असे थेट इशारे देत जनतेला सरकारविरुद्ध हिंसात्मकरित्या भडकवण्याचा प्रयत्न केला. पण देशात राष्ट्रवादाची नव्याने पेरणी केलेल्या पंतप्रधान मोदीजींनी जनतेच्या मनावर असं काही गारुड केलं की जनतेने अशांना अभूतपूर्व संयम व शिस्तीचं दर्शन घडवत व्यवस्थित फाट्यावर मारलं.

© मंदार दिलीप जोशी - मराठी रूपांतर व संपादन
प्रेरणास्त्रोत / मूळ  हिंदी लेखन - आनंद राजाध्यक्ष
पौष शु. ५, शके १९३८

या आधीचा लेखः वामपंथी भारत विखंडन १ - छडी लागे छम छम